नगरपरिषद शिक्षक संघटनेतर्फे मुख्याधिकारी टाले यांचे स्वागत ( Murtijapurnews )

 

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

 

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघातर्फे मूर्तिजापूर नगरपरिषद मध्ये नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी एस.एस.टाले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण ( eknathshinde )

यावेळी नगरपरिषद शाळांच्या समस्यांचा मुख्याधिकारी यांनी आढावा घेऊन भौतिक सुविधा पुरविणे,रिक्त पदावर शिक्षक भरती करणेबाबत तसेच शिक्षक-कर्मचा-यांना भेडसावणा-या समस्या टप्प्याटप्प्याने निकालात काढून नगरपरिषद शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांना दिले.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Murtijapurnews: प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने उपस्थित होते.म.रा.नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक-प्रदेशाध्यक्ष,प्राचार्य जयदीप सोनखासकर,अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद गांजरे,जिल्हा सचीव सुभाष मोहिते,प्रसिद्धीप्रमुख हेमंत शास्त्री,मुदस्सीर खान,स्वप्नील हनवते,विलास वनस्कार आदी उपस्थित होते.

Leave a Comment