Home Blog Page 178

काळा बाजारात विक्रीसाठी जात असलेल्या शासकीय तांदुळाचा ट्रक शेगाव खामगाव रोडवर उड्डाणपूल जवळ पोलिसांनी केला जप्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव अशोक रमेश थोरात, साहेब, यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून काळा बाजारात विक्रीसाठी शासकीय तांदूळ घेऊन जात असलेला संशयास्पद ट्रक विशेष पथकाने उड्डाणपूल जवळ जयपुर लांडे शिवारात जप्त केला गुप्त बातमीदारकडुन बातमी मिळाली

की, संशयास्पद तांदुळ काळ्याबाजारात विक्रीसाठी ट्रक क्रमांक MH- 37-1-1189 ने नांदुरा येथून नागपूर कडे घेवुन जात आहे. त्याची सत्यता पडताळणीकामी व कायदेशिर कार्यवाही करीता सपोनि सतीश आडे व पोहेकॉ / 566 रामचंद्र भोपळे, पोहेकॉ / 492 श्रीकृष्ण नारखेडे, पोहेकॉ / 1413 सुधाकर थोरात, पोहेकॉ / 1526 निलेश चिंचोलकर, पोकॉ / 503 हिरा परसुवाले पथक अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांना आदेशीत करण्यात आले

. दिनांक 22.09.2023 रोजी पो.स्टे. खामगांव शहर हद्दीत नवीन बायपासवर जयपुर लांडे शिवारात शेगांव रोडवरील उड्डाण पुलावर 02.45 वाजता ट्रक क्रमांक MH- 37-J-1189 हा नांदुरा कडुन येतांना दिसला. ट्रक चालक रविंद्र शेषराव महल्ले वय 45 वर्ष रा. गाडगेनगर, जुने शहर, अकोला, तसेच त्यांचे सोबतचे ट्रक चे • क्लिनर नरेश निळकंठ मेश्राम वय 42 वर्ष रा. डाबकी रोड, गोंडपुरा, अकोला यांना पोलीसांनी त्यांचा परीचय देवून तसेच वाहनात असलेल्या मालाची तपासणी बाबतचा उद्देश समजावून सांगुन ट्रकची पाहणी केली असता.

त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पोतडीत तांदुळाचे प्रत्येकी अंदाजे 50 किलो वजनाचे अंदाजे 500 कट्टे प्रती किलो 15/- रु. प्रमाणे एकुण 3,75,000/- रु किंमती चा संशयास्पद तांदुळ तसेच ट्रक • किंमती अंदाजे 18,00,000/-रु असा एकुण 21,75,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर माल व ट्रक चालक व क्लिनरसह पो.स्टे. खामगांव शहर येथे आणण्यात आले असुन पुढील कार्यवाही पो.स्टे. खामगांव शहर हे करीत आहेत.

सदर कार्यवाही मा. श्री. सुनिल कडासने साहेब, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मागर्दशनाखाली श्री अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक, खामगांव तसेच श्री विनोद ठाकरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे आदेशाने सपोनि सतीश आडे व सोबत पोहेकॉ रामचंद्र भोपळे, पोहेकॉ श्रीकृष्ण नारखेडे, पोहेकॉ सुधाकर थोरात, पोहेकॉ निलेश चिंचोलकर, पोकॉ हिरा परसुवाले यांनी केली आहे.

जळगांव ते सावखेड तेजन फाटा डांवर रस्त्याचे काम निकृष्ठ . सरपंच रामकिसन नागरे यांचा निवेदनाद्वारे अमरण उपोषणाचा इशारा

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगांव ते वैष्णवगड झालेल्या कामामध्ये कोणत्याही पॅचेस मध्ये ४० एम. एम. गिट्टी व डांबर टाकून पॅचेस भरलेले नाही रोलींग केलेले नसून बि.बी.एम. कारमेट काम (वरील कोट) केला आहे. सदर कामामध्ये आज पुर्ण पॅचेस उखळून गेलेले आहे व आता वैष्णवगड ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत काम झाले व ते पण निकृष्ठ दर्जाचे आहे. सोलींगच्या खाली न झाडता डांबर न टाकता सोलींगच्या वरून डांबर टाकून त्यावर कारपेट बि.बि.एम.चा कोट टाकला त्यामध्ये जे डांबर वापरले ते कमी प्रमाणात

आहे असा आरोप सरपंच व गावकऱ्यांचा असल्याने त्यांनी
पहिले निवेदन ४ जुलै रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगांव राजा यांच्याकडे लेखी विनंती अर्ज देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच सदर काम हे कॉलीटी कंट्रोलची तपासणी करून हे काम पुन्हा नव्याने जळगांव ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत रोडचे पुर्ण पॅचेस भरून दोन कोट टाकून काम नव्याने करून देण्यात यावी अशी मागणी करून सुध्दा आमची मागणी पूर्ण केली नाही.

या मुळे सरपंचासह गावकरी तहसिल कार्यालया समोर दिनांक ३०/९/२०२३ रोजी उपोषणास बसत आहोत. सदर उपोषणा दरम्यान आमचे जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार राहतील अशी मागणी तहसीलदाराकडे निवेदनाव्दारे केली आहे त्यांच्या प्रमुख मागण्या सविस्तर

जळगांव ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत रोडचे पुर्ण पॅचेस भरून पुन्हा दोन कोट टाकून काम नव्याने करून देण्यात यावे.

सदर कामाची गुणवत्ता चाचणी करून सबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीरत टाकून बोगस कामास प्रोत्साहन देणाऱ्या J.E. व उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगांव राजा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सदर काम आमच्या मागणीनुसार पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाचे देयक देण्यात येऊ नये. अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सिंदखेडराजा यांच्याकडे केली आहे.

शेतातील गोडाऊन मधून चाळीस हजार रुपये किमतीचे आठ पोते लंपास.. एका अनोळखी आरोपी सह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल.

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: नागझरी रोडवरील सर्वे क्रमांक 1172/2अ संदीप काठोळे यांच्या मालकीच्या शेतातील गोडाऊन मधून आठ पोते सोयाबीन किंमत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी 4 आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप पुष्पांकर गाठोडे व 48 वर्षे राहणार फुलेनगर शेगाव यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्या मालकीचे नागझरी रोडवर आहे.

या शेतामध्ये धान्य साठवणीसाठी गोडाऊन बांधण्यात आलेले असून या गोडाऊन लावलेले सलाखीचे लाॅक तोडून सुमित प्रकाश समदुर राहणार मिलिंद नगर तीन पुतळा परिसर शेगाव फाइटर उर्फ ऋतिक शिरूर कुंडवळा शेगाव सोपान बिलेवार राहणार टाकळी तालुका शेगाव अधिक एक अनोळखी अशा चौघ आरोपींनी या गोडाऊन मधून 12 सप्टेंबर रात्री नऊ ते 22 सप्टेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजे दरम्यान आठ पोती सोयाबीन किंमत ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध कलम 380 46134 बादली चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे साहेब करीत आहेत

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून यावल येथे आढावा बैठक

0

 

तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना मोहन माला पुस्तक भेट .

यावल/ /प्रतिनिधी विकी वानखेडे

जिल्हाधिकारी महोदय आयुष प्रसाद यांनी यावल येथील तहसील कार्यालयात व नगरपरिषद यावल येथील सभागृहामध्ये सर्व विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते त्यात त्यांनी महसूल विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले प्रामुख्याने महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी अवैध वाळू वाहतूक मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले

.तसेच सातबारा संगणकीकरण मध्ये यावल तालुक्याने पूर्ण शंभर टक्के काम पूर्ण केले आहे तसेच महसुलीची वसुली सुद्धा करण्याचे त्यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सांगीतले ई पीक पाणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त पाणी करून घेण्याचे सुद्धा सांगितले जेणेकरून पिकाचे नुकसान भरपाई विमा तसेच विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येईल.

तसेच शेळगाव बँरेज सुद्धा गाळमुक्त करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच यावल तालुक्यात तीन नवीन मतदान केंद्र स्थापन राजकीय पक्षांनी बूथ लेवल एजंट यांची नेमणूक लवकरात लवकर करून घ्यावी .गणेश उत्सव लक्षात घेता गुन्हेगारी वृत्तीच्या गुन्हेगारांना हद्दपारच्या प्रस्ताव तसेच ज्यांच्या वरती किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंद आहे त्यांना नोटिस व दोषारोप पत्र काढुन प्रांत अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात येईल .

या गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात आले आहे .नवीन अंगणवाडी .आयुष्यमान भारत कार्ड . आधार शेडिंग .शाळांमध्ये वीस कनेक्शन .तसेच शबरी व रमाई घरकुल योजनेसाठी लक्षांक उपलब्ध असून घरकुल मागणीचे प्रस्ताव ग्रामपंचायत नि लवकरात लवकर पाठवावे .दलित वस्ती सुधार योजना मार्फत सुद्धा प्रस्ताव प्राप्त झाले असून ते सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार आहे रोजगार हमी मार्फत सुद्धा कामे लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे.

तसेच ज्या रेशन कार्डधारकांना रेशन धान्य मिळत नाही त्यांना सुद्धा धान्य मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच मार्ग काढणार आहे त्यावेळी प्रांत अधिकारी कैलास कडलक तहसीलदार मोहनमाला नाझीरकर गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड. बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे , शाखा अभियंता आर पी इंगळे,सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता तडवी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणगावकर साहेब . फैजपुर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावल येथील ऐतिहासिक राजे निंबाळकरांचा किल्ला येथे भेट देऊन स्वच्छता उपक्रम राबऊन स्वच्छतेची शपथ घेतली व माझे घर माझा परिसर माझे शहर माझे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्यावेळी नगरपालिकेतील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते .

तसेच नगरपालिकेतील सभागृहामध्ये आढावा बैठक घेताना घंटागाडी कडे प्रामुख्याने लक्ष द्या ओला कचरा सुखा कचरा याच्या विल्हेवाट साठी उपाययोजना करा स्वच्छ सर्वेक्षण वरती भर द्या माझी वसुंधरा वृक्ष लागवड ग्रामस्थांच्या विविध तक्रारी निवारण करा दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर वाटप करा मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबवा तसेच पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या देखील सूचना यावेळी देण्यात आल्या नगरपालिकेच्या वसुली बाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली .

दारूड्याला वाचविण्यासाठी एसटी बस खड्डयात गेल्याने तिन विद्यार्थी जखमी मोठा अपघात टळला

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी उभी करून दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी यावल एसटी आगारातील बस क्रमांक (एमएच २० डी ९९७५) ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवून यावलच्या दिशेने येत असतांना यावल शहरापासुन सुमारे १ किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी लावून रस्त्यावर झोपलेला होता. वाहनचालक यांनी त्यास वाचविण्यासाठी एसटी बस रस्त्याच्याकडेला जात असतांना रोडच्या खाली उतरवून खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे.

या अपघातात तिन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालून पळ काढला आहे.

या अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जख्मी रूग्णाची काळजी घेत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद दाखल करण्यात आली आहे .

यावल तालुक्यात खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व पन्नी दारूची सर्वत्र विक्री होत असल्याचा हा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रीया जख्मी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या असुन , एसटी चालकाने प्रसंगी दक्षता घेतली नसती तर मोठा अपघात झाला असता असे देखील अपघातास्थळी उपस्थित नागरीकांमध्ये बोलले जात आहे

किनगांव बु|| मध्ये वंचित बहुजन महिला आघाडी शाखा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

गाव तेथे शाखा, गाव तेथे कार्यकर्ता”

यावल – यावल तालुक्यातील किनगांव येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखा उद्घघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम दिनांक 20/09/2023 रोजी दुपारी 1:00वा. जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित पुन्हा सतेज करत गांव तेथे शाखा स्थापन करून पुढील आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

यावल तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे. त्यामुळे आता यावल तालुक्यामध्ये वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी,छायाताई हिरोळे, संतोष तायडे, भुषण साळुंके, मेजर देवदत्त मकासरे, धीरज मेघे,किनगांव शहर अध्यक्षा मंगला सुनील कोळी,शहर उपाध्यक्षा मनीषा शरद अडकमोल,शाखा अध्यक्षा सबेरा गफुर तडवी,शाखा सचिव संध्या दत्तू भालेराव, शाखा कार्याध्यक्ष भारती संजय अडकमोल, शाखा सदस्य सपना नाना साळुंके, लता रघुनाथ बाविस्कर,यमुनाबाई युवराज भालेराव, सुशिलाबाई उत्तम भालेराव, माधुरी विनोद मेढे,रेखा रवींद्र अडकमोल, ताराबाई शामराव तायडे,मंडाबाई बापू सपकाळे,जनाबाई श्रावण सोनवणे,कल्पना मनोहर अडकमोल, रमाबाई राजू अडकमोल,पूजा संजय

सोनवणे,शिंधुबाई दामू साळुंके,शीतल चेतन भालेराव,तेजल सुनील सोनवणे, हसिनाबाई गाफुर तडवी,कल्पना शिधार्थ भालेराव,साधना गौतम निकम, ललिता राजू निकम,फरिदाबाई खाटीक,व दिलीप सोनवणे, रोहन निकम, भुषण भालेराव,बाबुलाल पटेल, भानुदास महाजन,सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन भुषण साळुंके यांनी मानले

राज्य सरकारच्या प्रस्ताविक कृषी कायद्यांना यावल तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने विरोध

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

केला अ सून, याबाबत चे विरोध दर्शविणारे पोस्टकार्ड मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना पोस्टकार्डव्दारे लिहून पाठवुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी घोषित केलेल्या व पुढील अधिवेशनात प्रस्तावित असलेल्या कृषी कायद्या मध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी सारखा प्रकार आहे. या कायद्या अंतर्गत एमपीडीए सारख्या झोपडपट्टी गुंड म्हणून त्यात असलेले गुन्हे नोंद होणार असल्याने कृषी विक्रेत्यांनी या कायद्यास प्रचंड विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यभरातून पोस्ट कार्ड पाठवून विरोध दर्शवण्यााठी यावल तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे पोस्ट कार्ड लिहून तालुक्यातील कृषी विक्रेते बांधवांनी विरोध दर्शविला.

या कायद्यांना विरोध करण्यासाठी पोस्ट कार्ड मोहिमेनंतर तीन दिवसीय बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती मनोज वायकोळे यांनी दिली. हिवाळी अधिवेशना पूर्वी या कायद्यांबाबत कृषी विक्रेत्यांचे हित लक्षात न घेता कायदा होत असल्यास हिवाळी अधिवेशना वेळी राज्यभरातून सर्व ५० ते ७० हजार कृषी विक्रेते बांधव नागपूर येथे ठिय्या आंदोलन करतील असे माफदा संघटनेच्या वतीने सांगितले.

यावेळी यावल तालुका ॲग्रो असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मनोज वायकोळे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव नारायण भंगाळे, कोषाध्यक्ष प्रशांत शिंदे, प्रशांत पाटील, पवन पाटील, पवन जैन, सुयोग यावलकर, राकेश जैन, बाळू पाटील, प्रमोद कोलते, हेमंत चौधरी, स्वप्नील फालक, सचिन बोरसे, समाधान पाटील, भरत चौधरी ,पाटील, भरत मोरे, रवी पाटील, गौरव राणे, राजू भगत, सोपान चौधरी, हर्षल नेमाडे, रवींद्र महाजन, अरुण पाटील, भूषण चौधरी, मोहन इंगळे, सोहम कोळंबे, भरत पाटील, चेतन चौधरी, प्रवीण शिरोळे, उदय साठे, मुकेश चौधरी आदी उपस्थित होते.

भाजपच्या जिल्हा चिटणीस पदी स्नेहल कलोडे.

0

 

सिंदी रेल्वे. – भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदी स्नेहल दत्ताजी कलोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी नुकतीच पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा केली. यात सिंदी रेल्वे मधून जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर यांनी केलेल्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती बद्दल स्थानीक भाजपा चे पदाधिकारी, शक्तीप्रमुख, बुथप्रमुख व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले…

ग्रामसेवकांने अव” लोकन करून माहिती देण्या अगोदरच घेतल्या स्वाक्षरी..

0

 

ग्रामपंचायत वरवट बकाल ला स्मरणपत्र” केला सादर ..

संग्रामपूर तालुक्यामधील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल ग्रामपंचायत मध्ये केंद्र शासनाच्या माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागील दिनांक 29/ 8/ 2013 चा अर्ज व चार आठ 2023 चे चार अर्ज आणि बारा /9/2023 चा अर्ज एकूण सहा माहिती अधिकार 2005 अंतर्गत मिळालेल्या ग्रामपंचायत वरवट बकाल यांच्या पत्र दिनांक 7/ 9 /2023 ला प्राप्त झाला.

असून आपण अर्जामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती मागितली आहे करिता आपण माहितीच्या अवलोकन” करिता यावे म्हणून अर्जदार हा व्यक्ती दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल येथे दुपारी एक ते दोन च्या दरम्यान उपस्थित झाला परंतु ग्रामसेवक बोडके यांनी अर्जदारास एक तास बसवून ठेवले नंतर त्यांना सांगितले की आम्ही सर्व माहिती तयार करतो त्याला भरपूर वेळ लागणार आहे त्यासाठी तुम्ही या अर्जावर एक स्वाक्षरी करा की मला पूर्णपणे माहिती मिळाली आहे मी तुम्हाला माहिती तयार करून देणार आहे.

परंतु ग्रामसेवक बोडखे यांनी कोणत्याही प्रकारची माहिती न’ देता फक्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्या कागदावर लिहून घेतले की मला माहिती मिळाली आहे आणि स्वाक्षरी करून घेतली

आणि सांगितले की माझी या ग्रामपंचायत मधून बदली झाली आहे तुम्हाला माहिती मिळवून देईल.

तसेच दिनांक 20/ 9 /2023 रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान अर्जदार ग्रामपंचायत वरवट बकाल येथे जाऊन ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांना ग्रामपंचायतच्या मिळालेल्या 7 /9/ 2023 रोज च्या पत्रानुसार स्मरणपत्र देण्यात आले आहे तसेच त्या पत्रामध्ये नमूद केले आहे

,ई-पाॅस मशीन अडचण सोडविण्या ची स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची तहसीलदाराकडे मागणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहर स्वस्त धान्य दुकानातील की पोस्ट मशीन वारंवार बंद पडत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शहरातील स्वस्त धान्य दुकानातील ही पोस्ट मशीन ची समस्या सोडवावी अशी मागणी शेगाव शहर स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत आज शेगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सणासुदीच्या दिवसात ई-पाॅस मशीन बंद असल्याने गरजू नागरिकांना आनंदाचा शिधा व शासकीय योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन इपास मशीन समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर विनोद लांजुळकर, राजहंस ढगे व मंगेश देशमुख बाळू भाऊ पुरी मोहन भाऊ कराळे दीपक दादा ढमाळ विजय भाऊ नामदास भालतडक भाऊ निलेश गणेश मंगेश ढोले , यांच्यासह शेगाव शहर व तालुका स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत