Home Blog Page 14

Breakingnews /७९ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून कर्मचाऱ्यांची मुजोरी? बुरकोणी ग्रामपंचायतीविरोधात शंकर आष्टनकर यांचे BDO कडे प्रथम अपील

Breakingnews /७९ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून कर्मचाऱ्यांची मुजोरी? बुरकोणी ग्रामपंचायतीविरोधात शंकर आष्टनकर यांचे BDO कडे प्रथम अपील

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

हिंगणघाट तालुक्यातील बुरकोणी येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक शंकर धोंडबाजी आष्टनकर यांनी गट विकास अधिकारी (BDO) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले आहे.

आष्टनकर यांनी ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील ऑडिट रिपोर्ट, कॅश बुक व बँक स्टेटमेंट यांची माहिती मागवली होती. त्यासाठी त्यांनी २,०४४ रुपये शुल्कही भरले. मात्र, मिळालेली माहिती अपूर्ण व अप्रमाणित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, १४ एप्रिल रोजी (सुट्टीच्या दिवशी) ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरी आल्याचा दावा आष्टनकर यांनी केला आहे. यावेळी संबंधितांनी कागदपत्रे समोर ठेवली व संमतीशिवाय छायाचित्रे काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.hingnghatnews

या प्रकरणात आष्टनकर यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. गावातील एक रस्ता सार्वजनिक वापराऐवजी माजी सरपंचांच्या खासगी जागेकडे वळवण्यात आल्याचा आरोप असून, तो वनविभागाच्या जागेत येत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.wardhanews

आष्टनकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई, प्रकरणाची सखोल चौकशी, तसेच संपूर्ण माहिती विनामूल्य देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर गट विकास अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.“न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा आष्टनकर यांनी दिला आहे.

RTE प्रवेशात मोठा गैरप्रकार उघड — बोगस कागदपत्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश चौकशीची मागणी!

 

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे RTE (बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009) अंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याची तक्रार समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांनी गटविकास अधिकारी (शिक्षण विभाग), पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सातपुडा इंग्लिश स्कूल व सहकार विद्या मंदिर, वरवट बकाल या शाळांमध्ये RTE 25% अंतर्गत काही विद्यार्थ्यांना खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, निवड यादीतील 14 तसेच प्रतीक्षा यादीतील 14 विद्यार्थी हे स्थानिक रहिवासी नसून त्यांच्या पालकांनी खोटे रहिवासी दाखले, आधार कार्ड व इतर बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश मिळविला आहे. या प्रकारामुळे खऱ्या अर्थाने पात्र व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात पारदर्शकता राखण्यासाठी आणि सत्यता पडताळण्यासाठी BLO, पोलीस पाटील, सरपंच तसेच रास्त दुकानदार यांचे चौकशी अहवाल तक्रारीसोबत जोडण्यात आले आहेत.

तरीही संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

RTE/दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

RTI/माहिती अधिकाराला नकार, ‘प्रमाणित प्रत’चा अडसर; वर्धा धर्मदाय कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह”

 

हिंगणघाट पत्रकार संघ (F6913) प्रकरण; अर्जदाराकडून शपथपत्राची अट

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

हिंगणघाट येथील नोंदणी क्रमांक F6913 अंतर्गत नोंद असलेल्या पत्रकार संघ/विश्वस्त संस्थेच्या संदर्भातील माहिती मागणी प्रकरणात वर्धा येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात अर्जदार सचिन वाघे यांनी संबंधित संस्थेची अनुसूची-१, नोंदणी प्रमाणपत्र, विश्वस्त करारपत्र तसेच सन 2024 ते 2026 या कालावधीतील हिशोब पत्रके माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागितली होती.mahitiadhikar

मात्र संबंधित कार्यालयाकडून “माहिती अधिकाराखाली माहिती दिली जात नाही, प्रमाणित प्रतीसाठी स्वतंत्र अर्ज करा” असे सांगण्यात आले.

तसेच अर्जदार हा संस्थेचा सभासद नसल्याचे कारण देत त्याच्याकडून शपथपत्र व ₹10 न्यायालयीन शुल्क तिकीट लावून अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.rtinews

सदर अर्ज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी स्वीकारण्यात आला असून, 24 एप्रिल 2026 रोजी प्रमाणित कागदपत्रे देण्याचे सांगण्यात आले आहे.wardhanews

दरम्यान, माहितीचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही नागरिकास सार्वजनिक माहिती मिळविण्याचा अधिकार आहे.

Hingnghatnews /संबंधित कार्यालयाने माहिती अधिकार अर्ज स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्याचा भंग मानला जातो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Yavalnews /बोराळे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

बोराळे (ता. यावल) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्य व विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.

या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच संध्या बाई उज्जैनसिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंह राजपूत, उपसरपंच मायाबाई राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई वानखेडे, दिपाली चौधरी, भरत राजपूत, पोलीस पाटील माधुरी राजपूत, अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे, अंगणवाडी मदतनीस सुवर्णा राजपूत यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी कैलाससिंग राजपूत, नितीन राजपूत, विवेकानंद तायडे, विनोद वानखेडे, राजू वानखेडे, शरद वानखेडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अमर वानखेडे, टोपलू वानखेडे, विकी वानखेडे प्रदीप वानखेडे,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या विचारांची आजच्या समाजात किती गरज आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

Yavalnews /त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाज प्रगत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या जयंती उत्सवात गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमामुळे सामाजिक एकात्मता व जागरूकतेचा संदेश संपूर्ण गावात पोहोचला.

शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Hingnghatnews /हिंगणघाट : पत्रकार भवन निधी प्रकरण गाजले; जिल्हाधिकारी, धर्मदाय आयुक्त व नगरपरिषदेकडे माहिती अधिकारातून सविस्तर माहितीची मागणी

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : पत्रकार भवनासाठी आमदार निधीतून निधी मंजूर झाल्याच्या चर्चेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा, धर्मदाय आयुक्त कार्यालय वर्धा तसेच हिंगणघाट नगरपरिषद यांच्याकडे माहिती अधिकारांतर्गत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.wardhanews

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार भवन उभारणीसाठी आमदार निधीतून आर्थिक मंजुरी दिल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून शहरात सुरू आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक पातळीवर उपलब्ध नसल्याने या प्रकरणावर संशय व्यक्त केला जात आहे.patrakarnews

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडे पुढील महत्त्वाची माहिती मागविण्यात आली आहे :

Patrakarnews /या सर्व विभागांकडून माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः निधी मंजुरीची प्रक्रिया कायदेशीर व नियमबद्ध होती का, तसेच संबंधित संघटना वैध नोंदणीकृत आहे का, याबाबत स्पष्टता येणार आहे.

Patrakarnews /दरम्यान, या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वर्ग याकडे लक्ष ठेवून आहेत.एकूणच, पत्रकार भवन निधी प्रकरण आता जिल्हास्तरावर पोहोचले आहे.

Nagarparishadnews /हिंगणघाट नगर परिषद ठराव; नियम व पारदर्शकतेवर सवाल?

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : पत्रकार भवन प्रकरणात नगर परिषदेत सत्ताधारी व विरोधक यांनी एकमताने ठराव मंजूर केल्याची बाब समोर आली असून, या सहमतीमुळे चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. तथापि, ठराव प्रक्रियेदरम्यान इतर पत्रकार व पत्रकार संघटनांचा विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.hingnghatnews

माहितीनुसार, हिंगणघाट नगर परिषद येथे पत्रकार भवनासंदर्भात ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. मात्र, या चर्चेदरम्यान कोणत्याही सदस्याने “इतर पत्रकारांना संधी देण्यात आली का?” किंवा “सार्वजनिक सूचना देण्यात आली का?” यासारखे मूलभूत प्रश्न उपस्थित न केल्याची चर्चा रंगत आहे.wardhanews

स्थानिक पत्रकारांच्या मते, सार्वजनिक हिताच्या विषयावर निर्णय घेताना सर्व संबंधित घटकांचा विचार होणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात केवळ एका संघटनेचा विचार झाल्याचे दिसून येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.hingnghatnews

तसेच, ठराव प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आली का, यावरही प्रश्न उपस्थित होत असून, कागदपत्रे व माहिती सार्वजनिक न केल्याबद्दल प्रशासनावर टीका होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व पत्रकारांना समान संधी देण्यासाठी नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Nagarparishadnews/एकूणच, सत्ताधारी व विरोधक यांची सहमती ही विशेष बाब असली तरी, इतर पत्रकारांचा मुद्दा पूर्णतः दुर्लक्षित राहिल्याने हा ठराव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Farmernews /चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाशी जोडलेले दावे; कोट्यवधी कर्जावर प्रश्नचिन्ह

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

नागपूर : “सामान्य शेतकऱ्यांसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा?” असा संतप्त सवाल उपस्थित करत कामठी तालुक्यातील सुरादेवी येथील जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवले आहे.

सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाशी संबंधित ७/१२ उताऱ्यावर तब्बल ८०.०० हेक्टर (सुमारे २०० एकर) अकृषक जमीन नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मात्र, स्थानिक पातळीवरून धक्कादायक दावा पुढे येत आहे — प्रत्यक्षात ही जमीन केवळ २ एकर असल्याचे सांगितले जात आहे! जर हे खरे असेल, तर उरलेले “१९८ एकर” कागदावर कुठून आले? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.chandrashekharbawankule

याहून गंभीर बाब म्हणजे, या नोंदीच्या आधारे सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाल्याचा आरोपही समोर येत आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीवरही संशयाची सुई वळली आहे.

“सामान्य शेतकरी २ एकर जमीन अकृषक करून बँकेकडे गेला, तर त्याला एवढे मोठे कर्ज मिळेल का?” हा प्रश्न आता गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, ७/१२ उताऱ्यात इतका मोठा फरक कसा काय झाला?farmernews

Chandrashekharbawankule /ही केवळ तलाठी स्तरावरील चूक आहे का?
की यामागे मोठा गैरव्यवहार दडलेला आहे?
आणि जर चूक असेल, तर जबाबदार कोण?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

Farmernews /महसूलमंत्री बावनकुळे अडचणीत? जमीन प्रकरणावरून व्हिडिओ व्हायरल; संपादक दरेकरांची पोलखोल

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

कामठी : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित जमीन व्यवहाराबाबत एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.chandrashekharbawankule

संबंधित जमिनीवर मंत्री बावनकुळे, त्यांच्या पत्नी ज्योती, मुलगा संकेत व मुलगी पायल यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

दरम्यान, “ज्यांच्याकडे गाडी-बंगला आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही,” असे विधान केल्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या बावनकुळे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारे संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी “बोल बिंदास बोल” या माध्यमातून या प्रकरणाची पोलखोल केल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी शेतकरी विषयावर व्हिडिओ केल्याप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता त्यांनीच मंत्री बावनकुळे यांच्या कथित जमीन प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला असून, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

Devendrafadnsvis /या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लक्ष वेधण्यात आले असून, संबंधित व्हिडिओ पुरावा म्हणून पुढे आणण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

Farmernews /सदर प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का, तसेच प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

gas cylinder/हिंगणघाटमध्ये गॅस सिलेंडर टंचाईचा प्रश्न तीव्र; प्रशासन म्हणते पुरवठा सुरळीत, नागरिक त्रस्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पुरवठा विभागाचे अधिकारी शहरात कोणतीही टंचाई नसल्याचे सांगत असताना, दुसरीकडे ग्राहकांना 18-20 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, शहरी भागातील ग्राहकांनी 25 दिवसांनंतरच नवीन सिलेंडरसाठी बुकिंग करावे, असे नियम सांगितले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ग्राहकांना बुकिंग करून तीन आठवडे उलटूनही सिलेंडर न मिळाल्याने घरगुती कामकाज विस्कळीत झाले आहे.

 

दरम्यान, गॅस एजन्सी चालकांकडून “वरूनच माल येत नाही” अशी कारणे दिली जात आहेत. यामुळे प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील विसंगती स्पष्ट होत असून नागरिक मात्र या दोघांच्या मध्ये अडकले आहेत.

शहरातील गृहिणींना याचा सर्वाधिक फटका बसत असून पर्यायी इंधनाचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. वाढत्या समस्येमुळे नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

gas cylinder/एकीकडे “टंचाई नाही” असा प्रशासनाचा दावा आणि दुसरीकडे नागरिकांचा अनुभव यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hingnghatnews /ठाकरे विरुद्ध सावरकर नावाचा संघर्ष; हिंगणघाट पालिकेत बहुमताने निर्णय

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नव्या सभागृहाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभागृहाला कोणाचे नाव द्यावे यावरून विविध पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहास हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत अधिकृत पत्र सादर केले.wardhanews

या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब व्हावे, अशी त्यांची अपेक्षा होती.मात्र, चर्चेदरम्यान भाजपच्या काही नगरसेवकांनी स्वतंत्रवीर स्व. विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आणला.hingnghatnews

ही बाब पूर्वनियोजित असल्याचे सभागृहातील घडामोडींवरून जाणवले, तर काही सदस्यांना याची पूर्वकल्पना नसल्याचेही स्पष्ट झाले.
यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका सारिका प्रकाश अनासाने यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या महाराष्ट्र व मराठी समाजासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.wardhanews

सभागृहात एकमताने निर्णय होण्याची शक्यता असतानाच अचानक सावरकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे काही सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते सुधीर कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या शीतल अमोल बोरकर तसेच प्रहार संघटनेचे सूरज कुबडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला समर्थन देत एकमताचा आग्रह धरला. मात्र, त्यांनी सावरकर यांच्या नावाबाबत तटस्थ भूमिका घेतली.breaking

अखेर भाजप सदस्यांनी बहुमताच्या आधारे सावरकर यांच्या नावाला मंजुरी दिली. या मतदानात 34 मते सावरकर यांच्या बाजूने पडली, तर 11 सदस्य तटस्थ राहिले.

Hingnghatnews /या निर्णयानंतर सभागृहातील घडामोडींवरून विविध पक्षांच्या राजकीय भूमिका व विरोधाभास स्पष्ट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.