Home Blog Page 194

अग्रेशन चौक परिसरातील नक्षत्र ज्वेलर्सच्या सराफा व्यवसायीका च्या सतर्कते मुळे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी सोने चांदी विक्रेत्यांना गंडवणारा गुन्हेगाराला केले गजाआड 

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

दिनांक 13/06/2023 रोजी रात्री 09/00 वा. सुमारास आरोपी विठ्ठल भालचंद्र सानप वय 52 वर्ष राहणार प्लॉट नंबर 72 राजीव गांधी नगर सिडको छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याने शेगांव येथील नक्षत्र ज्वेलर्स शेगावचे सराफा व्यवसाका कडून सोन्याचे पेंडल खरेदी केले व गहूमनी खरेदी करायचे आहे असे म्हणाला. त्यानंतर सोन्याचे 46 गहू मनीचे वजन घ्यायचे आहे

असे सराफा व्यावसायिकाला म्हणाला, मोड म्हणून आपल्या जवळील काही दागिने त्यांना दिली परंतु सदर दागिने नकली असल्याचे सराफा व्यावसायिकाचे लक्षात आल्यामुळे त्यांना सदर व्यक्ती बद्दल संशय आला नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक निलेश गणोरकर यांनी याबाबत शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली.

सदर माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह जाऊन त्यांनी आरोपीला पकडून त्याचेंजवळून नगदी 88,080/- रु. व काही पांढऱ्या व पिवळ्या धातूचे वस्तू दागिने व बनावट चांदी चे दागींने ईतर साहित्य जप्त करून ताब्यात घेतले

याबाबत सराफा व्यावसायिक निलेश शांताराम गणोरकर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्र. 328 /23 कलम 420,511 भा.द.वी. चा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उप. नि. आशिष गंद्रे करीत आहे.

या आरोपी ची छत्रपती संभाजी नगर बीड व जालना यथे गुन्हेगारी पूर्वपार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडल्याने सराफा व्यवसायिकांचे फसवणुकीचे बरेच गुन्ह्याची उकल होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.

निर्मला तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे मॅडमच्या हस्ते आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव :राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय समाजसेविका राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या प्रदेश पदाधिकारी सावित्रीबाई फुले नारी रत्न पुरस्कार प्राप्त सौ.निर्मला गणेश तायडे यांनी केलेल्या विविध सामाजिक व सेवा कार्याची दखल घेऊन आधार सोशल फौंडेशन मार्फत राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार,2008 च्या मिस इंडिया असणाऱ्या शुभांगी शिब्रे मॅडम च्या हस्ते बेळगाव (कर्नाटक) येथे सौ निर्मला गणेश तायडे यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन

त्यांचा गौरव करण्यात आला त्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे गरीब गरजू कुटुंबांना मदत करणे पूरग्रस्थांना सुधा एक मदतीचा हात दिला, माता रमाई जयंती निमित्ताने धून भांडी करणाऱ्या महिलांना साडी चोळी वाटप केले,प्रत्येक महिला दिनाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या, महिलांचा शाल, श्रीफळ पु्स्पगुच्छ देऊन मातृ शक्तीचा सन्मान केला

महिलांच्या समस्या जाणून होईल ती मदत करण्याचा एक सामाजिक प्रयत्न सर निर्मलाताई तायडे या सतत करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सौ निर्मला गणेश तायडे यांना विश्वसुंदरी शुभांगी शिब्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या बेळगाव येथे आज आयोजित कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात आले

विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने प्रा. डॉ. शरद विहीरकर यांच्या सत्कार

0

 

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट

हिंगणघाट प्रमोद जुमडे: विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने रघुनाथ शेंडे यांच्या नेतृत्वात प्रा.डॉ. रमेश पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनटक्के यांचे नियोजनामध्ये 6 जून ते 11 जून या कालावधीत संवाद यात्रा नागपूर वरून निघाली विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा ,यवतमाळ अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून संवाद साधत शेवटी नागपूर येथील नेहरू महाविद्यालय सक्कदरा चौक करण्यात आला

समारोपीय कार्यक्रमाला रघुनाथ शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. श्रीरामजी कावळे प्र – कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. प्राचार्य सुनील साखरे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ.सतीश चाफले महामंत्री शिक्षक मंच ,नागपूर तसेच प्रा. डॉ.नामदेव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. शरद विहीरकर यांचा सत्कार करण्यात आला

हिंगणघाट परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभाग घेणारे प्रा. डॉ शरद विहीरकर हे रा. सू. बिडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, हिंगणघाट येथे इंग्रजी विभागामध्ये कार्यरत असून आयक्युएसी समन्वयक आहे यांचे संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणावर निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

याप्रसंगी नागपूर विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक आणि समाज बांधव उपस्थित होते .

यावल चोपडा मार्गावर एसटी बस व मोटरसायकलचा भिषण अपघात एक जण ठार तर तिन जण गंभीर जख्मी

0

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील बुऱ्हाणपुर अंकलेश्र्वर महामार्गावर यावल शहरा पासून अवघ्या दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मरण पावला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे .

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , आज दिनांक १२ जुन रोजी दुपारी ३ते ३,३eवाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ यावलहुन चाळीसगाव जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच १४ बिटी२१४४या वाहनचालक राजेन्द्र सोनवणे

यावल आगाराची बसचा आणी मोटरसायकल एम पी ०९क्युटी ३९३९या वाहनांचा भिषण अपघात होवुन यात दयाराम बारेला वय २o वर्ष राहणार जामुनझीरा तालुका यावल हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला वय२८ वर्ष, सुनिता मांगीलाल बारेला वय २५ वर्ष, आणी चिंकी बारेला वय३ वर्ष सर्व शिरवेल ( मध्य प्रदेश ) तिन जण जखमी झाल्याचे वृत आहे .

दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रग्णालयात पाठविण्यात आले आहे

शेगाव पोलीस स्टेशन समोर वाहन तपासणी करीत असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये वीस इंच लांबीची दोन इंच रुंदीची धारदार तलवार मिळाल्याने एकच खळबळ

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र तसेच विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव शहरात आज बारा जून रोजी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील व विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी सहा वाजे दरम्यान पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी दरम्यान पांढरा रंगाची शिफ्ट कार क्रमांक टी एस 17 जे 44 58 या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये सागर गंगोडा व्यासाली व वीस वर्षे राहणार मंडळ झुकल मोहम्मद खंडेबलूर निजामाबाद आंध्र प्रदेश व शंकर गोंडा लक्ष्मण गोंडा बासलवर व 19 वर्षे राहणार सेक्टर 110 नगरबोध मार्केट लांद्रन मोहली पंजाब या दोघांना संचायावरून ताब्यात घेतली

व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एक तलवार स्टीलची 20 इंच लांबीची व दोन इंच रुंदी ची धारदार पाहत असलेली स्टीलची तलवार किंमत दोन हजार रुपये एक लाकडी दांडा 32 इंची लांबी साडेचार इंच गोलाई अर्धा लिटर पेट्रोल बॉटल विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार रुपये विवो वाय 75 कंपनीचा मोबाईल किंमत 22 हजार रुपये नोकिया कंपनीचा मोबाईल किंमत हजार रुपये व बनावट पांढरा मुंबई या स्विफ्ट डिझायर कार किंमत आठ लाख रुपये असा एकूण आठ लाख 50 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

याप्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी आर्म एक्ट कलम चार ऑब्लिक 25 135 मुंबई पोलीस कायद्यान्वये 41( 4) crpc प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेगाव शहरात एकच खडबड निर्माण झाली आहे

कारवाई शुन्य नगर पालीकेच्या विरोधात पुन्हा जनआक्रोश

0

 

नागरीकांनी दिला जिल्हाधिकारीना निवेदनातुन आमरन उपोषणाचा इशारा

सिंदी रेल्वे ता.१२ : नेहमीप्रमाणे स्थानिक नगर पालिका प्रशासणाला अतिक्रमणाबाबत अनेक लेखी तक्रारारी करुन सुध्दा कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश पेटला असुन प्रभाक क्रमांक ७ मधील वार्ड क्रमांक १३ येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की,घरटॅक्स सक्तीने वसुल करणार्‍या नगरपालीका प्रशासणाने नुकतीच अव्वाच्यासव्वा घरटॅक्स वाढीची नोटीस सर्व सिंदीवासीयांना बजावली मात्र कोणत्याही टॅक्सधारक नागरीकानी अतिक्रमणाबाबत किवा दोन शेजारी घरामधील जागेवरुन उध्दभवलेल्या वादावर कवडीची कारवाई सिंदी नगरपालिका प्रशासन करीत नाही परिणामता शहर अतिक्रमणाने बजबज झाले आहे गल्लीबोळातुन दुचाकी जाने कठीन झाले आहे. याबाबत संपुुर्ण सिंदीवासीयांत पालिका प्रशासना विरुद्ध रोष पहायला मिळतो.

शहरातील प्रभाक क्रमांक ७ वार्ड क्रमांक १३ मधील रहिवासी प्रभाकर लारोकार यांच्या नविन घराचे बांधकाम सुरू आहे त्यांनी आपल्या घराचा जीना/ पायर्‍या सार्वजनिक आमरस्त्यावर बांधल्यांने परिसरातील नागरिकांना जाने-येने करतांना अडचन होते. या अतिक्रमणाबाबत नगर पालिका प्रशासणाला मोहल्ल्यातील नागरीकानी तीनदा लेखी तक्रार केली. पालिका प्रशासनाने दोनदा प्रत्यक्षात मोक्का पाहनी केली आणि श्री लारोकार यांनी अतिक्रमण केल्याचे मान्य केले मात्र कारवाई शुन्य नगरपालिकेने अद्याप हे अतिक्रमण पाडुन मोकळे केले नाही.

पालिका प्रशासन केवळ अतिक्रमणाच्याच मुद्दावर कोणाच्या दबावात काम करते हेच कळत नाही.
शेवटी वैतागुन परिसरातील रहीवाश्यांनी खुशाल उर्फ पिन्टु इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना हि समस्या बुधवारी (ता.१५) पर्यंत निकाली काढली तर ठिक अन्यथा शुक्रवारी (ता.१६) पासुन नगर पालिका कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचाच इशारा दिला आहे.

कारवाई शुन्य नगर पालीका प्रशासनाच्या विरोधात अनियमित होणार्‍या पाणी पुरवठा बाबत काॅग्रेसने नुकताच जनआक्रोश मोर्चा काढुन रोष व्यक्त केल्याच्या बातमीची शाई वाळते न वाळते तर वार्ड क्रमांक १३ मधील नागरीकांनी अतिक्रमणाच्या समस्येवर आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने पालिका प्रशासना विरुद्ध आक्रोश पाहाला मििळतो आहे

विहिगाव -खेट्री येथील दोन दुचाकींची समोरासमोर धडक?

0

 

▪️विहीगाव- अटाळी रस्त्यावरील अपघात घटना
▪️एक जागीच ठार दुसरा गंभीर जखमी

राहेर:-पातुर तालुक्यातील खेट्री येथील दुचाकी विहीगाव अटाळी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना खामगांव तालुक्यातील विहीगाव येथे रविवार दि. 11 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली.

यात विजय शेगावकर वय 58 वर्ष रा.विहीगाव ता.खामगाव असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.खेट्री येथील अमोल एकनाथ लांडे वय 35 हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

खेट्री येथील योगेश महादेव ताले व अमोल एकनाथ लांडे हे दोघेजण दुचाकीवर खामगांव कडे जात होते तर खामगांव तालुक्यातील विहीगाव येथील दुचाकीस्वार खामगांव हून विहिगाव कडे जात असताना दरम्यान दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात विहीगाव येथील विजय शेगावकर हे जागीच ठार झाले.

अमोल एकनाथ लांडे हे गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी अकोला हलविले आहे.प्रतिनिधी गणेश भाकरे मोरगांव भाकरे

सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नाने हिंगणघाट शहरातील ३१ अंगणवाडी पोहोचले विद्युत मीटर

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट

मास्टर कॉलनी(यशवंत नगर),रामनगर वॉर्ड व दत्त मंदिर वार्ड सह हिंगणघाट शहराच्या अशा एकूण ३१ अंगणवाडीला महावितरणाकडून विद्युत मीटर लावण्याचे काम सुरु

सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

हिंगणघाट शहरातील अंगणवाडीला महावितरणाचे वीज मीटर मिळावे व अंगणवाडीतील वीज समस्या दूर व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांच्या मार्गदर्शनात महावितरणाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याकडे अंगणवाडी मधील विद्युत मीटरची समस्या मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.

हिंगणघाट शहरातील प्रत्येक अंगणवाडी मध्ये,लहान मुलानंचे आहार,लसीकरण,किशोरवीण मुलींची सभा,महिन्याची आरोग्य तपासणी,पोलियो डोज असे विविध उपक्रम राबविल्या जातात यात ३ ते ५ वयोगटातील असे ३० ते ४० लहान मुलं रोज शिक्षण घेतात परंतु ३१ अंगणवाडीमध्ये

आतापर्यंत विद्युत मीटर लावण्यात आलेले नव्हते विद्युत प्रवाह व विद्युत मीटर नसल्यामुळे उन्हाळ्याची ऊन लक्षात घेता अंगणवाडी सेविकेला व लहान मुलांना बरेच वर्षा पासुन त्रासाला सामोरे जावे लागतं होते.

परंतु स्थानिकांनी सामाजिक कार्यकरते विकी वाघमारे यांच्या सामाजिक क्षेत्रावर विश्वास ठेवून अंगणवाडी मध्ये विद्युत मीटर नाही या संदर्भात सांगितले हेचं गांभीर्य लक्षात घेत महावितरणाला कसून पाठपुरावा केला,हिंगणघाट शहरातील अंगणवाडीत विद्युत प्रवाह नाही व मीटर नाही,विद्युत प्रवाह संपूर्ण हिंगणघाट शहरारातील अंगणवाडीला मिळावे यासाठी विकी वाघमारे यांनी गांभीर्य लक्षात घेत कामाला दुजोरा दिला व महावितरण विभागाचा अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून पाठपुरावा करीत मागणी केली

अखेर सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले या मध्ये मास्टर कॉलनी(यशवंत नगर),रामनगर वॉर्ड व दत्त मंदिर वार्ड सह हिंगणघाट शहराच्या अशा एकूण ३१ अंगणवाडीला महावितरणाकडून विद्युत मीटर
लावण्याचे काम सुरु केले आहे.

 

प्रतिक्रिया:-

नागरिकांनी माझ्या सामाजिक क्षेत्रावर विश्वास ठेवला तोच विश्वास ठेवत मि अंगणवाडी मध्ये विद्युत वीज मीटर लागावे,अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात विद्युत मीटर नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व लहान मुलांना पुष्कळसा त्रास सहन करावा लागतं होता आता हा त्रास समोर होणार नाही हेच डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी मध्ये विद्युत विज मीटर लावण्यात यावे हाच प्रयत्न सातत्याने करीत होतो,महावितरणाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने माज्या उपस्थितीत मीटर लावल्यात आले याचा आनंद आहे

:सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे

मेडिकल कॉलेज की मांग के लिए काले गुब्बारे हाथ मे लेकर धरने आंदोलन महिला ओ का आंदोलन मे बडी संख्या मे सहभाग.

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट:

वर्धा जिले के लिए राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर में होने के लिए शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती द्वारा संघर्ष सुरू है।
डा बाबासाहेब आंबेडकर चौक में आयोजित धरने आंदोलन का कल चौदावा दिन था।

इसके लिए पहले संघर्ष समिती द्वारा बड़ा लॉंग मार्च निकाल कर बाजार पेठ बंद रखी गई थी l उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस की भेट लेकर चर्चा की गई और ज्ञापन दिया गया था l लेकिन शासन द्वारा अब तक इसकी कोई दखल नहीं ली गई।

इस पर शहर के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतले के पास धरना आंदोलन सुरू किया गया, जिसका कल चौदावा दिन था। जिसमे अब महिलांओ ने भी बड़ी संख्या में सहभाग लिया तथा अनोखे अंदाज मे सरकार का ध्यान आकर्षित किया।

शासकीय वैधकीय महाविद्यालय महिला कृति समिती ने सरकार का ध्यान आकर्षित करने काले
गुब्बारे हाथ मे लेकर धरणे दिए। जिसमे प्रमुखता से शासकीय महाविद्यालय कृती समिती की तरफ से सीमा मेश्राम, वंदना भगत, लक्ष्मी वानखेडे, वंदना थूल, राजश्री बांबोळे, सोनू बाभुलकर, शीतल तिवारी (औषधी केंद्र संचालक) की उपस्थिति थी। इस आंदोलन मे अब महिलाओ का बढता प्रतिसाद मिलता दिखाई दे रहा है।

महीलाओ के आंदोलन को देख के सभी वर्गो के लोगो को प्रेरणा मिली ।
रुपेश लाजुरकर, दिलीप पुनासे, गौरव डफ,अरविंद संगोले, सुरेंद्र बोरकर, श्याम इडपवार और साथियों के सामूहिक नेतृत्व में शुरू धरने आंदोलन को अब बढ़ता प्रतिसाद मिल रहा है।

विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

 

अर्जुन कराळे शेगाव

बुलडाणा, दि. ११ : केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र 50 टक्क्याहून अधिक वाढविण्यात येणार आहे त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणावरील खारेपाणी गोड्या पाण्याखाली आणण्यात येणार आहे.

हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. खारपाणपट्ट्यात असलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये झिंगा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभाव, कापूस उत्पादन आणि अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहे. शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणी, रोजगार, शाळा, स्वच्छता, मालाला भाव, मैदान, हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण झाल्यास समृद्ध जीवन जगतील. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे, रस्ते विकासाचे जाळे विणण्यास मदत करतात. जालना आणि सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे. जनतेच्या पैशातून विकासकामे करण्यात येतात. ही विकासकामे चांगल्या दर्जाचीच व्हावीत. निकृष्ट दर्जाची कामे ही जनतेशी बेइमानी करणारे आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील कामांमध्ये अनेक वेळा व्यत्यय आला. मात्र ही कामे तीन भागात पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. याकामांबद्दल लोकप्रतिनिधींचा समाधानकारक अभिप्राय ही कामे चांगली झाली असल्याची पावती आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गडकरी यांनी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या मलकापूर-बुलडाणा रस्ता विकासासाठी १२०० कोटी, बाळापूर -शेगाव रस्त्यासाठी ३५० कोटी, शेगाव-संग्रामपूर रस्त्यासाठी ३०० , संग्रामपूर ते सीमेपर्यंत रस्त्यासाठी 385 कोटी रुपये या नवीन विकासकामांची घोषणा यावेळी केली.