Home Blog Page 240

रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस… तुपकर मात्र जलसमाधी आंदोलनावर ठाम

0

 

बुलढाणा : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे. दिलेल्या इशारानुसार आज 23 नोव्हेंबर रोजी शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली होती,परंतु अशा कितीही नोटीस आल्या तरी आता माघार घेणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर पण शेतकऱ्यांचा हा लढा थांबणार नाही, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांची फौज घेऊन ते मुंबईकडे कुच करत आहेत.
दरम्यान आता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील तुपकरांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये असे या नोटीस मध्ये नमूद आहे. बुलढाणा पोलिसांनंतर मुंबई पोलिसांनी देखील नोटीस दिली असून राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनची नोटीस आली तरी आता ही शेतकऱ्यांची फौज मागे हटणार नाही. पोलिसांनी अडवा अडवीचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा आक्रमक आणि गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला असून ही फौज आता वेगाने मुंबईकडे मार्गक्रमण करत आहे.

*ठिकठिकाणी स्वागत*

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघालेल्या वाहनांच्या ताफ्यांचे ठिकठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. या शेतकरी यात्रेचे स्वागत करुन प्रत्येक ठिकाणाहून दोन-चार वाहने या यात्रेत सहभागी होत होते, सुमारे दोनशे वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना वेगळेच चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत होते. मार्गातील प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी, मायमाऊल्यांनी या यात्रेचे स्वागत करुन यशस्वी भव असा आशिर्वाद देखील दिला.

*चित्रपटात शोभावे असे दृष्य*

एकामागोमाग शेकडो वाहनांचा ताफा, नारेबाजी असे दृश्य केवळ चित्रपटात आणि खासकरुन साऊथच्या चित्रपटात पहावयास मिळते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलनासाठी शेकडो वाहनांनी हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे रवाना झाली आहे. रस्त्यावरुन एकामागे एक अशा शेकडो वाहनांची ही रांग पाहून चित्रपटातील दृश्य पाहत आहे की काय? असाच काही वेळ संभ्रम होतो.

*शेतात बसून खाल्ल्या घरच्या भाकरी*

अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे रवाना झाली आहे. शेकडो वाहनांचा ताफा मुंबईकडे आगे कूच करत असून मार्गावर ठिकठिकाणी रविकांत तुपकर व या शेतकरी यात्रेचे स्वागत केले जात आहे. दरम्यान या यात्रेतील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या घरून बांधून आणलेल्या भाजी भाकरीची न्याहरी एका शेतात केली. घरून पालवात बांधून आणलेली ठेचा भाकर, चटणी – पोळी आणि घरचे अन्न खाऊन ही यात्रा पुन्हा मार्गस्थ झाली आहे. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी घरची भाजी भाकर बांधून आंदोलनाला निघाली आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जाण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे शेतकऱ्यांच्या या फौजेमुळे प्रशासनात धडकी भरली असून मुंबई पोलिसांनी रविकांत पाठवून आंदोलन करण्याची विनंती केली आहे परंतु आता माघार नाही असा निर्धार करून पालवातील भाजी भाकर खाऊन शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे आगे कूच करत आहे.

यावल पंचायत समितीच्या शासकीय गाडीला अपघात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दिनांक 23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय गाडी एम एच एकोणावीस डी व्ही 41 99 या गाडीने कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीला अपघात होऊन जागीच गतप्राण झाले तर गाडीवरील ड्रायव्हर ला किरकोळ दुखापत झाली असल्याची वृत्त हाती आले आहे भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्या ठिकाणी गाडी ट्रकवर आढळल्या गेली त्यात ते जागीच गतप्राप झाले एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती

शब्दांचा अतिसार झालेला व थिल्लर राज्यपाल महाराष्ट्राला लाभावा हेच दुर्दैव!

0

 

प्रतिनिधी:(जालना)राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व दिलीप धोत्रे,प्रकाश महाजन,संतोष नागरगोजे,अशोक तावरे राज्य,सतेनाम गुल्हाटी,गजानन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा खलसे यांच्या अध्यक्षतेखाली विरेगाव येथे आंदोलन करण्यात आले.मा.राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला.राज्यपाल महोदय यांनी संभाजीनगर येथील कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त,शिवप्रेमी यांचे मन दुखवल्यामुळे राज्यपाल यांचा निषेध नोंदवण्यात करिता विरेगाव येथे मंगळवारी दहा वाजता तीव्र स्वरूपाचा निदर्शने व आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे.यावेळी उपस्थित कृष्णा खलसे,ॲड.हरीदास लांडे,श्रीकांत राठोड,कृष्णा पिसोरे,राम कातकडे,महादेव भोकरे,ऋषिकेश कावळे,सुनील चव्हाण,बाळासाहेब जाधव,अनिल जाधव,शिवाजी जाधव,गणेश बाहेरकर,गणेश जाधव,राम गुंजाळ,रामेश्वर जाधव,मचिंद्र राठोड,शरद जाधव,गोवर्धन जाधव,बालासाहेब जाधव,आकाश खरात,बालासाहेब देवडे,विलास घाटे,दिपक राऊत,कृष्णा काटकर,जिवा जाधव आदी शिवप्रेमी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

सांगवी खुर्द येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद एका वयोवृद्ध व्याक्तीस मारहाण चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्री मध्ये नाचण्यावरून वाद झाला यात एका ६० वर्षीय वृद्धास फावडयाच्या दांडाच्या मारहाणीत जबर जख्मी करून इतर दोन जणांना मारहाण केले असुन, तीन जणांना चौघांनी मारहाण जख्मी केल्याची घटना घडली असुन, यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भातील मिळालेली माहीती की सांगवी खुर्द ता.यावल या गावात हळदीचा कार्यक्रम होता, लग्न आले म्हणजे वाजंत्री आली वाजंत्री आली म्हणजे नाचणाऱ्यांचा गोंधळ झाला , अशाच प्रकारे गावात एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. वाजंत्री नाचणारे व त्यात झालेल्या गोंधळ या मध्ये नाचण्यावरून वाद झाला व कल्पेश रमेश पवार, राहुल विजय सावळे, विनायक सुरेश पवार व केदार विजय सावळे रा. सांगवी खुर्द या चौघांनी नारायण बारकू चौधरी व त्यांची मुलगी प्रमिला विनोद पाटील ,लहान मुलगा पंकज नारायण चौधरी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी फावड्याच्या लाकडी दांडाने दुखापत केली व आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी व पोलीस करीत आहे.

धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील शेतकरी मजुरांची आत्महत्या

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी मुख्यालय पासुन अवघ्या तीन की मी अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील युवक नानकीलाल सावरू भिलावेकर वय 38,याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली म्रुताची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली असता रात्री नानकीलाल घरी एकटाच होता शेजारी आई वडील,काका काकु चे घर आहे सकाळी नानकीलाल ला उठायला उशीर झाला म्हणून आई त्याला उठवायला त्यांच्या घरात गेली असता मुलगा नानकीलाल घरात फाशीवर लटला दीसला असता त्यांच्या आईने टाहो फोडला तसेच वडील व शेजारी धाऊन आले आनी सदर बाब धारणी पोलीस स्टेशन ला कळवीले माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेन्द्र बेलखेडे यांनी त्यांचे अधिकारी पि एस आए, श्रीखंडे, पोलीस अंमलदार जांबु,व मोहीत आकाशे यांना घटनास्थळी पाठवले पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गावातील मित्र व नातेवाईक च्या चर्चेत म्रुत नानकीलाल ने सोलापूर अकलुद ऐथील ऐका शेतकऱ्यां कडुन ऊस तोडणी करीता पैसे घेतले होते परंतु स्वाता च्या शेतातील कामे करण्याकरिता तो सोलापूर ला जाऊ शकत नव्हता असे बोलले जात आहे धारणी तालुक्यात शेकडो परप्रांतीय लोकांनी कामांकरिता जास्त पैशाचे प्रलोभन दाखवून मेळघाटातील शेकडो गावातील मजुरांना कामावर घेऊन जाण्याकरीता पैसे वाटले आहे अशी सुद्धा माहेती मिळाली आहे पुढील तपास धारणी पोलीस करत आहे सध्या

बाळापूर तालुक्यातील निबा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

यंदा खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरयांना सरसकट 25 हजार रुपये मदत देण्यात यावी ,पीक विमा,सह अनेक मांगण्या संदर्भात निंबा फाट्या वर शिवसेना नेते उमेरश जाधव उपजीलाप्रमुख रवींद्र पोहरे तालुका सचिव महेश बोर्डे . उपतालुका प्रमुख उमेश उबाळे . उल्पसंख्यक शहझाद खान . बबलु देशमुख – गणेश देशमुख . गोपाल पाटिल व सर्व
पदअधीकारी यांच्या नेतृत्व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उरळ पुलिसांचा कडक बंदोबस्त लावन्यात आला होता उरळ पुलिस ठाणेचे ठाणेदार अनंत राव वडत कार
उप निरिक्षक गोमासे . व इतर कर्मचारी उपस्थित होते

जालना शहराचे वैभव असलेला “बडीसडक” रस्त्यासाठी  रु.५.७५ कोटी मंजूर:

0

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना- शहराचे वैभव असलेला ‘बडीसडक’ नावाने ओळखला जाणारा रस्ता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक पर्यंत रस्त्यासाठी दिनांक 18/11/2022 रोजी महाराष्ट्र शासनाने रु.५७५ लक्ष मंजुर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदनामध्ये पुढे असे म्हटले आहे की, 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरातील विविध सिमेंट रस्त्यासाठी रु.70 कोटी मंजूर केले होते, या मंजूर निधीतून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहेत. जालना शहराला सिमेंट रस्ते ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखविले. अगोदरच्या काळामध्ये जालना शहरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले होते,नागरिकांना याचा खूप त्रास होत होता, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला होता, परंतु ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजूर करून आणलेल्या रु.70 कोटी निधीमधून शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले त्यामुळे शहरातील नागरिकांनी ना.रावसाहेब पाटील दानवे यांचे धन्यवाद देऊन आभार मानले.परंतु दरम्यानच्या काळात 2019 मध्ये बहुमत येऊनही भाजपा सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे शहरातील महत्त्वाचा आणि जालना शहराचे वैभव असणारा “बडीसडक” या नावाने ओळखला जाणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दधीची चौक(मुर्गी तलाव) पर्यंतचा रस्ता सिमेंटीकरण करण्याचे राहून गेला,आघाडी शासनाच्या काळातही या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी प्राप्त न झाल्यामुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडली होती, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नव्हता आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला या रस्त्यावरून जावे लागत असे एवढा हा रस्ता महत्त्वाचा होता.दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडी शासनाची सत्ता जाऊन भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत आले आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या, आपल्या रस्त्याचे भाग्य उजळणार ना.केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणणार असा विश्वास त्या भागातील नागरिकांमध्ये निर्माण झाला.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे हा रस्ता जालना शहराचे वैभव असतानाही जाणून बुजून दुर्लक्ष तर होत नाही ना ? शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटची बनली मग  बडीसडक साठी निधी मंजूर का होत नाही असा प्रश्न करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली.त्यामुळे ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे बंधू मा.भास्कर (आबा) दानवे यांना त्या परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन समस्या जाणून घेण्याचे सांगितले.त्यानुसार मा.भास्कर (आबा) दानवे यांनी श्री.मनीष बगडिया, चेतन देसरडा व विजय कामड यांच्यासह श्री.धानवाला यांच्या घरी दोन वेगळ्या दिनांक १७/११/२०२२ रोजी रात्री ८.०० वा त्या परिसरातील नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या, बैठकी मधील सर्व नागरिकांनी बडीसडक हा रस्ता खूपच खराब झाला असून हा रस्ता चांगल्या पद्धतीने भूमिगत नालीसह बनवावा अशी विनंती केली.या बैठकीचा अहवाल मा.भास्कर (आबा) दानवे यांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांना फोनवर कळविला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक 18/11/2022 रोजी सदरील रस्त्यासाठी रु.575 लक्ष महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याची माहिती ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.जालना शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रलंबित असलेले दोन प्रश्न ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविले. जालना शहरातील कन्हैयानगर समोरील रस्त्याचा प्रश्न व जालना शहराचे वैभव असलेला रस्ता बडीसडक या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सदरील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहिले नव्हते, रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते, या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले होते तर चार ते पाच नागरिकांचा बळीही या रस्त्याने घेतला होता. मात्र भाजपा+सेना (शिंदेगट) चे सरकार सत्तेत येताच ना.रावसाहेब पाटील दानवे ॲक्शन मोड मध्ये आले आणि कन्हैयानगर समोरील रस्त्यासाठी वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, जालना यांच्या कॅबिनमध्ये मीटिंग घेतली आणि तात्काळ सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले व प्रत्यक्षात काम सुरूही झाले आहे. “बडीसडक” या रस्त्यासाठी रु.575 लक्ष निधी मंजूर करून आणल्याने हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रलंबित दोन प्रश्न केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी चुटकीसरशी सोडविला,हे फक्त दानवे च करू शकतात असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

गोवर्धन कोल्हे,स्वीय सहाय्यक
(ना.रावसाहेब पाटील दानवे)

अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन सुध्दा नेर व इतर काही मंडळ का वगळण्यात आले,ते तात्काळ नुकसान ग्रस्त बाधीत यादीत समाविष्ट करण्यात यावे असा इशारा मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहेत:

0

 

(प्रतिनिधी-तुकाराम राठोड)

जालना-जिल्ह्यासह तालुक्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कपाशी,सोयाबीन,तसेच फळ पिकाची अतोनात नुकसान झाले होते.सदर नुकसान होऊन सुद्धा शासन-प्रशासने ते जाणून-बुजून दुर्लक्ष करून वगळण्यात आले आहेत.याचे काय कारण आहेत.नेर व इतर काही मंडळ अतिवृष्टीमुळे बांधीत यादीमध्ये तात्काळ समाविष्ट करावे व गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी.असा इशारा मनसेतर्फे तहसीलदार जालना यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.अन्यथा मनसेच्या वतीने येत्या दोन दिवसात आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनात जे काही बरे वाईट किंवा अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील,याची आपण नोंद घ्यावी. या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष श्रीकांत राठोड,तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे,मधुकर कुरेवाड,राजेश राठोड यांच्या स्वाक्षरया आहेत.

शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक येथे निषेध आंदोलन

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक हिंगणघाट येथे आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपा खासदार शुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्याबाबद राज्यातील जनता सर्विकडे रोष व्यक्त करत आहे राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा व तसेच खासदार त्रिवेदी यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे व्यक्तव राज्यातील जनतेकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द राष्ट्रवादी युवक काँग्रेस कदापी सहन करणार नाही. करीता कारंजा चौक हिंगणघाट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला..
यावेळी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, जिल्हा सचिव नितेश नवरखेडे,विध्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष राहुल जाधव, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष तेजस तडस, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर,तालुका संघटक आकाश बोरीकर, शहराध्यक्ष पंकज पाके, लिलाधार मडावी,गौरव तिमांडे, पंकज पाराशर, राहुल कोळसे, युवराज माऊस्कर, रितू मोघे, अमोल तडस, हर्षल तपासे, अभिजित लोखंडे, पवन काकडे, दिपाशु ढेगले, आदित्य बुटे, अमित मुळे, जनक पटेल, मो.शाकीब, मनोज हुमाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या बेताल विधानाचा मा जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने केला निषेध.

0

 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले. यामुळे महाराष्ट्रासह तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या विधानाचा निषेध म्हणून बुलडाणा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वात म. आ. जिल्हा संघटिका सौ जिजताई राठोड, उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, मा तालुका प्रमुख डॉ मधुसूदन सावळे, उप जिल्हा संघटिका नंदिनीताई रिंढे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा येथे आज दिनांक २१/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन करून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भगत सिंह कोश्यारी हे वारंवार बेताल विधाने करत असून त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावत आहे. त्यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नसून, महाराष्ट्रातील जनता यापुढे हे कदापि खपवून घेणार नसल्याचे मनोगत याप्रसंगी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पं. स. मा सभापती सुधाकर आघव, युवासेना तालुका प्रमुख निलेश राठोड, वै.आ. तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, आशिष बाबा खरात, गजानन उबरहंडे, सतीश राजपूत, अनिल रिंढे, किशोर कानडजे, बबन खरे, संदेश वानखेडे, रामदास काकडे, पद्माताई परदेशी, राहुल जाधव, विनोद तोटे, राहुल शेलार, रवींद्र भोंडे, सचिन मिसाळ, विकी जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
◼️♦️◼️♦️◼️♦️◼️♦️◼️