Home Blog Page 211

उषा पानसरे म्हणजे आज वर महिला पत्रकारितेतिल ऊगवता-सुर्य,

0

 

 

उषा पानसरे म्हणजे आज वर महिला पत्रकारितेतिल ऊगवता-सुर्य,

स्वातंत्र्याचा चौथा स्तंभ म्हणुन*पत्रकारिता*ला मान्यता असलि तरि स्वातंत्र्याचे इतर तिन स्तंभाच्या तुलनेत पत्रकारितेला नगन्य सुरक्षा कवच दिलेले आहे तरि देखिल समाज सेवे चे माध्यम म्हणुन पत्रकार छातिठोक पणे पत्रकारिता करित आहेत हि देशासाठि गौरवाचि बाब आहे कारण पत्रकारिता करणार्या पैकि काहिना पत्रकारिता करण्यास घरातिल महिलाकडुनच विरोधाचा सामना करावा लागतो अश्यातच काहि महिलांनि धैर्य करुन पत्रकारिता क्षेत्रात उडि घेतलि व नाव लौकिक करित आहेत अशिच एक लढवय्यि महिला पत्रकार अचलपुर तालुक्यात उदयास आलि जिने पत्रकारिता सोबत विविध सामाजिक संघटनेत प्रवेश करुन सामाजिक कार्यात उच्चांक गाठुन विविध पुरस्कार मिळविले पत्रकारिता व सामाजिक कार्यात हा उगवता सुर्य म्हणुन अचलपुर तालुक्यातिल असदपुर येथिल *उषा पानसरे* चे नाव घेतल्या जात आहे जिला नुकतेच “नारि सन्मान पत्रकारिता पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

त्यांचे आजचे या सन्मानार्थहा लेख लिहावेसे वाटले व तो मि उषा पानसरे ला तिचा सनमानार्थ शुभेच्छा म्हणुन अर्पित करित आहे
नुकतेच उषा पानसरे ने राज्यातिल सर्वाधिक लोकप्रिय अखिल भारतिय ग्रामिण पत्रकार संघात माझ्या मार्फत सदस्यता ग्रहण केलि असुन अचलपुर तालुका अध्यक्ष प्रविण तायडे,जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश फरकुंडे,राजेश डांगे,प्रमोद मुस्कर कौसर अहेमद यांच्या सिफारिस ने उषा पानसरे याचि अचलपुर तालुका महिलाध्यक्ष पदावर नेमणुक करण्यात आलि आहे.

उषा पानसरेला पत्रकारिता क्षेत्रात आज कोणत्याहि ओळखचि आवशक्ता नाहि आज तिने संपादक होण्या पर्यंत मझल गाठलि आहे
————-पदासिन————-
सध्या पत्रकारितेसह उषाने अनेक पदाचि जबाबदारि स्विकारुन सामाजिक कार्याचा गाडा ओढत आहे (1)-दबंग महिला पत्रकार
(2)-प्रेससंपादक सेवा संघाचि जिल्हा महिलाध्यक्ष
(3)-नारि अत्याचार निवारण केंद्राच्या प्रदेश सचिव
(4)-अखिल भा,ग्रा, प,संघचे तालुका महिलाध्यक्ष इत्यादि पदाचि जबाबदारि उषा निर्भिड व निस्वार्थ पणाने पार पाडित आहे
——-मिळविलेले सन्मान——
(1)-पहिला गुण गौरव पुरस्कार,यवतमाल
(2)-दुसरा,मुंबइ
(3)-कोरोणा योद्धा सनमान
(4)-मानवाधिकार पुरस्कार दिल्लि
(5)-प्रेस संपादक सेवासंघ महाराष्ट्र,
(6)-नागपुर हायकोर्टा द्वारे सन्मानित
(7)-भारतिय बौद्ध समाज अमरावति तर्फे सन्मानित,
—————————————-

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थी साहित्य संमेलनाची गरज ” – प्रा. दामोदर मोरे

0

 

( प्रतिनिधी ठाणे / कल्याण)

” माणसांचं मन हे अथांग आहे. त्यामध्ये सृजनाच्या अनेक शक्यता दडलेल्या आहेत. नव्या कवींनी कविता लेखना बरोबरच आपल्या मनाचे दार ठोठवावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या सृजनाच्या विविध शक्यतांचा शोध घ्यावा.

त्यात तुम्हाला कथाकार किंवा कादंबरीकार, चित्रकार किंवा छायाचित्रकार दडलेला दिसेल आणि तो संधीची वाट पहात असेल म्हणूनच अ. भा. मराठी साहित्य संमेलनात एक दिवस महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन भरवण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन मराठी हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी केले. ठाण्याच्या नीलपुष्प साहित्य मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. हा कार्यक्रम कल्याणच्या बुद्धभूमी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

प्रा. मोरे पुढे म्हणाले की, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने आयोजित अ.भा. मराठी साहित्य संमेलनात सर्वांच्या सहकार्याने मी हा प्रयोग यशस्वी केला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर झालेल्या काव्य संमेलनात उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे लोककवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे, साहित्यिक शिवा इंगोले, कवी डॉ. गंगाधर मेश्राम, कवी गिरीश लटके यांनी मोरे यांच्या विषय गौरवोउद्गार काढले आणि आपल्या उत्कृष्ठ कविता सादर केल्या. एकूण पन्नास कवींनी या काव्यासंमेलनात सहभाग घेतला .

विषयानुरूप दर्जेदार कविता सादर करून प्रा . दामोदर मोरे यांना कवितेने वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. नंदा कोकाटे, शशिकला कुंभार, नवनाथ रणखांबे, अश्विनी देशपांडे , किर्ती खांडे, सृष्टी गुजराथी, मोहसीना पठाण , राजरत्न राजगुरू , जगदेव भटू , शाम बैसाने, विजयकुमार भोईर, अॅड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे, नरेश जाधव ,सुरेखा गायकवाड इ. कवितांचे छान सादरीकरण झाले.

यावेळी एबीएम समाजप्रबोधन संस्थेचे संस्थापक सिताराम गायकवाड , आरपीआय (ए) चे जेष्ठ नेते सुरेश सावंत यांनी प्रा. दामोदर मोरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्याना शुभेच्छा देऊन सत्कार केला. प्रा. दामोदर मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांनी त्यांचा शाल, बुके, भेटवस्तू देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक आणि आभार (उपाध्यक्ष निलपुष्प साहित्य मंडळ , ठाणे ) नंदा कोकाटे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ रणखांबे यांनी केले.

मुख्यमंत्री यांचे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0

 

इस्माईल शेख शेगाव

शेगाव युवा सेना तालुका च्या वतीने शेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहर भागातील युवा शिवसेना कार्यकर्त्यांनी

मोठ्या प्रमाणात सहभाग देऊन रक्तदान करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला श्री रक्तदान शिबिर संपन्न रक्तसंकलन..डॉ दिनेश खेताडे,तंत्रज्ञ शिवशंकर गोडघासे,अनिकेत निकम,रक्तपेढी

अधिपरीचारक परमेश्वर इंगळे,प्रदीप बकाल बाळासाहेबांची युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके शेगाव विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अजय कोकाटे ज्ञानेश्वर भाऊ धमाळ महेश भाऊ हिंगणे ज्ञानेश्वर भाऊ हिंगणे गोपाल भाऊ हिंगणे अक्षय भाऊ हिंगणे निलेश भाऊ शेळके गणेश भाऊ बिलवार विजय सरदार गजानन बापू या सर्व युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले

पत्रकार व वृत्तपत्र वितरण वाहनाला समृध्दी महामार्ग मोफत करा-विकासकुमार बागडी

0

 

प्रतिनिधी:(जालना)पत्रकार आणि वृत्तपत्र वितरण कर्मचार्‍यांच्या वाहनांसाठी समृध्दी महामार्ग मोफत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्या हिंदी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मुंबई- नागपूर हा समृध्दी मार्ग करण्यात आला हे बरे झाले. परंतू हाच मार्ग आता पत्रकार आणि वृत्तपत्राचे वितरण करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मोफत करणे गरजेचे झाले आहे.

त्याचे कारण देखील तसेच आहे. कारण मुंबई किंवा नागपूरला ये- जा करण्यासाठी हा मार्ग जवळचा असून तो जर का पत्रकार आणि वितरण विभागातील कर्मचार्‍यांना मोफत करण्यात आला.

तर त्याचे अनेक फायदे हे पत्रकार आणि वितरण करणार्‍या कर्मचार्‍यांना होऊ शकतात, ही बाब सरकारने लक्षात घेतली पाहिजे. तातडीेने आणि जलदगतीने नागपूर किंवा मुंबईला पोहचणे हे जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकार आणि वृत्तपत्र वितरण करणार्‍या कर्मचार्‍यांना सोपे जाणार आहे.

परंतू या महामार्गावर टोलनाके जास्तीचे असून त्याचे पैसेही जास्तप्रमाणात मोजावे लागणार आहेत.

 

 

ही बाब सामान्य पत्रकार आणि कर्मचार्‍यांच्या आवाक्याबाहेरची आहे. म्हणूनच सरकारने हा मार्ग पत्रकार आणि वितरण विभागातील कर्मचार्‍यांसाठी मोफत करायला हवा, अशी विनंतीही हिंदी मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी केली असून या निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ.संतोष पा. दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, पालकमंत्री अतुल सावे आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

सातोद थकीत बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना पिता पुत्रांकडुन मारहाण दोघांना पोलिसांनी केली अटक

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील I सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात दोघ पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील सातोद येथील राहणारे सुनील भास्कर धांडे यांचे कडे मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे थकबाकी असलेले विजबिल मागणीसाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी राहणार यावल व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी हे सुनील धांडे यांचे कडे थकीत विजबिल मागणीसाठी गेले असता.

व वरिष्ठाच्या आदेशाने त्यांना भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व योगेश सुनील धांडे या दोघांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात पिता-पुत्रा विरुद्ध भादवी कलम ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६,व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , पिता पुत्राला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

बाळपुर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ

0

 

दिनांक 6/ 2/2023 रोजी ठाणेदार अनंतराव वडतकर साहेब यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती

मिळाली की ग्राम नया अंदुरा कडून हातरून गावाकडे रोडने एक इसम त्याचे मोटरसायकलवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे अशा माहितीवरून तात्काळ पथक रवाना करून नाकाबंदी केली असता.

आरोपी विकास ओंकार मुंडाले वय 21 वर्षे राहणार मांजरी तालुका बाळापूर जिल्हा अकोला हा अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याचे जवळून देशी दारू सखु संत्रा टांगो प्रीमियमचे 180 एम एल चे 144 कॉटर ज्याची किंमत 10,080/- व एक मोटरसायकल हिरो कंपनीची एचएफ डीलक्स लाल रंगाची जी चा क्रमांक mh.30.BG.0968 किंमत अंदाजे 50000/- असा एकूण 60,080/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडदकार, पोलीस अंमलदार संतोष भोजने,रवी हिंगणे, शैलेश घुगे, नंदकिशोर तांदळे

श्री संत रवीदास महाराज जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी

0

 

संग्रामपूर प्रतिनिधी। मन चंगा तो कटोती में गंगा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री संत रविदास महाराज यांनी पूर्ण भारतभर कार्य केले अशा या महापुरुषाचे आज 5 फेब्रुवारी 2023रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.

संग्रामपूर, वरवट बकाल, सोनाळा,टुनकी , पातुर्डा या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय टुनकी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरेश भिकाजी लोणकर यांच्या हस्ते रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय टुनकी येथे सरपंच सुरेंद्र चौकट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ प्रवक्ते, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल गजानन निंबोळकार, भाजपाचे जिल्हा सदस्य डॉ गणेश दातीर, सरपंच सुरेंद्र चौकट, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन विणकर, माजी सरपंच जीवन लोणकर अमोल निंबोळकार ,गजानन राजाराम निंबोळकार, श्रीकृष्ण निंबोळकार ,गणेश निंबोळकर, गोपाल निंबोळकार, सुभाष बावस्कर, भाजपा सोनाळा सर्कल प्रमुख मुरलीधर चोरे, ग्रामपंचायत लिपिक विठ्ठल लोणकर, मनोहर वाघ, श्याम खंडागळे, यासह बहुसंख्य समाजबांधव गावांमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी व निदान शिबिर संपन्न.

0

 

(जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाऊंडेशनचा पुढाकार)

चामोर्शी:-जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड जंक्शन(मित्र फाउंडेशनच्या)सहकार्यातून समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्याचास एक भाग म्हणून चामोर्शी तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी चामोर्शी(३४),घोट(३३),चित्तरंजपूर(१९),तळोधी(२४) व बोरी(३४)अशा पाच केंद्रातील नियोजित ११० विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थ्यांची दिनांक ३ व ४ फेब्रुवारी रोजी बुद्ध्यांक तपासणी व निदान शिबिर विशेष मोहीम मानसोपचार तज्ज्ञ देवयानी चोपडे,वृशाली विभूती,स्फृर्ती वाडीभस्मे, श्रद्धा वाळके,शशीकांत शंकरपुरे,अजय खैरकर,निलेश चहांदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले.

प्रसंगी या मोहिमेसाठी कार्यक्रम जिल्हा समन्वयक अभिजित राऊत,पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील,सहायक संवर्ग विकास अधिकारी भिमराव वनखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ हुलके यांनी शिबिराला भेट देऊन तपासणी कक्ष,बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी व इतर महत्वाच्या सुविधांची पाहणी केली.तसेच स्वच्छ मुख अभियानाचे सुद्धा आयोजन करण्यात आले.

दरम्यान शिबिरात उपस्थित मान्यवरांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी हितगुज साधून शिबिरातील सोई सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून उत्तम सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संसाधन शिक्षक यांनी प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक यांच्या गृहभेटी देऊन नियोजनानुसार कार्यवाही केली.शिबिरामध्ये गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, शिक्षण विस्तार अधिकारी राणा सातपुते,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,नरेंद्र कोत्तावार,समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक अविनाश पिंपळशेंन्डे,भाऊराव हुकरे, संजय नांदेकर,गट साधन केंद्र चामोर्शी येथील आयईडीचे विशेषज्ज्ञ सुशील गजघाटे,विषय साधनव्यक्ती विवेक केमेकर,चांगदेव सोरते,कु वंदना चलाख, संसाधन शिक्षक कु मेघा कोहपरे,उमेश पोहाने,रवी खेवले, जीवन शेट्टे,तसेच गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी, गावातील सरपंच,सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहुन उत्तम सहकार्य केले.

सौ.अनिता निकम यांची जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड

0

_______________________________________
कोल्हापूर : भारतीय लोकशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अनिता अनिल निकम यांची नियुक्ती.

भारतीय लोकशक्ती पक्ष
पक्षप्रमुख मा.कोळपा हनुमंत धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय लोकशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

यावेळी श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य. गगनबावडा तालुका संपर्कप्रमुख सौ.मंगल शेलार सौ.लक्ष्मी भोसले सौ.मीनाक्षी उगवे सौ.वनिता पाटील देवदासी सौ.सजाबाई जाधव सौ.अर्चना जाधव सौ.दिपाली पाटील सौ.मंदाकिनी जोंधळेकर शालाबाई भोसले सौ.सुनीता भोसले सौ.गीता पाटील व इतर महिला उपस्थित होत्या.

सूर्या मराठी न्यूज
रिपोर्टर, तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

जालना जिल्हा सी.एस.सी.समन्वयकाकडून केली जाते गुत्तेदारी:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जिल्ह्यातील सी.एस.सी.समन्वयकाची गुत्तेदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

त्यात प्रामुख्याने आपल्या जवळच्या माणसांना जवळ धरून त्यांची सर्व प्रकारचे सी.एस.सी.ची कामे लवकर करून द्यायचे व इतर सी.एस.सी.व्हीएलई चे कामे करायचे नाही.

एखाद्या सी.एस.सी.व्हीएलई ने कामाचा पाठपुरावा केला असता,कामाबद्दल विचारणा केली असता त्याला उद्धट शब्दात बोलणे,मानसिक त्रास देणे,धमक्या देणे असले प्रकार जालना जिल्ह्यातील सी.एस.सी. जिल्हा समन्वयक यांच्याकडून घडत आहेत.

जालना जिल्हा सी.एस.सी. समन्वयक श्री.तुकाराम बजरंग लोदवाल यांच्याकडून नवीन सी.एस.सी.व्हीएलई रेजिस्ट्रेशन सेंटर असताना सुद्धा पैसे घेऊन अप्रोव्ह केले जातात.

तसेच सर्व प्रकारच्या सी.एस.सी.च्या सर्व्हिसमध्ये सक्रिय असणाऱ्या सी.एस.सी.व्हीएलई चे कामे 6 महिण्यापेक्षा जास्त दिवस होऊन पण काम केले जात नाही. एवढेच नव्हे तर त्या सी.एस.सी.व्हीएलई ला वारंवार टाळाटाळ करत असून त्यांना मानसिक त्रास सुद्धा सी.एस.सी. समन्वयक यांच्याकडून होत आहे.

त्याऐवजी सी.एस.सी. जिल्हा समन्वयक हे आपल्या गुत्तेदारी पद्धतीने काम करणाऱ्या त्यांच्या माणसांना च सर्व कामे दिली जातात, त्यांचीच सर्व कामे केली जातात.

सध्याचे सी.एस.सी.जिल्हा समन्वयक श्री. तुकाराम बजरंग लोदवाल हे एक सी.एस.सी व्हीएलई असताना सुद्धा सी.एस.सी. जिल्हा समन्वयकचे काम करत आहेत.

अशा प्रकारे सी.एस.सी. मध्ये गुत्तेदारी पद्धतीने काम करणाऱ्या सी.एस.सी. जिल्हा समन्वयक श्री.तुकाराम बजरंग लोदवाल यांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.

अशी मागणी सी.एस.सी.व्हीएलई कडून करण्यात येत आहे.