Home Blog Page 22

Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या मुलांनी गाजविले कुस्तीचे मैदान जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत विजयप्रवास.

0

 

सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट, दि. 26 ऑगस्ट 2025 (मंगळवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने नगरपरिषद वाचनालय टाकाग्राउंड, हिंगणघाट येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील पल्लवी मुडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.

Hingnghatnews /ज्ञानदा हाय स्कूल ची जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेकरिता 3 खेळाडूची निवड

तसेच 17 वर्षखालील गटात मुलांमध्ये लोकेश येमुलवार याने सुद्धा प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत विजय मिळवीला व कुस्तीचे मैदान गाजविले. या दोन्ही खेळाडूंनी वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

शिक्षणाबरोबरच क्रीडेला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे संस्थापक श्री. गिरधर बाबूजी राठी सतत प्रोत्साहन देतात. क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत, ही विशेष बाब आहे.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. गिरधर राठी (संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट व वाघोली), सौ. अर्पना राठी (अध्यक्षा), श्री. रशेष राठी (सचिव), श्री. प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), श्री. अभिनव जैस्वाल (मुख्याध्यापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), श्री. रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Hingnghatnews /ज्ञानदा हाय स्कूल ची जिल्हा स्तरिय कुस्ती स्पर्धेकरिता 3 खेळाडूची निवड

0

 

सचिन वाघे हिंगणघाट

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट तालुका स्तरिय कुस्ती स्पर्धा 26 ऑगस्ट ला टाका ग्राउंड वाचनालय येथे संपन्न झाले.

या स्पधे मध्ये ज्ञानदा हाय स्कूल सातेफल चे अंडर 14 वयोगटातील करण विस्वास अंडर 19. वर्ष वयोगटतील अमीत वाढई , आर्यन कौरासे नि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा स्तरिय कुस्ती स्पधे करिता आपले स्थान निश्चित केले मिळालेल्या यशाबद्दल

त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे काशिनाथ लोणारे सर कोषध्यक्ष लकी खिलोसिया सर सह सचिव
निकीत गेडाम सर मुख्याध्यापक जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी अनिल निमगडे सर, क्रीडा मार्गदर्शक

भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर, सुभोध दादा महाबुधे, प्रा.राजु अवचट रेफरी रोहित लोहांडे तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा बखश ,अजय मुळे व सर्व शिक्षक वृंदाना दिले. त्यांचे यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Maharashtra news/महाराष्ट्र स्टेट लेवल कुडो कॉम्पिटिशन स्पर्धेत क्षणुश्री चेतन वाघमारेला सिल्वर मेडल

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे हिंगणघाट

खंडाळा (लोणावळा) येथे आयोजित महाराष्ट्रस्तरीय कुडो कॉम्पिटिशन मध्ये हिंगणघाट ची क्षणुश्री चेतन वाघमारे नी सिल्वर मेडल पटकावत हिंगणघाट शहराचे नाव रोशन केले आहे.

Polanews/मॉसाहेब राजमाता जिजाऊ चौक मित्र परिवार हिंगणघाट द्वारा भव्य तान्हा पोळा आयोजित

भारतीय विद्या भवन शाळेतील पाचव्या वर्गात शिकणारी क्षनुश्री वाघमारे ही सोळाव्या महाराष्ट्रस्तरीय कुडो स्पर्धेसाठी लोणावळा नजीकच्या खंडाळा येथे आली होती. 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट अशी ही महाराष्ट्र स्तरीय कुडो स्पर्धा लोणावळा नजीकच्या खंडाळा येथे सुरू होती.

यात क्षणुश्री वाघमारेनी सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. क्षणुश्री वाघमारे ने या संपूर्ण यशाचे श्रेय तिचे ट्रेनर शिक्षक प्रशांत लेदाडे सर यांना तसेच भारतीय विद्या भवन शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला दिले आहे.

Polanews/मॉसाहेब राजमाता जिजाऊ चौक मित्र परिवार हिंगणघाट द्वारा भव्य तान्हा पोळा आयोजित

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- तान्हा पोळयानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभागातील 200 बालगोपाल नंदीसह उपस्थित होते.Polanews

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे हिंगणघाट नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,डॉ.निर्मेश कोठारी,राजेश हिंगमिरे, राहुल मोटवानी,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र कुकसे,प्रभागातील नगरसेवक धनंजय बकाणे, वैशाली सुरकार,सुनिता तांबोळी,प्रतिभा भोयर, प्रविण उपासे,पप्पू अवस्थी,अनिल चाफले,अंबादास शेळके, दिनेश वर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात झेंडावंदन व मॉ जिजाऊंना माल्यार्पण करुन करण्यात आली.

chandrashekhar bawankule/धक्कादायक : पारधी समाजाच्या महिलांवर लाठीचार्ज!

तसेच लहान मुलांचा उत्साह वादविण्यासाठी वेशभुषा व नंदी सजावट याचे आयोजन करण्यात आले हॊते. मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना पुरस्कार, देण्यात आले लक्की ड्राॅ द्वारा 2 सायकल,व 1 नंदी देण्यात आला तसेच फळ फ्रुट, बिस्किटे, चिप्स चे वाटप करण्यात आले.

शिवपर्व अर्बन मल्टी निधी लिमीटेड हिंगणघाट व्दारा चित्रकला वही,पेन्सिल वाटप करण्यात आले.

जाहिरात

नंदीसजावट गटातील प्रथम बक्षिस स्वरुप उंडे तर वेशभुषा गटातील प्रथम ओम ठाकरे यांची निवड करण्यात आली.अमित गावंडे यांनी पाहुणे मंडळी, बालगोपाल व उपस्थित पालकवर्ग यांचे आभार मानले.

Polanews /या नंदी पोळ्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल जांभुळे,गोलू वरघणे, विक्की राऊत,सतिश तांबोळी,रुषी सुरकार,अंशुल बोभाटे, निखिल झोडे, निखिल देवघरे,आशिष दांडेकर,गोलू पावडे, सातपुते बंधू,ओम सुरकार,अमन सुरकार,सार्थक पावडे व समस्त नागरीक मंडळी यांनी अथक प्रयत्न केले.

chandrashekhar bawankule/धक्कादायक : पारधी समाजाच्या महिलांवर लाठीचार्ज!

0

 

इंदापूर, बाभुळगाव : पारधी समाजाचा मन हेलावून टाकणारा आक्रोश, गायरान जमीन हिसकवली जात आहे, झोपड्या पाडल्या जात आहेत.chandrashekhar bawankule

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी दलित विरोधी धोरण राबवत आहे. परिसरात 400 एकर गायरान आहे पण केवळ 14 एकर गायरान पारधी समाजाने धरले गेली 30 वर्ष झालं ते येते राहतात.

Jsw/जे एस डब्लू च्या आवारातील जनसुनावणी झटपट आटपली, पोटतिडकीने हरकती मांडणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप

आज सरकार जेसीबी पोलीस घेऊन त्यांना उद्धवस्त करण्यासाठी आली आहे. यावेळी महिलांना पुरुष पोलिसांनी मारहाण केली. पारधी समाजाच्या पुरुषांना अटक केली. हे धक्कादायक आहे आणि गंभीर आहे!

स्वतंत्र भारतात खरंच आम्हा आदिवासी दलितांचे स्वतंत्र कुठंय? कुठंय सामाजिक न्याय? लहान लेकरांचा आक्रोश, आया बहिणींचा आक्रोश, तरुणांचा आक्रोश या व्यवस्थेला दिसत नाही.deepakkedar

जाहिरात

आम्ही कायम चोऱ्या कराव्यात, जेलमध्ये राहावं, गुलाम राहावं आम्ही मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही का?

मी या पारधी समाजाला कॉलवर बोललो आहे. पोलीसांनी काही जणांना अटक सुद्धा केली आहे.

बावनकुळे यांना आवाहन आहे तात्काळ ही कार्यवाही थांबवा. 2020 पर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नावावर करून द्या.deepakkedar

घरं हिसकावून घेतले जात आहेत, आम्ही प्रत्येकाला घरं देऊ म्हणणारे घरं पाडायला निघालेत.

ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे. तात्काळ या पारधी समाजाला त्यांचा सामाजिक न्याय बहाल करा. त्यांचं गायरान कायम करा!deepakkedar

लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचं निलंबन करावे त्याच्यावर विनयभंगाची कार्यवाही करावी!

महसूल मंत्री होश में आओ!- दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष

 

Jsw/जे एस डब्लू च्या आवारातील जनसुनावणी झटपट आटपली, पोटतिडकीने हरकती मांडणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप

0

 

प्रदूषणाचे धोके मांडणाऱ्या नागरिकांचा माईक खेचल्याने संताप

अँकर……रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथील तिसऱ्या टप्प्यातील जे एस डब्लू प्रकल्प आणि धरमतर पोर्ट यांच्या विस्तारी करणासाठी पर्यावरण पूरक जनसुनावणी धरमतर जेट्टीनजीक आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जन सुनावणी पार पडली.

जाहिरात

पावणेतीन वाजता सुरू झालेल्या जन सुनावणीत जे एस डब्लू च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे उपक्रम रंगवण्यात , व प्रकल्प किती गोजिरवाणा हे सांगण्यात जन सुनावणीचा अर्धा वेळ खर्ची केला. तर उरलेल्या वेळात स्थानिक, भूमिपुत्र , शेतकरी पर्यावरण प्रेमी हे प्रदूषण , रोजगार, आरोग्य, शेती, खरबंदिस्ती व पर्यावरणाचे मुद्दे पोटतिडकीने मांडत असताना विरोधकांचे मुद्दे ऐकून न घेता जनसुनावणी लगबगीने आटोपती घेतल्याने जनतेतून संतापाची लाट उसळली, यातही कहर म्हणजे बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातून माईक खेचून घेतल्याने सुनावणी बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.

Farmernews/कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग

तर अनेकांनी ही सुनावणी बेकायदेशीर झाली असल्याचे सांगितले. प्रदूषणाने मृत्युदर वाढत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतोय? आजची जनसुनावणी नेमकी कशासाठी होती? केवळ फार्स व दिखाऊ गिरी का करण्यात आली,.

जनसूनावणीत हरकती मांडणाऱ्या नागरिकांचा आवाज का दाबण्यात आला, प्रदूषणाचे मुद्दे मांडले जात असताना गोंधळ का झाला? असे अनेक सवाल या जनसुनावणीच्या निमित्ताने अनुत्तरित राहिले आहेत.

Farmernews/कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग

0

 

(सातारा प्रतिनिधी हेमंत पाटील )

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित विशेष राष्ट्रीय कार्यक्रमात ‘समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या, कवठे ता. वाई या संस्थेला विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

Sataranews/नंदलापूर ते पाचवड सर्विस रोड ची चाळण महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम दुर्लक्ष

यावेळी संस्थेतील पदाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची आणि राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भूषण डेरे यांना व्यासपीठावर विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

जाहिरात

कार्यक्रमात केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यमंत्री भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्यासह विशेष संवाद साधण्याची संधी मिळाली.

स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथील आयोजित चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहकार्य व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व जिल्हा प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच वाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.

हेमंत पाटील
सूर्या मराठी न्यूज साठी सातारा

Sataranews/नंदलापूर ते पाचवड सर्विस रोड ची चाळण महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम दुर्लक्ष

0

 

सध्या कोल्हापूर नाका ते नंदलापूर फाटा ह्या दरम्यान सहापदरी पुलाचे काम चालू आहे

पर्यंत नंदलापूर ते पाचवड फाटा रस्त्यावर खडे च साम्राज्य झाले आहे हे खड्डे एवढे मोठे आहेत की रोज किमान पाच अपघात होत आहे

जाहिरात

घोगाव टाळगाव ह्या भागातील चाकरमानी ही रोज कराड मध्ये नोकरी साठी येत असतात रात्री येताना पाऊसाची परिस्थिती ही गंभीर असते ह्या वेळी ह्या खड्ड्यात किमान रोज 5 अपघात तरी होतात

महामार्ग प्राधिकरण ह्या खड्ड्यात मृत्यू व्हावेत ही वाट पाहत आहे का आता हा विषय ऐरणीवर आला आहे

हेमंत पाटील
राजधानी सातारा साठी कराड

Ajitpawar /शिवसेना ( उबाठा ) पक्षातर्फे अजित पवार (उपमुख्यमंत्री) यांना योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी ची मागणी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे उद्घघाटन सोहळ्याकरिता अजित पवार (उपमुख्यमंत्री) आले असता. त्यांना स्थानिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मध्ये नगरपरिषद हिंगणघाट द्वारा अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना, तथा नवीन पिण्याचे पाण्याची १२ टाकी, शहरात नळ पाईपलाईन बसविण्याचे कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे .

या मध्ये जवळपास १६७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.सन २०१६ ते २०२० पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. परंतु अजून पर्यंत ही दोन्ही कामे पूर्ण झाले नाही. भूमिगत गटार योजने करीता रुपये ८१ कोटी तरतूद करण्यात आली होती.

Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे तान्हा पोळ्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

तसेच अमृत योजनेअंतर्गत नवीन पिण्याच्या १२ टाक्या नवीन पाईपलाईन न जोडणी करिता तसेच फिल्टर प्लांट इत्यादी करीता शासनामार्फत ८१ कोटी मंजूर झाले. यातील एस.टी.पी प्लांट ची जागा चुकीची निवडल्यामुळे तो एस.टी.पी प्लांट पाण्याखाली आला आहे. तसेच शहरातील १९५०० घरांची भूमिगत गटार लाईन जोडणी ही पहिल्या टप्प्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती.

परंतु आतापर्यंत फक्त १२००० पूर्ण झाली आहे .उर्वरित निधीच्या अभावी जवळपास एकूण ७८०० जोडणी अजून बाकी आहे .असा अहवाल नगरपरिषद प्रशासन द्वारे आम्हाला दिला.

जाहिरात

परंतु या दोन्ही कामाकरता निधी किती वापरला गेला आणि सध्या स्थितीत किती शिल्लक आहे .याबद्दल कुठलाही लेखाजोखा स्पष्ट झाला नाही . इतक्या मोठ्या त्यामुळे या प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

Ajitpawar/संबंधित निवेदन शिवसेना ( उबाठा ) पक्षातर्फे उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे तालुकाप्रमुख मनीष देवडे यांच्या प्रमुख,उपतालुका प्रकाश अनसाने ,शंकर झाडे, शहर प्रमुख चंद्रकांत भुते, भास्कर ठवरे, नितीन वैद्य, सुनील आष्टीकर,अनंता गलांडे, गजानन काटवले, सतीश मसराम ,दिलीप वैद्य, भास्कर भिसे, निलेश भगत, विशाल माथनकर ,फिरोज पठाण,विलास चौधरी, शकील अहमद,हिरामण आवारी, श्रीकृष्ण रामगडे ,बलराज डेकाटे, विजय कोरडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे तान्हा पोळ्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:-आपल्या संस्कृतीतील, पारंपरिक सणांची लहान वयापासून ओळख मिळावी व बालकांच्या मनात शेती व शेतकऱ्यांविषयी आदरभाव निर्माण व्हावा या हेतूने ज्ञानदीप विद्या निकेतन, हिंगणघाट येथे प्रि-प्रायमरी विभागामध्ये  तान्हा पोळा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमासाठी शाळेचे प्रांगण रंगीबेरंगी फुलांनी, कागदी पताका व आकर्षक सजावटींनी सजवले गेले होते. लहानग्या मुलांनीही रंगीत पोशाख घालून उत्सवात सहभाग घेतला. बऱ्याच मुलांनी पारंपरिक शेतकरी वेशभूषा धारण केली होती.

Hingnghatnews /राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदा स्कूल सातेफळ चे 5 खेळाडूंची निवड

विद्यार्थ्यांनी छोट्या लाकडी नंदीबैलांना फुलांचे हार, रंगीत झुल, कागदी मुकुट आणि आकर्षक सजावट करून सजवले होते. तर काही मुलांनी खऱ्या बैलाची वेशभूषा धारण केली होती. सजावटीमुळे शाळेचे वातावरण सणावाराच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी सर्व मुलांचे स्वागत केले.

त्यानंतर लहानग्यांनी सजवलेल्या तान्ह्या बैलांची शाळेच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. उत्कृष्ट नंदीबैलाच्या सजावटीला पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, निरागस हसू आणि उत्साह पाहून उपस्थित शिक्षक भारावून गेले.

जाहिरात

या कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल यांनी बालकांना सोप्या भाषेत तान्हा पोळ्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, शेती ही आपल्या देशाची खरी ताकद आहे आणि बैल हे शेतकऱ्यांचे विश्वासू साथीदार आहेत. शेतकरी आपल्या बैलांची काळजी घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा व तान्हा पोळा हे सण साजरे केले जातात.

अखेरीस सर्व विद्यार्थ्यांना गोडधोड व फुगे देण्यात आले. मुलांच्या हातात फुगे व चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून संपूर्ण शाळा आनंदाने भरून गेली. शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा रशेश राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, प्राचार्य अभिनव जयस्वाल व शिक्षकांनी अशा उपक्रमांमुळे बालकांना भारतीय संस्कृतीची मोलाची शिकवण मिळते, असे मत व्यक्त केले. तसेच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Polanews/ज्ञानदीप विद्या निकेतन शाळेच्या प्रांगणात झालेला हा तान्हा पोळ्याचा कार्यक्रम केवळ मुलांच्या आनंदापुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या कष्टांचे व परंपरेचे महत्त्व पटवून देणारा ठरला.