Home Blog Page 192

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शेगांव शहर पोलिसांनी दिले पालकांचे ताब्यात

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

 

आज दि. 21/06/2023 रोजी शेगांव शहरात पोलीस पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा मिळून आला. त्यास पोलिसांची त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अभयकुमार संजय मोहता वय 10 वर्षे सांगितले त्यास त्याच्या घराचा पत्ता व घरून निघून आल्याचे करणाबाबत विचारणा केली असता.

त्याने अगोदर काही सांगितले नाही परंतु नंतर त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो मराजपुर जि. साहागंज झारखंड ह. मु. शिवणी अकोला येथील रहिवाशी असल्याचे सांगून रागाच्या भरात घरून निघून गेल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नमूद मुलाचा ताबा त्याचे पालक अडव्हकेट किशोर खंडारे यांना देण्यात आला.

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा लाखो वारकऱ्यांना दिलासा

0

 

अर्जुन कराळे शेगाव

मुंबई दिनांक २१: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका येथून हरविलेल्या इसमांचा शेगाव शहर पोलिसांनी लावला शोध. पोलिसांच्या तत्परतेची शहरवासीयाकडून होत आहे कौतुक

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

पोलीस स्टेशन वसंत नगर, ता. पुसद जिल्हा यवतमाळ हद्दीतून हरविलेल्या 47 वर्षीय इसमाचा शेगाव शहर पोलिसांनी शेगाव शहरात शोध लावला याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात येणाऱ्या

पोलीस स्टेशन वसंत नगर हद्दीतून सुनिल राजहंस पाझरे वय ४७ वर्षे रा. पुसद हे दिनांक १६/०६/ २०२३ रोजी पुसद येथुन हरविले होते. त्याप्रकरणी पो.स्टे. वसंत नगर येथे मिसींग क्रमांक २१/२०२३ दिनांक १६/०३/२०२३ चे मिसींग प्रकरण दाखल करण्यात आले होते. सदर हरविलेले इसम हे शेगांव येथे असल्याची माहिती मिळताच परी.

पो.उप. अधिक्षक श्री. विवेक पाटील व पो.नि. विलास पाटील यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पो.स्टे. शेगांव शहर पोलीसांव्दारे विशेष शोध मोहीम राबवुन सदर मिसींग व्यक्तीचा १ तासाचे आत शोध लावला.

सदर शोध मोहीम मध्ये पो.ना./५०४ शेख इरफान यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. सदर मिसींग इसम यांचे नातेवाईकांना माहीती देऊन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सद्यस्थीतीत पो.स्टे. शेगांव शहरामध्ये परी. पो. उप अधिक्षक श्री. विवेक पाटील व पो.नि. विलास पाटील यांचेव्दारे पोलीस प्रशासनाचे कामकाजामध्ये दिसुन येत असलेल्या बदलाबाबत व पोलीसांचे कार्यतत्पतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजरा

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

दरवर्षी 21 जून हा दिवस योगा दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेगांव शहर येथेसुद्धा परी.पो.उपअधीक्षक श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील व शेगांव शहर येथील 40 पोलीस अंमलदार याचे द्वारे योगा दिवस साजरा करून

विविध योग आसनांची माहिती देण्यात आली व योगा अभ्यास घेऊन स्वतःचे व आपले कुटुंबियांचे आरोग्याची काळजी घेणे, आपल्या दिनचर्येत बदल करून नियमित व्यायाम करणे, योगा अभ्यासाचे होणारे लाभ इत्यादींबाबत माहिती देऊन घेण्यात आला.

कृषी केंद्र संचालकां सोबत शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

आज दिनांक २०जून रोजी ११.०० वा. पो. स्टे. शेगांव शहर येथे परी पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील व ठाणेदार पोनी . विलास पाटील यांचेद्वारे शेगांव तालुक्यातील कृषी केंद्र संचालक यांची मिटिंग आयोजीत करण्यात आली होती.

सदर मिटींगमध्ये सद्यस्थीतीत जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या बोगस व भेसळयुक्त बि बीयान्यांचे विक्री व वितरणाबाबत मिटींगमध्ये चर्चासत्र राबविण्यात आले.

शेतकरी हिताच्या दृष्टीने बीयान्यांची जास्त दराने विक्री करु नये, दुकानांमध्ये बोगस बी बीयान्यांचा वापर करू नये. आपले दुकानात कोणती खते, बि बयाने आहेत याची अद्यावत माहीती रजीस्टरला नोंदी ठेऊन दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या व स्वतः दुकानाच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून दुकानामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही अथवा अनुचीत प्रकार घडणार नाही

या करीता दुकानामध्ये C.c.t.v. लावणेबाबत सूचना दिल्या. सदर मिटींग मध्ये शेगांव तालुक्यातील एकुन २० कृषी केंद्र व्यवसायीक उपस्थीत होते.

सुलतानपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश

0

 

प्रमोद  जुमडे हिंगणाघाट

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश व शाखा फलकाचे अनावरण

हिंगणघाट.प्रमोद जुमडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन सुलतानपूर येथील अनेकांनी प्रवीण श्रीवास्तव, रविकिरण कुटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाखा फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले.

सुलतानपूर शाखा अध्यक्षपदी श्रीराम डाहाणे, उपाध्यक्ष शांताराम चिंचुलकर, सचिव गजानन येरेकर, संघटक कुणाल नागठाणे, यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी येथील ज्ञानेश्वर भोयर, विजय पवार, संभा भगत, गजानन सातरकर, राजु आटोळे, अमोल भोयर, आकाश भगत, रुपेश भोयर, शांताराम चिंचुलकर, भागवत भोयर, श्रीराम डाहाने, किसना भगत, नाना भगत, अर्चना डाहाने, विना भोयर, सुकधा रोकडे, सुनंदा भगत, कोमल सातारकर, दुर्गामाता सातारकर, रुचिता चिंचुलकर, सारिका चिंचुलकर, शोभा भगत, वनिता चिंचुलकर जोशना येरेकर, कल्पना भगत, जया भगात, गीता नागठाणे, अर्चना भगत, कुंदा भगत, काजल भगत, बेबीताई भोयर, गाथा डाहाने, संगीता निशाणे यांनी पक्ष प्रवेश केला.

कार्यक्रमाच्यावेळी अतुल वांदिले यांनी नवयुकांचे पक्षात स्वागत केले. त्याना रा.कॉ. पक्षाचा दुपट्टा देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलंय तेलंग, जिल्हा सरचिटनीस दशरथजी ठाकरे, प्रवीण श्रीवास्तव, अमोल बोरकर, राजू झाडे, आशिष मंडलवार, राजू मुडे, सुशील घोडे, रविकिरण कुटे, श्रीमती भोयरताई यांचासह आदी मान्यवर उपस्थित होते..

दबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर मारला छापा

0

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहराच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून हजारो रुपये नगदी व साहित्य जप्त केले

या कारवाईमुळे जुगार यामध्ये खळबळ निर्माण झालेली दिसत आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील यांना गुप्त माहिती मिळाली

की शहरातील इदगाह प्लॉट आणि आठवडी बाजार इत्यादी भागामध्ये पैशाच्या हारर्जित वर वरली मटका व जुगार सुरू आहे या मिळालेल्या माहितीवरून ठाणेदार विलास पाटील यांनी शेगाव शहर येथील पो.ना. वाकेकर व इतर पो.स्टाप सह ईदगाह प्लॉटमध्ये छापा मारून त्या ठिकाणी एकाबादशाह नावाचा ताशपत्ता जुगार खेळणारे

आरोपी 1) फिरोज खान करीम खान वय 49 वर्ष

आरोपी 2) शेख अकिल शेख नजिर वय 38 वर्षे

आरोपी 3) शेख रूस्तम ऊर्फ सदाम शेख बशिर वय 29 वर्षे सर्व रा. इदमहाप्लॉट शेगाव
यांचेवर कलम 12 (अ) म.जु.का. अंतर्गत 19:30 वा सुमारास छापा कार्यवाही करून

त्याचे अंगझडतीत व डावावर , 3 मोबाईल नगदी पैसे व 52 ताशपत्ते असा एकूण 35,050/- रू चा मुद्देमाल घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करून कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा पुढील पो.हे.का. वाघमारे करीत आहे.

तसेच आज दिनांक 19.06.2023 रोजी आठवडी बाजार परिसरामध्ये पोहे का गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी छापा मारून वरली मटका जुगार खेळ पैशांची हार जीत वर खेळणारा आरोपी शेख इरफान शेख मंजूर व 27 वर्ष राहणार आझाद नगर आळस नारोड आरोपी तुला ताब्यात घेऊन

त्यांच्या जवळून एक मोबाईल नगदी पैसे असा एकूण 16.255 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कलम 12 मुजूका प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्ह्यांची पुढीलतपास पो. ना गणेश वाकेकर करीत आहे

आज शहरात मोठ्या आवाजाची सायलेंसर लावलेल्या 4बुलेट सह 45 वाहन चालकावर मोटर वाहन कायदयाचे अंतर्गत कार्यवाही 52000 दण्ड वसूल

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलिसांनी आज शिवाजी महाराज चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान 45 वहनावर मो वा का अंतर्गत कार्यवाही केली त्यात 4 बुलेट मोठ्या आवाजाच्या साइलेन्स बदल केलेल्या बुलेट, फैंसी नम्बर प्लेट, बिना नम्बर प्लेट, ,ट्रिपल सीट , ड्रायवहिंग लायसेंस, मुळ कागदपत्रे सोबत नसने या

कार्यवाही करून वाहने पोलिस स्टेशन मध्ये डिटेन करन्यात आल्या आहेत , तरी पोलिस विभाग कडून आवाहन करण्यात येते की वाहतूक नियमांचे पालन करावे लहान मुलानी गाडि चलवू नये, पालकानीही त्याना गाड़ी चालविने करिता देवू नये,

अकोट रोड वरील कलवाडी वस्ती जवळ पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.

0

 

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव..अकोट रोडवरील कलवाडी वस्ती जवळ पोलीस बंदोबस्त मध्ये अतिक्रम अतिक्रमाची कारवाई आज करण्यात आली

शेगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने आज सोमवार 19 जून रोजी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अकोट रोड वरील लाल बाबा दुर्गा माता मंदिरासमोर वसलेल्या नवीन खलवाडी वस्ती लगत हॉटेल पान टपरी इत्यादी अतिक्रमण पाठविण्याची कारवाई करण्यात आली

यावेळी शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व मुख्य प्रशासक डॉक्टर जयश्रीताई काटकर बोराडे मॅडमशेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील उपस्थित होते

खा.जाधव, माजी मंत्री आ.डाॅ. कुटे ,डीआरएम केडिया यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव राज्याचे माजी मंत्री व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे तसेच भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डी आर एम केडिया साहेब यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डीआरएम

शेगाव येथील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 18 जून रोजी शेगावला आले होते त्यांनी शेगाव येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर खामगाव रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह सभागृहांमध्ये खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजीव भाऊ कुठे यांच्यासोबत आयोजित पूर्वनियोजित बैठकीसाठी ते विश्रामगृह कडे रवाना झाले.

विश्रामगृह येथील व्हीआयपी सभागृहामध्ये खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय भाऊ कुठे व डी आर एम केडिया यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्नेहलता दाभाडे जिल्हा संघटक मंदाकिनी चव्हाण व जिल्हा सचिव शीला सोनेकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी रेल्वे संबंधी विविध मागण्या

सुद्धा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम दाणे पाटील माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख तालुकाध्यक्ष रामेश्वर धारकर रेल्वेचे उच्च अधिकारी उपस्थित होते