Home Blog Page 19

Yavalnews/चुंचाळे पिक सरक्षण सोसायटी निवडणूक बिनविरोध. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील पिक संरक्षण सोसायटी या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीसाठी मुदतीपर्यंत १३ जागांसाठी तब्बल २९ उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते तर अर्ज छाननीत सर्वच्या सर्व अर्ज वैध देखील ठरले होते.

व एक जागा ही पहील्याच दिवशी बिनविरोध देखिल झाली होती उर्वरित 12 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात होते मात्र गावातील संस्थेचा पैसा वाचावा वस्तीचा विकास व्हावा या हेतूने गावातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य माजी चेअरमन यांनी दि.17 रोजी अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीत अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना बसवून प्रत्येक समाजाला न्याय देऊन निवडणूक बिनविरोध केली.

बिनविरोध निवडून आलेले सदस्य सर्वसाधारण मधून
रवींद्र नामदेव पाटील, दिलीप नेमीदास नेवे, चंद्रकांत तुकडू चौधरी, विनोद लीलाधर पाटील, हिरामण मोतीराम पाटील, कलिंदर नथ्थु तडवी, दत्तू दयाराम कोळी, शेणफडू गोबा पाटील,
त्याचप्रमाणे महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी चमेलीबाई काशिनाथ पाटील, अनुसया रघुनाथ पाटील,तर इमाव (ओबीसी) राखीव मतदार संघात एका जागेसाठी गणेश ठाकूरदास चौधरी,त्याचप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघात जुम्मा हसन तडवी,तर वि.जा भ.ज व विमाप्र राखीव एका जागेसाठी शुभम रवींद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आता मात्र चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Yavalnews/निवडणूक अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे हे काम पाहत आहे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत, रवींद्र पाटील, राजू सोनवणे, दगडू तडवी शेखर तडवी, चुंचाळे वि.का.सो चेअरमन सुनील नेवे व्हाईस चेअरमन इस्माईल तडवी, पीक संरक्षण चे माजी चेअरमन प्रदीप पाटील, बोराळे सरपंच माजी उज्जैनसिंग राजपूत,चुंचाळे तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग पाटील,पत्रकार प्रकाश चौधरी

Hingnghatnews /संत निरंकारी मिशन शाखा हिंगणघाट आणि रेल्वे वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी संत निरंकारी मिशन शाखा हिंगणघाट आणि रेल्वे वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानात संत निरंकारी मिशन हिंगणघाटची साधसंगत तसेच सेवादलाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म आणि आसपासच्या भागांची स्वच्छता करून समाजाप्रती जबाबदारी व सेवा भाव दर्शविला.

या दरम्यान रेल्वे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यांनी साधसंगत व सेवादलाच्या या सेवा कार्याचे कौतुक केले. मिशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की स्वच्छता ही केवळ शासकीय योजना नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, जे एकत्रितपणे पार पाडले पाहिजे.

Hingnghatnews /स्वच्छता अभियानाच्या समारोपावेळी साधसंगतने या सेवेला सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे आशीर्वाद मानत आभार व्यक्त केला आणि पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प केला.

Bajarnews/पावसाने उमरगा शहरातील आठवडी बाजाराचा उडवला बोजवारा

0

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा प्रतिनिधी -: रविवारी दुपारनंतर उमरगा शहरात धुवाधार पावसाने हजेरी लावली पावसाचा जोर प्रचंड असल्याने रविवारच्या आठवडी बाजाराचा पुरता बोजवारा उडाला. रस्त्यावर चिखल, पाणी साचल्यामुळे बाजारात पालेभाज्या फळे विक्रेत्यांसह व्यापारी, ग्राहकांची पावसामुळे अक्षरशः तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यांतच उमरगा शहरात रविवारी मोठा आठवडी बाजारात भरत असतो.

उमरगा तालुक्यातील पंधरा ते पंचवीस गावातील पालेभाज्या, फळे, विक्रेते, व्यापारी, नागरिक खरेदी विक्रीसाठी उमरगा तालुक्याला येत असतात. परंतु याचं रविवारच्या दिवशी दुपारनंतर धुवाधार पावसाने आठवडी बाजारात हजेरी लावली.

Bajarnews/पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही क्षणात आठवडी बाजार रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पसारा आवरता आवरता बाजाकरूंची मोठी तारांबळ उडाल्यामुळे आठवडी बाजाराचा पावसाने पुरता बोजवारा उडाला आहे.

Pikvimanews/ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे

0

 

आणि तातडीने *सेलू तालुका ओला दुष्काळ जाहीर करा”शेतकरी मित्र परिवाराची मागणी

तहसील कार्यालयात जाऊन मंडल अधिकाऱ्यांना दिले निवेदन

निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या “संपूर्ण कर्जमाफी” या महत्वाच्या आश्वासनाचा विसर पडलेल्या महायुती सरकारने तत्काळ संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्णता सरसकट कर्जमाफी करून आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या या आक्रोशाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.farmernews

परंतु शेतकऱ्यांना दिलेला शब्द आणि शासनाची कृती यात प्रचंड तफावत दिसून येत असल्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे.

Pikvimanews /पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Farmernews/शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांचा शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून मदत मिळाली पाहिजे याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे स्नेहल कलोडे दत्ताभाऊ कोपरकर अजय कलोडे आशिष सातपुते अनुप वाघमारे संजय तळस धनराज झिलपे नरेंद्र सुरकार गुड्डू शेख इत्यादी शेतकरी उपस्थित होते

Shivshenanews/उबाठा शिवसेनेच्या वतीने उमरगा-लोहारा तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

0

मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
—————
बातमीदार ऋषिकेश सुरवसे, उमरगा

उमरगा प्रतिनिधी -: उमरगा-लोहारा तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी (दि१९) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा-लोहारा तालुक्यात सतत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची आर्थिक अडचण अत्यंत गंभीर झाली असून शेती उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांचे उपजीविकेवर संकट आले आहे.

तसेच शासनाने यांचा सहानभुतीपूर्वक विचार करून तातडीने ओला दुष्काळ घोषित करून बांधित शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात यावे, आणि शेतकऱ्यांच्या पुढील रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी सेना उबाठा पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

Shivshenanews/यावेळी, जिल्हा प्रमुख शेतकरी सेना विजयकुमार नागणे, तालुका अध्यक्ष शेतकरी सेना विजयकुमार तळभोगे, मा.नगराध्यक्ष रझाक आत्तार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, मा.सभापती रणधीर पवार, जेष्ठ शिवसैनिक महावीर आण्णा कोराळे, तालुका सोशल मीडिया प्रमुख दत्ता शिंदे यांच्यासह डी.के. माने, राजेंद्र समाने, अप्पाराव गायकवाड, संगमेश्वर स्वामी, धीरज बेळमकर, संतोष कलशेट्टी, संतोष जाधव, तानाजी जाधव, पवन त्रिमुखे, आदिनाथ काळे, विजय गायकवाड, अभिषेक स्वामी, आकाश गायकवाड, सगर उमशेट्टी, सदाशिव पाटील, जयराम चव्हाण, बिराजदार श्रीकर, रवी बडोरे, मल्लिकार्जुन बिराजदार, रमेश पवार, आकाश शर्मा, शहाजी गायकवाड, पंडित माशाळे, विशाल गायकवाड, मारुती थोरे, अण्णाराव माने, शिवाजी गायकवाड, सिद्धराम हत्तरगे, निकेश मारेकर, विलास माने, प्रकाश बेळंबे, सदाशिव भातागळीकर, शंभूलिंग स्वामी, हरी मदने आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hingnghatnews/चाकांवरून स्वप्नांचा प्रवास – शालेय मुलींना रोटरी कडून सायकल भेट

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब हिंगणघाट तर्फे *सायकल बँक प्रकल्पांतर्गत* शाळेतील गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमात एकूण ५१ सायकली१० शाळांतील मुलींना वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रम भारत विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री. समीर कुणावार उपस्थित होते. मा. पी.डी.जी. श्री. राजे संग्रामसिंह भोसले तसेच समुद्रपूर येथील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

समीरभाऊंनी रोटरी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून पुढील वर्षी १०१ सायकली वाटप करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला भारत विद्यालयाचे प्राचार्य हरीश भट्टड विशेष उपस्थित होते. हा उपक्रम प्रोजेक्ट डायरेक्टर्स रोटेरियन डॉ. राजू निखाडे, रोटेरियन मुरली लाहोटी व रोटेरियन मुकुंद मुंधडा यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रोटेरियन प्रा. जितेंद्र केदार यांनी केले.

Hingnghatnews /सेक्रेटरी रोटेरियन मंजुषा मुळे यांनी सर्व मान्यवरांचे व सदस्यांचे आभार मानले. रोटरी क्लबचे पास्ट प्रेसिडेंट्स दिगंबरजी खांडरे, अशोक बोंगिरवार, अशोक चंदनखेडे, संजय बोथरा, डॉ. राजू निखाडे, मुरली लाहोटी, मुकुंद मुंधडा तसेच रोटेरियन उदय भोकरे, शशांक खांडरे, वैभव पटेलिया, शाकीरखान पठाण, केदार जोगळेकर, पुंडलीकजी बकाने, विवेक तडस, प्रतिभा वांढरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Dharashivnews/बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

0

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा प्रतिनिधी -: येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात (दि.१७)रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार सोनकवडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग काळे व दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

तर ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कावळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने भाषणे, देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती श्रद्धा पुजारी यांनी केले.

Dharashivnews/तर आभार प्रदर्शन मोनिका नदीवाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका अश्विनी भोरे, पल्लवी मुटले, शबाना मुल्ला शिक्षक अक्षय राठोड व आकाश कटकधोंड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी शिक्षक, विद्यार्थी, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loharanews /अतिवृष्टीच्या सरसकट मदतीसाठी कृषीमंत्री भरणे यांना प्रा सुरेश बिराजदार यांचे निवेदन

0

उमरगा : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे पंचनामे पुर्ण करुण शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची तातडीची मदत देण्यात यावी . या मागणीचे निवेदन कृषिमंत्री ना दत्ता मामा भरणे यांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांनी दि.१७ रोजी मुंबई येथे दिले आहे .

देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळापैकी २२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे .तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये आज अखेर आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे .असे असताना प्रत्यक्षात मात्र धाराशिव जिल्ह्यातील अनेक पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त किंवा खराब झालेली आहेत. यामुळे चुकीच्या पर्जन्याची नोंद होत आहे. व त्यामुळे अनेक महसुल मंडळे अतिवृष्टीतुन वंचीत राहत आहेत. वास्तव परीस्थिती पाहता सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस व नुकसान झालेला आहे.

Loharanews /परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा दीडशे टक्के पेक्षा जास्त पावसाची नोंद असल्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन,उडीद ,तुर इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे तरी ही बाब विचारात घेऊन यंत्रणेस पंचनामे करण्याचे आदेश व्हावे व धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची सरसकट नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात म्हटले आहे .

Dharashivnews /स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जकेकुर उपकेंद्र येथे संपन्न

0

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा :जिल्हा परिषद धाराशिव आरोग्य विभाग यांच्या वतीने येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जेकेकूर आरोग्य उपकेंद्र येथे दि . १८ रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले .

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिल बिराजदार व वैद्यकीय अधिकारी डॉ . ऋतुजा साळुंखे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने करण्यात आले .
यावेळी चेतन गायकवाड ,रहमान जमादार,रामभाऊ समाने ,
,लियाकतबी पटेल , डॉ हरुण मुजावर ,दीपमाला देवळकर ,आरोग्य सेविका सोनाली सगर ,संतोष बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती .

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जेकेकूर येथे घेण्यात आलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबिरात १२५ महिलांची तपासणी करण्यात आली .या अंतर्गत विविध कर्करोग ,क्षयरोग’ ,गरोदर माता तपासणी ,लहान बालकांची तपासणी ,रक्त तपासणी ,कुष्ठरोग तपासणी ,यासह रक्तदाब , मधुमेह ,विविध आजारावरील तपासण्या करण्यात आल्या व औषधोपचार देण्यात आले .आयुष्मान कार्डही यावेळी काढण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . ऋतुजा साळुंखे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय बिराजदार यांनी केले .डॉ . हरून मुजावर यांनी आभार व्यक्त केले .

Dharashivnews /यावेळी नागनाथ जाधव,मेघराज देशमुख ,सरोजा बिराजदार, रंजना जांभळे, शितल जाधव,सुनिता सोनकांबळे, विश्वरूपा रेड्डी, सुवर्णा स्वामी , अंगणवाडी कार्यकर्त्या कमल दुलंगे, अनिता कांबळे इत्यादी सह गावातील महिला रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Loharanews/लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

0

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा प्रतिनिधी -: लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (दि.१७) रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष चव्हाण होते .

यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष विनोद गायकवाड , सेवानिवृत्त शिक्षक श्नी. जाधव ,सुतार पाटील, एस.जी.मठपती, योगराज सांडूर ,राहूल स्वामी ,माधुरी कुलकर्णी, रेखा बाभळसुरे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

Loharanews/प्रास्ताविक मनोज स्वामी यांनी तर वनराज सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन करून आभार मांडले.