चुकूनही फळे व भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका, अन्यथा भोगावे लागतील त्याचे दुष्परिणाम ( health)

0
1

 

आपल्या फ्रिजमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी अनेक कप्पे असतात.

जसे की, मसाले, दूध, पाणी, अंडी इ. पदार्थ आपण सर्वजण फ्रिजमध्ये ठेवतो. त्यासोबतच आपण फळे आणि भाजीपाला देखील फ्रिजमध्ये फ्रेश राहण्यासाठी ठेवतोच.

मार्केट मधून हिरवागार भाजीपाला आणला की तो लगेचच वाळून जाण्याची शक्यता असते.healthtips

उन्हाळ्याच्या दिवसांत तर या गोष्टी लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ते लगेचच फ्रिजमध्ये ठेवतो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

परंतु काही वेळा घाईगडबडीत आपण फळे आणि भाजीपाला एकत्रच फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र फळे आणि भाजीपाला फ्रिजमध्ये वेगवेगळे ठेवण्यासाठी तसे कप्पे दिलेले असतात. कारण फळे व भाज्या हे वेगवेगळेच ठेवणे गरजेचे असते.

या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता असते. यामागे एक खूप महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे फळांमधून एकप्रकारचा नैसर्गिक असा इथालियन गॅस तयार होतो.health

फळे नैसर्गिकरित्या तयार व्हावीत, यासाठी या गॅसची निर्मिती होणे आवश्यक असते आणि त्याप्रकारे फळे पिकतात.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

फळे व भाज्या एकत्र ठेवल्याने नेमकं काय होते :सफरचंद, केळी यांसारयांसारख्या काही फळांमधून इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात गॅसची निर्मिती होत असते.

त्यामुळे ती खूप लवकर पिकतात आणि फळांमधून निर्माण होत असलेल्या गॅसमुळे भाज्या ताबडतोब खराब होतात. हे दोन्ही एकत्र ठेवल्याने भाज्यांचा टेक्स्चर आणि प्लेवर बदलतो व त्याची मूळ चव जाऊ लागते.

health:जसे की काकडी पिवळी होणे, पालेभाज्यांचा टवटवीतपणा कमी होऊन त्या मऊ पडणे, फळभाज्या वेळेआधीच पिकणे. यासाठी फळे आणि भाजीपाला एकत्र मुळीच ठेवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here