Home Blog Page 13

Banknews/कर्मचाऱ्यांच्या खिश्याला कात्री लावून नेत्यांचे वाढदिवस साजरे केल्या जातात. 

0

 

मुख्य संपादक: अनिलसिंग चव्हाण

[ ही प्रथा बंद होईल का?]

संग्रामपूर ः- दिवसेंदिवस लोकप्रियतेसाठी आज-काल वाढदिवसाची साजरे करण्याची परंपरा दृढ होत आहे. खाजगी, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक ,सहकार व इतरही क्षेत्रात यांची चांगलीच दाटी पाहायला मिळते. परंतु यामध्ये अनेक पुढारी,नेते,पदाधिकारी त्यांचा वाढदिवस साजरा करीत असतांना काही स्वखर्चातून तर काही सामाजिक आणि राजकीय, सहकार क्षेत्रात संबंधित सामाजिक कार्यकर्ता व राजकीय क्षेत्रात संबंधित राजकीय नेते यांचे वाढदिवस कार्यकर्ते साजरा करत असतात.

परंतु अशी एक अर्थ संस्था आहे की जे विश्वातील सातही खंडात मान्यता प्राप्त आहे .आणि या अर्थसंस्थेचे अर्बन सह शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य आहे. म्हणून या संस्थेची उलाढाल ही अर्बोखर्बो मध्ये असते. या संस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अगणित आहे.

विश्वातील सात खंडात असलेला सर्वात मोठा खंड आशिया खंड या आशिया खंडातील नामवंत अशा संस्थेत, जेव्हा त्यांच्या आला चे वाढदिवस साजरे करतात, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावल्या जाते. अशी संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तसेच सहकार ,खाजगी शिक्षण संस्था मध्ये बोल्ड चर्चा दिसून येते.

व अधिकारी ,कर्मचारी दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमाह कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याचा घर खर्च भागवतांना किती धावपळ होत असेल अशातच वर्षाकाठी आला (आपले नेते) यांचे तीन ते चार वाढदिवस साजरे करावे लागतात. याची चांगलीच चर्चा कर्मचारी वर्गात दिसून येते.

Banking /तरी व्यवस्थापन मंडळ कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक लुटीचा विचार करून त्यांच्या मानगट्टीवर करीत असलेले हे वाढदिवस बंद करेल काय ?

Atulvandile /वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून नियुक्ती

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती स्वीकारण्यात आली.
या नियुक्ती प्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी आमदार सुनिल भुसारी, माजी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुल वांदिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सामाजिक चळवळींसाठी आणि युवकांच्या संघटन कार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याचा गौरव करत प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही संघटन बळकट करण्यासाठीचा ठोस निर्णय आहे.”

या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नव्या उत्साहाने आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या पक्ष म्हणून उभा राहील, असा विश्वास नव नियुक्त जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केला.

Atulvandile/वांदिले यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषदा आणि ग्रामीण भागातून अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर “योग्य व्यक्तीला मिळालेली योग्य जबाबदारी” अशा शब्दांत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले जात आहेत

Crimenews/मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीवर वर्धा गुन्हे शाखेची कारवाई — पाच जणांच्या अटकेसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवून मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले.

दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, वैष्णवी नगर येनोरा माता मंदिर रोड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. त्यावेळी एक सिल्व्हर रंगाची महिंद्रा एक्स.यु.व्ही. 500 (क्र. एम.एच. 43 ए.एल. 9294) वाहन पकडण्यात आले.

तपासात आरोपी (1) अक्षय विनोद डेहणे, (2) सुजीत अशोकराव गावंडे, आणि (3) मोहन हरिभाऊ टिचकुले, हे तिघेही हिंगणघाट येथील रहिवासी असून, ते संगणमताने मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळले. पुढील तपासात हा माल आरोपी (4) निखील रामनवार व (5) स्वप्नील शर्मा (दोघेही हिंगणघाट) यांच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.

कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 08.53 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, कार व मोबाईलसह रु. 10,42,120/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

/Crimenews/ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी व पथकातील कर्मचारी मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक, विनोद कापसे व अखिल इंगळे यांनी केली.

Hingnghatnews /विकास विद्यालय, हिंगणघाट – सत्र 1993 च्या विद्यार्थ्यांचे 32 वर्षांनंतर भव्य स्नेहसंमेलन संपन्न

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: विकास विद्यालय, हिंगणघाटचे इ.10 वी सत्र 1993 चे विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न करून तब्बल 32 वर्षांनंतर एक भव्य स्नेहसंमेलन 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केले. या विशेष प्रसंगी निवृत्त शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानाने कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ शिंदे सर होते. त्यांच्यासोबत मंचावर अंकुश खोके सर, गावंडे मॅडम, नांदुरकर मॅडम व खुपसरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे मुलींना चोळी, बांगडी व साडी देऊन ‘भाऊ’ म्हणून सन्मानित करणे — यामुळे संपूर्ण शिक्षकवर्ग भावूक झाला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सन्मानाने भारावून जाऊन सांगितले, “आम्ही घडवलेले विद्यार्थी आज ज्या प्रकारे आमचा सन्मान करत आहेत, तोच आमच्यासाठी खरा गुरुदक्षिणेचा क्षण आहे.”
विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवनप्रवासातील सुख-दुःख शेअर केले, कुटुंबियांचा परिचय करून दिला. या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश होता – बालपणीचे मित्र पुन्हा एकत्र आणणे, शिक्षकांचा सन्मान करणे आणि नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करणे.

कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले – अनिल निकोडे, किशोर ठाकरे, करीम खान, विनोद वाघमारे, रुपेश नेहरोत्रा, छोटू खापरे, जगदीश चंदनखेडे, गजानन वराडे, जागेश्वर कोरडे, जगदीश सटोणे, मुनेश्वर उरकुडे, नरेश चाटगे, राजू शिंदे, रवी धात्रक, सीमा परबत (झाडे), अनिता घरट (खांडवये), गीता राऊत (भोरे) आदींचा मोलाचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व संकल्पना सादरीकरण करीम खान यांनी केले.

Yavalnews/अँटी करप्शन अँड मीडिया इन्वेस्टीकेशन जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी श्री भूषण नगरे सर यांची निवड करण्यात आली

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी,) विकी वानखेडे

अँटी करप्शन अँड मेडिया इन्वेस्टीकेशन जळगाव ” जिल्हा अध्यक्ष पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्षव श्री संजय बसल साहेब यांनी सांगितले आहे.

भूषण नगरे सर हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी आहेत ते भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी पाठपुरावा करत असतात *जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, विजिलेन्स डिपार्टमेंट, इतर विभागातील, सेवानिवृत्त पोलीस व अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड , आणि परिवहन विभाग (आरटीओ)*, त्यांचे व त्यांच्या कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ते *पोलीस बॉईज असोसिएशनच्या व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या* माध्यमातून सतत कार्य करत असल्यामुळे त्यांच्या

कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय बसल साहेब यांनी भूषण नगरे यांच्यावर ” जळगाव जिल्हा अध्यक्ष ” पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते व सर्वांच्या सुखदुःखात कामात येणार श्री भूषण नगरे सर त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Devendrafadnsvis/फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा:राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे पॅकेज हे आकड्यांची हेराफेरी असून, शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांपासून दूर असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पॅकेज होळी आंदोलन’ करण्यात येणार आहे.

शेतकरी संघटनेच्या नेत्या माजी आमदार सरोज काशीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी शैला देशपांडे, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर व युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी या आंदोलनाचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मागील वर्षीपेक्षा यंदा कोरडवाहू व बागायती पिकांच्या मदतीत मोठी कपात झाली आहे. मागील वर्षी कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ₹१३,६०० मिळाले असताना, यावर्षी फक्त ₹८,५०० जाहीर करण्यात आले आहेत. बागायतीसाठीची रक्कम ₹३६,००० वरून ₹३२,५०० करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारवर आयात-निर्यात धोरण, वायदेबाजारांवरील बंदी, आणि बाजारभाव घसरवण्याचे आरोप करत सांगितले की, हीच “शेतकऱ्यांकडून लूट” झालेली रक्कम परत द्यावी. या मागणीसाठी हेक्टरी ५०,००० रूपयांची मदत तातडीने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Devendrafadnsvis/शेतकरी संघटनेने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पक्षीय भेद विसरून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.

फडणवीसांच्या ‘पॅकेज’ची होळी; शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन वर्ध्यात १६ ऑक्टोबरला!

Amarkale/”कलोडे चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी – अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, खासदार अमर काळे यांची भेट

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशी प्रवेशले असून, खासदार अमर काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

संत तुकडोजी वार्डातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून (२०१२ पासून) कलोडे चौकातील सर्वे क्र. १७६/२ येथील अवैध झोपडपट्टी हटविण्याची मागणी करीत आहेत. न्यायालयाचे आदेश असूनही (जून २०१७ व जुलै २०२२) प्रशासनाने कारवाई न केल्याने संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यालाच आता अन्नत्याग आंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे.

या आंदोलनाला महाविकास आघाडी व विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा असून, “उपोषणकर्त्यांना काही झाले तर जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल”, असा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक सामाजिक आणि राजकीय नेते सहभागी झाले असून, आंदोलकांची मागणी आहे की अतिक्रमण हटवताना दुसरीकडे पुनर्वसनाची योग्य व्यवस्था व्हावी.
प्रमुख उपस्थिती: माजी आमदार राजू तिमांडे, अतुल वांदिले, अनिल जवादे, प्रवीण उपासे, मोहम्मद रफीक, सुनील डोंगरे, दशरथ ठाकरे, अशोक पराते, बालू वानखेडे, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, राजेश भाईमारे, सीमा तिवारी, मीना सोनटक्के, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, परम बावने, सुरेंद्र बोरकर, पुरुषोत्तम कांबळे, पंकज भट, सूरज खोंडे, अमित रंगारी, विजय हजारे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amarkale/निवेदनात दिला इशारा:
“जर लवकरच योग्य तो निर्णय न घेतल्यास, संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या अनुचित प्रकारांना जबाबदार शासन/प्रशासन असेल

Hingnghatnews /जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत वर्ध्याच्या १७ खेळाडूंची विभागीय स्तरावर दमदार घोडदौड

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा, १० ऑक्टोबर २०२५:

वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत “दि वर्धा डिस्ट्रीक्ट अॅमेच्युअर ज्युदो असोसिएशन”च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण १७ खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. नागपूर येथे लवकरच होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी हे खेळाडू वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

पात्र ठरलेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत:

 

अंडर-१४ गट:

 

शिव कोटकर

 

सक्षम पर्बत

 

वेदिका कापसे

 

गुंजन पुरी

 

स्वरांजली भडे

 

 

अंडर-१७ गट:

 

आदेश खांडरे

 

तनमय कोसुलकर

 

माहीम लांडगे

 

मंजीत पिसे

 

वैभव खोडे

 

प्रथमेश खोडे

 

अनन्या सोनकुसरे

 

ईशा फाले

 

 

अंडर-१९ गट:

 

चंचल कापसे

 

काशिश चिंचुलकर

 

प्रथमेश आंधे

 

अरमान धानरेल

 

या सर्व विजेत्या खेळाडूंना दि वर्धा डिस्ट्रीक्ट अॅमेच्युअर ज्युदो असोसिएशनचे सचिव प्रा. विठ्ठल आवचट, डाॅ. प्रा. राजू अवचट, आणि मनोज कोसुलकर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ खेळाडू स्मीत श्रावणे, सतीश वरघणे, तेजस बरवड, आणि भूषण हिंगे यांनीही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी कामगिरीमागे प्रशिक्षक सुबोध दादा महाबुधे व विशाल कस्तुरे यांचे मार्गदर्शन व मेहनत महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच खेळाडूंनी हे यश प्राप्त केले.अमॅच्युअर ज्युदो असोसिएशनतर्फे सर्व विजेत्या व सहभाग घेतलेल्या खेळाडूंना अभिनंदन करण्यात आले असून, नागपूरमध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Sameerkunavar /आ. कुणावार यांच्या नेतृत्वाखाली बिरसा मुंडा नगरमधील कार्यकर्त्यांचा भाजपात मोठ्या प्रमाणात प्रवेश

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

सुरज सिडाम यांची अनुसूचित जमाती आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

हिंगणघाट, दि. १२ ऑक्टोबर २०२५ :
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या प्रभावी कार्यशैलीने प्रेरित होऊन माता मंदिर वॉर्ड, बिरसा मुंडा नगर येथील अनेक महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात सुरज सिडाम, नितीन कुडमते, विशाल पुसनाके, अमोल कुडमते, कबीर कुडमते, तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये मनीषा सिडाम, संगीता कन्नाके, कविता कुडमते, जनाबाई मसराम, परिकाबाई सिडाम, लताबाई कुडमते यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमाच्या वेळी आ. समीर कुणावार, भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, शहराध्यक्ष किशोर कोल्हारे, तसेच सोनू मडावी, गजानन इखार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांनी सर्व नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपाच्या शाल देऊन स्वागत केले.

Sameerkunavar/तसेच, पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत, पक्षाच्या ध्येयधोरणांचा जनसामान्यांमध्ये प्रचार करण्याचे आवाहन केले.याच कार्यक्रमात सुरज नानिक सिडाम यांची भाजपा अनुसूचित जमाती आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Hingnghatnews /हिंगणघाट महिला नगराध्यक्ष पदासाठी दिपाली अमित रंगारी यांचे नाव चर्चेत

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – हिंगणघाट नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्ष पदासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर उपाध्यक्षा दिपाली अमित रंगारी यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

पूर्वी नगरसेविका म्हणून निवडणूक लढवलेल्या दिपाली अमित रंगारी या सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावली आहे.

सामान्य जनतेशी त्यांचा उत्तम संवाद असून, स्थानिक समस्यांवर काम करत त्यांनी एक विश्वासार्ह लोकनेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या हक्कांसाठी, युवा सक्षमीकरण आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.

पक्षांतर्गत आणि शहरातील राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणारे आणि समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा विश्वास संपादन करणारे उमेदवार म्हणून दिपाली अमित रंगारी यांचा विचार प्राधान्याने होऊ शकतो, अशी माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे.

Hingnghatnews/हिंगणघाटच्या राजकारणात एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांचे नाव पुढे येत असल्याने आगामी निवडणुकीत रंगतदार घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.