Home Blog Page 215

मुंबई च्या सेबी कार्यालयावर जालन्यातुन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन जाणार—-गजानन पाटील भांडवले.

0

 

प्रतिनिधी:(जालना)शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टी च्या वतीने. दि,23 जानेवारी 2023 ला 11,00 वाजता मुंबईच्या बांद्रा कुर्ला येथील सेबीच्या कार्यलय समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.

त्यासाठी दि 22 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 9, वाजता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जालना रेल्वे स्टेशन ला येणे,
कारण दि, 09/01/2023 ला आपण शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष.. अनिल भाऊ घनवट,, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष.ललित पाटील बाहळे. यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हातुन मागणी चे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी ला दिले होते त्याचवेळी आपण जालना जिल्ह्यातुन दिले होते.

 

या सर्व मागण्याची दखल न घेतल्या मुळे मुबंई च्या सेबी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.
आपल्या मागण्या तरी काय आहेत .. की तुम्ही जे सेबी कार्यालया मार्फत दि, 20 डिसेंबर 2022 ला वायदे बाजारावरीला बंदी ला एका वर्षांची मुदत वाढ दिली ती तात्काळ उटविणे नबरं एक….. नंबर दोन
कापूस सोयाबीन व इतर सात शेती मालावरील वायदे बाजारात जि बंदी घातल्यामुळे शेती मालाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली याचे कारण म्हणजे सरकार चे धोरण ते धोरण तात्काळ बदलविण्यात यावे.

नंबर तिन तुम्ही जे सोयाबीन पेंड व डि ,ओ, सी, व कापसाचे सुत आयात करायचे धोरण राबवले ते धोरण तात्काळ बंद करण्यात यावे.

या सर्व आसेचे पत्र देवुन सुध्दा केंद्र सरकारने व राज्य सरकारने कुठलीच दखल न घेतल्या मुळे आता आम्ही सेबी कार्यालया वर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.

व जे केंद्र सरकारने शेतीमालाचे भाव दुप्पट करु आहे आश्वासन दिले होते ते पुर्ण केले नाही तेचा जवाब विचारणार आहोत.
तरी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांने मोठ्या संख्येने उपस्थित राहवे आहे आवाहन मी जालना जिल्हचा अध्यक्ष म्हणून गजानन पाटील भांडवले विनंती करीत आहोत.

साकळी येथे शिक्षणासाठी बाहेरगावाहुन येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीचा एकाने रस्त्यात केला विनयभंग

0

 

यावल : ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणा साठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवला व त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला.

याप्रकरणी साकळी येथील येथील त्या विद्यार्थीनींची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द विनयभंगासह बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक ( पोक्सो) कायद्यान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

यावल तालुक्यातील किनगाव येथून साकळी येथे एका माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी एसटी बस व्दारे ये – जा करतात बुधवारी काही विद्यार्थिनी एसटी बसने फाट्यावर उतरून साकळी फाट्या पासुन गावात पायी जात असताना साकळी गावातील आबा उर्फ दीपक वसंत मराठे याने त्यांचा रस्ता अडवत एका अल्पवयीन विद्यार्थीनींच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे, कृत्य केले घाबरलेल्या विद्यार्थीनींनी हा प्रकार आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी त्वरीत या संदर्भातील पालकांना माहिती दिली.

विद्यार्थीनींच्या पालकांनी धाव घेत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा २०१२ पोस्को अन्वये आबा उर्फ दीपक वसंत मराठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, हवालदार सिकंदर तडवी हे करीत आहे. या छेडखानी गुन्ह्यतील संशयीत आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेगावात शुक्रवारी “भारतीय संस्कृतीचे जतन प्रत्येकाची *जबाबदारी” विषयावर अविनाशभारतींचे जाहीर व्याख्यान

0

 

इस्माईल शेख शेगाव

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व आदर्श संस्थांना पुरस्काराचेही वितरण

शेगाव तालुका पत्रकार संघाचे आयोजन

शेगांव: पत्रकार दिन सोहळा २०२३ निमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्ती,जेष्ठ पत्रकार यांचा सन्मान तसेच शहरातील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था यांना पुरस्कार वितरण आणि प्रसिद्घ व्याख्याते अविनाश भारती यांचे “भारतीय संस्कृतीचे जतन ही प्रत्येकाची जबादारी” या विषयावर जाहीर व्याख्यान मधून प्रबोधनासह हास्याच्या मेजवानीचा.

भव्य कार्यक्रम स्थानिक श्री गणेश प्रस्थ वै.पुरुषोत्तम हरी गणेश पाटील नगर एम एस इ बी चौक शेगांव येथे
आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खा प्रतापराव जाधव तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ संजय कुटे राहतील.

याप्रसंगी देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.अँड आकाश पुंडकर,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, माऊली ग्रुप चे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, मा. नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच, मराठी पत्रकार परिषद चे राज्य उपद्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बर्दे,विभागीय सचिव अमर राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष सतीशआप्पा दुडे, अजय बिल्लारी,प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाठ, रणजितसिह राजपूत , जिल्हा सरचिटणीस संदीप शुक्ला, शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, काँग्रेस चे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, सहकार नेते पांडुरंगदादा पाटील,मा जी प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, स्वातीताई वाकेकर,दयारामभाऊ वानखडे, भास्करराव पाटील,प्रेसिन्नजित पाटील, शरद अग्रवाल,सुषमाताई शेगोकार, नंदाताई पाउलझगडे,राजाभाऊ भोजने प्रीतिताई शेगोकार, राजेंद्र माळवे,अनंत उंबरकर,कल्पनाताई मसने, यांची उपस्थिती राहणार आहे.

 

तरी या कार्यक्रमास शेगाव शहर व तालुक्यातील नागरिक महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल उंबरकर,विभागीय सचिव राजेश चौधरी , शेगांव तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धनराज ससाणे, कार्याध्यक्ष सतीश अग्रावाल,उपाध्यक्ष संजय ठाकूर ,सचिव मंगेश ढोले, डिजिटल मीडिया परिषद अध्यक्ष सचिन कडूकार ,कार्याध्यक्ष राजकुमार व्यास यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्यानी केले आहे.

“”विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार”
गेल्या दोन दशका पासुन संतनगरीत आपल्या लेखणीतून उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या पत्रकारांचा भव्य सत्कार यावेळी करण्यात येणार आहे यामधे जेष्ठ पत्रकार अरुण चांडक, महेंद्र व्यास,बद्रीप्रसाद अवस्थी,डॉ जयंत खेळकर,संजय सोनोने, नंदु कुळकर्णी,या पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच संत नगरीत सतत सेवाभाव व्रुत्ती ने काम करणाऱ्या कै पुरुषोत्तम हरी गणेश पाटिल चँरीटेबल ट्रस्ट ,स्व श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशन, गो ग्रीन फांऊंडेशन,नागरी हक्क संसरक्षण समीती,रोटरी क्लब,श्रध्दांजली फंड,अंजुमन शिक्षण संस्था,बुरूंगले शिक्षण संस्था,शेगांव शिक्षण संस्था तसेच विवेक चांदुरकर, राजुपाटिल मिरगे,नितीन शेगोकार,रामेश्वर थारकर,गजानन साखरपाळे यांचाही सत्कार होणार आहे”

16/महिलांनी गाजविला टाटा मुंबई मॅरेथॉन

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला मुंबई येथे आयोजित 18व्या मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या
प्रकारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल 20/ महिला सरपंचा मधून अकोला जिल्ह्यातील एकमेव मोरगाव भाकरे ग्रामपंचायतच्या सरपंच उमान ज्ञानेश्वर माळी सहभागी झाल्या मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भुत ड्रीम रन ठरली

राज्यभरातून निवड 16/ महिला सरपंचामध्ये त्याची अकोला जिल्ह्यातून निवड केली. प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन मध्यें
सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रमुख माधुरी लाड
मालती सगणे समन्वयक यांनी पुढाकार घेत या कार्यशील 16/ महिला गाव कारभारीची निवड.

करून देशाच्या आर्थिक राजधानीत मान मिळून दिला
या 27, 920 महिला सरपंचाचे
प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडक 16/ महिला सरपंचांना
देण्यात आली

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शिवसनेचा एल्गार

0

 

इस्माईल शेख शेगावप्रतीनिधी

अकोला- पुर्व विदर्भा प्रमाणे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना दिवसा 12 तास विज पुरवठा द्या दिंनाक 16 जानेवारी रोजी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने विद्युत भवन येथे रुमणे आंदोलन आयोजित करण्यात आले.

विदर्भा प्रमाणेच पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना 12 तास विज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शिवसनेचे खासदार मा. श्री अरविंदजी सावंत यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्च्यात हजारोच्या संख्येने शिवसैनिक,महीला शिवसैनिक, तथा शेतकरी आपली उपस्थिती दर्शवली या मोर्च्यात आमदार मा. नितीन देशमुख सह संपर्क प्रमुख सेवक राम ताथोड, जिल्हा प्रमुख मा. गोपाल भाऊ दातकर यांच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.

रात्रीला विज पुरवठा होत नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना साप, विंचू, जंगली जनावरे डुकरे तडस इत्यादीच्या हल्याची जोखीम स्वीकारुन आपला जिव धोक्यात ठेवुन पिकांना पाणी द्यावे लागते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू पण झाल आहे.

एकाच राज्यात एकाच विदर्भा भागातील शासन भेदभाव करीत आहे पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांना 2 जुन 2022 रोजी आदेश काढुन दिवसा 12 तास विज पुरवठा करण्याचे आदेशित केले इकडे मात्र रात्रीला विज पुरवठा तोही पुरेसा होत नाही कधी चार तास दिल्या जातो तर कधी रात्रभर बंद ठेवल्या जातेे पश्चिम विदर्भा तील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.

हा अन्याय तातडीने थांबवावा अकोला जिल्हा शिवसनेने शेतकऱ्यांच्या सामने मोर्चाचे आयोजन केले या मोर्च्यात अजय दादा खुमकर युवा सेना जिल्हाप्रमुख, राहुल भाऊ कराळे उपजिल्हा प्रमुख युवा सेना ओम भाऊ साकरकार उपतालुका प्रमुख युवा सेना पंकज भाऊ काळणे, भास्कर अंभोरे प.स.सदस्य, गोपाल इंगळे, बंडू माळी, मनीष बुटे, दिलीप परनाटे, निवृत्ती फुकट चेतन गोरले संतोष मोडक, आनंद अढाउ,नितीन ताथोड, छोटु हलवने,एकनाथ दांदळे,प्रविण फुकट,भिकाजी पांतोड, बंडू वाघमारे, व सर्व अकोला जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसैनिक, शेतकरी पदाधिकारी, यानी उपस्थिती दर्शवली

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ताकोते यांची नियुक्ती….

0

 

विठ्ठल अवताडे  शेगाव

दि.12 जानेवारी 2023 रोजी विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे कॉलेज नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.

या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा साबळे यांनी शेगाव निवासी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ताकोते यांची नियुक्ती केली. सदर नियुक्तीपत्र श्री ज्ञानेश्वर ताकोते यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ. बबनराव तायवाडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस मा. सचिन राजूरकर, राष्ट्रीय सहसचिव शरद वानखडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य अध्यक्ष मा.प्रकाश भोगरथ तथा माजी आमदार मा.दिगंबर विशे उपस्थित होते.

बहुचर्चित नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ

0

 

ब्युरो रिपोर्ट सूर्या मराठी न्यूज

बुलढाणा : बहुचर्चित नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून कायद्याची पायमल्ली करणारी आता राज्य महिला आयोगाच्या रडारवर आहेत.

सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने सविस्तर माहिती घेत चौकशी केली तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची लटकती तलवार राहनार आहे.

सदर प्रकरनात बुलढाणा जिल्ह्यातील मराठा समाजाचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रा कडून प्राप्त होत आहे.

जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक 575/22 मध्ये राज्य महिला आयोगाकडून माहिती मांगवीत नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना लेखी पत्र आले आहे.

नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात आता राज्य महिला आयोगाचे पत्र बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्यामुळे सदर प्रकरणाला महिला आयोगाने गांभीर्याने घेतल्याचे निदर्शनास येत आहे.

सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे देणे,नाबालिक मुलीला मातापित्यापासून लांब ठेवणे, नाबालिक मुलीचे दबाव आणून बयान नोंदविणे, तपास अधिकारी घोडेस्वार यांची कायद्याची पायमल्ली करणे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अंगलट येणार आहे.

याबाबत पीडित मुलीचे माता पिता यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवीत पोलीस प्रशासन माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या दबावात काम करीत असून कायद्याची खुलेआम पायमल्ली करीत आहे. त्यामुळेच पिडीत माता पित्यानी हम करे सो कायदा वृत्तीला आव्हान देत तक्रार केली होती.


तर सदर प्रकरणात पीडित मुलीच्या माता पित्यांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे न्यायाची मागणी सूध्दा केली होती. सदर प्रकरणात सुरुवातीपासून आझाद हिंद शेतकरी संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच महिला सुरक्षित असल्यामुळे झोपडीबांधो आंदोलन करण्याची भूमिका पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी यापूर्वीच घेतली आहे.

त्यानुसार आज पीडित मातापित्यांना राज्य महिला आयोगाकडून दखल घेतल्याचा पत्राची सह प्रत प्राप्त झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

#Rupalichakankar

@rupalichakankar

गाडऱ्या येथील बेपत्ता विवाहीत महीलेचे मृत अवस्थेत मिळाले प्रेत खुन झाल्याचे संशय पोलीस व आरोग्य विभाग घटनास्थळी रवाना

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गावात राहणाऱ्या बेपत्ता झालेल्या विवाहीत महिलेचे जंगलात मृत अवस्येत मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की करसना सुभाष बारेला वय३० वर्ष राहणार गाडऱ्या तालुका यावल या आदीवासी विवाहीत महिलेचे प्रेत मिळुन आले आहे .

या संदर्भात काल दिनांक १२ जानेवारी सदरची महिला ही गाडऱ्या येथुन दिनांक ९ जानेवारी घरातुन हरविल्याची तक्रार देण्यात आली होती.

, याच घरातुन बेपत्ता झालेल्या महीलेचे प्रेत मृत अवस्थेत आढळुन आले आहे , या घटनेच्या संदर्भात महिलेच्या मृत अवस्थेत प्रेत मिळुन आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे संशय व्यक्त करण्यात येत असून , याबाबतची खबर गाडऱ्या गावाचे पोलीस पाटील केरसिंग घाटु बारेला यांनी खबर दिल्याने पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन ,घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे हे तपास करीत आहे .

गाडऱ्या येथे घटनास्थळी पोलीस उप निरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस नाईक युनुस तडवी, महीला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे व गणेश ढाकणे व यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण , कर्मचारी बापु महाजन यांचे पथक रवाना झाले आहे .

१२ वर्षाच्या युवतीने दिला बाळाला जन्म ,लैंगिक अत्याचार करणारा ही अल्पवयीन ,पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

0

 

विकी वानखेडे यावल

यावल; – तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे ज्या वयात मुले मुली खेळण्याचा आनंद घेतात , त्या वयात एका १२ वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला . एका एलवयीन मुलाने हे भीषण कृत्य केले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि यावल तालुक्यात एका १२ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारातून बाळाला जन्म द्यावा लागला आहे . या घटनेमुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १२ वर्षीय मुलगी हि आपल्या आईवडिलांसह राहत होती .

या मुलीचे आईवडील आणि भाऊ हे दोघेही आपले जीवनाच गाडा चालविण्यासाठी हात मजुरीचे काम करीत असत . या मुलीने वर्षभराचे पासून शाळेत जाणे अचानक बंद केले , म्हणून ती घरीच राहत असे , घरी रहात असल्यामुळे त्यांच्याच समाजातील एका अल्पवयीन मुलाने तिला अमिष दाखवत तिच्यावर वर्षभर अत्याचार केला .

आणि या अत्याचारातून ती मुलगी गर्भवती राहिली . तो पर्यंत नातेवाईकांमध्ये गंधामुक्तीचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी त्या मुलीचे वागणे बोलण्यावरून काहीतरी फरक जाणविल्याने त्या ठिकाणी मुलगी गर्भवती असल्याचे माहीत पडले .

झालेल्या या घटनेमुळे यामुलीने १३ तारखेला शुक्रवारी दुपारी एका बाळाला जन्म दिला आहे . या घटनेमुळे सर्वांनाच धक्काचा बसला आहे . या सर्व झालेल्या प्रकरणा बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने विलास रामावत सन्माणित:

0

 

प्रतिनिधी:(जालना)गोरशिकवाडीचे राष्ट्रीय संयोजक विलास रामावत यांना राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व त्यांच्या आजवरच्या समाजकार्याची दखल घेऊन समाज रत्न पुरस्कार देण्यात आले.

विलास रामावत हे गोरसिकवाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांनी त्यांच्या जीवनाचा बंजारा समाजासाठी स्वतःचा जीवनाचा त्याग अर्पण करून समाजावर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला व संपूर्ण

महाराष्ट्र,तेलंगणा,कर्नाटक,मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश,नव्हे तर भारतभर फिरून त्यांनी समाज जागृती ,प्रबोधन करून समाज संघटित कसे होईल आणि समाजावर होत असलेल्या अत्याचारा ला लढा कसा देता येईल हाच प्रयत्न त्यांनी त्यांच्याचळवळ उभी करून संघटने मार्फत केला.

वयाच्या 23 वर्षापासून त्यांनी समाजासाठी त्याग करून समाज जागृत कसे करता येईल या गोष्टीकडे त्यांनी अहोरात्र गावोगाव फिरून समाज संघटित केला.स्वतः वयाच्या 23 व्या वर्षी आपले शिक्षण

atd.Gdart.animation.foundation.मराठी स्टोरी बोर्ड आर्टिस्ट व सेवालाल महाराज यांचे चित्र बनवून नॅशनल आर्टिस्ट चित्रकार,असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक समाज सेवक म्हणून समाजासाठी न्याय व अधिकाराला लढा देणारा एक समाज सुधारक निर्माण झाला .

आज त्यांच्या ह्या सगळ्या कार्याची दखल घेऊन त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्कार सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन लढावूवा विलास रामावत यांच्या समाज कार्याची दखल पोहरादेवी येथे ट्रॅफि,सन्मानपत्र देण्यात आले .

या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे शेखर महाराज, भोजू महाराज तेलंगणा,सोबत वेग वेगळ्या राज्यातील 21 गोर बंजारा रत्न पुरस्काराने, सन्मानित करण्यात आले.

पोहरादेवी,उमरीगड.मा.प्रभुजी चव्हाण मंत्री पशुसंगोपन कर्नाटक,मा.उमेशजी जाधव खासदार गुलबर्गा कर्नाटक,हरिभाऊ राठोड माजी खासदार,तुषार राठोड आमदार मुखेड,प्रदिप राठोड माजी आमदार किनवट,अँड निलय नाईक आमदार विधानपरिषद,इंद्रनिल नाईक आमदार पुसद विधानसभा,राजेश नाईक(NSDA)नॅशनल सेवा डॉक्टर असोसिएशन पुसद.या मान्यवरांच्या हस्ते धर्मगुरू तपस्वी डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत आयोजित दिनानिमित्त बंजारा समाजाचे 11 समाज सेवकांना राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.व त्यांचा सर्व बंजारा समाजामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.