Home Blog Page 173

अतिवृष्टी व पाण्याच्या खंडामुळे शेगाव तालुक्यात पिकाचे अतोनात नुकसान.

0

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगाव . शेगाव तालुक्यामध्ये जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाण्याच्या खंडामुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये 50 टक्के घट झाली,

त्याबद्दल शेतकऱ्यांची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी आहे.
कारण की दसरा दिवाळी हे सण समोरच आले आहेत,

त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणी मध्ये आहे जर शासनाने तात्काळ मदत दिली तर त्याची दिवाळी दसरा हा उत्सवात साजरा होणार आहे नाहीतर मनीप्रमाणे अच्छे दिन आहेतच.

नांदुरा व मलकापूर तालुका सकल माळी समाजाचे वतीने माळी समाज वधू- वर परिचय मेळावा पदाधिकाऱ्यांची निवड;

0

 

अध्यक्षपदी सुभाष गवळी व कार्याध्यक्षपदी सुभाषभाऊ बावस्कर तर प्रसिध्दी प्रमुखपदी विनोद खंडारे

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

नांदुरा व मलकापूर तालुका सकल माळी समाजाचे वतीने माळी समाज वधू- वर परिचय मेळावा अध्यक्षपदी सुभाष गवळी व कार्याध्यक्षपदी सुभाष भाऊ बावस्कर यांची निवड नांदुरा व मलकापूर तालुका सकल माळी समाजाचे वतीने करण्यात आली.

आहे. संमेलनाची सभा नांदुरा व मलकापूर तालुका सकल माळी समाजाचे वतीने करण्यात आली आहे. संमेलनाची सभा श्री संत सावता माळी भवन नांदुरा येथे झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अमृतभाऊ बोंबटकार हे होते.

तर मार्गदर्शक म्हणून ज्ञानदेव बावस्कर, संजूभाऊ घाटे, अड. पुंडलिक वानखडे, महादेव तायडे महळूंगी,दत्ताभाऊ जुमळे दहिगाव,गजानन वानखडे शेलगाव मुकुंद , प्रा. गजानन बावस्कर सर, प्रकशभाऊ बोदडे चांदुर बिस्वा,

गजनानभाऊ करांगळे चांदुर बिस्वा,तुकाराम भाऊ खंडारे.निवृत्ती भाऊ भोगले सर, गोपाळराव तायडे, कैलास भाऊ महाजन भुसावळ,गजेंद्र महाजन भुसावळ उपस्थित होते.यावेळी परिचय संमेलनाच्या आयोजना संबंधी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी सर्वानुमते खालील प्रमाणे समिती गठित करण्यात आली.

सुभाष महादेवराव गवळी लोनवडी अध्यक्ष,सुभाषभाऊ बावस्कर मलकापूर कार्याध्यक्ष,वासुदेव घाटे नांदुरा सहसचिव,नितीन सातव नांदुरा सचिव,संतोषभाऊ घाटे मलकापूर समन्वयक,कैलास मांगोजी वानखेडे उपाधक्ष्य,संजयभाऊ देवकर पान्हेरा उपाध्यक्ष,कैलास वेडुजी माळी बोदवड उपाधक्ष्य,विजयराव भोपळे नांदुरा

उपाध्यक्ष,गजानन वानखडे नांदुरा कोषधक्ष्य,भारत बंड सर नांदुरा सहकोषाधक्ष्य,विनोद रामेश्वर खंडारे नांदुरा प्रसिद्धी प्रमुख,रविंद्र शालिग्राम खंडारे पोटळी संघटक,राजुभाऊ कळस्कर नांदुरा सहसंघटक

मार्गदर्शक मंडळ,
अमृत भाऊ बोंबटकार,ज्ञानदेव बावस्कर, संजूभाऊ घाटे, ॲड पुंडलिक वानखडे, गजनान वानखडे शेलगाव मुकुंद ,महादेव तायडे महळूंगी, दत्ताभाऊ जुमळे दहिगाव, प्रा. गजानन बावस्कर सर, प्रकशभाऊ बोदडे चांदुर बिस्वा,गजनानभाऊ करांगळे चांदुर बिस्वा,तुकाराम भाऊ खंडारे, निवृत्ती भाऊ घोगले सर, गोपाळराव तायडे,कैलास भाऊ महाजन भुसावळ, गजेंद्र महाजन भुसावळ,
*सदस्य* ब्रम्हानंद चौधरी नांदुरा सदस्य, प्रा.उत्तमराव पवार,

सारंगधर अहिरे टाकळी जामनेर, केलास महाजन, पंकजभाऊ देविकार वाघुड सदस्य,मंगेश वावगे सदस्य,अविनाश (सोनू) चोपडे,कैलासभाऊ महाजन बोदवड भुसावळ, निवृत्तीभाऊ इंगळे (बुर्टी),सोपान नामदेवराव चोपडे धानोरा, मोहन राऊत महाळुंगी, ॲड. अमोल वसंतराव इंगळे (नांदुरा), उत्तमराव पवार जामनेर, अविनाश उर्फ सोनू चोपडे, सोपान नामदेवराव चोपडे धानोरा, , मोहन राऊत महळूंगी, उत्तमराव पवार जामनेर, सागर निवृत्ती

वावटळीकर, सागर संजय वाघमारे, ज्ञानदेव गोविंद बावस्कर, भागवत खंडारे, दिनेश विष्णू राऊत, सुमेकानंद सातव, जगदेव चोपडे,किसन सदाशिव राखोंडे, अनंत सातव, श्रीकांत वानखडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मलकापूर व नांदुरा तालुका सकल माळी समाज बांधव उपस्थित होते.

असाक्षरता कलंक पुसून काढण्यासाठी समाजपयोगी कार्य करा–चामोर्शी येथील तालुका स्तरीय प्रशिक्षणात प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-दिनांक ९ आक्टोबर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,शिक्षण विभाग(योजना)यांच्या मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत केंद्र स्तरीय सुलभकांचे दिनांक ९ आक्टोबर २०२३ ते दिनांक ११ आक्टोबर २०२३ या कालावधीत तालुका स्तरीय प्रशिक्षण गट शिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता.उदघाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष गट साधन केंद्र चामोर्शीचे गट समन्वयक चांगदेव सोरते हे होते तर विशेष अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत टेंभुर्णे,मुलचेरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम हे होते.

तर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख एम जी वासेकर, प्रशिक्षणाचे तालुका सुलभक विषय साधनव्यक्ती घनश्याम वांढरे,कालिदास डोंगरे,धर्मपूर शाळेचे उपक्रमशील शिक्षक वेणूगोपाल दासरवार,विषय साधनव्यक्ती विवेक केमेकर, फुलोरा समन्वयक प्रविण धुरके,विषय साधनव्यक्ती कु वंदना चलाख हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास डोंगरे यांनी केले. प्रशिक्षणार्थींना पंचायत समिती चामोर्शी येथील शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत टेंभुर्णे,नेताजी मेश्राम यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मार्गदर्शन गटसमन्वयक चांगदेव सोरते यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सरलक्ष्मी यामसनी मॅडम यांनी केले.

प्रसंगी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा परिचय, स्वरूप,उदिष्टे,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान,उजास प्रवेशिका,उल्हास अप्स, स्वयंसेवकांची भुमिका, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आले.

सदर प्रशिक्षणातील नियोजित घटकांचा उलगडा करण्यासाठी गटकार्य व सादरीकरण पद्धतीचा वापर केल्या जात आहे,दिवसभरात तिन्ही सुलभकांनी तणावमुक्त व आनंददायी वातावरणात नाविण्यपूर्ण अध्यापन पद्धतीच्या सहाय्याने मोकळीकतेचा वापर करून प्रशिक्षणार्थी यांना सहाय्य केले.प्रशिक्षणाला चौदा केंद्रातील २७(१ मुख्याध्यापक व १ तंत्रस्नेही शिक्षक) उपस्थित होते.शेवटी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्र गाण घेऊन दिवसाची सांगता करण्यात आली.

RFO च्या खुर्चीवर वन मजूर स्वार?मंग RFO मारतात काय दांडी?सर्व सामान्यांना पडला गहन प्रश्न?

0

 

जळगाव:-शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानूसार सेवा नियमावली ठरवून दिलेली असतानाही आणि त्या नुसार कोणत्याही पदावरील व्यक्ती, अधिकारी आणि कर्मचारी आपआपल्या पदानुसार वर्तन आणि व्यवहार करीत असतात.परंतू जळगाव जामोद मध्ये या नियमावलीची पायमल्ली झाल्याचे चक्क दिसून आले.

झाले असे की येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या चक्क खुर्चीवर त्यांच्यास कार्यालयातील वन मजुर खुर्चीवर बसून, तेथील गोपनीय माहितीचे आदानप्रदान झाल्याची चर्चा असतांना सुद्धा कार्यवाही दडपली जात आहे.त्यामुळे सदर वनकर्मचारी यांच्यावर कुणाचे आशिर्वाद आहे की यांनी नवीन प्रताप घडविल्याची बाब पुढे आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव व पदभार केव्हा पासून सांभाळण्यात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.

माननीय श्री कुमार स्वामी डि. एफ .ओ साहेब आपल्याकडून आशा करतो की जळगाव जामोद रेंज हि सध्या किशोर पडोळ यांच्याकडे चार्ज असून त्यांच्या खुर्चीवर बसून वन मजूरची पद नाही अशा माणसाला आर .एफ .ओ यांच्या खुर्चीवर बसून वन विभागातील सरकारी कम्प्युटर वापरणे व गोपनीय सरकारी दस्तावेज वन विभागाच्या बाहेर नेणे व गोपनीय माहितीचा बाहेर दुरुपयोग करणे या सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या कार्यरत असलेल्या आर एफ ओ दिनेश पडोळ साहेब यांनी स्वतःची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मला समाधानकारक उत्तर मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.

अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून वनमजूर काम करतोय तर मंग RFO कार्यालयाला दांडी मारतात की काय?असा नवा सुर पुढे येतांना दिसत आहे. महत्वाच्या सरकारी कागदपत्रांची हेराफेरी झाली तर जबाबदार कोण?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जळगाव जामोद तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा उद्घाटन संपन्न

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव जामोद तालक्यातील येनगाव,मराखेड खुर्द, मराखेड बु. जळगाव जामोद, येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली ०८ ऑक्टोंबर रोजी मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड , संजू भाऊ पळसकार राज्य उपाध्यक्ष, प्रतीक लोखंडकर जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, शिवचरण पाटील जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना राहुल चोपडे जिल्हा सचिव विद्यार्थी सेना, अकोला जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ,यांच्या हस्ते

जळगाव जामोद तालुक्यामध्ये येनगाव,मराखेड खुर्द, मराखेड बु. जळगाव जामोद, येथील शाखेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी , तालकाध्यक्ष राजूभाऊ राऊत. तालुका उपाध्यक्ष सुरेश पोहरे तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना आनंद सपकाळ शहराध्यक्ष नागेश भटकर, शहर संघटक वैभव येनकर, रजेद्र कुळकर्णी,
शाखा मडखेड खुर्द गनेश्वर. प्र. सित्रे शाखा अध्यक्ष.नारायण सु. खडसान,शाखा उपाध्यक्ष.

गणेश देते. कोषाध्यक्ष. सचिव.स्य:- मुकुंदा अत्तरकार, आकाश काळे, भिकाजी पिंपळकार, भागवत कडा गोपाल काळे, निरंजन पोहरे, दिनकर जवंजाळ, अंबादास चव्हाण.
शाखा मडखेड बु.येनगाव शाखा रामभाऊ दाभाडे
शाखा अध्यक्ष श्री. रामहरी भारसाकडे शाखा उपाध्यक्ष श्री.बाबुराव सिरसाट शाखा सचिव. प्रकाश सरदार शाखा कोषाध्यक्ष श्री.तेजराव दाभाडे विभाग प्रमुख,श्री. सुनिल सिरसाट विभाग अध्यक्ष,
उपस्थित होते. यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मदनरजे यांनी गाव तिथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे.

येणाऱ्या काळात मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सन्माननीय राजसाहेब यांचे आदेशाने निवडणुक लढण्यासाठी मनसे ताकद लावणार विठ्ठलभाऊ लोखंडकार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभा निवडणूक संपूर्ण तयारी ताकदीने तयारी करत आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले

होऊ द्या चर्चा उबाठा चा राज्यभर कार्यक्रम ,वर्धा जिल्ह्यात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

0

 

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर होऊ धा चर्चा हा कार्यक्रम केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा भंडाफोड़ करने करिता राबविण्यात ये आहे त्याचा भाग म्हणून आज.

दिनांक ०६ / १० /२०२३ रोजी वर्धा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फ़त आर्वी विधान सभेतील तलेगाव शा पंत मध्ये होऊ धा चर्चा हा कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्ते म्हणून लाभलेले शिवसेना प्रवक्ते मा श्री अनीषजी गाढ़वे साहेब तसेच मा श्री सतीशजी हरड़े निरीक्षक वर्धा लोकसभा तथा सहसंघटक पूर्व विदर्भ त्याच बरोबर वर्धा जिल्हा समर्क प्रमुख तथा निरीक्षक वर्धा लोक सभा मा श्री नीलेशजी धुमाल साहेब वर्धा जिल्हा सह समर्क प्रमुख मा श्री रविकांतजी बालपांडे वर्धा जिल्हा प्रमुख मा श्री आशीषजी पांडे आर्वी विधान सभा संपर्क प्रमुख प्रफुलजी भोसले देवली पुलगांव विधान सभा संपर्क प्रमुक भालचंदजी देउरकर हिंगनघाट वी स संपर्क प्रमुख रुपेशजी कांबले वर्धा जिल्हा उप प्रमुख दशरथजी जाधव हा कायक्रम नानकसिंगजी बावरी तलेगाव यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

विधानसभेतील पदाधिकारी तथा सर्व सामान्य नागरिक व असंख्य शिवसेनिक कांनी चर्चेत भाग घेतला जय महाराष्ट्र

चहा पिताना झालेल्या मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0

 

विकी वानखेडे यावल

या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील गजबजलेल्या बोरावल गेट परिसरात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर ( वय ५५ वर्ष ) हे चहाच्या स्टॉलवर बसलेले होते.

या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होते. यातूनच रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) या व्यक्तीने चेष्टा मस्करी चालु असतांना त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात धनगर हे गंभीर जखमी झाले.

जख्मी अवस्थेत तात्काळ प्रभाकर धनगर यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे.

दरम्यान याच प्रकरणात रामा ढाके हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना दिव्यांग आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी मनीषा श्रीपाद खेडकर यांची निवड ..

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या दिव्यांग आघाडी च्या विदर्भ अध्यक्ष पदी अकोला येथील समाजसेविका मनीषा श्रीपाद खेडकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दिव्यांग महिला पुरुषांना रेल्वेमधून प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्या.

सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य विस्तार वाढविण्यासाठी समाजसेविका मनीषा श्रीपाद खेडकर यांची दिव्यांग आघाडीच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड झाल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी या पत्रकात म्हटले आहे

अनोळखी महिलांनी स्टेट बँक मध्ये माजी सैनिक असलेल्या खातेदाराच्या कापडी पिशवीतून पन्नास हजार रुपये केले लंपास ..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

घराच्या बांधकामासाठी स्टेट बँक शाखा शेगाव येथून एक लाख रुपये विड्रॉल करून कापडी पिशवी ठेवल्यानंतर बँक मॅनेजर सोबत चर्चा करीत असताना नजर चुकवून दोघ अनोळखी महिलांनी कापडी पिशवीतून पन्नास हजार रुपये चे बंडल लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोंबर च्या दुपारी तीन वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी दोन महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील रोकडिया नगर भागात राहणारे माजी सैनिक प्रभुदास अंबादास झाडोकार वय 46 वर्ष यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली

या तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रभुदास अंबादास झाडोकार माजी सैनिक यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने आज सहा ऑक्टोबर रोजी ते एसबीआय बँक शेगाव येथे एक लाख रुपये खाते क्रमांक 10 88 39 0 5 283 यामधून एक लाख रुपये काढले बँकेत च्या कॅशियरने पाचशे रुपयांच्या नोटेचे पन्नास हजार चे दोन बंडल त्यांना दिले सदर दोन्ही बंडल त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कापडी थैलीमध्ये ठेवले

ते बँकेचे असिस्टंट मॅनेजर कुठे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या काउंटर जवळ उभे राहिले त्यावेळेस दोन अज्ञात महिलांनी त्यांची नजर चुकवून थैली मधील पन्नास हजाराचे एक बंडल लंपास केले बँकेच्या बाहेर निघताना झाडोकार यांना त्यांची थैली फाटलेली आढळून आली त्यावेळी त्यांनी थैलीमध्ये पाहिले असता 50 हजाराची एकच बंडल त्यांना दिसून आले त्यांनी याबाबत असिस्टंट मॅनेजर कुठे यांना सांगितले असता बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पाहिले

असता त्यामध्ये बँकेमध्ये झाडोकार यांच्या जवळ उभे असलेल्या दोन अग्यात महिला वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यांनी फिर्यादीच्या कापडाची थैली मधून पैसे काढताना दिसून आल्या याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघा अज्ञात आरोपी महिला विरुद्ध अपराध क्रमांक 530 ऑब्लिक 2023 कलम 379, 34 भावी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकीकर बक्कल नंबर 12 44 करीत आहेत

जळगाव जामोद येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर वनमजूर दिमाखात स्वार…..!वनमजूराला कुणाचे आर्शिवाद?कारवाई शुन्य.

0

 

जळगाव:-शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानूसार सेवा नियमावली ठरवून दिलेली असतानाही आणि त्या नुसार कोणत्याही पदावरील व्यक्ती, अधिकारी आणि कर्मचारी आपआपल्या पदानुसार वर्तन आणि व्यवहार करीत असतात.

परंतू जळगाव जामोद मध्ये या नियमावलीची पायमल्ली झाल्याचे चक्क दिसून आले.झाले असे की येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या चक्क खुर्चीवर त्यांच्यास कार्यालयातील वन मजुर खुर्चीवर बसून, तेथील गोपनीय माहितीचे आदानप्रदान झाल्याची चर्चा असतांना सुद्धा कार्यवाही दडपली जात आहे.त्यामुळे सदर वनकर्मचारी यांच्यावर कुणाचे आशिर्वाद आहे की यांनी नवीन प्रताप घडविल्याची बाब पुढे आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव व पदभार केव्हा पासून सांभाळण्यात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.

माननीय श्री कुमार स्वामी डि. एफ .ओ साहेब आपल्याकडून आशा करतो की जळगाव जामोद रेंज हि सध्या किशोर पडोळ यांच्याकडे चार्ज असून त्यांच्या खुर्चीवर बसून वन मजूरची पद नाही.

अशा माणसाला आर .एफ .ओ यांच्या खुर्चीवर बसून वन विभागातील सरकारी कम्प्युटर वापरणे व गोपनीय सरकारी दस्तावेज वन विभागाच्या बाहेर नेणे व गोपनीय माहितीचा बाहेर दुरुपयोग करणे या सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या कार्यरत असलेल्या आर एफ ओ पडोळ साहेब यांनी स्वतःची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मला समाधानकारक उत्तर मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.