Home Blog Page 229

पी.व्ही टेक्सटाइलच्या स्थापना दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- स्थानिक रोटरी क्लब आणि पी.व्ही.टेक्सटाईल जाम यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पी.व्ही. टेक्सटाइल कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कंपनीचे महाव्यवस्थापक श्री.भूपेंद्रजी शहाणे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

रोटरीच्या कार्याची माहिती देताना रोटरीचे अध्यक्ष पराग कोचर यांनी एक हजार युनिट रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला.142 रक्तदात्यांनी रक्तदान करून इतिहास रचला.

शाकीर खान पठाण, रोटरी क्लबचे सचिव डॉ.सतीश डांगरे, प्रा. अशोक बोंगीरवार, प्रा. राजेंद्र निखाडे, प्रा. माया मिहानी, पंकज देशपांडे, पुंडलिक बकाणे, प्रणय डागा, चेतन पारेख, संजय चांभारे यांनी सहकार्य केले.

रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट:- आजच्या युगात बदलत्या जीवन शैलीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते.

याच उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यात आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबीर, बाल आरोग्य शिबीर (लहान मुलांची तपासणी), नेत्र/डोळे तपासणी शिबिर, रक्त तपासणी शिबीर, HIV तपासणी, CBC तपासणी, मानसिक समुपदेशन, सिकलसेल तपासणी, बिपी, शुगर तपासणी, थायराईड तपासणी अशा अनेक शिबीराला १००० हून अधिक रुग्णांनी या तपासणी शिबिरात सहभाग घेतला होता.

तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून काही पदाधिकाऱ्याकडून शेकडो रुग्णांना भिंत घड्याळ (वॉच) वाटप करण्यात आले .प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले, दीप प्रज्वलित करत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरात बाळरोग विशेषज्ञ डॉ अभिजित बोरकर, नेत्ररोग तज्ञ डॉ स्नेहल चौधरी MS, जीवन ज्योती ब्लड बँक चे डॉ प्रशांत सर, डॉ सतीश नक्षीने तसेच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील संपूर्ण डॉक्टरची चमू इत्यादी डॉक्टरानी रुग्णांची यशस्वीरित्या तपासणी केली. प्रस्तुत शिबीराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपूर्ण सेल च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

अकोल्यात अतिक्रम हटवा मोहीम

0

प्रतिनिधी अकोला अशोक भाकरे

काही दिवसापूर्वी महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे

शनिवारी सकाळी मार्ग असलेल्या गांधी रोडवरील अतिक्रमण मोहिमेद्वारे दरम्यान मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक व्यावसायिक यांच्या झटापट झाली.

मनपाच्या पथकाने रस्त्यावरील साहित्य जप्त केले व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता मात्र नंतर ही परिस्थिती निवळली शहरातील मुख्य मार्गावर व मुख्य मार्गावर रस्त्यालगत अनेक ठिकाणी दुकाने थाटाण्यात येतात रस्त्यावरच हातगाड्यावर विविध साहित्याची विक्री होते परिणामी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते.

त्यामुळे काही दिवसापासून मनपाने अतिक्रमण हटवा मोहीम तीव्र केली आहे दरम्यान दहा डिसेंबर रोजी सकाळी मनपा ने गांधी रोड पासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला प्रारंभ केला आहे ही मोहीम मनपासमोरची वाणिज्यिक संकुल गांधी चौक गांधी रोड महाराणा प्रताप चौक व सिटी कोतवाली या मार्गाने राबविण्यात येत आहे

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यान परिसर स्वच्छ करण्याची निवेदनाव्दारे मागणी

0

गुड्डू कुरेशी सिंदी रेल्वे

किशोर वरघने यांचे नेतृत्व

सिंदी रेल्वे ता.९ : शहरातील वार्ड क्रमांक १२ मधील पालीकेच्या जागेवर दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत लोकशाहीर अन्नाभाऊ साठे उद्यानाची निर्मीती करण्यात आली.

मात्र या उद्यानाच्या स्वच्छतेकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने परिसरात घानीचे साम्राज्य पसरले असुन नवनिर्मीत उद्यांनाचे विद्रुपीकरन झाले आहे. यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर वरघने यांचे नेतृत्वात परिसरातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सोमवारी (ता.५)पालिकेचे मुख्याधिकारी सतिश शेवदा यांना देऊन ताबडतोब या परीसराची साफसफाई करुन स्वच्छता करण्यात यावी.

सोबतच सरकारी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या वास्तूची देखभाल करने पालिकेचे काम असुन याकडे नियमित लक्ष देऊन कर्तव्य करावे अशी मागणी करण्यात आली.

दिलेल्या निवेदनावर परिसरातील महेंद्र मडलीक, विशाल खंडाळे, मारोती शंभरकर, संदीप आगलावे, दामोधर फुलकर, देविदास वरजे, किशोर ब्राम्हने, सुरेखा साखरकर, रुपाली डोफे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे मोरगाव भाकरे येथील व सर्व ग्रामीण भागात गोवंश प्रमाण वाढलेला आहे तरी सर्व गावकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना.धोंडी सुद्धा दिली आहे

0

 

AKola प्रतिनिधी अशोक भाकरे

सदरचे काळात पो.स्टे. उरळ बाखराबाद येथील शरद ढवळे यांच्या मालकीची जोडी दि 8/12 अंदाजे रात्री एक ते दिळ वाजता गेली आहे सदर

हद्दीतील गावांमध्ये रात्रीच्या वेळी चोरी , घरफोडी,तसेच जानवर चोरीच्या घटना घडत असून चोरी करताना चोर हे चोरी करण्याच्या घराचे आजूबाजूचे घराला बाहेरून कडी कोंडे लावून घेतात.

व सदरच्या चोऱ्या या गावाबाहेरील विरळ वस्ती असणाऱ्या घरावर होत आहेत. व चोरी करणारे इसम यांनी गावात प्रवेश केल्यानंतर गावातील कुत्रे न भूकण्याची बाब देखील निदर्शनास आली आहे.

तरी आपण सदर चोरीच्या प्रकारावर आळा बसावा याकरिता आपण रात्री 11/00 वा.चे नंतर.गावातील पोलीस मित्र व युवामुले यांच्यासोबत टीम तयार करून गटा गटाने रात्रगस्त करावी. गावातील नागरिकांना आत्ताच होईल त्या पद्धतीने सतर्क करावे व विशेषता गावाबाहेरील विरळ वस्ती असलेल्या लोकांनी सुद्धा गटागटाणे आपल्या भागात सतर्क राहून पेट्रोलिंग करावी.

जेणेकरून पोस्ट हद्दीतील चोरीच्या प्रकाराला आळा बसेल या दृष्टीने आपले गाव पातळीवर होईल त्या उपाययोजना राबविण्यात याव्या. कोणीही संशयित इसम आढळून आल्यास त्याला विचारपूस करून शहानिशा करावी. काही संशयित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पो.स्टे.उरल कीवा आपले बीट जमादार, अमलदार किंवा पोलीस पाटील यांना संपर्क साधावा.

हा मेसेज प्रत्येक गावातील ग्रुप मधे पाठवून गावातील कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळावे पोहेका शिवानंद मुळे बीट जमादार हतरून पो. स्टे. उरळ

गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई जिल्यातील चोरीच्या मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- दि.05 डिसेंबर रात्री 8 वा. सुमारास फिर्यादी हा झाशी राणी चौक, हिंगणघाट येथुन पायदळ फोनवर बोलत जात असतांना दोन अज्ञात मोटरसायकल वरील इसम फिर्यादीचे मागुन येवुन त्याचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन घेवुन गेल्याचे फिर्यादीचे पो स्टे ला दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून अपराध क्र. 1280/2022 कलम 392, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला .

हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे। पथक प्रमुख पो.हवा, शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व मोबाईलबाबत शोध घेतला असता सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहणारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षीत बालक दोन्ही रा. निशानपुरा वार्ड, हिंगणघाट यांनी हिसकावुन नेल्याची माहिती वरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली.

असता त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यांचे कडुन एक विवो कंपनीचा अन्ड्राईड मोबाईल व गुन्हा करण्या करीता वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्र. एमएच-34/ क्यु- 4358 असा आरोपी व वि.सं.बा. यांचे ताब्यातून जप्त करून आरोपी गौरव वाघमारे यास अटक केली.

सदर गुन्हयातील आरोपी गौरव वाघमारे याची पोलीस कोठडी घेतली असता, त्यास जबरी चोरी करीता वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने ते वाहन पो.स्टे. गिरड हद्दीतील कोरा गावातून चोरल्याची कबुली दिली तसेच त्याने त्याचे दोन विधी संघर्षीत बालकासह जिल्यातील व बाहेर जिल्यातील विविध प्रकारच्या 7 मोटसायकल व 2 मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. आरोपी गौरव वाघमारे याचेकडुन 7 मोटरसायकल, सदर गुन्यात जबरीने चोरलेला एक मोबाईल व इतर दोन चोरलेले मोबाईल असा एकूण किमंत 1,93,000 / रु. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि सोमनाथ टापरे डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर व पो.शि. संतोष गिते व सायबर पोस्टे चे नापोशि दिनेश बोथकर यानी केली आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा !!

0

 

Jalna(तुकाराम राठोड)

जालना-भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवेsantosh Danve यांच्या वाढदिवसानिमित्त जालना हॉस्पिटल येथे मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जालना हॉस्पिटल येथे करण्यात येत आहे.तरी आपणास विनंती की आपण या उद्घाटनास आवर्जून उपस्थित रहावे.

भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील बंधू आणि माता-भगिनींसाठी दिनांक १० ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या मोफत शिबिराचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा.

आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी,असे आपणास आवाहन!आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना नगरपालिकेवर धडक मोर्चा:

0

 

Latur (तुकाराम राठोड)

जालना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना नगरपालिकेवर आज विविध प्रश्न संदर्भात मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवी भैया राऊत,शहराध्यक्ष राजू जगताप,शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे,महिला शहराध्यक्ष वंदनाताई खांडेभराड,माजी नगरसेवक रोहित बनवसकर,कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन कणसे,मनसे जिल्हा सचिव विलास तिकडे,कामगार सेनेचे सचिव राम पाटोळे,विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश नागवे,बाळू काळे,सोमनाथ कदम,विनायक जाधव,पवन फते,लष्करी अमर लहाने,अधिक पदाधिकारी उपस्थिती होते.

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३मध्ये होईल १५ डिसेंबर पर्यंत सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करावे यावल तालुका पंचायत समितीचे आव्हाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शिष्यवृत्ती परीक्षा या येत्या वर्षातील फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२२हे असून सर्व मुख्याध्यापक यांनी आपले.

शाळेतील पाचवी व आठवीचे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाण मध्ये परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातीत जिल्हा परिषद शाळेमधील पाचवी आणि आठवीचे वर्गाची संपुर्ण विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषद शेष फंडातून भरणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडुन मिळाली.

आहे. यावल तालुक्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये पालकांशी संपर्क साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेत समाविष्ठ करावे,

राज्यात मागील दोन वर्षांमध्ये या परिक्षेत कोरोना संसर्गाचे गोंधळलेले काळ असल्यामुळे जास्त प्रमाणात विद्यार्थी बसू शकलेले नाही मात्र

यावर्षी शिक्षण विभागाच्या माध्यमातुन यंदा जून पासून अभ्यासक्रम आपण सातत्याने राबत असून निपुण चाचणीचे नियमित आपण मूल्यमापन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे.

या वेळी शैक्षणीक गुणवत्ता साध्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त परीक्षेत आपण बसवावे जेणेकरून यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा पुर्वची तयारी विद्यार्थ्यांची होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये न्यू दंड निर्माण होण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

यासाठी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या परीक्षेत सहभाग घ्यावे यासाठी गटशिक्षण अधिकारी या साठी मोठे परिश्रम घेत आहे . विद्यार्थ्यांनी मोठया संख्येत परिक्षेत बसावे असे आवाहान यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन

0

 

अमरावती:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे मित्र परिवारातर्फे अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी वटफळी येथून भंतेजी सुमित बोधी महाथेरो व भन्तेजी प्रज्ञा बोधि महाथेरो आणि भिकू संघाच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश सर्वप्रथम बुद्ध टेकडी 500 क्वार्टर या ठिकाणी आले.

व त्या ठिकाणी हजारो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले तेथून ही असती कलश वडाळी येथील जनतेच्या दर्शनासाठी प्रत्येक विहारात घेण्यात आले व दुपारी एक वाजता ही असती कलश बडनेर येथील समता चौक या ठिकाणी देण्यात आले या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन पुण्यानुमोदन केले.

बडनेर येथे मनोज भाऊ गजबे उमेश भाऊ मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सायंकाळी सहा वाजता अस्थि कलश भीम टेकडी या ठिकाणी आले व या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी दर्शन घेतले व सायंकाळी साडेसात वाजता हे अस्थि कलश वटफळी या ठिकाणी रवाना झाले.

या अभिवादन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बुद्ध टेकडी मित्र मंडळ वडाळी येथील संपूर्ण नागरिक बडनेरा येथील संपूर्ण नागरिक व प्रभाग क्रमांक 27 संजय गांधी नगर उत्तम नगर पंचशील नगर कैलास नगर बेनोडा महादेव खोरी शांतीनगर जेवण नगर येथील हजारो नागरिकांनी रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी आणण्यासाठी मदत केली.