Home Blog Page 208

यावल भुसावळच्या मार्गावरील अंजाळे घाटाजवळ रात्री घडलेल्या रस्तालुटीतील दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

रात्री यावल भुसावळ रस्त्यावर अजय मोरे हे भुसावळ कडून आपल्याकडील शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावल कडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची मोटरसायकल रोखत त्यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांचे कडील मोटर सायकल सह मोबाईल घेऊन पसार झाले होते यातील दोन संशयीत आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे .

सदरची घटना रात्री पावणेदहा वाजे ची सुमारास घडली आहे घटनेचे वृत्त येथील पोलीस ठाण्यात कळताच पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाली आहे एस१९४२ शाईन कंपनीची गाडी तसेच जवळील मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती,

या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठान व पोलीस पथकांनी आरोपींच्या शोध कार्यासाठी वेगाने तत्परता दाखवुन काही तासातच या रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणुन करण रमेश पवार व विक्की अंकुश साळवे दोघ राहणार आसोदा तालुका जिल्हा जळगाव यांना यावल शिवारातुन शिताफीने अटक करण्यात यश मिळाले असुन , तर दोन आरोपींचा शोध अद्याप लागतोला नाही .

चोरटे त्यांचे कडील बुलेट व एक्टिवा गाडीने आले होते . यावल भुसावळ हा मार्ग वाहतुकीचा असुन रात्रीच्या वेळेस देखील मोठया प्रमाणावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरीकांची नेहमीच वर्दळ या मार्गावर असते, या ठीकाणी अंजाळे घाटावर मागील अनेक वर्षापासुन या ठिकाणी पोलीस चौकी बांधण्यात आली असून मात्र नागरीकांच्या रक्षणासाठी या चौकीवर पोलीस राहात नसल्याने अशा प्रकारच्या रस्तालुटीच्या घटना घडत असतात , तरी पोलीस प्रशासनाने या पोलीस चौकीवर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरीक करीत आहे .

मराठी भाषा संवर्धन हे करणे मराठी माणसाचे जिवंत पणाचे लक्षण आहे–डाएटचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने प्रतिपादन.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यां-शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेतील कर्मचारी यांच्यासाठी आठवडा भरापासून मराठी विभागाच्या वतीने शिक्षकांकरीता पाठ्यपुस्तकातील कविता गायन स्पर्धा,काव्यगायन स्पर्धा,विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि विषय साधनव्यक्ती यांच्यासाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानिमित्ताने कवी वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण गडचिरोलीच्या सभागृहात विजेत्या स्पर्धकांना, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,नवोपक्रम स्पर्धेत प्राविण्य प्राप्त शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम डाएट गडचिरोली संस्थेचे प्राचार्य डॉ विनित मत्ते,प्रमुख अतिथी संध्या येलेकर कनिष्ठ व्याख्याता,मराठी विभाग प्रमुख तथा जिल्हा समन्वयक, अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,अधिव्याख्याता पुनित मातकर,विषय सहायक डॉ विजय रामटेके,गुरूराज मेंढे,प्रदिप पाटील,तपन सरकार,प्रभाकर साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार यांनी केले तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने भाषेचा दैनंदिन जीवनात वापर आणि मराठी माणसाची भूमिका यावर श्रीमती संध्या येलेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ विनित मत्ते यांनी प्रतिभावान मुलांनी बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी नवनवीन उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हावे,सोबतच शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन प्रकिया आनंददायी करण्यासाठी,सकारात्मक विचार आणि कृतीशील बदल, सृजनशील कल्पना,व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विकसित करण्यासाठी,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी सदैव तत्पर,सजग राहावेत,स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २३ गुणवंत विद्यार्थी,शिक्षक व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजय रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर साखरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील संगणक परिचालकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी आजपासुन काम बंद व १ मार्चपासुन संघटनेच्या वतीने मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन यंदाच्या अर्थसंकल्पातुन किमान वेतनासाठी निधीची तरदुत करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक १ मार्च २०२३ पासुन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुन,

यावल तालुक्यासह ईतर ठीकाणी देखील आजपासून संगणक परिचालकांनी आपले काम बंद आंदोलन मुरू केले असुन, यासंदर्भातील माहीती निवेदन तालुक्यातील संगणक परिचालकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे .

या संदर्भात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने यावलच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , ग्रामविकास व माहीती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या पुर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पाअंतर्गत मागील ११ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रमाणीकपणे काम करत आहेत ,

ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरतपणे करत आहेत त्याच सोबत कोरोना काळात महत्वाची जबाबदारी याच संगणक परिचालकांनी बजावती ही सेवा करतांना सुमारे १९ संगणक परिचालकांनी आपला जिव सुद्धा गमावला आहे .

तसेच शेतकरी कर्जमाफी योजना , प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सुमारे ५४लाख कुटुंबांचा सव्हें याच संगणक परिचालकांनी केला आहे . असे अनेक प्रकारचे कामे प्रमाणिकपणे करून सुद्धा केवळ ७००० रुपये हे महागाईच्या काळात आतशय तुटपुंजे मानधन मिळते तेही केव्हाच वेळेवर मिळत नाही .

त्याचप्रमाणे संगणक परिचालक हे ग्रामपंचायत मध्ये बसुन सर्व प्रकारची कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असुन , ग्रामविभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २o१८मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतीबंधात पुर्व निर्मिती करण्याची शिफारस केलेली आहे . त्यानुसार राज्य संघटनेच्या माध्यमातुन केली असता ११ मार्च २०२१ रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी मान्य करीत तेव्हा लेखी आश्वासन देत प्रश्न सोडविण्याचे मान्य केले होते .

परन्तु त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता त्यामुळे नुकत्याच झालेल्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातुन २७ते २८ डिसेंबर र०२२ रोजी रात्रदिवस आंदोलन व या आंदोलनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणविस आणी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांनी घेतली व दिलेल्या लेखी आश्ववसानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व त्यात यावलकर समितीने केलेल्या शिफारसीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन , परंतु अद्यापपर्यंत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात १ मार्च र०२३रोजी सकाळी १० वाजता पासुन मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असुव , आज२७ फेब्रुवारी २०२३पासुन मागणी मान्य होईपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालकांकडे असलेली सर्व कामे बंद करण्यात आली आहे .

याबाबतचे निवेदन यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आले असुन , यावेळी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष संजय अरुण तायडे , तालुका सचिव सुधाकर कोळी , तालुका उपाध्यक्ष हर्षल सोनवणे , विलेश बावस्कर , सागर मोरे , रौनक तडवी , जावेद तडवी हे यावेळी उपस्थित होते .

महसूल मंडळ कडून तालुक्या ठिकाणी महास्वराज्य भव्य कार्यक्रमांमध्ये विधवा महिलेचा अर्ज स्वीकारला

0

 

अतिक्रमण करून राहणारी महिला, जिद्द करून तहसीलदार साहेबांना दिली निवेदन

 

संग्रामपूर तालुक्यामधील तहसीलदार गायकवाड यांनी आमंत्रित केलेल्या तूंमोड साहेब आणि जळगाव जामोद मतदारसंघाचेआमदार, संजय कुठे या सर्वांचे समक्ष बसलेली तालुक्यातील मंडळी त्यामध्ये भरपूर आलेले महिला व पुरुष म्हातारे या सर्वांचे हॅपी गरज” म्हणून प्रत्येक लोकांचे हाती एक एक अर्ज होता त्या अर्जामध्ये प्रत्येक लोकांचे प्रश्न मांडलेले होते.

त्या लोकांना हा विश्वास होता की आपले तहसीलदार साहेब गायकवाड यांनी इतके पैसे खर्च करून तालुक्या ठिकाणी मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथे भव्य दिव्य महाराज स्व म्हणून कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाला सकाळपासून महसूल वर्ग स्वतःहून मेहनत करत होते तसेच आदिवासी बहुल भागांमधील पात्र आदिवासी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना आणि विविध महिलांच्या केसेस त्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी स्वतः आदिवासी यांचे पाड्यावर जाऊन अर्ज भरून घेतले हे मात्र खरेच परंतु ‘ या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सगळे लोक आपापल्या अपेक्षा घेऊन आले होते त्या अपेक्षा मार्गी न लावता आंधळे बोलत, होते..

आणि बहिरे आयकत’ होते या जनतेमधून एक खंबीर विधवा महिला हिने उभे राहून मोठ्या हिम्मत ने तहसीलदार गायकवाड यांच्याजवळ जाऊन त्या महिलांनी आणलेला अर्ज त्यामध्ये नमूद असे होते की वरवट बकाल येथील परी तक्ता महिला तसेच विधवा सुद्धा असून 25 ते 27 वर्षापासून अतिक्रमण जागेमध्ये राहत आहे आणि प्रपत्र ड यादीमध्ये वरवर बकाल ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाच्या यादीमध्ये या विधवा चे नाव सुद्धा आलेले असून त्या महिलाला मुलगा नाही दोन मुली आहेत त्यांचे उदरनिर्वाह करण्यासाठी किती वर्षे लोकांच्या शेतीमध्ये काम केले आणि मुलींना शिक्षण देण्याकरिता स्वतःहून एकट्या महिलेने आयुष्यामध्ये खूप कबाड कष्ट करून मुलींना मोठे केले असून सुद्धा बीडीओ यांच्या कार्यालयावर खूप, चकरा मारल्या परंतु या महिलेचे कोणी ऐकणारच नव्हतं.

या कार्यक्रमाची माहिती या महिलाला मिळताच त्या कार्यक्रमांमध्ये तिची आशा व त्या आशेचा अर्ज घेऊन जाऊन बसली कार्यक्रमांमध्ये या महिला सारखे भरपूर महिला व पुरुष ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःखद दुःख भरले असून या कार्यक्रमाला खेड्यापाड्यावरून उपस्थित राहून सुद्धा त्यांच्या इच्छा” तशाच कायम राहिल्या खरं म्हटलं की कोणालाही राग येतो त्याकरिता ग्रामीण भागातील ज्या लोकांचे या कार्यक्रमांमध्ये अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्या अर्जांवर आपले प्रेमळ मुरलीधर गायकवाड तहसीलदार साहेब या गोरगरीब लोकांचे आणि ही महिला परिसत्ता विधवा असून हिला घरकुल मिळवून देतात की नाही आणि कोणत्या प्रकारे देतात किंवा आश्वासन देऊन सोडून देतील हे पाहणे गरजेचे ठरले आहे.tahsildar sangrampur

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिवादन

0

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव : येथील संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले

.यावेळी येथील श्री ग म मंदिर परिसरातील संत गाडगेबाबा पुतळ्याचे पुजन जिल्हा उपाध्यक्ष अनिल उंबरकर, विभागीय संघटक राजेश चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.

शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनराज ससाने,डिजीटल मिडीया परिषद चे तालुकाध्यक्ष सचिन कडूकार, श्रीकांत कलोरे,उमेश राजगुरे,ज्ञानेश्वर ताकोते,इस्माईल इरानी,राहुल धनोकार,ललित देवपुजारी आदीची उपस्थिती होती.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रूपाली वानखडे

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर

शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी येथील सौ रुपाली वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी 21 फेब्रु. व 22 फेब्रुवारी असे दोन दिवसीय बैठक शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या विरोधात आवाज उठविण्याचा दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्य विस्तार व संघटना वाढीसाठी
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ रूपाली वानखडे यांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे . या निवडीबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे

मावसदिराकडून बहिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

0

 

इस्माईल शेख शेगाव

 

शेगांव शहरातील मंगलम नगरामध्ये मावसदिराने वहिनीचा विनयभंग केल्याची घटना चहा घडली. तुम्ही दिसायला खुप सुंदर आहात, तुमच्या सारखी बायको भेटणं भाग्यचं..

असे म्हणत वहिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न दिराकडुन होत होता. मात्र दिर असल्याने सदर विवाहीतेन मस्करी समजुन याकडे वारंवार दुर्लक्ष केले. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी तो विवाहीतेच्या घरी आला व दादा कुठे आहेत असे

विचारले, त्यावेळी ते कामावर गेले आहेत असे सांगून विवाहीता करण्यास किचनमध्ये गेली. त्यावेळी मावसदिराने मागे जावून गैरवर्तणुक करीत तिचा विनयभंग केला.

याबाबत पिडीत महिलेने शेगांव शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणी मावसदिराविरुध्द कलम 354, 354 (अ)506 भादविनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेगांव : संत गाडगे महाराज जयंती शेगांव परीट समाज तर्फे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

0

 

इस्माईल शेख शेगाव

संत गाडगे महाराज यांनी विद्रोही संत परंपरेचा कणा मजबूत करीत अंधश्रद्धेला मूठमाती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहोचवली.

कोणत्याही अपेक्षेशिवाय निराधार गोरगरीब कुटुंबांना आश्रय दिला. त्याचे हेच विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार परीट समाज तर्फे करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला

आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या.

या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे.

श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले. अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या. या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला. पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे. श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या.

या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला.

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे.
श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.