Home Blog Page 149

बोराळे येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कॅण्डल मार्च द्वारे अभिवादन. मुलं/मुलांनी केली संपूर्ण पूजा पाठ.

0

 

यावल (प्रतिनिधी . विकी वानखेडे

यावल तालुक्यातील बोराळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महपरिनिर्वाण दिनी कैंडल मार्च काढून मानवंदना देण्यात आली.

बोराळे या गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलक ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहन्यात येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलपुष्प अर्पण बोराळे येथिल बौद्ध वस्तीतील उपासक व उपासिकांनी केले,त्याच बरोबर संध्याकाळी ६:३० वाजता समाज मंदिर (विहार)येथून तथागत भगवान गौतम बुद्धांची पूजा करून क्यांडल मार्च ची सुरुवात करण्यात आली व सांगत डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या फलका जवळ सांगता करण्यात आली,तदनंतर बाबा साहेबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून सरणत्तय ने कार्यक्रम संपला असे घोषित करण्यात आली.

https://www.suryamarathinews.com/crimenews-15/
यावेळी वाड्यातील बौद्ध उपासक/उपसिका समाज बांधव,यांच्यासह गावातील ग्रामस्थ संख्येने उपस्थिती होते त्याच प्रमाणे बोराळे येथे बौद्ध समाज बांधवान कडुन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च समाज मंदिर ( विहार ) ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या फलका पर्यंत काढण्यात येऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली,कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वस्तीतील लहान मुले,मुलींनी केली,तसेच सर्व बौध्द उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.savidhan

Crimenews /खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार, एक जण ठार दोन जण गंभीर…

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव तालुक्यातील रोहना येथे गोळीबार होऊन त्यामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून सोडणाऱ्या या घटनेबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यात असलेल्या, बुलढाणा रोडवरील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्धीत असलेल्या रोहणा येथे थकीत पैसे मागण्यासाठी तीन ईसम रोहणा गावातील पारधी समाजाच्या राहुटी वर आज सकाळी आले.

त्या ठिकाणी थकीत पैसे मागण्याच्या कारणा वरुन दोन्ही गटात वाद झाल्यानंतर बाहेरुन आलेल्या तिघांनी गोळीबार केला या गोळीबारात एक महिला सह दोन जण गंभीर जखमी झाले तर एक जण ठार झाला.सदर घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी तत्काळ रोहणा गावातील घटनास्थळी धाव घेतली वृत्त लीहे पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

https://www.suryamarathinews.com/शेगांवसईबाई-मोटे-सामान्/

रोहन गावात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे तर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेcrimenews

शेगांव,सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकाला ४० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले लाच लुचपत विभागाची कारवाई

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .तक्रारदाराचे प्रगती योजनेच्या फरकाचे बिल अदा करण्यासाठी-कनिष्ठ लिपीक,सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगांव येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी यास ४० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी रंगे हात पकडल्याचि घटना दि.७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी घडली

थोडक्यात हकीकत अशि कि यातील तकारदार यांचा आश्वासीत प्रगती योजनेच्या फरकाचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करून त्यावर वैदयकीय अधिक्षक यांची सही घेऊन लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी यातील आलोसे श्री. मंगेश जगन्नाथ जोशी, पद कनिष्ठ लिपीक, नेमणुक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगांव, ता.शेगांव, जि. बुलढाणा हे ४० हजार रुपये लाचेची मागणी करित असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे केली होती.

त्यानुसार दिनांक ०२.११.२०२३ रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता,लोकसेवक श्री. मंगेश जगन्नाथ जोशी, पद कनिष्ठ लिपीक, नेमणुक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय,शेगांव यांनी तक्रारदार यांचेकडे ४०हजार रुपये लाच मागणी करून सदर लाच रक्कम तक्रारदार यांच्या नोव्हेंबर महीन्याच्या पगारासोबत बिलाची रक्कम जमा झाल्यानंतर स्वीकारणार असल्याचे सांगीतले.

https://www.suryamarathinews.com/आ-संजय-कुटे-व-उपविभागीय-अध/

त्यानुसार तक्रारदार यांचा नोव्हेंबर महीन्याचा पगार झाल्याने आलोसे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन बोलावल्याने दिनांक ०७.१२.२०२३ रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता. आलोसे यांना तक्रारदार यांचेकडुन ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.वृत्त लिहीस्तव याप्रकरणी मंगेश जोशी, कनिष्ठ लिपिक याचे विरुद्ध पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो,अमरावती परिक्षेत्र अमरावती , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा,मा. श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एएसआय श्याम भांगे, पोहेकों,प्रविण बैरागी, पोना, विनोद लोखंडे, जगदीश पवार, मपोकों, रवाती वाणी, चालक नापोकाँ, नितीन शेटे अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.

सत्यमेव जयते शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा.
कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ व ९६५७०६६४५५ तसेच टोल फ्रि क्रमांक १०६४
यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केले आहे.buldhananews

आ.संजय कुटे व उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांना सकल धनगर समाजाचे निवेदन

0

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात चराई बंदी करणेबाबत

बुलढाणा जिल्ह्यातील सह्या करणार समस्त धनगर समाज बांधव विनंतीपूर्वक निवेदन देतो की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक मेंढपाळ असून बुरहानपुर मध्य प्रदेश मधून येणारे मेंढपाळ मेंढी चारण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात व  ईथला चारा संपूर्ण उद्ध्वस्त करून समोर निघून जातात त्यामुळे आम्हा स्थानिक मेंढपाळांना चराईसाठी वन वन भटकावे लागत आहे.

यासह परंप्रातातून येणाऱ्या मेंढपाळांच्या जनावरांच्या पासून विविध रोगाची लागन सुद्धा होत आहे सध्या हिवाळा व पुढे उन्हाळा असल्याने आम्हास मेंढ्यांसाठी चराई जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे परंतु परप्रांतीतून येणारे मेंढपाळामुळे आमच्या जनावरांना कोणतेही चराईक्षेत्र शिल्लक राहत नाही परिणामी जनावरांचे उपासमारी होऊन कित्येकदा शेकडो जनावरे दगावत आहे.

त्यामुळे येत्या दहा दिवसात प्रशासनाने या परंप्रातीय मेंढपाळांना आपल्या हद्दीतील काढून द्यावे अन्यथा आम्ही  बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मेंढपाळ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन हेच एकमेव जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन मा आ संजय कुटे व

मा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर

भाऊराव मांगोजी खरात

राजू मल्हारी डोमाळे शिवदास उखर्डा सोनोने श्याम राजिराम कोकरे महादेव खरात

बंसी डोमाळे सोनाजी डोमाळे गजानन डोमाळे सोनाजी मदने गंगाराम डोमाळे बाळकृष्ण खरात राजू डोमाळे तानाजी मोरे अंबर डोमाळे बंडू झिंटे बोंहर कारंडे हनुमान डोमाळे तानू मारकळ महादेव पोकळे सदाशिव डोमाळे

यांच्या सह बहुसंख्येने घनगर समाज बांधव उपस्थित होते

adhiveshan   /  हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

 

कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे आरक्षण देणार

नागपूर, दि. 6 – नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नागपूर येथे उद्या, दि. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री महोदयांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे,कामगार मंत्री सुरेश खाडे, कौशल्य विकास, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आशिष जायस्वाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन होत आहे. विदर्भाशी आमचे जिव्हाळ्याचे एक नातं आहे. विदर्भातील जनतेला ही अधिवेशनामधून न्याय देताना एक विशेष आनंदही होत आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रितीने जे प्रकल्प, योजनांचे निर्णय घेतले आहेत, ते पूर्ण केले जातील. गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कामे पोहोचण्याचे काम हे सरकार करत आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमात काल बीडमध्ये 70 ते 80 हजार लोक उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 2 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार हे लाभार्थ्य्यांपर्यंत जाऊन त्यांना लाभ देत आहेत. लाभार्थी स्टेजवर येऊन लाभ घेतात हे चित्र देशात फक्त आपल्या राज्यात दिसत आहे. आमच्या सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान होत असलेल्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान योजनेत लाभ दिला आहे. त्याबरोबरच देशात महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना घोषित करून आणखी सहा हजार प्रति शेतकरी लाभ देण्यात सुरूवात केली आहे. अवकाळी गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात शासन हात आखडता घेणार नाही, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयावर सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून अतिशय प्रामाणिक आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही तसेच इतर समाजावर अन्याय होणार नाही. तसेच कोणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यावर मंत्रिमंडळ हे ठाम आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम ठेवावा.

https://www.suryamarathinews.com/भारतरत्न-डॉ-बाबासाहेब-आं-4/

अधिवेशनात शेतकरी, आरक्षण प्रश्नांवर समर्पक उत्तरे देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसcmomaharashtra

आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज सकाळीच सर्वजण चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करून आलो आहोत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकतेच चार राज्यांमध्ये चक्रीवादळ आले होते. त्यामुळे हवामान विभागाने पुढचे तीन दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तविली आहे. जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे.

त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे किंवा होत आहे, त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले आहेत. राज्यावर कर्ज वाढत असल्याच्या चर्चा आहे. मात्र, 2013 साली आपली अर्थव्यवस्था 16 लाख कोटी होती, आज ही अर्थ व्यवस्था 35 लाख कोटी इतकी झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे.

आज देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था समतोल आहे. एनसीआरबीच्या अहवालात राज्य गुन्हेगारी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. मात्र, या अहवालात लोकसंख्या व एकूण गुन्हेगारीची वर्गीकरण यावर त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.

हिवाळी अधिवेशनात सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे. सभागृहामध्ये शेतकरी, आरक्षणाचे प्रश्नांवर सकारात्मकतेने चर्चा करण्यात येतील व त्यावर समर्पक उत्तरे देण्यात येईल. महाराष्ट्राच्या हितासाठी सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

*शासनाने आर्थिक शिस्त पाळली – उपमुख्यमंत्री अजित पवार*

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, विदर्भात होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या सरकारच्या वतीने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातल्या इतर प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात येणार असून याद्वारे सर्वांचे समाधान होईल, याचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भात शेती प्रश्नावर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, धान, संत्रा आणि इतर पिकांबाबत तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा होईल व न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होईल.

केंद्राच्या आर्थिक शिस्तीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे राज्याची केंद्राकडे आर्थिक पत चांगली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ठरविलेल्या निकषानुसार आपण यावर्षी एक लाख वीस हजार कोटीचं कर्ज काढू शकतो. मात्र, आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अंदाजे ८० हजार कोटींचे कर्ज काढण्याचे ठरविले आहे. राज्याचा जीएसडीपी 2013-14 ला 16 लाख कोटी होता, तो यावेळी मार्च 2024 पर्यंत सुमारे 38 लाख कोटींपर्यंत वाढणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

चहापान कार्यक्रमाला मंत्रिमंडळ सदस्यांसह विधीमंडळ सदस्यांची उपस्थिती

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आज चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.adhiveshan

 

शेगाव येथील राजश्री शाहू बँकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

0

 

राजश्री शाहू परिवाराच्या माननीय संदीप दादा शेळके यांच्या वन बुलढाणा मिशन शेगाव ऑफिस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ साव्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित शितल ताई शेगोकार साहित्यरत्न पुरस्कार प्रधान केलेल्या महिला म्हणून शेगाव येथील असून यांनी वन वन बुलढाणा मिशनला पाठिंबा दिला आहे व तसेच कार्यक्रमाला शाखा मॅनेजर काळे सर मुकेश सर वाघमारे सर तसेच तालुका समन्वयक अजबराव निंबाळकर उपस्थित होते

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर #चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

0

 

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर #चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू असून भारतीय राज्यघटना संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कायदे तयार केले, अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणाला मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

मा. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगाला हेवा वाटेल असे इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार,प्रवीण दरेकर,सदा सरवणकर,कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे,सरचिटणीस नागसेन कांबळे,देशभरातील आलेले अनुयायी उपस्थित होते.

BULDHANA / अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना आर्थीक मदत मिळावी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शेगाव तहसीलदारांना निवेदन

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि.प्र.

शेगांव: तालुक्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेगांव शहर व तालूक्यातील शेतक-यांना आर्थीक मदत मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली आहे याबाबत शेगाव येथे तहसील कार्यालयात तहसीलदार समाधान सोनवणे साहेब यांना वंचीत च्या वतीने आज 05 डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेगांव तालुक्यामध्ये गेल्या 24 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2023 पर्यंत संपुर्ण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी यांचे शेतातील तुर, हरबरा, कपाशी, कांदा, रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

त्याला आर्थीक संकटातुन बाहेर काढण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रत्येक शेतक-याच्या शेतावर जावुन तलाठी मार्फत सर्व्हे करून शेतक-याला योग्य ती आर्थिक मदत करुन न्याय देण्यात यावा जेणे करून शेतकरी आर्थीक संकटातुन मुक्त होईल.

https://www.suryamarathinews.com/crimenews-14/

नुकसान ग्रस्त शेतक-याला हेक्टरी 20 ते 25 हजार रूपये मदत जाहीर करावी तसेच आत्तापर्यंत ज्या शेतक-यांना कर्ज माफी झाली नाही अशा शेतक-यांना सुध्दा कर्ज माफी तातडीने देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर
दादाराव अंभोरे. शंकर इंगळे .इमरान खान.अजय भाऊ आदी सह बहुसंख्य कार्यकर्त्या ंच्यआ सह्या आहेत

Crimenews /मुलीने प्रेमविवाह केल्याचा मनात राग, पतीसह सासूला केली मारहाण, गुन्हा दाखल

0

 

 

खामगाव (बुलढाणा) : girl मुलीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर ती सासरच्या घरी काही दिवसांनी आली परंतु असं असताना घरात घुसून पतीसह सासूला केली मारहाण १२ जणांनी मारहाण केल्याची घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे रविवारी दुपारी घडली आहे.

याप्रकरणी या तक्रारीवरून तीन महिलांसह नऊ पुरुषांवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून.

खामगाव तालुक्यातील पारखेड येथील श्रीपाद सोमनाथ आणेकर (४७) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचा मुलगा गौरव आणेकर याने गावातील दिव्या नामक मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. या दरम्यान, त्यांच्या घरी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने ते दोघेही घरी परतले. परंतु यावेळी त्या मुलीची आई शीला मंगलसिंग चव्हाण ही घरात आली.

तिने काहीएक कारण नसताना मुलीच्या सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली. व त्याचवेळी लीलाबाई कैलास डाबेराव, पहाडिंग कैलास डाबेराव, सुशिला फुलसिंग पवार, पहाडसिंग फुलसिंग पवार, महेंद्रसिंग प्रतापसिंग चव्हाण, दुर्गासिंग प्रतापसिंग चव्हाण, श्रीकृष्ण प्रतापसिंग चव्हाण, महादेव फुलसिंग पवार, विक्रम नरसिंग सोळंके, नवलसिंग मोहनसिंग राठोड, हरिभाऊ लयेनसिंग सोळंके यांनी हातात लाठ्या – काठ्या, दगड घेऊन घरात प्रवेश केला. त्यावेळी गौरव याला जबर मारहाण करण्यात आली. व घरातील सामानाची फेकाफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

येथे क्लिक करून पहावे

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/bjpnews/

तीन दुचाकी, एक चारचाकी गाडीची पण मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केल्याचे म्हटले आहे. या पूर्ण तक्रारीवरून पोलिसांनी तीन महिलांसह नऊ पुरूष आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४६, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तर या प्रकरण मधील पुढील तपास पोहेकॉ. देवराव धांडे करीत आहेत. Policecrimenews

Shegaon / शेगांव येथे दि.१० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय दख्खनी मराठा समाजाचा उपवर वधू व पालक परिचय मेळावा

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव दि.४ दख्खनी मराठा समाजाचा उपवर वधू पालक परिचय मेळावा  दि.१० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

दख्खनी मराठा मंडळ अकोलाच्या वतीन
शेगांव येथे राज्यस्तरीये आयोजित उपवर- वधू व पालक परिचय मेळावा रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केला आहे या मेळाव्यात अकोला,बुलढाणा, वाशिम, जळगाव खानदेश, अमरावती, धुळे यवतमाळ या ठिकाणाहून समाज बांधव उपस्थित राहणार आहे दख्खनी मराठा समाजातील लग्न जुळविण्याच्या दुष्टीने दख्खनी मराठा मंडळ अकोलाच्या वतीने गेल्या ५ वर्षी पासुन उपवर वधू व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे  तर या वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे ६ वा मेळावा आयोजित करण्यात आले आहे.

दि.१० (वार रविवार) डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे ठिकाण द्वारका लॉन, उड्डाण पुलाच्या बाजूला, अकोट रोड, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा (महाराष्ट्र) – ४४४२०३ येथे आयोजित केले आहे दि.१० डिसेंबर २०२३  रोजी होणाऱ्या मेळाव्यासबाहेरगावाहून येणाऱ्या समाज बांधव व भगिनींची दि.९ डिसेंबर २०२३ सायंकाळची जेवणाची व रात्री मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या परिचय मेळाव्याला समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन
दख्खनी मराठा मंडळ शेगांवच्या वतीने दीपक सुरोसे यांनी प्रसिद्धपत्रकाद्दारे केले आहे.

चौकटीत घ्यावे….
विविध समिती गठीत.
दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री द्वारका लॉन, येथे मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंग मध्ये विविध विषयांवर चर्चा करून परिचय मेळाव्यासाठी विविध समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये स्वागत समिती, देणगी समिती, नोंदणी समिती, पार्कींग समिती, पुस्तक वितरण समिती,
भोजन समिती, पाणी पुरवठा समिती असे विविध समिती गठीत करण्यात आली आहे.

यावेळी शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. Shegaon