Home Blog Page 161

sameer wankhede समीर वानखडे NCB जोनल डायरेक्टर यांचे शेगाव मध्ये मोठ्या जल्लोषात सपत्नीक स्वागत……..

0

 

समीर वानखडे हे एक भारतीय राज्यसेवा अधिकारी आयआरएस ऑफिसर आहेत त्यांना भारतामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जनरल डायरेक्टर च्या रूपात ओळखले जात आहेत शेगाव येथील दौऱ्यावर आज आले असता त्यांनी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेला हर अर्पण करून.

तसेच त्यांच्या पदस्पर्शाने सुरुवात केली तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे खूप मोठे जल्लोषात स पत्नीक क्रांति रेडेकर वानखडे स्वागत पियुष ओवे,प्रविण सर बोदडे, ऍड इशारे सर, अजय सुरवाडे ऍड प्रथमेश माने आनंद गुजर विकास पवार गजानन बांगर अजय सुरवाडे अलकाताई बांगर महेंद्र थेटे शिबू खान बंटी सुर्वे या गावातील लोकांनी खूप मोठ्या जल्लोषाने त्यांचे स्वागत केले.

https://www.suryamarathinews.com/mumbai/

 

समीर वानखडे यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांविषयी समाजाला प्रेरणा मिळावी त्यांच्या संविधानाविषयी संविधानातील कलम विषयी आणि मी आज जो काही आहे तो फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि आम्हाला समर्पित केलेल्या संविधानाच्या जोरावर आहे असे बोलताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी सांगितले  sameer wankhede

राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

शेगांव: राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे . येथील राष्टॣमाता ईंदीरा गांधी नगर पालीका विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु.प्राची अमोल टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत रजत पदक पटकावून यश संपादन केले.

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अभ्यासात अतीशय हुशार असलेल्या कु.प्राची टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. पुणे येथे 26 ते 29 नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी कु. प्राची अमोल टवरे हिची निवड झाली आहे.तीचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे

Mumbai /गायक राहुल देशपांडे यांच्यासोबत दादर बीचवर रंगली सुगी परिवाराची सुरमयी दिवाळी पहाट

0

 

मुंबई, 17 नोव्हेंबर, 2023: मुंबईतील प्रथितयश व आघाडीचे विकासक सुगी डेव्हलपर्स यांच्या सुगी परिवाराने दादर बीचवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक श्री राहुल देशपांडे यांच्या पहाट दादरकरांसह अनेक मुंबईकरांची दिवाळी पहाट संस्मरणीय केली. नरक चतुर्दशीला सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पार्क क्लब येथे दादरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने रंगलेल्या या मैफिलीत राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या सुरावटींनी रसिकांची दिवाळी पहाट सुरमयी झाली.

श्री राहुल देशपांडे यांनी पहाटेच्या वेळी गायल्या जाणाऱ्या रागाने सुरूवात करीत सुर छेडले व त्यावर कडी करीत अहिर भैरव रागातील ‘अलबेला सजन आयो रे’ तसेच ‘तुज मागतो मी आता’, ‘देव देव्हाऱ्यात नाही’ इत्यादी भक्तीगीते, नाट्यगीते व भावगीते यांची पेशकश करीत ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तीगीताने वातावरण विठ्ठलमय केले.

गायिका आर्या आंबेकर हिनेही आपल्या सुमधुर स्वरांनी राहुल देशपांडे यांना उत्तम साथ देत काही गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी रंगभूमीवरील अभिनेते आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कविता कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले कवी संकर्षण कर्‍हाडे यांनी केले.

प्रेक्षकांना दिवाळी पहाटच्या शुभेच्छा देताना, सुगी ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार श्री निशांत देशमुख म्हणाले, “सुगी परिवाराच्या या मैफिलीने मुंबईकरांना दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सर्वोत्तम सांस्कृतिक मेजवानी दिली.

आपली संस्कृती, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी सुगी परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो; जेणेकरून सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध समाज निर्माण होईल. आम्ही मुंबईतील आणि विशेषतः दादरमधील सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये आमच्या सुगी परिवाराचे एक विस्तारित कुटुंब म्हणून या मैफिलीच्या निमित्ताने आनंद वाटण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात लहान मुलेही आपल्या पालकांसोबत तितक्याच उत्साहाने सहभागी झाल्याने आपल्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांचा पुढच्या पिढीवर संस्कार करण्याकामी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल.”mumbai

Deepika parkar

Reserve Bank / रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या फिंटेक विभाग तसेच SEBI(सेबी) मध्ये निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्र कडुबा पवार यांचा किंनगाव राजा येथे सत्कार!

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जि. प्र

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगांव राऊत या छोट्याशा गावातील जिजाऊच्या लेकाने पहिल्याच प्रयत्नात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या महत्वाच्या अशा फिंटेक विभाग तसेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) येथे निवड झाली आहे.

तालुक्यातील शेलगाव राऊत या छोट्याशा गांवातील श्री राजेंद्र कडूबा पवार यांनी वयाच्या २८ व्या वर्षी अवघड अश्या परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन अथक प्रयत्नातून सर्व काही शक्य आहे हे राजेंद्र यांनी सिद्ध केले आहे,

राजेंद्र पवार यांची संपूर्ण भारतातून होत असलेल्या खुल्या प्रवर्गातून निवड झाली आहे. राजेंद्र यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, चिकाटीने राजेंद्र यांनी हे यश संपादन केले आहे.Reserve Bank

त्यानिमित्त आज श्री राजेंद्र पवार व त्यांच्या यशात अप्रत्यक्ष मोलाचे योगदान देणारे त्यांचे वडील श्री कडुबा पवार यांचा छोटेखानी सत्कार समारंभ आज किनगांव येथे डॉ.ज्ञानेश्वर पातुरकर यांचे निवासस्थानी पार पडला. या प्रसंगी पवार कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध असणारे त्यांचे मित्रमंडळ सर्वश्री खुशालराव नागरे, गजानन हरकळ, ज्ञानेश्वर कुटे,राहुल शिर्के,राजेंद्र राऊत,संदीप घिके,श्रीमंत राऊत,डॉ दीपक पवार,डॉ ज्ञानेश्वर पातुरकर योगेश राऊत आदी उपस्थित होते…Reserve Bank

धक्कादायक! Doctor rape या महिला डॉक्टरवर बलात्कार; ३८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी केले अटक /

0

 

Doctor rape  : मुंबईत या महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी केले अटक . या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केले आहे.

तरी या माहितीनुसार, एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना आरोपी आणि पीडित महिलेची ओळख झाल्याचे पोलिसांचे सांगितले आहे. व या घरगुती कारणांमुळे महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या दरम्यान, मध्ये पीडित महिला आणि तिचा पती यांच्यामधील काय दिवसापासून तुमचे वाद मिटवून देतो, असे सांगून आरोपीने पीडितेला आपल्या विश्वासात घेतले. व यानंतर २० ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले. त्यानंतर आरोपी आणि पिढीचा सोबत जबरजस्तीने बलात्कार.

इथे क्लिक करावे

https://www.suryamarathinews.com/nana-patekar-viralvideo/

त्यानंतर या क्लब मध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. तसेच, आरोपीने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसेच, या व्हिडीओचा आधार घेऊन आरोपीने महिलेकडून पैसे सुद्धा उकळले आहे अशी माहिती मिळाली.Doctor rape

या दरम्यान, दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडित महिलेने अखेर गावदेवी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सर्व माहिती पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास करीत आहे.Doctor rape

Nana Patekar नाना पाटेकर यांचा तो ” व्हायरल व्हिडिओतील घटनेवर अखेर स्पष्टीकरण म्हणाले

0

 

Nana Patekar नाना पाटेकर यांचा तो ” व्हायरल व्हिडिओतील घटनेवर अखेर स्पष्टीकरण म्हणाले

 

Nana patekar अखेर अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठं प्रमाणात व्हायरल होतो आहे. अखेर नाना पाटेकर बनारसमध्ये शूटिंग करत आहेत. तेव्हाचा तो एक व्हिडिओ समोर येत आहे.

या व्हिडिओत एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे पुढे करत होता.nanapatekar

नाना यांचे शूटिंग चालू असताना हा चाहता मध्येच आला आणि अचानक त्यांच्यासोबत फोटो काढू लागला. त्यावेळीच नाना पाटेकर ने जोरदार टपली मारली आहे. व या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Viralvideo

यावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या.पण याच पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर म्हणाले की, तो सीन आमच्या सरावाचा भाग होता.

तो सीन परत शूट करायचा होता. तितक्यात एक मुलगा तिथे आला आणि मी त्याला टपली मारली. पण मला नंतर समजल की तो मुलगा सीनमधला नव्हता. त्यानंतर त्याला बोलवायला जाईपर्यंत तो तिथून निघून गेला. फोटो काढण्याला मी आता प्रयत कोणालाही कधी नाही म्हणत नाही.NanaPatekar

इथे क्लिक करावे

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/sanjaygaikwad/

 

हे सगळ चुकून घडले. मला काहीच माहिती नाही तो कुठून आला. माझी चूक झाली असेल तर माफ करा. सिनेमा शुटींग दरम्यान घडलेल्या घटनेवर नाना पाटेकरांची जाहीर दीलगिरी व्यक्त केली आहे. Nanapatekar

accident news :- भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक तिघांना चिरडले

0

 

accident news :-

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पंधरा दिवसांची दिवाळीची सुटी असल्याने ते शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला असून. Crimenews

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ एआर ०१ ज ७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एम एच ०५ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. मात्र या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे), जळगाव शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनास`थळावर मृत्यू झाला. मात्र यामध्ये कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला. Crimenews

दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे आणले. सदर घटनास्थळी ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे, नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय निबोळकर, विक्रम राजपूत, अनिल खंडारे, गोरानी वेरुळकार यांनी फार मदत व सहकार्य केली.accident news

स्वप्नीलचे दीड वर्षांपूर्वीच झाले लग्न मात्र

स्वप्नील करणकार याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला एक सहा महिन्याची मुलगी आहे. तिघेही एकाच कंपनीत कामाला होते. पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशन करत आहे accident news

साहेब आम्हाला नियमित सेवेत घ्या हो! एनएचएम कर्मचारी भगिनींचे आ.कुटेना भाऊबीजेच्या दिवशी साकडे / SanjayKute 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र

शेगाव : दि.15गेल्या 26 ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलना निमित्य भाऊबीजेच्या दिवशी जळगाव जा. मतदार संघांचे आ.डॉ.संजय कुटे ह्यांना ओवाळून आगळे-वेगळे आंदोलन करीत साहेब आम्हाला नियमित सेवेत सामावून घ्या हो! असे म्हणत साकडे घातले.
15 ते 18 वर्षे कंत्राटी स्वरूपाने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरु असून आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवाळीत येणाऱ्या भाऊबीजेच्या राज्यातील सर्व आमदार खासदारांना ओवाळण्याचे ठरविले होते.

तर ओवाळणी नंतर ताटात टाकलेल्या भेटीच्या स्वरूपात आम्हाला नियमित सेवेत सामावून घेत असल्याचे आश्वासन देण्याची ह्या कर्मचारी यांनी मागणी केली आहे

. ह्यावेळी तशा स्वरूपाचे निवेदन सुद्धा आ. कुटे यांना देण्यात आले. आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्व राज्यातील नियमित केल्याचे जीआर मला द्या मी आयुक्ता सोबत मिटिंग लावून तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन यावेळी दिले. आमदार संजय गायकवाड, यांच्यासह जिल्ह्यातील विविध मतदार संघातील आमदारांना आजच्या दिवशी ओवाळण्यात आले आहे.

या बाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत आझाद मैदानावर 30% कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने समायोजन करणार असल्याचे आश्वासन दिले असून लेखी स्वरूपात काहीही दिले नसल्यामुळे सदरचे आंदोलन 22 दिवशी आंदोलन सुरूच होते. आ.कुटे यांच्या भेटी दरम्यान परिसरातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. Sanjaykute

गावगुंडाने गोंधळ घालणाऱ्यांना शपथ घेऊन सांगतो की मी सोडणार नाही, माझं हिशेब अजून बाकी आहे – आ. संजय गायकवाड/ sanjay gaikwad 

0

 

sanjay gaikwad

गावगुंडाने गोंधळ घालणाऱ्यांना शपथ घेऊन सांगतो की मी सोडणार नाही, माझं हिशेब अजून बाकी आहे – आ. संजय गायकवाड/ sanjay gaikwad

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात दिवाळीच्या दिवशी एका गटाने गावात गोंधळ घातला. परंतु मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाके फोडून तिची छेड काढण्यात आली. एवढेच नाही तर मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या लोकांनी लाठ्या-काठ्या आणि दगडांनी पण मारहाण केली.

यासह घरात घुसून सामानाची मोडतोड केली.या दरम्यान, याची माहिती मिळताच शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड 40-50 वाहने व शेकडो कार्यकर्त्यांसह घटनास्थळी त्या गावात पोहोचले आणि घराचा आढावा घेतला.

25 ते 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जामिनावर बाहेर आल्यास आरोपीला पकडून जीवे मारण्याची धमकी आमदार संजय गायकवाड यांनी दिली. परंतु पीडितेचे कुटुंबीय आमदार संजय गायकवाड यांचे नातेवाईक आहेत. व या संपूर्ण प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात २५ ते ३० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. संजय गायकवाड म्हणाले की, रविवारी संपूर्ण राज्यात आणि देशात दिवाळी साजरी होत होती म्हणुन मी काही नाही करता मेहकरमध्ये काही मुस्लिम गटाने माझ्या भाचीवर जो हल्ला केला. त्यांचा द्वेष फक्त धर्माचा आहे की आपण देवीचा स्टेटस का ठेवतो, देवळात देवीची गाणी का वाजवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस का ठेवतो.

घरावरही मोठे दगडफेक करण्यात आली मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

संजय गायकवाड म्हणाले, “ज्यांच्यावर हल्ला झाला ते पूर्णपणे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरावरही मोठे दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली. मला एवढेच सांगायचे आहे की पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जर दिवाळी झाली नसती तर मी या लोकांना तोडून फोडून ठेवले असते. शेवटी आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत, पण मला पोलिसांची आणि जिल्ह्याची दिवाळी खराब करायची नव्हती म्हणून मीही सगळे टाळले. या लोकांना जामीन मिळाल्यावर मी कुणालाही तोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझा जात आणि धर्माला विरोध नाही, पण मी अशा प्रवृत्ती सोडणार नाही. सूर्या मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा Sanjay gaikwad

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती महाकाल चौक खामगांव येथे साजरी

0

 

इस्माईल शेख.बुलढाणा.जि.प्र

खामगाव.कार्यक्रमाचे उद्घाटक विदर्भ प्रांत संयोजक एडवोकेट अमोल भाऊ अंधारे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस गौतम भाऊ गवई तसेच प्राध्यापक विजय देशमुख,पवन भाऊ गरड,पवन भाऊ माळवंदे,शिवाजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब,थोरात साहेब,देशमुख साहेब,शेळके साहेब,राजपूत

साहेब,निलेश बरडिया,बापू करंदीकर, लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष अनंता सकळकळे यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. मान्यवरांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवन चरित्र रेखाटले.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे ज्येष्ठ नेते महादेवराव आढागळे अशोकराव सावळे लहुजी शक्ती सेनेचे युवा तालुका अध्यक्ष संजय पाटोळे सर, उप तालुका अध्यक्ष गोपाल भालेराव,नितीन सोनवणे शहराध्यक्ष,राम नाटेकर युवा शहराध्यक्ष,आशु खंडारे कोर कमिटी

अध्यक्ष, अंबादास सोनावणे,लखन सोनवणे,देवा वाकोडे,गजानन सोनवणे,संजय सोनवणे,सागर पाटोळे,संजय चांदुरकर,विशाल खंडारे,युवराज अंभोरे,राहुल अंभोरे,समाधान साठे व बहुसंख्येने मातंग उपस्थित होते.