Home Blog Page 209

यश मिळवायचे असेल तर आपले आदर्श आई -वडील व छञपती शिवराय असले पाहिजे-शिवव्याख्याते संदीप गाडेकर

0

 

प्रतिनिधी:(जालना)आयुष्यात यश‌ मिळवायचे असेल तर आपले आदर्श आपले आई- वडील व छञपती शिवराय आदर्श असले पाहिजे असे प्रतिपादन शिवव्याख्याते संदीप गाडेकर यांनी व्यक्त केले

.दैठाणा बु.येथे शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते संदीप गाडेकर यांचे शिवव्याख्यान आयोजित केले होते.यावेळी त्यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील घडलेला इतिहास सांगितला.तसेच छञपती शिवाजी महाराज यांचे स्ञी विषय धोरण

छञपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमान.शेतकऱ्यांचा विषयी धोरण,संयम,नियोजन व शञु टप्प्यात आला की कसा कार्यक्रम करायचा यांचे शिवचरित्रातून उदाहरण त्यांनी दिले.

कार्यक्रमाला महिलावर्गाची‌ विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रास्ताविक पोलिस अशोक बेरगुडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्याण दादा यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच शञुघ्न कणसे व आयोजक प्रशांत बेरगूडे सर तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती दैठाणा बु.च्या सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.व शिवजयंती शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली

.यावेळी गावातील लहान लहान मुलांनी भाषन व गिते सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्यावेळी गावातील समस्त बांधव माता भगिनीं उपस्थित होत्या.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

वीर अभिमन्यू वाचनालयात बाल वाचक मेळावा व शिवजयंती उत्साहात साजरी.

0

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव वीर.अभिमन्यू वाच
ण्यालयाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण संचालक‌ महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनालयाची माहिती व जाणीव राहावी.

या करीता शिवजयंतीचे‌ औचित्य साधून बालवाचक मेळाव्याचे आयोजन व ग्रंथालयाच्या क्षेत्रात कार्य रत असलेल्या ग्रंथालय भारती या संस्थेचा वर्धापन दीन व शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.श्री कॄष्णलाल रावलानी केशव अर्बन क्रेडिट सोसायटी चे अध्यक्ष तथा वीर अभिमन्यू वाचनालयाचे जेष्ठ संचालक होते.तर प्रमुख अतिथी म्हणून इंगळे इंग्लिश व क्लासेस चे संचालक श्री समाधान इंगळे सर तसेच श्री प्रमोद भाऊ मानकर तथा उपाध्यक्ष श्री प्रल्हाद काळे ‌मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा.श्री रावलानी सर यांनी चांदोबा मासीकातील चांगल्या व्यक्तींच्या नावावरून आणि हि पॄथ्वी उभी आहे.

चांगली व्यक्ती चांगल्या संस्कारावर व चांगले विचार आणि चांगल्या वाचनावर अवलंबून आहे.ही गोष्ट सांगितली.संस्कार युक्त वाचनातून शिवाजी महाराजांच्या सारखे घडून हे सुराज्य घडवावे असे आवाहन ही केले.

या निमीत्त ग्रंथालय भारती घ्या वर्धापन दीनाचे औचित्य साधून संस्थेने १हजार पुस्तके घेवून त्यांचे वाचनालयात प्रदर्शन लावले.या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात मोबाईल कांपुटरचा वापर होत असला तरी आजच्या तरुण पिढीने वाचाल तर वाचाल याकडे दुर्लक्ष करु नये.

त्यांना लागणारी सर्व प्रकारची पुस्तके आम्ही वाचन्यालयामार्फत उपलब्ध करून देऊ असे प्रल्हाद काळे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन ग्रंथापाल श्री गणेश ऊज्जैनकर यांनी प्रास्ताविक व परिचय .तसेच आभार प्रदर्शन श्री विजय तायडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री निलेश पुंडकर व लव ठाकरे आणि शंतनु देशपांडे महाराज यांनी परीश्रम केले.
प्रास्तावीक व परीचय प्रल्हाद काळे आभार विजय तायडे

यावल तालुक्यातील ७ परिक्षा केन्द्रांवर ३५८७ इयत्ता बारावीचे विद्यार्थी परीक्षेत बसणार कॉपीमुक्त परिक्षेसाठी भरारी पथके : गट शिक्षणाधिकारी व्ही. सी .धनके यांची माहिती

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आज पासून सुरू होत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत तालुक्यातील सात केंद्रामधून एकुण ३५८७ विद्यार्थी परीक्षेस बसत आहेत.

आज दिनांक २१ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. तालुक्यात एकूण सात केंद्र असून केंद्रनिहाय परीक्षार्थींची संख्या कंसातील आहे डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल यावल (६८१) नगरपरिषद संचलित साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालय (५४८) ज्योती विद्यामंदिर सांगवी ( ६१७) चिंचोली माध्यमिक विद्यालय( ३७८) तर फैजपूर येथील डी एन कॉलेज (६१७) मौलाना अबुल कलाम हायस्कूल फैजपूर (५१०) पी एस एम एस विद्यालय बामणोद तालुका यावल ( २३६) असे तालुक्यातून तीन हजार ५८७ विद्यार्थी परीक्षेत बसणार असल्याची माहिती येथील गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे. परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली असल्याचे , गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी सांगितले.

कॉपी मुक्त वातावरणासाठी जिल्हा पातळीवरील ५ पथकासह दोन तालुका पातळीवरील भरारी पथके तहसीलदार महेश पवार व गट विकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन भरारी पथके राहणार असुन , याशिवाय प्रत्येक परीक्षा केन्द्रावर प्रत्येकी एक असे सात पथकांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती येथील यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ चावदस धनके यांनी दिली आहे .

यावल येथे शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

शहरात विविध ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठया उत्साहात पार पडला. येथील शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी येथील बोरावल गेट पासून शहरातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शहरातील विविध भागात उत्साहात शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील बोरावलगेट परिसरात
शिवरत्न फाउंडेशन व छत्रपती ग्रुप आयोजित उत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही उत्सवाचे आयोजन केले होते.

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील डॉक्टर कुंदन फेगडे यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शिव प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गाने रात्री उशिरा पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यावर रांगोळ्या,भगवे ध्वज, भगव्या पथकांनी शहर भगवेमय झाले होते.

संपुर्ण शहर छत्रपतींच्या जयजयकाराने शहर दुमदुमून गेले होते विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले सुधाकर बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

आज सकाळी बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर यांचे वतीने देखील येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या संकुलनातील आवारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे , माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, चंद्रकांत जगन्नाथ पाटील, प्रशांत चौधरी, आदीवासी विभागाचे पदाधिकारी एम बी तडवी, मराठा सेवा संघाचे अजय पाटील, आर डी पाटील माजी नगरसेवक असलम शेख नबी, प्रा. मुकेश येवले, भगतसिंग पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने येथील शिवाजी नगरात सायंकाळी आमदार शिरीष चौधरी जि प गट नेते प्रभाकर चौधरी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यासह येथील बस स्थानक, धोबीवाडा ,महाजन गल्ली , शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

शेगावात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनाआ.डॉ संजय कुटे अभिवादन केल

0

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.त्यांनी कठोर परिश्रम घेऊन आपले पूर्ण जिवन स्वराज्य स्थापनेसाठी घालवले. त्यांच्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा व त्याप्रमाणे भविष्यात वाटचाल सुरू ठेवावी असे आवाहन आ.डॉ संजय कुटे यांनी येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आ.डॉ संजय कुटे यांनी शेगावात विविध ठिकाणी व मुख्य चौकात विविध छत्रपती शिवाजी महाराज मंडळाना भेटी देऊन अभिवादन केले.

तसेच
शिवजयंती निमित्त जमलेल्या शेकडो युवक, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.शहरातील प्रभाग १,मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण,प्रभाग ४ मध्ये महर्षी वाल्मिकी चौकाचे सौंदर्यीकरण,कुंभारवाडा येथे संत गोरोबा काका चौकाचे सौंदर्यीकरण, वाण प्रकल्प कार्यालय समोर जिजामाता चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन याप्रसंगी त्यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, मा. उपाध्यक्षा सुषमाताई शेगोकार, भाजप नेते शरदसेठ अग्रवाल,पांडुरंग बुच, मा.नगराध्यक्ष पी एम शेगोकार,संजय कलोरे,राजेंद्र शेगोकार,गजानन जवंजाळ, प्रदीप सांगळे, मा.सभापती पवन महाराज शर्मा,संतोष घाटोळ,अरुण चांडक,राजेश अग्रवाल,सचिन धमाळ, संदीप काळे,विजय यादव,राजेंद्र कलोरे, पुरोषोत्तम हाडोळे,रोहित धाराशिवकर,राजू भिसे,अरविंद इंगळे,भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस
कल्पनाताई मसणे,डॉ अंजूषा भुतडा, यासह इतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फिटनेस फंडा ग्रुप च्या वतीने शिवजयंती निमित्त जिजाऊ श्रुष्टी सिंदखेडराजा ते रामनगर पर्यंत शिवज्योत दौड:

0

 

प्रतिनिधी:(जालना) तालुक्यातील रामनगर येथील फिटनेस फंडा ग्रुप च्या वतीने शिवजयंती निमित्त जिजाऊ श्रुष्टी सिंदखेडराजा ते रामनगर पर्यंत शिवज्योत दौड चे आयोजन केले होते जिजाऊ श्रुष्टी पासून शिवज्योत दौड चा प्रारंभ करण्यात आला.

फिटनेस फंडा ग्रुप चे अठरा सदस्य या दौड मध्ये सहभागी झाले होते रामनगर येथे शिवज्योत दौड चे आगमन होतच गावाकऱ्यांच्या वतीने ढोल तशाच्या गजरात व फटाक्यांच्या आताशबाजी करत.

मशालीचे व फिटनेस फंडा ग्रुप च्या सदस्यांचे स्वागत केले या दौड मध्ये शिवाजी शिक्षण मंडळाचे सचिव धैर्यशील चव्हाण, डॉ. धनसिंग बहुरे, ऍड सोपान शेजूळ, कैलास डवले, राजाभाऊ शेजूळ, डॉ.संजय डोंगरे, डॉ.रितेश कुटे, डॉ. लक्ष्मीमन जाधव, डॉ.खेडेकर, माऊली शेजूळ, दशरथ गंगावणे, सलमान कुरेशी, अनिल शिंदे, राजू पिठोरे, गजनन् शेजूळ,तुकाराम ठोंबरे, संभाजी मोरे,आदी सहभागी झाले हनुमान मंदिरात गावाकऱ्यांच्या वतीने फिटनेस फंडा ग्रुप च्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी.

ऍड. गोपाळ मोरे,भाजपा उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष शरद ,नाथा सोनुने, कृष्णा सोनुने, लक्ष्मण शेजूळ, विठ्ठल् पिठोरे, बालाजी तांगडे, शिवाजी सोनुने, योगेश.सोनुने, तुकाराम वाघ, माऊली लांडे, गणेश शेजूळ, संतोष थेटे यांच्या सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

राज्यगीत” सादर करून वैनगंगा विद्यालयात “शिवजयंती” साजरी

0

पवनी: स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यगीत” सादर करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्राचार्या सुजाता अवचार उपप्राचार्य पराग टेंभेकर पर्यवेक्षक अजय ठवरे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

वर्ग सहा ड च्या विद्यार्थ्यांनी अफजल खानाचा वध ही लघु नाटिका सादर केली तर वर्ग सातच्या विद्यार्थी सुमित कुंभलकर याने शिव गौरव गीत सादर केले.

गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत संगीत शिक्षक शशांक आठले व विशाल निनावे यांच्या चमूने व विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन केले. विद्यार्थ्यांची भाषणे झालीत सहाय्यक शिक्षक श्री त्रिवेदी व प्राचार्या सुजाता अवचार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा बंसोड तर आभार प्रदर्शन प्राध्यापक योगेश ढेंगरे यांनी केले.

याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता

लग्नाआधीच भावी नवरीचा माथेफिरू भावी नवरदेवाने गळा चिरून केला खून!

0

 

प्रतिनिधी:(जालना)मंठा तालुक्यातील बेलोरा गावात आज दुपारी घडली घटना
खुन करून भावी नवरदेव घटनास्थळावरून फरार!

मंठा तालुक्यातील बेलोरा गावातील दीप्ती उर्फ कल्पना संदीप जाधव (वय १८) हिचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत 17 मार्च 2023 रोजी विवाह ठरला होता.
आज वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी जालना येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते.

यावेळी नियोजित वर असलेला तरुणही बस्ता बांधण्यासाठी सोबत आलेला होता, मात्र अचानक तो गायब झाला या गायब झालेल्या तरुणाने थेट वधूचे गाव असलेले बेलोरा हे गाव गाठले घरी फक्त नियोजित वधू दीप्ती उर्फ कल्पना ही एकटीच होती.यावेळी तिचा गळा कापला, त्यातच ती गतप्राण झाली.

गावातील लोक जमा होताच खून करून आरोपी पसार झाला होता.
दरम्यान घटनास्थळी सेवली पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

आशिष सावळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित

0

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणता राजा सेवा ग्रुप यांनी आयोजन केलेल्या व्याख्यानात आशिष सावळे करत असलेल्या सामाजिक क्षेत्रा मध्ये केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.

कार्य सामाजिक असो वा मग गरजू रुग्ण च्या मदती साठी किव्हा व्यतारिक्त कुठल्या अडचणी साठी आशिष सावळे सदैव रात्र दिवस गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात व आशिष सावळे यांनी रक्त दान श्रेष्ठ दान या ग्रुप च्या माध्यमातून ह्या सेवाचे कार्य सुरु केलेले आहे.

व युवकांन मध्ये सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण केली आहे सामाजिक क्षेत्रात आशिष सावळे व त्यांचे सहकारी मित्र परिवार अतिशय निस्वार्थी पणाने कार्य करत आहे. याच कार्याची दखल घेता छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य जाणता राजा सेवा ग्रुप ने आयोजित केलेल्या व्याख्यानात आज युवा वर्गा मध्ये आवडते असलेले आशिष सावळे यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

श्री संत सेवालाल महाराज यांचा जिवन परिचय:

0

 

संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला आहे.आणि निधन ०४ डिसेंबर १८०६ मध्ये झाला.हे बंजारा समाजाचे संत म्हणून ओळखले जायचे.

नाईक कुळातील या भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते.वडील एवढे श्रीमंत होते कि सात पिढी बसून आरामात जेवण करतील.पण मात्र रूढी आणि परंपरा यांच्याने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सतगुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली.म्हणूनच लहानपणापासूनच संतांचा गोष्टी वीरांच्या कथा तो आपल्या आई धर्मली माता यांच्या कडून ऐकू लागला.

सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात सुसंस्कृत आणि प्राचीन संस्कृती मानली जाते. गोर-बंजारा ही या संस्कृतीशी संबंधित एक संस्कृती आहे आणि हा गोर बंजारा समाज खरोखरच संपूर्ण जगात पुरी आहे आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
महाराष्ट्रातीलगोर बंजारा गौरा (भुकीयस) आणि मध्यभारतीचे भगंदरस वडतिया हे मोठे व्यापारी होते.
बंजारा समाज
हे सर्व व्यापारी भारतातील बड्या राजांना आणि सम्राटांना रसद (अन्नधान्य) पुरवत असत. पण सर्वसामान्यांची चिंता ही गौर बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज(कोर-गोर) संत संत सेवालाल यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.

भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीमुळे गोर बंजारा समाज मुख्यत: राज्याच्या सीमेवर होता,

श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्ग
बंजारा समाजातील व्यक्ती
वालाल महाराज यांचे वडील रामजी नायक यांचा मुलगा भीमा नायक एक त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 3755 गायी आणि बैल आहेत. कोण धान्याच्या वाहतुकीसाठी वापरला जात असे आणि ५२ तांड्यांचा नायक होता. त्यांना नायकडा (एक गावचा नायक आणि खेड्यांचा नायक) असे म्हटले जाते.

एका गावात (तांडे यांचे) लोकसंख्या सुमारे ५०० होते. प्रत्येक तांड्यासाठी, एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असे, त्यांना जवळ ५२ भेरू (माणूस) आणि ६४ जोगानी (स्त्री) असे संबोधत. या ५२ भेरू आणि ६४ जोगानींचे एकत्रिकरण होते. आणि त्यांची स्थापना मुख्य नाईक अंतर्गत झाली. म्हणूनच संत सेवालाल आजोबांना रामशहा नायक म्हटले गेले. (५२ तांड्यांचा संघप्रमुख) भीम नायक हेही ४१ तांड्यांचे संघप्रमुख होते
धर्मणीयाडी(आई)
सेवालालच्या आईचे नाव धरमणी होते, ती जयराम बदाटिया सुवर्णा कप्पा, कर्नाटक यांची मुलगी होती.

भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे
केली मा ज त्यांचा भाऊच आलो ना आता तूच सांग जर जगात माझ्या सर्व बहिणीच आहे तर मी लग्न कुणाशी करू.ह्या उत्तराने आई जगदंबा भारावून गेली.आई जगदंबा म
सेवालाल महाराज
संत सेवालाल महाराज
सेवालाल महाराज यांचे वचन
कोई केनी भजो पूजो मत एका रूपयाला एक वाटी पाणी व आपली
सेवालाल महाराज यांचे
सेवा जाणार्‍या बंजारा जीवनासाठी करा गोर भाषा / गोरबोली बोला
सेवालाल हे अनुकरणीय सत्यता
धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील, एक महान संगीतकार, अंधश्रद्धा विरुद्ध लढाई करणारे, एक बुद्धीप्रामाण्यवादी
आणि एक अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून काढणारे आहेत
असे शीतला आणि सती देवी आणि सती देवी आई जगदंबा यांच्या कथेत सुद्धा वाचायला मिळेल

सेवालाल महाराज यांचे मंदिर
जगातील ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आढळतो.त्या त्या ठिकाणी सेवालाल महाराज यांचे मंदिर बांधले जाते.सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते.तर सेवालाल महाराज यांनीच बंजारा समाजामध्ये नवीन चाली-रिती रूढी परंपरा तयार केले असेही सांगितले जाते.