Home Blog Page 156

Rohinitai khadse /महिला प्रदेशाध्यक्षा रोहिनीताई खडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0

 

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

वाढदिवसाला “बुके नको, बुक द्या” या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ. रोहिनीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मूर्तिजापूर येथील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व मिठाई भरवत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी गीत गाऊन रोहिनीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमा जयकिरण कावरे यांच्यातर्फे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मुर्तिजापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतील बाळगोपाल,शिक्षकवृंद,गावकरी महिला भगिनी, महिला आघाडीच्या व पक्षाच्या विविध नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत

उत्साहात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समशेरपूर गावच्या सरपंच मीनाताई वानखडे तर प्रमुख उपस्थिती रामकृष्ण गावंडे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव वाहूरवाघ,सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष कोकिळा वाहूरवाघ, महिला महासचिव मनीषा महल्ले,महिला जिल्हा सदस्य पवित्रा जाधव,मुर्तिजापूर महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार,अकोला महिला ता.अध्यक्षा संगिता दाळू,महिला ता.उपाध्यक्ष अनिता शिंगनाथ गजानन वाकोडे, योगेश सोनोने, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय भगेवार, ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, संजय वानखडे, अरविंदभाऊ आटोटे,विष्णु खोत,ग्रा.पं.सदस्य अनुराधा थोप,ज्योत्स्ना थोप यांची होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रकाश रेवस्कर सर, इर्शाद खान सर, शिलाताई गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला जिल्हाध्यक्ष सौ सुषमा कावरे यांनी व सूत्र संचालन विष्णू लोडम यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर जिल्हाभरातील महिला पदाधिकाऱ्यांचे आयोजनाकरिता सहकार्य मिळाले.Rohinitai khadse

मेहकर जामगाव ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल..

0

 

बुलढाणा- मेहकर भाग-1 मध्ये गट नं 21/1 अ व जामगाव मध्ये गट नं. 37/- व 53, शासन नियमानुसार ले आउट झालेले नाही याबाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आशी मागणी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना करण्यात आली.

असता यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांनी NAP/34 बोगस करुन दिल्याबाबत हे सर्व गट 21/1- अ मेहकर भाग-1 जामगाव गट न. 37, व 53 मध्ये सुद्धा शासनाच्या अट व नियमानुसार ले आऊट झालेले नाही.

व त्या ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल करीत आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप भाऊ गवई यानी केली आहे.

मुख्य संपादक जमील सर मलकापूर शब्द की गूंज यांच्या हस्ते जळगाव जामोद विश्रामगृहामध्ये नियुक्तीपत्र व सन्मानपत्र, सन्मान चिन्ह (अवॉर्ड) देण्यात आले

0

 

 

जळगाव जामोद येथे विश्रामगृहात शब्द की गुंज न्यूज चैनल RNI प्राप्त साप्ताहिक, पोर्टल , न्यूज चे मुख्यसंपादक जमील सर मलकापूर यांच्या हस्ते उप संपादक शेख युनुस,अकोट उपसंपादक अली सर, शेगाव तालुका प्रतिनिधी अमिन शेख, वरवट तालुका प्रतिनिधी मोहम्मद तौसीफ, आकोट तालुका प्रतिनिधी अहमद शहा, अकोट मजहर भाई ,आकोट शहर प्रतिनिधी सोहेल भाई, अकोट शहर प्रतिनिधी अहफाज भाई, प्रतिनिधी यांना नियुक्तीपत्र, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह, देऊन सन्मानीत करन्यात आले,

यावेडी शब्द की गूंज चे अकोट उप संपादक अली सर , शेगांव तालुका प्रतिनिधि शेख अमीन भाई, वरवट तालुका प्रतिनिधि मोहम्मद तौसीफ भाई, अकोट तालुका प्रतिनिधि अहमद शाह भाई, अकोट तालुका प्रतिनिधि मजहर भाई, अकोट शहर प्रतिनिधि सोहैल भाई, अकोट शहर प्रतिनिधि अहफ़ाज़ भाई, व परिसरातील शब्द की गूंज चे बरेच से पदाधिकारी उपस्थित होते

accident news /या भीषण अपघातात तीन महिला ठार, तर 22 जण गंभीर जखमी..

0

 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात या भीषण अपघाताची घटना समोर आली.असून ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत.
तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे. हे घटना मोठी असून या घटना 22जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली.

याबाबत असे वृत्त आहे की, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने वाहने पिकअप वाहनाला आमोरासमोर जोरदार धडक दिली.accident news

या भीषण आपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) , चंदनबाई गिरासे (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती

या अपघाताची माहिती मिळतात जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून बचावकार्याला सुरूवात केली. या दरम्यान, यावेळी रोडवरील दोन्ही बाजूची वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.accident news

Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती

0

 

धक्कादायक न्यूज

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अज्ञात नराधमाने केलेल्या कुकृत्यामुळे भटकंती करणारी १६ वर्षीय पीडिता अत्याचार सात महिन्यांची गर्भवती असल्याचा समोर आला प्रकार बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीतून सत्य समोर उघड झाला.

याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला.

शेगाव तालुक्यातील गौलखेड येथील पोलिस पाटील यांनी भटकंती करणाऱ्या अनोळखी पीडितेस शेगाव ग्रामीण पोलिसात दाखल केले. त्या बालन्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तिला बुलढाणा येथील सखी वनस्टाॅप सेंटर येथे दाखल करण्यात आले. पुढील तिची वैद्यकीय तपासणी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली.व त्यामध्ये ती २९ आठवड्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.व तिचे वय साडेसोळा वर्षेच सांगण्यात आले.

https://www.suryamarathinews.com/यावल-फैजपुर-रस्त्यावर-चा/

रुग्णालयाच्या प्रमाणपत्रानुसार तिच्यावर अज्ञात नराधमाने बरेच वेळा अत्याचार करून गौलखेड हद्दीत सोडून दिल्याचेही माहिती समोर आली. त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी ipc भादंविच्या विविध कलमांसह पोक्साे सहकलम ४,६,१२ पोक्साेअंतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत.crimenews

यावल फैजपुर रस्त्यावर चारचाकी व मोटरसायकलचा भिषण अपघातात मोटरसायकल चालकाचा दुदैवी मृत्यु पोलिसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल फैजपुर रोडवरील पॅट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैय्यद खलील उर्फ खलनायक) सैय्यद हमीद (वय-४५) रा. डांगपुरा ता. यावल असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी ३० नोव्हेबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास यावल फैजपुर मार्गावरील सुहानी पेट्रोल पंपासमोरील परिसरात सैय्यद खलील सैय्यद हमिद हे आपल्या ताब्यातील (एमएच १९ सीसी ) बुलेट मोटरसायकलने यावलकडे येत असतांना समोरून येणारी स्विफ्ट कार क्रमांक (एमएम ०४ डीएन २६२७) या वाहनाने यावलकडून फैजपुरकडे जात असतांना मोहसीन खान मुक्तार खान याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सैय्यद खलील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भुसावळ येथे खासगी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

याबाबत मयताचा पुतण्या सैय्यद तन्वीर सैय्यद शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला मिळणार 12 तास विद्युत पुरवठा

0

 

हिंगणघाट,समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मानले शेतकरी पुत्र अतुल वांदिले यांचे आभार

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या परिवर्तन यात्रेने जिल्ह्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे… कृषी पंपाला दिवसा विद्युत वाहिनी देण्याची मागणी करत अतुल बांधले यांनी विद्युत विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता…

या इशाऱ्याची दखल घेत विद्युत वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी अतुल वांदिले यांना विद्युत वितरण विभागाद्वारे पत्र दिले आहे.. या पत्रात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हिंगणघाट विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी वाहिनीवर आठवड्यातील सातही दिवस सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात येईल अशी माहिती दिली आहे..

परिवर्तन यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांची मूळ समस्या म्हणून पुढे आलेली दिवसा कृषी पंपाला थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी आता पूर्ण झाली आहे… अतुल वांदिले यांनी परिवर्तन यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची समस्या समजून घेतली होती.. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा कृषीपंपास द्यावा अन्यथा विद्युत वितरण कार्यालयाला टाळे लावण्याची चेतावणी देण्यात आली होती…..

विद्युत विभागाकडून अतुल वांदिले यांच्या चेतावणीची दखल घेत मौखिक आदेश काढन्यात आला आहे.या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र सकाळी सहा वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत कृषी पंपाची विद्युत पुरवठा थ्री फेज सुरू ठेवला जाणार आहे.
हिंगणघाट,समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथील रुद्रेश्वराच्या मंदिरातून माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख ,जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अतुल वांदीले या नेतृत्वामध्ये सुरु झाली आहे..

हि यात्रा २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत अविरत सुरू राहणार असून, अतुल वांदिले व त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावात कुठे मंदिरात तर कुठे शाळेत मुक्कामी आहेत… अतुल वांदिले यांच्या या जनसंवाद यात्रेदरम्यान विवीध गावात त्यांना मोठा प्रतिसाद दिला जात आहे. आपला शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी म्हणून आपापल्या गावात मुक्कामी आला.

असल्याने विविध गावातील नागरिकांकडून त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची जेवणाची व्यवस्था आपल्या घरी आलेल्या पाहुण्या प्रमाणे केली जात आहे… मागील दहा दिवसांपासून अनेक खेड्यापाड्यात मुक्कामी असलेले अतुल वांदिले देखील गावा गावात रमले असल्याचे चित्र सर्वत्र आहे..

गावातल्या नागरिकांची समस्या गावातील शेतकऱ्यांची समस्या ही आपली प्रमुख समस्या समजत मोठ्या पद्धतीने अतुल वांदिले आक्रमक झाल्याचे देखील पहावयास मिळत आहे… अशातच प्रत्येक गावातून उद्भवणारी शेतकऱ्यांची एक प्रमुख समस्या म्हणून कृषी पंपाचा थ्री फेज विद्युत पुरवठा दिवसा सुरू असावा अशा पद्धतीने समोर आली होती…

अतुल वांदिले यांनी विद्युत वितरण कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला होता.. अतुल वांदिले यांच्या इशाऱ्याची दखल घेत आता विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजत पर्यंत कृषी पंपांना थ्री फेज विद्युत पुरवठा दिला जात आहे… यामुळे आता अतुल वांदीले यांच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेला यश येताना दिसून येत आहे….

हिंगणघाट समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अतुल वांदिले यांचे आभार मानले आहे..

मूर्तिजापूरातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करा – मनसे

0

 

न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन सदर

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
श्याम वाळस्कर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना वरील नामफलक मराठी देवनगरी लिपित ठळक अक्षरांत लिहणे बंधनकारक केले आहे.त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर पर्यत मुदत ही दिली होती.

परंतु मुदत संपूनही शहरातील काही दुकानावर इंग्रजी भाषेत नामफलक लागले आहेत.हे लोक हेतू परस्पर मराठी भाषेचा अपमान करत आहेत.याकडे मुख्याधिकारी न.प याचे ही दुर्लक्ष आहे.या सर्व दुकानावरील नामफलक आठ दिवसाच्या आत मराठी भाषेत करण्यात यावे.जे दुकानदार मराठी नामफलक लावणार नाहीत .

तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन छेडाण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी मुख्याधिकारी न.प.यांना निवेदनद्वारे दिला आहे.यावेळी ता.संघटक चेतन सोळंके,जि.प.सर्कल अध्यक्ष रोहन नवघरे,शहर उपाध्यक्ष अनिकेत शिरभाते,वैभव महल्ले,सचिन काटोले,आशिष कावरे,ओम दवंडे,उपस्थित होते.

अज्ञात आरोपी कडून अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार , पीडिता गर्भवती.. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अज्ञात आरोपीकडून लैंगिक अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना उघडकिस आली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार एक अल्पवयीन बालिका वय अंदाजे साडेसोळा वर्ष हि शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावामध्ये फिरत असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली या माहितीवरून साक्षीदार पोलीस पाटील यांनी नमुद बालीकेस पोस्टेला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन आणुन हजर केले.

सदर बालीकेस मा बाल न्यायालय अध्यक्ष बुलढाणा यांचे आदेशाने तिला सखी वन स्टाप सेंटर बुलढाणा यांचेकडे दाखल करुन आज रोजी वैदयकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांचेकडे पिडीतेची लैंगीक अत्याचाराबाबत वैदयकीय तपासणी करण्यात आली . वैदयकीय अधिकारी सामान्य रुग्णालय बुलढाणा यांनी सदर पिडीत बालीका हिचेवर लैंगीक अत्याचार झाला असुन ति 29 आठवड्याची गर्भवती असुन तिचे वय साडेसोळा वर्षाच्या आतील आहे.

असे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडून ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाले सदर पिडीत बालीका हिचेवर कोणीतरी अज्ञात इसमाने लैंगीक अत्याचार करुन तिला गर्भवती ठेवुन पो स्टे शेंगाव ग्रामीण हददीत ग्राम येथे सोडुन दिल्याने आज रोजी प्राप्त झालेल्या मेडीकल सर्टीफीकेटवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात आरोपी विरुद्ध अप नंबर 300/2023 कलम कलम 376,376(2) जे, एल, भादवी सहकलम 4,6,12 पोस्को सन 2012 अन्वय गुन्हा दाखल करुन सदर गुनह्याचा तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो नी दिलीप वडगावकर ठाणेदार करीत आहेत.crimenews

लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मध्ये झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान rain 

0

 

लोकप्रतिनीधी ना पडला शेतक-यांचा विसर शेतक-यांच्या बांधावर जाण्यास त्यांना वेळ नाही

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल अनेक भागात अवकाळी पाऊसामुळे दि.२७,२८,२९,३० रोजी झालेल्या पाऊसामुळे कापुस,हरभरा,तुर,कांदा,गहु पिकांचे मोठ्याप्रमाणात अतोनात नुकसाना झाले.हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान झाले.लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील अनेक ठिकाणी घरांचे सुध्दा पडझड झाली आहे.लाखपुरी शिवारातील काही शेतातील कापुस तर अक्षरशा खाली पडला तर काही तुरीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले काही हरभरा पिक सडण्याच्या मार्गावर आहे,

व ईतरही पिकांचे नुकसान झाल्याची परिस्थीती आहे.शेतक-यावर असे असमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.या अवकाळी पाऊसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेल्या ३ ते ४ दिवसापासुन सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.व शेतक-यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ लाखपुरी सर्कल मधील शेतक-यावर आली आहे.अवकाळी पाऊसामुळे लाखपुरी,रसुलपुर,रेपाटखेड,खुदावंतपुर, दातवी,दुर्गवाडा,सांगवी,वाघझडी,मंगरुळकांबे,जांभा,लाईत व इतर गावाचा समावेश आहे.

शासनाने सदर झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याकरिता महसुल विभागाला व कृषी विभागाला तातडीने सर्वे करण्याचे आदेश देवुन शेतक-यांला तातडीने आर्थिक मदत द्यावी व अशी मागणी लाखपुरी च्या माजी पं.स.सदस्या मिनल नवघरे सह लाखपुरी सर्कलच्या शेतक-यांनी केली आहे .

________________________________________

लाखपुरी सर्कल मधील लाखपुरी,मंगरुळकांबे,जांभा,रसुलपुर,
खुदवंतपुर,रेपाटखेड,दातवी,लाईत, दुर्गवाडा,सांगवी,वाघझडी व इतर ठिकाणी दि.२७,२८,२९ रोजी अवकाळी पाऊसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. व शेतकरी संकटात सापडला आहे.तरी महसुल विभागाने व कृषी विभागाने तातडीने सर्वे करुन झालेल्या नुकसानाची भरपाई शेतक-यांना द्यावी.

मिनल नवघरे
(माजी पं.स.सदस्या लाखपुरी)
_______________________________________
तालुक्यातुन आलेल्या तक्रारी मंडळ अधिकारी यांना पाठविल्या आहे.सदर मंडळ अधिकारी त्या शेताची नुकसानी संबधी पाहणी करणार आहेत.

उमेश बनसोड
(नायब तहसिलदार मुर्तिजापुर)

_________________________________________

लाखपुरी व खुंदावतपुर ईतर परिसरात खुप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान खुप मोठ्या प्रमाणात झाले असुन शेतक-यांना मदत द्यावी.

गजानन गवई
(शेतकरी खुंदावतपुर)

_________________________________________
माझे शेत मंगरुळकांबे शिवारात असुन १५ एक्कर मध्ये मी कपासी पेरली असुन यामध्ये दि.२७,२८,२९ रोजी आलेल्या अवकाळी पाऊसामुळे १५ किंटल कापसाचे माझे नुकसान झाले.अक्षरशा कापुस गळुन खाली पडत आहे.शासनाने सर्वे करुन आम्हाला मदत करावी.
ऋषिकेश डिके
(शेतकरी मंगरुळकांबे)