Home Blog Page 188

गोळेगाव बुद्रुक ग्रामवासियाकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किट चे वाटप

0

 

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव तालुक्या अंतर्गत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत तसेच गावकरी यांनी मानवतेसाठी सर्वधर्मसमभाव व एकतेची भावना सहानुभूती दाखवत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व गावकरी यांनी गावातून लोक वर्गणी करून संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात झालेला

अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरी उध्वस्त झाली त्यांचे खाण्यापिण्याचे सामान अन्नधान्य सर्व पुरामध्ये वाहून गेले अशा नागरिकांना आसलगाव येथे अन्नधान्याचे किट वाटप करून मानवतेचा एक आदर्श निर्माण केला आहे

यावेळी उपस्थित सरपंच रघुनाथ मापारी उपसरपंच पती शांताराम गावंडे सदस्य पती निलेश गावंडे, सदस्य देवचंद्र समदुर गावातील नागरिक धम्मपाल समुद्र सचिन गावंडे अनिल समदूर ग्रामपंचायत परिचारक उमेश नांदोकार आदींनी परिश्रम घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव या ठिकाणी पूरग्रस्त पीडितांना ने अन्नधान्याचे मदत वाटप केला

यावेळी योगायोगाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तूमोड साहेब व जळगाव जामोद च्या तहसीलदार मॅडम उपस्थित असल्याने त्यांनी सुद्धा गोळेगाव वासियांचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते सुद्धा किट वाटप करण्यात आले खरोखरच तेथील पूर पीडित नागरिकांचे अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले

आणि खरोखरच अशा लोकांना मदत करणे हे जीवनातील खूप मोठे पुण्याचे काम असल्याचे त्या ठिकाणी जाणीव झाली आणि कीट वाटप झाल्यानंतर खूप मोठे समाधान मिळाल्याचे गोळेगाव बुद्रुक वासियांनी सांगितले.

यावेळी उल्हास माहोदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव तसेच गावचे सरपंच, सदस्य ईश्वर वानखडे व काही गावकऱ्यांनी यावेळी हीट वाटप करताना मुलाचे सहकार्य केले

रोही प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अंबाशी, काटोडा, खैरव, गांगलगाव येथील शेतकरी त्रस्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

: चिखली तालुक्यातील अंबाशीसह परिसरातील खैरव, काटोडा, गांगलगाव इत्यादी गावांमध्ये रोही, हरीण, माकडे आदी वन्य प्राण्यांनी अक्षरशा: धुमाकूळ घालत असून पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून दिवसेंदिवस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रोही, हरीण यांचा कळप एकाच वेळी शेतात घुसून पीक मोठ्या प्रमाणात उध्वस्त करतात. अगोदरच पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या.

त्यातच शेतमालाचे पडलेले भाव, विमा कंपनीकडून पिक विमा अनुदानाची अनियमितता, यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी एक महिना उशिरा पेरणी केली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागत केल्यामुळे पिके बहरत आहेत.

त्यातच जमिनीच्या बाहेर आलेली कोवळी पिके रोही, माकडांनी फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे दिवस-रात्र पिकांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

याबाबत वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत

लोकांचे व पर्यटकांचे मन आकर्षित करणारे निंबादेवी धरण झाले ओव्हरफ्लो पर्यटकाना प्रवेश बंदी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकीवानखेडे

यावल तालुक्यातील व सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरणात पाण्याचा साठा चांगलाच वाढलेला आहे. सध्या पर्वतात दररोज चांगल्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरण तुडूंब भरले आहे. गेल्या वर्षी हे धरण २३ जुलै रोजी भरले होते. सदर ठिकाण अतिशय विलोभनिय असल्याने गेल्या वर्षी निसर्ग प्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती.

अनेक दिवसांपासुन जिल्ह्यातील लाखो पर्यटक हे या आकर्षणाचे केन्द्र असलेल्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना प्रार्दुभावच्या काळात या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. त्यावेळीपासून यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे.

भुशी डॅमची अनुभुती पर्यटकांना याठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हे धरणावर यावल, फैजपुर, रावेर, भुसावळ जळगाव धुळे शहरासह विविध ठीकाणाहुन शहरी जिवनातील गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी आणी निसर्गाशी जोडण्यासाठी ही एक संधी असल्याचे समजुन

मोठमोठी डोंगरातुन नैसर्गीक हिरवगार झाडे व नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहलीच्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठीकाणी गर्दी होत असते एक निसर्गरम्य ठिकाण म्हणुन या डॅमची गणना केली जात आहे. मागील घटनांच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते त्यासाठी काही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळ पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन धरणाच्या ठीकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे, पोलीस कर्मचारी आणी गृहरक्षकदलाचे महीला व पुरुष कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांनी याठिकाणी येवु नये असे आवाहन पोलिसानी केले आहे.

सिंदखेड राजा शहारातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये यांच्या जाहीर प्रवेश

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच मनसे नेते महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्धी सेना अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून आज सिंदखेडराजा शहरातिल युवकांच्या मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष निलेश देवरे तालुका अध्यक्ष अभि देशमुख शहर अध्यक्ष घनश्याम केळकर मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव विधानसभा अध्यक्ष सिध्दु गव्हाड मॉन्टी सोनपसरे मनसे शहर दुसराबिड भागवत राजे जाधव विशाल चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला

त्यामध्ये भागवत साबळे, गणेश पाचफुले,सौरव कोरडे,कुणाल पेसोडे, गोपाळ उगले,राष्टपाल कुटे, रितेश खरात, विकास केळकर, राजेंद्र साबळे,करण राठोड यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला

सिंदी,पळसगाव, गौळ-भोसा शिवारात पाण्याने केला कहर..

0

 

शेतकऱ्यांचे व नदी तीरावरील रहीवाश्यांचे मोठे नुकसान

सिंदी रेल्वे ता.२७ : परिसरात बुधवारी (ता. २६) ला रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे सिंदी येथील नंदानदीला पुर येवुन पळसगाव बाई, गौळ-भोसा दिग्रज पहेलानपुर आलगाव शिवनगाव परसोडी भांसुली पिपरा हेलोडी हिवरा आदी गावाचा सिंदी रेल्वे या मुख्य शहराशी महापूरामुळे संर्पकच तुटला होता.

सिंदी शहरातील पुलापलीकडील भाग संपर्क तुटल्यामुळे पूर्ण पाण्याने वेढलेला होता. याची तत्काळ दखल घेत सिंधी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वंदना सोनुने व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना केल्या त्याचप्रमाणे आपला पूर्ण स्टाफ ज्या ज्या ठिकाणी रिक्स झोन आहे

त्या त्या ठिकाणी मदत कार्यास सुरुवात केली पळसगाव बाई येथेही दोन नद्यांचा संगम असून दोन्हीही नद्यांना महापूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे गावातील पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत कार्यालय संपूर्णपणे परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हल्ल्याच्या सूचना दिलेल्या आहेत, तहसीलदार सोनवणे साहेब यांनी पळसगाव बाई येथील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपाध्यक्ष धीरज लेंडे यांनी स्वतः पाहणी करून नदीकाठी असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे तसेच सर्व सरपंच महोदयांनी गाव पातळीवर मदत कार्य सुरू करावे असे सांगितले

व काही आपत्कालीन परिस्थिती आल्यास प्रशासनाला सोबत घेऊन तात्काळ मदत करण्यात येईल अशी हमी दिली गौळ भोसा शिवारातील शेतकऱ्यांचे नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे समुद्रपूर येथील तहसीलदार यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..

बुलढाणा अर्बन बँक व्यवस्थापकाचा मोबाईल बसस्थानकावरुन लंपास

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:- स्थानिक बसस्थानकावर तेल्हारा येथे जाण्यासाठी बस मध्ये चढताना बुलढाणा अर्बन शाखा शेगावच्या व्यवस्थापकाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज संध्याकाळी दरम्यान घडली आहे

या बाबत प्रविण विनायकराव पारोदे रा.तेल्हारा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते बुलढाणा अर्बन बँक शाखा शेगाव येथे मॅनेजर आहेत. ते घरी जाण्यासाठी संध्याकाळी तेल्हारा बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी एम ३२ हा अलगद काढून लंपास केला.

याबाबत पारोदे यांनी बसमध्ये मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मिळून आला नाही. सदर मोबाईलची किंमत ८ हजार रुपये असल्याचे पारोदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत शेगाव पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द शेगाव पोलिसांनी कलम ३७९ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागा च्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड

0

 

यावल ( प्रतिनिध)विकी वानखेडे

येथील युवासामाजिक कार्यकर्त अनिल निळकंठ जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागा च्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागचे जिल्हा अध्यक्ष अॅड कैलास ना .शेळके यांनी अनिल जंजाळे यांचे तालुका अध्यक्षपदाच्या नियुक्ती पत्र दिले असुन ,

त्यांच्या निवडीचे यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी , काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील , काँग्रेस कमेटीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार , अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुन्नवर खान ,कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे ,यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील ,यावल पंचायत समिती चे माजी सभापती लिलाधर चौधरी ,धनंजय शिरीष चौधरी,मारूळचे जावेद अली

,वढोदे सरपंच संदीप सोनवणे , मारूळ सरपंच असद जावेद अली सैय्यद , यावलचे माजी नगरसेवक मनोहर सोनवणे ,सैव्यद युनुस सैय्यद युसुफ , गुलाम रसुल मेंबर , समिर शेख मोमीन ,काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी जलील

पटेल,दहिगाव ग्रामपंचायतचे सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच वितास अडकमोल, उमेश जावळे यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी अनिल जंजाळे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे .

श्रींच्या पालखीचे दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

शेगाव येथे खामगाव रोडवर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया जवळ श्रींच्या पालखीचे दर्शन घेताना महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

खामगाव येथून शेगाव कडे परत येणाऱ्या श्रींच्या पालखीचे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत शेगाव शहर पोलीस मित्र कडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील सौ आरती रामा कोळपे या 19 वर्षीय महिलेने आज 26 जुलै रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की 24 जुलै रोजी ती तिच्या भावासोबत खामगाव येथून पालखीसोबत शेगाव येथे पायदळ वारी मध्ये सहभागी झाली होती

शेगाव येथे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय समोर श्रींच्या पालखीचे दर्शन घेत असताना गर्दीमध्ये कुणीतरी धक्का मारल्याचे जाणविले दर्शन घेतल्यानंतर माझे गळ्यातील मंगळसूत्र तीन ग्रॅम सोन्याचे लंपास झाल्याचे आढळून आले

याबाबत आज 26 जुलै रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कलम 379 भावी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करूटले बक्कल नंबर 1275 करीत आहेत

मनिपुर प्रकरणाचा काग्रेसने केला निषेद नायब तहसीलदाराला दिले निवेदन

0

 

सिंदी रेल्वे ता.२६ : शहर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून मनीपुरच्या अमानुष प्रकरणाचा आणि त्यावर कारवाई शुन्य काम करणाऱ्या मनीपूर राज्य शासन आणि केंद्र सरकारचा जाहिर निषेद करुन नायब तहसीलदार यांना बुधवारी (ता.२६) निवेदन देण्यात आले.

शहरातील गांधी चौकात सकाळी ११ वाजता शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेद मोर्चात शेतकरी संघटना, शिवसेना(उ.ब.ठ.) आदी तिन्ही पक्षाचे शेकडो महीला-पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोळा होत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत शहराच्या मुख्य रस्त्यांने जात नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांना निषेदाचे निवेदन देऊन जाहिर निषेद नोंदविला.

याप्रसंगी सर्व पक्षाच्या नेते मंडळीनी मोर्चातील जनसमुदायाला संबोधीत केले. *सेलु तालुका प्रतिनिधी :- गुड्डू क्युरेशी*

मणिपूर मधील त्या नराधमांना कठोर शिक्षा करा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

0

 

जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख सह खामगाव तालुका प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम

भारताच्या अविभाज्य घटक असलेल्या मणिपूर राज्यात महिलांची धिंड काढून संपूर्ण महिला जातीचा अपमान करणाऱ्या नराधमांना अटक करून त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई मणिपूर शासनाने करावी.

अशी मागणी राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने तहसीलदार शेगाव यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे आज 26 जुलै रोजी शेगाव येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने राष्ट्रपती यांना तहसीलदार समाधान सोनवणे यांच्यामार्फत मनिपुर घटनेचा तीव्र निषेध करत दोषी असलेल्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन भारताच्या महामयीन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदन देताना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी ताई शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ रत्‍नाताई डिक्कर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा सौ प्रणिता धामंदे, सौ.अलकाताई बांगर, खामगाव शहर अध्यक्ष सौ रंजनाताई राठोड चव्हाण मॅडम आधीच राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अनेक भगिनी उपस्थित होत्या