Home Blog Page 239

मोहता शाळा नवीन इमारत मधील पीओपी ढाचा पडला त्या मागे शाळा व्यवस्थापक यांचे दुर्लक्ष !

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी
दि.25 नोव्हेंबर
हिंगणघाट :- शहरातील ऐतिहासिक मोहता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आठ कोटी ब्यांशी लाख रुपयांचा खर्च करून बांधण्यात आला. या इमारतीचे उद्घघाटन मा. नितीन गडकरी यांनी केले होते. सहा महिन्यातच इमारतीच्या पीओपीचा ढाचा कोसळला ? प्रतिनिधी यांनी शाळेत भेट दिली असता पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते पाणी स्लॅपला पाझरत होते ते पाणी पीओपी शोषून घेत होती त्यामुळे पीओपी चा ढाचा पडला. याशिवाय अनेक बाबतीत मुख्याध्यापक यांचे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात येते .

मुख्याध्यापक गंगाधर ढगे :- आम्ही या विषयावर अनेकदा इंजिनियर यांना कळविले आहे त्यांनी या ठिकाणी भेट दिली.

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड :- पाईप लिकेज झाल्यामुळे पीओपीने पूर्ण पाणी शोषून घेतले. जिथे जिथे पाईपलाईन लिकेज झाली त्या ठिकाणी पीओपी पडले ठेकेदारास पीओपी फिटिंग व नळ पाईपलाईन चेक करून बदलण्याचे निर्देश दिले. या अगोदर मुख्याध्यापक यांनी कोणतीही लिखित तक्रार केली नाही . मुख्याध्यापक यांनी लेखी तक्रार पीओपी ढाचा पडल्यानंतर दिली.

3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

0

 

शेगाव प्रतिनिधी इस्माईल

3डिसेंबर 2022 रोजी अंपग जागतीक दिवस म्हणुन सपुर्ण जगात साजरा करण्यात येतो या दिनी अंपगाचे छोटे मोठे कार्यक्रम शासन व सामाजिक संघटना यांच्या मार्फत करण्यात येतात ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अनेक अंपगाच्या समस्या व मागण्या असतात व त्याच्यासाठी 5%निधी सुद्धा अंपग पुर्णवसन करण्यासाठी राखीव ठेवण्यात येतो परंतु अनेकवेळा ग्रामसभामध्ये अंपगाच्या समस्या संदर्भातील बाजु ऐकल्या जात नसुन अंपगाच्या समस्येचे निराकरण होत नाही म्हणुन 3 डिसेंबर अंपग जागतीक दिन असुन या दिवशी अंपगासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अंपगाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व ग्रामसभेत फक्त अंपगांचा सहभाग असावा असे आपल्या स्तरावर सर्व गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सचिवांना आदेशीत करावे असे निवेदन अंपग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यानी दिले करामत शाह अकोला अध्यक्ष, रुपाली टेकाडे, इम्रान पांडे, शेख हुसेन अझरवसी ,

भाजपला सोडचिट्ठी देत अल्पसंख्याकचे शहराध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल ….

0

 

सुभाष मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक अनिल लांबट यांचाही रा.काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश मेळावा…

प्रतिनीधी :-सचीन वाघे हिंगणघाट,

समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी ,कार्यकर्त्यांसह अनेकांनी शेकडोच्या संख्येत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे अल्पसंख्याक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष जावेदजी हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत महावीर भवन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रिय मंत्री तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष खलीत साहेब, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,
जिल्हा उपाध्यक्ष दिनकर घोरपडे, नागपूर जिल्हा निरीक्षक सुरेखाताई देशमुख, शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाने, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, , युवक जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष हरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे ,
सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधरजी कलोडे, चैनकरणंजी कोचर, कामगार नेते आफताब खान,
माजी नगरसेवक धंनजय बकाने, , अनिकेत कांबळे, माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब बोलताना यांच्या हिंगणघाट येथील मतदार संघातील तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर यांच्या विचाराला प्रेरित होऊन पक्षात काम करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. असा प्रचंड विश्वास तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असुद्या. याची अनुभूती आज तरुणांची गर्दी पाहून आली, असे प्रतिपादन प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांनी यावेळी व्यक्त केले.
हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत असून आपण त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सर्व गटतट विसरून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर जागा राष्ट्रवादी काँग्रेस हमखास जिंकेल, असा विश्वास जावेद हबीब यांनी यावेळी व्यक्त केला.
यामेळावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजप अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष मोहम्मद साबीरभाई ,सुभाष मंडळाचे अध्यक्ष अनिलभाऊ लांबट, रहीमभाई पट्टेवाले,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण रघाटाटे, धनराज शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापारी संघाचे समाजसेवक नानाभाऊ हाते यांच्यासह त्यांचे सहकारी, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक सुरेश तांदुळाकर,माजी सरपंच भास्करराव मानकर, ग्रा.सदस्य सौ. रंजना बावणे, समाजसेविका अर्चना कलोडे,सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ चौधरी, किरण तांदुळकर, भोई समाज क्रांति एकता दल उब्दा शाखा अध्यक्ष,सौ.वैशालीताई मेश्राम व त्याचे सहकारी,रोहित लेदे, माजी सरपंच दिलीप कुंभलकर, सुरेश कुलसंगे,नांदगाव ऑटो चौक युनियनचे पदाधिकारी, डॉ. ठाकुरदास रॉय, तलत पठाण, रेश्माताई मेश्राम, दर्शनाताई काळे, ज्योतीताई काळे, ज्योतीताई कापकर, आचलताई वकील, सपनाताई मुन्ने, अर्चनाताई डोंगरे, शम्मा अजुम, वैशालीताई भगत, रजनीताई महाकाळे, अश्विनिताई विश्नोई, रमेश भेदूरकर, झोंगुजी तुराळे, आकाश हुरले, राजू धात्रक, शाकिर अली यांच्यासह शेकडो लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन कट करणे तात्काळ थांबवा,अन्यथा आसुडाचा प्रसाद देणार….कृष्णा खलसे(मनसे तालुकाध्यक्ष जालना)

0

 

प्रतिनिधी:(जालना)महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गोगलगाय,येलो मोझॅक,सततचा पाऊस,परतीचा मुसळधार पाऊस अशा विविध कारणांनी हातचा गेल्यामुळे शेतकरी संकटात असताना रबी हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणाने थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन कट करण्याची मोहीम हातात घेत शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र आखले आहे.त्यानुसार सर्वच तालुक्यांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धडक वसुली मोहीम राबवत हजारो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडली आहेत.कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड हैराण आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे.पाण्याच्या जीवावर शेतकऱ्यांनी ऊस लागवड,भाजीपाला लागवड सुरू केली आहे तसेच रब्बी हंगामातील गहू,हरभरा,ज्वारी,करडी,जवस या पिकांची पेरणी केली आहे.सध्या रबीचे पीक काही ठिकाणी उगवले आहे तर काही ठिकाणी उगवत आहे.तर काही ठिकाणी ऊसाची नुकतीच लागवड झाली आहे.तर काही ठिकाणी लागवड सुरू आहे.अशी एकंदर सध्याची परिस्थिती आहे.या परिस्थितीत महावितरण ने शेतकऱ्यांना खिंडीत पकडून वसुली सुरू केली आहे.खरेतर राष्ट्रीय अन्नसुरक्षा आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतीच वीज कनेक्शन कापल्यास शेतीतील उभ पीक नष्ट होत.त्यानंतर शेतातून कुठलही उत्पन्न मिळत नाही त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेले अन्न नष्ट होते.त्यामुळे पीक निघेपर्यंत तरी वीज कनेक्शन कट करू नये.असा आदेश वीज कंपन्यांना दिला आहे.परंतु या आदेशास केराची टोपली दाखवत महावितरण ने वसुली सुरू केली आहे.वास्तविक पाहता ज्या थकित वीज बिलापोटी वीज पंपाचे कनेक्शन कट केले जात आहेत ते वीजबिलच बेकायदेशीर आहे. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता बिल आकारणे बेकायदेशीर आहे.(ग्रा.सं.कायदा १९८३,पटी क्रमांक १३६८५, दि. ६/५/२००५ भरपाई-प्रती आठवडा १०० रु.) सध्याचे शेतीपंपाचे वीजबिले आहेत ते सर्वच बिले मीटर चा फोटो न काढता दिलेली सरासरी दिले आहेत,त्यामुळे हे शेतकऱ्यांना येत असलेले वीजबिल बेकायदेशीर असल्याने वीजबिल जेवढा वापर आहे त्यानुसार दुरुस्त करून मिळेपर्यंत ते भरण्याचा संबंधच येत नाही. यासोबतच वीज कायदा २००३ सेक्शन ५६ नुसार थकबाकी बिलासाठी वीजपुरवठा बंद करायचा असेल तर १५ दिवस अगोदर स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य असते.परंतु महावितरणने अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन हे कसल्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीररित्या कट केलेले आहे.तसेच वीज कायदा २००३ व लायसेन्स रुल २००५ नुसार शेतात पोल,डीपी असल्यास प्रतीमाह २००० रुपये ते ५००० रुपये (भरपाई) भाड मिळू शकते.परंतु महावितरणने आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला हे भूभाडे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचेच पैसे महावितरणकडे निघतात. त्यामुळे ते भूभाड्याचे पैसे महावितरणने शेतकऱ्यांना व्याजासहित द्यावे अशी आमची मागणी आहे.तसेच सध्या ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास महावितरणचे अधिकारी बिल भरल्याशिवाय आम्ही ट्रान्सफॉर्मर बंद चा रिपोर्ट पाठवणार नाही अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वीज बिलाची वसुली करून घेत आहेत. परंतु वीजबिल भरून अधिकाऱ्यांची रिपोर्ट करूनही,ऑइल उपलब्ध नाही,दुरुस्त करणारे कर्मचारी कमी आहेत,तुमच्या अगोदर खूप वेटिंग आहे असे कारण सांगून १५-१५ दिवस ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना मिळत नाही.खरे तर वीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर बिघाड झाल्यास ४८ तासात वीजकंपनीने तो दुरुस्त करून देणे अनिवार्य आहे.अन्यथा वीजकंपनीने शेतकऱ्यांना प्रति विलंब तासास ५० रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागते.परंतु ही थकीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधीच मिळाली नाही.ती नुकसान भरपाई महावितरणने शेतकऱ्यांना द्यावी.तसेच फ्युज गेल्यामुळे वा इतर कारणाने ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ जर वीज पुरवठा खंडित झाला तर ग्राहकांना प्रतीविलंब तासात ५० रुपये नुकसान भरपाई मिळते. ग्रामीण भागात तर २४ तासापेक्षा अधिक काळ वीज जाण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. त्यामुळे ती सुद्धा नुकसान भरपाई ची रक्कम महावितरणकडे थकीत आहे.ती सुद्धा थकीत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना महावितरणने तात्काळ देणे गरजेच आहे.तसेच शेतकऱ्याने कृषीपंपासाठीचे कोटेशन भरल्यानंतर वीज कंपनीने १ महिन्याच्या आत विद्युत जोडणी सुरू करून दिली पाहिजे परंतु महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांना कोटेशन भरल्यानंतरही १-१ वर्ष वीज जोडणी करून मिळत नाही त्यासाठीही महावितरणने शेतकऱ्यांना प्रती आठवडा १०० रु.प्रमाणे कायद्यानुसार नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र अशी नुकसान भरपाई महावितरणने एकाही शेतकऱ्याला दिलेली नाही.त्यामुळे ही सुद्धा नुकसान भरपाई महावितरण ने शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी.ही सर्व नुकसानभरपाई महावितरणने शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या बेकायदेशीर विजबिलाची वसुली करावी.व सध्याची बेकायदेशीरपणे सुरू असलेली वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बेकायदेशीर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आसूडाचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी.यावेळी उपस्थित कृष्णा खलसे- तालुकाध्यक्ष,ॲड.हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष,कृष्णा पिसोरे- तालुका उपाध्यक्ष,श्रीकांत राठोड- तालुका उपाध्यक्ष,महादेव भोकरे- तालुका सचिव,मच्छिंद्र खरात,रोहित व्येव्हारे,मच्छिंद्र चव्हाण,किरण मुळे,महादेव चोरमारे,विलास घाटे,गणेश हान्डगे,सिध्देश्वर काळे आदी शेतकरी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अर्धशतका पेक्षा अधिक जुने व जिर्ण झालेल्या यावल बसस्थानकाच्या ईमारतीचे नुतनीकरण कधी होणार प्रवासांच्या मनातील प्रश्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला यावल हा आदीवासी तालुका अशी जिल्ह्यात ओळख असुन ,असे असले तरी एसटी बस आगार हे उत्पन्नात जळगाव जिल्ह्यात अग्रस्थानी आहे तरी देखील जुनाट व अतिशय जिर्ण झालेले बसस्थानक हे उपेक्षीत असुन मागील पाच ते सहा वर्षापासुन प्रवासी या बसस्थानकाच्या नुतनीकरण कधी होणार याची वाट बघत आहे . यावलचे एसटी बस आगार हे सुमारे पन्नास वर्षापेक्षा अधिक जुने असुन संपुर्ण बसस्थानकची ईमारत जिर्ण अवस्येत आहे . नाशिक विभागात व जळगाव जिल्हाात प्रवासी सेवा व उत्पन्नात नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या यावल आगाराच्या बसस्थानकाची अवस्था ही अत्यंत बिकट व दयानिय झाली आहे .विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्व बस स्थानकांच्या ईमारतीचे नुतनीकरण झाले असून , यावल कडे मात्र लोकप्रतिनिधी , महामंडळाचे वरिष्ठांचे लक्ष का जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासांना पडला आहे .विशेष म्हणते यावल तालुक्यातील फैजपुर शहरातील बसस्थानकाचे नुतनीकरण झाले तरी यावल बसस्थानकाचे का नाही असा प्रश्न नागरीकांसमोर निर्माण झाला आहे.तालुक्याचे मुख्य शहर असतांना ही पन्नास वर्षा पेक्षा ही अधिक दिर्घ काळातील बांधलेले यावलच्या बसस्थानकाची अवस्था सर्व पातळीवर अतिश्य जिर्ण जुनाट झालेल्या बस स्थानकाच्या भिंती बांधकाम कोसळत आहे तरी देखील कुणी लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे . या विषयाला घेवुन प्रवासांचे हित लक्षात घेता यावल तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी सातत्याने बसस्थानकाची ईमारतीचे नुतनीकरण व्हावे याचा शासन दरबारी पाठपुरावा केला होता .मध्यांतरी सदरच्या बस स्थानकाच्या नुतन ईमारतीस निधी उपलब्ध झाल्याची चर्चा रंगु लागली होती मात्र खऱ्या अर्थाने पाठपुरावा झाला नसल्याने सदरच्या बसस्थानक नुतनीकरणाच्या कामाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने अद्याप पर्यंत कामास मान्यता मिळवण्यात प्रगती झाली नसल्याचे दिसुन येत आहे . यावल आगाराला मागील तीन वर्षापासुन कायमस्वरूपी कार्य करणारे आगार व्यवस्थापक नसल्याने देखील अनेक समस्या निर्माण झाल्यात , मात्र आता यावल आगारास दिलीप महाजन यांच्या रूपाने कायमस्वरूपी एक कार्यकुशल व अभ्यासु एसटी आगार व्यवस्थापक मिळाल्याने आगाराच्या प्रलंबीत जुनाट व जिर्ण झालेल्या नुतनीकरण ईमारतीसह ईतर प्रवासांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .

बाळापूर तालुक्यातील देशी दारु विक्रेत्यावर उरळ पोलिसांची कारवाई

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत झुरळ बु.येथे दोन ठिकाणी विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना दोन इसमांना पोलिसांनी रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून दोन हजार चारशे रुपये किंमतीची देशी दारूचे 30 क्वाटर जप्त करून दोन जणांविरुद्ध उरळ पोलिसांनी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे झुरळ बु.येथे दोन इसम राहत्या घरातुन गेल्या काही दिवसांपासून विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अनंतराव वडतकर यांना मिळाली होती.त्या माहीतीच्या आधारावर सापळा रचून होते.त्यादरम्यान सदानंद भोजने हा त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून अवैधरित्या देशी दारु विक्री करत होता तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून देशी दारूची 18 क्वाटर असा 1हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदानंद विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच त्याच गावातील अनिल तायडे यालासुद्धा देशी दारूची विक्री करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन त्यांच्याकडून 960 रूपये किंमतीचे देशी दारूचे 12 क्वाटर जप्त करून अनिल तायडे विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई ठाणेदार अनंतराव वडतकर,व त्यांचे कार्यकर्ते बीट जमादार विजय झाकरडे, रघुनाथ नेमाडे, कांताराम तांबडे यांनी केली आहे

न. प . हद्दीतील भागात स्वतंत्र दफनभूमी ची वेवास्था करून देण्यासाठी दशमान गोसावी समाधी बचाव समितीचे निवेदन

0

 

शेगाव प्रतिनिधी इसराईल

शेगांव न.प येथे निवेदन देवुन खालील मागणि करण्यात आल्या
न.प हध्दीतील दशनाम गोसावी समाज
बांधवाचे पूर्वापर पासुन वास्तव्य असुन दशनाम गोसावी समाजात मृत्यु नंतर दफन विधी केली जाते
त्यास समाधी देण्याची प्रथा असे म्हटले जाते
परंतु इतर समाज प्रमाणे स्वातंत्र्य दफनभुमी आपले न.प हध्दीत उपलब्ध नाही
न.प भागात दफन दहन भुमीची व्यवस्था करण्यात यावी
असे शासनाचे धोरण आहेत
त्या करीता शासकीय परिपत्रक भा. ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई आदेश असुन
दशनाम गोसावी समाजा करिता दफनभुमी दहनभुमी करिता जागा उपलब्ध करून स्थानिक
पातळीवर वापर सुरु करण्यात यावा
कदाचित आपल्या न.प कडे जागा नसेल तर शासनाकडे जागेची मागणी करून
ही दहनभुमी दफनभुमी करिता जागा उपलब्ध करून धावी
अशी मागणी त्यावेळी दशनाम गोसावी समाधी बचाव समिती च्या वतीने मुख्यधिकारी न.प शेगांव यांना निवेदन देवुन करण्यात आली आहेत
त्यावेळी उपस्थित पांडुरंगजी बुच व शेगांव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वरजी साखरे
इत्यादी गोसावी समाजबांधव उपस्थित होते

रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाची सरकारने घेतली गंभीर दखल…

0

 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची रविकांत तुपकरांशी यशस्वी चर्चा…राज्यस्तरावरील बहुतांश मागण्या मान्य…

सोयाबीन – कापसाच्या भावासाठी केंद्राकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन जाणार : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे

रविकांत तुपकर यांची सोयाबीन – कापूस प्रश्नाबाबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घडवून आणणार : उपमुख्यमंत्री ना. फडणवीस

मुंबई : आपण मांडलेला विषय महत्त्वाचा असून सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या रास्त आहेत, राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तर केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक लावू आणि सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी लवकरच राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेवून दिल्लीत घेवून जाऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून तुपकरांना चर्चेचे निमंत्रण देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिडतास रविकांत तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्या व सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली. सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे ही बैठक दुपारी अडीच वाजता पार पडली. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, सहकार मंत्री ना.अतुल सावे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह प्रमुख विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये, मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध करून द्यावे, यासह ईतर मागण्या रविकांत तुपकरांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. सोयाबीन व कापसाचा उत्पादन खर्च व मिळणारे उत्पादन यातील फरकाची अभ्यासपूर्ण मांडणी तुपकरांनी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तुपकरांचे म्हणने व सर्व मागण्या गांभीर्याने समजून घेतल्या.या शिष्टमंडळात दामोदर इंगोले डॉ.ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत,अमोल हिप्परगे, अनंता मानकर आदींचा समावेश होता

*बॉक्स*

*या मागण्या झाल्या मान्य…*

कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द, मागील वर्षीचा व चालू वर्षाचा शंभर टक्के पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्यांना बाध्य करणार अन्यथा विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करू, जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता होण्यासाठी शेतीला कंपाउंड करण्याची योजना तातडीने आणणार, शेतमजुरांना विमा सुरक्षा कवच देणार, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिवसा वीज पुरवठा करण्याच्या संदर्भाने निर्णय घेणार व ना दुरुस्त रोहित्रे बदलून देणार, लंप्पी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांना शंभर टक्के मोबदला देणार व त्यातील जाचक अटी दूर करणार, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाला बँकांनी होल्ड लावल्यास व परस्पर कर्ज खात्यात पैसे वळती केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करणार, मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलणार, आदी मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या व याबाबत तात्काळ अंमलबजावणी केली जाईल,असा शब्द दिला. राज्य स्तरावरील बहुतांश मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहेच शिवाय केंद्र शासनाकडे असलेल्या विषया संदर्भात मुख्यमंत्री आजच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना पत्र पाठविणार, रविकांत तुपकरांसह राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठक लावणार असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जलसमाधीचा धसका अन सरकारने बोलावली बैठक

सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान या मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले व प्रत्येक ठिकाणाहून शेतकऱ्यांचे समर्थन आणि वाहनांचा ताफा वाढत गेला 23 ला संध्याकाळी ही शेतकऱ्यांची फौज खोपोली येथे दाखल झाली. रात्रभर मुक्काम करून 24 नोव्हेंबरला सकाळी हजारो शेतकऱ्यांची फौज रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्राकडे आगे कूच करण्यासाठी सज्ज झाली. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, आता माघार नाही अशी आक्रमक भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने कार्यकर्ते ही आक्रमक झाले होते, दरम्यान ही बाब लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकर यांना फोन लावून चर्चा केली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तुपकरांना फोन लावून संवाद साधत बैठकीचे निमंत्रण दिले. राज्य सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगत दुपारी अडीच वाजता सह्याद्री अतिगृह येथे बैठक नियोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. तब्बल दीड तास चाललेली ही बैठक यशस्वी झाली. सरकारने दिलेला शब्द येत्या 15 दिवसात पाळला नाही व मान्य झालेल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणी झाली नाही तर मात्र पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करू व आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा द्यायलाही रविकांत तुपकर विसरले नाहीत.

स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट, येथे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 24 नोव्हेंबर
स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट यांनी इयत्ता 7 वी आणि 8 वी साठी पी व्ही टेक्सटाईल, जाम येथे औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. जिथे विद्यार्थ्यांना वास्तविकतेमध्ये
संस्थात्मक समायोजन मध्ये अंतर्दृष्टी प्रदान करते. पी व्ही. टेक्सटाईल ने भारतातील सर्वोच्च दर्जाच्या फॅब्रिक उत्पादकांच्या यादीत स्वतःचे नाव कोरले आहे. ही मिल जाम येथे आहे आणि भारतातील अग्रगण्य कापड गिरण्यांपैकी एक आहे. या भेटीत विद्यार्थ्यांनी औद्योगिक भेटीतून कापड गिरणीचे कामकाज समजून घेतले. संस्थेच्या प्रत्यक्ष अनुभवासह सैद्धांतिक ज्ञान त्यांना वस्त्रोद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कारकीर्द घडवण्यास मदत करते. पीव्ही टेक्सटाइल्सच्या अर्चनाजी यांनी विद्यार्थ्यांना कामाच्या पद्धती, उत्पादन लाइन, वितरण वाहिन्या आणि रोजगार पद्धती याविषयी समजावून सांगितले. व्यवस्थापक श्री भूपेंद्रजी शहाणे यांनी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक बनून आपल्या करिअर साठी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले.

हा दौरा आणि प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी आणि शैक्षणिक समन्वयक सौ.संतोषी बैस शिक्षक श्री.अभिनव जैस्वाल आणि सौ.प्रतिभा झिले यांच्यासोबत केला. शाळेच्या मुख्याध्यापिका कु. शिल्पा चव्हाण यांनी सहलीवरून परतल्यानंतर विद्यार्थ्यांशी मुख्य मुद्द्यांवर चर्चा केली आणि भविष्यात या ज्ञानाचा उपयोग करण्यास सांगितले. शाळेच्या या प्रयत्नाचे पालकांनी कौतुक केले.

रिया राठोड चा बीएएमस ला प्रवेश मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक:

0

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील सावंगी तलाव येथील रहिवासी रोहिदास हरिश्चंद्र राठोड शिक्षक जनता हायस्कूल जालना यांची मुलगी रिया राठोड हिचा एस.एम.बी.टी.महाविद्यालय इगतपुरी नाशिक येथे बीएएमएस ला प्रवेश मिळाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच जालना ग्रामीण येथील पत्रकार तुकाराम राठोड यांची पुतणी आहे.रिया राठोड चा बिएएमएस प्रवेश मिळाल्याबद्दल ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना आदर्श निर्माण होणार आहे.त्यामुळे गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी विद्यार्थ्यांना ही ध्येय गाठण्यासाठी आदर्श निर्माण होईल.यामुळे पालक,शिक्षक,मैत्रीण यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे हे प्रवेश निश्चित झाल्याची भावना रिया रोहिदास राठोड हिने व्यक्त केली आहे.