Home Blog Page 236

बाळापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन उरळ दुकानाचे शटर तोडून चोरी करणारे चोरट्यांना केले जेरबंद

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

निंबा फाटा येथे व्यापारी फिर्यादी प्रशांत गुलाबराव ठाकरे रा. मालवाडा यांनी दिनांक 22 11 2022 रोजी पोस्टला येऊन तक्रार दिली की त्यांचे निंबा फाटा येथील कृषी केंद्र दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्री दरम्यान शटर वाकून दुकानातील नगदी 10,000/- रुपये चोरून नेले व तसेच माझे दुकान समोरील व्यापारी देवानंद अशोकराव पाथरिकर राहणार निंबा फाटा यांचे दुकानातील शटर वाकून वरील अज्ञात चोरट्यांनी नगदी 8000/- रुपये अशी दोन्ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 461,380 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांचे मार्गदर्शन तपास पथक तयार करून तात्काळ निंबा फाटा व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून व तांत्रिक साधनाचा वापर करून सदर आरोपींना काही दिवसातच छडा लावून संशयित आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले आरोपी 1) धनंजय उर्फ चींना रामकृष्ण अप्पा रेड्डी वय 46 राहणार मगाल क्वाटर विकलांग क्वाटर इंदापूर रोड कादरी जिल्हा पटूपर्थी राज्य आंध्र प्रदेश,2) फरहान अहमद अब्दुल गफार वय 27 रा. इंदिरानगर कापूसतळणी तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती ह.मू. हैदराबाद यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यामध्ये अजून एक साथीदार शेख अन्सार शेख कयूम रा. अमरावती हा असल्याचे सांगितले आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून मुद्देमाल जप्त करून आरोपी पोलीस स्टेशन उरळ पोलीस कस्टडी मध्ये असून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही करणारे तपास पथक, ठाणेदार अनंतराव वडतकर, पोलीस अंमलदार संतोष भोजने, अनिल येनेवार, रवी हिंगणे, हरिहर इंगळे, शैलेश घुगे, कांताराम तांबडे यांनी कार्यवाही केली.

जागतिक “दिव्यांग दिनानिमित्त” गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने शहरात रॅली आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन.

0
  •                                                                             अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-समग्र शिक्षा जिल्हा परिषद गडचिरोली,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शी येथील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद,शाळेतील सर्व विद्यार्थी-पालक,युवक, शहरातील नागरिक,गट समन्वयक तथा केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,समावेशीत शिक्षण विशेषतज्ञ सुशील गजघाटे,संसाधन शिक्षक दशरथ गहाणे,जीवन शेट्टे,हिमदेव पिपरे,उमेश पोहाणे,रवी खेवले,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी शहरातून वाजत-गाजत “जागतिक दिव्यांग दिवस” मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
तसेच ३ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत गट साधन केंद्राच्या वतीने चामोर्शी तालुक्यात “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी” विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Gram Panchayat यावल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 41 तर सदस्य पदासाठी 223 अर्ज दाखल

0

 

Yaval वीकी वानखेडे

यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत सरपंच पदासाठी ४१ तर सदस्य पदासाठी २२३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

आज शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी आज अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

यावल तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या न्हावी प्र यावल, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या आठ गावांसाठी आठ सरपंच पदासह २९ प्रभागातील ७८ सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम दोन दिवस असताना गुरुवारी येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळली होती.

सरपंच पदासाठी आज दि. २ डिसेंबर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी एकुण ४१ अर्ज तर ग्राम पंचायत सदस्य पदासाठी २२३ अर्ज दाखल झाले आहेत. आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने यावलच्या तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली होती.

यावल तालुक्यातील या आठ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका भुसंपादन विभागाच्या अधिकारी शुभांगी भारदे , फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.

मानधनिया दालमीलच्या डाळीच्या हौदात बालकामगाराचा अपघाती मृत्यू

0

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट, दि. 3 डिसेंबर
कडाजना शिवारातील मानधनीया दालमिल मध्ये काम सुरू असताना डाळीच्या हौदात एका बालकामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत्यूनंतर दालमिल मालकाने घटनेची पोलिसांना सूचना न देताच बाल कामगार प्रभास कुमार यादव वय 16 वर्ष याचा मृतदेह त्याच दाल मिल मध्ये कामकरणाऱ्या भावाचे मदतीने हिंगणघाट येथिल स्मशानभूमीत जाळण्यात आला.

सदर घटना 30 नोव्हेंबर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्याचे दिल्ली येथिल आते भावाने पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून कंपनीचा संचालक सौरभ मानधनीया फरार झाला आहे.

कंपनी ही मानधनिया परिवारातील एका महिलेच्या नावावर असून मुलगा सौरभ हा कंपनीचे कामकाज सांभाळतो. मृतक प्रभासकुमार यादव हा बिहार राज्यातील अमृतनगर (दरभंगा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन बाल कामगार आहे. हिंगणघाट येथे मानधनीया दाल मिल मध्ये कार्यरत होता.

गेल्या काही महिन्यांपासून कामकरणाऱ्या या कामगाराने नेहमीप्रमाणे आपले काम बुधवारी सुरू केले. रात्री ९ वाजताच्या सुमारास मानधनीया दालमील मधील डाळीच्या हौदात उतरला. याच हौदातील डाळ बाहेर निघणाऱ्या आऊटलेटमध्ये तो अडकला. तर याच हौदात वरून पडणारी डाळ त्याच्या अंगावर पडत राहिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेने हादरलेल्या दालमिल मालकाने मात्र त्याच्या परगावी असणाऱ्या नातेवाईकाला पूर्व सूचना दिली नाही, पोलिसांना देखील
याबाबत माहिती दिली गेली नाही.कंत्राटदार व कामगारांच्या मदतीने त्याचे कामगार असलेल्या भावावरती दबाव आणून मृतक प्रभासचा मृतदेह जाळण्यात आला.

सर्वकाही संपल्यानंतर त्याच्या भावाने घटनेची माहिती परप्रांतातील कुटुंबियांना दिली. नंतर दिल्ली येथील नातेवाईकाने पोलिसात तक्रार करताच घडलेले सर्वप्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणाने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून बालकामगार हा विषय हाताळणाऱ्या कामगार अधिकारी कार्यालयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये कंत्राटदार अजितकुमार यादव, कामगार अशोक ऊरिया, सुपरवायझर दिलीप असलकर यांचा समावेश आहे. तर या कंपनीचा मालक तसेच कंपनी मॅनेजर मात्र फरार झाला आहे.

Wardha News

वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका व शहरच्या वतीने जगदीश गायकवाडचा जाहीर निषेध ‌

0

 

प्रतिनिधी शेगाव  इस्माईल

शेगाव येथील वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडीच्या वतीने पनवेल येथील जगदीश गायकवाड लागतात करा असे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेब यांना शेगाव तहसीलदार साहेब यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दादारावजी अंभोरे शेगाव शहर अध्यक्ष प्रवीण जी ब्रो बोदडे शेगाव शहर सचिव आशिष खंडेराव खंडेराव महिला आघाडी संगीता ससाने तसेच आकाश चोपडे दीपक इंगळे रामदास सुरळकर प्रवीण विरघट उदय सुरवाडे दीपक इंगळे मोहन कराळे राहुल सुरवाडे आशिष शेगोकार कैलास दाभाडे रामेश्वर शिरसाट मोदराची समदूर शैलेश गवळी दिलीप वाकोडे जोगेंद्र पहुरकर अभी मान्यवर कार्यकर्ते हजर होते

मा.श्री.अशोक(आण्णा)पांगारकर विनम्र,अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

0

 

Jalna (तुकाराम राठोड,जालना)

जालना-सर्वांचे लाडके अशोक(आण्णा)पांगारकर भारतीय जनता पक्षाचे ओ.बी.सी.सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,जालना नगर परिषदेतील गटनेते,भाग्य नगर वॉर्डाचे नगरसेवक! भारतीय जनता पार्टीचे उदयोन्मुख लोकाभिमुख नेतृत्व.विविध सामाजिक व राजकीय पदावर काम करणारे अशोक आण्णा आज सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.भारदस्त उंची देहयष्टी,सदा हसतमुख चेहरा,बोलण्यातील गोडवा व वागण्यातील साधेपणा यामुळे पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आण्णा आपलंसं करून घेतात.

कमी वयात एवढ्या उंचीवर जाऊनही त्यांच्यातील विनम्रता कुठेही कमी झालेली नाही.वॉर्डाच्या,शहराच्या समस्यांची बारकाईने माहिती घेणे व ते प्रश्न सोडविण्यासाठी लगेच प्रतिसाद देणं हि आण्णांची खासियत आहे.विकासाची ब्लू प्रिंट तयार ठेऊन त्यावर अमल करणारा हा तरुण नेता आज प्रगतीचे एक एक शिखर काबीज करत आहे।राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेल्या दिग्गज लोकांसोबत काम करणं;त्यांच्या पसंतीस उतरणं आणि त्यातून लोकांची विधायक कामे करणे ही सोपी गोष्ट नाही.यासोबतच सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांसोबत असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध हि आण्णांची खासियत आहे.एका वैभवशाली आणि समृद्ध परिवाराचा वारसा पुढे नेटाने आणि डौलाने चालविणारे आण्णा आपल्या कुटुंबाचं भूषण आहे.उद्योग व्यवसायात असलेली त्यांची दूरदृष्टी आज त्यांनी जे उद्योग उभे केले आहेत,त्यावरून दिसून येते.

अनेक तरुण आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलद्ध करून दिले आहेत.वृक्षारोपण,रोपवाटप,फळवाटप,गरजूना अन्नवाटप,रक्तदान शिबिराचे आयोजन,समाज मेळावा असे अनेक लक्षवेधी काम आण्णांच्या हातून झाले आहे.सध्या ते करत असलेले सर्वात मोठे काम म्हणजे मुक्तेश्वर तलाव व मंदिर परिसर सुशोभीकरण ! आज जालना शहराच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प पहिला की मन खूप प्रसन्न होते.संपूर्ण जालना शहराचे हा प्रकल्प आज वैभव ठरत आहे.

या बरोबरच ईतर सर्वच आघाड्यावर यशस्वीपणे काम करणं सोपं नाही.पण हे सर्व आण्णा तुम्ही तुमच्यातील अंगभूत गुणांनी साध्य केले आहे.आज वाढदिवसानिमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो व एक दिवस आपण जालना शहराचं नेतृत्व करताना आम्हाला पाहावयास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुनश्च आपणास लाख लाख शुभेच्छा!
शुभेच्छुक-तुकाराम राठोड,शिवाजी राठोड,राजू राठोड,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड,छबुराव राठोड,नितीन पवार,रमेश पवार,गोरख जाधव,संजय रंधवे,सचिन चव्हाण,भिमराव चव्हाण,सुभाष चव्हाण,शामराव पवार व भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा.

मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!

0

 

जळगाव जा.:- महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे जळालेले ट्रान्सफॉर्म तात्काळ २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या ही मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील व वडशिंगी,पाटण,तरोडा या गावातील शेतकऱ्यांनी केली होती.

त्याचे कारण असे की यावर्षी शेतकऱ्यांनी हरभरा,गहू,कांदा व इतर काही पिकाची लागवड चालू केलेली आहे. ज्या शेतकऱ्याकडे बोर,वीर आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला चालू केलेले होते.

परंतु अचानकपणे तरोडा शिवारातील डीपी व पाटण शिवारातील (बेंद्रे) डीपी ही पंधरा दिवसाच्या अगोदर जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची अडचन निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले पिके सुकू लागले होते.

महावितरण कडे जळालेल्या डीपीची तक्रार करून व बिलाचे पैसे भरून सुद्धा पंधरा दिवसांपासून अधिकारी केवळ आणि केवळ वेळ मारुण द्यायचे.

तरोडा येथील शेतकरी व वडशिंगी येथील शेतकऱ्यांनी अक्षय पाटील यांना सांगितले असता आज दिनांक २ डिसेंबरला महावितरण कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या वतीने ट्रान्सफॉर्म तात्काळ मिळावे याकरता मुक्काम आंदोलन ठेवले होते.

शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच दोन्ही गावातील शेतकऱ्यांना तात्काळ ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले.

बाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जी लेंडवे साहेब व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळापूर पंचायत समिती सभापती सोनटक्के साहेब मंगेश गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरीमेड येथील नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पंचायत समिती बाळापुर मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाला युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ वानखडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब पंचायत समिती सदस्य गजानन उगले साहेब माजी सभापती पती मंगेश गवई सादिक भाई गुलाबरावजी उमाळे नागेश शिरसाठ उमेश कवर उमेश इंगळे श्यामला लोध नाजुकराव इंगळे प्राध्यापक भोजने सर रामकृष्ण सोनटक्के बाबाराव जी बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या ओबीसी समाज बांधव व कोळी बांधव जगन्नाथ पाटील काळे शिवहरी मस्के प्रतिभा मनोज मस्के संदीप मस्के निलेश मस्के सोनू मस्के इत्यादींनी जाहीर प्रवेश केला तसेच या कार्यक्रमाला चांदोरी मिळेल येथील नागरिक पत्रकार देवराव पर घर मोर सरपंच प्रवीण परघर मोर देविदास हिवराडे सुरेश पर घर मोर ओम प्रकाश परघर मोर बाळूभाऊ पगार मोर राजकुमार परघर मोर अमरदीप परघर मोर मेघराज पर्भर मोर गौतम हिवराळे गौतम वानखडे गौतम पगार मोर दीपक पडघमोर नाशिकराव पर्घ मोर रवींद्र शेगोकार रमेश शेगोकार इत्यादी मंडळी उपस्थित

मौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना आवर कधी घालणार?

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील निरखेडा येथील ज्ञानेश्वर हरिश्चंद्र राठोड यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,दि.२७/११/२०२२ रोजी रात्री ९:३० वाजता गावातून घरी जात असताना,तांड्यातील चार ते पाच जणांनी मिळून मला मारहाण केली आहे.हि घटना दि.१५/११/२०२२ रोजी दुपारी चार ते पाच वाजे दरम्यान निरखेडा तांडा येथे घडली आहे.मिळालेली माहिती अशी की,ज्ञानेश्वर राठोड हे नेहमीप्रमाणे गावातून तांड्याकडे नेहमीप्रमाणे जात असताना,रस्त्यावर तांड्यातील दोन व्यक्ती ची भेट झाली.व ते म्हणाले की,मला तुम्ही माझ्या मागच्या भांडणात का मदत केली नाही.असे म्हणून मला दोघांनी शिवगाळ करून चापटबुक्यांनी मारण केली.यावेळी मी सदर घटनेची तक्रार मौजपुरी पोलीस स्टेशन ला दि.१५/११/२०२२ रोजी दिली आहे.तसेच सदर घटने संदर्भात मौजपुरी पोलीस स्टेशन येथे एनसी क्रमांक ५०२/२०२२ तक्रारीची नोंद केली आहे.तसेच आतापर्यंत कुठल्याच प्रकारची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही.वारंवार ज्ञानेश्वर राठोड हे मौजपुरी पोलिसांना जाऊन गाडीची नुकसान झाल्या संदर्भात विचारणा करत आहे.पण कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यामार्फत मिळत नाही.मग गोरगरिबांना न्याय कधी मिळणार हा आमचा सवाल आहे.मग पोलीस प्रशासन करत आहे काय?,त्यांची गरज कशासाठी हा मोठा एक्स प्रश्न आहे.या सदर गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी दि.२७/११/२०२२ रोजी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मालकीची घरासमोर असलेली मोटर सायकल एचएफ डीलक्स घरासमोरून घेऊन गेले व मोटारसायकलची तोडफोड व नुकसान केली आहे.तसेच सदर गाडीची नुकसान करण्या अगोदर मी त्यांना माझी गाडी परत करा म्हणन सांगितली होते.त्यांनी मला सांगितले की तुला काय करायचे ते करून घे व आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही.व पोलीस प्रशासन आमच्या खिशात आहे.अशा प्रकारच्या दम दिला.अशा प्रकारच्या धमक्या देऊन ते तेथुन निघुन गेले.या बाबत मी मौजपुरी पोलीस स्टेशन येथील पोलिसांना माहिती दिली.तरी पण अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा व अशा मंजुर लोकांना कायद्याचा धाक राहिलेले नाही.त्यामुळे मौजपुरी,रामनगर आणि सेवली परिसरात नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सर्व निर्माण होत आहे.तरी,पण आपले पोलीस अधिकारी,कर्मचारी कुठलीही प्रकारची चौकशी करत नाही व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे.याला न्याय म्हणता येईल का? तसेच पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल सुद्धा कुणी घेत नाही.व गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत आणी मुग गिळून गप्प आहेत.याकडे सुद्धा आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे.तसेच सदर परिसरातील ठिकाणी गोरगरीब,वंचित,मागासवर्गीय घटकावर वारंवार अन्याय-अत्याचाराच्या घटनेमुळे परिसर हादरला आहे.तसेच पण गुन्हेगारीच्या घटना मौजपुरी,रामनगर व सेवली सर्कलमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यामुळे आपण याला आळा घालावा.तसेच ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही ज्ञानेश्वर राठोड यांनी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावल पंचायत समितीतील ग्रामीण पाणीटंचाई विभागाचे रविन्द्र देशमुख यांची तिन दशकांतर जामनेर येथे बदली

0

 

Yaval यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या पाणी टंचाई विभागात गेली तिन दशकापासुन सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रविन्द्र प्रल्हाद देशमुख यांची जामनेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे . रविन्द्र प्रल्हाद देशमुख हे मुळ हिवरखेडा तालुका जामनेर येथील रहीवाशी असुन, आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर देशमुख यांनी यावल येथे ७ / ३ / १९९१या वर्षी पंचायत समितीत आपल्या प्रशासकीय सेवाकार्यास सुरुवात केली होती .

यावल पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीटंचाई विभागात त्यांनी सतत ३२ वर्ष तिन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी उत्कृष्ठरित्या एक उमदा व सर्व प्रिय असे कर्मचारी म्हणुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली . ३० नॉव्हेबर २०२२रोजी त्यांची प्रशासकीय मार्गाने जामनेर येथील पंचायत समितीत बदली झाली असुन , यावल पंचायत समितीत मागील ३२ वर्ष सेवा करीत असतांना त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक मोठा कुटुंब निर्माण केले , यावल पंचायत समितीचा पदभार सोडतांना रविन्द्र देशमुख हे अत्यंत भावुक झाले होते .

पण नौकरी आली म्हणजे बदली असते असे सांगुन त्यांनी आपल्या जन्मभुमि असलेल्या जामनेर तालुक्याची आपल्यास सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला . यावेळी त्यांना यावल पंचायत समिती कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी , तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी . व्हि तळेले,हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक मजीद तडवी , संगणक विभागाचे मिलींद कुरकुरे , जावेद तडवी , अक्षय शिरसाठ , चेतन चौधरी यांच्या आदीनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .