Home Blog Page 160

कृषी सहायक खंडणीखोर महिलेच्या घरात सापडले तब्बल,१९ लाखांचे घबाड; ‘तो’ अश्लील व्हिडिओ ‘फॉरेन्सिक’ लॅब कडे crimenews

0

 

 

नाशिक :- निफाड येथील बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून नोकरीला असलेली महिला व तिच्या मुलाने वीस कोटींची खंडणीची मागणी करत १कोटी रूपयांची खंडणी स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळाच्या एका कार्यकारी सदस्याकडून उकळल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

पण याप्रकरणी पोलिसांनी तपासाला जास्त गती दिली असून संशयित महिला सारिका सोनवणे हिच्या घराचे झडतीत पोलिसांना सोमवारी (दि.२०) आणखी १९ लाख रूपयांची रोकड हाती लागल्याचे विश्वासनीय सुत्रांनी सांगितले. आहे या दरम्यान, तिचा मोबाइल डेटाचेही तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पण या आक्षेपार्ह तो व्हिडिओ फॉरेन्सिक’च्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांन कडून सांगितले आहे.crimenews

या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची ती धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याचे वारंवार सांगून ‘ब्लॅकमेल’ करून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणीची मागणी परंतु संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे.

तर याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित महिला कृषी सहायक सारिका बापूराव सोनवणे (४२), मोहित बापूराव सोनवणे (२५) या दोघांना अटक केली आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायालयाने या मायलेकाला पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

तर या गुन्ह्याचा प्रकार व गांभीर्य लक्षात घेत पुरावे शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याकडून मिळणारी माहितीच्याअधारे पोलिस तपासाला या प्रकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दोघांच्या आर्थिक व्यवहारांची छाननीही पोलिसांकडून सुरू करण्यात येत आहे. ज्या आक्षेपार्ह अश्लील

https://www.suryamarathinews.com/buldhana-खामगांव-एम-आय-एम/
व्हिडिओचा आधारघेत संशयित महिला व तिच्या मुलाने धमकावून सुमारे १ कोटी ५ लाखांची खंडणी वसूली केली, तो व्हिडिओ फॉरेन्सिक लॅब कडे सखोल तपासाकरिता पोलिसांनी सोपविला आहे. सर या संशयित महिलेच्या मोबाइलचा डेटाची पडताळणी पोलिस करत आहेत. लवकर पुढील तपास पुलिस करत आहेत तर या प्रकरणाला कसा प्रकारे वळण येणार हे पहाणे गरजेचे आहे. असेच नवीन बातमी पाहण्यासाठी सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक फॉलो करायला विसरू नका.crimenews

Buldhana खामगांव एम.आय.एम.च्यावतीने शहिद-ए-वतन टिपु सुलतान जयंती निमित्त गरजुंना ब्लॅकेट वाटप

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र.

एम.आय.एम.च्यावतीने सतत १० वर्षापासून करण्यात येते ब्लॅकेट वाटप
खामगांव : संपुर्ण खामगांव शहरात व मस्तान चौक भागात खामगांव एम आय एम च्यावतीने शहर अध्यक्ष आरीफ पहेलवान तथा
माजी नगर परिषद सदस्य तथा एम.आय.एम चे शहराध्यक्ष यांच्याहस्ते परिसरातील गोरगरीब लोकांना सतत १० वर्षापासून ब्लॅकेट वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

त्यानुसार यावर्षी सुध्दा दि.२०/११/२०२३ रोजी शहिद-ए-वतन टिपु सुलतान यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून १०० चे वर ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. सदर ब्लॅफेट हे परिसरातील गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले असून आजरोजी थडीचे दिवस असल्यामुळे सदर ब्लॅकेटमुळे गरीब लोकांना आवश्यकता असल्याचे पाहून एम.आय.एम. चेवतीने वाटप करण्यात आले आहे.

तसेच गोरगरीब व गरजू लोकांना तसेच परिसरात फिरणान्या अनाथ मनोरुग्ण लोकांचा शोध घेवून त्यांना सुध्दा ब्लॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात आरीफ पहेलवान यांनी शहिद-ए- वतन टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन शहिद-ए-वतन टिपु सुलतान यांनी केलेला पराक्रमाला कधीही न विसरता त्यांचे शौर्य आठवत राहण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाकरीता सईद मिर्झा साहब, रज्जाक कुरेशी, राजीक कुरेशी, तसेच एम.आय.एम. चे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि मस्तान चौक येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Buldhana

“मनोज पाटील  व छगन भुजबळांनी आप आपले शब्‍दांना आवर घालावा”, कडूंचा सल्‍ला, Bachhu kadu

0

 

अमरावती : जालन्यातील अंबड येथे ‘OBC आरक्षण एल्गार सभा’ पार पडली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले त्‍याचे पडसाद राज्यभरात उमटत असून मनोज जरांगे यांनीही छगन भुजबळांवर सुरु टीका केली आहे.

आमदार बच्‍चू कडू यांनी या दोन्‍ही नेत्‍यांना सबुरीचा सल्‍ला दिला आहे.

तर या प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना बच्‍चू कडू म्‍हणाले, ‘जे काही होईल, ते कायद्यानेच होणार आहे. तर कायद्याच्‍या बाहेर काही होणार नाही. त्‍यामुळे मराठ्यांच्‍या विरोधात जो काही आव आणला जात आहे, तो चुकीचा आहे, तर मला असे वाटते.

 

https://www.suryamarathinews.com/lonar-lake/

मनोज जरांगे पाटील यांनीही एकेरी भाषेत बोलू नये. छगन भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्‍या सासऱ्यापासून ते खालच्‍या पातळीपर्यंत जाऊ नये. असं माझं दोन्‍ही नेत्‍यांनी शब्‍दांवर संयम ठेवायला हवा’. कारण कि त्यांचं परिणाम चुकीचा झालं नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे बच्चू कडू,, bachhukadu

टिपु सुलतान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद Tipu Sultan

0

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी आठवडी बाजारातील डॉ.असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11वा.या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी यांनी शंभर च्या वर नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली.यावेळी डॉ.असलम खान हे ऊपस्थीत होते,नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर असलम शेख,शिफा क्लिनिक,रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव यांचे सहकार्य लाभले tipusultan

Lonar Lake लोणार येथे आलेल्या पर्यटकाची कार पलटली; त्यात एक ठार, तर तीन गंभीर जखमी.

0

 

Buldhana लोणार सराेवर पाहून आपल्या गावाकडे जात असलेल्या पर्यटकांची अचानक कार उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाेणार सराेवराजवळ किन्ही रस्त्यावर १८ नाेव्हेंबर राेजी घडली. आहे.

या अपघातानंतर कार तीन ते चार वेळा उलटली. सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) असे मृतकाचे नाव आहे.

मुंबई व ठाणे येथील पर्यटक इनाेव्हा कार (एमएच ०१ एएक्स ९८९८)ने सकाळी शेगाव येथे दर्शन घेऊन लाेणार सराेवर पाहण्यासाठी आले हाेते. अचानक सराेवर पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परत जात हाेते. या दरम्यान, मध्ये लाेणारवरून समृद्धी महामार्गाकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरली आणि ती कार दाेन ते तीन वेळा पलटी झाली .Lonar Lake

या अपघातामध्ये सूरज शिवाजी गुडवे यांचा जागीच मृत्यू झाला तर सूर्यकांत शिवाजी गुडवे (२७), निहाल संदीप सुर्वे (१ वर्ष), साहिल संजय गुडवे (२०), नीता संदीप सुर्वे (३३) हे गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

https://www.suryamarathinews.com/बाईक-वर-जात-असताना-अचानक-म/

या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनास्थळावर पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, संतोष प. चव्हाण, पाठवण्यात आले आहे राजेश घोगरे आदींनी भेट देऊन जखमींना तातडीने जालना येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे
Lonar Lake

टिपु सुलतान जयंती निमित्त 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव: शहिदे वतन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रविवार 19 नोव्हेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.स्थानिक आठवडी बाजार परिसरातील शहिद अ.हमीद चौक येथील डॉ. असलम खान यांच्या शिफा क्लिनिक येथे रविवारी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.दाऊद देवाणी हे केवळ 50 नेत्र रुग्णांचीच मोफत नेत्र तपासणी करणार आहेत.

त्यामुळे गरजू रुग्णांनी त्वरीत रिलीफ मेडीकल अ.हमीद चौक आठवडी बाजार मो.क्र.9420834600, व देवाणी चष्मा घर ,सहारा आय क्लिनीक मेन रोड शेगांव 9604243414 येथे नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

श्री जलाराम बाप्पा जयंती प्रित्यर्थ १९ नोव्हेंबरला ”स्वर्णीम महोत्सव

0

 

प्रमोद जुमडे/वर्धा

“हिंगणघाट येथील शीतला माता मंदिराजवळ दानी महाराजाच्या मंदिरातील जलाराम बापाच्या मूर्तीची स्थापनेला 51वर्ष पूर्ण होत आहे. जयंतीनिमित्त प्रसादाचा कार्यक्रम व भजन पूजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या मंदिरात 1973 साली बाप्पाच्या मूर्तीची स्थापना नरली बाई माधव जी चंदाराणा यांच्या हस्ते करण्यात आली होती.

त्या वर्षापासून प्रसादाचा कार्यक्रम हरीभाई, अरुण भाई व डाह्या भाई हे सुरत वरून हिंगणघाट ला येऊन त्यांचे सुपुत्र मनोज, जयेश, राकेश, नितीन व संजय चंदाराणा कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करतात.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 नोव्हेंबरला दुपारी बारा ते संध्या आठ पर्यंत प्रसादाचा सर्वांनी लाभ घेण्याचा आग्रह चंदाराना परिवाराणी केला आहे.

बाईक वर जात असताना अचानक मधमासाच्या  हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

0

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथील शेतकरी सुरेश शिवराम कळमकर वय (४०) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. असून  शेतकरी दुचाकीवर शेतात जात असतांना अचानक  नाल्याच्या काठीही घटना घडली.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ते शेतकरी आपल्या   शेतात जात होते. रिशोदार शिवारातच त्यांच्यावर मधमाश्यांनी अचानक हा हल्ला केला. या मधमाशांचा हल्ला होत असतांनाही त्यांनी त्यांच्याबाबत घडत असलेल्या या प्रकाराची माहिती गावातील मित्राला फोन लावून दिली. परंतु त्यानंतर गावातून काही लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले .

तेव्हा घटनास्थळी सुरेश कळमकर हे ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ताबडतोब  त्यांना त्यानंतर  तातडीने धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतुl बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

असून मृतक सुरेश कळमकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील व भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.

रुग्णवाहिका असूनही खासगी वाहनाचा आधार  घ्यावा लागते धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. मृकाच्या नातेवाईकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जखमी अवस्थेत सुरेश कळमकर यांना धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानामधून बोलावून आणावे लागले. तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्यावरील चालक जागेवर  नव्हता. याच परिणामी खासगी वाहनाचा शोध घेऊन त्या वाहनाद्वारे सुरेश कळमकर यांना बुलडाणा येथे हलवावे लागले.

या प्रकाराबाबात तीव्र नाराजी व्यक्त केलेले आहे या सर्व प्रकाराला जबाबदार कोण आहे.

Maratha Reservation: आता तोडगा निघाला आहे ? OBC कोट्याला  धक्का न लावता मिळणार लवकर मराठ्यांना आरक्षण!

0

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन  आता राज्यातील वातावरण  खूप  तापलं आहे.  तरी लवकर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.  तरी त्या आधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. या साठी  शिंदे सरकार लवकर निर्णय घेणार..

तरी यापार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर येत आहे. कि मराठा समाजाला  लवकर आरक्षण देण्यासाठी  शिंदे  सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तरी या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समूदायामध्ये खूप  तेढ निर्माण झाले आहे.  या शिंदे सरकार  लवकर तोडगा निघाला? OBC कोट्याला धक्का न लावता सरसकट मराठ्यांना मिळणार आता  आरक्षण!Maratha Reservation

या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. तरी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्याआधीच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

यापार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.

या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समूदायामध्ये तेढ निर्माण झाले आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेत्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता EBC च्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा नवा कायदा आणण्याची शिंदे  सरकारने पूर्ण तयारी सुरु केली आहे.

येणारे  नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी कायदा आणला जाण्याची दाट शक्यता  नाकारता येत  आहे. तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या मराठा-कुणबी नोंदी राज्यभरात आढळून येत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.Maratha Reservation

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार आता कायदा करुन स्वतंत्रपणे मराठा समाजारा आरक्षण देण्यासाठी सरकारने कंबर कसल्याचे समजते.

मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेत्यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता EBC च्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा नवा कायदा आणण्याची सरकारने तयारी सुरु केली आहे.Maratha Reservation

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधी कायदा आणला जाण्याची दाट शक्यता आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मराठा-कुणबी नोंदी राज्यभरात आढळून येत आहेत.

त्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.suryamarathinews.com/mahamarg-bus-accident/

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण लवकर  देण्यात येईल. ओबीसी समाजाने मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार आता कायदा करुन स्वतंत्रपणे मराठा समाजा आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने कंबर कसल्याचे आता समजते आहे. तरी लवकर गोड बातमी मिळणार..Maratha Reservation

Mahamarg Bus Accident/ खाजगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले होते.तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अटक

0

 

Mahamarg Bus Accident

बुलढाणा : खाजगी बसणे राष्ट्रीय महामार्गावर तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी तीन दिवसाच्या आत अटक केली. असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. व संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता.पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर (भोलजी) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नायक विक्रमसिंह राजपूत यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

राष्ट्रीय महामार्गावरून आरोपीने १४ नोव्हेंबरला आपल्या ताब्यातील खासगी बस भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगा जवळ ही दुर्घटना घडली होती.

पण या अपघातात गोपाल शालीक राणे, स्वप्नील करणकार (जळगाव खान्देश), आकाश राजु आखाडे ( कल्याण) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी चालक संदीप पवार याला नांदुरा पोलीसांनी ताब्यात घेतले.

https://www.suryamarathinews.com/sameer-wankhede-समीर-वानखडे-ncb/

व त्याच्याविरुद्ध भादंवीच्या कलम २७९, ३०४ (अ), मोटर वाहन कायद्याच्या कलम११९/१७७, १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले व हवालदार उमेश भारसाकळे करीत आहेत.

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक करा फॉलो करा crime news /Mahamarg Bus Accident