Home Blog Page 204

शाळेचे पहिले पाऊल,शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत पहिल्या मेळाव्याने दुमदुमली शंकरपूरहेटी.

0

 

चामोर्शी:-तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूरहेटी येथे इयत्ता पहिलीत दाखल मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्टार्स प्रकल्पांतर्गत शासनाच्या वतीने मागील वर्षीपासून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,गट साधन केंद्र चामोर्शीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूरहेटी येथे मुख्याध्यापिका सौ नंदा कोत्तावार,शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोपवार व उपक्रमशील शिक्षिका कु धारणी मॅडम यांच्या उत्तम नियोजनानुसार व चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिम्मतराव आभारे,श्री संजय बंडावार व विषय साधनव्यक्ती श्री चांगदेव सोरते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याचे अध्यक्ष राजेश्वर मानपल्लीवार smc उपाध्यक्ष हे होते तर उद्घाटक म्हणून विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते हे होते.प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती व्याहाळकर,सौ राऊत मॅडम,मुख्याध्यापिका सौ नंदा कोत्तावार,अंगणवाडी सेविका सौ मडावी मॅडम शाळेच्या शिक्षिका कु धारणी मॅडम आणि दाखल पात्र विध्यार्थी यांच्या माता भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान शंकरपूरहेटी गावात जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली,प्रभातफेरी मध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवकवर्ग,महिलामंडळी,शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभातफेरी नंतर शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याचे स्वरूप,उदिष्टे विशद करण्यासाठी शाळेत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.उपस्थित महिला आणि गावातील बहुसंख्य नागरिकांना विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच शाळेत नाव नोंदणी,शारीरिक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी व समुपदेशन असे सात प्रकारचे स्टाल्स लावण्यात आले होते.
दाखल पात्र विद्यार्थी आणि मातांचे पुस्तक,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री गोपवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु धारणी मॅडम यांनी व्यक्त केले.

यावल बाजार समितीची निवडणूक संपन्न महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा सेना अशी चुरस 30 तारखेला निकाल

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले आहे. यावलसह फैजपूर साकळी येथेही मतदान शांततेत पार पडले.

तीनही केन्द्रावर एकूण २६०४ मतदानापैकी २४३८ मतदान झाले असून मतदानाची ९३.६३ टक्केवारी आहे. निवडणूक निर्ण अधिकारी पी. एफ. चव्हाण तहसीलदार महेश पवार उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आमदार शिरीष चौधरी यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

सकाळपासूनच मतदानाचा वेग चांगला होता. येथील बाजार समितीच्या सार्वजनिक निवडणुकीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले सकाळी आठ पासूनच मतदानास वेग आला होता. दुपारी शहरासह तालुक्यात वादळी पाऊस आल्याने काही काळ मतदान मंदावले होते

त्यानंतर पुन्हा मतदानास वेग आला होता. महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल व भाजप शिवसेनेचे सहकार पॅनल मध्ये, खरी लढत असून पाच अपक्ष उमेदवार ही आपले नशीब आजमावत आहेत. मतदानानंतर दोन्ही पॅनल कडून विजयाचे दावे प्रति दावे केले जात असले तरी मात्र रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण मतदार संघ निहाय झालेले मतदान असे

सेवा सह. संस्था- ६०४ / ५९७ = ९८.८४ टक्के

ग्रा. पं. ६५९/६४१=९७.२७ टक्के

व्यापारी ३३३ / ३२० = ९६.१० टक्के

हमाल / तोलारी १००८/८८०=८७.३० टक्के

मतदानाच्या पेट्या उमेदवाराच्या समक्ष येथील पंचायत समितीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले असून त्यास सील लावण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.

ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी दिली आहे

किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रामार्फत हिवताप जनजागृती मोहीम

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

दि.२५ एप्रिल रोजी हिवताप दिनानिमित्त किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन द्वितीय वैद्यकीय अधिकारी तरन्नुम शेख व तालुका पर्यवेक्षक विजय नेमाडे

यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे हिवताप मोहीम राबवण्यात आली या कार्येक्रमाचे सूत्रसंचालन पवन काळे (पाटील) आरोग्य सेवक यांनी केले या मोहिमेमध्ये गावात जलताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटणे इत्यादी बाबी करण्यात आल्या

तसेच यामध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे उपचार हिवताप प्रतिरोधक उपाययोजनांनबद्दल माहिती नागरिकांना देण्यात आली नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे,

घरासमोरील नाल्या वाहत्या करणे खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाडी बसवणे घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाडणे अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या

या मोहिमेमध्ये आडगाव चे सरपंच,सदस्य,शिक्षक,आरोग्य सेवक व आरोग्य सेविका इ.उपस्थित होते तसेच मनापुरी गावामध्ये आरोग्य सेविका शिलाजमरा यांनी ग्रामस्थांना हिवतापाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राअंतर्गत येणाऱ्या मालोद,नायगाव,चिंचोली उपकेंद्रासह किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात आली

यामध्ये आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील,कविता सपकाळे आरोग्य सहाय्यक राजेश सुरवाडे आरोग्यसेविका मोहिनी धांडे,सुजाता सोनवणे व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला होता.

शेगावात ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन

0

 

२९ एप्रिल रोजी प्रसिद्ध कवीकडून रंगणार मैफल !

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव : (प्रतिनिधी) दि २७ हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम ऑल इंडिया मुशायरा २९ एप्रिल रोजी शेगाव शहरात रंगणार आहे.

अमरावती विभागाच्या उर्दू टीचर्स असोसिएशन कडून २९ एप्रिल रोजी शेगाव येथील हॉटेल विघ्णहर्ता इन येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित ईद मिलन, पुस्तक विमोचन व कवि सम्मेलन यामध्ये ऑल इंडिया मुशायरा या विशेष कार्यक्रमांचे आकर्षण राहणार आहे.

यावेळी प्रसिद्ध कवी मोहम्मद फारुख यांच्या अलफाज का चेहरा या ग़ज़ल संग्रहांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश गायकवाड (आग़ाज़ बुलढाणवी) यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात विशेष सत्कारमूर्ती म्ह्णून उर्दू टीचर्स असोसिएशन चे अमरावती विभागीय अध्यक्ष ग़ाज़ी जाहेरोश सर आणि पत्रकार फहीम देशमुख यांचा विशेष गौरव या कार्यक्रमात होणार आहे.

या मुशायऱ्यामध्ये प्रसिद्ध कवी हामिद भुसावली, नईम फराज, मुजावर मालेगावी, शकील मेवाती, पीरजादा शारिक अहमद नासिक, डॉ इफ्तिखार शकील रायचूर कर्नाटक, डॉ साहिर करीम (शायर शेगानवी), अत्हर नईमी धुलिया, अदीब अलीमी अमरावती, डॉ कमर सुरूर अहमदनगर, हुनर पुणे, रफीक काजी पुणे, उध्दव महाजन, बिस्मिल पुणे, हाजरा ज़रयाब अकोला, अक्रम कुरैशी जलगांव, इम्रान सानी बुलढाणा, इम्रान फारिस जलगांव, गुलाम गौस अजहर नासिक, अमीन खान वसीम खामगाव, मतीन तालिब नांदुरा, अज़हर आतिफ नांदुरा, आकिब ज़मीर चिखली आपले गीत, गझल आणि कविता आपल्यासमोर प्रस्तुत करतील.

सकस आणि मधुर शब्दांनी विणलेले काव्य मैफिलीत रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. सादर होणाऱ्या कविता वीर रस, हास्य रस, शृंगार रस आदी बांधणीतल्या आहेत. या विविध कार्यक्रमांसह शिरखुर्म्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन अनीस अहमद शौक, डॉ. असलम खान, इज़्ज़त उल्लाह खान सर, समीर शेख यांनी केले आहे.

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शेगाव तालुक्यातील पालोदी या गावात सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे 

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव तालुक्यात असलेल्या पाळधी या लहानशा गावात भास्कर भेंडे यांच्या.

घराजवळ हनुमान मंदिराच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच बैलपोळा भरण्यासाठी राखीव असलेल्या सार्वजनिक जागेवर विलासराव ज्ञानदेव जंजाळ हरिभाऊ ज्ञानदेव जंजाळ व दिनकर विलासराव जवंजाळ यांनी तीन पत्रे व चाराचा कंपाउंड बांधून अतिक्रमण केलेले आहे.

त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे सदर अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी आज 25 एप्रिल मंगळवार रोजी पाळधी येथील शशिकांत अनंतराव भेंडे एकनाथ निनाजी तायडे विष्णू वासुदेव आखरे श्रीकृष्ण रामचंद्र भेंडे विजयाराव भेंडे प्रमोद भेंडे शंकर भेंडे गोपाल भेंडे योगेश भेंडे ब्रह्मदेव भेंडे बाळकृष्ण भेंडे माणिकराव भेंडे धीरज भेंडे मोहन भेंडे दत्तात्रय भेंडे शिवाजी भेंडे गजानन भेंडे अनिल भेंडे गणेश भेंडे सुरेश भेंडे शिवाजी भेंडे प्रमोद फुलकर व रवींद्र फुलकर आदी गावकरी शेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे

कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटने कडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

याबाबत नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह कांचनपूर येथील महिला भगिनींनी आज अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर त्यांच्याकडे वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले या निवेदनामध्ये म्हटले आहे

की कंचनपुर गावातील अवैध सुरू असलेली दारू विक्री तत्काळ बंद करावी याकरिता पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी,

तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत

कांचनपूर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटने कडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

याबाबत नॅशनल अँटी करप्शन अँड क्राइम ब्युरो संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह कांचनपूर येथील महिला भगिनींनी आज अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर त्यांच्याकडे वरील मागणी संदर्भात निवेदन सादर केले या निवेदनामध्ये म्हटले आहे

की कंचनपुर गावातील अवैध सुरू असलेली दारू विक्री तत्काळ बंद करावी याकरिता पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई झाली नाही.

त्यामुळे याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या सह्या आहेत

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शंभर उमेदवारीअर्ज माघार महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर तर भाजप शिवसेनेचे सहकार पॅनल मध्ये समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ठ

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीची साठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने

रिंगणात आता ४१ उमेदवार राहिले असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना (ठाकरे गट )यांचे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल तर भाजप – शिवसेना शिंदे गट यांच्या सहकार पॅनल मधे समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून पाच अपक्ष उमेदवारही नसीब अजमावत आहेत.

महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी ,माजी आमदार रमेश चौधरी, नितीन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी हे नेतृत्व करीत आहेत तर सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी. शरद महाजन, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहेते, पांडूरंग सराफ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील करत आहेत.

शिवसेना ( ठाकरे ) गट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल
सहकारी सोसायटी मतदार संघ

प्रभाकर नारायण सोनवणे ,केतन दिगंबर किरंगे, ज्ञानेश्वर श्रीधर ब-हाटे, भानुदास दगडू चोपडे, विनोदकुमार पंडितराव पाटील, अनिल दंगलराव साठे, प्रदीप बाळकृष्ण पाटील,
योगेश सिताराम पाटील (ईमाव),
नयना चंद्रशेखर चौधरी,नंदा गोपाळ महाजन (महिला राखीव),
अनिल प्रल्हाद पाटील (विजा/भज)
ग्रामपंचायत मतदार संघ :-
सर्वसाधारण मध्ये सुनील नामदेव फिरके, शेखर सोपान पाटील,
सुलेमान कान्हा तडवी (अनु. ज.)

पोर्णिमा राकेश भंगाळे (आर्थिक दुर्बल)
व्यापारी मतदारसंघ अशोक त्र्यंबक चौधरी, सैय्यद युनूस सैय्यद युसुफ
हमाल मापारी मतदारसंघ सुनील वासुदेव बारी
भाजप शिवसेना (शिंदे गट) सहकार पॅनल सहकारी सोसायटी मतदार संघ :-राकेश वसंत फेगडे ,हर्षल गोविंदा पाटील ,सागर राजेंद्र महाजन ,दीपक नरोत्तम चौधरी, पंकज दिनकर चौधरी उमेश प्रभाकर पाटील ,संजय चुडामन पाटील, नारायण शशिकांत चौधरी (ईमाव) , कांचन ताराचंद फालक, राखी योगराज ब-हाटे (महिला राखीव)
उज्जैन सिंग भावलाल राजपूत ( विजा/ भज)

ग्रामपंचायत मतदार संघ :- सर्वसाधारण विलास चंद्रभान पाटील ,सूर्यभान निंबा पाटील,
यशवंत माधव तळेले (आर्थिक दुर्बल घटक) दगडू जनार्दन कोळी (अनु.ज.)

व्यापारी मतदारसंघ:- जितेंद्र पद्माकर चौधरी, निलेश सुरेशचंद्र गडे
हमाल मापारी तोलारी मतदारसंघ :- सचिन पंढरीनाथ बारी
तर अपक्ष उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत मतदार संघात सत्तार सुभान तडवी, योगराज यशवंत सोनवणे, ग्रामपंचायत मतदार संघात नंदकिशोर एकनाथ सोनवणे यशवंत तुळशीराम सपकाळे व्यापारी मतदार संघात नरेंद्र आबाजी पाटील असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. ही माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे.

मावळते सभापती तुषार सांडूसिंग पाटील यांची रिंगणातून माघार गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात भाजपा शिवसेनेच्या माध्यमातून अडीच वर्षे सभापतीची धुरा सांभाळणारे तुषार सांडूसिंग पाटील ( मुन्नाभाऊ ) यांनी रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेला उत आला होता.

भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार नाही आंदोलनाचा इशारा मेल्या नंतर सांत्वन केल्या पेक्षा भोई समाजाला जिवंत पणी घरकुल द्या.

0

 

श्री देवानंद आमझरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष निषाद पार्टी

संग्रामपूर: काटेल येथील भोई समाजाचे बोरवार कुटुंबाच्या घराची भिंत कोसळून एका चिमुकलीला जिव गमावा लागला असून एक चिमुकली जखमी आहे,असा दुःखाचा डोंगर काटेल येथील बोरवार कुटुंबावर कोसळा असता निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवानंद आमझरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले

व घाराची पाहणी केली असता, शासन आणि सरकार यांची शर्मनाक बाब समोर आली की काटेल येथे पिढ्या न पिढ्या राहत असलेल्या भोई समाजाला स्वताची जागा आणि राहायला घरे नसून मजबुरीने कुळा मातीच्या घरात वास्तव्य करत असताना,

तेथील भोई समाजाने संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा धाव घेऊन घरकुलाची मांग केली होती आणि उपोषणाला सुध्दा बसले होते तरी सुद्धा कोणत्याही अधिकारी किंवा सरकारला दया आली नाही आणि सरकारच्याच बेटी बचाव बेटी पढाव च्या उपक्रमात एका भोई समाजाच्या चिमुकलीला घरकुला पासून वंचित असल्यामुळे अंगावर भींत कोसळल्या मुळे जीव गमावा लागला.

आता हे अपघाती मरण की हत्या, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर बोलताना देवानंद आमझरे बोलत होते की या भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार आणि या चिमुकली चे बलिदान भोई समाजाला नक्कीच न्याय मिळवून देईल, जर या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत किंवा भोई समाजाला घरकुल न मिळाल्यास किंवा अशा घटना पुढे न घडाव्यात म्हणून निषाद पार्टी च्या वतीने आंदोलनचा इशारा देण्यात आला

असून खालील कार्यकर्ते श्री देवानंद आमझरे, श्री रमेश भाऊ नांदणे श्री मारोती भाऊ बोरवार, श्री अशोक भाऊ नांदणे, श्री महेश भाऊ नांदण़े, भागवत नांदणे आणि समस्त भोई समाज बांधव उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी काम करणारे शेतकरी पुत्र नितीनकुमार पहुरकार यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

0

 

नाशिक येथील ॲग्रो केअर गृप ऑफ कंपनी (एजीसी) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड-२०२३’ पुरस्काराचे वितरण नाशिक येथील द इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे सिने अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ.सुर्या गुंजाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री स्मिता प्रभू ,राहुरी कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त उच्च अधिकारी डॉ. प्रमोद रसाळ, कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन भूषण निकम हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲग्रो केअर गृप ऑफ कंपनीच्या संचालिका रोहिणी पाटिल यांनी केले.
कृषी विस्तार व प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, गटशेती व विषमुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करुन शेकडो शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करणारे बुलढाणा जिल्ह्यातील नितिनकुमार पहुरकार यांना देण्यात आला.

नितीनकुमार यांनी विवेकानंद कृषी महाविद्यालय येथून ‘कृषी पदवी’ पूर्ण केली. त्यातच वडिलांचे छत्र हरपलेल्या नितिनने शिकवणी वर्ग घेऊन घराची आर्थिक धुरा सांभाळत पुढील शिक्षण मात्र सुरुच ठेवले ‘एमबीए’ मध्ये पदव्युत्तर पदवी आणि कायद्याचे शिक्षण(LLB) देखील घेतले. शासकीय तसेच नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणुन कामगीरी बजावली.,

या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग कृषी व कृषी निगडित प्रश्नांवर करायचा असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतामधून प्रकट केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना YCMOU चे माजी संचालक डॉ. सुर्या गुंजाळ यांनी पुरस्कार्थीचे अभिनंदन करुन त्यांचे कार्यकाळातील अनुभव सांगीतले. मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी विषमुक्त मालाची मोठी मागणी वाढत आहे.कृषी क्षेत्रातील शेतमाल विक्री व्यवसायातून रोजगाराला प्रचंड संधी उपलब्ध आहेत.यामधे युवक वर्गाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच सेंद्रीय शेती काळाची गरज आहे त्यामूळे कॅन्सर सारख्या रोगराईपासून स्वतःला वाचवायचे असेल तर शेतीमधील रसायनांच्या वापराला थांबवावं लागेल आणि पर्यावरणाचा विचार करूनच शेती केली पाहिजे ,असे विचार आपल्या भाषणातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी उच्च अधिकारी डॉ. प्रमोद रसाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी उपस्थित होते. प्राजक्ता पवार यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी “शेतकरयांना असंख्य समस्या आहेत आणि या समस्या रावणाच्या दहा तोंडाप्रमाने कधीच संपनार नाहीत परंतू त्यावर मात करण्यासाठी आपसातील हेवेदावे मागे टाकून समूहशेतीची कास धरने गरजेचे आहे, यातून सेंद्रीय पद्धतींचा वापर करुन उत्पादन खर्चात बचत होईल आणि निव्वळ नफा वाढवता येईल.,गटशेतीमुळे शेतकरी एकत्र निविष्ठा खरेदी,मजुरी खर्च बचत व आपल्या शेतमालाचा भाव करू शतील असे मत नितीनकुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .