Home Blog Page 176

संग्रामपूर येथील शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

0

 

प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती आहे त्यामुळे प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे आणि त्या दृष्टीकोणातूनच पंचायत समिती संग्रामपूर चे गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके यांच्या नेतृत्वात, पुढाकाराने व मार्गदर्शनाने संग्रामपूर तालुक्यात चला करूया वर्ग अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.

या अभियानाचा उद्देश सर्व शिक्षकांच्या समोर जावा या उद्देशाने सर्व शिक्षकांच्या संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा आयोजित करण्यात येत असून दिनांक 8 सप्टेंबर रोजी संग्रामपूर, निवाना, वरवट बकाल व एकलारा या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांची जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथील खेतान सभागृहात संयुक्त शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.

या शिक्षण परिषदेमध्ये आपल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत कसे करावे, अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकरीता अध्ययन स्तर निश्चिती करून पुढील उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण निर्मिती करण्यास सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले.

सर्व शाळांमध्ये नियोजनबद्ध दैनिक परिपाठ घेणे, अध्यापन करावयाच्या घटकांची पूर्वतयारी करून येणे, प्रभावी अध्यापन होण्यासाठी शाळेतील उपलब्ध साहित्य जसे टीव्ही, गणित पेटी, इंग्रजी पेटी, भाषा समृद्ध पेटी इत्यादी साहित्याचा नियमित वापर, शालेय परिसर स्वच्छ ठेवून सर्व विद्यार्थी गणवेशातील यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती 90% पेक्षा जास्त राहील यासाठी प्रयत्न करणे,

अनुपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांशी वारंवार संपर्क साधने, शालेय पोषण आहाराचा दर्जा उत्कृष्ट राखणे, लाभांच्या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याकरिता दक्षता घेणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, विविध स्पर्धा परीक्षा जसे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा,Nmmsपरीक्षा , ५/८ वी शिष्यवृत्ती परीक्षा यांची तयारी करून घेणे, आपली शाळा, आपला वर्ग सर्वोत्कृष्ट कसा राहील यासाठी प्रयत्न करणे,

शालेय वेळेत भ्रमणध्वनीचा वापर कमी करणे, शाळा व्यवस्थापन समिती सभा, पालक सभा, माता पालक संघाच्या नियमित सभा घेणे, आपल्या शाळेतील/ वर्गातील वातावरण सुसज्ज ठेवण्यासाठी शाळेला रंगरंगोटी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सहकार्य घेणे, वृक्षारोपण करणे त्यासोबतच शाळा आयएसओ करण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या विविध बाबींवर शिक्षण परिषदेमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास निर्माण झाल्याने आम्ही आमचा वर्ग , शाळा प्रगत करणारच असा विश्वास सर्व शिक्षक व्यक्त करीत आहेत.

या शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढण्यास निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी श्री एन जे फाळके यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी संग्रामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मिलिंद सोनोने, निवाना केंद्राचे के प्र श्री श्याम कौलकार,एकलारा केंद्राचे के प्र श्री अनिल धनभर, वरवट बकाल केंद्राचे के प्र श्री राहुल इंगळे, समग्र शिक्षाचे कर्मचारी श्री कमलेश गोसावी ,उद्धव चव्हाण, इंगळे, वानखेडे, सहारे या सर्वांनी परिश्रम घेतले.

नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात पावसामुळे घरांची पडझड ,मदतीची मागणी

0

शेगाव:स्थानिक नगरपालिका शेगाव अंतर्गत येणाऱ्या नागझरी रोडवरील भीम नगर परिसरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

भीम नगर परिसरामधील गिताबाई सुभाष शेगोकार दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे घर जमीन दोस्त झाले त्यामुळे या कुटुंबातील चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचा जळगाव जिल्हा दौरा संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. कृष्णा इंगळे यांचा जळगाव जिल्हा दौरा दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. या दौऱ्याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तक्रार निवारण बैठकीचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू मा. विजय माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

या बैठकीत विद्यापीठा अंतर्गत अनुदानित बिंदु नामावली नुसार महाविद्यालय प्राचार्य भरलेली पदे रिक्त पदे , प्राध्यापक रोस्टर निहाय रिक्त पदे , आकृती बंध बिंदू नामावलीनुसार , शिक्षकेतर कर्मचारी माहिती तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. .

कृष्णा इंगळे यांनी जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अंकित साहेब तसेच जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्याताई गायकवाड यांचीही भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली.

संध्याकाळी विद्यापीठाच्या विश्रामगृहावर मा. अध्यक्षांनी कास्ट्राईब संघटनेच्या सर्व शाखा निहाय जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्याप्रसंगी मा. कृष्णा इंगळे यांच्या समवेत कास्ट्राईब राज्य संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब वन विभागाचे राज्य कार्याध्यक्ष मनोज कांबळे , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे , कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे , कास्ट्राईब महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पुलकेशी केदार , शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू साळुंके , महासंघाचे जिल्हा सचिव ब्रम्हानंद तायडे , जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल ,वनविभागाचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे , सचिव योगीराज तेली , महासंघाचे कोषाध्यक्ष प्रा. प्रमोद लोंढे , जळगाव मनपा संघटनेचे सुरेश भालेराव ,नंदकुमार गायकवाड यांचीही उपस्थिती होती .

हवालाचे ५ कोटींपैकी ३कोटी २५ लाखासह ३ आरोपी ताब्यात घेण्यात वर्धा पोलिसांना यश

0

 

अवघ्या ५ तासात कारवाई, महाराष्ट्रातील पहिलीच घटना

प्रतिनिधी वर्धा/हिंगणघाट  प्रमोद जुमडे

नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरुन हवालातील ५कोटीरुपयेबंदुकीचा धाक दाखवून लुटणा-या टोळीतील तिघांना अवघ्या ५तासात अटक करण्यात वर्ध पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी रचलेल्या शंभर सहाय्यकाच्या चमूने साडेतीन कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. महाराष्ट्रात एवढी मोठी रक्कम वर्धा पोलिसांना हस्तगत करण्यात पहिल्यांदाच यश आल.

नागपूर हैद्राबाद महामार्ग क्र- ७वरुन हवालाचे ५ कोटी रुपये बंदूकीचा धाक दाखवून लूटत असल्याची माहिती वर्धा पोलिस अधीक्षकांना मिळाली यावरुन त्यांनी स्वत: हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत पोहचून आरोपींना पकडण्याचा सापळा रचला. यामध्ये रक्कम घेऊन जाणारी टोळी नागपूरकडे जात असल्याचे लक्षात येताच नुरुल हसन यांनी यवतमाळ , नागपूर, ग्रामीण, शहर व वर्धा स्थानिक गुन्हे शाखा यातील प्रमुख अधिकारी,कर्मचारी यांना मार्गावर ठेवून नागपूर शहरातील अंबाझरी

परिसरात तांत्रिक परिस्थिती हाताळून ३ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेजवळून ३ कोटी २५ लाख जप्त करण्यात आले. यातील १ आरोपी फरार होण्यास यशस्वी ठरला असून त्याचेकडे माहिती मिळाल्याप्रमाणे १ कोटी ८५ लाख असल्याचे प्राथमिक माहिती असून केवळ ५ तासांच्या आत १०० पोलिसांच्या अतिरिक्त बळ वापरुन ही कारवाई करण्यात आली.

सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडलेली घटना असून यात ५ कोटींपैकी ३ कोटी २५ लाख जप्त करण्यात आले. उर्वरित १ कोटी ८५ लाखांच्या शोधार्थ पोलिस चमू कार्यरत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली. पोलिस विभागासाठी महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्यामुळे आरोपी ताब्यात घेणे महत्वाचे ठरले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथील शेख युनुस यांची समाजवादी पार्टी युवा जन सभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

समाजवादी पार्टीचे युवा जनसभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदर श्री अबू असीम आझमी जी यांच्या आदेशावरून जळगांव खान्देश येथील सरकारी विश्राम गृह येथे उत्तर महाराष्ट्र जन संवाद यात्रेच्या दोर्या दरम्यान निकुक्ती पत्र दिले .

शेख युनुस हे मागील बऱ्याच वरष्या पासून समाजवादी पार्टी चे निष्ठावान कार्यकरते होते ..त्यांची पार्टी सोबत ची निष्ठा पाहून ही नियुक्ती करण्यात आली

या नियुक्ती वेळी महासचिव श्री परवेज सिद्दीकी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री फहाद अहमद महाराष्ट्र प्रदेश अध्यशा माया ताई चवरे महाराष्ट्र प्रदेश मेंबर श्री लियाकत खान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अझहरउल्लाह खान जळगांव जामोद तालुका अध्यक्ष सय्यद नफिस ज्येष्ठ समाजवादी नेते सय्यद बशीर भाई युवा शेख समीर तसेच जळगांव जामोद येथील असंख्य कार्यकते उपस्थीत होते.

यावल येथे सकल मराठा समाजाच्या तर्फे  सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या निर्दयी लाठीमारचा जाहीर निषेध

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी तालुका अबंड येथे मागील पाच दिवसापासुन मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी १ सप्टेंबर पासुन या गावात मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता प्रिय मार्गाने सुरू असलेले उपोषणास उधण्यासाठी पोलीसानी केलेल्या अमानुषपणे लाठीमार व गोळीबार करून अनेक आंदोलनकर्ते यांना जख्मी करण्यात आल्याच्या निषेधार्त शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले आहे .

दरम्यान आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता यावल सहकारी खरेदी विक्री संघातुन सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यात समाजाच्या वतीने अतुल पाटील ,प्रा. मुकेश येवले , अजय पाटील ,उमाकांत पाटील ,देवीदास धांगो पाटील,अनिल साठे ,अॅड देवकांत पाटील, पवन पाटील , वसंत पाटील , विलास चंद्रभान पाटील , नानाजी प्रेमचंद पाटील ,डी सी पाटील , डॉ हेमंत येवले,डी बी पाटील , सुनिल गावडे ,महेश पाटील,अशोक पाटील ,अतुल यादव, पाटील, ललीत पाटील , गौरव भोईटे , स्वपनील चव्हाण, नरेन्द्र पाटील, यश पाटील , किरण पाटील , कोमल पाटील , शैलेश पवार , उदय पाटील , योगेश चव्हाण, विलास येवले , अमोल खैरनार ,

निळकंठ यादव , प्रकाश पवार, आशिष महाजन , कल्पेश पवार ,चंद्रकांत येवले, बापु जासुद, गुणवंत पवार , अनिल पवार , संजय पवार , कमलाकर पाटील , किरण महाजन यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी यात आपला सहभाग नोंदविला यावेळी जिल्हा परिषदचे माजी गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दिला आहे.

परसाडे गावातील एका विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील परसाडे गावातील एका विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संजना आमीन तडवी (वय-२१, रा. परसाडे ता. यावल) या विवाहित तरुणीने रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहीतेच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केले. दरम्यान या विवाहीत तरूणीने आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही .

डिजिटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद खंडारे यांची निवड जाहीर!

0

 

नांदुरा,प्रतिनीधी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक मा. एस.एम.देशमुख सर, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ उंबरकर यांनी पत्रकार विनोद खंडारे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक सर अध्यक्ष शरदजी पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, अमरावती अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे, अमरावती विभागीय सचिव अमर राऊत,

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, नारायण दाभाडे ,गोपाल ढगे,नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेशदादा पेठकर,जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे, जेष्ठ पत्रकार जगदिश आगरकर,पुरुषोत्तम भातुरकर,योगेश धोटे, ॲड.अमोल इंगळे, विलास निंबोळकर, गजानन बोटुळे,लक्ष्मण वक्ते, बाळ चोपडे, विजय क्षिरसागर,लक्ष्मण भातुरकर यांच्यासह मान्यवरांनी विनोदभाऊ खंडारे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी..

0

 

अन्यथा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही.. अँड सतीशचंद्र रोठे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करना-या उपोषणकर्त्या सहिष्णु मराठा समाज बांधवांवर झालेला लाठी चार्ज घृणास्पद षडयंत्राचा भाग आहे.सदर घटना निंदनीय असून उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांवर झालेला अमानुष लाठी चार्ज राजकीय पोळी शिजविण्यासाठी खेळलेली मोठी खेळी आहे.

सदर प्रकरण शांततेच्या मार्गाने हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करना-या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून बाळाचा वापर केला जात असेल तर याहून मोठी लोकशाहीची हत्या कोणतीच नाही.

सदर घटनेचा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सरकारने त्वरित सदर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही.
अशी प्रतिक्रिया आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज जाहीर केली आहे.
_______________

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी भैय्यासाहेब पाटील यांची निवड..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी मेहकर येथील भैय्यासाहेब पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली आहे

भारत राष्ट्र समिती पक्षाची बैठक पक्षाचे पश्चिम विदर्भ समन्वय निखिल भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत आज पार पडली या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली

भारत राष्ट्र समिती पक्षाचे तर्फे लवकरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी दिली