Home Blog Page 135

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्र्वर टाले सह ३ कार्यकर्त्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला.( Crimenews )

0

 

डोणगाव येथील शिक्षक सातपुते पती-पत्नी यांनी अकोला येथून नातेवाईक व गुंडांना बोलावून कट रचून पुर्वनियोजीत हत्तेच्या उद्देशाने केला गंभीर हल्ला.

डॉ.ज्ञानेश्र्वर टाले यांच्या डोक्याला गंभिर इजा असल्याने उपचरासाठी संभाजीनगर येथे आय.सी. यू. मध्ये भरती करण्यात आले.


Crimenews: दिनांक. १फेब्रुवारी २०२४ रोजी अंदाजे सांयकाळी साडेपाच वाजे दरम्यान गजानन सातपुते व छाया सातपुते शिक्षक जिल्हा परिषद प.स.मेहकर यांनी तक्रारीच्या रागातुन अकोला येथील नातेवाईकांना व पैसे देऊन गुंडाना बोलावून जाणीवपूर्वक राजकीय लोकांच्या सांगण्यावरून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने कट रचून.डोणगांव येथे देवेंद्र आखाडे यांच्या सी.एस.सी. सेंटरवर काही दस्तऐवजाची माहिती घेण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले गेले असता तिथे सातपुते दांम्पत्यांनी व महिलांनी जाऊन डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांच्यासोबत हुज्जत घालून जाणीवपूर्वक वाद तयार केला.

व अकोला येथिल नातेवाईकांना व गुंडांना बोलवुन पुर्वनियोजीत कट रचत कोयत्याने व लोखंडी राॕडने मारहाण करत हत्या करण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचा जीवघेणा हल्ला गजानन सातपुते,छाया सातपुते,धृवल सातपुते, रोहिणी सातपुते,निशा चव्हाण,वैष्णव सातपुते, मंगेश इंगळे अकोला येथील त्याचे साथीदार चोरीच्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार असलेले चार ते पाच जण यांच्या मदतीने सत्तेचा कट रचून हा हल्ला घडवून आणला यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून जिल्ह्यातील काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या सांगण्यावरून हा हत्तेचा कट घडवून आणल्याचा संशय व दाट शक्यता असल्याची शंका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी पत्रकारांसमोर रुग्णालयात सांगितले याचे कारण असे कि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका त्या अनुषंगाने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व सहकारी मेहकर लोणार तालुक्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संघटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून उभ करत आहेत त्त्यांच वाढतं काम वलय पाहून मेहकर लोणार मतदार संघातील परिस्थिती बदलत चाललेले चित्र पाहुन.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या पायाखालाची वाळु सरकली असुन त्यांच्या डोळ्यात खूपत असून हा राग सुध्दा मनात धरून या सातपुते दाम्पत्यांना हाताशी धरून रविकांत तुपकर हे लोकसभेचे उमेदवार असुन आपल्याला मात देणार म्हणुन त्यांची बदनामी करुन याला राजकिय रंग देऊन त्यांच्यासह डॉ.ज्ञानेश्वर टाले यांचा राजकिय दृष्ट्या व जिवाने संपवण्यासाठी अडकविण्याचा डाव सातत्याने राजकिय पुढारी करत आहेत. डाॕ.टाले हे रविकांत तुपकर यांचे अंत्यत जवळचे व ताकतीचे सहकारी आहेत.

त्यांना अडकुन त्यांचे या भागातील काम थांबवण्याचा प्रयत्न काही पुढाऱ्यांनी केल्याचा दाट संशय आहे व हे प्रकरण देवेंन्द्र आखाडे यांच्या जागे बद्दल असुन त्यामध्ये इतरांना बदनाम करुन गोवण्याचा प्रयत्न राजकिय दृष्ट्या चालु आहे.माञ खरी परीस्थीती वेगळी आहे.याला राजकिय रंग देऊ नये. सत्तेचा एवढा गैरवापर करणे योग्य नाही.असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.टाले यांनी व्यक्त केले. कारण की सदर घटनेपूर्वी या राजकीय पुढाऱ्यांचे फोन सातपुते दांम्पत्यांना व काही अधिका-यांना गेल्या आठ दिवसापासून सातत्याने सुरू होते.

त्यांच्या फोन डिटेल CDR सुद्धा पोलिसांनी तपासले पाहिजे अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी केली आहे.जेणेकरुन सर्व सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या राजकीय पुढार्‍यापासून तसेच सातपुते दाम्पंत्यापासून माझ्या व सहका-याच्या जीवाला धोका आहे.कारण आम्ही त्यांच्या कायम विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत चळवळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम मेहकर लोणार मतदार संघामध्ये उभे केले असून यामुळे राजकीय पुढार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याची पद्धत करत आहेत. ही त्यांची स्टाईल फार पूर्वीपासून स्थानिक राजकीय नेत्यांची असल्याचे सांगितले त्यांनी याआधी सुद्धा स्वतःच्या पक्षातील काही लोकांचा घातपात केल्यांचां मतदार संघात सर्वश्रुत आहे.बोगस शिक्षक गजानन सातपुते व छाया सातपुते यांच्या बद्दल शिक्षण विभागातील तक्रार केल्याच्या उद्देशाने देवेंद्र आखाडे यांच्या विरोधातील राग मनात धरून आपली नोकरी जाते असं गजानन सातपुते व छाया सातपुते या शिक्षक पति पत्नीला कळाले यांना चार चार अपत्य असल्यामुळे यांची या तक्रारीमुळे शिक्षण विभागाच्या वतीने चौकशी लागलेली आहे.

त्या भीतीने या राजकीय पुढारी यांना घरी जाऊन ठिक ठिकाणी भेटून मदत घेण्याचा संपुर्ण प्रयत्न केला.त्याबाबत आपल्याकडे पुरावे सुध्दा आहेत व त्या माध्यमातूनच काही राजकिय पुढार्‍यांच्या मदतीने हा हत्या करण्याचा डाव,कट काही दिवसापासुन रचण्यात आला असावा.

अकोल्यातील लोकांचा डोणगाव मध्ये येऊन हल्ला करणे म्हणजे हा किती मोठा हत्तेचा कट असू शकतो यावरून लक्षात येते त्यामध्ये असलेल्या व्यक्ती इंगळे व त्याचे मिञ हे अज्ञात असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे अकोला येथे दाखल आहेत माञ त्यांना पैसे (सुपारी)देऊन डोणगाव मध्ये बोलून घेण्यात आलं यासाठी सर्व मदत स्थानिक राजकीय काही सत्ताधारी पुढार्‍यांनी केल्याची दाट शक्यता असल्याने सदर राजकीय पुढाऱ्यांचे व सातपुते दाम्पत्याचे संपूर्ण कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष न करता यांचे पाळेमुळे शोधून याचा खरा सुञधार कोण आहे.

 

तो शोधुन काढून त्या राजकीय लोकांना सुद्धा जेलमध्ये टाकले पाहिजे खऱ्या अर्थाने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करुन बिघडवण्याचे काम कोण करत आहे व त्यांचे सूत्रधार कोण आहे हे महत्त्वाचं असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे असे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतांना देखील सातपुते दांम्पत्य व त्यातील इतर आरोपींना त्यांना कुठली दुखापत नसताना सुद्धा मोकाटपणे उघड माथ्याने गावात फिरत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे अन्यथा यांना खुले सोडल्यास पुन्हा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Crimenews : व सदर आरोपी हे पुराव्या नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात असा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष टाले यांनी केला. शासकिय नोकरीवर असलेल्या या दांपत्यांना अटक करू नये म्हणून राजकीय पुढाऱ्यांचा पोलिसांवर प्रंचड दबाव आहे.परीस्थीती पहाता असे लक्षात येत आहे.माञ पोलींसानी त्यांचे काम राजकिय दबावाखाली न येता कायदेशिरपणे केले पाहीजेत.भविष्यकाळात पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत.शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो.

द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी येथे डुकरांचा हैदोस ( shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव. shegaonnews: माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन संत नगरी शेगाव येथे *स्वच्छ शेगाव सुंदर शेगाव* ही भूमिका बजावत सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे.

 

परंतु शेगाव नगरातून गौलखेड रस्त्याने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी या भागामध्ये गेल्या सहा-सात महिन्यापासून डुकरांचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. घरासमोरील झाडं, परसबाग, आणि सुकवायला ठाकलेले धान्य डुकरं नष्ट करून टाकतात.

तसेच बाहेर लहान मुलांना खेळणे सुद्धा अवघड झाले आहे .प्रत्येक रहिवाशाला दररोज डुकरांचा सामना करावा लागत आहे आणि जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छ अशा संत नगरीत द्वारकाधीश नगर व आरोग्य कॉलनी येथे मात्र डुकरांनी जगणे कठीण केले आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

याबाबतीत नगरपरिषद शेगाव कडे सहा महिन्यापूर्वी तशी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे परंतु अजूनही त्या तक्रारीची साधी दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

उलट डूकरांची संख्या पाच वरून ५० झाली आहे तरी कृपया समस्त द्वारकाधीश नगरातील आणि आरोग्य कॉलनीतील रहिवाशी नगर परिषदेकडून अशी आशा करत आहेत.

shegaonnews: की या डुकरांच्या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळावी व आम्हाला आरोग्यपूर्ण व सुखाचे जीवन जगता यावे आणि आमच्या लहान मुलांना आमच्या कॉलनीमध्ये स्वच्छंदपणे खेळता यावे एवढी रास्ता पेक्षा धरून आम्ही आपणास विनंती करतो की आम्हाला डुकरांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी.

पोलीस ठाण्यातील गोळीबारावर अजित पवार स्पष्ट बोलले कि हे नाही पटलं, ( Ganpat Gaikwad Firing )

0

 

Ganpat Gaikwad Firing : शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अचानक पणे सहा गोळ्या झाडल्या.

पण आता यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर हे सत्ताधारी पक्षाच्या आमदांरासाठी नियम वेगळे आहेत का?

असे प्रश्न जनता मध्ये विचारले जात आहेत.

पण आता या राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीवर टीका सुरु झाली आहे.

तर आता खासकरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमके टार्गेट केलं जात आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

पण आता या कारण राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. पण त्यांच्या पक्षाच्या आमदाराने हा गोळीबार काय केलाय.

पण आता शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली.

पण नेमके या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पण आता जागेच्या वादातून ही फायरींग केल्याची माहिती पोलिसांनी समोर दिली आहे.

पण अचानक पणे सहा राऊंड फायर करण्यात आले. तर आता राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या गेले आहे.

नेमके या प्रकरणावर अजित पवार काय म्हणाले?

तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या घटनेवर भाष्य केलं आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या “कोणाबद्दल तक्रार असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे. मग असे अचानक पणे हे सगळं पोलीस स्टेशनच्या आवारात घडल्याची मला प्राथमिक माहिती मिळालीय”

पण असं अजित पवार यांनी सांगितलं. “देवेंद्र फडणवीस या राज्ययाचे उपमुख्यमत्री आहेत, तर मी त्यांचाशी बोलणार आहे.

Ganpat Gaikwad Firing: पण एवढी टोकाची मजल का मारली?. टीव्ही चॅनलशी फोनवरुन काही संभाषण जे केलं, ते कायद्याला धरुन अजिबात नाही. तर हे माझं स्पष्ट मत आहे” असं या ठिकाणी अजित पवार स्पष्ट म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार माटरगाव बु. येथे शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ.( krushiutpannabajarsamiti )

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव -krushiutpannabajarsamiti: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने नाफेड ची शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन या शेतीमालाचे खरेदीचा शुभारंभ उपबाजार माटरगाव बु. येथे बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे यांचे हस्ते करण्यात आला.

बाजार समिती मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सबएजंट म्हणून सदर खरेदी करीत असून सोयाबीन या शेतमालाला रुपये 4600/- हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांकरिता शेगाव व माटरगाव या दोन्ही ठिकाणी नोंदणी करिता व्यवस्था केली असून शेतकऱ्यांनी सन 2023-24 या वर्षाचा अद्यावत पीक पेरासह सातबारा, बँक पासबुक लिंक असलेले आधार कार्ड ची स्पष्ट झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा

कॅन्सल चेक, व नोंदणी अर्ज भरून वरील कागदपत्रे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पर्यंतच घेऊन येऊन बाजार समितीचे मुख्य बाजार शेगाव किंवा उपबाजार माटरगाव येथे शेतकऱ्यांनी सादर करावित व आपला नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन यावेळी बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी शेतकऱ्यांना केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन आलेल्या बेलुरा येथील शेतकरी प्रभाकर रामचंद्र सुलतान तसेच माटरगाव येथील शेतकरी सिकंदर हकीमखा पटेल यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांनी शेला,टोपी, श्रीफळ व हार घालून सत्कार केला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव आळशी, सुरेशभाऊ वनारे, राजेश बाजारे, बाजार समितीचे संचालक दादाराव निळे पाटील, परमेश्वर हिंगणे, श्रीधर पुंडकर, माजी संचालक अनंत मिरगे, संचालक तेजराव दळी, रमेश पाटील, संजय गव्हांदे इत्यादी मान्यवरांसह भीमराव वाकोडे, अभिजीत मिरगे, किशोर मिरगे, विठ्ठल सोनटक्के, बाळूभाऊ निखाडे, बाळकृष्ण देशमुख,

 

krushiutpannabajarsamiti: नंदू अमलकर, गजानन बाजारे, पिंटू टिकार, बबलू नरवाडे, गजानन कानडे, दिनेश खंडारे, शिवाभाऊ वावटीकार, खरेदी विक्री अध्यक्ष रघुनाथ पाटील भांबेरे, खरेदी विक्री व्यवस्थापक मनोहर ताठे, मापारी रियाज उल्लाखा ताऊल्लाखान, बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर, निरीक्षक नागोराव डाबेराव, लिपिक दीपक कडाळे, रितेश मेटांगे, संगणक चालक नितीन तायडे, प्रशांत घोडेराव, जानू वाकोडे यांचे सह माटरगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

प्रहारच्या जिल्हाप्रमुख सह सात जनावर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखलनंतर झाली कारवाई ..खंडणीचा गुन्हा (prahar news )

0

 

अमर दूध डेअरीवाल्याला मागितली ११ लाखांची खंडणी ..

शेकडो दूध उत्पादक शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले..

जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखलनंतर झाली कारवाई ..

prahar news :बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील अमर दूध डेअरी चे मालक याना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे सुशोभीकरण करायचे आहे म्हणून 11 लाखांची खंडणी मागण्यात आली होती ..

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्यामुळे मालकाने देण्यास नकार दिला असता प्रहार संघटना चे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते आणि सहकाऱ्यांनी डेअरी मध्ये जाऊन आणि बोडवड येथे डेअरी मालक यांचे घरी जाऊन धिंगाणा घातला, शिवाय दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडून देण्याची धमकी दिलीय ..

यामुळे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या जाचाला कंटाळून डेअरी मालकाने धाड परिसरातील दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला असता, आपले नुकसान होणार असल्याने याविरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे खंडणी खोरांवर कारवाईची मागणी केलीय ..

जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले ..

prahar news: याप्रकरणी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभव राजे मोहितेसह सात जनावरं खंडणीसह विविध कलमनव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेय ..

 

ओबीसींवर अन्याय करणाऱ्या राजपत्राच्या मसुद्यावर हरकत ( OBC )

0

 

शाम वाळस्कर
प्रतिनिधी मुर्तीजापुर

OBC: राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २६ जानेवारी २०२४ च्या राजपत्राचा मसुदा हा मूळ ओबीसीत असणाऱ्या ओबीसी , भटक्या ,व विशेष मागास प्रवर्गातील समाज समूहाच्या अधिकारांवर घाला घालणारा आहे.

समिती ही घटनात्मक नसून ती घटनाबाह्य आहे. ती समिती बरखास्त करण्यात या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी य दि १ फेब्रुवारी २४ रोजी तहसीलदार मुर्तिजापूर यांना समता परिषदेच्या वतीने निवेदन दिले व रोष व्यक्त केला,तर स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांना संयुक्त निवेदन देण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

दरम्यान तहसीलदारा सह लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेतल्या.या ओबीसी आरक्षण बचाव व शासनाने काढलेल्या अध्यादेश रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदनावर आशिष निलखन,श्रीकृष्ण बोळे जगदीश तायडे,किशोर तायडे, विनोद तायडे,किशोर सोनोने,प्रा एल डी सरोदे,बाळासाहेब गणोरकर,नरेंद्र खवले,पत्रकार सुमीत सोनोने,ॲड निलेश सुखसोहळे, नंदकिशोर राऊत,ओम राऊत,अक्षय काळे, अतुल बोळे, प्रदीप बेलसरे,

OBC: जगदीश मारोटकर, विनोद मानकर, अमोल गढवे,सागर निलखन, राजेश ढवळे, संदीप काळपांडे,अक्षय केने,स्वप्नील बनारसे, निलेश मेहरे, प्रविण टाकं,अक्षय राऊत,चंदन उंबरकर,रूपेश बोळे, संतोष च-हाटे,अविनाश यावले,अरविंद वरोकार, प्रविण इंगळे, प्रदिप इंगळे, अमोल गुल्हाने,मो.मुसादीक मो.सादीक.ओबीसी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनोद खन्नांचा डायलॉग मारत संजय गायकवाडांची अर्वाच्च टीका,भुजबळांचा पलटवार ( sanjaygaikwad )

0

 

Sanjaygaikwad: बुलढाणा / शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांच्यावर वादग्रस्त टीका केली,

परंतु आज एवढंच नाही तर अश्लिल भाषेत पण शिवीगाळ केल्याची एक क्लिपही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.

तर आता या क्लिपमधला आवाज संजय गायकवाड यांचा असल्याचं बोललं गेलं.

पण संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त टीकेवर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर ‘त्यांनी वापरलेली भाषा बरोबर नाही. ते आता शिवसेनेत आहेत म्हणजे पूर्वीही शिवसेनेत असणार.

तर आता ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सीनियर फ्रोफेसर होतो.

तस मला मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,

तर तो मला मान्यच आहे’, असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलं.

तर आता या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आपल्याच सरकारविरोधात मैदानात उतरलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर संजय गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत टीका केली.

तर आता सातत्यानं मनोज जरांगे आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी करतानाही गायकवाडांनी शिवराळ भाषेचा वापर केल्यानं पाहायला मिळालं. ‘

तर आता या भुजबळ मंत्रिमंडळामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिले नाही, भुजबळांच्या कंबरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा’, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली होती.

 

बातमी सविस्तर पहा एक क्लिक वर

तर बुलढाणा आमदार संजय गायकवाड या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय..

Sanjaygaikwad :तर आता या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार संजय गायकवाडांच्या टीकेचा निषेध नोंदवत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

मनसे पदाधिकाऱ्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जळगाव जामोद ठाणेदारा मार्फत निवेदन ( mns news )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव जामोद.चिखली येथे शेतकर्यांना न्याय देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे; तसेच शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत – मनसेने दिले जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा यांना जळगाव जामोद ठाणेदार मार्फत निवेदन

जळगाव जामोद: बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील एम.आय.डी.सी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असतात. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालावर त्या ठिकाणी असलेले खाजगी अडत व्यापारी हे १% बटाव म्हणून शेतकर्यांची लुट करीत होते. शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला असता गेट बंद करून मारण्याच्या धमक्या हि अडत व्यापारी मंडळी देत होती. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी हि बाब मनसे पदाधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिली.

व ते शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष (एम.आय. डी.सी.) परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेले त्या ठिकाणी तिरुपती जिनींगचे गोविंद अशोक अग्रवाल यांनी १% बटवा हिच आमची कमाई आहे.तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणत त्या ठिकाणी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सहा. निबंधक घोंगे व शेतकऱ्यांना सर्वोच्च भाषेत बोलत पैसे परत करण्यास नकार दिला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्या ठिकाणी आमचे पदाधिकार्यांनी त्यांना विरोध दर्शविला असता, त्या ठिकाणी कामावर असलेले परप्रांतीय बिहारी, यु.पी. चे कामगार यांनी त्यांचे अंगावर येत घाणेरड्या शिवीगाळ करीत मनसेचे राजेश परिहार व नारायण बाप्पु देशमुख या दोघांचे गळ्यातील सोन्याची चैन व प्रदिप भवर यांचे वरच्या खिशातले अंदाजे ६,५०० रुपये रक्कम त्या ठिकाणी या मंडळींनी जमावाद्वारे लोटपाट करीत काढून घेतली.

त्यामुळे तिथे वाद निर्माण झाले परंतु त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी मध्यस्थी होत वाद मिटवला. त्यानंतर गोविंद अग्रवाल यांनी आमचे मनसे पदाधिकारी हे खंडणी मागायला आले असल्याचे खोटे आरोप करीत FIR नं. ००७२/२०२४ नुसार आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले.

मात्र आमचे उपस्थित मनसे पदाधिकारी हे शासकीय कर्मचाऱ्यांचे समवेत त्या ठिकाणी फक्त पाहणीसाठी गेले होते.जर बटाव विरुद्ध विरोध दर्शविला तर मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले मग त्यांचे सोबत शासकीय कर्मचारी सुध्दा उपस्थित होते. त्यांचेवर सुद्धा खंडणीचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते.

परंतु वास्तविक पाहता हा सर्व प्रकार केवळ राजकीय सुडापोटी केला जात असुन, महाराजा अग्रसेन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक बाबुलाल अग्रवाल हे भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष असुन सत्तेत असल्या कारणाने त्यांनी आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी राजकीय सुडापोटी दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येऊन शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येऊन शेतकर्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणेदार पोलिस स्टेशन नांदुरा मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

mns news : सदर निवेदन देतेवेळी मनसे माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत , शहराध्यक्ष नागेश भटकर, प्रमोद यऊल, ऋषिकेश पाटील, यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर पंचत्वात विलीन : मान्यवरांकडून भावपूर्ण श्रध्दांजली ( MLA Anil Babar Death )

0

 

गार्डी येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनिल बाबर हे जनसामान्यांशी, मातीशी जोडलेले नेते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली, दि.३१ – “आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

MLA Anil Babar Death: खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील आदिंसह सर्वपक्षीय नेते, मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी अत्यंत दुःखद असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदार संघासाठी खूप काम केले. कृषी, पाणी, रस्ते, वीज इत्यादी कामांबाबत त्यांचा पाठपुरावा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. अनिल बाबर यांना पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी लोकवर्गणीतून निवडून दिले.

असे देशातील एकमेव उदाहरण आहे. जनतेने प्रेम, जिव्हाळा व आत्मियता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन प्रत्येकाला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. इतर राज्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क होता, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरामध्ये तळागाळातून काम सुरु केले होते. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि चारवेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचले पाहिजे, सिंचन झाले पाहिजे या करिताचे त्यांचे प्रयत्न कोणीच विसरु शकत नाही.

जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत, असे ते म्हणाले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्या विषयीच्या आठवणी जागृत करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अन्य मंत्रीमहोदयांसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. दिवंगत आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. या शोकाकुल गर्दीच्या साक्षीनेच पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, आमदार अनिल बाबर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने सांगली येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी विटा येथील निवासस्थानी व त्यानंतर मूळ गाव गार्डी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन दोन्ही ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली. गार्डी येथे सायंकाळी चिरंजीव अमोल आणि सुहास यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला व अंत्यसंस्कार करण्यात आले.

MLA Anil Babar Death: त्यांच्या पश्चात चिरंजीव अमोल व सुहास बाबर, स्नुषा, नातवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा परिवार आहे. आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने शेतकरी शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला अंगणवाडी सेविका आदींच्या विविध समस्या बाबत तहसीलदारांना निवेदन..( Nationalist Congress ) 

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगाव: Nationalist Congress: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांना आज एक फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार युवक महिला अंगणवाडी सेविका आदींच्या संबंधातील विविध समस्या सोडविण्याबाबत निवेदन सोपविण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा पदाधिकारी जेष्ठ नेते प्रसंजीत पाटील व पांडुरंग दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे निवेदन सोपविण्यात आले तहसीलदार शेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदना

१) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी. दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी२) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.३) छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

४) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व याआधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे.५) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तत्काळ सुरु कराव्यात.

तसेच प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तत्काळ देण्यात याव्यात. यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

Nationalist Congress: निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा पाटील शहराध्यक्ष दिनेश साळुंखे तालुका अध्यक्ष संजय पहुरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सलमान खान सुधाकर ढोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत