Home Blog Page 177

कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा जीवे मारण्याची धमकी वाळू तस्करांच्या मुसक्या केव्हा आणि कोण अवळणार ?

0

 

विकी वानखेडे यावल

यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळ वाळुची विनापरवाना वाहतुक करणार्‍यांकडून महीला पर्यवेक्षकास  मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. तालुक्यातील विनापरवाना वाळुची वाहतुक करणार्‍यांची मुजोरी वाढली असुन महसुलच्या अधिकार्‍यांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे.

वढोदे ता.यावल ते शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतुक करणार्‍यांनी पर्यवेक्षक म्हणुन नेमणुकीस असलेल्या महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना कर्तव्यावर असतांना धक्काबुकी व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी पोलीसात त्या अज्ञात वाळु वाहतुक करणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, बामणोद तालुका यावल येथे बबीता सुधाकर चौधरी या मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी त्यांचेकडे महसुल प्रशासनाच्या वतीने थोरगव्हाण तालुका यावल करीता पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन .

आज दिनांक ३१ ऑगस्ट गुरूवार रोजी दुपारी १२ , १५ वाजेच्या सुमारास पर्यवेक्षक बबीता चौधरी या आपल्या कडील खाजगी वाहनाने थोरगव्हाण कडे जात असतांना वढोदे प्रगणे यावल ते शिरसाड या रस्त्यावर वढोदे गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वाळु वाहतुक करीत असतांना आढळुन आले.

संबधीत ट्रॅक्टर चालकाकडे बबीता चौधरी यांनी वाळु वाहतुकीचा परवाना मागीतला असता परवाना नसल्याचे सांगुन थोरगव्हाण च्या पर्यवेक्षक आणी बामणोदच्या महिला मंडळ अधिकारी असलेल्या सौ बबीता सुधाकर चौधरी यांच्याशी ट्रॅक्टरचालक निलेश समाधान सोनवणे याने हुज्जत घातली व धक्काबुकी करीत करून शिविगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

दरम्यान संबधित ट्रॅक्टर वाहन चालकाने घटनास्थळा वरून निलेश सोनवणे राहणार थोरगव्हाण तालुका यावल व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने ट्रॅक्टर पळवुन नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे महीला मरण पावली आरोग्य प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी : वैद्यकीय व्यवसायिकांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली गावात बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे एका आदिवासी महीलेच्या झालेल्या दुदैवी मृत्युच्या पाश्वभुमीवर यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायीकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यावल यांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे . या निवेदनात त्यांनी म्हटले आहे

की यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक गावात बोगस डॉक्टर मुन्नाभाईनी आपली दुकाने उघडली असुन ,त्याचा चुकीच्या उपचारामुळे रूग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतअसुन प्रसंगी काही लोकांना आपल्या जिवाशी मुकावे लागत असुन अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी व कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या चुकीच्या उपचारामुळे दुदैवीरित्या मरण पावलेल्या त्या आदिवासी महिलेच्या प्रकरणात अद्याप पर्यंतआरोग्य प्रशासनाच्या वतीने कुठली ही कारवाई झालेली दिसत नाही,

आदिवासी महिलेस न्याय मिळावा अशा मागणी निवेदन यावल तालुका वैद्यकीय व्यवसायीकांच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्या कडे केली आहे .

यावेळी बोगस डॉक्टरांवर त्वरीत कारवाई व्हावी यासाठीचे निवेदन देतांना डॉ कुंदन फेगडे ,डॉ धिरज पाटील , डॉ . धिरज चौधरी ,डॉ.अमित तडवी,डॉ.दिपक चौधरी,डॉ.ईसरार खान,डॉ रमेश पाचपोळे,डॉ.अभय रावते,डॉ सतिषअस्वार,डॉ पद्दमानभन देशपांडे,डॉ बि.के.बारी , डॉ सरफराज तडवी ,डॉ गौरव धांडे ,डॉ दाऊद खान डॉ तुषार सोनवणे ,डॉ अमोल महाजन डॉ युवराज चोपडे,डॉमनोहर महाजन , डॉ हरीष महाजन,डॉ चंद्रकांत चौधरी यांच्यासह आदी डॉक्टरांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत .

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा रेखाताई खेडेकर यांची राज्यपालाकडे मागणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

चिखली. महाराष्ट्र राज्यात गेल्या वीस दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. विशेषत: विदर्भात शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर आहे.

त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे स्थलांतराची परिस्थिती उद्भवू शकते.

त्यामुळे या परिस्थितीत कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई खेडेकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत मराठा सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते. रेखाताई खेडेकर यांनी याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांना राखी बांधली.

डॉक्टरच बनला मृत्यूचे कारण ,चुकीच्या उपचाराने निष्पाप बळी , कार्यवाहीची मागणी

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली गावात अनेक दिवसापासुन आपली दुकानचालवणाऱ्या एका बोगस डॉक्टराकडुन चुकीच्या उपचारा पध्दतीमुळे एक महिलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे .

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , कोरपावली तालुका यावल या गावात गेल्या तिन ते चार वर्षापासुन विद्युत विश्वास राय नामक एका बंगाली कथित डॉक्टरांने आपला दवाखाना उघडला होता ,या बोगस डॉक्टराच्या विरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशन पासुन तर गावातील लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल यांनी वारंवार या बोगस डॉक्टराचा दवाखाना तालुका आरोग्य यंत्रणेने बंद करावा

अशी लिखित तक्रार केली होती , दरम्यान आरोग्य विभागाने या संदर्भात थातुरमातुर चौकशीच्या पलीकडे काहीच केले नाही . त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता , अखेर परिणामी आज या बोगस डॉक्टराकडे उपचार घेणाऱ्या एका ४० वर्षीय आदिवासी महिलेचा चुकीच्या उपचारामुळे दुदैवी मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला.

असुन, दरम्यान त्या बोगस डॉक्टराकडे सदरच्या महिलेचा उपचार सुरु होता पण उपचार सुरू असतांना सदर या बोगस डॉक्टराकड्रन चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन लगावले गेल्याने तिचा पायावर विपरीत परिणाम झाले , व त्या महिलेचा मृत्यु झाल्याचे या बोगस डॉक्टराच्या लक्षात आल्याने डॉक्टराने आज दिनांक २९ऑगस्ट रोजीच सकाळीच गावातुन पळ काढले आहे .

या बाबत ची अधिक माहिती घेण्यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या संदर्भातील घटनेची त्वरित सखोल चौकशी करून या आदीवासी महिलेच्या मरणास जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरूद्ध योग्य प्रकारची कडक कारवाई करू असे सांगीतले आहे .

पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

सिंदखेडराज.आगामी काळात येणारे गोकुळाष्टमी ,पोळा ,गणेशोत्सव या संबंधाने मा. पोलीस अधीक्षक साहेब, बुलढाणा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, बुलढाणा यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजयकुमार मालवीय साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज तारीख 29 रोजी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन येथे सिंदखेड राजा व किंनगाव राजा हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकारी, बँड /DJ मालक यांची मिटिंग घेण्यात आली.

सदर मीटिंगमध्ये आगामी काळात येणारे वरील सर्व सण/उत्सव हे शांततेत पार पाडावे तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,

तसेच सोशल मिडिया बाबतीत व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यावर कोणत्याही प्रकारे आक्षेपार्य पोस्ट, व्हिडिओ हे प्रसारित करू नये तसेच गणपती मंडळाचे मिरवणूक मध्ये पारंपरिक वाद्य लावावे Dj वाद्य लावण्यात येऊ नये या व इतर महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

सदर मिटींगला पोलीस स्टेशन सिंदखेडराजाचे ठाणेदार केशव वाघ, किंनगाव राजा ठाणेदार सपोनि दत्तात्रय वाघमारे तसेच 60 ते 70 सदस्य हजर होते.

जलब रेल्वे स्टेशन येथे अमरावती सुरत एक्सप्रेस गाडीचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेतर्फे स्वागत..

0

 

इस्माईल शेख सह रत्नाताई डिक्कर

 

शेगाव:अमरावती सुरत एक्सप्रेस गाडी जलंब रेल्वे स्टेशन येथे थांबताच या एक्सप्रेस गाडीच्या चालक पथकाचे आज जलंब रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने जलम रेल्वे स्टेशन येथे अमरावती सुरत अमरावती तसेच मुंबई हावडा मेल या रेल्वे एक्सप्रेस गाडीला थांबा मिळावा

याकरिता शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सतत निवेदन पाठवून पाठपुरावा करण्यात आला

भुसावळ रेल्वे डिव्हिजनच्या कर्तव्यदक्ष डी आर एम यती पांडे मॅडम त्यांनी नुकत्याच शेगाव रेल्वे स्टेशन येथे दिलेल्या भेटीदरम्यानही त्यांच्याकडे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी हा मुद्दा उचलून त्यांना जलम रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांचा थांबा किती आवश्यक आहे हे पटवून दिले होते रेल्वे प्रशासनाने

या मागणीची दखल घेऊन जलंब रेल्वे स्टेशन येथे अमरावती सुरत अमरावती व मुंबई हावडा मुंबई मेल या दोन्ही गाड्यांना थांबा मंजूर केला आज राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रत्नाताई डिक्कर ,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किरण ताई लंगोटे ,जिल्हा उपाध्यक्ष प्रणिता धामंदे

,सचिव लीना भारंबे पाटील, खामगाव शहर अध्यक्ष रंजना चव्हाण राठोड यांच्यासह डिजिटल मीडिया असोसिएशन शेगाव तालुका कार्याध्यक्ष राजकुमार व्यास यांनी चालक दलातील व्ही. डी. हिवरकर,डी एस फुले, जलंब रेल्वे स्टेशन मास्तर विशाल निकम, एस .एम. रत्नपारखी ,मनोज तमळाले, गजानन सरकटे संजय डाबेराव यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या दुरूस्तीसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले किनगाव येथे रास्ता रोको.

0

 

यावल (प्रतिनीधी )विकी वानखेडे

राष्ट्रीय महामार्ग म्हणुन ओळख असलेला ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असून या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातांची मालिका सातत्याने सुरु आहे मात्र या महामार्गा च्या दुरूस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळख असलेल्या या माहामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन या रस्त्यावर रोज अपघात होत असतात.

मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबधीत विभागाने आजवर काहीही कार्यवाही केली नसून दिवसेंदिवस या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. मध्यप्रदेश,महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांशी संपर्क जोडणाऱ्या या राज्य मार्गावरील स्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

तर ठीक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नसून खड्यांनमध्ये वाहणे आदळतात व वाहन धारकांना नाहक वाहनाच्या दुरूस्ती साठी भार सोसावा लागतो ब-याचदा वाहन चालक खड्डे चुकवण्याच्या नांदात अपघात होतात व दोन वाहनधारकांनमध्ये शाब्दिक चकमक ही होते.मात्र आज पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने काही ठिकाणी खड्यांची तात्पुरती थातूरमातूर स्वरूपात डागडुगी केली जाते व दोन-तीन दिवसात परत जैसे थे परिस्थिती या रस्त्याची होत आहे.

नेहमीच रहदारीचा हा रस्ता असल्याने व शाळेच्या स्कूल बस देखील या रस्त्यावर नियमित प्रवास करीत असतात या स्कूल बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या लहान लहान विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांनी शनिवार दि.२६ रोजी सकाळी १०:३० वाजता किनगाव येथे रास्तारोको केला.या रास्तारोको दरम्यान शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी रस्त्यावर उतरून महामार्गवरील खड्ड्या बाबतीत “यावल चोपडा रस्त्यावरील खड्डे बनले हाँस्पीटलचे अड्डे””देखो यावल चोपडा रस्ता हालत हो गई खस्ता””देशाने केले चंन्द्रावर यशस्वी लँन्डींग यावल चोपडा रस्त्याचे काम आहे पेंन्डींग”यासारख्या विविध घोषणांनी परीसरगजबजला होता अर्धा तास हा रस्तारोको करण्यात आला.

यावेळी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व सर्व शिक्षक,शिक्षीका यांनी राष्ट्रीय महामार्गचे अभियंता चंदन गायकवाड यांना निवेदन दिले.चंदन गायकवाड यांनी रास्ता रोकोच्या ठीकाणी भेट देत विद्यार्थीच्या समस्या जाणून घेत पावसाळा संपल्यावर लगेचच या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगीतले यावेळी

स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शांततेत निवेदन सादर केले याठीकाणी शांततेतसाठी यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरिक्षक मुज्जफर खान, पोतीस नाईक नरेंद्र बागुले, सहाय्यक फौजदार असलम खान,जाकीर तडवी,उमेश महाजन, निलेश वाघ,योगेश खोंडे,गोपणीय विभाग प्रमुख सुशील घुगे,सीमा चिघळकर पो.पा.संघटनेचे जिल्हा कार्येअध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील डोणगाव येथील पो.पा.उमेश पाटील किनगाव बुद्रूकचे पो.पा.सौ.रेखाताई सचिन नायदे नायगावचे पो.पा.मनोज देशमुख,सचिन नायदे यांचे सहकार्य लाभले.

या रास्तारोको कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन, सुहास भालेराव,प्रतिक तायडे,पुजा तायडे,सोनाली कासार,प्रतिभा पाटील,बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर,मयुरी बारी,तिलोत्तमा

महाजन,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर,बाळासाहेब पाटील इ.सह स्कुलबस वाहनचालक यांचे योगदान लाभले.
या वेळी माहामार्ग अभियंता चंदन गायकवाड यांना निवेदन देतांना सचिव मनिष पाटील प्राचार्य अशोक पाटील व सर्व शिक्षक.

केंद्रीय मानव अधिकार ऍथॉरिटी भारत सरकार महाराष्ट्र अध्यक्षपदी यांची नियुक्ती

0

 

इस्माईल शेख.बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शीतल गोपाळ शेगोकार यांची महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षेसाठी मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र महिला अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे त्या महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी काम करणार असून पोलीस खाते न्यायालय महिला विभाग अशा अनेक खात्यामध्येही त्या काम करणार आहेत.

तरी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्या योग्यरीत्या पार पाडतील अशी संबंधित पत्रकारांना त्यांनी बोलताना दिली आहे

त्यांचे कार्य महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाच्या रोखण्यासाठी रस्त्यावर वेश्याव्यवसाय अवैध जुगार मटका हातभट्ट्या असे अनेक प्रकारावर बंदी घालण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ग्रामीण भागातील महिलांवर होणारे बलात्कार यावर त्या काम करणार आहेत असे त्यांनी पत्रकार सोबत बोलताना सांगितले आहे

दारूबंदी, महीला शौचालय व स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीसह विविध शासकीय योजनांचे मिळणारे लाभ या विषयांना ग्रामसभेत चर्चाअंती मार्गी लावण्यास मंजुर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील परसाडे गावातील प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झालेली ग्रामसभा परिसरात होणारी अवैद्य दारूच्या विक्रीवर कायमची बंदी घालणे,महीला शौचालयाचे गंभीर प्रश्न, गावातील शाळा आवारात होणारीअस्वच्छता,ग्राम पंचायत कडून अनेक वर्षा पासुन न झालेली कर वसुली, विविध शासकीय योजना पासून आदीवासी बांधवांना मिळणाऱ्या योजनांचा लाभाची माहिती देणे अशा विविध लोकहिता च्या मुद्यांवर ग्रामस्थांच्या मोठया उपस्थितीत सकारात्मक प्रतिसादाने गावातील प्रथम नागरीक सरपंच सौ मिना राजु तडवी यांच्या अध्यक्षते खाली अतिश्य सोर्हादपुर्ण वातावरणात ग्रामसभा पार पडली .

परसाडे तालुका यावल या आदिवासी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गावातील प्रथम नागरिक ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मिना राजु तडवी यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामस्थांच्या मोठया सहभागाने संपन्न झाली.यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे उत्तर आणि आदीवासी बांधवांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनाबद्दलची माहिती यावेळी ग्रामसेवक मजीत तडवी यांनी दिली.

ग्रामस्थानांच्या वतीने गावातील कार्यकर्ते युनुस तडवी व आदी गावकऱ्यांनी गावातील तरूणाचे आयुष्य परिसरातअवैद्य मार्गाने विक्री होणाऱ्या घातक पन्नीची दारू व हातभट्टी गावठी दारूच्या आहारी जाणुन उद्धवस्थ होतअसुन या दारू विक्रीचे धंदे कायमचे बंद करावे असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यातआला,या शिवाय गावातील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानदारा कडुन वेळेवर किंवा शासना कडून मिळणारे धान्य पुर्ण मिळत नसल्याची तक्रारी ग्रामस्थांनी सभेत उपस्थित केल्यात,तसेच गावातील महिला शौचालय नसल्याने महिलांना गावातील चारही बाजुस असलेल्या रस्त्यांच्या कडेला शौचास बसावे लागत असल्याचे गंभीर प्रश्न,मागील दहावर्षा पासुन गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातुन कर वसुली करण्यात आली

नसल्याचे व आपल्या गावास तंटामुक्त करण्याच्या ठरावास यासह गावातील विविध प्रश्नांना ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आपल्या गावाचा सर्वागीण विकास, विविध नागरी हिताच्या शासकीय योजना आपल्या पर्यंत पहोचणे हेच आपले ध्येय व संकल्प असल्याचे सांगुन यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागा शिवाय हे शक्य नसल्याचे सरपंच सौ मिना राजु तडवी यांनी

ग्रामसभेत अध्यक्षस्थानाहुन बोलतांना सांगितले ,ग्रामसभेस उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी,ग्राम पंचायत सदस्य शकीला महेमुद तडवी ,मदिना सुभेदार तडवी ,बाबासाहेब शंकर भालेराव ,खल्लोबाई युनुस तडवी, रमजान छ्बु तडवी,योगीता सतिष साळवे ,श्रीमती मुन्नाबाई ईस्माइल तडवी उपस्थित होते . या ग्रामसभेची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक मजीत तडवी यांनी मानले .

तक्षशिला बुद्ध विहार शेगाव येथे धम्म संस्कार वर्ग शिबिर संपन्न

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जगाला युद्ध नको बुद्ध हवा बुद्धाच्या समता शांतीचा संदेश देण्याकरिता आणि त्यांच्या विचारांचे बीज प्रत्येक घरात युवक युतीमध्ये नवीन पिढीमध्ये पेरण्याकरिता धम्म संस्कार शिबिर घेणे आज काळाची गरज आहे करिता

तक्षशिला बुद्ध विहार शेगाव येथे तक्षशिला महिला मंडळ शेगाव यांच्या वतीने दिनांक 27 ,8,2023 रोजी भंते डी धम्मचरण महाथेरो यांच्या वाणीतून दहा वर्षावरील मुला मुलींना धम्म संस्कार शिबिर वर्ग चे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिराला शेगावातील व नगरातील बहुसंख्या युवक युवती उपस्थित होते यावेळेस भंते धम्मचरण महाथेरो यांनी आपल्या अमृतवाणीतून या नवयुकांना धम्माविषयी व आचरण विषयी मार्गदर्शन केले.

सदर धम्म संस्कार शिबिर हे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत घेण्यात आले या शिबिराच्या आयोजन तक्षशिला बुद्ध विहार समिती व तक्षशिला महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते