Home Blog Page 150

मौलाना आझाद विचार मंच्या वतीने आरक्षण, शिक्षण व संरक्षण साठी धरणे आंदोलन (निषेध निदर्शने)Reservation

0

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

बुलढाणा.18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच, बुलडाणा शाखेतर्फे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन (निषेध निदर्शने) आयोजित करण्यात आले होते. 18 डिसेंबर, सोमवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निदर्शने सुरू होती.

बुलडाणा जिल्ह्यातील हजारो मुस्लिम राजकीय, सामाजिक, शैक्षणिक लोक व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये खालील मागण्यांचा समावेश होता.
मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे.

केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी. पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा. मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह स्थापन करावे.
राज्यातील वक्फ मालमत्तेचा वापरچ मुस्लिमांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजातील माबलिंचींग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत. मौलाना आझाद शैक्षणीक व आर्थिक विकास महामंडळ यांचे कर्ज 10 लाखांपर्यंत मर्यादित असावे.

बेरोजगार तरुणांना थेट कर्ज मिळावे. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या सीबीएसई निवासी शाळा स्थापन कराव्यात.बार्टी प्रमाणे मार्टी कायम करण्यात यावा.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हाजी मुझमल खान यांनी शेकडो लोक जोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला.रेसेर्व्हशन

एक क्लिक वर बातमी

👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/sangrampur-chana-damage/

विशेष मुस्लिम धर्म गुरूंची उपस्थिती लक्षणीय होती ज्यात मौलाना अकबर साहब, मौलाना खलील साहब, मौलाना ईनायत साहब, मौलाना सनाऊल्ला साहब, आणि जिल्हाभरातील मुस्लिम नेते, हाजी मुज़म्मिल अली खान, हाजी रशीद खान जमादार,एड.नाझेर काज़ी,अताऊलला खान सर, बाबु जमादार,संजय राठौड़, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, दिलीप कुमार सानंदा,मोहन पाटील, हरिष रावळ,राजु पाटील, हाजी दादु सेठ, डॉ.अरविंद कोलते,स्वाती वाकेकर,रामविजय बुरंगले,लक्षमण घुमरे,सज्जाद हुसेन,मो.वसी रज़ा, मो इरफान कच्ची,वासिक नवेद सर, उबेद भाईजान, कासम गवळी, इरफान अली, इब्राहिम खान, डॉ. अनिस, मुज़म्मिल फुरकान,
काशीफ कोटकर, वाजीद कादरी, शेख युनूस,सलाम खान, मो. साबिर, , बब्बु भाई,रेहान भाई,गौतम गवई,डॉ. गुफरान, मो. वसिम, मो. सुफियान, मो. मुशिर, ज़ाकिर कुरेशी, युसुफ खान, रफिक सर, मो. कलिम, एड. मोहतेशम, इरफान पठाण, गुफरान खान, फिरोज खान, मो. रफिक, लाईक खान, शफक्ऊल्ला, मो. अमिन, रिज़वान सौदागर, रब्बानी देशमुख, हाजी अकरम, गजनफर खान, अनवर चौधरी, अज़हर देशमुख, फ्ईम देशमुख, मिर मक्सुद अली, इरफान काज़ी, शेख अफरोज़, सलाम खान, डॉ. सलीम कुरेशी, एड. जावेद कुरेशी, हाजी ईनायत खान, मो. तौसिफ, एड. सलीमोद्दीन, असलम अंजुम, जुलकर भाई, गाज़ी भाई, एड. शाहिद शेख, स्उद सेठ, साबिर अली, इरफान सर, रिज़वन सर, मो. ईल्यास, चांद ठेकेदार, जाकिर भाई, आबिद सर,सय्यद शकील, मो. रफिक, ईकबाल खान, मोईन काज़ी, रियाज शेख, हैदर कुरेशी, वाजीद खान, इमरान, वसिम, सिकंदर कुरेशी, पठाण सर, नफिस शेख, हमिद खान , एड. मोहसिन, एड. मजीद कुरेशी, एड. वानखेडे, एड. शहज़ाद खान, तौसिफ कुरेशी, डॉ. ज़ूबेर, अनु कुरेशी, मो. इरफान, शेख अनवर, अफरोज़ भाई, जहीर ठेकेदार, सय्यद साजीद, मो. रफिक, छोटु गवळी, कलिम मंसुरी व अन्य मुस्लिम लोक आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच ऐतिहासिक आंदोलन असल्याचे सिद्ध झाले. या आंदोलनात जिल्हा उर्दू शिक्षक संघ, मुस्लिम आरक्षण समिती, मुस्लिम सेवा संग, सोबत राहिले, Reservation

Sangrampur Chana Damage : शेकडो एकरातील हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर

0

 

Sangrampur Chana Damage : शेकडो एकरातील हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक) 8975551991

गेल्या काही महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने या संग्रामपूर तालुक्यात कपाशी, तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत लागवड केलेल्या हरभरा पिकावर ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी फिरवल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.

साधारणतः या दिवाळीच्या मुहूर्तावर रब्बीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु या सोयाबीन तयार झाल्यावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या लागवडीची तयारी सुरू केली होती. पंरंतु मागील गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सतत पावसाने या संग्राम पूर तालुक्यात धुमाकूळ घातला होतं.

https://www.suryamarathinews.com/sangtiraobhongal/

त्यामुळे या कापूस, तूर, या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेअसून. शेतकऱ्याचे हजारो क्विंटल कापूस शेतात भिजला. व व्यापारी या भिजलेल्या कापसाला अत्‍यंत कमी भावात खरेदी करीत आहेत. परंतु तूर पिकाचे पण नुकसान झाले. तुरीच्या शेंगा गळून पडल्या होतं. परंतु शेतात आता केवळ तुराट्या उभ्या आहेत. म्हणुन पावसाची संक्रांत आल्याने शेतकरी पार उद्‍ध्वस्त झाला आहे.

पावसानंतर ओलाव्यामुळे मर रोगाचे खूप मोठ्या प्रमाण वाढले. संग्रामपूर तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरविले आहे.Sangrampur Chana Damage

संग्रामपूर येथील तीन एकरात हरभरा पेरणी केली होती. परंतु या पावसामुळे हरभरा पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्‍याने अंकुरलेल्या हरभरा रोपावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्‍यामुळे हरभरा पिकावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय पर्याय उरलं नव्हता.

परंतु या दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.- श्रीकृष्ण राऊत, तामगाव, जि. बुलडाणा
अमोल बनसोड, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर दुबार पेरणी करायची झाल्यास शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ज्वारीचे पीक घेता येईल. व सोयाबीन, तीळ, जवस आदी पिके पण घेता येतील. परंतु यासाठी ओलिताची सोय असणे खूप गरजेचे आवश्यक आहे. मात्र या २० डिसेंबरपर्यंत उशिरा येणाऱ्या हरभरा वाणाची पेरणीसाठी निवड करता येईल. पण बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. असे आव्हान कृषी अधिकारी अमोल बनसोड यांनी दिली..Sangrampur Chana Damage

महाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रवानगी / sangtiraobhongal

0

 

संगितराव भोंगळ यांनी लक्झरी बसला दिली झेंडी

संग्रामपुर(राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ उपाख्य राजु पाटिल तथा डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.जळगांव (खान्देश) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीर पार पडले.

या शिबीरात रुग्णांनी हृदयरोग तपासणी,2D इको ईसीजी,शुगर तपासणी,नाक,कान,घसा तपासणी,मोतीबिंन्दु शस्त्रक्रिया,महिलांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आल्या होत्या.या महाआरोग्य शिबीरात बहुसंख्य रुग्णांनी उपचार घेतले त्या रुग्णांना पुढिल उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिबीरात शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्याची आज दि.१९ डिसेंबर रोजी.रुग्णांना लक्झरी बस ने डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव (खान्देश) येथे पाठविण्यात आले.

https://www.suryamarathinews.com/crime-news-2/

यावेळी लक्झरी बस ला संगितराव भोंगळ यांनी झेंडी दिली. यावेळी रुग्णांचे नातेवाईक व गावकरी बहुसंख्यने उपस्थित होते.sangtiraobhongal

Crime News | निकाह होण्यास साठी फक्त काही तास असतानाच वधुची गळफास घेऊन आत्महत्या

0

 

Crime News | निकाह होण्यास साठी फक्त काही तास असतानाच वधुची गळफास घेऊन आत्महत्या

 

सोलापूर येथे विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असतानाअचानक निकाह साठी काही तासात होणार असताना नवरी मुलीने आपलेच राहत्या घरी बेडरुम मधील सिलिंग फॅनला ओढणीने साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे.

सोलापूर येथील सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम : शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या नवरीच्या नाव आहे. हा प्रकार सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आल.

सोलापूरची सालिया शेख हिचा विवाह आज होणार होता. पण घरी पाहुणेही आले होते. पण या दरम्यान, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास आपलेच राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवुन बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

https://www.suryamarathinews.com/amravtinews/

व तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण या घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. पण विजापूर नाका पोलीस पुढील तपास करीत आहेत. Crimenews

धारणी प्रकल्प कार्यालयात कार्यरत पुरवठा अधिकारी गिरडकर यांची विभागीय चौकशी करावी

0

 

आदिवासी विकास उपायुक्तांचे धारणी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र

धारणी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रमशाळेच्या 2023-24 च्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा परस्पर रद्द केल्याप्रकरणी आदिवासी विकास उपायुक्त जागृती कुमरे यांनी पुरवठा अधिकारी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.


या पत्रानुसार 2019 ते 2023 या कालावधीत झालेल्या क्रीडा स्पर्धांची सविस्तर चौकशी आणि तात्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. गिरडकर यांनी कारकून म्हणून काम केल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. मेस आणि खाद्यपदार्थ पुरवठ्याचे कंत्राट सांभाळणारी व्यक्ती त्यांच्या गाडीतून गिरडकर यांच्याकडे छोट्या भेटीसाठी जाते.

नोव्हेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान कोणत्याही आदिवासी सामाजिक संस्थेला किंवा महिला बचत गटाला निविदा देण्यात आल्या नाहीत. स्पर्धेदरम्यान भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बिरसा क्रांती दलाने उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांना निवेदन दिले होते.

https://www.suryamarathinews.com/crimenews-27/

एवढेच नाही तर गिरडकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आदिवासी विकास उपायुक्तांनी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली असून याप्रकरणी गिरडकर यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.amravtinews

माणुसकीचा धर्म सोडलेला पालिकेचा कारभार , गावातील नागरिकांना मृत्य नंतर ही न्याय नाही ,crimenews 

0

*मृत्यूनंतरही मरणयातना; रस्ता नाही*

पुणे आंबेगाव खुर्द सच्चाई माता आगम परिसर अटल 12 येथे  विविध समस्येला नागरिक तोंड देत असताना शासन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. नागरिकांचा मोठा टॅक्स पालिकेने दरोडा टाकून गोळा केला .

सुविधा देत नसल्यामुळे हा दरोडाच आहे. असे सिद्ध होत आहे. असा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत कांबळे यांनी केला त्याचे कारण असे की नागरिकांना कुठली सुविधा शासन पूर्वत नाही.

आज झालेली घटना वृद्ध मयत विमलबाई धडे यांना ने आन करण्यासाठी सुद्धा  रस्ता नाही. नागरिकांनी स्वतःहून रस्ता तयार केला तरी देखील मयत नागरिकांना गाडीमध्ये घेऊन जाता आले नाही.

परिणामी ॲम्बुलन्स रस्त्यामध्ये फसली,  2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आलेला हा भाग अजूनही आदिवासी सारखा वाटतो असे वाटते हा भाग शहराच्या लगत असला तरीसुद्धा अधिवासी पाडा म्हणून पुणे महानगरपालिकेने घोषित केले की काय असाही आरोप इथले नागरिक करत आहे.

येथे क्लिक करावे

https://www.suryamarathinews.com/crimenews-26/

सतोष शेंबडे, ऍड.प्रदीप माने, ऍड. महादेव कापरे, राज पाटील, धीरज शर्मा, सागर जाधव, राम वानखेडे, बालाजी बिराजदार, लक्ष्मण केकान यदि मयत नातेवाईक नागरिक करत होते.crimenews

शेणगावचा माजी उपसरपंचाला विनयभंग व अँट्रासिटीचे गुन्ह्यात जिवती पोलिसांकडून अटक crimenews 

0

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================
जिवती -शेणगावचा माजी उपसरपंच व ताडी हिरापुर येथील रहिवाशी असलेले दिगंबर अप्पाराव पोले वय 45 वर्ष यांना आदिवासी महिलेचा विनयभंग केलेचे प्रकरणात जिवती पोलिसांकडून अटक करणेत आली आहे.

दिनांक,17/12/2023 रोजी मौजा ताडी हिरापुर येथे दिगंबर पोले चे घराजवळ राहणारी महिला ही तिचे घरात नातवांसोबत झोपली असताना दिगंबर अप्पाराव पोले याने मध्यरात्रीचे सुमारास महिलेचे घरात प्रवेश करून हात पकडून तिचा विनयभंग केला .

https://www.suryamarathinews.com/jansavandyatra/

अशा महिलेच्या तक्रारीवरून दिगंबर पोले याचे विरुध्द जिवती पोलिस ठाणेत विनयभंग व ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला आहे. व दिगंबर पोले याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास डी. वाय .एस .पी .गडचांदुर करीत आहे. Crimenews

परिवर्तन जनसंवाद यात्रेचे सिंदी रेल्वे शहरात जेसीपी द्वारे पुष्पवर्षाव करीत भव्य स्वागत / jansavandyatra

0

 

दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून दिल्याबद्दल अतुल वांदिले यांचे सिंदी रेल्वे शहरात भव्य स्वागत

संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले – सलील देशमुख

सिंदी रेल्वे :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी पोहना येथील महादेव मंदिरातून सुरूवात झाली होती. या यात्रेचे १७ डिसेंम्बर रोज सिंदी रेल्वे शहरात आगमन झाले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदी शहर द्वारा जेसिपी द्वारे पुष्पाचा वर्षाव करीत ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या २८ व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सलीलजी देशमुख यांनी उपस्थित राहुत परिवर्तन जनसंवाद यात्रेचा सभेला संबोधित केले.संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले आहे.

परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अतुल वांदिले व त्यांच्या सहकार्याने २८ दिवस घरी न जाता २८८ गावांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या आहे.त्यांच्या या संघर्षाला २०२४ मध्ये यश नक्की मिळेल असे प्रतिपादन युवा नेते सलील देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस किशोरजी माथनकर, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकजी वांदिले,सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई देशमुख,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगराध्यक्ष संगीताताई शेडे, माजी उपाध्यक्ष सुधाकरजी खेडकर,शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, बबनरावजी दाभणे गुरुजी, प्राचार्य अशोक कलोडे,मोहन अंबीरे,बाजार समिती संचालक गणेश वैरागडे,

https://www.suryamarathinews.com/homeguard/

महादेव वांदिले,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, शिवसेनेचे सचिन लांबट, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ तळवेकर,फिरोज बेरा, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सुनीलजी शेंडे,माजी नगरसेवक सुमनताई पाटील, कमलेश डगवार,गजानन धाबडधुसके, हेमराज झाडे, नितेश झाडे, जगदीश बोरकर, अफजल बेरा, बबलू खान, वसंतराव सिरसे, नितीन देशमुख, जावेद मिर्झा, संदीप उईके,

सुधाकर वाढई, राजू मेसेकर, बंडु लोणकर,नदीम भाई, बबलू भाई, अनिल लांबट,गणपत ढगे,अजय पर्बत अरुण सावरकर, घोडे पाटील, सिमा तिवारी, सुचिता सातपुते, सुजाता जांभुलकर, सविता गिरी, विद्या गिरी, वकीलताई, मिनाक्षी ढाकणे, दिपाली रंगारी
सुमित तळवेकर,निलेश तकवेकर, बंटी बेलखोडे,सुमित शेंडे, अतुल कारवडे, सोनू बोरकर, राहुल बेले, रवी राणा,

अनुप वाघमारे, सुमित वाघमारे, सुनील सोनटक्के, हेमंत झाडे,सोनू झाडे, रवी वाघमारे,रोशन तडस जगदीश बोरकुटे दीपक अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..jansavandyatra

हिवाळी अधिवेशनातुन सुध्दा होमगार्ड चे प्रश्न दुर्लक्षित- सोनु मोहोड /homeguard

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

होमगार्ड संघटनेकडुन लोकप्रतिनिधींसह विविध पक्षातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळींना होमगार्ड च्या समस्या व प्रश्न लेखी स्वरुपात कळवुन सुध्दा सर्वांनीच दुर्लक्ष केले. हा प्रश्न चालु अधिवेशनात तरी मांडल्या जाणार ही अपेक्षा असतांना कुठल्याही नेत्यांनी या संदर्भात सकारात्मक भुमिका मांडली नसल्याचे दिसुन येते. असा,आक्षेप सोनु मोहोड यांनी घेतला आहे.

मोहोड यांनी म्हटले की, राज्यात ४८ हजार होमगार्ड महिला व पुरुष कार्यरत आहेत.त्यांच्या वर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्यांचे प्रश्न समजुन घ्यावे व चालु हिवाळी अधिवेशनात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची भुमिका असायला हवी होती.

मात्र,नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना सुध्दा विदर्भातील एकही आमदार किंवा मंत्री याप्रश्नांवर बोलायला तयार नाही. होमगार्ड प्रश्न मांडतांना मोहोड यांनी म्हटले की,निष्काम सेवा हे वाक्य हटवुन नियमित सेवा करावे,३६५ दिवस होमगार्डला काम द्यावे,सेवा निवृत्ती ५८ वरुन ६० करावे,निवृत्तीनंतर भत्ता देण्यात यावा,

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातव्या वेतन आयोगानुसार मानधन वाढवुन देण्यात यावे,महिला होमगार्डला महिला पोलिस प्रमाणे प्रसुती रजा मिळुन इतर सुविधा द्याव्यात,होमगार्ड यांची दर ३ वर्षांनी होणारी पुनर नोंदणी प्रक्रीया बंद करण्यात यावी.अशा स्वरुपाच्या मागण्यांचे यापुर्वी लोकप्रतिनिधींना देवुन सुध्दा दुर्लक्ष करण्यात आले.

 

 

येथे क्लिक करावे

 

https://www.suryamarathinews.com/avedhdaru/

हिवाळी अधिवेशनात होमगार्ड चे प्रश्न मांडल्या जातील अशी अपेक्षा असतांना सुध्दा सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधी सह विरोधकांची भुमिका सुध्दा सकारात्मक नाही. असे सोनु मोहोड यांनी म्हटले / homeguard

दारूचा सर्रासपणे विक्री..!शासनाच्या आदेशाला केराची टोपली..!

0

 

पोलिस प्रशासनाना समोर मोठे आव्हान?लक्ष देणार काय?

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

संग्रामपूर:-संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल मानलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले टूनकी नावाचे गाव आहे.येथील सरकार मान्य देशी दारूचे दुकान हे जळगाव जामोद रोडवर असून त्या ठिकाणी लावलेले फलकावर सकाळी देशी दारूचे दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ स्पष्ट स्पष्टपणे लिहिलेली असून सुद्धा शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

नियमानुसार सकाळी आठ वाजता ते रात्र दहा वाजेपर्यंत आणि किरकोळ विक्रेता लिहिलेले असून सुद्धा संबंधित देशी चे दुकान सकाळी सात वाजताच दुकान उघडून त्या दुकानांमधून चोरी,चोरी, अवैध” रीतीने सकाळी कॉटरी चिल्लर व ठोक पेट्यांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

तसेच दुकानांमधून सकाळी पेट्या बाहेर काढून मोटरसायकल द्वारे तालुक्यामधील छोटे-मोठे खेड्यापाड्यात दारू पोहचवली जाते.तर या नियमबाह्य प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन की दुर्लक्ष?या सर्व गोष्टींचा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून अवैध दारूचा व्यवसाय अधिक जोर धरत असून तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांच्या संसारातील छोट्या मोठ्या मुलांच्या भविष्याची राखरांगोळी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या प्रकरणामुळे परिवारांची आयुष्याची राख रांगोळी होत असून आई-वडिलांच्या व आजी,आजोबांच्या नजरेसमोर त्यांचे भविष्य अंधारामय झाल्याचे दिसत आहे.याचे जिम्मेदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर आदिवासी भागामध्ये लोक शेतीमध्ये काम करतात रात्र दिवस त्यामध्ये शेतीचे नुकसान कपासी खराब झाल्या तुरी पसरल्या हरभरा खराब झाला मजुरी निघेना आणि जवान तरुण हा व्यसनाधीन होऊन संसाराची राख रांगोळी होत आहे आणि अधिकारी सुद्धा या अवैध्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर लगाम लावत नाही? की कुणाच्या तरी आशिर्वादाने दारू विक्री होत आहे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

उघडपणे सर्रास मोटरसायकलवरून दारूचे बॉक्स खेड्यापाड्यांमध्ये सेलिंग करून दिलें जातात.परंतु कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या निर्देशनामध्ये अवैद्य वाहतूक करताना भरपूर वेळेस आढळून आलेले.

महाराष्ट्राचा डंका उडीसा पश्चिम बंगाल मध्ये वारकरी संप्रदायाचा दुसऱ्या राज्यातील लोकांपुढे आदर्श /Maharashtranews

 

त्यामुळे आता लोकांच्या उत्तम जीवनाचा आणि चांगले जगण्याचा प्रश्न निर्माण झाले आहे? Avedhadaru