Home Blog Page 191

चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याला मोहर्थ सापडेना: ग्रामस्थ झाले संतप्त

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे गाव फाटा ते चुंचाळे गावा पर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली असुन , विविध आदीवासी गावांशी जोडणाऱ्या मार्गावर वाहनधारकांना आपले जिव धोक्यात घालुन आपली वाहने चालवावी लागत आहे .

बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य महामार्गास लागुन असलेल्या चुंचाळे गाव फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमिटरच्या रस्त्याची मागील काही वर्षापासुन दयनिय अवस्था झाली असून, रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे,

या वाहन वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवितांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान काही वर्षा पासुन या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन , या संदर्भात चुंचाळे व बोराळे या सह परिसरातील गावांच्या ग्रामस्थांना वेळोवेळी परिसरातील लोक प्रतिनिधी ,यावल पंचायत समिती , सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे या मार्गाची दुरूस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असुन

अद्यापपर्यंत या अत्यंत खराब झालेल्या या रस्त्याकडे कुणालाच वेळ नसल्याचे दिसुन येत आहे .दरम्यान या मार्गावर एखाद्या मोठा अपघात होण्यापुर्वीच प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करावे अशी मागणी मोठया संख्येने ग्रामस्थ मंडळीकड्डन करण्यात येत आहे.

रस्ता बनवा अन्यथा पुन्हा रास्ता रोको: सुपडु संदानशिव यांनी आमच्या प्रतिनिधि सोबत बोलत असताना सांगितले कि,निवडणूक आल्यावर ग्रामस्थाची विनवनी करणारे लोकप्रतिनिधि मात्र आज रस्ता दुरुस्त करण्याच्या मागनीला कानाडोळा करत आहेत,अश्या प्रतिनिधिना आमच्या मत पेटिटून आम्ही नक्कीच जागा दाखवू असे त्यांनी बोलताना सांगितले आनी जर एक महिन्यात रस्ताच्या कामास सुरुवात नाही झाली तर पुन्हा रास्ता रोको करू असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधि सोबत बोलताना सांगितले.

आठवडी बाजार परिसरातील सेंटर बँकेजवळ पोलिसांचा छापा 630 ग्रॅम गांजा जप्त आरोपीला घेतले ताब्यात

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: येथील आठवडी बाजार परिसरात जुने सेंट्रल बैक जवळ शहर पोलिसांनी छापा मारून इम्रानखांन अब्बासखान वय 40 वर्ष रा दगदालीपुरा शेगाव यांच्या ताब्यातून 630g गांजा जप्त केला याबाबत चार पोलीस सूत्रां कळून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे डीवायएसपी विवेक पाटील व ठाणेदार विलास पाटील यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली

की शेगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आठवणी बाजार परिसरात अवैद्य रित्या मादक अमली पदार्थ गांजा ची विक्री होत आहे या माहितीवरूनपोलिस अधिक्षक श्री सुनील क़डासने सर, अपर पोलिस अधीक्षक महामुनि सर, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सर यांच्ये मार्गदर्शानाखाली

पो नि, विलास पाटिल , पो हवा रोहनकार, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवहानदे , गणेश वाकेकर, गजानन वाघमारे यानी जुन्या सेंट्रल बँकेजवळ आठवडी बाजार येथे छापा मारून आरोपी अब्बास खान याला ताब्यात घेतले यावेळी त्याची अंग झडती घेतली असता

त्याच्याजवळ 630 ग्राम गांजा कीमत 7000 रुपये, नगदी गांजा विकरिचे इलेक्ट्रॉनिक वजन 1000 रुपये , तसेच 1 मोबाइल कीमत 10,000 रुपये असा एकूण 18,000 रूपयांचा मुद्देमाल मिलूंन आल्याने आरोपी इम्रानखांन , अब्बासखान वय 40 रा दगदालीपूरा शेगाव यांच्या विरुद्ध पो स्टे, शेगाव येथे NDPS एक्ट कलम 8,C,20 B, अनवये गुनहा नोंद करन्यात आलेला आहे ,

सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक श्री सुनील क़डासने सर, अपर पोलिस अधीक्षक महामुनि सर, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सर यांच्ये मार्गदर्शानाखाली

पो नि, विलास पाटिल , पो हवा रोहनकार, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवहानदे , गणेश वाकेकर, गजानन वाघमारे यानी केली,

रागाच्या भरात घर सोडून शेगाव ला निघुन आलेल्या 2 मुलीना शेगाव पोलिसांनी त्यांच्ये घरि सुखरूप पोहचविले

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दि,25,06,23,रोजी शेगाव पोलिस श्री गजानन महाराज मन्दिर परिसरात रात्रगस्ट करीत असताना रात्रि 2 वाजता 2 अल्पवयिन मूली त्याना सनश्यास्पद वावरतांना मिलूंन अल्यात त्याचे हालचाली वेगडया वाटत असल्याने रात्रगस्तकरिता असलेले

पोलिस निरीक्षक विलास पाटिल ,लखन ठाकुर , चांलक सुरावसे यानि त्या 2 मूलीना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्या वरूड गावातील राहनारया असून आईवडील यांच्या सोबत भांडण करून रागात ते वरुड़ येथून निघुन आल्याचे समझले त्यावरून पो स्टे वरूड येथे मिसिंग तकरार सुधा दाखल असल्याचे समझले

त्यांचेसोबत विश्वासात घेवून त्यांच्ये आई वडील पालक यानाही माहिती देवून त्याना शेगाव येथे बोलावून त्यांच्ये ताब्यात त्या 2 मूली सुखरूप परत देण्यात आल्यात , आपल्या अल्पवयिन रागाच्या भरात घर सोडून निघुन गेलेल्या मूली 8 तासात शेगाव शहर पोलिसानी शोध घेवून सुखरूप पोहचवून दिल्यामुळे

त्या आई वडलानी शेगाव पोलिसांचे खुप खुप आभार त्यानच्या डोळ्यातिल आनन्दाश्रु मधून न काही बोलता व्यक्त झालेत व त्यानी शेगाव पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले व श्रीगजानन महाराजांचे नामस्मरण करीत आपल्या मुलिना घेवून आपल्या घरि वरूड गावी रवाना झालेत, धन्यवाद शेगाव पोलिस

साठ वर्षीय इसमाची मनसगाव तालुका शेगाव येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ओळख झाली या बाबत

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील सागर विठ्ठल कोलकार वय 31 वर्ष याने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली

की 23 जूनच्या रात्री आई बाबासह रात्री घरी जेवण केल्यानंतर आम्ही सगळेजण झोपी गेलो होतो मध्यरात्री नंतर आईने मला झोपेतून उठवून तुझे बाबा दिसत नाहीत कुठे आहेत ते बघ त्यामुळे मी व माझी आई आम्ही दोघांनी बाबांचा शोध घेतला असता

मागील बाजूच्या खोलीमध्ये माझे वडील विठ्ठल शालिग्राम कौलकार हे छतावरील पंख्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन मरण पावलेले आढळून आले. अशा फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कलम 174 जा.फौ अन्वय मर्ग दाखल केला आहे

अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल धनराज माने बक्कल नंबर 629 हे करीत आहेत

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक 24 6 23 रोजी माननीय ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोना निलेश गाडगे 21 88 व पोस्टात यांनी पैशाच्या हारजीत वर जुगार खेळणारे आरोपी क्रमांक 1)सचिन दिनेश गोयल क्रमांक 2) गणेश शिवाजी शेंबडे क्रमांक 3)संजय शाम मोटू क्रमांक 4)धोंडूराम प्रल्हाद चावरे क्रमांक 5) विजय सुरेश चंडाले क्रमांक 6) अमित हरी दंडोरे क्रमांक ,7)नंदू बैजू गोवर क्रमांक 8) मनोज मधु चावरे सर्व खळवाडी परिसर शेगाव हे

अकोट रोड वरील कळवाडी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हार वर जुगार खेळताना मिळून आले सदर आरोपीतांचे ताब्यामध्ये एकूण 2240 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला वरून गुन्हा दाखल करून तपास माननीय ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने निलेश गाडगे बन 21 88 हे करीत आहेत

हरविलेली मुलीचा घेतला शेगांव शहर पोलीसांनी शोध व दिले तिला आईच्या ताब्यात.

0

 

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक २४/०६/२०२३ रोजी भावीक भक्त श्री. नंदकिशोर पंढरी तिजारे रा. हिंगणघाट जिल्हा वर्धा हे त्यांचे पत्नी व ६ वर्षाचे लहान मुलीसह श्री. गजानन महाराज मंदिर परीसर शेगांव येथे दर्शनाकरीता आले होते.

दर्शनाकरीता जात असतांना भाविक भक्तांचे वर्दळीत त्यांची ६ वर्षांची मुलगी कुठेतरी हरवीली. तेव्हा त्यांनी लगेच मुलीचा शोध घेण्यासाठी मंदिर पोलीस चौकी गाठली असता मंदिर चौकीतील पोलीसांनी त्यांची मुलीचे शोध कार्यवाहीसाठी कार्यतत्परता दाखवुन मंदिर परीसरात

मुलीचा शोध घेण्यासाठी सतत लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट केली, चौकीतील ईतर पो. स्टाप व मंदिराचे सेवाधारी यांचे मदतीने लगेच मुलीचा शोध घेऊन तिला तिचे आई वडीलांचे ताब्यात दिले.

मुलीचे शोध कार्यवाहीसाठी पो.का. उद्धव कंकाळ, यांनी कौतुकास्पद तत्परता दाखविल्याने शोध कार्यवाहिमध्ये त्यांचे मोलाचे योगदान लाभले. हरवलेली मुलगी मिळाल्याने व्याकुळ झालेल्या आईचे आनंदाश्रु अनावर झाले व त्यांनी पोलीस व सेवाधाऱ्यांची मन:पुर्वक आभार मानले.

तरी सद्यस्थीतीत मो.सा. चोरी, सोन्याचे पोथ, गळ्यातील दाग दागीने, पाकीट मारी, मोटार सायकल चोरी व लहान मुले मुली हरविण्याचे, पळविण्याचे प्रकार पाहता श्री. संत गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना आव्हाहन करण्यात येते की, दर्शनाकरीता येत असतांना आपले लहान मुला मुलींचा काळजीपुर्वक संभाळ करुन आपले दाग दागीने, पाकीट, पर्स, मोटार सायकल, मौल्यवान वस्तु चोरी किंवा लुट होणार नाही या दृष्टीने सुरक्षीततेबाबत खबरदारी घ्यावी, आपणासोबत अशी कुठलीही दुर्घटणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

श्री शेत्र कारंजा (लाड)जि. वाशिम येथे होणार परशराम महाराजांचा पारायण सोहळा

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अमरावती : श्री शेत्र कारंजा (लाड)जि. वाशिम येथे श्री. नृसिंह सरस्वती (गुरु महाराज) मंदिरात श्रीसंत परशराम महाराज, महिमा ग्रंथाचे पारायण ०९ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक भाविकांनी पारायणासाठी ३० जुनपूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार यांची तर्फे करण्यात आले आहे.

महाराजांनी कारंजा लाड या परिसरामध्ये दिनांक २१ मार्च१९५१ (होळी पौर्णिमेच्या) दिवशी इंझा तालुका कारंजा (लाड) या गावी ब्रह्मलीन झाले त्यानंतर त्या परिसरामध्ये महाराजांचा कुठलाही पारायणाचा कार्यक्रम झालेला नाही.

त्या उद्देशाने सर्व समाज बांधवांनी व भक्तांनी या पारायण सोहळ्याचे साक्षीदार व्हावे या हेतूने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरु महाराज) मंदिराचे विश्वस्त कारंजा (लाड) यांच्या सहकार्याने थेट मंदिर परिसरातील समोरच्या सभागृहात पारायणाची संधी भाविकांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी सेवाधारी देविदासजी वाघमारे, जयंत वानखडे, गोकुळभाऊ शेगोकर, भालचंद्र दादापाटील कथलकर, राजूभाऊ काथलकर, प्रशांतभाऊ देशमुख, अध्यक्ष शरद देवरणकर, जयंत पुसतकर, विलास जामठीकर, विलास दलाल, शरद निहाटकर, हरिहर तांबस्कर, संदीप राजूरकर, सचिन आरोकर, राजू धाकतोड,गणेशराव भांडे,सचीनराव चौधरी, दत्ताभाऊ कापसे,दिपक राजनकर,संतोष दुत्तोंडे,अशोक आगरकर, शुभम पुसतकर,ओम मोरे, कैलास डांगे, सुरेश रोहनकर, मोहन पंडित, पुरुषोत्तम खंडार, सौ रंजनाताई डोरस, सौ पद्माताई भारसाकळे, प्रभाकरराव शेगोकर, चंद्रकांत पुसदकर, अंकुश बाळापुरे, विजय खंडार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेगांव शहरातील काही निवडक प्रभागातील नागरिक पाणीपुरवठा नळ योजने पासून वंचित

0

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

शेगांव शहरातील काही निवडक प्रभागांमध्ये नव्याने समाविष्ट आलेले वार्ड/प्रभाग मुलभूत गरजांची अभाव आपल्या ला पहायला दिसुन येत आहे आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळुन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

असे असतांनाच नव्याने स्थानिक झालेल्या लोकांना भरपूर प्रमाणात कर नगरपरिषद शेगांव कडुन वसुल केला परंतु त्या लोकांना पाणीपुरवठा मिळाला नाही याची दखल सुद्धा कोणीही घेत नाही आपण मोठ्या आनंदात, उत्साहात अमृत महोत्सव वर्ष साजरे करतो

परंतु आपल्या या भारत देशातील शेगांव शहरातील अवस्था बघता नागरिकांना मुलभूत गरजांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे असे असतांनाही येथील आमदार, लोकप्रतिनिधी,जनसेवक स्वताला जलयोधा संबोधित घेणारे येथील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत…….

तात्काळ प्रशासनाने या कडे पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर यांनी केली आहे…..!!

पी. एम. किसान त्रुटी पुर्तता शिबीर

0

 

अर्जुन कराळे शेगाव

खामगांव,दि-22(उमाका)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAAN) अंतर्गत दिनांक 27/06/2023 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता पासुन महात्मा गांधी सभा गृह तहसिल कार्यालय खामगांव येथे शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. शिबीरामध्ये E-KYC करणे,

नविन नोंदणी करणे, नविन नोदंणी केलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देणे, आधार कार्डानुसार नावात दुरुस्ती, ईत्यादी करिता शिबीर घेण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थ्याना लाभ मिळण्याकरीता अडचणी येत आहेत त्यांनी आपले आधार कार्ड, संगणीकृत 7/12 8अ, बँक पासबुक, आधार कार्डाला लिंक असलेले मोबाईल क्रमांक चा मोबाईल व पती पत्नी दोघांचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे.

तरी याव्दारे खामगांव तालुक्यातील पी एम किसान योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या व ज्यांना काही हप्ते मिळुन व नंतर लाभ बंद झालेल्या व नोंदणी करुनही लाभ सुरू न झालेल्या

खातेदारांच्या अडचणी असल्यास (PM KISAAN) पोर्टलवरुन सदयास्थितील स्टेटस आपल्या जवळील सेतु केंद्र, (CSC) आपले सरकार केद्रां मधुन झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन यावे याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे अतुल पाटोळे तहसिलदार खामगांव यांनी कळविले आहे.

बालाजी फैैल रेल्वे गेट जवळ जुगारावर छापा एका विरुद्ध गुन्हा दाखल

0

 

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: येथील शहर पोलिसांनी बालाजी फैैल रेल्वे गेट जवळ सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर छापा मारून एका वरली बहाद्दराला ताब्यात घेतले व त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून योगा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे बकल नंबर 742 व पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे बकल नंबर11 19 यांनी रिक्वेस्ट ठिकाणी छापा मारला असता

त्या ठिकाणी गंगाधर मुरलीधर कांबळे वय 52 वर्षे राहणार बुरुंगले प्लॉट वर बकाल रोड शेगाव याला ताब्यात घेतले त्याची अंग जळती घेतली असता त्याच्याजवळ अगदी तेराशे 30 वरली मटका अंक लिहिलेले चिठ्ठी एक डॉट पेन असा एकूण तेराशे 35 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 12 मुंबई जुगलबंदी कायद्यान्वय यांना दाखल करण्यात आला आहे

अधिक तपास पोलीस नायक गणेश वाकेकर बक्कल नंबर 12 44 करीत आहेत