Home Blog Page 170

चांगेफळ ते भेडवळ रस्त्याचे काम त्वरीत करा किसान सेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

0

संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम गत चार ते पाच वर्षापासून सुरू आहे मात्र हे काम संथ गतीने व कासव गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावर अपघात सुरूच आहेत त्यामुळे चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांच्या वतीने संग्रामपूर तहसीलदारा मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला २० ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे
चांगेफळ ते भेंडवळ रस्त्याचे काम आपल्या विभागामार्फत मागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. संथ गतीने व कासवगतीने सुरु असलेल्या या रस्त्याचे काम कित्येक वेळा या दोन वर्षात बंद पडलेले आहे व रखडलेले आहे .ह्या रखडलेल्या कामामुळे व रस्त्यावर खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात होऊन.

अनेकांचे बळी या रस्त्यावर गेलेले आहेत .आपण खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर धूळच धूळ आहे त्यामुळे वाहन चालक या रस्त्यावरून दररोज ये जा करतात त्या नागरिकांना या रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे

तसेच रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर गड्डे असल्यामुळे अनेकांना कंबर दुखी चे त्रास वाहन चालकांना सुरू झालेले आहेत तसेच याच खोदून ठेवलेल्या रस्त्यावरची धूळ शेतकऱ्यांच्या पिकावर पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके गत दोन वर्षापासून खराब होत आहेत. त्यामुळे आपण या रस्त्याचे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले काम त्वरित पूर्ण करावे.

अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने मा. नरेंद्रजी खेडेकर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मा दत्ता पाटील मा वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे

या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप ता प्रमुख , राहुल मेटांगे , शेख अब्दुल, धनंजय अवचार ,नेमीवंत तेल्हारकर, सुनील मुकुंद, वैभव मानकर, गजानन वानखडे उपशहर प्रमुख ,सुमित डोसे ,गणेश डाखोडे, रीलेश ठाकरे, गौरव ठाकरे ,नितीन सुलताने, पिंटू दाभाडे ,काशिनाथ हावरे, विलास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत

Shivsena News : शिंदेंचे जिल्हाप्रमुख ठाकरेंच्या नेत्यांसोबत पार्टी करतात ? हे खरं आहे #shivsena

0

 

Buldhana Political News : बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील गटबाजी समोर आली आहे. आमचे जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसोबत बसून ओल्या पार्ट्या करत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.#Buldhana

याबाबत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांच्या विरोधात मुंबईत जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.#nivedan

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यभरातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र, शिवसेना शिंदे गटातही गटबाजी वाढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या शिंदे गटात सर्वकाही ‘आलबेल’ नसल्याचं समोर आलं आहे.#shantaramdane

थेट जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांना बडतर्फ करण्याची मागणीच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह सहा तालुक्यांतील तालुकाप्रमुख यांनी केली आहे. या सर्वांनी मुंबईत जाऊन मंत्री उदय सामंत यांची भेट घेत ही मागणी केली आहे. या वेळी सामंत यांना देण्यात आलेल्या निवेदनात जिल्हाप्रमुख दाणे पाटील यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.#bjp

जिल्हाप्रमुख हे गटबाजीचे राजकारण करीत असून, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख यांच्यासोबत जवळीक साधून त्यांच्यासोबत ओल्या पार्ट्याही करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शांताराम दाणे यांना तत्काळ बडतर्फ करावं, अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचे काम बंद करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

काय म्हटलं नेमकं निवेदनात

सर्व सहा तालुक्यांतील तालुका प्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात सध्या जिल्हाप्रमुख यांचा बदल करणे गरजेचे आहे. जिल्हाप्रमुख शांताराम दाणे हे सर्वच तालुक्यामध्ये पक्षबांधणी न करता गटबाजीचे राजकारण करतात.#rajkaran #cmomaharashtra #devendrafadnvis

संघटना बांधणीसाठी विविध प्रकारे अडचणी निर्माण करतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले वसंत भोजने व त्यांच्या सहकाऱ्यांची जवळीक ठेवतात व दिवसासुद्धा त्यांच्यासोबत बसन पार्ट्या करतात. त्यामुळे आपले पक्षातील सर्वसामान्य शाखाप्रमुख ते सर्व पदाधिकारी त्यांच्या या वागणुकीला कंटाळले आहेत.

ते पक्ष संघटनेकडे लक्ष न देता आपल्या पक्षाकडून व प्रत्येक तालुक्यात गटबाजी करतात, दारू पिऊन उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखसारख्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत वाईट भाषेत शिवीगाळ करतात, मारण्याच्या धमक्या देतात.#shindegat

त्यांच्या स्वतःच्या तालुक्यात पक्ष संघटन नसून त्यांच्या त्रासामुळे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख यांना काम करताना अडचणी निर्माण होतात, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

त्यामुळे त्यांना तत्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे, नाहीतर आम्ही सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख ते सर्व माजी पदाधिकारी दाणे पदावर कायम असेपर्यंत पक्षाचे काम बंद करणार आहोत.#shivsena #suryamarathinews #brekingnews

lराजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चे जन्मस्थळ अंधारात

0

 

राजवाड्यातील लाईट 20 दिवसापासून तर सीसीटीव्ही कॅमेरे 1 महिन्यापासून बंद#sindkhedraja #rajmata

*सिंदखेड राजा सुरेश हुसे*

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ युगपुरुष राजे लखुजीराव जाधव यांची कर्मभूमी व राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या महाराष्ट्राचे अस्मिता असणाऱ्या सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ गेल्या 20 दिवसापासून अंधारात आहे तर सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल 1 महिन्यापासून बंद आहे देशाला व राज्याला दिशा देण्याचे काम करणाऱ्या स्वराज्यास संकल्पिका राजमाता जिजाऊ यांनी केले त्यांचे जन्मस्थळ आहे ही वास्तु राज्य पुरवतात खात्याच्या ताब्यात असून जन माणसातून लाईट बंद असल्यामुळे रोष व्यक्त होत आहे

 

. राजमाता जिजाऊ चे जन्मस्थळ असलेला ऐतिहासिक राजवाडा राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे राजवाड्यातील स्वच्छता दिवाबत्ती यासह अन्य सुविधा देण्याची जबाबदारी राज्य पुरातत्त्व खात्याची आहे कारण या कामाचे पैसे बिल सुद्धा त्यांना भेटत असते असे असताना सुद्धा राजवाड्यातील कर्मचारी या विषयाकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाआहे

राजवाड्यातील लाईट बंद का पडली ती तात्काळ का सुरू करण्यात आली नाही कशामुळे बंद पडली लाईनचे बिल थकले का यासह विविध प्रश्न निर्माण झाले आहे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवाड्याच्या बाहेरील स्थानिक शहरातील रहिवाशांच्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली नागरिकांना वाटली लाईट बंद पडली असेल काही दिवस नंतर सुरू होईल.

परंतु आज उद्या परवा असे अनेक दिवस गेल्यानंतर तब्बल वीस दिवस नंतर सुद्धा लाईट बंद पडली आहे रात्रीचा अंधार पाहून याकडे लक्ष वेधले गेले राज्यपुरातत्व खात्याची उदासीनता पाहून जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून राजवाडीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत दिवसभर पर्यटक शिवभक्त राजवाड्यात येत असतात या पवित्र जिजाऊ जन्मस्थळ परिसरात दिवसभरात काय काय घडामोडी घडते.

हे टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे गरजेचे आहे मात्र हे कॅमेरे बंद का पडले ते समजू शकले नाही राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यात काही भुयारी मार्ग आहेत धान्य ठेवण्याचे कोठार जागा आहे तिथे दिवसा सुद्धा अंधार असतो तेथील घडामोडी टिपण्यासाठी मुद्दाम त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत मात्र हे कॅमेरे बंद आहेत ही सर्व जबाबदारी राज्य पुरातत्व खात्याची आहे मात्र त्यांनी स्पेशल याकडे दुर्लक्ष केलेले आहे

शेतकऱ्यांना लावला लाखोचा चुना;फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

 

प्रतिनिधी शाम वाळस्कर
सूर्या न्यूज मराठी
मुर्तीजापुर

Anchor – मुर्तीजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील खापरवाडा येथील आठ शेतकऱ्यांना तेथीलच एका महाठकाने शेतकऱ्यांचे धान्य घेऊन पैसे न दिल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार खापरवाडा येथील आठ शेतकऱ्यांनी माना पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vo – हकीकत अशी की माना येथून जवळच असलेल्या खापरवाडा येथील पंडित गोविंद गवई, अमोल रामदास गवई, गौतम वकील गवई, चंद्रकला साहेबराव गवई, बेबीबाई प्रल्हाद वानखडे, आणि बाळकृष्ण वासुदेव कुकडे या शेतकऱ्यांनी येथीलच राहणारा महाठक अण्णा सागर सुधाकर कीर्दक याने शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन तूर आणि हरभरा खरेदी करून त्यांना पैसे न देता चेक दिला असता, तो चेक त्यांच्या बॅक खात्यात पैसे नसल्याने परत आल्याने या महाठगावर 138, आणि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.

अशी मागणी खापरवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.या तक्रारीची चौकशी पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सदर तक्रार ही जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे पाठवणार असल्याचे सूत्रांनी संगीतले.#former #shetkri

 

Maratha News :’..तर दोन पाऊलं मागे येण्यास तयार’; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य ManojJarangePatil

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो

मुबई- मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार असल्याचा आरोप काही विरोधक करत आहेत. यावर जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.#jarange patil #sharadpawar

माझ्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास दोन पाऊलं मागे जाण्यास तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.#andolan

सत्ताधाऱ्यांनीच हे आंदोलन बसवलं आहे असा आरोप होतोय. पण, सत्ताधारी कधी विरोधात आंदोलन उभं करु शकतात का? सर्वसामान्य मराठ्यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे. स्वत:ची भाकर खाऊन, दोन रुपये घेऊन ते आंदोलनाला येत असतात. स्व:ताच्या कुटुंबाला सोबत घेऊन मोठी ताकद उभी केली जात आहे. कोणाचा हात असेल तर सिद्ध करावा, मी दोन पाऊलं मागे जाईन, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.#maratha arkshan

आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाचं आंदोलन सरकारला झेपणार नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून शेवटपर्यंत हटणार नाही. माझी अंत्ययांत्रा निघेल किंवा मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल. त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील सर्वात मोठा आमचा समाज आहे. त्यापाठोपाठ धनगर समाज आहे. हे दोन समाज एकत्र आले तर सरकारला अवघड होईल, असंही जरांगे पाटील म्हणाले.#manojjarangepatil

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्याला आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. (SURYA Marathi News

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

0

 

मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी

पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १८: परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.#meeknathshinde

दरम्यान, आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरिक्षकांपैकी ९१ टक्के जणांना तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.#bjp

परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसीत केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाईन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.

१६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी १०० जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, ३५ जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, १५ जणांना तृतीय पसंती क्रमानुसार तर १६ जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.#rtooffice

या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक तीव्र उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.#cmomaharashtra
००००

समाजवादी पार्टीकडून शहर अध्यक्ष आमीन भाई यांची नियुक्ती जाहीर…

0

 

 

समाजवादी पार्टीचे युवा जन जिल्हाध्यक्ष यांच्याकडून ऑनलाइन द्वारे नियुक्ती केली…

समाजवादी पक्ष किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता.[ संदर्भ हवा ] (बाकीचे पक्ष – काँग्रेस , हिंदू महासभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला.

याही पक्षाचे लोहिया समाजवादी (प्रजा सोशालिस्ट पार्टी), संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे अनेक तुकडे होऊन बरेच राजकीय पक्ष तयार झाले.

आजही हिंदुस्थान प्रजापक्ष, भारतीय प्रजापक्ष ता नावाचे काही प्रजापक्ष अस्तित्वात आहेत.

त्या कारणाने समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान यांनी

शेगाव येथील आमीन भाई. यांना समाजवादी पार्टी शेगाव “शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समाजवादी पार्टीचे युवा जन सभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शेख युनूस भाई यांनी ऑनलाइन द्वारे त्यांची नियुक्ती केली व शेगाव शहर वासियांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत

रंकाळा ते नंदवाळ एसटी सेवा

0

 

तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

नंदवाळ करवीर तालुका १७ ऑक्टोबर कोल्हापूर राधानगरी रोड वाशी ते नंदवाळ अडीच किलोमीटर अंतर आहे.

कोल्हापुरातील नंदवाळ हे गाव आधी नंदापूर मग नंदा ग्राम प्रती पंढरपूर या नावाने प्रसिद्ध आहे. महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक एकादशीला हजारो वारकरी व भाविक विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनाला येतात.व वर्षातील आषाढी एकादशी यात्रेला विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शना साठी चार ते साडेचार लाखांच्यावर भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. माध्यमिक व कॉलेजला विद्यार्थी मुला मुलींना कोल्हापूरला शिक्षणासाठी वाशी फाट्यावर अडीच किलोमीटर पायी चालत जावे लागत होते.

व गावी घरी अडीच किलोमीटर यावे लागत होते.व नंदवाळ गावातील शेतकरी महिला व पुरुष डोक्यावरून चाळीस ते पन्नास किलोचे भाजीपाला व फळे डोक्यावर घेऊन चालत अडीच किलोमीटर वाशी फाटा पर्यंत जात होते. तसेच या गावांमध्ये बांधकाम कामगार 70 ते 80 आहेत.

ह्या बांधकाम कामगारांना आपल्या पोटाची उदा निर्वासाठी कोल्हापूर व भागात कामाला जाण्या, येण्यासाठी अडीच किलोमीटर वाशी फाटा शिवाय पर्याय नव्हता. अशा या गावामध्ये एसटी महामंडळाने एसटी बस सेवा चालू करून इतरांसह गावकरी प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

आगार प्रमुख संभाजीनगर डेपो मॅनेजर, श्री. शिवराज जाधव, वाहतूक नियंत्रक श्री. प्रकाश गायकवाड, एसटी कामगार संघटना सचिव श्री.उत्तम पाटील देवाळेकर, एसटी महिला प्रतिनिधी सौ.अरुणा कोडेंकर, यांचे सहकार्य लाभले.

उपस्थिती – लोक नियुक्त सरपंच श्री.अमर कुंभार साहेब, डेपोडी सरपंच श्री. सचिन कोडेंकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.तानाजी कांबळे, श्री.सुरेश उलपे, श्री.संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सविता निकम,सौ.उज्वला गुरव,सौ.शारदा पाटील,ग्राम सेवक श्री.उत्तम पाटील, पोलिस पाटील उलपे साहेब व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी प्रवासी होते.

सुर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर

BULDHANA /: ना ‘सन्मान’ ना ‘हफ्ता’! शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट

वारंवार गाजावाजा करीत असलेल्या पंतप्रधान शेतकरी सम्मान योजनेचा लाभ तब्बल एक वर्षापासून मिळाला नाही! अर्ज केले, विनवण्या केल्या, मात्र ना सन्मान ना हफ्ता मिळाला.#pantprdhanshetkrisamman

अखेर संतप्त शेतकऱ्यांनी खडकपूर्णा धरणात आज अर्धनग्न ठिय्या आंदोलन सुरू केले.#andolan

यामुळे जिल्हा प्रशासनासह संबधित यंत्रणा हादरली असून त्यांनी घटनास्थळी दाखल होण्याची धावपळ सुरू केली. तहसीलदार धरण क्षेत्रात दाखल झाले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. शेतकऱ्यांना वर्षात ६ हजार रुपये २ हजार रुपये हाफत्याने देण्यात येतात. मात्र देऊळगाव राजा तालुक्यात योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे.#pmkishan

एक वर्षांपासून येथील २९५ कास्तकारांना लाभ मिळाला नाही. त्यांनी तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांना निवेदने दिलीत. मात्र न्याय मिळाला नाही.#devalgaonraja

आज१७ ऑक्टोबरला बायगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी खडकपूर्णा धरणात आंदोलन सुरू केले आहे. ६००० रुपये याप्रमाणे २९५ शेतकऱ्यांचे १७ लाख ७० हजार रुपये प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे आहे.

त्यांना वर्षभरापूर्वीपर्यंत सन्मान निधीचा हप्ता मिळत होता मात्र एकाएकी या शेतकऱ्यांना मिळणारा सन्मान बंद करण्यात आला होता. शेतकरी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष तेजराव मुंढे, शिवाजी काकड, कोंडू पाटील दहातोंडे, गुलाब जाधव, जगन मांटे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, बाजार समिती सभापती समाधान शिंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

सध्या देऊळगाव राजा तहसीलदार आंदोलन कर्त्यांशी चर्चा करीत आहे.#shetkri #andolan

संग्रामपूर वकील संघाची नुतन कार्यकारणी गठीत.

0

 

[अध्यक्षपदी- अॕड.गोतमारे ,उपाध्यक्ष- अॕड.गायकी, सचिव- अॕड.चिकटे.]

संग्रामपूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय अंतर्गत असलेल्या संग्रामपूर तालुका वकील संघाची बैठक दि .१६/ ऑक्टोबर रोजी वकील संघाचे चेंबर मध्ये मावळते अध्यक्ष अॕड पि.के. घाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन ठरल्याप्रमाणे कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी महिला अॕड. एस. एस. गोतमारे(मेतकर) मॅडम यांची तर उपाध्यक्षपदी अॕड. एस.आर. गायकी यांची उपाध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात येवून अॕड. जी.जी.यांची सचिवपदी फेर निवड करण्यात आली.

असून कोषाध्यक्षपदी महिला अॕड. एस.आर.सातव मॅडम यांना कायम ठेवण्यात आले आहे.

संग्रामपूर न्यायालयाचे नवीन इमारत बांधकाम मंजूर झाले असून इमारत बांधकाम लवकर होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. ह्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे व विविध उपक्रमात सहभाग घेवून न्यायालयीन कामात एकजुटीने संघटित राहून काम करावं असे आवाहन मावळते अध्यक्ष पि.के. घाटे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले आहे. याप्रसंगी जेष्ठ विधीतज्ञ अॕड. जी.एस.गावंडे ,अॕड. एस, जी. अजणे,,अॕड. बी. एस. गवई,अॕड. एल.एफ. राठी

अॕड.जी.ए.क्षीरसागर,अॕड.ए.एस.गिरजापूरे, अॕड. के. पी .बावस्कर,तसेच अॕड.बी.पी. खंडेराव,अॕड.व्हि.एम. घोडेस्वार,अॕड. एम. एस. किर्तने,अॕड.पी.पी.अग्रवाल,

अॕड.एन.एस.गव्हांदे,अॕड.व्हि.पी.वानखडे, अॕड.व्हि.एम.बावणे, अॕड.डी.वाय.गव्हांदे, अॕड.ए. एस धामोळे यांच्यासह वकीलांचे कारकून देवानंद इंगळे उपस्थित होते.