Home Blog Page 171

स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या उपोषणाची सांगता

0

 

वरवट बकाल ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या लेखी पत्राने अतिक्रमण धारकांना सहानुभूती

 

संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने वरवट बकाल येथील अतिक्रमण धारक यांना ग्रामपंचायत वरवट बकाल यांच्याकडून काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या#warvatbakal

त्या कारणाने तहसील कार्यालय संग्रामपूर येथे मागील दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पासून अमरण साखळी उपोषणाला बसलेल्या ठिकाणी धारक यांना आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवले व सोनवणे तसेच वरवट बकाल ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आहे

 

वरवट बकाल ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सर्व अतिक्रमण काढण्यापूर्वी उपोषण  करत्यांना ग्रामपंचायत मध्ये बोलवण्यात येईल व ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांसमोर या विषयाबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल

वरवर बकाल ग्रामसेवक दुबे.

👇👇👇👇👇👇

वरवट बकाल यांना प्रत देऊन सुचीत करण्यात येते की, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या सोनाळा रोड ते कृषि उत्पन्न बाजार समिती व ग्रामिण रुग्णालयाच्या उत्तर संरक्षण भितीला लागून असलेल्या अतिक्रमीत दुकाना बाबत नियमानुसार योग्य कार्यवाही करावी व उपोषण कर्ते यांना साखळी उपोषणापासून परावृत्त करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

गट विकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर#panchayatsamiti

इंदिरानगर परिसरात रहिवाशांची आयुष्यमान कार्ड बनविण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन..

0

 

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव नगरपालिका हद्दीतील इंदिरानगर परिसरातील रहिवाशांसाठी आयोजन करण्यात आले होते. इंदिरानगर येथील समाज मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आयुष्यमान कार्ड शिबिरामध्ये आशा वर्कर,,

आरोग्य विभागाचे कर्मचारी शेगाव नगरपालिका रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांची नाव नोंदणी व त्यांना कार्ड बनवून देण्याचे कार्य केले आज इंदिरा नगर शेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड PMJAY लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून देण्यात आले.

इंदिरानगर परिसरातील रहिवाशांच

सदर कार्ड तयार करण्यासाठी गौतम खंडारे समाजसेवक यांच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता .#ayushmancard

हा कार्यक्रम तालुका समुह संघटक शेगांव विनोद चंदनशिव यांच्या टीम द्वारे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कामासाठी सतीश पाटील.शिवाजी तायडे, आशा वर्कर सुरेखा पवार ,मनीषा देशमुख,अनिता चितोडआशा स्वयमसेविका उपस्थित होत्या.यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला#ayushmancard #pmJay

Breking News /देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हायवेवर मोटारसायकल ची समोरासमोर धडक

0

 

हायवेवर 7:30च्या सुमारास मोटरसायकलचा समोरासमोर धडक#beednews 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गेवराई तलवाडा हयवेवर मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात घडण्याला मोटारसायकल समोरासमोर आल्याने हा अपघात झाला

असून अपघातामध्ये तीन ते चार जण गंभीर तर एक जन अति गंभीर असल्याचे सांगण्यात आले ,#apghat

याची तलवाडा पोलीस स्टेशनला मिळतात तलवाडा पोलीस स्टेशनचे पीएसआय बाळासाहेब भवर ,बीटआमलदार आलगट ,पोलीस कर्मचारी काकडे जिकरे, बांगर व शेळके , त्यानी घटना स्थळी धावघेऊन पाहणी केली.

व अपघात झालेल्या सर्व वेक्तीस उपचार करण्यासाठी गेवराई प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तात्काळ हलवण्यात आली आहे ,अपघात झालेले व्यक्ती हे पैठण तालुक्यातील असल्याची या ठिकाणी बोलले #breking

आझाद हिंदच्या आक्रोश मोर्चातील मागणीची पूर्तता.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदलीमुळे पोलीस प्रशासनात खळबळ.

0

 

अखेर होम डिवायएसपी गिरीश ताथोड आणि उपपोलीस निरीक्षक घोडेस्वारांची जिल्हा बदली.

बुलढाणा: आझाद हिंदच्या वतीने काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने 27 जानेवारी 2023 ला प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने होम डिवायएसपी गिरीश ताथोड आणि जळगाव जामोद पोस्टेचे उप पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांची त्वरित जिल्हा अंतर्गत बदली झाली होती. परंतू आझाद हिंदने जिल्हा बदलीची मागणी केलेली होती. सदर मागणी आझाद हिंदने रेटून धरली होती.

त्यामुळे अमरावती विभागीय पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे यांच्या आदेशांन्वये तसे पत्र जिल्हा पोलीस प्रशासन आणि जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकतेच आझाद हिंद संघटनेला प्राप्त झाले आहे.

उपोषणकर्त्या ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा अवमान करने. त्यांना उपोषण मंडपातून केबिनमध्ये बोलवणे. तत्कालीन होमडीवाय एसपी गिरीश ताथोड यांच्या अंगलट आले असुन त्यांची बुलढाणा जिल्ह्यातून ईतर जिल्हात बदली करण्याची आझाद हिंदची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

त्याचबरोबर अल्पवईन नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात तपासकामी कूचकामी ठरलेले उप पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांचीही जिल्हया बाहेर बदली करण्यात आली आहे.

तसे पत्र १४ आक्टोंबर २०२३ ला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांना प्राप्त झाले आहे.

Vaijapur Road Accident / वैजापूरजवळील अपघात; मुख्यमंत्र्यांना दुःख

0

 

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई, १५ – नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Vaijapur Road Accident

पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेट; जखमींची विचारपूस #cmmaharashtra

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानराव भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.#meeknathshinde

या अपघातातील १७ जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि ६ जखमींवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.#eknathshinde

धनगर जागर यात्रा खामगाव मध्ये संपन्न, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती.

0

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

अनेक वर्षापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा खंडित आहे, याच प्रश्नावर पूर्ण महाराष्ट्रभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाचा मुद्दा लांबून धरला आहे, त्याच अनुषंगाने आज 14 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे
संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता

या मेळाव्याला संबंधित करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबोधले की आमचा लढा हा आमच्या हक्काच्या आरक्षणाचा आहे त्याबद्दल आम्ही कोणाच्याही आरक्षणाला ठेच पोहोचणार नाही व ज्या समाजातील लोक आरक्षणाची मागणी करतील त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे व अशा समाजाला धनगर समाज व मी त्यांचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती धनगर समाज नेते व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, रेगुलर आमदार आमदार आकाश भाऊ फुंडकर, आदी मान्यवर व धनगर समाजाचे बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.

राजकीय कुतुहल अन् माणुसपण जपणारी ग्रेट भेट!!!

0

 

मा.मंत्री तथा विद्यमान आ.डाॕ.राजेंद्रजी शिंगणे यांची मा.जि.प.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांचे घरी सदिच्छा भेट!

राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करतांना मतभेद-मनभेद वाढत असतांना राजकीय कुतुहल निर्माण करणारी सदिच्छा भेट निर्माण करणारी ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते मा.मंत्री तथा सिंदखेड राजा चे विद्यमान आमदार डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे यांनी बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ उपाख्य राजु पाटील यांचे पातुर्डा येथे सदिच्छा भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ गटात विभागल्या गेल्याने राजकीय समिकरणे बदलणार अशी चर्चा होत असतांना राजकारणा व्यतिरिक्त ‘माणुसपण’ जपणारा जिव्हाळा दोन्ही राजकीय नेतृत्वांच्या माणसातुन आपलेपणा रुजविल्या गेला हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल…!

 

आ.डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे हे सद्या ‘अजितदादा गटात’ तर संगितराव भोंगळ हे ‘शरद पवार गटात’ आहेत पक्ष एक विचारधारा ऐकचं त्यात निर्माण झाली राजकीय फडी असतांना “शिंगणे-भोंगळ” यांची ग्रेट भेट कुतुहल निर्माण करत आहे…!!!
असो, राजकीय प्रतिकुलता असतांना माणुसपण जपणारी ‘अनुकुलता’ रुजविणारी उपरोक्त ग्रेट असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण दोन्ही नेते आप-आपल्या पक्षाच्या नेतृत्वाशी प्रामाणिक आहेत त्यात पक्षीय विचारधारेशी बांधिल आहेत राजकारणातुन समाजकारण जपण्यासाठी ही ‘ग्रेट -भेट’विचारांनी प्रग्लभता दाखवुन देते हे विशेष!

असो, आज ‘अजितदादा गट’ राष्ट्रवादी काँग्रेस चे मा.मंत्री सिंदखेड राजा चे विद्यमान आ.डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे यांनी संगितराव भोंगळ यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संगितरावांच्या मातोश्रींची संवाद साधला त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपुस केली. संगितरावांची विविध विषयांवर संवाद साधला चर्चा केली.

यावेळी टी.डी. अंभोरे साहेब,देवेंद्रदादा देशमुख, भगवान लाऊडकर, नारायण ढगे, संदीप दामधर, नरेश घिवे, पंजाबराव वानखडे, पप्पू पठाण,दुर्गासिंग सोळंके, विष्णू भोंगळ,ज्ञानेश्वर बोपले,विलास मानकर सरपंच,प्रवीण पाचडे, अमोल व्यवहारे,अमित पाटील,मुन्ना पिसे,निखिल भाकरे,मंगेश पानबिहाडे, उज्वल पाटील,विक्रांत पाटील,उत्तम हातेकर उपस्थित होते.

Shegaon /शितलताई शेगोकार यांच्या वाढदिवसाला शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर यांची उपस्थिती

0

 

इस्माईल शेख बुलढाणा

आज 14 ऑक्टोबर धम्म प्रवर्तन दिवस या दिवशी केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी महाराष्ट्र महिला अध्यक्षा शितलताई शेगोकार राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण करून ताईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शेगाव पोलीस स्टेशन शहर चे ठाणेदार माननीय सुनील जी आंबुलकर साहेब यांनी शितलताई यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन रेल्वे स्टेशन पासून ते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपणाने करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संघटनेच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरगोच्च शुभेच्छा देऊन ताईंचा वाढदिवस साजरा केला बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष पूजाताई खेते यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली तसेच मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी खामगाव तालुकाध्यक्ष वैशालीताई तायडे मंगलाताई सोळंके रेवसकर ताई मीनाताई भक्त मुक्ता ठाकूर प्रज्ञाताई सावंत दीपमाला कांबळे नीता पाटील श्रेया खंडेराव तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगेवार साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा ताईंचा वाढदिवस पिंपळाचे झाड लावून साजरा केला.

तसेच राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने उमाताई बोचरे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ शेगोकार विदर्भ उपाध्यक्ष इस्माईल शेख शेगाव तालुकाध्यक्ष श्यामपूरकर तालुका उपाध्यक्ष सुभाष वाकोडे आमिन शेख शेगाव शहर कार्याध्यक्ष शाहरुख भाई शहर अध्यक्ष तसेच शेगाव रेल्वे स्टेशन येथील सर्व पदाधिकारी लाभिणी किशोर पाटील एच आय डीपी मोहरीर डी वाय एस एम आर एस देशपांडे डी वाय एस एम पी आर पाटील एस एम भिकाव बंकर कार्यालय सहाय्यक नासिर अली तसेच रेल्वे इन्स्पेक्टर सावळे सर यांची उपस्थिती.

मध्ये ताईंचा वाढदिवस खूप मोठ्या संख्येने ठीक ठिकाणी साजरा करण्यात आला तसेच एरियातील बुद्ध विहार येथे सुद्धा एरियातील लोकांनी शितलताई चा वाढदिवस साजरा केला आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ माझ्या वाढदिवसाच दिला त्याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे असे बोलून पत्रकार मीडियाला सर्वांचे आभार व्यक्त केले

Yaval / तब्बल एक ट्रॅक्टर सह १३ मोटारसायकल हस्तगत करत १५ संशयित आरोपींना अटक सर्वत्र एकत्र खडबळ

0

 

विकी वानखेडे यावल

शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून त्यातील एका ट्रऍक्टरसह १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.#yaval

 

या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील कुंभार टेकडी परिसरातुन दिनांक १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते.

याबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या संदर्भात पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत होते#yavalpolice

दरम्यान सदर तपास करत असतांना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार (वय १९ रा.कुंभारवाडा यावल) याच्यासह तिन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशीत या तिघांनी ट्रक्टर सह दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्यात अजुन काही जण सहभागी असल्याचे सांगीतले होते.

या संदर्भात पोलिसांनी तपासात शहरातुन एकापाठोपाठ एक अशी एकुण १५ जणांची टोळीच चौकशीसाठी ताब्यात घेतली असून चौकशीत या सर्वांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल ३७ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.#police

पोलिसांनी या प्रकरणात १३ मोटरसायकली विविध भागातून हस्तगत करून आणल्या आहेत. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरिक्षक मुजफ्फर खान, उपनिरीक्षक सुनील

मोरे,सहायक फौजदार विजय पाचपोळे,असलम खान, हवालदार राजेंद्र पवार,सुशील घुगे, योगेश खांडे, संदीप सूर्यवंशी, मोहन तायडे,अशोक बाविस्कर, अनिल पाटील,एजाज गवळी या पथकाने केली आहे. तर सदर ट्रॅक्टर हे डांभुर्णी शिवारात लपवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन रात्री उशीरा पर्यंत पोलीस ठाण्यात संशयीतांकडे तपास व अटक करण्याची प्रक्रीया सुरू होती.#crime

यावलसह परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी करणारी टोळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून या चोरट्यांनी तालुक्यासह परिसरातून वाहने चोरली असल्याची शक्यता असून आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत.

असंघटित कामगारांनी घेतला वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये प्रवेश..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: दी.१३/१०/२०२३ ला शहरातील असंघटित कामगार यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश घेतला.शेगांव शहरातील स्थानिक पंचशील नगर मध्ये सदर पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडी च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.पंचशील नगर वार्ड शाखा अध्यक्ष अंबादास सहारे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित केला होता.

*या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी चे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशाभाई खराटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे,जिल्हा संघटक भाऊराव उमाळे,शेगाव तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,शेगांव शहर युवा अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार,शहर सचिव उदयराजे सुरवाडे,आयोजक अंबादास सहारे,प्रसिद्धी प्रमुख विशाल सरदार तथा असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठांच्या सुचणे नुसार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा शहराध्यक्ष संदेशकुमार शेगोकार उपस्थित होते.या वेळी जिल्हा महासचिव अतिशाभाई खराटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे,तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,युवा शहर अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार या मन्यवरांनी नवनिर्वाचित पक्ष सदस्यांचा सत्कार केला व आपापल्या मार्गदर्शन पर भाषणातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणा विषयी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ड शाखा अध्यक्ष अंबादासभाऊ सहारे,युवा शहर प्रसिद्धी प्रमुख विशाल सरदार व सर्व पंचशील नगर युवकांनी खूप मेहनत घेतली व संघटन केले त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या वतीन त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.