Home Blog Page 206

यावलला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित विविध शासकिय योजना आढावा बैठक व आदीवासी महीला बचत गट भोजनालयाचे उद्धाटन

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवारी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचा आढावा घेतला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग नगरपालिका, पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत अडी अडचणी संदर्भात विचारण्यात आल्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबणा नंतर अट्रावल गावाच्या सद्य परिस्थिती व दंगलीची सविस्तर माहीती जाणुन घेतली,

बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास कडलग उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे उपस्थित होते

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित निंबाळकर, वनविभागाचे विक्रम पदमोर, यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पी बी देसले , महीला व बालविकास प्रकल्पच्या अर्चना आटोळे यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी महिला बचत गटाच्या अनुदानीत तत्वावरील नाश्ता व भोजन केन्द्राचे उद्घाटन

येथील भुसावळ रस्त्यावरील दूरध्वनी कार्यालयाजवळ पेट्रॉलपंपाच्या शेजारी आदिवासी विकास प्रकल्प विभागा च्या न्यूक्लिअस योजनेअंतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटाला खादय ढाबा साठी ८५ % टक्के अनुदान योजनेस आयुक्त नयना गुडे व अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडुन मान्यता मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्वातील यावल चोपडा व रावेर या ठीकाणच्या खाद्य ढाब्यांना मान्यता मिळाली असुन ,

यावल तालुक्यातुन या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे . यावल येथे एकलव्य आदिवासी महिला बचत गटाच्या नाश्ता भोजनालय केन्द्राचे उद्घाटन जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार महेश पवार आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्युक्लिअस बजेट योजनेचे सहाय्यक पवनकुमार पाटील , सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे आय तडवी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , सहाय्यक लेखा अधिकारी पी व्ही रोकडे यांच्यासह एकलव्य आदीवासी महिला बचत गटाच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या .

विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

0

 

मूर्तिजापूर:- तालुक्यातील जांबा बुद्रुक येथे विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
जांबा बुद्रुक या गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत एक कुजबजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सदर मृतदेह गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत पडून असल्याने मृतदेह पुरुषाचा की महिलाचा याची ओळख पटविण पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे.

मात्र या घटनेमुळे जांभा बुद्रुक वासियांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूरचे आपत्कालीन पथकाचे सेनापती, अमोल खंडारे, बादशाह,सुमित यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून मोठ्या कसरतीने बाहेर काढला,पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु आहे.
———————
*कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतिनिधी प्रतिक कुऱ्हेकर सूर्या न्युज मराठी अकोला.*

विराज देवकांत पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा विरावली येथे संगणक भेट म्हणून देण्यात आले

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील विरावली गावातील रहिवासी ॲड देवकांत पाटील यांच्या मुलाचा विराज चा पहिला वाढदिवस या वाढदिवसाचे अवचित साधुन वाढदिवसानिमित्त विरावली गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक

असणारे संगणकाची गरज ओळखून वाढदिवसाला केक जेवण इतर अनावश्यक खर्च न करता शाळेला संगणकाचा सेट भेट दिला या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगता मध्ये ॲड.देवकांत पाटील हे नेहमीच विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी यावेळीही आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील गावातील शाळेला संगणक भेट देत आहे

असे सांगत विराज ला जन्म दिवसाच्या शुभेच्छा रुपी आशिर्वाद दिले याप्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका प्रियांका तायडे मॅडम व शाळेतील विध्यार्थ्यांनी पाटील कुटुंबा ने दिलेला संगणक स्वीकारला या कार्यक्रमाला पाटील कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते

त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील स्वराज्य फोटो स्टुडिओ चे संचालक हेमराज पाटीलभाऊ, गोलू माळी ,विनोद पाटील विरवली विकास सोसायटीच्या व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, प्रल्हाद पाटील ,संजय पाटील लीलाधर सोनवणे ,पवन पाटील गिरीश पाटील, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती संगणकाची भेट मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रियंका तायडे मॅडम यांनी देवकांत पाटील व त्यांच्या परिवाराचे आभार मानले .

रोकडीया नगर मध्ये श्री हनुमान जन्म उस्तव साजरा तर साफसफाई नकेल्याने न. प. वर नाराजी

0

 

विठ्ठल अवताडे शेगाव

स्थानिक रोकडीया नगर येथील श्री संकट मोचान हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान जन्म उत्सव सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते ,

या वर्षी देखील जन्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी नगरपरिषद मध्ये तोंडी मागणी केली होती तरी नगर परिषद कडून साफसफाई न करता तिथल्या नालिमध्ये तसाच कचरा आणि घान होती ,

यांकडे नगर परिषद कडून दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे , त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे , त्यामुळे भविष्यात या मंदिर समोरील नालीमध्ये पाईप टाकून किंवा नाली बांधून देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे ,

त्यामुळे आता नगर परिषद कडून लवकरात लवकर या ठिकाणी पाईप टाकण्यात यावे ही मागणी नागरिक करीत आहेत

मनसेचा शेवटचा इशारा आता “ठोकणार मंजे ठोकणार”

0

 

_एस टी महामंडळ आगर बुलढाणा (मेहकर आगर)यांना वारंवार पाठपुरावा करून, आणि सागून थकलो, यांची अडचण काय नेमकी समजत नाही? बस चालू करतात बस बंद करतात? लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतात,आता वेळ आली.

नक्कीच मनसेचा या सर्वांना शेवटचा इशारा,आता नक्कीच सांगतो चुकीला माफी नसणार, ठोकणार मंजे ठोकणार, या मधे सामान्य लोकांना किती त्रास होतो? यांना कळत नाही का ? बस चालू असेल डायवर आणि कंडक्टर मुदाम स्टॉप असताना गाडी थाबवात नाही? का? ह्या घटना वारंवार होत असल्याने याचा पहिले मी जाहीर निषेध करतो.

आता सुधरा नाही तर तुमच्या अंगावर आल्या शिवाय राहणार नाही? अचानक बस बंद करतात? लोक बिचारे वाट बघत बसतात, एसटी त्यांची रोजच्या जीवनातील एक घटक आहे एसटी प्रवास ,आता शेवट सांगतो आता तयार राहा एका दोन माणसानं मुळे साऱ्या एसटी प्रशासन याचं नाव खराब होत आहे हे कळतं नाही?

का? आवरा त्यांना नाहीतर आता मनसे नक्कीच आवरणार जय महाराष्ट्र जय मनसे जिल्हातील सर्व जनतेला सर्वांना आवाहन करतो बस स्टॉप असताना देखील बस थांबली नाही ?तर मनसे कडे एक लेखी तक्रार दाखल करा मनसेच्या कोणत्याही पदाधिकारी यांच्याकडे करू शकता जिल्हात हे बस कसे थाबंवनार नाहीत याची जबाबदारी मनसेची

प्रश्न जिथं जनतेचा मार्ग तिथं मनसेचा

 

दहा दिवशीय श्रामनेर शिबीराची यशस्वी सांगता

0

 

मूर्तिजापूर – तालुक्यातील ग्राम खापरवाडा येथे आयोजित दहा दिवशीय श्रामनेर शिबीराची पुज्य भन्ते गण व हजारो बौध्द उपासक ,उपासिका यांच्या उपस्थितीत यशस्वी सांगता झाली.

भारतीय बौध्द महासभा जिल्हा अकोला शाखा अंतर्गत ग्रामशाखा खापरवाडाचे विद्यमाने दहा दिवशीय श्रामनेर शिबिराचे मानवता प्रगती बौध्द विहार येथे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात बौध्दाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर ,उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर ,समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर अश्या तिन प्रकारच्या शिबीराचा समावेश होता.

या शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक पुज्य भन्ते बुध्दपालजी महाथेरो यांच्या उपस्थितीत गावातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील ३० -३५ युवकांना श्रामनेराची दीक्षा देण्यात आलीदहा दिवस चाललेल्या शिबिरात रोज सकाळी बुद्ध वंदना दिवसभर व रात्रीच्या सात ते दहा या वेळेत प्रवचन अशा विविध बौद्धमय कार्यक्रमाने खापरवाडा नगरी दुमदुमून गेली होती सदर शिबिराचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने आणि धम्म आणि धम्मच या गोष्टीची योग्यरीत्या अंमलबजावणी करून केलेल्या नियोजनात भारतीय बौद्ध महासभा अकोला टीम कडून नियोजना बाबत आयोजन टीम वरती कौतुकास्पद थाप देण्यात आली.

जिल्हाभर सदर नियोजनाचे कौतुक होत असल्याचे बोलल्या जात आहे पूजनीय भदन्त बी-संघपालजी महाथेरो, व्यवस्थापक चैत्यभूमी मुंबई, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रवचनाचा आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांनी लाभ घेतला.

लाईफ केअर हॉस्पिटल मूर्तिजापूरचे संचालक डॉ. आशिष चक्रनारायण (एमडी) यांच्या सहकार्याने दिनांक ३० मार्च रोजी भव्य रोग निदान शिबिर व ३१ मार्चला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. दोन्ही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहीती आयोजक मंडळाचे प्रमुख सतिश गवई यांनी दिली.
—————-
*कॅमेरान श्याम वाळस्कर सह प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला*

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेवटच्या दिवशी १४४अर्ज दाखल

0

 

यावल (प्रतिनिधी):-विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी होवु घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.३ सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी आपले १४३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीपर्यंत उमेदवारी अर्जांची संख्या १४३ झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांसह सूचक अनुमोदक व समर्थकांची मोठी गर्दी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात उसळली होती.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे

.मतदार संघनिहाय एकूण दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ ६७,ग्रामपंचायत मतदार संघ ४५,व्यापारी मतदार संघ १६,हमाल तोलारी मतदार संघ १३ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सदरील माहिती पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम.चव्हाण यांनी दिली आहे.

या निवडणुकीचे निवडणुक निरिक्षक म्हणुन तहसीलदार महेश पवार हे काम पाहात आहे.निवडणुकीबाबत अद्यापि चित्र स्पष्ट झालेले नसल्याने उमेदवारांच्या माघारीनंतर तसेच अर्जाच्या छाननीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवृत्तीराव गायकवाड यांची नियुक्ती:

0

 

रामनगर(वार्ताहार)जालना तालुक्यातील मौजपुरी येथील भाजपा कार्यकर्ते तथा माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड यांची भाजपा जालना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती बद्दल त्यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा.रावसाहेब पाटील दानवे,आ.संतोष पाटील दानवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे,स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे,तालुका अध्यक्ष वसंत शिंदे,बाबुराव खरात,पांडुरंग पोहेकर,बंन्सीधर आटोळे,किसनराव शिंदे,संजय डोंगरे,भागवत जाधव,हरिभाऊ गोरे,नारायण जाधव,तुकाराम राठोड,नामदेव ढाकणे,तुकाराम बोंद्रे,दत्ता जाधव,बाबासाहेब मोरे, शरद सोनुने,छबुराव राठोड,संतोष मोरे,बंडुभाऊ काळे,राम जाधव,नारायण गायकवाड,विष्णु डोंगरे,सोनाजी खडेकर,जगदीश जोशी,शाम देशमुख,रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी

0
3D Rendered Apis Mellifera 'Honey Bee'

 

चिंचपूर :- खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीनिमित्त कथा वाचन श्री श्रृंग ऋषी संस्थान चिंचपूर येथे करण्यात येते याही वर्षी गावापासून एक ते दीड किमी अंतरावर जंगलात असलेल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामुळे सकाळपासून अंदाजे तीनशे पेक्षा जास्त महिला पुरुषांनी प्रसाद घेतला व श्रृंग ऋषी संस्थान येथून घरी परतले होते.

व उपस्थित शंभर ते दीडशे भक्त भंडार्यात प्रसाद घेत होते त्यावेळी अचानक वडाच्या झाडावर असलेल्या मधमाशांनी नयना हिवराळे या महिलेवर हल्ला चढविला त्यामुळे तिथे उपस्थित महिला बालक सर्व गोंधळून गेले त्यांना सावरण्यासाठी उपस्थित नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्वांना तिथून इतरत्र हलविले त्यांना हलवीत असताना अचानक नामदेव रोडे यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला जीवाच्या आकांताने त्यांनी पळत जाऊन विहिरीत उडी मारले पण पोहता येत नसल्याने

त्यांनी भुचकड्या खाल्ल्या त्यावेळी प्रसंगावधान राखत राम शेळके यांनी जीवाची परवा न करता विहिरीत उडी मारून नामदेव रोडे यांना सुखरूप वर काढले.

या मधमाशांच्या हल्ल्यात गावातील इतरही बरेच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे

मूर्तिजापूर शहरात 4 एप्रिल रोजी स्वा. वि.दा. सावरकर गौरव यात्रा..!

0

 

मूर्तिजापूर:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षाकडून होत असलेला अपमान बघता सर्वसामान्य जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी 30 मार्चपासून राज्यातील 288 मतदार संघात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सायंकाळी 5 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र चळवळीतील योगदानाची माहिती देणारे चित्ररथ व पालखी सह स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले

असून सदर गौरव यात्रा श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सायंकाळी पाच वाजता सुरु होऊन सायंकाळी 7 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रख्यात व्याख्याते, स्वातंत्रवीर सावरकर विषयांचे गाडे अभ्यासक राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प योगेश महाराज साळेगावकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर गौरव रथयात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयक त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देणारे चित्ररथ, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पालखी आदींची माहिती देणारे देखावे असणार असल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मुर्तीजापुर चे अध्यक्ष अॅडव्होकेट पवन पांडे यांनी बोलतांना सांगितले.

मुर्तीजापुर येथील भक्तीधाम मंदिर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रेचे नियोजन बैठक संपन्न झाली.

यावेळी अॅडव्होकेट पवन पांडे, आमदार हरीश पिंपळे, प्रा. दिपक जोशी,सतीश शर्मा, अभय पांडे, अनिल जेठावानी,अमितशास्त्री कंझरकर, प्रतिक कुऱ्हेकर, शाम वाळस्कर,संजय उर्फ भुरा सेठ तिवारी, श्रीकांत जोशी,कमलाकर गावंडे, रितेश सबाजकर,सुधीर दुबे, योगेश फुरसुले,पप्पू पाटील मुळे, अमित नागवान, संतोष माने,राहुल गुल्हाने, निक्की महाजन, दीपक गुप्ता, सुभाष ठाकूर,अर्पित गावंडे, श्याम देवगीरकर, बादशाह आदींची उपस्थिती होती.
———————
कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतिनिधी प्रतीक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला.