Home Blog Page 174

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या घाटकोपर मुंबई विभागीय अध्यक्षपदी रत्ना अरुण पाटोळे

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या घाटकोपर मुंबई विभागीय अध्यक्षपदी घाटकोपर येथील समाजसेविका रत्ना अरुण पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या महानगरी मुंबई मधील रेल्वेतून दररोज हजारो महिला प्रवासी प्रवास करतात महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी व

मुंबई घाटकोपर परिसरात राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य वाढविण्याच्या उद्देशाने समाजसेविका रत्नाताई अरुण पाटोळे यांची घाटकोपर मुंबई विभागीय राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना अध्यक्षपदी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी निवड केली आहे रत्नाताई पाटोळे यांची निवड

झाल्याबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

प्रदूषण नियंत्रण विभागाला गोपाल तायडे यांचे निवेदन. नगर परिषदेच्या दुर्लक्षते मुळे म्हाडा कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहरात जीवन प्राधिकरण विभागा मार्फत भूगटार योजना राबविण्यात आली आहे. डॉ.अण्णा भाऊ साठे ( म्हाडा कॉलनी ) येथील भूगटारीचे काम म्हाडा विभागा कडून करण्यात आले आहे. कॉलनीतील संडास मल विसर्जन व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्या मुळे मोठया प्रमाणात टॉयलेट चेंबर चॉकअप होत असतात.

प्रत्येक सदनिकेला स्वातंत्र्य टॉयलेट चेंबर असायला पाहिजे होते किंवा 14 सदनिका मिळून एक मोठे सेफ्टी टॅंक तरी असायला हवे होते. परंतु असे न केल्याने या 14 सदनिकेचे संडास मल भुगटारीच्या चेंबर मध्ये उतरते निमूळत्या पाईप असल्याने संडास मल पुढे जात नसल्याने तिथेच अळकून राहते त्या मुळे मल युक्त घाण पाणी चेबर च्या वरतून वाहत असून.

त्या मुळे संपूर्ण कॉलनीत दुर्घधी पसरली आहे. आणि मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होता आहे.ही समास्या पाच वर्षांपासून चालू आहे.या घाण दुर्गंधी प्रदूषणा मुळे कॉलनीतील केत्येक नागरिक आजारी पळत आहेत.

नागरिकांनाच्या आरोग्यास मोठा धोका उदभवाला असून स्थानिक नगर परिषदेला वारंवार निवेदने, आंदोलने करून ही भुगटार चेंबर व घाण कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येत नाही. भुगटार चेंबर चे काम जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात आले होते. त्यांनी कॉलनीतील भुगटार चेंबर नगर परिषदेला शेगावला हँडवर्क (हस्तरीत ) केले आहे. त्या मुळे कॉलनीतील भुगटार चेंबर साफ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. परंतु नगर परिषद जाणीव पूर्वक

कॉलनीतील भुगटार चेंबर साफ करणे तसेच घाण कचरा साफ सफाई संदर्भात कोणत्याच प्रकारचे लक्ष देत नसल्याने कॉलनीत प्रदूषण होत आहे. कॉलनीतील भुगटार चेंबरचे मोठे पाईप लाईन टाकून 14 सदनिके मिळून एक टॉयलेट चेंबर सेफ्टी टेंक देण्यात यावे कॉलनीतील ईतर घाण काचारा चे ही योग्य रित्या व्यवस्थापन कारण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी या समास्या बद्दल तीव्र आंदोलन करेल.असा ईशारा गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला आहे.

वाढीव मालमत्ता कर आकारण्याची हरकतीसाठी मुद्दत वाढ करा, -किरण बाप्पू यांची मागणी!

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव येथील नगर पालिकेने केलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणीवर हरकती घेण्यासाठी साठ दिवसा मुदत वाढ देण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष बापू देशमुख यांनी केली आहे पालिकेने वाढीव मालमत्ता करा बाबा 2023 2024 ते 2027 पर्यंत मालमत्ता करामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केली.

असून त्याबाबत 30 सप्टेंबर रोजी वृत्तपत्र प्रसिद्ध करून चार सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत हरकती घेण्याची मुदत दिली आहे त्यानंतर येणाऱ्या तक्रारी वर्गातीच्या विचार केला जाणार नाही असे स्पष्ट उल्लेख केला होता परंतु आता नगरपालिका प्रशासन कडून उपलब्ध तोंडी माहिती अनुसार तक्रारी वर हरकत घेण्याची मुदतवाढ 30 ऑक्टोबर वाढविण्यात आली आहे असे सांगण्यात येत आहे.

परंतु ही वाढीव मुदत कोणत्या नियमानुसार व कोणत्या अधिकारात वाढविण्यात आली हे मात्र सांगण्यात आले नाही नगरपालिकाला जर मुद्दत वाढण्याचे असेल तर तशा प्रकारचे शुद्धिपत्रक तयार करून प्रसिद्ध पत्र किंवा जाहिरात द्वारा प्रसिद्ध करा अशी मागणी शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष किरण बापू देशमुख यांनी मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषद शेगाव यांच्याकडून केली आहे

कर्जबाजारी ला कंटाळून लोखंडा येथील 38 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..

0

 

रत्नाताई डिक्कर खामगाव प्रतिनिधी

खामगाव: कर्जबाजारी ला कंटाळून खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील 38 वर्षीय मोहन किसना लोखंडकर नावाच्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील मोहन किसना लोखंड याला बँक ऑफ महाराष्ट्र खामगाव कडून कर्ज तडजोडी आणि कर्जाची थकीत रक्कम 55 हजार 560 रुपये भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती

निसर्गाचा लहरीपणा नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोखंडा येथील शेतकरी मोहन किसना लोखंडकर 38 वर्षे याने थकीत कर्ज नोटीस मिळाल्यामुळे शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुरुस्ती झाली आहे वृत्त शेतकरी मोहन लोखंडकार याला एक मुलगा एक मुलगी असे कुटुंबीय आहे

मुख्यालयी हजर राहत नसलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करा भाजपच्या देवानंद सानप यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

0

 

प्रतिनिधी- सुनिल वर्मा

लोणार तहसिल अंतर्गत येत असलेल्या बिबी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी दादाराव खरवाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी भाजपचे कायम निमंत्रीत जिल्हा सदस्य देवानंद सानप यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखि तक्रार केली आहे.

तक्रारीत असे म्हटले आहे की मंडळ अधिकारी दादाराव खरवाल हे त्यांच्या मुख्यालयी बिबी येथे कधीच हजर नसतात ते सतत तालुक्याच्या ठिकाणी लोणार येथे असतात त्यामुळे बिबी मंडळातील सोळा गावातील शेतकऱ्यांना सतत चकरा माराव्या लागतात तरी पण मंडळ अधिकारी मुख्यालयी दिसुन येत नाही त्यामुळे आर्थिक, मानसिक, नुकसान होत आहे अनेक शेतकरी मंडळ अधिकारी यांना कामासंदर्भात फोन करतात तर मंडळ अधिकारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलतात काय कराचं करुन घ्या अशा धमक्या देतात.

बिबी महसूल मंडळातून खडक पुर्णा नदी जाते अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूक केल्या जाते सदर उपसा मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादने लक्ष्मीदर्शन देऊन घेऊन सुरु असल्याची खमंग चर्चा सुरु आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीच्या नोंदी दादाराव खरवाल यांनी हेतुपुरस्सर पैसे न दिल्यामुळे थांबल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या सोलर पंप च्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे विहिरीची नोंद नसल्यामुळे विद्युत कनेक्शन सुद्धा मिळत नाही त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे याला मंडळ अधिकारीच जबाबदार असुन अशा मुजोर मंडळ अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देवानंद सानप यांनी केली आहे.

या संदर्भात लोणार चे तहसीलदार जोशी यांना सुध्दा या प्रकरणाची माहिती दिली असून काय कारवाई करतात याकडे बिबी मंडळातील सोळा गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

नवभारत साक्षरता कार्यक्रमातून “सर्वांसाठी शिक्षण” असाक्षरांसाठी ठरणार आशेचा किरण….!

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-दिनांक ४,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षण संचालनालय(योजना)पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ आक्टोबर २०२३ ते दिनांक ६ आक्टोबर २०२३ या कालावधीत सुरू असलेले नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुका सुलभकांचे “जिल्हा स्तरीय प्रशिक्षण” हे अतिशय उत्साहात आणि आनंदात कमलताई मुनघाटे हायस्कूल गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी प्राथमिक विवेक नाकाडे जिल्हा परिषद गडचिरोली,शाळेचे प्राचार्य सागर मशाखेत्री हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणाला मुख्य सुलभक म्हणून अधिव्याख्याता पुनीत मातकर,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विनायक लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 36 प्रशिक्षणार्थींना कृतीयुक्त गटपद्धतीने,भुमिकाभिनय,आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे सुरू आहे.

प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०,निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान,उजास प्रवेशिका भाग एक ते चार मधील घटक,उल्लास ॲप्स, स्वयंसेवक मार्गदर्शिका, स्वयंसेवकांची भूमिका,कुटुंब आणि शेजार,संवाद,आपली संस्कृती,आपल्या अवतीभवती, आहार आणि आरोग्य,मतदान, कायदेविषयक माहिती,आपत्तीचे प्रकार व स्वरूप,काळानुरूप बदलत्या गोष्टी,प्रवास,मनोरंजन,वित्तीय साक्षरता व डिजिटल साक्षरता या थीमच्या माध्यमातून अधिव्याख्याता पुनीत मातकर, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विनायक लिंगायत यांच्या सुलभनातून प्रशिक्षण दिल्या जात आहे.

प्रशिक्षणाला सर्व प्रशिक्षणार्थी अतिशय उत्साहाने,हिरीरीने व सकारात्मक दृष्टीने सहभागी होऊन प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सहकार्य करीत आहेत.प्रशिक्षणात तालुकास्तर केंद्र स्तर आणि शाळा स्तर प्रशिक्षणाचे नियोजन दिल्या जात आहे.

सोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले,शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्या नियंत्रणात प्रशिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे.

चक्क वनमजूर बनला वनपरिक्षेत्र अधिकारी?जळगाव जामोद येथील अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर दिमाखात स्वार…..!

0

 

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण 

जळगाव:-शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानूसार सेवा नियमावली ठरवून दिलेली असते आणि त्या नुसार कोणत्याही पदावरील अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पदानुसार वर्तन आणि व्यवहार करीत असतात.

परंतू जळगाव जामोद मध्ये या नियमावलीची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.झाले असे की येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या चक्क खुर्चीवर बसून वनकर्मचारी यांनी नवीन प्रताप घडविल्याची बाब पुढे आली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव व पदभार केव्हा पासून सांभाळण्यात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.

माननीय श्री कुमार स्वामी डि. एफ .ओ साहेब आपल्याकडून आशा करतो की जळगाव जामोद रेंज हि सध्या किशोर पडोळ यांच्याकडे चार्ज असून त्यांच्या खुर्चीवर बसून.

वन मजूरची पद नाही अशा माणसाला आर .एफ .ओ यांच्या खुर्चीवर बसून वन विभागातील सरकारी कम्प्युटर वापरणे व गोपनीय सरकारी दस्तावेज वन विभागाच्या बाहेर नेणे व गोपनीय माहितीचा बाहेर दुरुपयोग करणे या सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या कार्यरत असलेल्या आर एफ ओ पडोळ साहेब यांनी स्वतःची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मला समाधानकारक उत्तर मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

0

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

मुंबई, दि. ४ : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विमा कंपन्यांना दिले.

वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त आहे. त्याला दिलास देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांनी देखील याकाळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याची भूमिका संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बळीराजाला दिलासा म्हणून राज्य शासनाने एक रुपयामध्ये पीक योजना सुरू केली आहे. अशी विमा योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगत विम्यापोटी शेतकऱ्यांनी भरायचा हिस्सा राज्य शासन अदा करत आहे. यामागची शासनाची भूमिका विमा कंपन्यांनी समजून घेतली पाहिजे. विमा कंपन्यांनी प्रस्तावांवर जे आक्षेप घेतले आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासून घ्यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी, असे मंत्री श्री. मुंडे, श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. खरीप २०२३ मध्ये प्रधानमंत्री पिकविमा योजनेसाठी १ कोटी ७० लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. ११३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनिव्हर्सल सोम्पो, युनायटेड इंडिया, चोलामंडलम एम एस. भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी एगो, रिलायन्स जनरल या विमा कंपन्या राज्यात कार्यरत आहेत.

0000

एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय युवतीची घरातून बाहेर बोलावून हत्या…

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवतीच्या घरातून तिला बाहेर बोलावून हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे.

या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही तर एकतर्फी प्रेमातून हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यामध्ये आहे.

वर्ध्याच्या नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे पोहचले सोबत असलेल्या दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला लावलीय. रात्रीला युवती घराबाहेर अंगणात येताच मागावून आलेल्या युवकांनी चाकूने गळ्यावर वार केले.

जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले,पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे. अंकिता सतीश बाईलबोडे असे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवतीचे नाव आहे. चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करीत पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दहेगाव गोसावी येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले होते. या थरारक घटनेमुळे गावकार्यांमध्ये चांगलाच रोष आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते, राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे.

खामगाव.शहरातील तीन दुकानांना आग; लाखोंचा माल जळून खाक

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव शहरात आज, बुधवारी लागलेल्या आगीत ३ दुकानांतील लाखोंचे साहित्य खाक झाले. तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग नियंत्रणात आली. टिळक मैदान परिसराला लागून असलेल्या एका दुकानाला प्रारंभी आग लागली. पहाता पहाता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या दुकानालाही आग लागली.

टिळक मैदान परिसरातील दुकानांच्या पाठीमागे कचऱ्याचे ढिगार असून या कथन्याला काहीजण आग लावून पेटवून बेतात. त्यातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

आहे. सुहाग बंगल्स अंड कॉस्मेटिक ज्वेलरी या दुकानाला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बाजूच्याच मेडिकलच्या दुकानाला ही आग लागली. खामगावसह शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.