Home Blog Page 175

 रेल्वे येथील रेल्वे ट्रॅक वरून होणारा पुलाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले…

0

 

त्या पुलाचे बांधकाम 15 दिवसात सुरू करा अन्यथा सिंदी रेल्वे येथील नागरिक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार…
……………………………

कांढळी ते सिंदी रेल्वे रोडचे काम संथ गतीने सुरू असल्याने ते काम वेगाने करा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सिंदी रेल्वे येथील नागरिकांनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…

 

सिंदी रेल्वे :- सिंदी रेल्वे शहरात रेल्वे उडाण पुलाच्या बांधकामाची मागणी अनेक दशकापासून होत आहे तसेच त्या पुलाची नितांत गरज आहे. त्या अनुषंगाने रेल्वे ट्रॅक वरील पुलाच्या कामाची सुरुवात सन २०१४ रोजी झाली आहे. परंतु आज पर्यंत सदर काम सुरुच असून या कामाला नऊ वर्षांचा कालावधी झालेला आहे व अजून पर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या रखडलेल्या अपूर्ण पुलाच्या कामामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सद्यास्तिथीत पावसाळा सुरु असल्याने पावासाचे पाणी पुलाखालच्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात साचून राहते. त्यामुळे सर्वत्र चिखल झालेला असून या चिखलामुळे अनेक लोक त्या ठिकाणी घसरुन पडले आहे. तसेच सदर पुलाचे काम हे रेल्वे ट्रॅक वरुन असल्याने या पुलाचे बांधकाम त्वरीत होणे गरजेचे आहे कारण की, रेल्वे क्रॉसिंग असल्याने रेल्वेचे ये-जा होत असतांना रेल्वे क्रॉसिंग वरील गेट बंद असल्याने अनेक लोकांनी आपातकालीन परिस्थितीत जीव गमाविला आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंगचे गेट खोलण्याकरीता नागरीकांना अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागते. त्यामुळे अनेकदा एखाद्या ठिकाणी वेळेत न पोहचल्यामुळे आर्थिक व प्रतिष्ठेची हानी होत असते.

तसेच सेलडोह ते सिंदी व सिंदी ते कांढळी या रोडचे बांधकाम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सिंदी ते कांढळी पर्यंत रोड हा ५ किमी पेक्षा अधिक बनवायचा असून सदर रस्त्यावर मुरुम, माती व गिट्टी या व्यतिरिक्त काहीच नसतांना घसरत असते. तसेच उन्हाळ्यात याच रस्त्याने कोणतेही वाहन ये-जा करीत असतांना मुरुम व माती मुळे धुळ उडत असते. या धुळी मुळे अनेक नागरीकांना दम्या सारखे आजार झालेले आहे.

कळमना, मारडा गावातील नागरीकांना व विद्यार्थ्यांना शाळा व बाजारपेठे करीता सिंदी रेल्वे शहरातच यावे लागते. त्यामुळे या रोडचे काम लवकरात लवकर होण्याची नितांत गरज आहे. या आधी सुद्धा दि. २२ आगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.वरिल दोन्ही विषयांकीत मुद्यांवर गांर्भियाने लक्ष देवून येत्या १५ दिवसात मुद्दे मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सिंदी रेल्वे येथील समस्त नागरीक रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार व यांची संपूर्ण जबाबदारी ही शासन / प्रशासनाची राहील अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,
माजी नगराध्यक्ष बबनरावजी हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोंटिंग, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, अशोकबाबू कलोडे, सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, प्रा.अशोक कलोडे, वसंतराव सिरसे, मोहनराव अंबोरे, प्रा.प्रभाकर कलोडे, रा.यु.शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील शेंडे, दिनेश घोडमारे, अफजल बेरा, गुड्डू कुरेशी, बंटी बेलखोडे, जगदीश बोरकर, हेमराज झाडे, सौ.रुपेशा झाडे, भारत हिवंज, रवी राणाजी,प्रमोद झाडे, विजय मुडे, लक्ष्मण झाडे, शरद झाडे, गणेश मसराम, राहुल तमगिरे, रामाजी घनवटे,गजानन डंभारे आदी उपस्थित होते…

सिंदी रेल्वे शहरात रेल्वे उडाण पुलाच्या बांधकामाची मागणी अनेक दशकापासून होत आहे. सन २०१४ रोजी सदर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली.परंतु आज पर्यंत सदर काम सुरुच असून या कामाला नऊ वर्षांचा कालावधी झालेला आहे व अजून पर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या रखडलेल्या अपूर्ण पुलाच्या कामामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच सेलडोह ते सिंदी व सिंदी ते कांढळी या रोडचे बांधकाम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सिंदी ते कांढळी पर्यंत रोड हा ५ किमी पेक्षा अधिक बनवायचा आहे. नागरीकांना व विद्यार्थ्यांना शाळा व बाजारपेठे करीता सिंदी रेल्वे शहरातच यावे लागते. त्यामुळे या रोडचे काम लवकरात लवकर होण्याची नितांत गरज आहे.

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सिंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

 

सिंदी : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला सिंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंदी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ, सुंदर, निर्मल व आरोग्यदायी गावे निर्माण होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही ”सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘एक तास एक साथ’ स्वच्छतेसाठी श्रमदान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला सिंदी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींसह, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे यावेळी हात राबत या श्रमदानातून बापूंना जयंतीनिमित्त स्वरांजली वाहण्यात आली. सर्वप्रथम उपस्थितांनी सकाळी ९.३० वाजता स्वच्छतेची शपथ प प्रतिज्ञा घेतली.

त्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत सिंदी शहरातील बस स्टँड आणि मैन मार्केट परिसर येथे श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाला नगर परिषद सिंदीचे मुख्याधिकारी श्री. मधुकर ठाकरे आणि सर्व अधिकारी व कर्मचारी, बचत गटातील महिला व नगर परिषद शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

मुख्याधिकारी श्री. मधुकर ठाकरे यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली. सर्वांच्या उपस्थितीत महात्मा गांधी व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला हारार्पण करून स्वच्छतेचा संदेश दिला.

श्री सप्तश्रुंगी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिम्नास्टीक स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड.

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव दि 29 सप्टे 2023
येथील जिल्हा स्तरीय जिन्मास्टीक क्रीडा स्पर्धा श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या स्पर्धा मध्ये स्कूलचा विध्यार्थी रुद श्याम खोंड वर्ग ६ वा, (आर्टिस्टिक ) स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी झाला

तसेच ( अक्रोबॅटीक ) स्पर्धेत कु. गौरी शांताराम खारोड वर्ग ९, कु. इकार मोहमद अमीन मेमन वर्ग ७ वा, कु. तन्वी विठ्ठल गंग्रस वर्ग ६ वा, कु. समीक्षा गणेश बिडवे वर्ग ६ वा, कु. प्रगती गोपाळ वाकडे वर्ग ७ ह्या स्पर्धक जिल्हा स्तरावरून विजयी होऊन त्यांची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. सर्व विजयी स्पर्धकाचे अभिनंदन संस्थेच्या संचालिका सौ उज्वला अनंत भटकर व प्राचार्य पी. यु. दळी यांनी केलेलं आहे.

ग.भि.मुरारका महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.स्थानिक ग. भी. मुरारका कला, वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार दिनांक o3 ऑक्टोंबर 2023 रोजी “सूत्रसंचालन कसे करावे” या विषयावर चर्चासत्राच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयामध्ये मध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडे बनवून चालत नाही,

केवळ पुस्तक वाचून व पास होण्याला काही अर्थ नाही, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाची माहिती असणे आवश्यक आहे व ती व्यक्त करायला लावणे ही काळाची गरज आहे हा स्पर्धेचा काळ आहे . महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे केवळ सर्टिफिकेट बोलते न होता विद्यार्थी बोलता झाला पाहिजे. विद्यार्थी जे शिक्षण घेतो ते विचार त्याला व्यक्त करता आले

पाहिजे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी करून घेतल्या गेले.या चर्चासत्रामध्ये “सूत्रसंचालन कसे करावे” या विषयावर बीकॉम भाग -1 मधील कु साक्षी पहुरकर , दामिनी मिरगे, विवेक मिरगे ,

अतुल सहस्रबुद्धे ,प्रांजली म्हसाळ, विशाल झाडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत विषयावर आपले विचार व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन कसे करावे हे शिकून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सुंदर फलक लेखन कु साक्षी पहुरकर हिने केले.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.गणेश वाघ यांनी केले केले.

सुटाळा व चिखली आमसरीशिवारातून ७७ हजाराची दारू जप्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव .जिपो अधीक्षक सुनिल कडासणे, एएसपी अशोक थोरात व डीवायएसपी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओच्या पथकाने सुटाळा बु. व चिखली आमसरी शिवारातील हॉटेल पुनमवर छापा मारून ७७ हजार रूपयाची विनापरवाना देशीविदेशी दारू जप्त केली. हॉटेल पुनम येथून हरीचंद्र विष्णु खिरडे रा. आमसरी याच्या

ताब्यातून ५ हजार ७४० रूपयांचा देशी व विदेशीदारूचा साठा जप्त केला. तर सुटाळा येथील श्रीकृष्ण नगर मधील रमेश लालसिंग मोरे याच्या ताब्यातून ७१ हजार १६० रूपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. सदर कारवाई पथकातील पोउपनि मनोज वासाडे, पोहेकाँ. सुधाकर थोरात, पोका विशाल कोळी, महिला पोकाँ. पुजा कडाळे यांनी केली.

शेतात रक्षा विसर्जन अन कर्मकांडाला मूठमाती!- अभयसिंह मारोडे

0

 

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो 

जितेपनी नाही अन्न। मेल्यावर पिंडदान काय कामाचे.

या तुकोबांच्या विचाराला अनुसरून मी माझ्या वडिलांना त्यांच्या मृत्यूनंतर आदरांजली वाहिली.माझे वडील 28 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास निधन झाले.वडील तसेही सत्यशोधक विचारांचे आणि तोच त्यांचा वैचारिक वारसा आमच्या कुटुंबात वृद्धिंगत होत गेला.आणि म्हणूनच त्यांचा मृत्यू सोहळा सकारात्मक पद्धतीने करण्याच्या प्रयत्नात होतो.

आणि सामूहिक कुटुंबातील सर्वांचं यावर एकमत झालं की अण्णा(माझे वडील)च तेरवी करायची नाही.आणि अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सावटण्याच्या दिवशी अण्णांची रक्षा/अस्ति ह्या आपल्याच शेतशिवारात टाकायच्या.

आणि त्याच दिवसापासून कुठल्याही प्रकारचा विधी न करता आपल्या आप्तेष्टांना सुतक या संकल्पनेतून बाहेर पाडायचे.मला वाटते ही बाब फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तर इतरही समाज बांधवांनी अंगिकारून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी होण्यासाठी प्रयत्नरत राहावे.

आमच्या एकत्रित कुटुंबातील सर्व आत्या, आमच्या बहिणी ,घरातील सर्व सुना यांच्या सोबत आम्ही यासंदर्भात विचारविनिमय करून आम्ही हा निर्णय अंगिकारला व तो अंमलात आणला.आणि सामाजिक प्रबोधन करतांना ते आधी आपल्या घरातून आणि आपल्या कृतीतून जर आपण सुरू केले तर त्याला किंमत प्राप्त होते.अन्यथा लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपलं कोरड पाषाण असे व्हायला नको.

जिवंतपणी अण्णा ची काळजी संपुर्ण कुटुंबाने जिव्हाळ्याने घेतली त्यात प्रामुख्याने माझी आई,दोन्ही काकाकाकू,आमच्या आत्या,आतेभाऊ आते बहिणी,मामेभाऊ,आम्ही सर्व 5 भाऊ ,आमच्या 7 बहिणी जावई आणि आमच्या परिवारातील 5 सुना ह्यांचा समावेश आहे.अण्णाने आपली इच्छा प्रकट करावी आणि ह्या सर्वांनी ती आपसूकच पूर्ण करावी.तब्येत अंत्यत खालावलेली असून पण अण्णा गेली सात महिने अण्णा जे आपल्या सोबत होते ते याच सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच आणि मला वाटते सामुहिक/ एकत्रित कुटुंबाचा सर्वात हा सर्वात मोठा impact आहे.

अण्णाचे शेतीवर खूप प्रेम म्हणूनच त्यांचा अंत्यविधी शेतात पार पाडला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अस्ति आम्ही आमच्या शेतात टाकल्या कारण एका शेतीवर प्रेम असलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या शेता एवढे पवित्र स्थळ कोणतेच असू नाही शकत. आणि ज्या ठिकाणी अण्णाना दहन दिलं त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडं लावली.

अण्णांना घरातील सर्व महिला वर्गाने खांद्या दिला त्यामध्ये सुना,बहिणी,आतेबहिणी यांचा समावेश होता.
आमच्या मारोडे कुटुंबाने माझ्या बाबांचा मृत्यू हा एक सोहळा म्हणून साजरा केला.

समस्त समाजव्यवस्थेत काम करणाऱ्या मंडळींना आमचे हे च सांगणे राहील की,घरातील व्यक्तीच्या मृत्य अगोदरच त्यांची सर्व प्रकारची काळजी घ्या आणि मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा विधी न करता त्या नंतरच्या सर्व कर्म कांडाला मुठमाती द्यावी.

 

महीला काँग्रेस कडून महात्मा गांधी जयंती निमित्त सत्याग्रह मार्च

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.आज परमपूज्य महात्मा गांधी व भारत देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक शेगाव सईबाई मोठे रुग्णालय समोर अग्रवाल बिछायत केंद्र येथे जिल्हा महीला कॉग्रेस व शेगाव शहर महिला कडून अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली अध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्या नेतृत्वात ,

शेगाव शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष कविता राजवैदय यांनी सत्याग्रह मार्च चे आयोजन केले होते सर्वप्रथम सर्व महिला काँग्रेस बुलढाणा जिल्हा अध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला व सर्व महीलांनी पुष्प वाहून अभिवादन केले.

आज देशात वाढती महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचार आज सतत 150 दिवसापासून मणिपूर येथे वाढत असलेले महिलांवरील अत्याचार हे सर्व काही अन्यायकारक असून देशांमध्ये शांतता नांदावी कुठलेही वाद विकोपाला न जाता सर्व काही शांततेच्या मार्गानेच चालले पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे.

आरक्षणाचा नावाखाली जनतेला मूर्ख बनवणाऱ्या या हुकूमी तानाशाही सरकारच्या विरोधात शेगाव शहर महिला काँग्रेस व जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज एक दिवसीय “सत्याग्रह मार्च “महात्मा गांधीजींचे बॅनर हातात घेऊन सईबाई मोटे रुग्णालय पासुन .. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन गांधी चौक मध्ये हुतात्मा स्मारक पर्यंत काढण्यात आला

यावेळी मंगलाताई पाटील,मीराताई माळी सुनीता ताई कलोरे प्रणिता धामंदे कल्पना पाटील कविता राजवैदय स्नेहलता दाभाडे शीलाताई सोनेकर प्रतिभा धनोकार अनिता मांजरे पार्वती काळे दिपाली धनोकार वंदना वानखडे सुकेशनी सावधेकर निर्मला अंबुसकर आशा देशमुख यांची उपस्थिती होती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिखली ऐथे शैकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

0

 

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या वतीने शासकीय विश्रामगृह चिखली येथे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या वर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाए पक्षांमध्ये असंख्य कार्यकर्तेनी पक्ष प्रवेश करण्यात आले

या वेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई बोले कि रिपब्लिकन पक्षाचे गावा गावा मध्ये शाखा लावा व घरा घरा मध्ये कार्यकर्ते तयार करा. आपला जो खरा पक्ष आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्ष आहे त्याचे आपण काम कतो तो अभिमान आहे

जोकोनी संविधान बदलून टाकाचा विचार करेल त्याला बदलू टाकन्याची ताकत आमच्या आहे

चिखली तालुक्याचा वतीने आपल्या पक्षांवर विश्वास ठेवून जो खरा रिपब्लिकन पक्षाचा पक्ष आहे तो खरा डॉ बाबासाहेबांच्या पक्ष आहे त्या पक्षांमध्ये असंख्य नागरीकांनी प्रवेश केला त्या चे अभिनंदन करण्यात आले

शासकीय विश्रामगृह येथे पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई होते व तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या नेतृत्व मध्ये कार्यक्रम घडुन आनला व युवा ता अध्यक्ष फकिरा निकाळजे ता उपअध्यक्ष अम्रपाल वाघमारे शहर अध्यक्ष राजेश बोर्ड मयुर मोरे विशाल गवई महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा विद्याताई इंगळे आशाताई कस्तुरे ताई व असंख्य कार्यकर्ते व पदधीकारी उपस्थित होते

.

भारत मुक्ती मोर्चाचे वरवट बकाल येथे कडकडीत बंद आंदोलन

0

 

भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेना,राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चा यांच्या द्वारे 2 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते.

यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजित बांगर यांच्या नेतृत्वामध्ये संग्रामपूर तालुक्यातील मध्यभागी असलेल्या वरवट बकाल येथे विविध मागण्यांसाठी सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.

१) गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात.
२) महाराष्ट्र राज्यात 62 हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आरएसएस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात.

३) शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठबिगारांचा महाराष्ट्र करणाऱ्या आरएसएस/भाजप सरकारच्या धोरणा विरोधात.
४) ओबीसींची जात निहाय जनगणना करणे व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांच्या समर्थनात.

५) बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर बडवे ब्राह्मणाच्या स्वाधीन करणाऱ्या आरएसएस/भाजपच्या षडयंत्राच्या विरोधात.
६) बहुजन महापुरुषांचा,संविधान व राष्ट्रप्रतीकांचा अपमान करणाऱ्या देशद्रोही आतंकवादी दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंद चे आव्हान वरील सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.

ह्याच मुद्द्यांना समर्थन म्हणून संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल या ठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलनामध्ये बहुजन समाजातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, सिद्धार्थ तायडे, दयावंत इंगळे तसेच भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हा महासचिव जगदीश कोकाटे,राहुल नितोने,रवि नितोने,पंकज वानखडे,महेंद्र इंगळे, असंघटित कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष करुणानंद तायडे, सचिन कोकाटे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष मिलिंद भटकर प्रदीप निंबाळकर नाना तायडे संजय सोनवणे,संतोष भारसाकडे व भारत मुक्ती मोर्चाचे

कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने बंद आंदोलनामध्ये सहभागी होते यावेळी महाराष्ट्र बंद हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी दुकानदारांनी आपली आस्थापने कडकडीत बंद ठेवून सहकार्य केले व पोलीस प्रशासनाने कडकडीत बंदोबस्त तैनात करून आंदोलकांना सहकार्य केले त्याबद्दल या सर्वांचे आभार मानण्यात आले.

ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान व जेष्ठ नागरिकांचा सत्कार ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपच्या वतीने

0

 

रत्नाताई डिक्कर खामगाव प्रतिनिधी

खामगाव.1 ऑक्टोम्बर 2023 रोजी ओंकारेश्वर स्मशानभूमी येथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत संपुर्ण परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

सोबतच आज जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्याने छत्रपती शिवाजी नगर भागातील सामाजिक कार्य करणाऱ्या जेष्ठ व्यक्तीचा सत्कार ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

यावेळी जेष्ठ नागरिक तथा सत्कारमूर्ती श्री. प्रभाकरराव केवारे, श्री. विठ्ठलराव पऊळ, श्री. शिवाजीराव शिंदे, श्री. तुळशीरामजी मुळीक, श्री. महादेवराव जोगदंड, श्री. शिवाजीराव राऊत, श्री. लक्ष्मणराव गाडे, श्री. गणपतराव लांडगे, उपस्थित होते.

स्वच्छता अभियान व सत्कार कार्यक्रमासाठी ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपचे सदस्य सर्वश्री, नरेंद्रभाऊ मावळे, शुभाषभाऊ शेळके, सुरेशभाऊ घाडगे, राजेश मुळीक, संजय शिंदे, शैलेश सोले, गजानन मुळीक, रवींद्र शिंदे, राजू जोगदंड, श्याम नळकांडे, नितीन केवारे, नितीन महाडिक, विपीन गरड, गोविंद पवार, मंगेश पोकळे, आनंद पवार, योगेश बिंगले, तेजस मुळीक, सौरभ महाडिक, विराट मुळीक, शौर्य नळकांडे यांनी परिश्रम घेतले..