Home Blog Page 152

मनसे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार संत सोनाजी महाराजांच्या दहीहंडीला प्रमुख उपस्थिती

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

सोनाला :- संत सोनाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली असून दोन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावाचे वातावरण भक्तीने भरून गेले आहे. व रथयात्रेत हजारो भाविक भक्त सहभागी झाले त्यानंतर दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला व नंतर मंदीरात आरती व व 125 किन्टल चा महाप्रसादाचे वाटप सुरू झाले गावकरी व पंंचकृषीतील सेवाधारी व नागरीक भक्ताचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्धा या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन संत सोनाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा बुलडाणा संपर्क अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकर, प्रभारी जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकार संग्रामपूर तालुका अध्यक्ष शिवा पाटील शेगाव शहर उपाध्यक्ष परमेश्वर लाहुडकर यांनी सोनाजी महाराजांच्या दहीहंडीत सहभाग घेऊन रथाचे मनोभावे दर्शन घेतले.

व सोनाजी महाराजांची आरती केली या नंतर मंदिर प्रशासनाकडून मनसे नेते विठ्ठलराव लोखंडकार यांचा व पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.sonala

शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा १२ तास विद्युत पुरवठा दिला गेल्या नाही तर विद्युत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा अतुल वांदिले यांचा परिवर्तन यात्रेमधून इशारा…

0

 

परिवर्तन जनसंवाद यात्रा आपल्या दारी..
वडनेर व फुकटा सर्कल च्या घरोघरी..

शेतकरी पुत्र अतुल वांदिले घेणार पुढाकार …

हिंगणघाट :- हिंगणघाट,समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथील रुद्रेश्वराच्या मंदिरातून माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख ,जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अतुल वांदीले या नेतृत्वामध्ये सुरु झाली असून ही यात्रा २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत अविरत सुरू राहणार आहे.मागील सहा दिवसामध्ये या यात्रेने चाळीस गावाला भेट दिल्या आहे.

परिवर्तन जनसंवाद यात्रेमध्ये फिरत असताना मागील सहा दिवसात पोहना, शेकापूर(बाई), पिपरी, वडणेर, बुरकोनी, फुकटा सर्कल मधील चाळीस गावामध्ये भेटी झाल्या असून मुख्यतवे शेतकरी,मजूरवर्ग ,युवावर्ग याच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा संकल्प या यात्रेतून होत आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा लाईन नसल्यामुळे आम्हाला रात्री शेत ओलित करण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते.

जर आम्हाला साप चावला किंवा जंगली प्राण्यांनी हल्ला केला तर यांचा जबाबदार कोण राहणार आमच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. त्यामुळे आमचे कुटुंब रस्त्यावर येऊ शकते अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र अतुल वांदिले यांना सांगितली. ही परिस्थिती अतुलभाऊ यांनी ऐकताच आपल्या शेतकरी बापाची किती वाईट परिस्थिती आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं राहून काय फायदा जर आमच्या बापाला धक्का लागणार असेल.

तर आम्ही हे सहन करणार नाही यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा कृषी पंपाला जर तुम्ही सातही दिवस दिवसाला १२ तास वीज द्या जर १२ तास वीज दिल्या गेली नाही तर आम्ही विद्युत कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालय चालू ठेवू देणार नाही ही आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा अतुल वांदिले यांनी दिला आहे.

शेतकत्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी मोठया उत्साहाने ,आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने या परिवर्तन यात्रेमध्ये सहभागी होत आहे .

नागपूर येथे सासर असलेल्या 23 वर्षीयविवाहितेच्या तक्रारीवरून पती सह सासू सासऱ्याविरुद्ध बलात्काराचा व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र.

शेगाव: नागपूर येथे सासर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती व सासू-सासरे यांच्या विरुद्ध बलात्काराचा व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आल्या ची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली 23 वर्षीय विवाहितेने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

की तिचा पतीआरोपी क्र । पती दारु पिण्याचे सवइचा असुन त्यांचे इतर स्त्रियां सोबत अनैतिक संबंध आहेत त्यावरुन आरोपी पती हा फिर्यादी पत्नी सोबत नेहमी वाद करत असतो इच्छा नसताना तिचे सोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार व अनैतिक शारीरिक संबंध ठेवतो प्रसंग करायचे फिने विरोध केला.

असता आरोपी पती फिला मारठोक करून जिवाने मारून टाकण्याची धमकी देतो सासू-सासर्‍यांनी तुझ्या वडीलांनी लग्राचा अर्धा खर्च दिला नाही.तु हुड्याचे बाकी राहीलेले 15 लाख रूपये तुझ्या वडीलांकडुन घेवुन ये असे म्हणुन फिला तिचे सासु सासरे मारहाण करुन शिविगाळ करून शारीरीक व मानसिक त्रास द्यायचे अशा फिचे तोंडी रिपोर्टवरून अप कायमी अपराध क्रमांक 591/2023 कलम 498 अ 376, 377, 504, 506, 34 भा.दं.वी. सदरचा गुन्हा दाखल करून तपास .पो.नि. सुनील अंबुलकर साहेब यांचे आदेशाने सपोनि इंगोले साहेब यांचे कडे देण्यात आला आहे.crimenews

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शेतातून जाण्याच्या कारणावरून चुलत भावा मध्ये हाणामारी.. परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल..

0

 

इस्माईल शेखबुलढाणा .जि.प्र.

शेगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन शेगावच्या हद्दीत येणाऱ्या गव्हाण तालुका शेगाव येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये हाणामारी झाल्या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन ज्ञानदेव कंकडे वय 55 वर्ष राहणार गव्हाण तालुका शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष किसन कंकाळे विरुद्ध अप नं 295/2023 कलम 324 504 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुशीला संतोष कंकाळे वय 38 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन ज्ञानदेव कंकाळे विरुद्ध अपराध नंबर 296 ऑब्लिक 2023 कलम 324 504 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांच्या आदेशाने अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे भेट जमदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण मेटांगे साहेब बकल नंबर 850 करीत आहेत..buldhananews

विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..crimenews

0

 

 

इस्माईल. शेख बुलढाणा .जि.प्र.

जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील दुधाने व काना येथील विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृतक विवाहितेच्या पती सासू-सासरे व दोन ननंदअशा पाच जणां विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार मृतक विवाहितेची बहीण सौ. नेहा अश्विन जाधव वय 26 वर्ष यांनी दिल्यावरूनआरोपी – पती 1. रवि प्रल्हाद उगळकार 2. सासरे प्रल्हाद उगळकार, 3. सासु पार्वताबाई उगळकार, तिन्ही रा. रुधाणा वकाना, ता. संग्रामपुर, 4 नणंद सौ. माया वेरुळकार रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा, 5. नणंद सौ. छाया मोहन भड़, रा. तळेगाव बाजार, ता तेल्हारा. घटनास्थळ – खेर्डा बु ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा विरुद्ध कायमी अप क्र 645/2023 कलम 304 ब, 306, 323, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास तपास अधिकारी – मपोउपनि रंजना आवारे करीत आहेत crimenews

पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी केला सत्कार..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव:येथील शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सुनिल सुसर ,अजय शिरसोले, कैलास गुरव, आणि योगेश सुरुसे यांची पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती झाली. पदोन्नती मिळालेल्या चौघा पोलीस कर्मचारी यांचा ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे फेटा बांधून सत्कार केला.

संविधान दिवसानिमित्त पंचशील बुद्ध विहार शेगाव येथे शितलताई शेगोकार यांचा सत्कार …

0

 

इस्माईल शेख बुलढाणा.जि.प्र.

आज दिनांक 26 नोव्हेंबर जागतिक संविधान दिवसाच्या निमित्ताने प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पंचशील नगर बुद्ध विहार शेगाव येथे गुणवंत महिलांचा सत्कार आयोजक अलकाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आला..

कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी महाराष्ट्र महिला अध्यक्ष शितलताई शेगोकार तसेच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ वैशालीताई तायडे मंगलाताई सोळंके दीपमालाताई कांबळे राजकन्या ताई रेवसकर जयश्रीताई बोराडे ज्योतीताई बावस्कर जयश्रीताई देशमुख प्रणिता ताई धामंदे मैफुजा ताई अकोला जिल्हा अध्यक्ष पूजाताई खेते सय्यद इत्यादी महिलांचा सन्मान सत्कार हा हाय प्रगती महिला क्रीडा बहुउद्देशीय संस्था द्वारे करण्यात आला.

https://www.suryamarathinews.com/buldhana-news-2/

संविधान दिवस कार्यक्रमाचे अध्यक्षांनी संविधान दिवसाबद्दल महिलांचे हक्क अधिनियम अधिकार यांच्या विषयी माहिती दिली आणि हिंदू कोड बिल जे आपण सरकारी मुद्द्यावर महिलावर्ग ज्यांना प्रसूतीची सहा महिने व सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सती प्रथा आज जर समाजामध्ये सती प्रथा असते तर समाजातील स्त्री ही नक्कीच चूल आणि मूल यातच असते.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल काढले नसते तर स्त्रियांच्या पायातील बेडी ही तशीच अखंड राहिली असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला त्यांचा अधिकार त्यांचा सन्मान त्यांचा समानतेचा हक्क दिला आज भारतीय संविधान हे जगातील एकमेव संविधान आहे की जिथे स्त्री पुरुष समानता आहे प्रत्येक स्त्रीचा आत्मसन्मान म्हणजे भारतीय संविधान आहे.

कार्यक्रमाला उपस्थित महिला नर्मदाताई इंगळे दीपमाला ताई गंगा ताई गायकवाड सुजाता व इतर महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन gअलकाते बांगर यांनी केली त्यांनी महिलांच्या हक्काविषयी हिंदू कोड बिल विषयी आणि स्त्री पुरुष समानता याविषयी महिलांना मार्गदर्शन केले…savidhan

Buldhana news : भरधाव दुचाकीची झाडाला टक्कर ; एक ठार, तर दोन गंभीर

0

 

बुलढाणा जिल्हातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड जवळ झालेल्या अचानक अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. असून पुढील जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती जास्त गंभीर असल्याचे सूत्रांनी माहिती सांगितले गेले आहे.

या तीन मित्र एकाच दुचाकीवर (एम.एच २८ बी. एन ९६२९) बसून बुलढाणा जिल्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे गावाकडे जात होते. अचानक या दरम्यान, रोहिणखेड स्थित बारागाव पाणी पुरवठा योजनेच्या टाकीजवळ दुचाकी रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडाला धडकली. त्या मुळे दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

https://www.suryamarathinews.com/crimenews-8/

पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे करीत आहे. Buldhananews

देशी कट्ट्या व सात जिवंत काडतूससह आरोपी अटक,चाैघे फरार

0

 

बुलढाणा जिल्हातील जळगाव जामाेद पाेलिस स्टेशन अंतर्गंत देशी कट्यांची जोरात विक्री सुरु आहे गुप्त माहिती वरून गुन्हे साखेची या खरेदी-विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर राेजी घटनास्थळावर रंगेहाथ पकडले. व यावेळी पाेलिसांनी चाैघांना अटक केली तर चारजण घटनास्थळावरून पसार झाले़. Crimenews

Police पाेलिसांनी देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर साहित्य सह १४ लाख ३ हजार रुपयांचा एवज केला़ जमा .

अकाेला येथील मध्यस्थाच्यामार्फत पुणे येथील दाेघेतर जळगाव जामाेद पाेलिस स्टेशन अंतर्गंत गाेडाळा डॅम येथे देशी कट्टा खरेदीसाठी आले हाेते़. याविषयी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच छापा टाकला़.

https://www.suryamarathinews.com/khamgaontren/

यावेळी माेहम्मद अख्तर शेख मुश्ताक रा. वाशिम बायपास अकाेला, फहदखान फारुखखान रा. भवानीपेठ पुणे, ताैसिफ करीमखान रा. रविवारपेठ पुणे, रामसिंग भवानसिंग मुझाल्दा रा. निमखेडी ता. जळगाव जामाेद यांना अटक केली.

तसेच इतर चारजण घटनास्थळावरून पसार झाले. पाेलिसांनी आराेपींकडून एक देशी कट्टा किंमत ३० हजार, ७ जिवंत काडतूस किंमत ३ हजार ५०० रुपये, कार किंमत १२ लाख व इतर साहित्य असा १४ लाख ३ हजार ५०० रुपयांचा एवज जप्त केला. या कारवाई ने ही असे धंदे करनाऱ्याच्या धाबे दणावले आहे पाेलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.crimenews

डांभुर्णी गावाच्या.चारुदत्त दिनेश पाटील(सोनवणे) यूपीएससी (CDS) या परीक्षेतून ऑल इंडिया रैंक ९६ घेऊन इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट या पदी निवड ..

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी गावातील रहीवासी निंबाजी काका सोनवणे सद्या चोपडा येथे वास्तव्यास असलेले यांचा नातू व गोंदिया येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत दिनेश निंबाजीराव सोनवणे यांचे चिरंजीव चारुदत्त दिनेश सोनवणे याचे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ने घेतलेल्या कम्बाईन डिफेन्स सर्विसेस (CDS)च्या परीक्षेतून ऑल इंडिया रँक 96 घेत भारतीय स्थलसेनेत (Indian Army)लेफ्टनंट -परमनंट कमिशन ऑफिसर या पदी निवड होऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संपूर्ण निंबाजी काका सोनवणे आणि दिनेश सोनवणे व चंद्रशेखर सोनवणे परिवाराचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

अगदी दहावी किंबहुना त्या अगोदर पासूनच उराशी बाळगलेले स्वप्न त्याने जिद्दीने ,कठोर मेहनतीने व अभ्यासाने पूर्ण केल.या प्रवासात त्याला आईवडिलांचा सक्षम पाठिंबा लाभला.खर तर माझ्या दृष्टीने तो सिविल सर्विस मटेरियल आहे आणि तो आयएएस आणि आयपीएस म्हणून देखील त्याची निवड शंभर टक्के झाली असती असं त्याचं अकॅडमीक कॅलिबर आहे कारण मी त्याला अगदी सर्विसेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूटच्या (SPI)परीक्षेपासून मार्गदर्शन करत आलोय परंतु त्याची जिद्द एकच लेफ्टनंट व्हायचे तेही इंडियन आर्मी मधेच त्यामुळे वायू सेनेची परीक्षा पास होऊनही त्याने पुढे मार्गक्रमण केले नाही.

एवढच नव्हे तर मागच्या वर्षी पूर्वपरीक्षा ,मुख्य परीक्षा आणि सर्विस सिलेक्शन बोर्ड चा इंटरव्यू यशस्वी पूर्ण करून त्याची निवड झालेली होती मात्र मेडिकल मध्ये डोळ्याच्या अत्यंत छोट्याशा अडचणीमुळे त्याला जॉईन करता आलं नाही .

नाहीतर आता त्याच प्रशिक्षण पूर्ण झालेले असते परंतु त्याने न खचता पुन्हा तयारी केली आणि यावर्षी विजयश्री अगदी दिमाखात खेचून आणला त्याच्या पुढील सैनिकी करिअर साठी व आपल्या राष्ट्रभूमीच्या रक्षणा साठी ,देशसेवेसाठी प्रचंड शक्ती , साहस आणि यश मिळो अशी प्रार्थना आणि भरभरून शुभकामना ..

संपूर्ण सोनवणे परिवार व ग्रामस्थ डांभुर्णी .स्वयंदीप प्रतिष्ठान डांभूर्णी
मराठा सेवा संघ जळगाव
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र स्वराज्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जळगाव दिनवार्ता समुह आणी सह्याद्री बिल्डर्स जळगाव

Indian Army