Home Blog Page 190

समुद्रपुरात 6 लाख 12 हजाराची गावठी दारू जप्त

0

 

प्रमोद जुमडे, समुद्रपूर, वर्धा

पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात ईद व आषाढी सण बंदोबस्त दरम्यान पो.स्टे. समुद्रपुर डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे,श्रीकृश्ण इंगळे व 14 गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी आज दि 28/06/2023 रोजी पो.स्टे. समुद्रपुर परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात जमिनीत गाढुन व झुडपात लपवुन असलेले एकुण 153 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 10,950 लीटर गावठी मोहा दारूच्या निर्मिती करीता तयार करण्यात आलेला कच्चा मोहा सडवा रसायण, तीन पोत्यामध्ये अंदाजे 150 किलो गुळ व भट्टी साहित्य असा एकुण कि. 6,12,000 रू चा माल मिळुन आल्याने, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीचं नाश करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ. सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संजय पवार सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पो.अंम. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे, श्रीकृष्ण इंगळे व 14 गृहरक्षक दलाच्या सैनिकांनी केली.

बकरी ईद सणा निमित्त शेगाव शहर पोलिसांनी रहदरीच्या रोडने केला चोख बंदोब

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

बकरी ईद सणानिमित्त शेगांव शहरातील कब्रस्तान टि पॉईंट ते अशपाक उल्ला चौक या परिसरा दरम्यान असलेली ईदगा मज्जिद, कुरेशी मज्जिद व गरीब नवाज मज्जित येथे नमाज पठनाकरिता आजू बाजूचे परिसरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवणार आहे.

सदर उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधवांना कब्रस्तान टी पॉइंट ते अशपाउल्ला चौक येथे बंदोबस्ता दरम्यान रहदरी मुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस स्टेशन शेगाव शहर द्वारे अशफाकउल्ला चौक ते कब्रस्तान टी पॉइंट येथे बॅरिगेटिंग करण्यात आली आहे.

तरी शेगाव शहरवासीयांनी सामाजिक तथा धार्मिक सहकार्याचे भूमिकेतून मुस्लिम समाज बांधवांचे बकरी ईद सणानिमित्त कब्रस्तान टी पॉइंट ते अशपाक उल्लाचौक या मार्गव्यतिरिक्त इतर पर्यायी मार्गाचा वापर करून बंदोबस्त दरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शेगाव शहर पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.

समाजवादी जिल्हाप्रमुख यांनी डीवायएसपी यांच्याकडे कलम 169 अंतर्गत खोटे” गुन्हे खारीज करण्यासाठी दिले निवेदन

0

 

 

संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील विघ्नहर्ता इंटरप्राईजेस यांच्या दुकानासमोर 12 फेब्रुवारी रोजी अंदाजे 4.30 ला झालेली घटनेची सखोल चौकशी करून समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख शेख शहीद शेख कदीर यांच्यावर व संग्रामपूरचे पत्रकार अनिल सिंग चव्हाण यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले त्यामुळे

आज दिनांक 27 जून रोजी डीवायएसपी कडे निवेदन मधून म्हटले आहे की मी शेख शहीद शेख कदीर निवेदन निवेदन तथा विनंती अर्ज फिर्यादी शेख रहमान शेख असिफ राहणार सोनाळा यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी तामगाव पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खोटी रिपोर्ट दाखल केली असून त्या रिपोर्टच्या आधारे आपण आपल्या पोलीस स्टेशनमध्ये 36/ 2023 भादविचे कलम 142, 117 ,149 ,294 ,324, 327, व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे

तसेच या गुन्ह्याचा तपास आपल्याकडे आहे आपण या गुन्ह्या तपास करीत आहात.

तर फिर्यादी यांनी आपल्याकडे रिपोर्ट देऊन असे म्हटले आहे की दिनांक 12 /2023 रोजी अंदाजे 3.30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी त्यांच्या भावाच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच 28 ए ,एल 40 61 मी गाडी घेऊन आला त्यावेळी फिर्यादीचा काका शेख आरिफ शेख अब्दुल राहणार माळेगाव बाजार तालुका तेल्हारा जिल्हा अकोला हे वरवट बकाल ग्रामपंचायतीच्या मागे वडाच्या झाडाखाली बोलत असताना

तेथे शेख आरिफ शेख युसुफ राहणार वरुड बघायला हजर होते तेव्हा मी व माझ्यासोबत इतर लोकं फिर्यादीच्या काका सोबत काही एक कारण नसताना वाद उपस्थित केला शिवीगाळ केली परंतु ही घटना पूर्ण काल्पनिक व खोटी आहे तसेच फिर्यादी यांनी पुढे असे नमूद केले आहे की इतरांनी कोण कोणतेही कारण नसताना काठी घेऊन त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला ध्यान झाली

त्या ठिकाणी ही बाब तपास पूर्णपणे निष्पन्न झाला आहे म्हणजेच ही बाब पूर्ण खोटी आहे कारण कोणतेही लाठी काठीने मारहाण झालेली नाही व रक्त निघाल्या बाबत किंवा मारहाण झाल्याबाबत कोणतीही मेडिकल सर्टिफिकेट उपलब्ध नाही

तसेच फिर्यादी यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये पुढे स्वतः कबूल केले आहे की ते जवळ जवळ असलेले वरवट बकाल सरकारी दवाखान्यात गेले नाही तर मी या निवेदन सोबत शेख आरिफ यांच्या सरकारी दवाखाना वरवड बकाली येथे दाखविण्यात आले नाही

याबाबत माहिती अधिनियम 2005 अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रानुसार आपल्या सेवेची सादर करीत आहे त्यावरून निष्पन्न होते की कोणतीही मारहाण झाली नाही व कोणतेही जखमा झाल्या नाही त्यामुळे माझ्यावरील कलम 324 मुळीच लागू शकत नाही तसेच घटनास्थळ वर कोणतेही घटना घडली नाही शिवीगाळ झाली नाही करिता कलम 294 देखील लागू शकत नाही .

त्याचप्रमाणे फक्त खोटा पुरावा सादर करण्याचे उद्देशाने शेकारी हे दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेले व तेथे देखील त्यांना रक्त निघाल्या बाबत कोणतीही जखम आढळली नाही करिता मेडिकल सर्टिफिकेट देण्यात आले

सुद्धा नाही त्यानंतर फिर्यादीच्या भावाची मोटरसायकल क्रमांक एम हेच 28 ए एल ४०६१ ही आम्ही जबरदस्तीने घेऊन गेल्याचे खोट्या रीतीने म्हटले आहे व याबाबत आपण शेख अकबर शेख रफिक यांचे बयान घेतले असेलच परंतु शेख अकबर शेख आरिफ राहणार जामोद यांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी लेखी प्रतिज्ञा लेख देऊन स्वस्तुतिथी सांगितली आहे की सदर मोटरसायकल फिर्यादी यांनी

स्वतः अकबर शेख रुपी यांच्याकडे दिली व आम्ही जखमी अवस्थेत असल्याने आम्हाला दवाखान्यात नेण्याचे सांगितले या बयान वरून निष्पन्न होते की मोटर सायकल इस करून घेण्याची कोणतीही घटना घडलेली नाही करिता कलम 327 देखील लागू होत नाही उलट पक्षी फिर्यादी यांचे काका व इतरांनी आम्हाला मारहाण केली

याबाबत आम्ही पोलीस स्टेशन खामगाव येथे रिपोर्ट दिला आहे व आमच्या रिपोर्ट वरून मुन्ना नंबर 35 ऑब्लिक 2023 दाखल करण्यात आलेला आहे व फिर्यादी व त्यांचे काका व इतर आम्हाला मारहाण केली व कोटापुरावा तयार करण्याचे उद्देशाने आमच्याविरुद्ध बनावटी व खोटी रिपोर्ट दिलेली आहे

तरी गुन्हा नंबर 36 ऑब्लिक 2023 प्रमाणे कोणती घटना घडलेली नाही व या गुन्ह्यात रक्त निघाले बाबत कोणतीही सर्व तिकीट उपलब्ध नाही फिर्यादीच्या सांगितल्याप्रमाणे त्याचे काका शेख आरिफ यांच्या कोणतेही सरकारी दवाखान्यात दाखविण्यात सुद्धा आले नाही
यावरून शेख अकबर यांच्या बयाना वरून व प्रतिज्ञा लेख वरून स्पष्ट होते की आम्ही संबंधित मोटरसायकल हिसकवून घेतली नाही व ती मोटरसायकल आमच्याकडे नव्हती व नाही व कोणतीही घटना घडली नाही त्यामुळे शिवीगाळचा प्रश्न उत्पन्न होत नाही

त्यामुळे या गुन्ह्यात डिस्चार्ज दाखल करणे न्याय व हक्क, आवश्यक आहे
सर्व आरोपी विरुद्ध टीचर दाखल करण्याची विनंती निवेदन या निवेदनाला जोडलेले सहपत्र शेख शेख अकबर शेख रफिक यांचा दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीचा प्रतिज्ञा लेख तर ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल यांची माहिती अधिकार कायदे अंतर्गत मिळालेली माहिती आणि वैद्यकीय अधिकारी दानापूर यांचे दिनांक 13 मार्च 2023 चे पत्र सुद्धा जोडून हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर तसेच तपास अधिकारी पोलीस स्टेशन तामगाव यांना देण्यात आले आहे

संबंधित तामगाव पोलीस स्टेशन अधिकारी तसेच तपास पोलीस अधिकारी यांना दोन ते तीन दिवसांमध्ये बोलावून या विषयाची पूर्ण निष्पक्ष चौकशी करून समाजवादी जिल्हा संपर्कप्रमुख यांना न्याय मिळवून देण्याकरिता आश्वासन देण्यात आले

उघड्यावर मास विक्रेत्यांवर शेगाव शहरपोलीस स्टेशन पोलिसांनी केली कार्यवाही

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 27 जून 2023 रोजी आगामी एकादशी आषाढी व बकरी ईद सणानिमित्त पोलीस स्टेशन शेगाव शहरा अंतर्गत उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारी 01:30 वा. सुमारास

त्यांनी शेगाव शहरातील पेठ मोहल्ला येथे उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांवर छापा कार्यवाही करून मास विक्रेता शेख कालू शेख शेख इस्माईल वय पंचवीस वर्षे राहणार खळवाडी परिसर तालुका शेगाव याच जागेत पकडले व त्याच्यावर पोलीस स्टेशन शेगाव येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 105 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.

तरी पेठ मोहल्ला व शेगाव शहरात इतरत्र उघड्यावर मास विक्री करणाऱ्यावर यापुढे सुद्धा कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना देऊन अवैधरीत्या किंवा उघड्यावर मास विक्री होणार नाही याकरिता मुस्लिम व इतर प्रतिष्ठित लोकांना पोलिसांचे संपर्कात राहून माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शेगाव शहर पोलिसांची भुरट्या चोरांवर करडी नजर

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 27/06/2023 चे दुपारी 03:30 सुमारास शेगाव शहर पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी फैजलखान रोशन खान वय 26 वर्षे राहणार आझाद नगर तालुका शेगाव हा इसम गजानन महाराज मंदिर परिसरातील महाराजा गेस्ट हाऊस समोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चोरीचा लॅपटॉप विकत देण्याचे प्रयत्न करीत होता.

अशा खात्रीलायक माहितीच्या आधारे शेगाव शहर पोलिसांनी नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याचे जवळ असलेल्या लिनोवो कंपनीच्या अंदाजे 40,000/-₹ किमतीच्या लॅपटॉप चे मालकी हक्काबाबत विचारणा केली परंतु त्याने उडवाउडीचे उत्तरे देऊन मालकी हक्काबाबत काही एक संयुक्तिक कारणे सांगितले नाही.

पोलिसांनी त्याला कसून चौकशी केली असता सदर लॅपटॉप हा चोरीचा असल्याचे त्यांनी कबुली दिल्याने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघमारे हे करीत आहे

एकात्मीक आदीवासी विकास विभागाअंतर्गत पेसा क्षेत्रातील नागरीकांना दाखले देण्यात यावे . तालुका ग्रामसेवक संघटनेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयाच्या माध्यमातुन अनुसूचित क्षेत्र पेसा अंतर्गत रहिवासी नागरीकांना शासन निर्णया अनुसार प्रमाणपत्र व दाखले देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आदीवासी प्रकल्प अधिकाऱ्यांना व गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .

या संदर्भात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरुषोत्तम तळेले, ग्रामसेवक पतपेटीचे व्हाईस चेअरमन बि के पारधी, सदस्य हितु महाजन व ग्रामसेवक संघटनेचे सदस्य परसाडे गावाचे ग्रामसेवक मजीत तडवी , मालोद चे ग्रामसेवक राजु तडवी व आदीनी जिल्हा एकात्मिकआदीवासी विकास प्रकल्प चे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

, संदर्भीय उपरोक्त राज्य ग्रामविकास विभागाच्या पत्र क्रमांक१ अनुसार पेसा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात राहणाऱ्या अनुसुचित जमाती नागरीकांना रहीवासी दाखले देणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असुन, लाभार्थी यांचे स्वयंघोषणा पत्र स्विकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे . संदर्भ नुसार ग्राम पंचायत मार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या दाखल्यामध्ये रहीवासी दाखला देणे बाबत कुठही उल्लेख केलेला नाही .

त्यामुळे उपरोक्त विषय क्रमांक१ आणी २ अनुसार पेसा क्षेत्रा अंतर्गत रहिवासी नागरीकांना रहिवासी दाखला देण्यातचा ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना नाही तरी ग्रामसेवक आणी ग्रामविकास अधिकारी यांच्या कड्डन दाखले मागण्यात येवु नये , शासना निर्णय क्रमांक३नुसार सरळ सेवेच्या पद भरती करीता अर्ज करणाऱ्या अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना पेसाअंतर्गत राहणाऱ्या नागरीकांना आपल्या एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालया मार्फत रहिवासी दाखले देण्यात यावे

असे शासनाने आदेशाव्दारे नमुद आहे तरी शासनाच्या आदेशान्वये विहीत मुदतीत आपल्याकडुन रहिवासी दाखले उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामसेवक संघटना यावल तालुका जिल्हा जळगाव यांच्या नेतृत्वात प्रकल्प कार्यालय यावल प्रकल्प अधिकारी यांचे प्रतिनिधी सहायक प्रकल्प विस्तार अधिकारी पवन पाटील व गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना ग्रामसेवक संघटना अध्यक्ष रुबाब तडवी व जिल्हा ग्रामसेवक पतपेठीचे व्हाईस चेअरमन बि के पारधी यांच्यासह आदी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे .

वाळू वाहतूकदारांकडून मंडळ अधिकाऱ्यास मारहाण यावल पोलिसात गुन्हा दाखल

0

 

यावल- ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालया कडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोन चालकांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना

चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गटारीत व काट्यात ढकलून दिले मंडळ अधिकारी यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांचे दिशेने दगडफेक केली ,

यात मंडळ अधिकारी जखमी झाले असुन, मंडळ अधिकारी जगताप यांची फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालकांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुक प्रतिबंधात्मक उपायासाठी तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांचे सह तलाठी मधुराज पाटील , कोतवाल विकास सोळंके हे गस्तीपथकावर असताना तालुक्यातील डांभुर्णी येथून कोळन्हावी येथील तापी नदीपात्रात जाणाऱ्या नाल्यात निळ्या रंगाचे ट्रॅक्टर दिसल्याने पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टर मध्ये वाळू दिसून आली,

पथकाने परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता , ट्रॅक्टर चालकाने कोळन्हावी येथील सुपडू रमेश सोळुंके यांचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलिक द्वारे वाळू खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असता पथकाने तात्काळ शासकीय वाहनास बोलावून ट्रॅक्टर कार्यवाहीसाठी यावल कडे आणत असताना, ट्रॅक्टर चालकाने नावरे फाट्या जवळून शिरसाड गावाकडे पळ काढला

त्याचा पाठलाग करून साकळी येथील मुस्लिम कब्रस्तान जवळ ट्रॅक्टर अडवीला असता ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके चालक आकाश अशोक कोळी गोपाळ प्रल्हाद सोळुंके यांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मी तुला जिवंत ठेवणार नाही या सह लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जगताप यांना गटारीत व काट्यात फेकून दिले सचिन जगताप यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता

त्यांचे दिशेने दगड गोटे भिरकावले ट्रॅक्टर मालकांसह दोन चालकांनी शासकीय कामात अडथळा आणून मंडळ अधिकारी जगताप यांना मारहाण करून दुखापत केल्याचे कारणावरून यावल.येथील पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हाधिकारी यांनी तात्काळ रद्द करावा : काँग्रेस स्वस्त धान्य कमेटीची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालोद येथील एका स्वस्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभार लाभार्थ्यांना धान्य न देता शिवीगाळ धमकण्याचा प्रकार स्वस्त धान्य समितीच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रकला इंगळे यांनी केली तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे कारवाईची मागणी केली असुन संबधीत स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात

याबाबत महसुल प्रशासनाच्या वतीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. यावल तालुक्यातील भालोद येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ७३ही भालोद कल्पना अनिल भालेराव यांच्या मालकीची असून संजय भालेराव हे या दुकानास भाड्याने चालवता मात्र ते परिसरातील शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी असुन ,

उलट पक्षी धान्य घ्याला येणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य न देता धमकी व दमदाटी करून मनमानी कारभाराने दुकान चालवतात, लाभार्थ्यांना धान्य न देता त्या धान्याला काळ्या बाजारात विकतात संजय भालेराव या भाडोत्री स्वस्त धान्य दुकान मालकाच्या भ्रष्ठ कारभाराने अनेक लाभार्थींना आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे

. कल्पना अनिल भालेराव यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या भोंगळ कारभाराची त्वरीत प्रशासनाकडून चौकशी होऊन त्यांचा स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या स्वस्त धान्य कमिटी जिल्हा अध्यक्षा चंद्रकला इंगळे , युवक काँग्रेसचे रावेर विधान क्षेत्र प्रमुख फैजान शाह ,यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह असंख्य लाभार्थी यांनी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असुन , संबधित स्वस्त धान्य दुकानदारावर परवाना रद्द करण्याची कारवाई न झाल्यास कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा चंद्रकला इंगळे यांनी दिला आहे.

जीवनाला हो म्हणाअमली पदार्थाला नाही म्हणा

0

 

आज 26 जून अंमली पदार्थ विरोध

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव.अमली पदार्थ दिनानिमित्त पो.स्टे. शेगांव शर येथील परी. पो.उप.अधीक्षक श्री. विवेक पाटील, पो.नि. विलास पाटील, पो.उप.नि. आशिष गंद्रे यांनी शेगांव येथील ST. XAVIER’S ENGLISH SCHOOL, SHEGAON

येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शरीरा करता अपायकारक असलेल्या अमली पदार्थ सेवनाचे होणारे नुकसानाबाबत मार्गदर्शन केले. अमली पदार्थ सेवन करणार नाही म्हणून शपथ घेण्यात आली. सोशल मीडिया माध्यमातून चित्रपट, लघु चित्रपट, वेब सिरीज, रील्स, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, इत्यादी माध्यमांपासून दूर राहून प्रक्षोभक बाबींपासून अलिप्त राहणे बाबत सूचना दिल्या.

अमली पदार्थ सेवनाचे मार्गदर्शनाकरिता शालेय नाविन्य तरून पिढीपासून जनजागृती करण्याची सुरुवात केली.

तसेच शेगांव शहरात छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे गावांतील मुख्य चौरसत्याचे वर्दळीच्या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बॅनर दर्शवून अमली पदार्थाचे सेवनाकरिता विरोध करावा बाबत जनजागृती केली.

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये हिंदुत्ववादी संघटनां सोबत बैठक

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनयेथे
आज दिनांक 25.06.2023 रोजी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, पो. नि.विलास पाटील पो.स्टे.शेगांव शहर यांचे मार्गदर्शनाखाली आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव संबंधात पो.स्टे.हद्दीतील हिंदू संघटनांची बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ईतर पदाधिकारी असे एकूण 12 महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांना आगामी सण उत्सव बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करू नये, कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड/पोस्ट करू नये, काही आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास आम्हास तात्काळ माहिती द्यावी असे मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.

सदरची बैठक 18/30 वा. पासून 19/15 वा. पावेतो घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये बंदोबस्त काळात सार्वजनिक शांतता अबाधित राहावी याकरिता पोलिसांची शेगाव शहरातील मंदिर मज्जित व इतर समाजाची धार्मिक स्थळे, उपासना स्थाने, जातीय वस्ती यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

गावातील विविध जाती-धर्माचे प्रतिष्ठित नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना बंदोबस्त काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.