Home Blog Page 189

बाळापुर रोडवरील आनंद सागर विहार जवळ निर्दयतेने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त .दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापुर रोडवरील आनंद सागर विहार जवळ निर्दयपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन शहर पोलिसांनी नाकाबंदी करून जप्त केले याप्रकरणी दोघा आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

आज दिनांक 01/07/2023 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना खात्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली की, एक टाटा कंपनीच्या निळ्या रंगाच्या वाहनांमध्ये 4 गोवंशांना वाहनात टाकून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना जबरदस्तीने अडचणीत दोराने बांधून कोंडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बाळापुर रोड ने घेऊन जात आहे.

अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील सोबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे पोलीस नाईक गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे यांनी आनंद सागर विहार परिसरामध्ये नाकाबंदी करून मिळालेल्या माहितीप्रमाणे निळसर रंगाचे वाहन क्र. MH-28-BB- 5278 ला अडवले.

त्यांनी वाहनातील जनावरांचे पाहणी केली असता त्या मध्ये लाल रंगाचे दोन बैल, एक काळया भुरकट रंगाचा बैल, तसेच एक पांढरे रंगाचा बैल असे एकुण 4 गोवंशीय जनावरे बळजबरीने वाहनात कोंबून दोराने बांधून निर्दयतेने वाहून नेतांना मिळून आले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास त्याचे नाव व गावाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव अमीर खान बुढण खान वय 24 वर्षे रा. इदगहा प्लाट शेगाव असे सांगीतले.

त्यास वाहनातील जनावरे बाबत अधिक विचारना केली असता त्याने वाहनातील नमूद चार गोवंशे ही ( आरोपी क्र.2) मोहमंद शकील मोहमंद शफी वय 42 वर्षे रा. बाळापुर याचे सांगणे वरून कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथुन खरेदी केले व बाळापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले.

वरून दोन्ही आरोपीतांचे कृत्य हे कलम कलम 11(1) (घ) (ड) (च) प्राणी निदर्यतेने वागविने अन्वये गुन्हा होत असल्याने प्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी राहुल काटकाडे हे करीत आहे.

राजश्री गेस्ट हाऊस च्या पाठीमागे पैशाच्या हरजीत वर सुरू असलेल्या जुगारावर छापा.5 आरोपींना रंगेहात पकडले. पाच ऑटो रिक्षासह दोन लाख 2220 रुपयांचा मुद्देमात जप्त .

0

 

 

इस्माईलशेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : शहर पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस पथकाने जुन्या मंदिर रोडवर असलेल्या राजश्री गेस्ट हाऊस च्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हारजीत वर जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की , आज दिनांक 01/07/2023 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम राजश्री गेस्ट हाऊस च्या मागे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाचे हारजीतवर खेळत खेळवित आहे अशी खात्रीलायक मिळालेल्या माहीतीच्या आधारे

पो. स्टाप ने उपरोक्त ठिकाणी महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत छापा कारवाई करून आरोपी 1) सैय्यद नजिर सैय्यद युसुफ वय 55 वर्षे रा. पेठ मोहल्ला शेगाव (2) शेख समीर शेख बच्चु वय 20 वर्ष रा. जमजम नगर शेगाव 3) मोहमंद असलम शेख मुसा वय 44 वर्षे रा. महात्मा फुले शाळे मागे शेगांव

4) शेख जुनेद शेख फारूक वय 25 वर्षे रा. फरशी परिसर शेगाव 5) शेख इरफान शेख युसुफ वय 38 वर्ष रा. लेडी तलाव शेगाव यांना पकडून ताब्यात घेण्यात आले यावेळी त्यांचे अंगझडतीतून नगदी 1650 रूपये तसेच खाली जमीनीवर जुगार डावा वरील नगदी 550 रूपये असे एकुण नगदी 2200 रू. डायावर पडलेले 52 तारापत्ते कि. 20/-रुपये. तसेच घटनास्थळ मिळुन आलेले बजाज कंपनीचे 5 अँटो 1) MH 28 R 2658 2) MH 28 C 91163) MH 19 BU 95784) MH28R 1684 असे जुने वापरते अॅटो अंदाजे 2,02,220 रुपये चा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 12अ महाराष्ट्र जुगार बंंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एएस आय गजानन गावंडे हे करीत आहेत.

शेगाव शहर पोलिसांनी झाडेगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून तिघांना घेतले ताब्यात, तर चौघे फरार..

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे पाण्याच्या टाकी खाली पैशाच्या हार् जीत वर ताश फक्त जुगार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली या माहितीवरून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव पोलीस नायक निलेश गाडगे यांनी झाळेगावयेथे पाण्याच्या टाकी खाली छापा मारला असता

त्या ठिकाणी पैशाच्या हार्दिक वर तास फक्त जुगार खेळताना विश्वास दिनकर माळी वय 45 वर्ष राहणार झाडेगाव, गणेश नरहरी माळी व सत्तर वर्ष व सुभाष दिनकर माळी वय 45 सर्व राहणार झाडेगाव तालुका शेगाव या तिघांना पोलिसांनी जागीच पकडले

व त्यांच्याकडून अगदी 420 रुपये काश पत्ता किंमत वीस रुपये आणि डावावर पडलेले 180 रुपये असा एकूण 620 रुपयांचा जुगार म** जप्त केला यावेळी नंदकिशोर जगन्नाथ माळी दिनेश रामदास माळी एकनाथ गणेश सराफ पंकज सुदामा बाभुळकर सर्व राहणार झाळेगाव हे फरार होण्यास यशस्वी ठरले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 12 महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस नायक निलेश गाडगे करीत आहेत

हरविलेल्या मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला तीच्या पालकांचे ताब्यात.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक ३०/०६/२०२३ रोजी भावीक भक्त सौ प्रियंका सचिन मसने वय 35 वर्षे राहणार नागपूर हे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शना करीता त्यांची मुलगी कुमारी आराध्या वय 7 वर्षे हिचेसह आले असता श्री. गजानन महाराज मंदिर परीसरात भाविक भक्तांचे वर्दळीत त्यांची 7 वर्षांची मुलगी कुठेतरी हरवीली.

तेव्हा त्यांनी लगेच मुलीचा शोध घेण्यासाठी बंदोबस्तात हजर असलेले पोलिसांना गाठले असता पोलीसांनी मुलीचे शोध कार्यवाहीसाठी कार्यतत्परता दाखवुन मुलीचा शोध करीता सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली व मुलीचा शोध घेऊन तिला तिचे आईचे ताब्यात दिले. वरून त्यांनी पोलिसांचे मन:पुर्वक आभार मानले.

तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही

या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संत नगरी शेगाव मध्ये पंढरीच्या राजाचे आगमनाने आषाढी एकादशी उत्सव साजरा…!

0
  • विठ्ठल अवताडे शेगांव

स्थानिक शेगाव मधील रोकडिया नगर ( पवन गिरी वसाहत) येथे स्थानिक नागरिक आणि श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समितीच्या सहयोगाने नूतन श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिव लिंग प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळा सोहळा पार पडला दिनांक २७-६-२०२३ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिवलिंग यांच्या मूर्तीचे आगमन आणि शोभायात्रा पार पडली

तर दुसऱ्या दिवशी हवन पूजन स्थापना आणि कळस स्थापना पार पडली तर आज आषाढी एकादशीला सकाळी १० ते ११.३० पर्यंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज मिरगे यांचे प्रवचन झाले त्यानंतर दानशूर व्यक्तींचा स्वागत सत्कार समारंभ आणि प्रसाद वाटप झाला तर सायंकाळी चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतीमे सह टाळ मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली ,या

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तथा स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले तर भविकभक्तांसाठी आता पंढरीच्या राज्याचे दर्शन संत नगरीत घेण्याचा योग या निमित्ताने आला तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समिती मर्फक्त करण्यात आले .

आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथे लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन..

0

 

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त आज 29 जून रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात लाखो भाविकांनी श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी करणे सुरू केले होते जे भाविक आषाढीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शना निमित्त जाऊ शकत नाही असे भाविक विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

संत नगरी शेगाव शहरात श्रीं संत गजानन महाराज मंदिरामध्ये येऊन श्री संत गजानन महाराजांचे समाधी मंदिराचे व श्रींच्या शयन गृह जवळील विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेत असतात आज गुरुवार 29 जून रोजी आषाढी निमित्त मंदिरात पहाटे पासूनच आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन बारी मध्ये तीन ते चार तास अतिशय श्रद्धेने व शिस्तबद्ध रीतीने उभे राहून श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे राम लक्ष्मण सीतामाता व हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आषाढी एकादशी तिथी सोबतच आज श्रींचा पवित्र गुरुवार चा दिवस अशा दुहेरी संयोग मिळून आल्याने

हजारो भाविकांनी पारायण ग्रहांमध्ये पहाटेपासूनच श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे भक्ती मय वातावरणामध्ये पारायण केले आज श्रींच्या गुरुवारच्या दिवशी आषाढी एकादशी तिथी आल्याने मंदिरामध्ये दर्शनाकरिता भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा दुप्पटीने वाढलेली दिसत आहे संध्याकाळी साडेपाच वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून श्रींच्या रजतमुखाची शेकडो टाळकरी भगवा ध्वजथारी यांच्यासह गण गण गणात बोते चा गजर करीत आषाढी एकादशी निमित्त पालखी करण्यात आली पालखीमध्ये शेकडो भावीक सहभागी झाले होते

यावर्षी हिंदू धर्मियांचे पवित्र तीथी आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मियांचे बकरी ईद हे दोन्ही एकत्रित एकाच दिवशी आल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याकरिता शेगाव येथील कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विवेक पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेगाव शहरात ठीक ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त लावण्यात आला दुपारी दोन वाजता श्रींच्या मंदिरातून पालखी काढण्यात आली

कलेक्टरच्या समोर वाचला शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा….

0

 

जळगाव जा :- २८ जुन रोजी बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर तुम्मोड साहेब जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शेतकरी या नात्याने रिपाईचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलेक्टरच्या समोरच आपल्या समस्या मांडल्या… विशेषतः पेरणी पावसाचे दिवस जवळ येवून सुद्धा शेतकऱ्यांना हवे ते बि बियाने बाजारात मिळत नसुन त्याची कृत्रिम टंचाई निर्मान केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने नको ते बायाने घ्यावे विकत घ्यावे लागत आहे.

एकीकडे जिल्ह्यात अधीकाऱ्याकडून जिल्ह्यात बी बीयाने मुबलक स्वरूपात आहे असे सांगितले जाते तर दुसरीकडे अशा प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे अगोदरच हवालदार झालेला बळीराजा फार अस्वस्थ झाला आहे.

सभ्रमाअवस्थेत सापडलेल्या शेतकरी राजा एकप्रकारे संकटात सापडला आहे.त्यामुळे अशा संकटात सापडलेल्या बळिराज्याच्या प्रश्नाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हवे ते सोयाबीन व कपाशी वान बाजारात उपलब्ध होईल यावर पावाले उचलून कृषी केन्दा मार्फत जो बियानांचा कृतीम तुटोडा निर्मान केल्या जात आहे तो दुर करून शेतकरी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

यामध्ये प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी कागदोपत्रीच कागदांचा बाजार मांडत असून, बाजारा मुबलक बियाने उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांना भासवत आहेत.एकप्रकारे ते शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूकच करत आहे.कृषी विभागा मार्फत खोटी माहिती आणि चुकिची माहिती आपणाप्रयंत कागदोपत्री पोहचवल्या जात असून वास्तव मात्र वेगळ आहे.प्रत्येक तालुक्यातील अधीकारी आपणास कागदोपत्री खोटी माहीती देत आहे.

हे जीवंत वास्तव सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा आधिकारी यांना सांगितले.
रुची १००१ सोयाबीन चे वान व असेच आधिक उत्पन्न देणारे बियाने बिजारात उपलब्ध नाही तेव्हा अशा बियाण्याची उपलब्धता होण्यासाठी आपल्या स्तरावरुन त्वरीत पावले उचलावी,तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे दावे महसुल विभागाकळे अनेक वर्षापासुन प्रलबित आहे ते दावे पेरणी वजळ येवून सुद्धा प्रलंबीत आहे,

त्याकळे सुद्धा आपन लक्ष देवुन प्रलंबीत दावे तात्काळ निकाली काढावे यासह अनेक समस्याचा पाढच जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर कथन केला.विशेषतः एक शेतकरी या नात्याने आर.पी.आय.युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांनी या महत्त्वाच्या मागणी साठी जिल्हा आधिकारी याची भेट घेवून चर्चा केली.व या बाबीकडे कलेक्टरचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना विश्वासात घेत जिल्हा अधीक्षक यांनी सांगितले की,कृषी विभागाला या बाबत अलंर्ट केले जाईल व प्रलंबित शेत रस्ते दावे बाबत जळगाव महसूल विभागाला तशा सुचणा केल्या.तसेच शेतकऱ्यानी जो प्रयत्न पेरणीयोग्य पाऊस होत नाही तोप्रयंत पेरणी करूच नका असा सल्लाही यावेळी कलेक्टर महोदयांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी प्रशांत तायडे,अक्षय पाटिल, भास्कर भटकर, प्रभाकर वानखडे ,अनिकेत पाटील, बाळु दामोधर इत्यादी शेतकरी उपस्थीत होते

हरविलेली मुलाचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले त्याला आई वडिलांचे ताब्यात.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक २९/०६/२०२३ रोजी महत्त्वाच्या अशा आषाढी एकादशी निमित्त संत श्री गजानन महाराज येथे भाविक भक्तांची गर्दी उसळलेली आहे. त्यात भाविक भक्तांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन शेगाव शहर चे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील व परी पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील यांनी चोख बंदोबस्त नेमलेला आहे.

या बंदोबस्ताचे फलस्वरूप आज दर्शनाकरिता आलेले भाविक भक्त निलेश पस्तापुरे राहणार मालेगाव तालुका पातुर यांचा आठ वर्षाचा मुलगा श्लोक हा दर्शना दरम्यान लोकांच्या गर्दीमध्ये हरविला होता त्यांनी बंदोबस्त ला हजर असलेल्या पोलिसांना मुलाचा फोटो व माहिती देताच पोलिसांनी बंदोबस्त ला हजर असलेल्या सर्व अमलदारांना मोबाईल व्हाट्सअप द्वारे फोटो पाठवून लहान मुलगा श्लोक याचा शोध घेतला. शोध घेण्यासाठी सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली. हरवलेली मुलगा मिळाल्याने व्याकुळ झालेल्या आईचे आनंदाश्रु अनावर झाले.

तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

बकरी ईद निमित्त परी पोलीस उपाधीक्षक श्री विवेक पाटील व पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन दिल्या हार्दिक शुभकामना.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील परी पोलीस उपाधीक्षक श्री.विवेक पाटील व पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी महत्त्वाच्या अशा बकरी ईद व आषाढी एकादशी बंदोबस्त दरम्यान शेगाव येथील मुख्य जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजबांधवांची नमाज अदा झाल्यानंतर त्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यांना पुष्पगुच्छ देऊन बकरी इदच्या शुभकामना दिल्या.

बंदोबस्त करिता आलेले अधिकारी व अंमलदार यांना बकरी ईद बंदोबस्त शांततेत पार पडल्याबद्दल अभिनंदन करून बंदोबस्त काळात मुस्लिम समाजवासीयांनी पोलिसांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व एकादशी आषाढी बंदोबस्ता करिता रवाना झाले.

शेगाव शहर पोलिसांनी केली अमली पदार्थ गांजाचे सेवन करणाऱ्या तीन गुन्हेगारांवर कारवाई

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी दिनांक 26/06/2023 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशन द्वारे अमली पदार्थ विरोधी दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला होता त्यात पोलिसांनी तरुण पिढीला शाळेत जाऊन तसेच शेगाव शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाणी बोर्ड होर्डिंग लावून, लाऊड स्पीकर द्वारे पेट्रोलिंग दरम्यान अनाउन्समेंट करून तर विविध प्रसारमाध्यमांद्वारे जाहिराती देऊन जनजागृती केली होती.

अमली पदार्थ प्रतिबंध हेतू प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता शेगाव शहर पोलिसांनी त्यांचे स्थानिक गोपनीय बातमीदार यांना सतर्क करून ठीक ठिकाणी छापेमारी केली होती त्यात शासनाद्वारे प्रतिबंधित अमली पदार्थ गांजाचे विक्री करणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले होते व त्याचेकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे अमली पदार्थ सेवन करणारे गुन्हेगारांवर देखील कार्यवाहीसाठी विशेष मोहीम सत्र राबवून आज रोजी 07:30 वा. सुमारास ठिकाणी इतके वा सुमारास स्थानिक पोस्टचे गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे पोलीस निरीक्षक विलास पाटील व परि. पोलीस उपअधीक्षक श्री विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी नामे
1- असलम खान हारुन खान वय 33 वर्षे रा. डगडाळी पुरा शेगाव
2-शेख युनुस शेख रमजान वय 51 वर्षे रा. आझाद नगर शेगाव
3- शेख अब्बास शेख जिलानी वय 33 वर्षे रा. खळवाडी परिसर शेगाव

यांच्यावर सकाळी 07:30 वा. सुमारास जुने बस स्थानक परिसरातील पाण्याचे टाकीजवळ वचनाम्यातील नमूद पंच समस्या छापा कारवाई केली असता नमूद आरोपी हे त्यांचे जवळील चिलम मध्ये शासनाद्वारे प्रतिबंधित अमली पदार्थ गांजा चे सेवन करताना मिळून आले.
त्यांचेवर शेगांव शहर पोलिसांनी कलम 8(क), 27,29 N.D.P.S. ACT अंतर्गत गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात आली.