Home Blog Page 180

शेगांव मध्ये शुक्रवारी डिजिटल मिडिया परिषदेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन.

0

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हाप्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन येत्या शुक्रवारी शेगांव येथे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यातील युट्युब चॅनेल चे व पोर्टलचे संपादक आणि पत्रकार यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अनिल उंबरकार यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सरांच्या आदेशानुसार व श्री राजेंद्र काळे राज्य उपाध्यक्ष,श्री अमर राऊत विभागीय सचिव,श्री नितिन सिरसाट प्रदेश प्रतिनिधी,श्री रणजितसिंह राजपूत प्रदेश प्रतिनिधी,श्री चंद्रकांत बर्दे जिल्हाध्यक्ष,श्री अजय बिल्लारी कार्याध्यक्ष,श्री सतिषआप्पा दुडे कार्याध्यक्ष,श्री राजेश चौधरी विभाग संघटक,संदिप शुक्ला जिल्हा सरचिटणीस या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे डिजिटल मिडिया परिषदेच्या पहिल्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामभवन, शेगांव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले.

असून या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुका अध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे हे सर्वांना या बाबतीत आगामी काळातील ध्येय धोरणे आणि काही महत्वपूर्ण सुचना करणार आहेत

.त्यांच्या सोबत डिजिटल मिडिया परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम धन्वे यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.तसेच विभागीय अधिस्विकृती समितीवर निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे,पुरस्कार प्राप्त राजेश चौधरी,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहिमभाई देशमुख, सचिव नंदु कुळकर्णी,मावळते अध्यक्ष धनराज ससाने,सचिव दिनेश महाजन यांचा सत्कार आयोजित केलेला आहे.

तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक,पत्रकार यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहनही डिजिटल मीडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकार यांनी केले आहे.

यावल पंचायत समिती समोर पंचायत समिती गट नेता शेखर पाटील यांचे आमरण उपोषण

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम येथे 2020 पासुन आज पर्यंत ग्रामपंचायत सावखेडा सिम येथिल सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, यांनी ग्रामपंचातीला येणारा निधी चा अपहार केला असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आमरण उपोषण कर्ते माजी पंचायत समिती गट नेता शेखर पाटील यांनी केली आहे.
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे सन 2020 पासुन आज पावेतो झालेला अपहार पाहता.

या बाबत लेखी तक्रार तोंडी सूचना गटविकास अधिकारी यांनी आज पावेतो सावखेडा सिम येथिल ग्रामपंचायत मध्ये अपहार करण्याऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही गटविकास अधिकारी यांनी केलेली नाही. त्यामुळे आज दिनांक 14/08/2023 पासुन माजीपंचायत समिती गट नेते शेखर पाटील यांनी आमरण उपोषण निर्धार केला असुन जो वर अपहार करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल होत नाही .

जो पर्यंत अपहार करण्याऱ्यावर कार्यवाही व गुन्हे दाखल केले जाणार नाही तोवर उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी मागणी उपोषण कर्ते माजी पंचायत समिती गटनेता शेखर पाटील यांनी केली असुन आमरण उपोषण कर्ते यांना तालुक्यातून पाठिंबा दिला जात आहे.

यावेळी माजी पंचायत समिती गटनेते शेखर पाटील यांच्या सह जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल तालुका शहर काँग्रेस चे अध्यक्ष कदीर खान, काँग्रेस अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे सावखेडा सिम येथिल ग्रामस्थ यांच्या सह आमरण उपोषणास पाठिंबा दिला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एस टी महामंडळा चा ठेंगा कमकुवत पुलावरून बसेस सुरु

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

राज्य महामार्ग 753 सी हा मुंबई ते नागपूर राज्य महामार्ग आहे या मार्गावरच राहुरी येथे खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पुल आहे . या पुलाला खूप मोठा इतिहास आहे ,

येथून वाहनाची नेहमी वर्दळ सुरु असते मात्र मागील काही वर्षापासुन हा पुल कमकुवत असल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपने बंद करण्यात आली आहे आणि ते हि जिल्हाधिकारी यांच्या आदेश नुसार . मात्र एस टी महामंडळ आदेशाचे उल्लंघन करीत असून ठेंगा दाखवित बसेस ह्या कमकुवत पुला वरून नेण्यात येत आहे.

दिनांक 14 ऑगस्ट रोजी या पुलावरून बस क्र. एम एच ४० वाय ५६६२ वाशीम ते नाशिक जाणारी ही बस जात असताना तिचे एक्सल तुटले परिणामी बस हि पुलावरच बंद पडली. छोटी –छोटी वाहने या पुला वरूनच ये –जा करीत असताना वाहतूक खोळंबली. वास्तविक पाहता या पुला वरून बस नेण्यास सक्त मनाई आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभाग सोबत चर्चा करून व पुला बाबत अभियंता यांच्या कडून तपासणी हि करण्यात आली अहवालानुसार थोडी दुरुस्ती करण्यात आली

मात्र जास्त काही फरक जाणवला नाही . त्या मुळे काही मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून या पुला वरून कोणतेही वाहन नेऊ नये या बाबत सक्त मनाई करण्यात आली आहे. व या बाबतीत किनगाव राजा ठाणेदार वाघमारे यांनी फलक लाऊन बरीकेटस हि लावलेले आहे. वाहने सुरळीत जावी यासठी वळण मार्ग आहे मात्र महामंडळ बस चालक व इतर वाहन धारक हे फलक कडे काना डोळा करून कमकुवत पुलावरून जात असतात. काही मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल करण्यात येत आहे.

या बाबत किनगाव राजा ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,पुलावरील जड वाहतूक बंद करण्या साठी व बैरिगेट लावण्या बाबत आणि नामफलक साठी संबधीत विभागाला दोन वेळेस पत्र व्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही म्हणून पोलीस स्टेशन च्या वतीने नामफलक व बैरीगेट लावण्यात आलेले आहे तसेच वाहने हि पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. स्वत: सोबत दुसर्याचे जीव धोक्यात घालून पुला वरून वाहने नेऊ नये. असे काही निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल.

आहे का तांदुळ ? तांदुळ आहे का तांदुळ ?

0

 

राशनच्या तांदळाने भरलेला अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

सिंदी रेल्वे ता.१३ : लगतच्या समृद्धी महामार्गावर सिंदी रेल्वे पोलिसांनी नाकाबंदी करुन ट्रक क्रमांक एम एच ४० सि डी ६७०९ या वाहनात ६४४ कट्टे भरलेला २५७ क्विंटल तांदुळ ज्याची किमंत ९२५२००/- रुपयाच्या राशनच्या तांदुळाची अवैधरित्या वाहतूक करतांना रविवारी (ता.१३) जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,

आहे का तांदुळ ? तांदुळ आहे का तांदुळ ? अशी हाक आरोरी प्रत्येक गल्लीबोळातुन दररोज ऐकु येते. चारचाकी वाहन घेऊन बाहेरुन ऐणारे शहरातील राशन धारक कृटुबांकडुन चड्या दराने सर्रास राशन मालाची खरेदी होत असते आणि हाच गल्लीबोळातुन जमा झालेला राशनचा तांदुळ……

तांदुळ माफीया विकत घेऊन मोठ्या खरेदीदाराला पुरवठा करतो मागील कोरोना काळात दोन वर्षांपासून हा व्यवसाय शासकीय यंत्रनेच्या आशिर्वादाने चांगलाच फलाफुलास आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारावर सिंदी रेल्वे पोलिसानी समृर्ध्दी महामार्गावर नाकाबंदी करुन ट्रक क्रमांक एम एच ४० सि डी ६७०९ या वाहनास थाबवुन विचारपुस केली असता वाहन चालक पवन चारमोडे याने वाहनात चना असल्याचे सागुन चन्याचे बिल दाखविल्याने नमुद वाहनाची तपासणी केली असता वाहनात चुगड्यात तांदुळ भरुन मिळुन आल्याने वाहन चालकास तांदळा बाबत विचपुस केली असता तांदळा बाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर केले नाही़.

वरुन आरोपी व ट्रक ताब्यात घेतला असता ट्रक मध्ये ६४४ कट्टे भरलेला २५७ क्विंटल तांदुळ ज्याची किमंत ९२५२००/- रुपये आणि ट्रक किमत २५०००००/-रुपये एकुन ३४२५२००/-रुपयाच्या राशनच्या तांदुळाची अवैधरित्या वाहतूक करतांना रविवारी (ता.१३) जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला

.गुन्हयाचा तपास सह पोलीस निरीक्षक वंदना सोनुने ठाणेदार पोस्टे सिदी रेल्वे करत असुन राशन धान्याची काळाबाजारी करणारे मोठे राॅकेट उघडकीस येवुन राशन माफीया गळास लागण्याची शक्यता आहे. मात्र शहरात दुधाच्या चुकार्यातुन सापडलेल्या पाचशेच्या जाली नोटाचा तपास जसा नागपुरातील हल्लदीराम पर्यंत जाऊन थांबला होता तस होता कामा नये. अशी सिंदीवासीयांत चर्चा आहे.

 

समृद्धी महामार्गावर देऊळगाव कोळ जवळ कार पलटी होऊन दोन गंभीर

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

सिंदखेडराजा

समृद्धी महामार्गावर चैनल नंबर 306.3मुंबई कँरीडाँर वर कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहणावरील ताबा सुटून कार पलटी झाल्याने कार चालक व एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि 13/08/2023 सायंकाळी 5.20 वाजेदरम्यान घडली. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सम्रुध्दी महामार्ग वर पेट्रोलिंग करीत असताना C.NO 306. वर अपघात झाल्याची माहिती पेट्रोलिंग पथकाला मिळाल्याने सदर ते मदत कार्य ठिकाणी पोहचले.
हकीकत अशाप्रकरे आहे की उपकेंद्र दुसरबीड म.पो.केंद्र मलकापूर जि. बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग वर चॅनल नंबर 306.3 मुबंई कॉरिडॉर वर कार क्रमांक GJ 03 LG 8419 चे चालक नामे पार्थ हरपाल वय 35 वर्ष सोबत प्रवीण मधुकर खडसे वय 19 वर्षे रा. वाशिम. हे वाशिम कडून औरंगाबाद कडे जात असताना सदर वाहन चालक यांना झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने सदरचे वाहन पलटी होऊन मिडीयम लाइन मध्ये आल्याने वाहनातील वाहन चालक नामे पार्थ हरपाल वय 34 वर्षे रा. राजकोट हे गंभीर जखमी झाले असून,

सोबत असलेले प्रवीण खडसे हे किरकोळ जखमी झाले आहे . त्यांना औषध उपचार कामी पीएसआय पवार एनपीसी 20 70 पीसी 10 69 यांनी जखमींना तात्काळ तात्काळ ॲम्बुलन्स द्वारे ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठवण्यात आले आहे.

तसेच अपघाताग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली.

पुरग्रस्त जामोद ग्रामवाशीयांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा.

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव/खेललोन जामोद येथील बेंबळेश्वर नदीवरील मोरिया पुल बांधकामात निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे व चुकिच्या डिझाईन मुळे शेकडो नागरिकांना नुकसानिला सामोरे जावे लागले या नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई मिळण्यासाठी व पुल बांधकाम करणाऱ्या संबधीतांनवर कारवाई करा या मागणीसाठी जामोद ग्रामवाशीयांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सदर पुलाच्या मोऱ्या अतिशय लहान आकाराच्या वापरल्या असल्याने पुराच्या पाण्याने वाहून आलेले झाडे, कचऱ्याने बंद होऊन संपूर्ण खेलशिवापूर व खेललोन या परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले असल्यामुळे घराच्या भिंती पडून घरातील संसारकरिता जीवनाश्यक असणाऱ्या वस्तूंची नासधूस झाली आहे. तर कित्येक लोकांचे अन्नधान्य, गुरे, भांडी कुंडी, इले. उपकरणे ही पुराच्या महाभयंकर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

त्यामुळे त्यांना आजपर्यंत उघड्यावर राहावे लागत आहे तसेच भविष्यात सुद्धा पूर्णपरिस्तिथी निर्माण झाल्यास जिवितहानी होऊ शकते परिणामी शासनाकडून मिळणाऱ्या सानुग्रह लाभापासून जाणीवपूर्वक पूरग्रस्तांना वंचित ठेवल्या गेले आहे.त्यामुळे त्यांचे झालेले नुकसान शासनाने योग्य त्या मापडंदात बसविलेले नाही. वास्तविक या ठिकाणी आर सी सी पूल बांधणे गरजेचे होते मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामपंचायतने केवळ भ्रष्टाचाराच्या उद्देशाने सदर मोरीपूल बांधून सर्वसामान्य लोकांची व शासनाची दिशाभूल करून निधी व्यर्थ गमावीला आहे त्यामध्ये फारमोठे नुकसान केले आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर विना विलंब कडक कारवाई करण्यात यावी. व नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी १७/८/२०२३ पासुन जळगाव तहसिल कार्यालयावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसिलदार यांना निवेदनातून दिला आहे.

या वेळी तेजराव लोणे ,असलम खां अली खां, शकील खान अपदूल्हा खान, संजय रजाने, मोतीराम भगत,शे साबीर शे लूकमान,सूबान खा इसमाइल खा, श्री कृष्ण शंकर धुर्डे,जयवंती पवार,मगरुबाइ पवार,,लीयाकत बेग आलम बेग,शे इसूफ शे हमजा ,शे आसिफ शे बब्बू,या वेळेस तसेच लक्षणीय आदिवासी महीला उपस्थित होत्या..

आपली मायी आणि मातीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असावाच….! आमदार समीर कुणावार

0

 

“माझी माती माझा देश” अभियानात हजारोनी घेतली पंचप्रण शपथ

सिंदी रेल्वे ता.१३ : प्रत्येकाला आपल्या मायी म्हणजे जन्मदाती आई आणि जगवणारी मातीचा सार्थ अभिमान असायलाच हवा…! असे गौरवोद्गार आमदार समीर कुणावार यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

स्थानिक नगर पालिका प्रशासणाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा’ समारोप कार्यक्रम म्हणून केद्र सरकारच्या “मेरी माटी मेरा देश” अभियानांतर्गत शनिवारी (ता.१२)ला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मधुकर ठाकरे हे होते. आमदार समीर कुणावार आणि मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा
यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.

कार्यक्रमाची सुरुवात नगर परिषद सभागृहात दिप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते देश स्वातंत्र्य व सुरक्षेसाठी हुतात्मा झालेल्या थोर व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ “शिलाफलकाचे” अनावरण करण्यात आले तसेच वसुधा वंदन करून 75 वृक्ष लावून “अमृत वाटिका” तयार करण्यात आली.

शिक्षक, विद्यार्थी, तसेच माजी नगर सेवक, माजी नगर सेविका, पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व पालिकेचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले व शिक्षक खोडे यांनी वाचन केलेल्या पंचप्रण शपथ सर्वानी हातात दिप प्रज्वलीत करुन घेतली.

तसेच प्रसंगी शहरातील स्वातंत्र्य सैनिक विश्वासराव रामराव देशमुख, श्रीमती. सखूबाई राचेलवार, रमेशचंद्र बळीरामजी देवतळे आणि माजी सैनिक रामदास भगवान बारई, मधुकर साखरकर, अजाब महादेव साबळे,कृष्णा गणपती पेटकर, गोपाल बोरघरे व कवडुजी धोंडीबा नरड आदींचा आदरभाव म्हणून त्यांच्या कृटुबांतील सदस्यांचा नगर परिषद सिंदीच्या वतीने मान्यवराच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय आश्रमा यांनी केले. तर संचालन शिक्षक भगवंत पवार यांनी केले. पंचप्रण शपथेचे वाचन शिक्षक खोडे आणि उपस्थिताचे आभार प्रशासकीय अधिकारी नंदकिशोर चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रमाला शहरातील माजी नगरसेवक, प्रतिष्टीत नागरीक, सर्व बचत गटांच्या महीला, पालिकेचे सर्व कर्मचारी, शिक्षक शिक्षिकां शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यी आदीची उपस्थिती होती.

 

पुरुष जातीचे नवजात शिशु मंदिरात सोडुन माता पसार

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – अनोळखी २५ ते ३० वयोगटातील हिरवी साडी ब्लाऊन परीधान केलेल्या स्त्रीने तिच्याजवळील पुरुष जातीचे नवजात शिशुचा संभाळ न करता ते शिशु संत श्री गजानन महाराज मंदिर परीसरात बेवारस अवस्थेत सोडून निघुन गेली असल्याची घटना दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री ७ वा उघडकिस आली.

या बाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशा प्रकारे आहे की यातील फिर्यादी हे श्री गजानन महाराज मंदिर येथे सेवाधारी म्हणून काम करतात नमूद घता वेळी व ठिकाणी फिर्यादी हे मंदिरात चप्पल स्टैंड परीसरात ड्युटीला हजर असताना अनोळखी २५ ते ३० वयोगटातील हिरवी साडी ब्लाऊन परीधान केलेल्या स्त्रीने तिच्याजवळील पुरुष जातीचे नवजात शिशुचा संभाळ न करता ते शिशु संत श्री गजानन महाराज मंदिर परीसरात बेवारस अवस्थेत सोडून निघुन गेली

या प्रकरणी गोपाल सहदेव काळे वय ३२ वर्ष व्यवसाय ग.म.मे. शेगाव सेवाधारी रा. टाकळी वीरो ता
शेगाव यांनी शहर पो.स्टे. ला फिर्याद दिली असुन तरी सदर अनोळखी महिलेवर कारवाई व्हावी

.अशा फिर्यादीचे तोड़ी रिपोर्ट वरुण अप सदरचा दाखल करुण तपास मा पो नि सा आदेशाने सपोनि.गजानन गांवडे याच्याकडे देण्याण आला आहे

मलकापुर शहर पोलीसांनी मोठी कारवाई गांजा सह आरोपी अटक गांजा केला जात

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

आज 12/08/2023 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी पोस्टे मलकापुर शहर यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, एक इसम त्याचे ताब्यातील पांढन्या रंगाच्या सुझुकी कार क्रमांक ए.पी. 35 एस-2347 मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा गांजा अमली पदार्थ राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 वरील खामगांवकडुन मलकापुरकडे घेवुन जाणार असल्याची बातमी मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून ठाणेदार रत्नपारखी यांच्यासह नापोकों/ 1323 पंजाबराव शेळके डिवी पथकाचे सपोनि. के.पी तायडे पोकों/ 311 आसिफ शेख, पोकॉ/994 प्रमोद राठोड, पोकॉ/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/25 गोपाल तारुळकर, पोकॉ/2732 प्रविण गवई, पोकॉ/1254 आनंद माने, पोकों / 2313 गोपाल इंगळे, पोकों/ 898 मंगेश चरखे

पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी व पोस्टे स्टॉप राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 वरील खामगांव व मलकापुर रोडवरील कन्हैय्या हॉटेलच्या बाजुला पोहचुन सापळा रचला बातमीतील नमुद वाहनाचा शोध घेत असतांना सदर वाहण कन्हैय्या हॉटेल च्या परिसरात पार्क केलेली दिसली व त्यातील दोन इसम सदर वाहणाच्या पाठीमागे उभे होते त्यांनी आम्हा पोलीसांना पाहून पळ काढला असता त्यातील एक इसमांस आम्ही जागीच पकडले त्यांचे नाव गाव विचारले असता,

त्याने त्याचे नाव अजयकुमार नित्यानंद भत्रा वय 26 वर्ष रा. आरएससी- 14 धारागुडा जि. मलकानगिरी राज्य ओडीसा असे सांगितले वरुन त्यांचे कडुन 69 किलो 900 ग्रॅम प्रति किलो किंमत 12,000/- एकुण एकुण 8,26,800/- रुपयांचा गांजा व एक सुझुकी कंपणीची कार क्रमांक ए.पी-35 एस-2347 किंमत अंदाजे 5,00,000/- रुपये असा एकुण 13,26,800/- रुपयांचा मुददेमाल मिळुन आल्याने पोस्टे मलकापुर 419/203 कलम 8 (क), 20 (ब), (ii), (ब) एनडीपीएस अॅक्ट व प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी करीत आहोत.

सदरची कार्यवाही व तपास मा. सुनिल कडासने साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. अशोक थोरात साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. देवराव गवळी साहेब उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सा पोस्टे मलकापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे डिबी पथकाचे सपोनि. के.पी तायडे पोकों/311 आसिफ शेख, पोकों/ 994 प्रमोद राठोड, पोकॉ/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/25 गोपाल तारुळकर, पोकों/ 2732 प्रविण गवई, पोकों/ 1254 आनंद माने, पोकों / 2313 गोपाल इंगळे, पोकॉ/898 मंगेश चरखे व पोकॉ/१०१३ संतोष कुमावत यांनी केली आहे.

यावल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा.

0

प्रतिनिधी ( यावल)विकी वानखेडे

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला‌.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा.एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कामडी यांनी यांनी आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती देताना आदिवासी संस्कृतीचे जतन संवर्धन, आदिवासींचे अधिकार, निसर्ग जाणीव, पर्यावरणाचे रक्षण विषयक टिकून राहिलेली अस्मिता, स्वातंत्र्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान, शासकीय योजना, आदिवासी साहित्या माहिती दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी दिन व क्रांती दिन हे महत्त्वाचे दिवस आहेत हे सांगताना त्यांनी महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध यांनी ९ ऑगस्ट १९४२ साली मुंबईतून चलेजाव चळवळ सुरू केली होती. याची आठवण करून दिली आदिवासी समाज हा पुर्वीपासून डोंगराळ भागात राहणारा निसर्गपुजक आहे

त्यांचे रितीरिवाज, भाषाशैली इतर समाजाहून वेगळी आहे त्यांच्या संस्कृतीला वैभवशाली इतिहास लाभला आहे.एकलव्य आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा हे आदिवासींचे प्रेरणास्थान आहे असे विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक. प्रा. छात्रसिंग वसावे यांनी केले.

तर आभार उपप्राचार्य प्रा. एम. डी .खैरनार यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला प्रा. डॉ.पी. व्ही. पावरा, प्रा.डॉ. सुधीर कापडे,प्रा. डॉ. हेमंत भंगाळे, प्रा.एस.आर. गायकवाड, प्रा.डॉ. आर. डी. पवार, प्रा. मनोज पाटील,प्रा. सी. के.पाटील , प्रा. एकनाथ सावकारे, प्रा.अरुण सोनवणे, प्रा मुकेश येवले प्रा.राजु तडवी उपस्थित होते. तर प्रा. डॉ. संतोष जाधव,प्रा. नंदकुमार बोदडे, प्रा.मिलिंद मोरे, प्रा. प्रशांत मोरे , प्रा. अर्जुन गाढे, प्रा. डॉ. निर्मला पवार, प्रा.डॉ. वैशाली कोष्टी, प्रा.ईश्वर पाटील, संतोष ठाकूर, मिलिंद बोरघडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.