Home Blog Page 231

सुरेश गायकवाड मित्रपरिवार तर्फे ज्ञानरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 डिसेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संध्या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश गायकवाड मित्र परिवार व सौजन्य आदर्श महिला नागरी पतसंस्था हिंगणघाट कडून करण्यात आले

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका मा. बबिताताई वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
” नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा” या स्वर संगीतातून अभिवादनाला सुरुवात झाली आपल्या मधुर स्वरातून व प्रबोधनातून संपूर्ण जनतेच्या उपस्थितीमध्ये अभिवादन संध्या च्या माध्यमातुन शब्दसुमनाने आदरांजली वाहली सादर करते साई स्वरयज्ञ संगीत कला वृंद हिंगणघाट, व सोबत मी होणार सुपरस्टार स्टार प्रवाह.

फेम गायक मा.राहुल मोरे, व साई स्वरयज्ञ संगीत कला वृंद, हिंगणघाट .
संचालन :- महेश मुडे
गायक महेश चौधरी,
योगिनी वांधरे,तबला – ढोलक वादक:- अभय जी झाडे अक्टो पॅड वादक:- अतुल तांदूलकर
कीबोर्ड वादक:- आदित्य खंदारे
साउंड सिस्टीम:- जितू भगत यांनी केले.

या अभिवादन संध्येला यशस्वीरित्या नियोजन सुरेश गायकवाड ,शुभम कोंडागुरले, रसपालजी शेंद्रे, अमित सोगे, निकु रामटेके, वीरेंद्र दुर्गे,अविनाश झाडे,अरुण कांबळे, निखिल उंमरे, मनीश सुनानी, रजत मून, ईशान खंदार, सौरभ पाझारे, प्रवीण जनबंधू, मित्रपरिवार यांनी केले

महसुली बाबांची अवैध रेतीमा बेधडक वाहन जप्त. अंदाजे वीस लाखाचा मुद्देमाल जप्त

0

 

  • प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापुर महसूल विभागांची अवैधर येथे उपवासा करून जाणारा वाहनावर या आठवड्यात एक के बाद एक कारवाई करण्यात येत असून दिनांक 6 डिसेंबर रोजी बेधडक कारवाई बाळापुर परिसरात करण्यात आली बाळापुर महसूल विभागांचे तहसीलदार सय्यद अहिंसा मोदी यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली.

की कागद येथून काही वाहन अवैध रेती उपसा करून वाहन मध्ये नेत असतात त्या माहितीनुसार ही तहसीलदार आपला वाफला घेऊन कागद येथे गेले असते तिथून काही वाहन फरार झाले तर एक वाणचा पाठ लाख करून गायगाव जवळ वाहन क्रमांक एम एस 28 बीपी 99 91 या वाहनाला पकडून कूच तास केली असता.

त्यांच्याजवळ बुलढाणा येथून तर रेती उपसा अंगात लोहारा या परिसरातून होत आहे त्यामुळे हे अवैध्य रितीचा वाहन जप्त करण्यात आला आहे कारवाई करून सदर हा वाहन महसूल विभागाने यांच्या ताब्यात सहज जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आले.

आहे ही कारवाई बाळापुर महसूल विभागांची तहसीलदार सय्यदिन यांच्या मार्गदर्शनाखाली विजय तेलगोटे मंडळ अधिकारी दीपक सोळंके मंडळ अधिकारी बोले मंडळ अधिकारी संतोष और निंबाळकर मंडळ अधिकारी गजानन भागवत यांनी केली हा या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफिया मध्यवर्तीचे वातावरण पसरले आहे

शालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत वीरा वॉरियर्स ग्रुप ला भरभरून यश

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

वर्धा :- जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा आणि तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन जिल्हा वर्धा यांच्या सयुक्त विद्यमाने 5,6 डिसेंबरला शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

त्या मध्ये जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये विरा वॉरियर्स ग्रुप हिंगणघाट ने घवघवीत यश प्राप्त केले त्या मधे 14 वर्षा खालील मुले या वयोगटात मानव मुकेश वानखेडे, आरुष विलास मनहोरे तर 14 वर्षा खालील मुली या वयोगटात प्राची राजेश मसराम, स्वरांगी गणेश घाटूर्ले तर 17 वर्षा खालील मुले या वयोगटात प्रज्वल महादेव देवतळे, साहील चंद्रशेखर तेलहांडे, 17 वर्षा खालील मुली या वयोगटा मधे विशाखा रामदास कंडे, श्रुती रविपाल खैरे, अदिती सुभाष गायकवाड आणि 19 वर्षा खालील मुले या वयोगटात संकेत मिलिंद नगराळे ,19 वर्षा खालील मुली या वयोगटात तेजल प्रमोद भोयर, छकुली रामकृष्ण पिसे, अनुष्का गणेश बलखंडे यांनी विजय प्राप्त केला. सर्वांनी प्रथम क्रमांक मिळऊन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे व यांची विभागीय स्तरावर निवड झाली.

व सर्व खेळाडू होणाऱ्या विभागीय तायक्वांडो स्पर्धेत वर्धा जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे। मुख्य पंच म्हणून मा. श्री श्याम खेमसकर सर( जिल्हा सचिव -तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन वर्धा) यांनी कार्यभार सभाळला.

मोलाचे मार्गदर्शन मुख्य प्रशिक्षक- रोहित राऊत सर यानी केले, प्रशिक्षक, गौरव खिराळे, भूषण वाठोरे, चेतन दहिवलकर, विशाल मडावी, हर्ष मून, कशिश खैरे, वैष्णवी पिसे, लक्ष्मी धनफोले, सदस्य. रोहित खैरकर, यश झाडे, मयूर नगराळे व गौरी पेटकर, यांनी अभिनंदन केले.

तसेच खेळाडूंनी यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन

0

 

शेगाव प्रतिनिधी  इस्माईल शेख 

वंचित बहुजन आघाडी तालुका शेगावच्या वतीने भारतरत्न विश्वभूषण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव तालुक्याच्या वतीने विश्रामगृह शेगाव येथे महा अभिवादन सभा घेण्यात आली.

यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य मधुकर बाबुळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण आणि महापरिनिर्वाण या विषयावर त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यामध्ये तिंत्रव येथील सरपंच माननीय विनायकरावजीं हिंगणे, मोहनराव विश्वासराव कराळे तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ निळे ,गजानन सोळंके ग्राम शाखा अध्यक्ष महागाव ,शिवाजी गुरव तालुका महासचिव, यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शब्दरूपी अभिवादन केले.

तर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण पहुरकर, शंकरराव पहुरकर जिल्हा उपाध्यक्ष, यांचे सुद्धा अभिवादन सभेवर शब्द रुपी अभिवादन केले तर कैलास भाऊ दाभाडे ,आशिष भाऊ शेगोकार ,गौतम इंगळे यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले.

संदेश कुमार शेगोकार व जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे यांनी अभिवादन सभेला मार्गदर्शन केले, अभिवादन सभेला प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, सुनीता ताई इखारे तालुका अध्यक्ष महिला आघाडी, शहराध्यक्ष संगीता ससाने, जिल्हा सदस्य वनमाला ताई इखारे, आशाताई सावदेकर, तालुका प्रसिद्ध प्रमुख पंडितराव पर्घरमोर,शेख नसीर शेख गफ्फर ,अर्जुन शेगोकार, धम्मपाल बाबुळकर, युवा नेतृत्व संजय भाऊ वाकोडे, संतोष राव हिवराळे तालुका उपाध्यक्ष, राहुल अनिल मोरे, चित्रपट सेनेचे निखिल पहुरकर, उदयनराजे सुरवाडे, युवा नेते क्षितिज कुमार निर्वाण ,युवा शहर सल्लागार अशोक भाऊ तायडे ,संतोष भाऊ तायडे, प्राची धम्मपाल बाबुळकर या मुलीने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

आकाश दादा चोपडे ग्राम शाखा अध्यक्ष चिंचखेड, सागर शिरसाठ ग्रामशाखाध्यक्ष गव्हाण, येउलखेडचे सरपंच प्रकाश गवई, भास्करराव शिरसाट ,कपिल भाऊ शिरसाठ, तर भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस आदरणीय बोधिसत्व गवई तसेच राजकिरण सावदेकर यांच्यासह कार्यकर्ते हजर होते तर अभिवादन सभेचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहर युवा नेते माननीय दीपक भाऊ इंगळे यांनी केले.

संदीप शामगिर याचे यश

0

(तुकाराम राठोड)

जालना-तालुक्यातील मौजपुरी येथील लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी संदिप नारायण शामगिर याने शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ५१ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असुन,त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

या यशा बद्दल त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.रमणताई बनकर,मुख्याध्यापक जयराम डुचे,अमोल बनकर,सरपंच भागवत राऊत,उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे,ग्रा.प.सदस्य बंद्रीभाऊ भसांडे,सतिश ढोकळे,नारायण गायकवाड,बंडुभाऊ काळे,संतोष मोरे,राम जाधव,विष्णूपंत डोंगरे,माजी सरपंच निवृत्ती गायकवाड,दिपक डोंगरे,राजु महाडिक,सोनाभाऊ खडेकर,बालाजी बळप,बबन शामगिर,पै.अनिल काळे,पै.अर्जुन काळे,रामदास गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कालखेड ची कन्या बनली PSI

0

 

शेगाव प्रतिनीधी अर्जुन कराळे

शेगाव तालुक्यातील कालखेड येथील गणेश चोखंडे यांची मुलगी कु,पूजा हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI ( पोलीस उपनिरीक्षक) बनली आहे. त्यामुळे कालखेड गावात आनंदाची लाट पसरलेली आहे.

कालखेड येथील पुजा गणेश चोखंडे ह्या विद्यार्थिनीने महाराष्ट लोकसेवा आयोगाची psi पदासाठी परिक्षा दीली होती. या परिक्षेत पुजाने यश संपादन केले असुन ती पोलीस उपनिरीक्षक बनली आहे.

कु. पुजाचे वडील जळगाव जा. तालुक्यातील मडाखेड येथे प्राथमीक आरोग्य केद्रांत शिपाई पदावर कार्यरत आहेत. ग्रामीन भागातील तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पूजा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडीलाना आणि गुरूंना देत आहे।
ग्रामीन भागातील युवक-युवतींनी पुजाचा आदर्श व प्रेरना घेऊन शैक्षणीक वाटचाल केल्यास यश निश्चीतचं दूर नाही. एवढे मात्र नक्की.

सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिल्यामुळे एका 20 वर्षीय मुलीने केली आत्महत्या !

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट : भेटायला न आल्यास सोशल मीडिया वरून बदनामी करू अशी धमकी दिल्याने एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदर तरुणी शहरातील महात्मा फुले वॉर्ड येथील रहिवासी असून नुकताच दि.२६ नोव्हेंबर रोजी तिचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला.

सदर घटना उघडकीस आल्यानंतर मृतक मुलीचा भाऊ रितिक किरण करोसिया मु. महात्मा फुले वार्ड ,स्वीपर कॉलनी याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली असून आरोपी आदित्य गजराज महतो रा. रामनगर पांढराबोडी नागपूर, सनी गायकवाड रामबाग झाटूरली, नागपुर यांचे विरोधात पोलीसांनी भादंवी च्या कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेतील आरोपी तसेच मृत तरुणीची ओळख असल्याने आरोपी नागपूरवरून तीला हिंगणघाट येथे भेटण्याकरिता यायचे.

घटनेपुर्वी आरोपी यांनी सदर तरुणीला भेटण्यास बोलविले होते, भेटावयास आली नाही तर व्हाट्सअप , फेसबुकच्या माध्यमातून तुझी बदनामी करू अशी धमकी आरोपींनी तीला दिली. बदनामीचे भीतीने तरुणीने उंदीर मारण्याचे औषध घेत आत्म हत्या केली होती.
यावेळी तरुणीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे नागपूर येथे वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते.

या तरुणीचा दि. २६ नोव्हेंबर रोजी तिचा दुदैवी मृत्यू झाला.
घटनेतील आरोपी आदित्य महतो व सनी गायकवाड यास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला करीत आहे.

प्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण

0

 

गोंदिया:- एन.एम.डी महाविद्यालयतील समाजशास्त्र विभाग प्रमुख,रातुम नागपुर विद्यापिठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व साहित्यिक प्रा.डाॅ.बबन मेश्राम लिखित जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन या पुस्तकाचा लोकार्पण संविधान दिनी २६ नोव्हेंबर ला

उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या दक्षिणेला व अयोध्येच्या उत्तरेस राप्ती ( अचिरावती ) नदीकाठी बसलेल्या बौद्धांच्या पाली वाङ्‌मयात सावित्थी असा श्रावस्तीचा उल्लेख असलेल्या, जैन वाङ्मयात त्यास चंद्रपूर वा चंद्रिकापुरी संबोधले जाते,तर विष्णुपुराण व हरिवंशपुराण यांच्या मतानुसार युवनाश्व राजाचा मुलगा श्रावस्त याने वसविलेल्या, श्रावस्ती येथे भगवान बुद्ध यांनी अधिक वर्षापर्यंत, वर्षवास निमित्त निवासी होते अशा बौद्ध धम्माच्या सर्वात पवित्र ठिकाणी करण्यात आले.

महिला सशक्तिकरण संघ द्वारा श्रावस्ती येथिल म्यानमार मोनास्ट्रि येथे आयोजित चतुर्थ आंतराष्ट्रीय बौद्ध सम्मेलनात डॉ.बबन मेश्राम यांच्या पुस्तकाचे लोकार्पण सम्राट अशोक सुभारती स्कूल ऑफ बुद्धिस्ट,सुभारती विश्वविद्यालय मेरठचे पाली विभाग प्रमुख डॉ.चंन्द्रकिर्ति यांच्या हस्ते कुशिनगर येथिल अग्नमहापंडित भदन्त ज्ञानेश्वर, भदन्त देवेन्द्र, भदन्त नंदरत्न थेरो, दिल्ली चे भदन्त करुणाकर, म्यानमार येथिल भदन्त ओभाषा, भदन्त नायका, भदन्त पंडिताभिवंसा,लंडन चे डॉ.मंजुलाल, डॉ.निलीमा बागडे,भंन्ते विनाचार्य, डॉ.अश्विर गजभिए डॉ.शुशांत चिमणकर, सामाजिक कार्यकर्ता आतिष बागडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

सदर पुस्तकाचे प्रकाशक वैनगंगा व्हॅली लोटस अॕन्ड कोब्रा पब्लिशिंग हाउस नागपुर हे आहेत.डाॕ.मेश्राम यांच्या संशोधनावर हि पुस्तक असून विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच संशोधनकर्ता, आदिवासीच्या जिवनावर अध्ययन करणारे अभ्यासक यांना उपयुक्त असणारे पुस्तकात जनसंवाद माध्यमे व सामाजिक परीवर्तन, आदिवासी, आदिवासीतील सांस्कृतिक व धार्मिक बदल, आदिवासीतिल सामाजिक व आर्थिक बदल यासारख्या विषयांवर सखोल संशोधन मांडण्यात आले आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात पांढरे सोन्याची सर्रास चोरी

0

 

शेतकरी शेतामध्ये राबराब राबून पीक मोठे करतो, कष्ट घेतो, पैसा ओततो, दुसरीकडे मालाचे भाव पडतात अशातच जळगाव जामोद परिसरामध्ये या पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याची अर्थात कापसाची रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे सर्रास चोऱ्या करत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

महागाई वाढतच असताना आसमानी, सुलतानी संकटासोबत भुरट्या चोरांचे संकट जळगाव जामोद परिसरात निर्माण झाले आहे जळगाव (जा) तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी संतोष महादेव फाटे यांनी 3 डिसेंबर ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शेतातील कापूस वेचणीचे काम सुरू आहे

अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये कापूस वेचणी करता गेलो असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 50 किलो कापूस अंदाजे किंमत 4000/- चोरून नेल्याचे निदर्शनास आले यावरून जळगाव जामोद पोलिसांनी कलम 379 नुसार गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील करीत आहेत.

दिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केला नसता? माजीमंत्री बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते ?तर दिव्यांग मंत्रालय निर्मिती झाली नसती? दिव्यांगाना न्याय मिळाला नसता?

0

 

असे मत दिव्यांग, वृ.नि.मि.मंडळ चे संस्थापक डाकोरे पाटिल यांनी माहुर येथे जागतिक दिनी मेळाव्यात केले

 

माहुर येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी माहुर शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण जिजखमाता चौक येथे दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे,माहुरचे नगरअध्यक्ष फेरोजभाई दोसानी, नायब तहसिलदार, मा.आमदार केरामचे प्रतिनिधी,कॉग्रेसचे प.स.माजि सभापती किसनकाका राठोड,गोरसेंनेचे जिल्हा सचिव अर्जुन पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी, भाजपाचे जेष्ठ नेतेअनिलभाऊ वाघमारे, पत्रकार पदमा मॉडम,पत्रकार तळणकर मॉडम दिव्यांग सं.सर्वपदाधिकारी, शाखा प्रमुख अनेक मान्यवराच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरण करून डॉ.बाबासाहेब अंबेडकर चौकाच्या बोर्डाला पुष्पहार घालुन पेढे वाटुन फटाके फोडुन उत्साह,आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
कपिलेश्वर धर्मशाळा माहुर येथे दिव्यांगाचा मेळ्याव्यात वरील मान्यवराच्या हस्ते दिप प्राजलन करून मान्यवराचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,तर ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी,प्रमुख पाहुणे नायब तहसिलदार माहुर, मुख्यकार्यकारी माहुर माजी सभापती किसनकाका राठोड,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार पत्रकार पदमा मॉडम, पत्रकार तळणकर मॉडम, सरपचअनेक मान्यवर दिव्यांग बांधवासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दिव्यांगाचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंलन सरपंच अर्जुन पवार,यांनी केले
प्रस्ताविक मार्गदर्शन ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचा ऊध्देश सर्व बांधवाना दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी यांनी दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपणास संघटित करण्यासाठी डाकोरे साहेबानी प्रयत्न केल्यामुळे आज आपल्या संघर्षामुळे मंत्रालय करण्यात आले या सरकारचे मी आभार व्यक्त करतै नुसते मंत्रालय झाल्याने प्रश्न सुटत नसतात म्हणुन आपण सर्वानी चंपतराव डाकोरे सोबत लाढाईत सामिल व्हावे गरज पडल्यास मला आवाज द्या मी आपल्या सोबत आहे नगरपंचायतचा दिव्यांग निधी,घरकुल चे वाटप केले आहे आपल्या समस्या मी सोडविण वरीष्ठ पातळिवर पक्षासमोर मांडुन न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले

माजी सभापती राठोड सरानी जागतिक दिनाच्या शूभेच्छा देऊन माहुर आदिवाशी डोगराळ भागातिल दिव्यांगाना न्याय मिळावा म्हणुन मा. चंपतराव डाकोरे पाटिल माहुर तालुक्यात दरमहा मिटिंग ,निवेदन पहिला मोर्चा दंवडी मोर्च्या काढला होता त्यावेळी मी सभापती होतो त्यावेळी गटविकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन दिव्याग निधी दिला व प्रत्येक वेळि मी डाकोरे पाटिल यांच्या चळवळी सोबत आहे पुढे पण दिनदुबळ्याना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले
यावेळी पत्रकार पदमा गिरे मॅडम ,प्रहार संघटनेचे शिवचरण दिव्यांग स जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ईत्यादीचे मार्गदर्शन झाले


अध्यक्षिय मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन शासनाने अनेक वेळा कायदे,शासन आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्टृ या संघटनेच्या वतीने सर्वानी संघटित करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वानी मला सहकार्य केल्यामुळे आज आपणास कुठेतरी न्याय मिळत

आहे,गावपातळीवर निधी,सवलती,एवढेच नव्हे तर आपल्या व्यंगावर बोलणे सुध्दा बंद झाले ते शासनाने दिव्यांग कायदा २०१६ च्या कलम ९२,९३ प्रमाणे आपल्या शरीराच्या व्यंगावर बोलले फार मोठा गुन्हा नोंद होतो त्यांची माहिती आपणास व्हावी म्हणुन गाव तिथे दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे अनावर नांदेड जिल्यात १८१ व्या बोर्ड शाखेचे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

देशातील पहिले दिव्यांग मंत्रालयाची घोषणा आपल्या सर्वाच्या संघटित संघर्षामुळे व आपले दिव्यांगाचे कैवारी माजी मंत्री बच्चुभाऊ कडुमुळेच आपणास मंत्रालय झाले बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते तर मंत्रालय मिळाले नसते सतेत आपला प्रतिनिधी असल्याशिवाय
न्याय मिळत नाहि या शासनाच्या सर्व मंत्रीमंडाचे ,बच्चुभाऊचे जाहिर आभार व छोटिशी विंनती कि या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ अधिकारी,व मंत्री पण दिव्यांगासाठी राखिव ठेऊन भर्ती केल्यास खऱ्या अर्थाने दिव्यांगाना न्याय मिळेल.

कारण या म्हनीप्रमाणे *पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा तेंव्हाची कळे
त्या दिव्यांगाना काय दु:ख होते त्याच्या वेदना सर्व सामान्याना कसे कळतिल एखादा हजारात बच्चुभाऊ कडु सारखा असतो पण एखाद्याने संघर्ष केल्यास न्याय मिळत नसतो म्हणुन सर्वानी संघटितपणे संघर्ष करावा असे अव्हाहण अध्यक्षिय समारोपात डाकोरे पाटिल यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार ता.उप अध्यक्ष ऊमेश भगत यांनी केले
या कार्यक्रमास किनवट ता अध्यक्ष अंकुश राठोड,हदगाव सचिव चव्हाण,धनगरे,अर्धापुर बबन पाताळे, अनिस मिर्झा
ता् अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण ,ता ऊपअध्यक्ष ऊमेश भगत,ता. सचिव अरविंद राठोड,शहर अध्यक्ष दादाराव कांबळे, महिला अध्यक्ष बबिता मारबते,म.सचिव वनिता पेटकुले नरवाडे सागर नरसिमलु, सुखळकर,रेवा राठोड ईत्यादीने केले असे प्रसिध्दी पत्रक दिले