Home Blog Page 179

रक्ताची कमतरता रक्तदानानेच दूर होऊ शकते – जिल्हाध्यक्ष किरण लंगोटे ..शिबिरात महिलांनीही केले उस्फूर्तपणे रक्तदान.

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : कृत्रिमरीत्या रक्त तयार करणे अशक्य असल्याने रक्ताची कमतरता ही रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानानेच दूर होऊ शकते त्यामुळेच रक्तदान हे जीवनदान असे म्हटले गेले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सब किरण ताई लंगोटे मॅडम यांनी येथे केले .

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे दोन दिवसीय भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सईबाई मोठे उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दिनेश खेकडे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी किरण लंगोटे मॅडम बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी ताई शर्मा ,मातृशक्ती संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ रजनी ताई चव्हाण, यांच्यासह संघटनेच्या अनेक महिलांनी रक्तदान शिबिरात उस्फूर्तपणे रक्तदान करून हम किसीसे कम नही हे दाखवून दिले रक्तदान केले.

शेगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आयोजित या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे आरोग्य इन्स्पेक्टर लाभीनी पाटील, सईबाई मोटे उपजिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढीचे डॉक्टर दिनेश खेकाळे, ब्लड बँक टेक्निशियन अनिकेत निकम ,ब्लड बँक टेक्निशियन, निलेश ब्रदर, प्रदीप बकाल, यांच्यासह चालक सुरेश भाऊ कौसकार यांच्या सोबतच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरीताई शर्मा ,राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ लीनाताई पाचबोले ,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ रत्नाताई डिक्कर ,प्रदेश संघटक

अलकाताई बांगर ,विभागीय सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे, बुलढाणा जिल्हा सचिव सौ.मंदाकिनी चव्हाण राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा सचिव सौ फुलाबाई राठोड, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटने च्या खामगाव शहर अध्यक्ष सौ रंजनाताई चव्हाण रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या शेगाव तालुका अध्यक्ष सौ रोशनी कबीरदास ,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना युवा ब्रिगेड अध्यक्ष कु. कुसुम रितेश चव्हाण शेगाव तालुका महिला बस प्रवासी संघटनेची तालूका अध्यक्ष कु. ज्ञानेश्वरी बढे, प्रशांत बकाल ,श्रीधर पाटील शेगाव, तालुका डिजिटल मीडिया चे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास आदीसह रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिलांनी सहकार्य केले

स्पर्धा परीक्षा शुल्क वाढी विरोधात,जंगली रमी विरोधात मानवहित रस्त्यावर येणार

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

मानवहित लोकशाही पक्ष बुलढाणा जिल्हा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन स्पर्धा परीक्षा ची वाढलेली परीक्षा शुल्क कमी करावी व सोशल मीडियावर प्रत्येक व्हिडिओ वर येणाऱ्या तीन पत्ती,जंगली रमी, माय 11सर्कल आणि येणाऱ्या अस्लील जाहिराती बंद करण्यात याव्या ही मागणी केली.

त्यावेळी नागेश्वर पाटेकर म्हणाले या महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर हा आपल्या रक्ताच पाणी करतो आपल्या मुलांना सुशिक्षित करून स्पर्धा परीक्षांसाठी तयार करतो चांगल्या स्पर्धा परीक्षेच्या क्लास साठी त्याच्याजवळ 50 हजार तर सोडा फडणवीस साहेब दहा हजार सुद्धा नसतात.

म्हणून त्या विद्यार्थ्यांचा बाप एक मोबाईल घेऊन देतो की ऑनलाईन द्वारे ते क्लास फ्री असतात पण काही नालायक क्रिकेटर चित्रपटातील कलावंत त्यांना तीन पत्ती आणि रमी खेळायचं सांगतात तर काही जाहिराती ह्या अश्लील व्हिडिओ दाखवून तो इंस्टॉल करायचं सांगतात आणि त्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते त्यासाठी या शासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे

की ह्या फालतू लोकांच्या जाहिराती बंद कराव्या व परीक्षा शुल्क कमी करावा अन्यथा मानवहीत लोकशाही पक्ष रस्त्यावर उतरेल व तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन करे अशी मागणी आणि आवाहन मानवहित लोकशाही पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटेकर यांनी केले

यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

0

 

 

विकी वानखेडे यावल

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतंसंस्थेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे प्रशासकपदाची सूत्रे आहेत.

या पतसंस्थेच्या सावदा येथील शाखेत सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता. यानंतर गाळा मालकाने फेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत गाळा आणि याची अमानत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे यांनी त्या गाळा मालकाकडे पाच लाख रूपयांची मागणी केली होती.

दरम्यान, सदर गाळा मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यात आज सकाळी सखाराम कडू ठाकरे (वय ५६, रा. पाचोरा) यांना धुळे येथे लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ताज्या वृत्तानुसार त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक हेमंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो.शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची होळी करून निषेध

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कायदाची होळी केली. यावेळी सदर कायद्याची अंमलबजावणी साठी गृह विभागाला तात्काळ सूचना द्या अशी मागणी करण्यात आली.

मागील आठवड्यात पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकारावर हल्ला झाला.शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्या संदर्भात संबंधित कार्यकर्त्यांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलम लावण्यात आल्या नाही.

राज्यात कुठेही पत्रकारांवर हल्ला झाल्यास पोलिसां कडून सदर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदविला. तदनंतर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले,

सदर आंदोलनात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, व्हॉइस ऑफ मीडियाचे जि.उपाध्यक्ष मुशिर खान कोटकर, जिल्हा सदस्या सुषमा राऊत, संघटनेचे सचिव सुरज गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश तिडके,अर्जुन आंधळे,शिवाजी वाघ,प्रभाकर मांटे,संतोष जाधव,राजेश पंडित,पूजा कायंदे,मुन्ना ठाकूर,अशोक जोशी,मुबारक शहा,चंद्रभान झिने,विजय जाधव आदी पत्रकारांनी सहभाग नोंदविला.

पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करा शेगावात पत्रकारांची तहसील समोर निदर्शने

0

 

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव : महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे.. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे मात्र हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे..

त्यामुळे या कायद्याची प्रभावीपणे मलबजावणी व्हावी याशिवाय पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई व्हावी यासाठी आज गुरुवारी शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद यांच्या संयुक्त नियमाने राज्यसरकारच्या पत्रकारांविषयीच्या धोरणांचा निषेध करीत निदर्शने करण्यात आली

. डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर आणि शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी तहसीलदार समाधान सोनावणे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास 200 पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना, धमक्या, शिविगाळ केली गेली .. मात्र केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांचा मनात उरली नाही.

. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली आणि दुसरया दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला.. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे..

असे असले तरी मारहाण करणारया गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणारया आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही..पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील 75 टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे.. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत..

हे थांबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे यासाठी सरकारकडे आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत, पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिकारयावर कारवाई व्हावी, जेणे करून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल.

. दुसरी मागणी अशी आहे की, पत्रकारांवरील हल्लाचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत..जेणे करून पत्रकारांना न्याय मिळू शकेल. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांचे मार्गदर्शनात राज्यव्यापी आंदोलनाला पाठीबा देण्यात आला.

निवेदनावर डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख,राजेश चौधरी,संजय सोनोने,धनराज ससाने नंदू कुलकर्णी, अविनाश दळवी,राजवर्धन शेगावकर, नारायण दाभाडे, सचिन कडूकार, प्रशांत इंगळे, राजकुमार व्यास, अर्जुन कराळे, नितीन घरडे, संजय त्रिवेदी, ललित देवपुजारी, समीर शेख, इस्माईल शेख, शेख शारीख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अतुलनिय कार्यासाठी अतुल सन्मानितप-त्रकार संघाने केला भव्य सत्कार

0

 

सिंदी रेल्वे ता.१७ :शहरातील अतुल दामोधरराव बेलखोडे यानी रक्तदानाचे अर्धशतक करुन अनेक कृटुबांची, अनेक पेंशन्टची गरजेच्या वेळी महत्त्वाची मदत करुन मदत आणि सेवाभावाचे अर्धशतक पुर्ण केल्याबदलच्या त्यांचा अतुलनिय कार्याची दखल घेत स्थानिक पत्रकार संघाच्या वतीने स्वतंत्राच्या झेंडावंदन प्रसंगी भव्य सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील बुलढाणा अर्बन बँकेत कार्यरत असलेले पन्नास वर्षीय अतुल बेलखोडे यांनी तब्बल ५१ वेळा रक्त दान करुन अनेक पेंशन्टची आणि कुटुंबाची गरजेच्या वेळी भरीव मदत केली आहे शिवाय रक्तदानबाबत समज गैरसमज दुर करुन ५१ वेळा स्वतः रक्तदान करुन आपल्या कृतीतुन अनेकांना या महान कार्यास प्रवृत्त केले आहे.

अतुल बेलखोडे यांच्या या अतुनीय कार्याची दखल रक्तदान सारख्या महान कामात शहरातील तरुनांनी समोर यावे यासाठी ७७ व्या स्वतंत्र दिनानिमित्त बाजार चौकातील सर्वपक्षीय झेंडा वंदन प्रसंगी सिंदी रेल्वे पत्रकार संघाच्या वतीने अतुल बेलखोडे यांचा शाल श्रीफळ आणि मोमेंटो तसेच गुणगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद छाजेड सचिव बबलू खान, सन्मानित सदस्य मोहन सुरकार, ओमप्रकाश राठी, अमोल सोनटक्के, गुड्डू क्युरेशी, प्रशांत कलोडे, प्रशांत बोरीकर आदीची प्रमुख उपस्थीती होती.

सिंदी रेल्वे पत्रकार संघा तर्फे बेलखोडे यांचा सत्कार करताना

कर्तव्यदक्ष लाईनमनची बदली रदद करा…गांधी चौक विचार मंचची निवेदणातुन मागणी

0

 

सिंदी रेल्वे ता.१५ : महावितरनचा चार वेळा कर्तव्यदक्ष लाईनमन पुरस्काराचा मानकरी ठरलेला सचिन धोटे यांची नुकतीच झालेली बदली रदद करुन सिंदीकरांची होणारी असुविधा दुर करण्याबाबत गांधी चौक विचार मंचने मंगळवारी ( ता.१५) निवेदन देऊन मागणी केली आहे.

असंख्य ग्राहकाच्या स्वाक्षऱ्या असलेले सदर निवेदन नुकतेच रुजू झालेले कनिष्ठ अभियंता विनोद चाचेरकर यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील महावितरन कर्मचाऱ्यांच्या अभियंत्यासहित नुकत्याच बदल्या करण्यात आल्या यामुळे येथील मागील दोन तीन वर्षांपासून सुरळीत सुरू असलेले शहराचे विद्यृत नियोजन पुर्ते कोलमडले आहे.

नवनियुक्त कर्मचारी अद्याप रुज झाले नसुन जुनाजनता कर्मचारी कोणीच नसल्यांने आकस्मिक पावर कट झाल्यास पुर्ती फजिती होते.
विशेष म्हणजे महावितरन शाखा सिंदी च्या अंतर्गत ४२ ट्रान्सफारमर असुन असंख्य थ्री फेस आणि घरगुती ग्राहक आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असने गरजेचे आहे. मात्र येथे तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. याच तीन कर्मचाऱ्यांवरच बीलाच्या वसुलीचे सुध्दा अतिरिक्त काम देण्यात आल्याने विज ग्राहकाची तक्रार वेळीच निकाली काढणे शक्य होत नाही.

यामुळे स्थानिक महावितरन शाखे विरुद्ध विद्यृत ग्राहकाचा रोष वाढत असुन विद्युतसेवा ही अत्यावश्यक असुन सर्वाची निकडीची गरज आहे. शिवाय पुढे सण उत्सव होवू घातले आहे. गोकुळअष्टमी, गणपती आणि त्यानंतर सिंदी शहर ज्यासाठी महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे तो विख्यात पोळा उत्सव साजरा होणार आहे इतिहासकालीन पोळ्यात दोन लाखांहून अधिक चाहत्यांची गर्दी होते यावेळी विद्यृत व्यवस्था चोख ठेवण्याची मोठी जबाबदारी महावितरन कर्मचाऱ्यांवर असते पोळ्यापुर्वी तरी कर्मचारी कमी संख्येची ही अडचन दुर करण्यात यावी आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची झालेली बदली ताबडतोब रदद करावी अशी मागणी होत आहे

 

कनिष्ठ अभियंता विनोद चाचेरकर यांना निवेदन देतांना गांधी चौक विचार मंचचे कार्यकर्ते

अकोला सिटी कोतवाली पो.स्टेशन मध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचारीने केली गळफास घेऊन आत्महत्या

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अकोला : प्रत्येक व्यक्तीला आयुष्य हे एकदाच मिळते. ज्या मध्ये काही व्यक्ती जिवनाला कंटाळून आत्महत्या करतात. असाच काही प्रकार अकोला येथील सिटी कोतवाली पो.स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या वृषाली दादाराव स्वर्गे वय (३५) यांच्या सोबत घडला. सविस्तर वृत्त अशे कि, सिटी कोतवाली हद्दितील गिता नगर मध्ये राहणारी पोलीस कर्मचारी १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या कार्यक्रमाला हजर नव्हती. दरम्यान वृषाली ज्या अपार्टमेन्ट मध्ये राहायची त्या अपार्टमेंट शेजारील लोकांना त्या कमर्‍यामधून दुर्गंधी येत होती.

दुर्गंध येत असल्यामुळे शेजार्‍यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतुन बंद असल्याने उघडता आला नाही. म्हणून त्यांनी सिटी कोतवाली पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून दरवाजा तोडून कमर्‍याच्या आत प्रवेश केला. या वेळी वृषाली स्वर्गे ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. दरम्यान वृषाली जवळ एक सुसाईट नोट आढळून आली.

त्यामध्ये तिने लिहल आहे कि, पतिचे निधन झाल्यानंतर आयुष्यात आज एकटीच राहिली आहे. त्यात मुल-बाळ सुद्धा नाही. जगाव तर कोणासाठी? त्यामुळे आज माझ्या इच्छेने मि आपल जिवन संपवत आहे. माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार समजू नये. हे सर्व काही स्व:ता करीत आहे. अस त्या सुसाईट नोट मध्ये नमुद केल आहे.

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात श्रवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तसेच परिसरात व पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

चुंचाळे रस्त्यासाठी आज डी.एम.पाटील यांनी केले भव्य रस्ता रोको आंदोलन लिखित आश्वासनानंतर आंदोलन मागे

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

-चुंचाळे गाव ते चुंचाळे फाटा रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय व बिकट झालेली आहे सदर रस्ता नागरिकांच्या वापरासाठी धोकेदायक बनला आहे तरी सदर रस्ता तात्काळ दुरुस्तीसाठी चुंचाळे येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील डी एम पाटील यांनी जळगाव कलेक्टर व संबंधित प्रशासनास लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती व रस्त्याचे काम वेळेत न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित विभागाकडून कुठलीच अशी ठोस कारवाई न झाल्याने आज दि.१५ आँगष्ट रोजी सदर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

याबाबत सविस्तर असे की, दि.२०/७/२०२३ रोजी जळगाव जिल्हा कलेक्टर यांना यावल तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी यांना डी एम पाटील यांनी भेटून चुंचाळेगाव ते चुंचाळे फाटा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था बघून दुरुस्तीची मागणी केली होती.सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने रस्ता खराब आहे व त्यामळे सर्व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अश्या या नादुरुस्त रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चुंचाळे येथील डी एम पाटील यांनी लावून धरली मात्र झोपलेले प्रशासन काही जागे झाले नाही व काही कार्यवाही करण्यात प्रशासन अपयशी ठरले परंतु प्रशासन जरी झोपलेले असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील प्रशासनाला जागं करेल कारण इथं प्रश्न नागरिकांच्या जीवाचा आहे अशी

आक्रमक भूमिका घेत दिनांक १५ आँगष्ट रोजी चुंचाळे फाट्यावर आंदोलन सुरू करण्यात आले गावकरी व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिल्याने डी एम पाटील यांनी आभार मानले

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तडवी साहेब यांनी दिले लेखी स्वरूपात आश्वासन संदर्भ पत्र क्र. ५ नुसार कळविण्यात येत आहे की पावसाळा संपल्यावर दिनांक २६/१०/२०२३ नंतर सदर काम सुरु करण्यात येईल. तरी आपण दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी करीत असलेले रास्ता रोको आंदोलन स्थगीत करावे व या कार्यालयास सहकार्य करावे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तडवी साहेब यांनी असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास दिनांक २७/१०/२०२३ रोजी परत याचं रस्त्यावर उग्र व तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल यांची नोंद संबंधित अधिकारी यांनी घ्यावी असे चुंचाळे येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले यावेळी
सरपंच प्रतिनिधी, मुबारक छबु तडवी, माजी सरपंच नत्थु रमजान तडवी, वि. का. व्हा. चेअरमन ईस्माईल तडवी, माजी सरपंच दगडु तडवी, भाजप सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, वि. का. सो. संचालक, नानाबापु, रवींद्र पाटील,समाधान निळे, शिवाजी गजरे शिवसेना ता. अध्यक्ष रविंद्र सोनवणे,रोहिदास महाजन, रमेश लिंगायत, किनगांव, (ऊ.बा.ठा) बोराळे माजी उपसरपंच भिमराव वानखेडे चुंचाळे योगेश पाटील, रविंद्र सोनवणे,सुपडु संदानशिव,राजु वानखेडे , सुकलाल पाटील. साहेबराव पाटील. युवराज पाटील. संदीप पंडित यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते.

स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून फ्री क्लास मध्ये शिक्षण घेणाऱ्या ३४ मुलांना केले शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप.

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

येत्या पंधरा दिवसात चालू होणार फुले शाहू,आंबेडकर नावाने गावातील मुलानसाठी अभ्यासिका,तर परिसरातील लोकांना केले धम्म दान करण्याचे आव्हाहन.

यावल तालुक्यातील बोराळे या लहानश्या गावात,जगाला शांततेचा संदेश देणारे, महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती पासून चालू करण्यात आलेल्या समाज मंदिर (विहार) बोराळे गावात,नियमित सकाळी ७ वाजता बौद्ध पुजा पाठ व संध्याकाळी ठीक ५:०० वाजता १ली ते ८ पर्यंत (फ्री क्लास) मध्ये,
आज १५ ऑगस्ट २०२३ भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गावातील धम्म बंधू आयु.भिमराव सुका वानखेडे यांच्या वतीने त्यांचा नातू आयु.जिग्नेश (विर) विकी वानखेडे याच्या हस्ते, क्लास मध्ये नियमित येणाऱ्या,हुशार होतकरू ३४ मुला/मुलींना शिक्षण उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नवीन पर्वाची वाटचाल म्हणून चालू करण्यात आलेली मोहीम काबीज व्हावी म्हणून, बोराळे गावातीलच सुपडू संदानशिव व त्यांच्या सोबत कार्य करत असलेले बौद्ध वाड्यातील धम्म बांधव यांच्या प्रयत्न मुळे आज सफलता मिळत आहे,क्लास चालू करण्याचा जो उद्देश असा की गावातील अनेक मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,त्यांचे मनोबल वाढावे तसेच बौद्ध वस्तीतील मुला/मुलींना धम्माची जाणीव व्हावी म्हणून हे केंद्र/क्लास चालू करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात पुढील प्रमाणे घोषणा देखील संदानशिव यांनी केली की, येत्या पंधरा दिवसात याच ठिकाणी चुंचाळे व बोराळे गावातील भरती तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नवतरुण मुला/मुलींसाठी फुले,शाहू आंबेडकर नावाने अभ्यासिका देखील चालू करण्यात येणार असून ज्या बंधू/भगिनींना अभ्यास करण्यास उपयोगी वस्तू द्यायच्या असतील त्यांनी देखील सहकार्य करावे,पैसे न देता वस्तू रुपी तसेच महापुरुषांचे पुस्तके भेट देण्यात यावी,जेणे करून अभ्यास करण्यास उपयोग होईल.

सदर वेळ प्रसंगी,भिमराव सुका वानखेडे,विवेकानंद मुरलीधर तायडे,शंकर सावळे,शिवाजी गजरे,विकी वानखेडे,राजू सोनवणे,अमर वानखेडे आदी उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद मुरलीधर तायडे यांनी केले तर आलेल्या बांधवांचे आभार सुपडू संदानशिव यांनी मानले.