Home Blog Page 172

महिलांच्या समस्या बाबत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी महिला आयोग अध्यक्षांसोबत केली चर्चा

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकरRupali chaknkar या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर 13 ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे आलेल्या होत्या. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी बुलढाणा येथील शासकीय विश्राम भवन येथे रुपालीताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी महिलांच्या विविध समस्या बाबत.

चर्चा करून अपंग विधवा चला ग्रस्त महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा व त्यांच्या इतरही समस्या सोडविण्याबाबत योग्य तो निर्णय आपल्या राज्य महिला आयोगामार्फत घेण्याची विनंती यावेळी माधुरी शर्मा यांनी रूपालीताई यांच्याकडे केली.

सर्वप्रथम माधुरी शर्मा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारूपालीताई चाकणकर मॅडम तसेच राज्य महिला आयोग सदस्या आभा ताई पांडे मॅडम यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या निर्मलाताई तायडे, रेखाताई गवई व अर्चनाताई टाले मॅडम उपस्थित होत्या#rupali chakankar

जवळा बुद्रुक येथे 35 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या..

0

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव: तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील 35 वर्षीय विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 13 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार शांताराम सावदेकर वय 52 वर्ष यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जवळा बुद्रुक येथील माझ्या चुलत भावाची पत्नी छाया शामराव सावदेकर अंदाजे 35 वर्षे राहणार जवळा बुद्रुक तालुका शेगाव यांनी स्वतःच्या राहत्या घरात आल्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमदार पोलीस हेडकॉन्स्टेबल करून अरुण मेटांगे बकल नंबर 850 हे त्यांच्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून विच्छेदनासाठी सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणण्यात आले या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वर्ग क्रमांक 28 ऑब्लिक 2023 कलम 174 जा.फौ.नुसार मर्ग दाखल केला आहे.

याबाबत अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटेंगे साहेब बक्कल नंबर 850 हे करीत आहेत

सामाजिक तेढ निर्माण करण्याऱ्या ठराव विरोधात उपोषणाची सांगता

0

 

 

श्याम उमरकर संग्रामपूर  ता. प्रतिनिधी 

संग्रामपूर शहरातील वार्ड क्रमांक 15 मधील गट नंबर 214 मधील ले आऊट मधील ओपन स्पेस च्या जाग्यावर नगर पंचायत च्या मासिक सभा मध्ये दिनांक 25/08/2023 ला शादीखाना किंवा सभागृह बांधकाम करण्यासाठी स्थानिक सत्ताधारी यांनी ठराव पारीत केला. सदर वार्ड क्रमांक 15 मध्ये गट नंबर 14 मध्ये हिंदू व मुस्लिम बांधव आज पर्यन्त गुण्या गोविंदाने राहत सर्व सन उत्सव साजरे करत.

असतांना स्थानिक सत्ताधारी यांनी आपली नागरिकांच्या भावना चा विचार न करता जातीय तेढ निर्माण होण्यासाठीच का येथील ओपन स्पेस मध्ये शादीखाना घेतला का?

याबाबत सतत जनतेत सुर निघत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रथम विनंती करत तो ठराव रद्द करावा याबाबत विनंती केली. परंतु नगर पंचायत चे पदाधिकारी व प्रसाशन याबाबत काही ऐकायला तयार नसल्याने आपला आडेमूठ पणा धरत होते.

शेवटी नागरिकांनी गट नंबर 14 वार्ड क्रमांक 15 मधील ओपन स्पेस वर शादिखाना करू नये यासाठी निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला. तरी पदाधिकारी ऐकत नाही व याबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे दिनांक 12 ऑक्टोबर पासून स्थानिक नगर पंचायत चे भारत बावस्कार व रमेश सोनटक्के यांनी आमरण उपोषण सुरु केले.

उपोषणाला स्थानिक संग्रामपुर शहरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने नगर पंचायत पदाधिकारी यांना उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गट नंबर 214 वार्ड क्रमांक 15 मधील ओपन स्पेस जागेवर शादिखाना सभागृह बाबत उपोषण कर्ते सोबत चर्चा करून येणाऱ्या सभेत सार्वजनिक जागेत प्रस्तावित असलेले सामाजिक सभागृहाचे काम येणाऱ्या नगर पंचायत च्या सभे समोर ठेवून ठराव रद्द करण्यात येईल.

व त्या नुसार वार्ड क्रमांक 15 मधील सामाजिक सभागृहाचे बांधकामाची कोणतेही कार्यवाही यापुढे होणार नाही. तरी आपण आपले उपोषण मागे घ्यावे असे लेखी आश्वासन दिल्याने नगराध्यक्ष उषा सोनोने यांच्या हस्ते लींबू पाणी देऊन भारत बावस्कार व रमेश सोनटक्के यांना आपले उपोषण मागे घेतले.

यावेळी नगर पंचायत चे नगर अध्यक्षा उषाताई सोनोने, बांधकाम अभियंता पारस्कार, नगर पंचायत अधीक्षक शरद कोल्हे, पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वतःची बीट सोडून दुसऱ्या तालुक्यातील हद्दीत रंदा मशीनचे दुकानात बसणाऱ्या वनरक्षकाचा हेतू काय?

0

 

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण

वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

संग्रामपूर ः- तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र वन्यजीव प्रादेशिक मधील वसाळी बंदर झीरा वनरक्षक स्वतःची बीट सोडून दुसऱ्या तालुक्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र हद्दीत येऊन रंदा मशीनचे दुकानावर बसून जामोदला बैठक घेऊन स्वतःचा चांगभलं करून घेण्यासाठी देवाण-घेवाण तर करीत नाही ना ?

अशी चर्चा जनतेत सुरू आहे, याकडे वरीष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.

सदर मिथुन गवळी नामक वनरक्षक हा स्वतःची बीट सोडून दुसऱ्या वनपरिक्षेत्रातील हद्दीत का येतो ?

याबाबत वरीष्ठांची परवानगी घेतल्या जाते काय? याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. यावर संबंधित वनरक्षकावर काय कारवाई होणार?

व होणार की नाही? नाहीतर “तेरी भी चुप मेरी भी चूप” असे होणार का ?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर वनरक्षकावर कारवाई ही अपेक्षा आहे. #vanvibhag #forest

Buldhana /अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले.. चार ब्रास रेती सह 33 लाखाचा मुद्देमाल जप्त.

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गाव मोमिनाबाद येथे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून विनापरवाना रेतीची चोटी वाहतूक करणारे दोन टिप्पर चार ब्रास रेतीसह पकडले वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचे कोणतेही कागदपत्र आढळून आल्याने दोन्ही टिप्पर व रेती जप्त करून वाहन चालकांना अटक करण्यात आली व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाला गुप्त व खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासणे साहेब यांच्या आदेशाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोमीनाबाद येथे पोलीस पथकाने सापळा रचला.

यावेळीअशोक लेलँड कंपनीचे निळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक MH-28-BB-1590 , व बिना नंबरचे अशोक लेलैंड कंपनीचे पिवळ्या रंगाचे टिप्पर अशी दोन वाहने येताना दिसली सदर वाहने थांबून तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये रेती आढळून आली याबाबतसचिन रघुनाथ कांडेलकर, 29, रु. दाताळा ता. मलकापूर

2) शेख अन्सार शेख शकुर वय 30 वर्षे रा. उमाळी ता. मलकापुर या दोन्ही वाहन चालकाकडे रेतीची वाहतूक करण्यासंबंधी कागदपत्र कसले बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आढळून आले नाही.

त्यामुळे दोन्ही वाहने व रेती असा एकूण 33 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नांदुरा पोलीस स्टेशन मध्येS.P.N. सतीश काशीराम आडे, वय 39, अपॉइंटमेंट रीडर, A.P.O.A. कार्यालय खामगाव, यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२३ कलम 379 I.D.V. कं ए. १५८/१७७, ३(१)/ १८१, ५/१८०, ५०/१७७ मे/से. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेहकीकत हकीकत अशा प्रकारे आहेकी, यातील नमुद घ.ता. वेळी वठिकाणी यातील नमुद आरोपी हे त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये गौणखनीज रेती अवैधरित्या चोरुन घेवुन जातांना मिळुन आले. वरुन त्यांचे कब्जातून कॉ.न. 08 प्रमाणे मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. सुनिल कडासणे साहेब, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब, खामगांव यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक साहेब खामगांव यांचे पथकातील सपोनि. सतिष आडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, निलेश चिंचोळकर, पो. कॉ. शिवशंकर वायाळ, पो. कॉ. हिरा परसुवाले यांनी केली.#buldhana #poloce

Forest / Jalgaon वन मजूर जोमात शासकीय अधिकारी गेले ? कोमात , अजब अधिकाऱ्याचा गजब कारभार ,

0

 

अजब अधिकाऱ्याची गजब कहाणी सुरू असून आता पर्यंत बऱ्याच बातम्या प्रसिद्ध करून ही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत ,

नेमके त्यांच्याच आशीर्वादाने तर हा भोंगळ कारभार सुरू नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे ,

कोणाचा आशीर्वाद आहे हे जरी आज शासनाला महत्त्वाचे वाटत नसले तरी शासकीय नियमानुसार उद्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीची हमी कोण घेईल हे महत्त्वाचे आहे #forest

, यासोबतच लोकप्रतिनिधी यांनी ही या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे , आज शासकीय दस्ता ऐवज आणि गोपनीय माहिती अश्या प्रकारे सार्वजनिक झाली तर.

त्यातून होणाऱ्या गैरप्रकाराला जबाबदार कोण असेल हा प्रश्न चर्चेचा विषय. बनला आहे ,

सूर्या मराठी न्यूज चे माध्यमातून आम्ही हा प्रश्न लावून धरला असला तरी यावर कारवाही केव्हा होईल हे बघणे महत्वाचे आहे ,

RFO च्या खुर्चीवर वन मजूर स्वार?मंग RFO मारतात काय दांडी?सर्व सामान्यांना पडला गहन प्रश्न?

शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानूसार सेवा नियमावली ठरवून दिलेली असतानाही आणि त्या नुसार कोणत्याही पदावरील व्यक्ती, अधिकारी आणि कर्मचारी आपआपल्या पदानुसार वर्तन आणि व्यवहार करीत असतात.

परंतू जळगाव जामोद मध्ये या नियमावलीची पायमल्ली झाल्याचे चक्क दिसून आले.

#forest #nature #naturephotography #photography #trees #landscape #naturelovers #tree #travel #hiking #mountains #forestphotography

 

झाले असे की येथील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या चक्क खुर्चीवर त्यांच्यास कार्यालयातील वन मजुर खुर्चीवर बसून,

तेथील गोपनीय माहितीचे आदानप्रदान झाल्याची चर्चा असतांना सुद्धा कार्यवाही दडपली जात आहे.त्यामुळे सदर वनकर्मचारी यांच्यावर कुणाचे आशिर्वाद आहे की यांनी नवीन प्रताप घडविल्याची बाब पुढे आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव व पदभार केव्हा पासून सांभाळण्यात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.

माननीय श्री कुमार स्वामी डि. एफ .ओ साहेब आपल्याकडून आशा करतो की जळगाव जामोद रेंज हि सध्या किशोर पडोळ यांच्याकडे चार्ज असून त्यांच्या खुर्चीवर बसून वन मजूरची पद नाही.

अशा माणसाला आर .एफ .ओ यांच्या खुर्चीवर बसून वन विभागातील सरकारी कम्प्युटर वापरणे व गोपनीय सरकारी दस्तावेज वन विभागाच्या बाहेर नेणे व गोपनीय माहितीचा बाहेर दुरुपयोग करणे या सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या कार्यरत असलेल्या आर एफ ओ दिनेश पडोळ साहेब यांनी स्वतःची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मला समाधानकारक उत्तर मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.

#autumn #wildlife #woods #outdoors #landscapephotography #art #naturelover #beautiful #photo #wald #instagood #explore #sky #sunset

अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून वनमजूर काम करतोय तर मंग RFO कार्यालयाला दांडी मारतात की काय?

असा नवा सुर पुढे येतांना दिसत आहे.
महत्वाच्या सरकारी कागदपत्रांची हेराफेरी झाली तर जबाबदार कोण?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या मागणीला आले यश…. शहरात झाली धुळ फवारणीला सुरवात

0

 

सिंदी रेल्वे ता.१० : एक महीण्यापुर्वी माजी नगरसेवक आणि शिवसेना (उ.बा.ठा ) तर्फे शहरात डासांच्या बदोबस्तासाठी धुळ फवारणी करण्याच्या मागणीला यश आले असुन सोमवारी( ता.९) पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने धुळ फवारणीला सुरवात करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,सततधार पावसामुळे शहरात डासांचे प्रमाण लक्षनिय वाढल्यांने डासांपासुन होणारे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता पाहता डासांचा बदोबस्त म्हणून पालीकेला धुळ फवारणी करण्याची मागणीचे निवेदन पालीका मुख्याधिकारी यांना एक महीण्याअगोदर माजी नगरसेवक अमोल बोंगाडे यांनी तसेच शिवसेना (उ.बा.ठा) शाखा सिंदी च्या वतीने शहरप्रमुख सचिन लांबट, तालुका उपाध्यक्ष किशोर खडतकर यांनी देऊन मागणी लावुन धरली होती.

सदर मागणीला स्थानिक दैनिकनी बातमी प्रकाशीत करुन प्रशासणाच्या समोर आणली मात्र निगरगट्ट प्रशासन
तब्बल एक महीण्याहुन अधिकचा कालावधी उलटून गेल्यावर पालीका प्रशासनाला जाग आली आणि सोमवारी (ता.९) ला रात्री पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शहरात धुळफवारणीला सुरवात झाली.

शहरवासीयांनी माजी नगरसेवक अमोल बोंगाडे आणि शिवसेना (उ.बा.ठा) शहर शाखेचे आभार मानले.
1)माजी नगरसेवक अमोल बोंगाडे धुळ फवारणीच्या मागणीचे निवेदन देतांना
2)शिवसेना (उ.बा.ठा) निवेदन देऊन मागणी करताना

क्रांतीसुर्य माळी महासंघ, राज्य प्रसिध्दी प्रमूख पदी विनोद खंडारे यांची निवड

0

 

मुंबई, (ऑनलाईन न्यूज डेस्क)

क्रांतीसुर्य माळी महासंघ राज्य प्रसिध्दी प्रमूख पदी विनोद खंडारे यांची निवड करण्यात आली आहे. Krantisurya

दिनांक 12ऑक्टोबर 2023 गुरूवार रोजी श्री संत सावता माळी भवन नांदुरा येथे क्रांतीसूर्य माळी महासंघ प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी श्री. विनोद रामेश्वर खंडारे यांची नियुक्ती क्रांतीसूर्य माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अमोल वसंतराव इंगळे यांनी एका पत्रद्वारे केली आहे. सामाजिक प्रगती व महासंघाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी.तसेच आपण हे समाजसेवेचे व्रत स्वीकारून आपली जबाबदारी पुर्णपणे यशस्वीरीत्या पुर्ण कराल हीच अपेक्षा व आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. असे या नियुक्ती पात्रात नमूद करण्यात आले आहे. Krantisurya #kranti

याप्रसंगी सचिव, योगेश रामभाऊ घाटे (खामगांव), उपाध्यक्ष शत्रुघनभाऊ बोचरे (शेलगाव मुकुंद), सदस्य संजयभाऊ बोंबटकार (खामगांव), दिनकर इंगळे (खामगांव), यांच्यासह माळी समाज बांधव निवृत्ती हरिभाऊ इंगळे, गजानन सातव (से.नि.पोलीस), सागर वावटळीकर, बळीराम चोपडे, राजेश निखाडे, संजय वानखडे, वसंत चोपडे, यांच्यासह माळी समाज बांधवांची उपस्थिती होती.#krantisurya

Eknath shinde /आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाच्या आराखड्याचा घेतला आढावा

मुंबई, दि. १२ : भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला साजेशे असे भव्य स्मारक नाशिक जिल्ह्यात उभारण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Cmmeeknathshinde

राघोजी भांगरे यांच्या स्मारक उभारणीसाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आणि आराखडा संबंधित जिल्हा समितीने तयार केला आहे. मात्र या प्रस्तावामध्ये भूसंपादन आणि इतर बाबींचा समावेश करुन एकत्रित आराखडा समितीने तयार करण्याच्या सूचना देऊन हा प्रस्ताव राज्य शासनाकडे तात्काळ पाठविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. Raghoji bhangare

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, शौर्य नव्या पिढीसमोर मांडण्यात हे स्मारक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्यामुळे त्या दृष्टीने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करुन स्मारकाची उभारणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. Cmeknathshinde

पत्रकाराच्या फिर्यादीवरून 3 जणां विरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल.

0

 

संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचरणसिंग चव्हाण यांनी दि.10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसात परतवाडा येथील 3 जणांवर विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.

सविस्तर माहिती अशी की,संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचणसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून परतवाडा येथील बिजलसिंग उदयसिंग बावरी , धरमसिंग जयसिंग बावरी व नानकसिंग उदयसिंग बावरी यांनी सोशल मेडीयावर फिर्यादी यांचे विषयी तसेच त्यांचा भाऊ लखनसिंग चव्हाण आणि त्याच्या कुटुंबीया विरुध्द बदनामी कारक पोष्ट टाकुन व्हॉटसप व्दारे आमची समाजात बदनामी केली. तसेच वेगवेगळ्या स्वरुपाचे व्हाईस रेकॉर्डींग आणि फोटो टाकून बदनामी करणारे पोष्ट मेसेज व्हायरल केले.

ह्यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तामगाव पो. स्टे.मध्ये दिल्यावरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.

संग्रामपूर शहरातील पत्रकार फिर्यादी पत्रकार दयालसिंग गुरुचरणसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तिन्ही आरोपी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणे करीता वि. न्यायदंडाधिकारी संग्रामपूर यांच्या न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करून न्यायालयात न्याय मागितला असुन सदर प्रकरण किरकोळ फौजरी अर्जानुसार अप.क्र. 158/2023 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

आहे. तसेच सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांनी सुध्दा योग्य चौकशी करुन फिर्यादीस न्याय मिळावा.अशी मागणी फिर्यादीने संबधीत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली आहे. फिर्यादी हा एका चँनल आणि वृत्तपत्राचा पत्रकार असल्यामुळे त्यास पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार संरक्षण मिळण्याची मागणी सुध्दा समस्त पत्रकार बांधवांनी केली आहे.

फिर्यादी पत्रकार यांचे वहीणीला संबधीत आरोपी पैकी बिजलसिंग बावरी याने मोबाईलवर तुझा पतीला मारून टाकू आणि रात्री घर पेटवून देऊ .तसेच तुझ्या पत्रकार दिराला सुद्धा जिवे मारण्याचे दिलेल्या धमकी वरुन सुध्दा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.