Home Blog Page 228

खेळ मांडीयला महिला भगिणीसाठी कार्यक्रम संपन्न:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक,अध्यक्ष व माजी केद्रीयमंत्री अशा सर्व क्षेत्रात पदभुषविलेले पद्मभुषण श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घनसावंगी येथे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

यापैकी खेळ मांडीयला हा एक कार्यक्रम फक्त महिला बघिणीसाठीचं या कार्यक्रमाचा खरा उद्देश आमच्या महिला बघिणींच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद पाहुन सार्थक झालेले दिसले.

आमच्या महिला बघिणींना आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातुन थोडा आनंदाचे क्षण उपभोगता यावे यासाठी आपले कर्तव्यदक्क्ष माजी आरोग्य मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनिषाताई राजेश टोपे यांचे आपल्या समाजाप्रती सतत काहीना काही चालू असते.

नेहमीचं पुरुषमंडळीसाठी कार्यक्रम होत असतात. एखाद्या कार्यक्रम महिलासाठी व्हावा यामध्ये सर्व महिलांना सहभागी होता आले पाहिजे यासाठी त्यांनी महिला बघिणींसाठी मराठवाड्यात पहिल्यांदा एका आगळ्यावेगळ्या होम मिनिस्टर फेम अंतर्गत सुप्रसिद्ध आदेशजी बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयला हा कार्यक्रम आयोजित केला.महिला बघिणींच्या या दोन ते तीन तासात वेगवेगळ्या विभागातुन ,समाजातुन आलेल्या महिला मंडळींनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून जणु एका प्रकारे नविन विक्रमचं घडवला आहे.

या तीन तासात रोजचे दुःख विसरून माय माऊलींनी निखळ आनंद घेतला यातचं या झालेल्या कार्यक्रमाचे सार्थक झाले आहे.पहिले बक्षीस ,दुसरे बक्षीस,तीसरे बक्षीस व काही शेकडो प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.

पण यापेक्षाही काही महिला बघिणींनी आपले मत व्यक्त करतांना आम्ही बक्षीस मिळाली नाही म्हणुन बिलकुल नाराज नाही क्षणभर आनंद मिळाला हेचं खुप झाले.असे महिलासाठी कार्यक्रम नेहमीच आयोजित करण्यात यावे अशा भावनाही काही महिलांनी व्यक्त केल्या आहेत.असे कार्यक्रम घेतल्याबद्दल सौ.मनिषाताई टोपे व राजेशभैय्या टोपे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Gopinath munde गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला संघर्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे,भाजपाचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी व्यक्त केली भावना

0

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री,संघर्षयौद्धा,लोकनेते,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी व भारतीय जनता पार्टीसाठी जिवनभर केलेला सघर्ष.

आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारा असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त उदगार काढले आहे.लोकनेते स्व.मुंडे साहेबांची आज जालना तालुक्यातील सोनदेव येथे स्व.मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

त्याप्रसंगी ज्ञानेश्वर शेजुळ बोलत होते,यावेळी बोलताना श्री ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले की स्व.मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गोरगरिब,दिनदुबळे,वंचित,वाड्यावस्त्यांवर राहणार्‍या सर्वसामान्य जनतेसाठी व शेतकर्‍यांसाठी अहोरात्र केलेला.

संघर्ष महाराष्ट्रातील जनता कदापी विसरणार नाही.उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्व.मुंडे साहेबांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे राज्यात मुठेही जातीय दंगल अथवा मुंबईत बाँंबस्फोट झाले नाहीत.साहेबांच्या कार्यकाळात राज्यात शांतता प्रस्थापित झाली होती.यांची आठवण सुद्धा शेजुळ यांनी यावेळी करुन दिली.

सन २०१४ साली देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली केंद्रिय मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणुन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना संधी मिळाली.

परंतु स्व. मुंडे साहेबांचे अकाली निधन झाल्याने मुंडे साहेबांचे ग्रामविकासाचे स्वप्न अर्धवट राहील्याचे भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी शेवटी सांगीतले.

यावेळी,परमेश्वर सोळुंके,रामदास ढाकणे,गणेश शेजुळ,मधुकर सोळुंके,रामदास पालवे,ज्ञानदेव ढाकणे,बद्रिनाथ ढाकणे,विष्णु मुंढे,बद्रिनाथ ढाकणे,बालासाहेब ढाकणे,राजेंद्र ढाकणे,रमेश मुंढे,विलास मुंढे,श्री कारभारी आंधळे,भास्कर ढाकणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Gopinath munde

अकोला नवनिर्वाचित जि. प. सभापतींचा पदग्रहण सोहळा संपन्न

0

 

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या चार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सभापतींचा आज दि. १२/१२/२०२२ रोजी दुपारी १२:३० वाजता स्थानिक जिल्हा परिषद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांच्या अध्यक्षतेखाली पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या पदग्रहण सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष सौ संगीताताई अढावू, जि. प. उपाध्यक्ष सुनिल फाटकर, माजी जि. प. अध्यक्ष तथा जि. प. सदस्य सौ. पुष्पाताई इंगळे, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महिला जिल्हा महासचिव सौ. शोभाताई शेळके, जेष्ठ नेते मनोहरराव पंजवाणी, बळीरामजी चिकटे, अशोकराव शिरसाट, प्रतिभाताई अवचार, महानगर अध्यक्ष सौ वंदनाताई वासनिक, महिला जिल्हा महासचिव निलोफर शहा, माजी सभापती आकाश शिरसाट, राहुलजी अहिरे, महानगर अध्यक्ष कलिम खॉ. पठाण, किशोर जामणिक, नितेश किर्तक, संजय हिवराळे, अमोल शिरसाट, अमोल जामणिक, निताताई गवई, प्रमोदिनी कोल्हे, लिनाताई शेगोकार, राम गव्हाणकर, शंकरराव इंगळे, मोहन तायडे, रतन आडे, चरण इंगळे, देवराव राणे, सुनिल सरदार, राजेश वावकार, अजय शेगावकर, वसंतराव नागे, सुशील मोहोळ यांच्यासह सर्व जि. प. सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी व तालुकाध्यक्ष मंचावर उपस्थित होते. जिल्हा परिषदेवर ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपुर्ण बहुमतात आपण काबीज केली.

त्याच प्रमाणे जिल्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात घेण्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी कामला लागा असे आवाहन पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे यांनी केले. समाजकल्याण सभापती सौ. आम्रपालीताई खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शे मुक्तार, शिक्षण सभापती सौ. मायाताई नाईक, कृषी सभापती सौ योगीताताई रोकडे यांचा सत्कार या सोहळ्यात उपस्थित पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आला.

सत्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव खंडारे यांनी तर प्रास्ताविक मनपा गटनेते गजानन गवई यांनी केले व उपस्थितींचे आभार विकास सदांशिव यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातुन बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल यांच्याकडून वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

समुद्रपूर :- पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.श्री शरदचंद्रजी पवार sharad pawar साहेब यांचे वाढदिवसानिमित्य समुद्रपुर राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल समद्रपुरच्या संयुक्त विद्यमाने समुद्रपुर बाजार समितीमध्ये वृक्षारोपण आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सहकारमहर्षी जेष्ठ नेते अँड. सुधीरबाबू कोठारी यांचे हस्त पार पडला.

या प्रसंगी हिम्मतरावजी चतुर, रा.का.तालुका अध्यक्ष महेशभाऊ झोटिंग, समुद्रपुर नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. योगिताताई सचिनभाऊ तुळणकर,इंटुक महासचिव आफताबभाई खान ,ओ.बी.सी.सेल. वर्धा जिलाध्यक्ष हरीशभाऊ काळे,हिंगणघाट शहर अध्यक्ष विठ्ठलभाऊ गुळघाणे, समुद्रपुर बाजार समितीचे संचालक अशोकभाऊ वांदिले, गणेश भाऊ वैरागडे, समुद्रपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलालजी गांधी,सुधीरजी खडसे, अरुणजी बकाल, नगरसेवक प्रदीपभाऊ डगवार,राजुभाऊ कटारे,गुरुसिंगजी बावरा, निशांतभाऊ बोरकुटे, ताराबाई अडवे, शालिकभाऊ वैद्य, मोतीराम जिवतोडे, राहुलभाऊ लोहकरे, सुरेंद्रभाऊ टेंभुर्णे, ,अतुलभाऊ टेकाडे,सचिन तुळणकर, अतुलभाऊ चौधरी,पवनभाऊ मुडे, आनंदभाऊ शेंडे, रोशनभाऊ शेळके,अमितभाऊ लाजूरकर,सौरभभाऊ घुमे, कुणालभाऊ कोल्हे, शिवमभाऊ निखाडे, राहुलभाऊ चौधरी,महेश खडतकर,चेतन मून,अक्षय दोडके,आंगणवाडीच्या शिक्षिका आणि विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते

Sharad pawar

मा. शरदचंद्रजी पवार व अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम .

0

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- समाजसेवक प्रशांत मेश्राम मित्रपरिवार कडून मा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व अतुल वांदिले महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस याच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्टँड रोड येथे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन ,पाणी बॉटल, बॅग मिठाई वाटप करण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सुशील घोडे (वर्धा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष ) अमित मुळे (हिंगणघाट शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कोषाध्यक्ष ) लक्ष्मण रामटेके, अतुल रामटेके वृषभ सातकर, प्रशांत मेश्राम मित्रपरिवार उपस्थित होते .

झेडां वंदन करून महीला पञकार व जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे याचा हाताने नारळ फोडून भावी संरपंच अंकूश सावरकार ! यानी समोर प्रचार ची केली सूरूवात!

0

 

असदपूर शहापूर ग्रामपंचायत निवडनूक 18 /2022 परिवर्तन पॅनल सरपंच पदाकरिता सर्वसाधारण उमेदार अंकूश ञेबकराव सावकर याची निशानी नारळ !

असून त्यानी एक देशभत्ती आपल्या अंगाअंगात फूटून दाखवली एक मेव नागरिक जो सरपंच पदासाठी उमेंदवार उभे राहले तेही सर्वप्रथम त्यानी एक सिध्द करून दाखवले अंकूश सावकार सरपंच पदासाठी उमेदवार असून त्याची साखळी देवानंद रमेश भूस्कट संध्दा ताई बंडू काळे यानी सर्वप्रथम रंगारवासनी येथे तिरंगा झेंडा वदंन करून करून उषा पानसरे समाज सेविका याच्या हातानी पूजा व नारळ फोडून समोर प्रचारास सूवात केली.

अंकूश सावकर यानी विकासा ची कामे करी सर्व प्रथम वेल कम गेट असदपूर शहापूर घरकूल लाभ पाणी विज वेगवेगळी सूविधा उपलद्द करेल असी हामी दिली हे वन यूवा पिडी अंकूश सावकर तसेच संध्दा बंडू काळे देवानंद भूस्कट.

शहापूर ग्रामपंचायत निवडनूकीत सरपच पदासाठी उभे असून काही नागरिकाच्या विषेश मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले, आहे एक सर्वसाधारण असून त्यानी सर्वप्रथम गावातील समाज सेवीका महीला जिल्हा अध्यक्ष ,व पञकार उषा पानसरे याना भेट दिली.

उषा पानसरे

व त्याची मकाना समोर तिरंगा झेडा ध्वजारोह दर वर्षी नियमाने तिरंगा फडकवण्यात येते तिथे त्याची पूर्ण टिम नी झेडा वदंन करून पूजा केली त्याचा हस्ते नारळ फोडून समोर सूरूवात केली त्या किठानी उपस्थिती समाज सेवीका व पञकार उषा पानसरे रत्याबाई काळे , शालू दिपक काळे , देवानंन भूस्कट , शालू सूनिल ठाकरे आशा अरून चिमोटे उज्जला रवी काळे छिया अशोक काळे कोकीळा बाई मानिक काळे सूसीला काशिनाथ कोसरे निना कोसरे प्रगती कोसरे लता काळे आतिष काळे सितल डवरे सूरेकांत्ता डवरे रमा ताई भूयार दिपा राजिव भूयार सिमा बारबूध्दे गजानन चिमोटे किर्तीक काळे बाला काळे अशोक बडवाईक गिता बाई उमक निता देवानंद भूस्कट कात्तांबाई भूस्कट अनिल साबळे अनिता साबळे पाढूरंग गिरी राजिव भूयार गणेश सगणे दिपक सूनिता डवरे सिमा सोनोनो ममता काळे प्रविन काळे व ईतर अनेक जन उपस्थित विकासाची कामे करिल व सर्व प्रथम पानसरे पञकार यानी एकच मागणी केली आहे असदपूर शहापूर मधे दोन ग्रामपंचायत असून लोक संख्या बारा हजार नंवद असून ईथे आजवर वेल कम गेट बनवले नाही किती शर्मनाक बाब आहे.

तरी शहापूर मधे त्यानी वेलकम गेट बनवण्या यावा भावी सरपंच अंकूश सावकर संध्दा काळे देवानंद भूस्कट यानी आश्वासन दिले आशा आहे आजवर गावाचा विकास कूठल्या प्रकारे झाले नसून ते पूर्ण करती ! हामी दिली

बेजबाबदार लोकसेवक चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांना बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल कारवाई करावी -वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

0

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

शेगाव -वंचित बहुजन युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, तसेच महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीच्या आजी-माजी जील्हातील वंचित बहुजन आघाडी, तसेच युवा आघाडी,महिला आघाडी,तालुका व शहर च्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव चंद्रकांत पाटलावर फटकेबाजी करत शेगाव तहसिल समोर आंदोलन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील तसेच भाजप नेत्यांनी केलेले वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील. शाहू,फुले,आंबेडकर या महापुरुषांवर बेताल वक्तव्य करून सातत्याने त्यांना अपमानित करणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून चालूच आहे.

महामानवांवर गरड ओकणाऱ्या भाजप नेत्यांची चौकशी करून तसेच चंद्रकांत पाटलाची सखोल चौकशी करून त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा.

अशे सदर मागणीचे निवेदन शेगाव तहसीलदार डॉ.सागर भागवत यांना निवेदन देण्यात आले.

सुधारित नियम २०१६ कलम ३(१) व्ही.कलम ३(१) पी. ३(१) क्यु. नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहीर फेक करून निषेध नोंदवणारे भीमसैनिक मनोज भास्कर गरबडे
धनंजय भाऊसाहेब इजगत
विजय धर्मा ओहोळ या समता सैनिक दल तथा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या रीतीने दाखल झालेली गुन्हे ३०७.३९३.२९४.५ ००. ५०१ १२० (ब ) 34 क्रिमिनल लॉ अमेंडमेंड ॲक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)/१३५ अन्वये गंभीर स्वरूपाची कलमे लावली आहेत.

ही कलमे निषेधार्थ आहेत.ही त्वरित गुन्हे मागे घेण्यात यावे. अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.

वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, शहराध्यक्ष संदेश शेगोकार, दीपक इंगळे, महिला आघाडी शेगाव तालुका अध्यक्ष सुनीता अंकुश एखारे, शहर अध्यक्ष संगीता सिद्धार्थ ससाने, शाखा अध्यक्ष कालखेड सुभाष तायडे,संदीप खंडेराव, संतोष तायडे, अर्जुन शेगोकार, दीपक विरघट,गौतम इंगळे वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते शेगाव तहसील कार्यालयावर हजर होते.

पी.व्ही टेक्सटाइलच्या स्थापना दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- स्थानिक रोटरी क्लब आणि पी.व्ही.टेक्सटाईल जाम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पी.व्ही. टेक्सटाइल कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कंपनीचे महाव्यवस्थापक श्री.भूपेंद्रजी शहाणे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

रोटरीच्या कार्याची माहिती देताना रोटरीचे अध्यक्ष पराग कोचर यांनी एक हजार युनिट रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला.142 रक्तदात्यांनी रक्तदान करून इतिहास रचला.

शाकीर खान पठाण, रोटरी क्लबचे सचिव डॉ.सतीश डांगरे, प्रा. अशोक बोंगीरवार, प्रा. राजेंद्र निखाडे, प्रा. माया मिहानी, पंकज देशपांडे, पुंडलिक बकाणे, प्रणय डागा, चेतन पारेख, संजय चांभारे यांनी सहकार्य केले.

रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट:- आजच्या युगात बदलत्या जीवन शैलीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते.

याच उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यात आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबीर, बाल आरोग्य शिबीर (लहान मुलांची तपासणी), नेत्र/डोळे तपासणी शिबिर, रक्त तपासणी शिबीर, HIV तपासणी, CBC तपासणी, मानसिक समुपदेशन, सिकलसेल तपासणी, बिपी, शुगर तपासणी, थायराईड तपासणी अशा अनेक शिबीराला १००० हून अधिक रुग्णांनी या तपासणी शिबिरात सहभाग घेतला होता.

तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून काही पदाधिकाऱ्याकडून शेकडो रुग्णांना भिंत घड्याळ (वॉच) वाटप करण्यात आले .प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले, दीप प्रज्वलित करत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरात बाळरोग विशेषज्ञ डॉ अभिजित बोरकर, नेत्ररोग तज्ञ डॉ स्नेहल चौधरी MS, जीवन ज्योती ब्लड बँक चे डॉ प्रशांत सर, डॉ सतीश नक्षीने तसेच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील संपूर्ण डॉक्टरची चमू इत्यादी डॉक्टरानी रुग्णांची यशस्वीरित्या तपासणी केली. प्रस्तुत शिबीराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपूर्ण सेल च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

अकोल्यात अतिक्रम हटवा मोहीम

0

प्रतिनिधी अकोला अशोक भाकरे

काही दिवसापूर्वी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे

शनिवारी सकाळी मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहिमेद्वारे दरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व्यावसायिक यांच्या झटापट झाली.

मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता मात्र नंतर ही परिस्थिती निवळली शहरातील मुख्य मार्गावर व मुख्य मार्गावर रस्त्यालगत अनेक ठिकाणी दुकाने थाटाण्यात येतात रस्त्यावरच हातगाड्यावर विविध साहित्याची विक्री होते परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते.

त्यामुळे काही दिवसापासून मनपाने अतिक्रमण हटवा मोहीम तीव्र केली आहे दरम्यान दहा डिसेंबर रोजी सकाळी मनपा ने गांधी रोड पासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला प्रारंभ केला आहे ही मोहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल गांधी चौक गांधी रोड महाराणा प्रताप चौक व सिटी कोतवाली या मार्गाने राबविण्यात येत आहे