सय्यद जहीर लोणार /बुलढाणा
morcha:दिनांक २६/५/२०२५ रोजी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले
असून पंचायत समिती लोणार येथून दुपारी १२.०० वा. या संदर्भात मा. तहसील कार्यालय लोणार यांना निवेदन देण्या करीता मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहून राज्य सरकारकडे प्रत्येक शेतकरी कर्जमाफीचे निवेदन देणार असून ग्रामीण भागामध्ये
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन (sameerkunawar)
कर्जमाफीचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून स्वतः शेतकरी फॉर्म भरून घेत आहे, तसेच किसान ब्रिगेडचे सर्वेसर्वा श्री प्रकाश पोहरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मागील त्याला पिक विमा द्या शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा दोन्ही संघटनेच्या नेतृत्वाखाली वरील दोन्ही मागण्या संदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे.
प्रत्यक्ष शेतकरी स्वतः निवेदन देणार आहे याची संपूर्ण माहिती दिनांक 22 मे रोजी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन लोणार यांना निवेदनाद्वारे दिली आहे , निवेदन आपण आपल्या स्तरावर स्वीकारावे प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पोच देण्यात यावी याकरिता आपण या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना कुठे अडथळा येऊ नये म्हणून आपण आपल्या स्तरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व तसेच आमच्या या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फक्त पिण्याचे पाणी आपल्या कार्यालामार्फत उपलब्ध करून देण्यात यावी अशी निवेदनामध्ये मागणी केली.
या मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केले असून यांनी संबंधित संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.
morcha:की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी या मोर्चात सामील व्हा असे आव्हान शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे, श्री दिलीप चौधरी, श्री गजानन जायभाये व इतर शेतकऱ्यांनी केली आहे