revenuenews:बुलडाणा, दि. 23 : सिंदखेडराजा येथे अवैध वाळू विरुद्ध कारवाई करण्यात आली. यात तहसीलदार प्रविण धानोकर यांनी कारवाई करत 500 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला.
जप्त केलेला वाळू साठा त्याच ठिकाणी लिलाव केला. ही कारवाई अभिनंदनीय असून अशाच प्रकारच्या कारवाई इतरही ठिकाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर मेहकरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. एकाच कारवाईत 500 ब्रासचा वाळू साठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
जप्त करण्यात आलेली वाळू त्याच दिवशी जागेवर लिलाव करून संबंधितांना देण्यात आली.
सिंदखेड राजा येथे अवैध बाळू विरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे.
सिंदखेड राजा येथील चमूने हे एक उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. जिल्ह्यातील तहसिलदारांनी अवैध वाळू साठाच्या ठिकाणांचा तपास घेवून तात्काळ अशीच कारवाई करावी. अशा संकलित केलेल्या साठ्यावर छापा टाकून जागेवरच लिलाव करावा.
याबाबत संपूर्ण मदत जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. तसेच जिल्ह्यातील गाव, परिसरनिहाय वाळू माफियांची ओळख पटवावी. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल होतील याची खातरजमा करावी, त्यांच्या विरुद्ध स्थानबद्ध किंवा एयपीडीएची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली आहे.
revenuenews:सिंदखेड राजा चमूने खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटीचा शोध घेऊन वाळू उपसा साठी लागणारे साहित्य त्याच ठिकाणी नष्ट केले.
00000
crimenews:बुलढाणा: शहरातील चिंचोले चौक परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार , २० मे च्या दुपारी उघडकीस आली.
साक्षी संजय कथने असे मृतक तरुणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार साक्षी घरी एकटी असताना तिने गळफास लावला.
घरचे घरात आल्यानंतर साक्षीने गळफास घेतल्याचे दिसताच तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला.
crimenews:मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षीने आत्महत्या का केली? हे अद्याप कळू शकले नाही.
murdernews:बुलढाणा: सासुरवाडीत येऊन पत्नीची चाकूने हत्या करून दोन मुलींची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास बुलढाणा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
गजानन विश्वनाथ जाधव रा. जालना असे आरोपीचे नाव असून आज २० मे रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे.
सदर घटना त्रिशरण चौकातील स्मशानभुमी नजीक जगदंब नगर येथे घडली होती. ९ ऑगस्ट २०२१ रोजी मृतक पुजा उर्फ गिता ही वडिलांच्या घरी एकटी असतांना तिच्या चारीत्र्यावर संशय घेउन पती गजानन विश्वनाथ जाधव (३५ वर्ष) याने चाकुने सपासप वार करून तिचा खून केला होता. या प्रकरणाची तक्रार पूजाचे वडिल सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसांत दिली.
त्यानुसार ते, शहरातील स्मशानभुमी नजीक जगदंबा नगरात राहतात. सन २०११ मध्ये मुलगी पुजा उर्फ गीता हिचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे गजानन विश्वनाथ जाधव (रा.जालना) याच्यासोबत लावून दिले. लग्नानंतर पूजाला ३ मुली झाल्या. आरोपी गजानन हा नेहमी पत्नी पुजाच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करायचा. शारीरिक व मानसिक छळाने पूजा त्रस्त झाली होती. फिर्यादी पुजाचे वडील सुरेश तायडे नेहमी पूजा व आरोपी गजानन यांना समज द्यायचे त्यानंतर पूजाला तिच्या सासरी नांदायला पाठवत होते.
शेवटी गजाननच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजा घटनेच्या दीड महिन्याआधी आपल्या दोन मुलींसह माहेरी अर्थात बुलढाण्यात आली होती. त्यांनतर ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता तिचा पती गजानन हा देखील जालन्यावरून बुलढाणा येथे आला. रात्री जेवण करून सासऱ्याच्या घरी मुक्कामी थांबला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी ९ च्या दरम्यान पुजाचे वडील सुरेश तायडे, त्यांची पत्नी व मुलगी अश्वीनी हे बाहेर कामानिमित्त गेले होते. व पुजा उर्फ गीताच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या त्यावेळी क्रूर गजाननच्या डोक्यात पत्नीचा खून करण्याचा प्लॅन होता. घरात एकटेपणाचा फायदा घेवून गजाननाने पुजावर चाकूने सपासप आठ वार केले. यात ती गंभीरित्या जखमी झाली अखेर तिची निघृणपणे हत्या झाली.
इतक्यावरच न थांबता आरोपी गजानन ने बाहेर खेळत असलेल्या आपल्या दोन्ही मुलींना आपल्यासह जिवे मारण्याच्या उद्देशाने उचलून संगम तलाव गाठले आणि उडी घेतली. परंतु दैव बलवत्तर म्हणून तलावावर असलेल्या लोकांनी तिघांचेही प्राण वाचविले . त्यानंतर आरोपी गाजनान स्वतः बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला.
त्याने गुन्हयाची कबुली दिली असल्यामुळे संबंधीत पोलीस उपनिरीक्षक गवारगुरू यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत शेजारी लोकांनी मयत पूजा उर्फ गीता हिला सरकारी दवाखाना बुलढाणा येथे नेले असता तीची प्राणज्योत मालवली होती. त्यांनतर उपनिरीक्षक गवारगुरू यांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी दोन रक्ताने भरलेले चाकू व रक्ताचे नमुने मिळाले. त्यानंतर मृतक पूजाचे वडिल वडील सुरेश दत्तू तायडे यांनी बुलढाणा शहर ठाण्यात घटनेची रितसर तकार दाखल केली. त्यानुसार आरोपी गजानन विरोधात भा.द.वि.चे कलम ३०२ व ४९८ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास अधिकारी गवारगूरू यांनी उर्वरीत गुन्हयाचा तपास करून भा.द.वि.चे कलम ३०२,३०७, ३०९, ३३६, ४९८-अ व आर्म ॲक्टचे कलम ४,२५नुसार वि. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर सत्र खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरुध्द दोषसिध्द होण्याच्या दुष्टीकोणातुन जिल्हा सरकारी वकील . वसंत लक्ष्मणराव भटकर यांनी १६ साक्षीदार तपासले. त्यापैकी घटनास्थळी शेजारी रहाणा-या साक्षीदार स्वाती चव्हाण, सविता सावंत, दिनकर पवार व संतोष खिल्लारे यांची साक्ष महत्वाची राहिली त्यांनी आरोपीला घटनास्थळावरुन जातांना पाहिले होते. तसेच मृतक व आरोपी गजानन यांची मुलगी श्रुती हिने सुध्दा महत्वाची साक्ष दिली.
एकंदरीत घटनास्थळावरुन आढळुन आलेली परिस्थीती व वैदयकीय पुरावे एकत्र असल्याने तसेच आरोपीचे कपड्यावर, व घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चाकुवर रक्त मिळुन आल्याने तसेच सर्वात महत्वाचे फिंगर प्रिट एक्स्पर्ट यांना एका चाकुवर आरोपीची फिंगरप्रिंट मिळुन आल्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाला आहे. विशेष बाब म्हणजे सदर सत्र खटल्यामध्ये सर्व साक्षीदाराने सरकार पक्षास मदत केलेली आहे व मृतकाला न्यायदेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एकंदरीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद केला.
त्या अनुषंगाने विदयमान जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ बुलडाणा श्री. एस. बी. डिगे यांनी आरोपी गजानन जाधव यास भादवी कलम ३०२, ३०७, ४९८३, ३०९, ३३६ प्रमाणे व आर्मस ॲक्टचे कलम ४, २५ प्रमाणे दोषी ठरवुन भादवीचे कलम ३०२ नुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न
भरल्यास सहा महिने अधिकची सक्त मजुरी, भांदवीचे कलम ३०७ नुसार सुध्दा जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तिन महिने अधिकची सक्त मजुरीची शिक्षा, भादवीचे कलम ४९८ अ नुसार तिन वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिना अधिकची सक्त मजुरीची शिक्षा तर आर्मस ॲक्ट चे कलम ४, २५ नुसार सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अधिकची साध्या कारावासाची शिक्षा अश्याप्रमारे सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचे आहे.
murdernews:तर सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी सुधाकर गवारगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट रामेश्वर गाडवे तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. कांबळे यांनी पुर्णपणे सहकार्य केले.
Yavalnews:यावल: तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी ,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत दि. २० मे रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा एकाच तिथीवर एकाच तारीख वैशाख शुद्ध बारसला गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा श्री समर्थ वासुदेवबाबा दरबार चुंचाळे येथे साजरा होत आहे.
चुंचाळे हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून येथे १२५ वर्षांपूर्वी श्री समर्थ सुकनाथ बाबांनी १२ वर्षे तप केला म्हणून चुंचाळे ता. यावल ही त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते.
श्री समर्थ रघुनाथ बाबा हे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचे पुत्र,शिष्य असुन चुंचाळे हे त्यांचे जन्मस्थळ असुन सुकनाथ बाबांचा नात सांप्रदायाच्या गादीचा वारसा त्यांनी चुंचाळे येथे पुढे सुरू ठेवला.
सन १९३५ मध्ये फाल्गुन शुद्ध पाडवा श्री समर्थ सुकनाथ बाबा व १९७९ वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ रघुनाथ बाबा समाधीस्थ झाले आहे. दोघं पिता-पुत्रांची समाधी वर्डी तालुका चोपडा येथे आहे.
श्री समर्थ वासुदेव बाबा हे श्री रघुनाथबाबा यांच्या जवळ वर्डी तालुका चोपडा येथे राहत असत. श्री समर्थ रघुनाथ बाबांनी श्री समर्थ वासुदेव बाबांना वरणगाव जवळचे फुलगाव येथे हनुमान मंदिरात गुरुमंत्र दिला होता.
श्री समर्थ रघुनाथ बाबा १९ ७९ मध्ये चोपडा येथे समाधीस्थ झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्य श्री वासुदेव बाबा यांना चुंचाळे तालुका येथे जाऊन नाथ संप्रदायाची पताका उंच कर व जनसामान्याच्या संपर्कात राहून त्यांचे कामे कर असा आदेश श्री रघुनाथ बाबांनी दिला.
त्यावेळेस श्री समर्थ वासुदेव बाबा हे चुंचाळे ता.यावल येथे आले . त्यांनी सर्वात पहिले काम म्हणजे गावामध्ये दोन गटांतील धर्माची भिंत पाडली व ती तेड मिटवली व सर्वांना एकत्र करून गावाचा तसंच मंदिराचा विकास केला.
अंधश्रद्धेला कधीही खतपाणी घातले नाही.
श्री समर्थ वासुदेव बाबा हे बालब्रह्मचारी होते, सर्व भक्तच हा त्यांचा मला मोठा परिवार आहे. त्यांनी कधीही जादू टोंना, छु-छा, धागा दोरा केली नाही.
जुन्या मठाचे भल्यामोठ्या दरबारात रूपांतर.श्री समर्थ वासुदेवबाबा चुंचाळे येण्याच्या आधी गावात एक पुरातन मठ होता त्या ठिकाणी एक फक्त जुनी समाधी होती ,बांधकाम मात्र कोणतेही नव्हते श्री समर्थ वासुदेवबाबांनी गावकऱ्यांच्या, परिसराच्या, व श्री सुकनाथ बाबा, श्री रघुनाथ बाबा व त्यांच्या सर्व भक्तांच्या मदतीने गावात भलेमोठे मंदिराचे निर्माण केले. महाराष्ट्र सह गुजरात, मध्य प्रदेश मध्ये त्यांचे शिष्य मोठ्या प्रमाणात आहे.
गावात शिक्षणाची सोय नसल्याने उभारले विद्यामंदिर.
चुंचाळे गावत इ.१ ते इ.४ पर्यंत जि.प.ची मराठी शाळा होती,पुढील शिक्षणाची सोय नसल्याने मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहत असत. पुढील शिक्षणासाठी मुली बाहेरगावी पाठवण्यास पालक वर्ग नाराज राहत असे, त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव श्री समर्थ वासुदेवबाबांनी इ.५ ते इ.१२ पर्यंतचे विद्यामंदिर गावात उभारले आहे. आज या ठिकाणी गावातील तसेच परिसरातील मुले, मुली शिक्षण घेत आहे.
असा आगळावेगळा आणि दुर्मिळ गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा.गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा हे वैशाख बारसला १९७९ मध्ये समाधीस्थ झाले. त्यांच्या गुरुची पुण्यतिथी श्री वासुदेव बाबा चुंचाळे येथील मंदिरात आंब्याचा रस व पुरणपोळी प्रसाद देऊन साजरे करत असत. श्री समर्थ वासुदेवबाबा गावातील भक्तांना सांगायचे ,की मी ज्यावेळेस नसेल त्यावेळेस माझ्या गुरुची पुण्यतिथी (श्री समर्थ रघुनाथबाबा) अशीच तुम्ही साजरी करत चला, तेव्हा शिष्यमंडळ म्हणायचं की जसे तुम्ही तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात, तशी आम्ही आमचे गुरु म्हणजे ( श्री समर्थ वासुदेवबाबा)तुमची पुण्यतिथी साजरी करत जाऊ ,यावर श्री समर्थ वासुदेवबाबा हसत म्हणायचे काही हरकत नाही माझी पुण्यतिथी आणि व माझ्या गुरुची पुण्यतिथी एकच राहील. याचाच प्रत्यय म्हणून श्री समर्थ वासुदेवबाबा यांनी सन २००० साली श्री समर्थ रघुनाथबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ वासुदेव बाबांनी आपल्या देहाचा त्याग केला. त्यांचे समाधी स्थळ चुंचाळे ता. यावल या ठिकाणी आहे म्हणूनच सण २००१ सालापासून गुरु श्री समर्थ रघुनाथबाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेवबाबा असा दुर्मिळ योग असलेला गुरु आणि शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक २० मे वैशाख शुद्ध बारसला चुंचाळे येथे सालाबादप्रमाणे साजरा होत आहे.
विशेष म्हणजे श्री समर्थ वासुदेव बाबा यांचे मंदिर शिरपूर जि.धुळे, विखरण ता. एरंडोल येथे भक्तांनी प्रशस्त असे बनवले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप.सकाळी ६.०० वाजता आरती ७.०० ते १०.०० बजने व भारुडे,११.०० महाआरती, १२.००ते ५.०० महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकनाथ बाबा, श्री रघुनाथ बाबा, श्री वासुदेवबाबा यांचे शिष्य मंडळ व चुंचाळे -बोराळे तसेच परिसरातील गावकऱ्यांनी आवहान केले आहे.
Yavalnews :रात्रभर गावातील महिला जागरण करून या खापरावरच्या पुरणपोळ्या तयार करतात , यामध्ये पूर्ण गाव जसा काही आपल्या घरचाच कार्यक्रम आहे, असे गावातील नवतरुण, अबाल ,वृद्ध, पुरुष व महिला पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभर काम करून हा कार्यक्रम आनंदाने पार पाडतात.
[ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा]
संग्रामपूर (रामेश्वर गायकी)
river bridge:संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना.
आज दि. 18 /मे रोजी सकाळी घडली आहे. यात शेतकऱ्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले असून बैलगाडी अडकल्याने चार जणांचे प्राण वाचले आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की आज दि .18 /मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट (बकाल )येथे गुरांचा आठवडी बाजार असल्याने काकोडा येथील राजू कौळकार व त्यांचे 3 सहकारी हे बैल खरेदी विक्रीसाठी जात असतांना काथरगाव जवळील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून जखमी झाला.
तर चार जण व मागे बांधलेले बैल बचावले. सदर घटना ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे घडली आहे, शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी. अशी ग्रामस्थ व सरपंच यांच्याकडून मागणी होत आहे.
दि. 22 /जून 2023 रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगाव नदीच्या पुलावरील कठड्याचे नुकसान झाल्याने सार्व. बांधकाम विभागाने ते काढून नेले.
त्यानंतर ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून व फोन द्वारे कठडे बसविण्याची मागणी करूनही अद्याप कठडे बसवली नाहीत.
त्यामुळेच नुकसान झाले आहे.ह्यापूर्वी ही दुचाकी,चारचाकी वाहन प्रवाश्यांचे किरकोळ घटना घडल्या आहेत.
river bridge:तरी शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान भरपाई न मिळाल्यास महाराष्ट्र प्रदेश किंवा काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
murtijapurnews:दिनांक 8/5/2024 रोजी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्या मध्ये ओटीपी मध्ये कर्मचारी यांनी ऑन ड्युटी वाढदिवस साजरा केला या निमित्तानेऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुका मध्ये नीवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.. लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय मुर्तीजापुर तालुका मध्ये.. आन ड्युटी रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला आहे . ओपीडी च्या वेळेत त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे..
अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आले आहे.. रुग्णांना सोडून रुग्णांची देखभाल न करणे याबाबत निवेदन सादर करण्यात आले..
वैद्यकीय अधीक्षक साहेब मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.. तसेच जिल्हाधिकारी साहेब अकोला जिल्हा शल्य चिकित्सक साहेब अकोला यांच्याकडे मागणी करण्यात आली लवकरात लवकर कार्यवाही करून सर्वांना निलंबित करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा मूर्तिजापूर तालुक्यात ऑल इंडिया पॅंथर सेने तर्फे जन आंदोलन उभा करण्यात येईल अशा इशारा जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांनी दिला आहे..
murtijapurnews:यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव तालुका उपाध्यक्ष गंगा ताई गवई तालुका महासचिव रफिक शहा तालुका संपर्क प्रमुख मंगेश बागळे आदी मान्यवर उपस्थित होते…
crimenews:बुलढाणा: खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय नर्स वर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची तक्रार पीडित नर्सने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पापी २३ वर्षे तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गजानन बोराडे ( रा.जुनागाव) असे या वासनांध तरुणाचे नाव असून तोदेखील एका खाजगी रुग्णालयात ब्रदर्स म्हणून नोकरी करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत नर्स बुलडाणा शहरातीलच राहणारी आहे. पिडीत नर्स आणि आरोपी विशाल २०२० मध्ये शहरातील एका हॉस्पिटल मध्ये नोकरीला होते.
तिथेच दोघांची ओळख आणि त्यातून मैत्री निर्माण झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे देखील सुरू झाले. पुढील काळात विशालने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याचाच उपयोग करून विशाल तिला बदनामीची धमकी देऊ लागला, त्यामुळे पुन्हा वारंवार विशालने त्याची शारीरिक भूक भागवली. पिडीत नर्स च्या मुलांना जिवे मारून टाकीन अशी धमकी देखील विशालने दिल्याचे पिडीत नर्स ने तक्रारीत म्हटले आहे.
crimenews:तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिडीत नर्स ही अनुसूचित जातीची असल्याने यात ॲट्रॉसिटीचे देखील कलम समाविष्ट करण्यात आले असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.
crimenews:येथील तालुक्यातील डांभुर्णी गावात शेतात रोटावेटर करीत असताना.
ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल जाऊन रोट्याव्हेटर मध्ये अटकून तरूणाच्या शरीराचे तुकडे तुकडे होवुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना दुपारीच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ,डांभुर्णी तालुका यावल येथील राहणारा विजय जानकीराम कोळी बाविस्कर वय३५ हा रोटावेटर करण्यासाठी शेतात गेलेला असता दिनांक १४ मे २o२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटावेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.
याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची सीआरपीसी १७४प्रमाणे नोंद करण्यात आली असुन,पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत
सदर मयताचे मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शिवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला,
brekingnews:शेगांव ,१९ वर्षीय युवतीला एकटे पाहुन घरात प्रवेश करून रवी हाडोळे या युवकाने विनयभंग केल्याची घटना दि.१५ मे २०२४ रोजी रात्री १२ वाजता दरम्यान माळीपुरा येथे घडली.
हकिकत अशा प्रकारे आहे की फिर्यादी हिचे घराचे बांधकाम सुरू असल्याने फिर्यादी तिचे आत्या यांच्याकडे राहते .व आई-वडिल बाजूला भाडयाची खोली करून जवळच राहतात फिर्यादी ही आत्याचे घरी आत मध्ये एकटी बसलेली होती आत्या हि बाजुच्या घरी गेलेली असल्याने घराचा समोरील दरवाजा लोटलेला होता.
त्यावेळी अचानक रवि गजानन हाडोळे याने धराचे आत मध्ये प्रवेश करून फी खुर्चीवर बसलेली असता फी चा उजवा हात पकडुन फीला वाईट उददेशाने जवळ ओतुन कवठयात पकडून मिठी मारली त्यामुळे फि जोराने आरडा ओरड केली.
असता त्याने फिला दमदाटी करून ओरडू नको असे म्हणून जिवाने मारण्या धमकी दिली फि परत जोराने ओरडली असता रवी हाडोळे घाबरून घरा बाहेर पळून गेला.
brekingnews:.याप्रकरणी पीडीत युवतीने शहर पो.स्टे ला फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपी रवि गजानन हाडोळे जात-माळी रा.माळीपुरा शेगाव याचे विरूध्द अप. नं. २६५/२०२४ कलम ३५४, ४५२,५०६ भादवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास मा पो नी सा आदेशाने पोहेका विनायक सरोदे हे करीत आहेत.
Amravtinews:अमरावती :- अंजनगाव सुर्जीचे श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे पिताश्री देवनाथ परंपरेतील ज्येष्ठतम नाथभक्त विद्वतवरेण्य दत्तात्रय केशव लोमटे यांचे आज वृद्धापकाळाने अमरावती येथे निधन झाले.
ते १०० वर्षांचे होते. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले दत्तोपंत हे मूळ बडनेरा येथील असून त्यांचे पश्चात पत्नी सौ कुसुम, मुकुंद , माधव , मोहन ही मुले तसेच कुलकर्णी , प्रचंड, मंजू कुऱ्हेकर या मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.
अंजनगाव सुर्जीचे पूर्व पीठाधिपती सदगुरु मनोहरनाथ महाराज यांचे अनुग्रहित असलेल्या दत्तोपंत लोमटे यांना त्यांच्या निःस्पृह नाथसेवेबद्दल ज्योतिषपीठ बद्रीकाश्रमचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून विद्वतवरेण्य हि उपाधी प्राप्त झाली होती.
दत्तोपंत लोमटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वयंसेवक होते त्यांनी संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांच्यासह रेल्वे प्रवास देखील केला होता. बंगालच्या शांतिनिकेतन मध्ये असताना त्यांना रवींद्रनाथ ठाकूर यांचादेखील सहवास लाभला.
मधुराद्वैत संप्रदायाचार्य ज्ञानेश्वरकन्या गुलाबराव महाराज यांचे शिष्य बाबाजी महाराज पंडीत आणि श्री भाऊजी गिरणीकर यांनी दत्तात्रय लोमटे यांना ज्ञानेश्वरी पारायण व्रत सुपूर्द केले. दत्तात्रय लोमटे यांची निस्सीम भक्ती पाहून गोविंदनाथ महाराजांनी उत्सव साजरा करण्याचा संकेत दिला.
नाथांचा संकेत ही आज्ञा मानून दत्तोपंत लोमटे यांनी १९५१ पासून ज्ञानेश्वरी पारायण आरंभिले आणि गोविंदनाथ महाराज यांचे आज्ञेनुसार स्वतःचे घरीच माऊलींचा संजीवन समाधी पुण्यतिथी उत्सव प्रारंभ केला. अगदी ७-८ व्यक्तीच्या उपस्थितीत प्रारंभ झालेला हा उत्सव आज लोमटे परिवाराची चौथी पिढी असंख्य नाथभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करते.
आध्यत्मिक अधिष्ठान लाभलेले दत्तात्रय लोमटे यांनी आपले गुरुवर्य सद्गुरू मनोहरनाथ महाराज यांचे जीवनचरित्र सांगणारा श्रीमनोहरभक्तीरसामृत या नावाचा ओवीबद्ध पारायणग्रंथ रचला आहे.
Amravtinews:दत्तोपंतांच्या निधनावर ज्योतिषपीठ शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलताई मेढे ,विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत हरताळकर, विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवाल , भारतीय शिक्षण मंडळाचे डॉ नितेश सिंह , श्रीनाथ सखा साधक वृंद, जगद्गुरू देवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्था आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. देवनाथ मठ परिवारात चालता बोलता विश्वकोश असलेल्या स्व दत्तोपंताच्या पार्थिवावर अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत बुधवार १५ मे रोजी अंत्यसंस्कार केले जातील. अंतिमयात्रा सकाळी १० वाजता त्यांच्या दस्तूर नगर येथील निवासस्थानातून निघेल.