Home Blog Page 212

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भुमीपुत्रांची तहसील कार्यालय वर धडक….!

0

 

जळगाव जा.:- यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन प्रंचड पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्याच्या काही पिकाचे नुकसान झाले पिकाची नुकसान होऊन सुद्धा एक रुपयाची फुटकी मदत शासनाने शेतकऱ्याला दिली नाही. ती मदत शेतकऱ्याला तात्काळ मिळायला पाहिजेत.

तसेच सोयाबीन-कापसाचे भाव हे कमी झाल्याने शेतकर वर्ग हा चिंतेमध्ये पडलेला आहे. त्यामुळे सोयाबीन कापसामध्ये दरवाढ करून शेतकऱ्यांना आधार द्यावा.

त्यानंतर खराब झालेल्या सोयाबीन-कापूस तसेच इतर पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यास पिक विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झालेले आहे कुठतरी पिक विमा कंपनीने खराब झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक करावे.

गेल्या काही दिवसानंतर संपूर्ण जगभरामध्ये गुराढोरांवर लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली या मरण पावलेल्या जनावरांचे आर्थिक सहाय्य मिळावे याकरता शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना दगावलेल्या जनावरांची आजपर्यंत ही आर्थिक मदत मिळालेली नाही ही मदत शेतकऱ्यांना द्यावी.

आणि विशेष म्हणजे जळगाव जामोद तालुक्यातील आसगाव बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विकायला आणत असतात व्यापारी हे शेतकऱ्यांना मालाची कॅश रक्कम न देता चेक स्वरूपात अदा करतात ज्यावेळेस शेतकरी बँकांमध्ये चेक जमा करायला जातात त्यावेळेस काही बँका ह्या शेतकऱ्याची मागील रक्कम कपात करतात त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या बँका जर शेतकऱ्यांना न विचारता रक्कम कपात करत असतील तर अशा बँकांवर कारवाई व्हायला करा.

या सर्व मागण्या घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तहसील कार्यालय गाठत नायब तहसीलदार त्यांच्याशी चर्चा केली.

वरील सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या असुन ह्या मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा नायब तहसीलदार मार्तंड साहेब यांना अक्षय पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला.

यावेळी अशपाक देशमुख, अजय गिरी, सोपान पाटील, अमीत भिवटे, गुडु मिस्तरी, ऋषिकेश वंडाळे, योगेश ताडे, उल्हास माहोदे तसेच तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने आर्थिक मदत द्या – जिल्हाध्यक्ष अनंता मानकर

0

संग्रामपूर : काही महिन्याअगोदर लंपीच्या आजाराने संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते.

यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, खूप साऱ्या औषधी त्यांना दिल्या, जनावरांना वाचवण्यासाठी खूप खर्च केला,

परंतु त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे हे लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडली. शेतकऱ्यांकडे शेतीच्या व्यवसायाला जोड धंदा म्हणून जनावर पाळली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल हे आहेत.

परंतु लंपीच्या आजारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडली. त्याचा खूप मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या जलसमाधी आंदोलनामध्ये लंपी च्या आजाराने मृत्युंमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी ही प्रमुख मागणी होती.

ती मागणी सरकारने तात्काळ मंजूर करून पहिला हप्ता टाकला होता.परंतु गेल्या दोन महिन्यापासून दुसरा हप्ता हा अजूनही लाभार्थ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, दुष्काळामध्ये शेतीमाल हा मातीमोल झालेला आहे,

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणे फार गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लंपीच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई बँक खात्यात जमा करावी करिता तहसील कार्यालय संग्रामपूर मार्फत जिल्हाधीकारी साहेब बुलडाणा यांना स्वाभिमानीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, आशिष सावळे नयन इंगळे, श्रीकृष्ण मसूरकार, अर्जुन सपकाळ, राजेश उमरकर, प्रदीप उमरकर,समाधान मसूरकर भास्कर तांदळे, हे उपस्थित होते

धीरेंद्र शास्त्रीवर कारवाई व आक्रोश निषेध मोर्चातील मागण्यांच्या पूर्ततेसाठी.

0

 

मुख्यमंत्र्यांचे मुख्य अप्पर सचिव सुजाता सौनिक यांना निवेदन सादर.

बुलढाणा:
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींवर कारवाई करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या संघटनांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रार दाखल करावी.
राष्ट्रसंत संत शिरोमणी तुकाराम महाराजांची प्रथांना अवमान.

करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री महाराजांना महाराष्ट्रात बंदी घालावी.आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चांच्या माध्यमातून अवैध धंदे बंद करने, बुलढाणा जिल्ह्यातील होम डिवायएसपी ताथोड, पीएसआय घोडेस्वार,ग्रामसेवक सावकारे यांची उच्चस्तरीय चौकशी करने,.

शेतकऱ्यांच्या कापूस,सोयाबीन ला भाव देने, नेताजी जयंती पराक्रम दिवस, नाबालिक मुलीचे अपहरण प्रकरण, यासह ईतर मागण्यांची त्वरित पूर्तता करावी.

करीता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे मुख्य अप्पर सचिव सुजाता सौनिक (भा.प्र.से.) मंत्रालय मुंबई यांना आज 31 जानेवारी 2023 आझाद हिंदच्या शिष्ट मंडळाने निवेदन सादर केले.

मूख्य अप्पर सचिव सुजाता सैनिक यांनी सकारात्मक चर्चा करीत मागण्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला आदेशीत केले. विशेष म्हणजे अप्पर सचिव महोदयांनी उभे राहून निवेदन स्वीकारले.

यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे, महीला प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे , प्रदेशाध्यक्ष प्रशांत यशवंतराव पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष बैरवार, प्रदेश सोशल मीडिया इन्चार्ज योगेश कोकाटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
__________________
बुलढाणा
दिनांक: ०१/०२/२०२३.

कळपातील मेंढी पळून कापली गुन्हा दाखल

0

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

कनारखेड : शेगाव तालुक्यातील कनारखेड शिवारात चराई करीत असलेल्या मेंढ्याच्या कळपातील एक मेंढा व दोन मेंढ्या दोन त्यामधली एक मेंढी कापल्याची तक्रार मेंढपाळ तानाजी काशीराम कोळपे वय तीस वर्षे राहणार नांद्री तालुका खामगाव यांनी 30 जानेवारी रोजी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे फिर्यादीने तक्रार दिल्यानुसार त्यांचा धंदा मेंढपाळ असून वीस दिवसापूर्वी कनारखेड शिवारात तीन खंडी मेंढ्या त्यांनी चराई करता नेल्या होत्या कळपातील एक मेंढा व दोन मेंढ्या हरवल्या होत्या.

त्यानंतर फिर्यादीने त्याचे बस बंस्तन वरखेड शिवारात बसविले आहे आज 30 जानेवारी रोजी सध्या स्थितीत कनारखेड शिवारात मेंढा सराई करत असलेला रंगा कोळपे याने फिर्यादीची मेंढी लगतच्या शेतात दिसून आल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी रंगा याच्यासोबत कनारखेड येथील शिवा निळे व बंडू निळे याच्या गोठ्यात गेले असता फिर्यादीची मेहंदी त्यांच्या गोठ्यात बांधलेली दिसली त्यानंतर आज दुपारी दीड वाजता सुमारास शिवा निळे व बंडू निळे यांनी एक मेंढी कापल्याची तक्रारीत नमूद आहे पोलिसाच्या फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 323 429 भावींदनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ASi ज्ञानदेव ठाकरे करीत आहेत.

ट्राम पोलियम राष्ट्रीय स्पर्धेत अजय पहुरकर यास सुवर्ण पदक

0

 

शेख इस्माईल शेगाव

शेगां येथील अजय विजय पहुरकर याने दि. २७ -२८ जानेवरी २०२२-२३ रोजी डोम्बिवली (ठाणे) येथे पार पडलेल्या ट्रामा पोलियम राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले.

नॅशनल गोल्ड मिडलिस्ट अजय व्ही पहुरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी एम पी एड फिजिकल कॉलेज औरंगाबाद. जिम्नॅस्टिक्स प्रॅक्टिस भारती प्राधिकरण साई सेंटर औरंगाबाद चे चिफ कोच अजितसिंग राठोड, प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे.

सरनो राणीग, कोच संजय मोरे सर, हाय प्लेइंग औरंगाबाद जिम्नॅस्टिक असोसिएशन डिस्टिक्स सेक्रेटरी मिस्टर .सागर कुलकर्णी आणि प्रेसिडेंट मिस्टर .आदिती जोशी सर औरंगाबाद आणि ऑल मॅगा ऍक्सिक्युटी सदस्य डोंबिवली येथील झालेल्या २७ – २८ २०२२-२३ ट्राम पोलियम राष्ट्रीय चम्पीयन स्पर्धेत अजय पहुरकर याने सुवर्ण पदक पटकाऊन संत नगरीच्या शिरपेचात मानाचा तुला खोवला या बद्दल त्याचेवर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रोहयो अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसीय काम बना आंदोलन यावल तालुका यावल येथील पंचायत समिती आवारामध्ये

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर टेक्निकल ऑफिसर डाटा एन्ट्री ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांचे एकदिवसीय राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात आले.

रोहयो ही योजना 2005 पासून महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात राबविले जाते याची जननी ही महाराष्ट्र राज्य असून सुद्धा तटपुंज मानधनावर कर्मचारी व रोजगार सेवक काम करीत आहे जेव्हा की केंद्र सरकारच्या 264 विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत नियमित व अखंडपणे हे कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक हे चौघं घटक पोहोचविण्याचे काम करीत आहे.

राज्यामध्ये रोहयोच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे शेतकरी शेतमजूर भूमीहीन अशा विविध प्रकारच्या घटकांना विविध योजनांची अंमलबजावणी करून शासनास मोठ्या प्रमाणे मदत करणे तरीही आज या चारही आधारस्तंभांना केंद्र शासन व राज्य शासन आधार देत नाहीये देशातील इतर सात राज्यांमध्ये या चौघटकांना सन्मानपूर्वक पोटाला मिळेल एवढे मानधन किंवा मासिक वेतन देण्यात येते त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात मासिक वेतन देण्यात यावे यासाठी पुढील मागण्या मंजूर करण्यात याव्या.

1 मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे
2 पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे
3 रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या
4 योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी
5 मध्यप्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची आम्ही देण्यात यावी

वरील प्रमाणे मागण्याची दखल न घेतल्यास उद्यापासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल सदर राब राज्यव्यापी आंदोलनात असिस्टंट प्रोग्रॅम मॅनेजर विशाल राऊत टेक्निकल ऑफिसर समाधान बोरसे ऑपरेटर किशोर कोळी जितेंद्र सोनवणे संतोष पाटील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक कुशाल पाटील तालुकाध्यक्ष दीपक कोळी उपाध्यक्ष अनिल वसीम पिंजारी सचिव सरफराज तडवी ,साहेबराव कोळी अनिल डाके, दिगंबर पाटील ,अरुण कोळी ,शरीफ तडवी, गणेश भालेराव, मेहरबान तडवी इत्यादी मोठ्या संख्येने मनरेगा कर्मचारी उपस्थित होते

भारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व धोरणाची आवश्यकता मा० नगराध्यक्ष कासमभाई गवळी

0

 

इस्माईल शेख शेगाव

आज दि. 30 जानेवारीला हुतात्मा दिना निमित्त कॉंग्रेसच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी विचार मांडले.

आज भारत देश त्या अस्थिर अश्या परिस्थितीमधून जात आहे. ही परिस्थिती स्थिर करण्यासाठी व भारताच्या प्रगतीसाठी म. गांधीजी यांच्या विचाराची व त्यांच्या धोरणाची नितांत आवश्यकता आहे.

यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रतिनिधी प्रा. सतीश ताजने यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बु. जि. महिला काँ.च्या उपाध्यक्ष लंबे ताई, मेहकर शहर महिला कॉ. च्या अध्यक्षा विमल माने मा. गटनेते अलिमभाई, मा. नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.

तसेच यावेळी मा कासम भाई गवळी यांनी पदविधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेरवार धिरज लिंगाडे यांना निवडून आणा. मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धिरज रामभाऊ लिंगाडे यांना पसंती क्र. १ चे मत देऊन विजयी करावे असे आवाहन मा. नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांनी केले.

मेहकर येथील जि. प. हायस्कूल येथील मतदान बुथावर पदवीधर मतदारांना एकत्र करून व सर्वांना सोबत नेऊन लिंगाडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी कांग्रेसचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक व पदवीधर मतदार बंधु भगिनी सोबत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र माने यांनी केले तर आभारप्रदर्शन ससाणे यांनी केले.

रामनगर युनियन बँकेच्या नाना तऱ्हा,नागरीकांच्या नुसत्याच येरझरा- तुकाराम राठोड

0

—————————————-
रामनगर(वार्ताहर)युनियन बँक रामनगर शाखेच्या गचाळ कारभाराचा फटका रामनगरसह परिसरातील तब्बल तीस ते चाळीस गावातील नागरिकांना बसत आहे.

अगदी लहानात-लहान काम घेऊन देखील बँकेत गेले तरी ते देखील एक दिवसात होत नाही

.त्यासाठी नागरिकांना किमान चार ते पाच चकरा बँकेत माराव्या लागतात.बँकेतील कर्मचाऱ्यांच्या चालढकल वृत्तीला नागरिक कंटाळले असून,अनेकांनी बँकेतील आपली खाती बंद करून इतर बँकेत खाती उघडली आहेत.तसेच बँक कर्मचारी यांनी नागरीकांच्या सेवेसाठी तत्पर राहणे गरजेचे असताना.दुपारी चार वाजताच बँकेचे गेट बंद केले जाते.

त्यानंतर कुणालाही बँकेत प्रवेश दिला जात नाही.खुर्चीचा अमरपट्टा घेऊन आल्यासारखे कर्मचाऱ्यांच्या वागण्याला नागरिक कंटाळले आहेत.

सध्या एमपीएससी मार्फत अनेक जागांच्या जाहिराती निघाल्या आहेत.तसेच राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.अनेक विद्यार्थ्यांना यासाठी बँकेच्या पासबुक ची आवश्यकता भासते.मात्र बँक कर्मचारी कुणालाही पास बुक उपलब्ध करून देत नाही.तसेच त्यांना ऑनलाईन एप्लिकेशन्स वरून पासबुक काढण्यास सांगितले जाते.मात्र असे पासबुक कुठेही ग्राह्य धरले जात नाही.हे कर्मचाऱ्यांना सांगणार कोण हाच खरा प्रश्न आहे.अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहेत.

त्या शेतकऱ्यांची खाती बँकेने फ्रिज केले आहेत.त्यातली एक रुपया देखील सबंधित शेतकऱ्यांना काढता येत नाही.शासन स्तरावरून असे कुठलेही आदेश नसताना बँक प्रसासशन शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.अनेक शेतकऱ्यांनी तडजोड करून आपली कर्ज खाती नील केली आहेत.ते बेबाकी मागायला गेल्यास उडवा- उडविची उत्तरे दिली जातात.

—————————————-
बँक अधिकाऱ्यांनी घेतली दखल
—————————————-
बँकेतील कर्मचारी वर्गाच्या वर्तनाला सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून बँकेच्या कारभाराविषयी सामन्यामध्ये तीव्र भावना व्यक्त केली जात आहेत.बँक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

तरच नागरिकांचा रोष कमी होण्यास मदत होईल.अन्यथा लोकांच्या भावनांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.

प्रतिक्रिया:

रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याच्या किंवा खातेदाराच्या अनुदानाचे पैसे तसेच तहसील मधून आलेल्या श्रावण बाळ,निराधार,अपंग सेवा योजनेतील लाभार्थ्याची खात्यावरील पैसे देण्यास टाळाटाळ करतात.कर्ज असल्यामुळे बचत खात्याला होल्ड लावतात.

मयत झालेल्या लाभार्थ्याचे पैसे काढण्यासाठी चार-पाच बाँड मागवतात.शेतकऱ्यांना विनाकारण चकरा मारायला लावतात.यामुळे त्यांचा आर्थिक खर्च होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.आज या उद्या असे कारणे सांगून कर्मचारी वेळ काढूपणा करत असून,त्यांच्या या वृत्तीला जरब बसवण्यासाठी प्रसानानाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तुकाराम हरिचंद राठोड
जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी जालना.

यावल पंचायत समितीव्दारे झालेल्या विविध कामांची चौकशी व्हावी या मागणीसाठी निळे निशाण संघटने आमरण उपोषण सुरू

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पातळीवरील अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन या अभियांनाचा फज्जा उडाला असुन

,ठेकेदार व स्थानिक ग्रामपंचायतच्या मार्फत बोगस ठराव करीत कामे करून शासनाच्या निधी लुट करण्याचा कारभार सुरू अयुन या गैरकारभाराच्या विरोधात निळे निशाण सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमरण उपोसण सुरू केले आहे .

निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी या उणेषणा संदर्भात डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे दिली असून त्याची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .

अशा प्रकारे यावल पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या या भोंगळ कारभाराची त्वरीत चौकशी व्हावी या करीता ३०जानेवारी २३ पासून यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे .

यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणारी डोंगर कठोरा , पाडळसा, सावखेडा सिम, थोरगव्हाण, वड्री, निमगाव ,गिरडगाव, कासारखेडा, चिंचोली, आडगाव, म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये शासकीय माहीती अनुसार ही गाव मात्र हगणदारी मुक्त झाले असतांना ही तसेच या गावांना सरकारकडून पुरस्कार जाहीर झाले

असुन देखील शौचालय बांधकाम करणारे ठेकेदार ग्रामपंचायत मधून काही बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी खोटे ठराव करून ग्रामसभेत न चर्चा करता हे ठराव मंजूर करीत आहेत पंधराव्या वित्त आयोगातून काही जण गावाच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेची कोणतेही नियोजन न घेता सरपंच ग्रामसेवक ही शासनाची दिशाभूल करीत आहेत स्वतःच्या आर्थिक ठक्केवारीच्या मोहात ठराव न घेता स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी सरकारची दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे .

सदरच्या या बोगस नियमाबाह्य कामांची जिल्हा पातळीवरून तात्काळ कामे बंद करण्याचे आदेश देवुन तात्काळ संबधीतांवर कार्यवाही करण्यात आवी , तालुका स्तरावरील जेणेकरून कामकाज झालेले कामाचे बिल थांबविण्यात यावीत , शासनाच्या निधीचा अपव्य होणार नाही याची काळजी पंचायत समिती यावल प्रशासनाने घ्यावी व संबंधीतांवर तात्काळ कारवाई तसे न झाल्यास आपण सत्र न्यायालय या संदर्भात अर्ज दाखल करून दाद मागणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. आज दिनांक ३० जानेवारी २३ पासुन यावेळी उपोषणाच्या ठीकाणी मिळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर उपोषणा संदर्भातील आपल्या संघटनेची भुमिका मांडली ,याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी येत्या दहा दिवसात आपण संबधीत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे लिखित आश्रासन दिले तरी काही मागण्या या अपुर्ण असल्याने आपले उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त अशोक तायडे यांनी म्हटले असुन या प्रसंगी पंचायत समितीचे पोषण आहार प्रमुख धनके, कृषी अधिकारी डी एस हिवराळे

, शिवसेना ( ठाकरे ) गटाचे संतोष धोबी , सारंग बेहडे , पप्पु जोशी , संतोष वाघ आदीनी उपस्थित राहुन या उपोषणाला आपला पाठींबा दिला आहे .

सेजगाव येथे शिबिरा दरम्यान NSS ची मतदान जनजागृती रैली रैली ने ग्रामस्थाचे लक्ष वेधले

0

 

गोंदिया:- मतदान जनजागृतीसाठी एन.एम.डी महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व जि.प वरीष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रासेयो निवासी शिबिर दरम्यान सेजगाव येथे २०जानेवारी रोजी जनजागृती रॅली काढली.

यावेळी उपसरपंच प्रमोद पटले,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम,शिबिर प्रमुख डॉ.अश्विनी दलाल,प्रा.रवी रहांगडाले,प्रा.अर्चना अंबुले,मुख्याध्यापक फाल्गुन कावळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते.

म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सेजगाव येथे भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.असल्याचे डॉ.बबन मेश्राम यांनी गावकऱ्यांना रैली दरम्यान मार्गदर्शनातून समजावून सांगितले.

या जनजागृती रॅलीने गावाच्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. विविध घोषण वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वरीष्ठ प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत चे सदस्य सहभागी झाले होते.