Home Blog Page 203

मोटरसायकलच्या भिषण अपघात झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर सांगवीहिंगोणा गावाच्या दरम्यान अज्ञात वाहने धडक दिल्याने मोटरसायकलच्या भिषण अपघात झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की भिमराव बाळु पांडव (वय ३५ वर्ष राहणार म्हैसवाडी तालुका यावल ) हा तरूण आपल्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच १९ ईबी ४७९१व्दारे सांगवी गावात आपल्या सासरवाडीला भेट देवुन यावल फैजपुर मार्गा वरून सांगवी मार्ग मारूळ गावास आपल्या बहीणीस भेटण्यासाठी दुचाकी वाहनाने जात होता.

दरम्यान, रात्री ८,३० ते ९ वाजे च्या सुमारास सांगवी ते हिंगोणा गावाच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला जोरदार धडक दिल्यावे मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात भिमराव पांडव नांवाचा हा जागीच मरण पावले आहे .

अपघात झाल्यावर तात्काळ नागरीकांच्या मदतीने गंभीर जख्मी झालेल्या भिमराव पांडव यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. मयत भिमराव प्रदीप पांडव यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुली व एक मुलगा आहे.

त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डोंगर कठोरा आदीवासी आश्रमशाळेत कार्यरत सफाई कामगार यांनी केली गळफास घेत आत्महत्या पोलीस घटनास्थळी दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगरकोटा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात मिळालेली माहिती

अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील आदिवासी आश्रम शाळेत सफाई कामगार काम म्हणून कामास असलेले नामदेव दगडू खैरनार वय ५६ वर्ष यांनी आज दिनांक ८ मे २०२३ सोमवार रोजी वेळ माहीत नाही ते आश्रम शाळेचे कर्मचारी राहात असलेल्या खोलीच्या ठिकाणी त्यांनी छताला दोरी बांधुन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना समोर आली आहे.

नामदेव खैरनार हे२०१६पासुन मागील आठ वर्षापासून डोंगर कठोरा आदिवासी आश्रम शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते, आज सकाळीच त्यांनी आपल्या वड्री तालुका यावल या गावाला राहणाऱ्या मोठया मुलाला फोन करून मला माझ्या लहान मुलाशी बोलायचे आहे असे बोलुन लहान मुलाशी बोलणे झाले नाही त्या वेळी त्यांनी मोठया मुलाशी माझी तब्येत खराब आहे असे सांगितले

व मला भेटायला ये असे सांगितले व माझ्या खिशातील चिठ्ठी वाचुन घ्याची असे सांगीतले असे बोलणे झाल्यावर तात्काळ त्यांना भेटण्यासाठी डोंगर कठोरा आदिवासी शाळेवर त्यांचा मोठा मुलगा आणि सून हे आले असता त्यांच्या येण्याची आधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडतील आले .

घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पहोचले असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे .
मयताचा मुलगा गोपाळ नामदेव खैरनार यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे .

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महत्वपूर्ण बैठक आज शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव.राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा ह्या या बैठकीला अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या विविध समस्येबाबत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रा त विस्तारित करण्याच्या उद्देशाने सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या तसेच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांसाठी सतत लढा देणाऱ्या राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सक्रिय पदाधिकारी असलेल्या उषाताई वनारे यांची

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर एकमताने निवड करण्यात आली सदर निवडीची घोषणा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी केली या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या उपस्थित महिला सदस्य व पदाधिकारी यांनी सौषा वनारे मॅडम यांचे अभिनंदन केले.

बैठकीला अकोला जिल्हाध्यक्ष सौ.लीनाताई पाचबोले मॅडम, अकोला जिल्हा सरचिटणीस फुलाबाई राठोड मॅडम, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे मॅडम, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस कुमारी स्नेहलता दाभाडे , कुंभार समाज महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे प्रदेश सरचिटणीस सौ. ज्योतीताई बावस्कर खामगाव तालुका अध्यक्ष सौ मंगलाताई हिवरकर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या शेगाव तालुका अध्यक्षा सौ शुद्धमती निखाळे कुमारी अनुशा निखाडे सौ वैशाली जोशी यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अनेक महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या

भोई समाजाचे पारस येथे भव्य मच्छसंपदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

0

 

पारस येथे मच्छसंपदा मार्गदर्शन भव्य शिबिर सोमवार ८ मे रोजी सावता माळी सभागृह पारस येथे मच्संछसंपदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यसंपदा व्यवसाय संबंधित

शासनाच्या विविध योजनाचा लाभ मच्छीमारांसाठी मिळण्याचे उद्घाटन मा.आ. रणधीर सावरकर सचिन भालेराव प्र विनोद राठोड सहायक आयुक्ता मत्स्य विभाग अकोला यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे असे आयोजन गणेश सुरजुसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितले आहे

या कार्यक्रमाला माजी आमदार बळीरामजी सिरस्कार उखाणराव सोनवणे,डॉ बावणे, विजय साटोटे राजारामजी म्हात्रे तथा मधुवर कोल्हे गुरुजी महिला पत्रकार संगीताताई इंगळे यांची प्रमुख उपस्थिती

लाभणार आहे भोई समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना पंतप्रधान मच्छसंपदा योजना अंतर्गत शासनाच्या विविध योजनाचा आयोजक लाभ व मच्छ व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात

आल्याची माहिती आयोजक गणेश सुरजुसे,श्रावणजी धारपवार,गणेश श्रीनाथ यांनी दिली आहे शिबिरामध्ये नोंदणी विनामूल्य करण्यात येणार आहे २ पासपोर्ट व आधार कार्ड झेरॉक्स सोबत आनायल सांगितले आहे.

महाराष्ट्राची अवहेलना थंबवा अन्यथा तीव्र आंदोलन : संभाजी ब्रिगेडचा इशारा

0

 

चिखली* : घटनाबाहय शिंदे – फडणवीस सरकार चुकीचे निर्णय घेत असून महाराष्ट्राची वाट लावत आहे.

त्वरित महाराष्ट्राची अवहेलना थंबवा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेड़ू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे आणि प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी चिखली येथे ६ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

ते संघटन बंधनीसाठी चिखली येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी सावंद साधला.
डॉ.शिवानंद भानुसे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकरने १४ मार्च रोजी कंत्राटी नौकरभरतीचा काढलेला शासन आदेश तरुणाचे भविष्य उद्धवस्त आणि अंधकारमय करणारा आहे. त्याचबरोबर हे सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत असून अस्मानी सुल्तानी संकट राज्यावर असताना हे अयोध्या दौरा करतात.

जाहिरतिवर अमाफ खर्च करीत आहे.शेतीमालाला हमीभाव व दारूमुक्त गाव हे संभाजी ब्रिगेडचे घोषवाक्य आहे.
महागाईने सामान्य मनसाचे कंबरडे मोडले आहे. प्रचंड मोठ्या प्रमानावर बेकरी वाढली आहे. शिक्षण आणि आरोग्याचे तिनतेरा वाजले आहे.

मराठा आरक्षणाचा मराठा ओबीसीकरण एकमेव मार्ग असताना राज्य सरकारच्या अधिकारात असताना राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. जातनीहाय जनगणना करुन ओबीसी आरक्षणाचे सरक्षण करने आवश्यक असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

कुठलेही समाजकार्य नसताना अप्पा धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तो पुरस्कार त्वरित परत घ्यावा ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. तो पुरस्कार वितरित करण्यासाठी भर दुपारी कार्यक्रम आयोजित करुण लाखो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या राज्य सरकरवर सादोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

आशा प्रकारची चाललेली महाराष्ट्राची अवहेलना त्वरित थांबवा अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची असेल.असा इशारा डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष शिवश्री संतोष गाजरे, गजानन भोयर विभागीय अध्यक्ष, रमेश ढगे विभागीय उपअध्यक्ष,योगेश पाटील जिल्हा अध्यक्ष बुलढाणा उत्तर,विकास खंडागळे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा दक्षिण ,मदन दहातोंडे,पांडुरंग पाटील,श्रावण भुसारी,आकाश लंबे,अमर पाटील, राजकुमार जाधव,योगेश खेडेकर,सुनील वाघमारे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेगाव रेल्वे स्टेशनवर आर पी एफ चे मुख्य आरक्षक पोलीस हेडकॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त केले

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव रेल्वे स्टेशनवर गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणारे आर पी एफ चे मुख्य आरक्षक पोलीस हेडकॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी शेगाव रेल्वे स्टेशनवर ड्युटी बजावत असताना

शेगाव रेल्वे स्टेशन येथे झालेल्या मोबाइल चोरी प्रकरणी अवघे 24 तासातच रंजन तेलंग यांनी छडा लावत 02 जणांना तर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशाच्या सामानाची रेकी करत असलेल्या एकाला रंजन तेलंग यांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे रंजन तेलंग यांनी तिघांचे पोलिस रिकार्ड चेक करताच तिघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे समजले.

तिघांनाही मेडिकल केल्यानंतर पुढील कारवाईसाठी शेगाव रेल्वे पोलीस जीआरपी यांच्या सुपूर्द करण्यात आले

रंजन तेलंग यांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले

नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

मुख्याधिकारी मॅडमचे दुर्लक्ष तर शहरवासी त्रस्त
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरीमध्ये नगरपालिका आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून आठ आठ दहा दिवस कचरा उचलला जात

नसल्याने ठीक ठिकाणी कचरा साचून त्यामुळे दुर्गंधी पसरलेली दिसत आहे या सर्वांचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे

याबाबत शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर्स जयश्री बोरकर बोराडे मॅडम यांना वारंवार लेखी व तोंडी सांगून सुद्धा याबाबत त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही असा आरोप शहरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे

शेगाव येथून महाशिवपुराण कथा स्थळ मैसूर अकोला पर्यंत बस सेवा सुरू करावी महिला प्रवासी संघटनेची मागणी

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

: शेगाव येथून शिव महापुराण कथास्थळ महेशपुर अकोला पर्यंत तात्पुरती 5 मे पासून 11 मे पर्यंत बस फेरी सुरू करण्यात यावी .अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने शेगाव बस डेपो प्रमुख जंजाळ साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या मधुर आवाजात 5 मे ते 11 मे पर्यंत म्हैसपुर अकोला येथे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आलेली आहे

शेगाव व परिसरातून या कथा श्रवणासाठी हजारोच्या संख्येने भाविक अकोला म्हैसपुर येथे जाणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या भाविका ंच्या सोईकरिता शेगाव ते कथास्थळ महेशपुर अकोला पर्यंत बस फेरी तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्यास भाविक प्रवाशांची सोय तर होणारच त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यसेवा प्राप्त होऊ शकतो

त्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव बस आगाराने 5 मे ते 11 मे दरम्यान सकाळी आठ वाजता पासून शेगाव बस स्थानकावरून म्हैसपूर अकोला कथास्थळापर्यंत बस फेरी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या वतीने वाहतूक निरीक्षक स्वाती आंबेडकर मॅडम यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

यावेळी राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेचे अध्यक्ष माधुरी शर्मा ,साक्षी नाईक, वैष्णवी आवरकर,, साक्षी डुकरे ,ज्ञानेश्वरी बडे, स्नेहल शेगोकार ,पायल राऊत ,नम्रता निलाजे ,आकांक्षा सोनवणे, सचिन पालवे यांच्यासह शेगाव बस स्थानकावरील बस कर्मचारी प्रदीप जुंबळे उपस्थित होते

गो ग्रीन फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहरामध्ये १ मे २०१९ रोजी गो ग्रीन फाउंडेशन ची स्थापना वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती.

त्या दिशेने कार्य करीत शेगाव शहरामध्ये श्रम वन, ब्रह्मांडवन, स्मृतिवन, ऑक्सीजन पार्क, न्याय वन व मोक्षवन ची निर्मिती करण्यात आली व जवळपास ६००० वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्यांचे यशस्वी संवर्धन गो ग्रीन फाउंडेशन करीत आहे.

मात्र या सोबतच पर्यावरण पूरक उपक्रम सुद्धा गो ग्रीन फाउंडेशन करीत असते. म्हणून आजच्या वर्धापन दिनानिमित्त शेगाव येथील बस स्थानक परिसरात गो ग्रीन फाउंडेशन व शेगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच आपले कार्यक्षेत्र सांभाळून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत समाजभान जपणार्या व्यक्तींना गो ग्रीन फाउंडेशनचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. गोविंदजी जंजाळ (व्यवस्थापक शेगाव आगार) तर प्रमुख अतिथी म्हणून मा. सचिनजी गाडोदिया अध्यक्ष रोटरी क्लब शेगाव, अतीक जी मेमन अध्यक्ष अंजुमन उर्दू हायस्कूल शेगाव, श्रीमती तांबटकर मॅडम बस स्थानक प्रमुख शेगाव, मा. श्री. मोहनजी देशपांडे सेंट्रल रेल्वे शेगाव, दिलीपजी इंगळे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वर्ग १, नाना पाटिल पञकार तरूण भारत या सर्वांची उपस्थिती लाभली. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशोक जी सुभेदार माजी सैनिक, गोविंद भाऊ आंबुसकर संपादक साप्ताहिक माञृभाषा , गजानन बुडुकले सामाजिक कार्यकर्ता, शितलताई शेगोकार निसर्ग प्रेमी, शंकरराव घाटोळ सेवानिवृत्त शाखा अभियंता, विलास भाऊ इंगळे (म्.रा.प. कर्मचारी) इत्यादी मान्यवरांचा गो ग्रीन फाउंडेशनचे स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेगाव नगर परिषदचे सफाई कामगार, बस स्थानक कर्मचारी, प्रवासी तथा गो ग्रीन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
गो ग्रीन फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यामध्ये शहरातील नागरीकांचा मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद कायम असाच राहो अशी अपेक्षा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली…

प्रधान तंत्रज्ञ आनंद निकम यांना गुणवत कामगार पुरस्कार प्रदान

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

शिंदी ता. भुसावळ येथील
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सन २०२२ – २३ या वर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार भुसावळ उपविभाग ग्रामीण – १ मधून शिंदी कक्ष ता. भुसावळ येथील प्रधान तंत्रज्ञ मा. आनंद वसंत निकम यांना

१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरण जळगांव परिमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन प्रदान करण्यात आला.

मा. आनंद निकम हे एम.एस.ई.बी. तील माजी कर्मचारी दिवंगत वसंत धुडकू निकम यांचे चिरंजीव आहेत.

आनंद निकम यांना पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ त्यांचे विद्युत विभागातील सर्व कर्मचारी संघटना तसेच सामाजिक नेते , मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यातर्फे सर्व स्तरातून त्यांचे अभिनदन होत आहे.