Home Blog Page 241

राज्यपाल कोशारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदी विरोधात निषेध आंदोलन पदावरून काढण्याची मागणी

0

 

विठ्ठल अवताडे शेगाव

आज स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा संभाजी ब्रिगेड यांच्या कडून निषेध आंदोलन करण्यात आले , छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी तथा भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वर कारवाही करून त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करत घोषणा बाजी देऊन कोषारी आणि त्रिवेदी यांच्या बॅनर ल पैदळी तुडवण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी ,तालुका प्रमुख दत्ता वाघमारे , माजी तालुका प्रमुख रमेश पाटील , माजी नगर सेवक आशिष गणगणे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे ,उमेश पाटील अवचार ज्ञानेश्वर निंबाळकर, भूषण मापरी ,युवासेना जिल्हा उपप्रमुख विशाल लहाने शहर प्रमुख शिवा कराळे , युवराज पाटील ,यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

कलाध्यापक उत्तम वानखेडे यांना ” राष्ट्रीय रत्न ” पुरस्कार प्राप्त उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे (केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे) यांना युवभाग्य फुड्स लि.कंपनी,ढगा व डाॅ.मनोहर आडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “युवराज फुड्स चा पहिला वर्धापन दिनानिमित्त”राष्ट्रीय पुरस्कार व व्याख्यान

0

गुड्डू कुरेशी सिंधी रेल्वे

” दि .१९/११/२२ला स्थळ:- माधवराव काठावाले सभागृह अप्रोच रोड, वरुड, जिल्हा-अमरावती येथील आयोजित सोहळ्यात कार्यक्रम विशेष आकर्षण व अतिथी मिस इंडिया युनिवर्स, निर्माती व अभिनेत्री *रुपल मोहता* यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील कलाशिक्षणाबद्दल केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” *राष्ट्रीय रत्न* ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्री रोग व प्रसुती तज्ञ तथा सत्य शोधक फाउंडेशन चे माजी अध्यक्ष डॉ मनोहर आडे,व रोटरी क्लब च्या अध्यक्षा डॉ सोनाली आडे कार्यक्रमाचे अध्यक्ष जांयंट्स गृप ऑफ वरुड चे माजी अध्यक्ष श्री नितीन खेरडे प्रमुख अतिथी रितेश शहा, राजेंद्रजी आडे, रमेजी चिचकार, प्रफुल्लजी अनासाने, विलास कडू, अनिकेत फुटाणे, राहुल कुबडे, जनार्दन निंबुरकर, श्याम गावडे, अर्चना शिष्याने, मनोज ठेवले, आयोजक युवराजजी ठाकरे, नितिन ठाकरे, डायरेक्ट भाग्यश्री वानखेडे तर याप्रसंगी “शून्यातून विश्व निर्माण करणारी ….” आज ५०० करोडचा बिझनेस करणारी व २५०० महिलांच्या हाताला काम देणारी महिला ” सुपरिचित असलेल्या *कमल परदेशी* यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले.
या सोहळ्याप्रसंगी जांयंट्स गृप वरुड चे माजी अध्यक्ष नितीन खेरडे व निता खेरडे, दिलीप वानखेडे यांचा सत्कार घेण्यात आला…. तसेच देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकुण २५ व्यक्तीला व महिलांना *राष्ट्रीय स्तरावरील* *”राष्ट्रीय रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे हे आपल्या कलाशिक्षण क्षेत्रात विविध कला प्रयोग करीत असतात. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी नेहमी नवनवे प्रयोग, विविध स्पर्धा, परीक्षा, विविध उपक्रम राबवित असतात.व याच त्यांच्या अनोख्या कलाशिक्षण क्षेत्रातील प्रयोगामुळे, उपक्रमामुळे युवभाग्य फुड्स प्रोडुसर लि.कंपनी ढगा व डॉ मनोहर आडे मित्र परिवार यांनी कलाध्यापक उत्तम वानखेडे यांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील “राष्ट्रीय रत्न”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले….
शाळेचे मुख्याध्यापक विलासराव येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर शाळेचे अध्यक्ष श्री अतुलभाऊ टालाटुले ,सचिव राजुभाऊ पात्रिकर, कोषाध्यक्ष अशोकराव दवंडे,सदस्या निताताई टालाटुले व इतर सदस्यगण, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पत्रकार , व्यापारी गण, विदर्भ साहित्य संघ शाखा सिंदी चे पदाधिकारी इत्यादींनी वानखेडे सरांच्या यशस्वीतेकरीता व सिंदी शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले बदल अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक केले ….

अल्लीपूर येथे नाबालिक मुलीवर अत्याचार पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

अल्लीपूर :- आरोपी याने दि.1 ऑगस्ट 2020 ला राहुल चंदु बालबन्सी, रा. कानगाव, ता. हिंगणघाट,जि. वर्धा. यांनी अल्पवयीन फिर्यादीचा जवळीक साधण्यासाठी पाठलाग करुन तिच्याशी मैत्री करुन तिला त्याचे मित्राचे घरी कोणी नसताना घेऊन जाऊन तिचे इच्छाविरुद्ध तिचेशी बळजबरीने अत्याचार केला, त्यानंतर फिर्यादी त्याचेशी बोलत नसल्याने तिला एकदा मारहाण केली होती. दि. 19 नोव्हेंबर2022 रोजी फिर्यादी ही अल्लीपूर येथून कॉलेज वरुन घरी जात असताना कानगाव बस स्टॅन्ड वर आरोपी तिला भेटला व तिला त्याचेशी बोलण्याचा आग्रह करु लागला त्यास फिर्यादीने नकार दिला असता त्याने फिर्यादीस शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून जाळून मारीन अशी धमकी दिल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून कलम 376(2)(n), 354(ड ),323,504,506 IPC r/w 4,6,12 POCSOA r/w 3(1)(w)(i)(ii),3(1)(r)(s), 3(2)(va) atrocities अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास अधिकारी श्री गोकुळ सिंह पाटील (SDPO) पुलगाव करीत आहे

सख्ख्या मुलीवर केला बापने जबरी अत्याचार विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा

0

 

अकोला प्रतिनिधी अशोक भाकरे

सख्ख्या मुलीवर केला बापाने जबरी अत्याचार
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी
उजेडात आली दरम्यान या गावात मागील
वर्षी14 ऑगस्ट 2021 रोजी वय 45 वर्षे बापाने पोटाच्याच
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर
जबरी लैंगिक अत्याचार केला
हा प्रकार आई भावाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई भाऊ यांना देखील जीवे मारून टाकेल अशी धमकीही दिली त्यानंतर पीडीत अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूला हा प्रकार सांगितला त्यांनी आईला बोलावले आणि उरळ पोलीस ठाणे गाठले त्यानंतर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत 376/376/ (2) (एल) 376 (2) (एन)376 (3) 506 सहकलम 4,5,(एल)
(एन)6,7,8, नुसार गुन्हा दाखल केला तसेच अत्याचार करणाऱ्या बापालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वळतकर यांनी केला
पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपी हा गुन्हेगार प्रकृत्तीचा असून यापूर्वी त्याला एका विनयभंग प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास करण्यात येऊन दोषारोपत्र सादर केल
या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासाण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये जन्मठेपे ची शिक्षा ठोठावली आहे व पाच लाख विस हजार रूपयांचा दंड सुनावला हे प्रकरण न्यायालयात सादर झाल्यापासून 13/ महिन्यात निकाली काढण्यात आले पुरावी म्हणून पोलीस स्टेशनचे ASI ढोकणे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांना सहकार्य केले .

भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा शेगाव मधून यात्रेत सहभागी

0

 

संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष ऍड मनोज आखरे यांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला असून ,संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेत त्या त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांनी यात्रेत सहभाग घेतला तर , संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी काल शेगाव येथून आपला सहभाग दर्शविला ,

या वेळी त्यांच्या सोबत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील , एस पी संभारे , चेके सर , संजय धोरण ,निवृत्ती ढोले , मंगेश सोळंके जिल्हा कार्याध्यक्ष ,अमोल दाभाडे ,जिल्हा प्रवक्ते चेतन धुमाळ जिल्हा उपाध्यक्ष , नांदुरा तालुका अध्यक्ष अमर पाटील , मोटाळा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे , जळगाव जा तालुका अध्यक्ष रामा रोठे , खामगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वालोडे , शेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे , शेगाव तालुका सचिव उमेश पाटील , कुलदीप डंबेलकर नांदुरा शहर उपाध्यक्ष , याच सोबत जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष कोमल ताई तायडे , वानिताताई अरबट, सिमाताई ठाकरे , यावेळी उपस्थित होते

रेती ट्रॅक्टर मालकाच्या निवेदनावरून अवैद्य धंद्याची केली पोलखोल ! अवि नवरखेले

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट शहरात ट्रॅक्टर चालक मालकांनी कधीही निवेदन दिले नाही व येथील आमदाराशी व कलेक्टर तहसीलदार यांच्याशी कधीही चर्चा केली नाही.आता स्पष्ट मी सांगते की हे कशासाठी आहे कारण आत्ता संदीप सूरकार त्याच्या वर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .तो बीजेपी कार्यकर्ता व त्याच्या घरी त्याची वहिनी ही BJP नगरसेविका आहे. याच्या अगोदर टिप्पर मालक ज्यांनी आपल्या परिवारासोबत आमरण उपोषण केले होते त्यालाही ट्रॅक्टर चालक मालकांनी कधीही प्रतिसाद दिला नाही व त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या उपोषणाला सहभागी झाले नाही, आज हे कशासाठी आहे ?
याच्या पूर्वी अनेक ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. ट्रॅक्टर चालक मालक यांच्यावर कित्येक वेळा 379 चोरीच्या गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा कुणी आवाज उचललेला नाही. आता सर्व काही मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन आले आहे. जे या रेती व्यवसायात आहे ,यांचे 2 नंबर चे कामे पूर्णपणे बंद पडल्यामुळे पोट कस भरणार कारण रेती व्यवसाय मागे हे रात्र दिवस शहरातल्या प्रत्येक ठिकाणी चौकात उभे राहून प्रत्येक शासन – प्रशासन सर्व पदाधिकारी कर्मचारी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होते व यांचे पूर्ण जे काही 2 नंबरचे व्यवसाय राहते ते पूर्ण होत होते आता यांचे काम पूर्ण होऊन राहिले नाही म्हणून आता इतके भाबावले आहे .यात काही आपल्या शरीरावर खादी वस्त्र व वाईट शर्ट घालून , पत्रकार आहे . हे सर्व ह्या शहरात होणारे प्रत्येक 2 नंबरच्या कामात सहभागी आहे. प्रत्येक नागरिकाला हे समजणे गरजेचे आहे की शहरात 2 नंबरच्या व्यवसाय हा सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर रेती व्यवसाय हा सुरू करावा लागतो नंतर हायवेवर अवैद्य कोळसा, धान्य ,मास व इतर अवैध व्यवसाय या सर्व गोष्टी हे सर्वे राजकारणी व पत्रकार असलेले या सर्व बाबीवर लक्ष ठेवून चालणारे लोक आहे . हे सर्वात अगोदर व्यवसाय सुरू करत असतात त्यानंतर शहराच्या आत होणाऱ्या 2 नंबरच्या कामाला सुरू करण्याची परवानगी मिळते म्हणून या सर्वांवर व विशेष लक्ष देणे सुरू आहे कारण यांना रात्रीला फिराची परवानगी नाही व यांचे 2 नंबरची कोणतीही कामे पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे हे रस्त्यावर निघाले आहे. रेती व्यवसाय मुळात ज्याच्या रक्तात व ओरिजनल चोर आहे असं मी समजतो कारण हा व्यवसाय कित्येक वर्षापासून यांच्या बापाच्या असल्यासारखा आहे कारण नवीन ट्रॅक्टर नवीन लोक ह्या रेती धंद्यामध्ये आले तर ह्या लोकांनी कधीही त्यांना टिकू दिले नाही.

अवैध धंदेवाल्यांसाठी झिरो टाॅलरन्स…गांधी, भावेंचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्रात नाही देशात लौकिक मिळवुन द्यायचाय…! पोलीस अधीक्षक हसन

0

 

गुड्डू क्युरेशी
सिंदी रेल्वे ता.१६: अवैध धंदेवाल्यांसाठी यापुढे पोलीस विभागाकडुन झिरो टाॅलरन्स असुन त्यांनी हा उपद्व्याप येथेच थांबवावा अन्यथा गय केल्या जाणार नाही. माहात्मा गांधी, विनोबा भावेच्या वास्तव्यांने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्य़ाला महाराष्ट्रात नाही तर देशात नावलौकिक मिळवुन द्यायचा असल्याचे मत शहरातील आपल्या पहिल्या भेटी प्रसंगी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी सिंदी येथे व्यक्त केला.
ते सिंदी पोलिस ठाण्याला बुधवार (ता.१६) दिलेल्या आपल्या पहिल्या नियोजित भेटी प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेल्या नियोजित भेट प्रसंगी आयोजित केलेल्या संवाद बैठकीत ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील, शांतता समितीचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्टीत नागरीक आणि पालिकेतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वप्रथम जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबत बदललेली परिस्थिती कशी वाटते. असा प्रश्‍न करित दारु मिळावी कि मिळु नये आपण समाधानी आहा की नाही असे प्रश्न विचारले असता उपस्थित सर्वानी अधिक्षक साहेबांचे एकसुरात अभिनंदन केले आणि हिच बदलेली परिस्थिती चिरकाल राहावी अशी विनंती केली. यावर उत्तर देतांना हसन साहेब म्हणाले मला सुध्दा हटविण्यासाठी काही मंडळी कामी लागली आहे मात्र हमारीभी जडे बहुत मजबुत है हमभी नरुल हसन है साहब…! असे सांगित आपले इरादे स्पष्ट केले.
अवैध धंदे वाल्यांनी जिल्हा सोडावा नाही तर आत जावे. असे ठनकावुन सांगतांनाच यापुढे ज्यांच्याकडे मनी आणि मस्सल पावर नाही अशा गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी हक्काचा माणूस म्हणून नरुल हसन उभा आहे. कोणावरही अन्याय होणार नाही.असे सांगत आपल्या हळव्या मनाचा कोपरा पण येथे व्यक्त केला.
उपस्थितांनी मांडलेल्या समस्येत पशु धनाची चोरी, दारुची होम डीलेवरी,चोरीच्या रेतीचा फोफावलेला अवैध व्यवसाय, अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची होणारी कोंडी, पोळा प्रसिद्ध सिंदी शहरातील दुपारी भरणाऱ्या बालगोपालाच्या पोळ्याला सुध्दा यापुढे पोलीस बंदोबस्त मिळावा, आठवडी बाजारात भुरटय़ा चोरांचा वाढलेला वावर आदी समस्यांची माहीती अधिक्षक साहेबांना दिली असता प्रत्येक समस्यावर स्वतंत्र चर्चा करुन अधिक्षक साहेबांनी या समस्येचे लवकरच निराकरन करण्याची उपस्थितांना ग्वाही दिली.
यावेळी सिंदी ठाण्यांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे आणि त्यांचा पुर्ण स्टाप उपस्थित होता.


संवाद बैठकीला आशिष देवतळे, सुधाकर खेडकर, अशोक कलोडे, दत्ता कोपरकर, असलम पठान, फिरोज बेरा, अजीम शेख, रवी राणा,
प्रभाकर तुमाने, मुन्ना शुक्ला, बालु इंगोले आदी तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद छाजेड, सचिव बबलू खान, ओमप्रकाश राठी, मोहन सुरकार, गुड्डू क्युरेशी, तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावखेड्यातील महीला पुरुष पोलीस पाटील आदीची उपस्थिती होती.
फोटो ओळी

गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे शेतकऱ्याच्या ‘गो’धनावर दरोडा ! शेतकऱ्याचे हातपाय बांधून, शस्त्राचा धाक दाखवून बैलजोडी, दोन गायींची चोरी

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला, तालुका जिल्हा धनाड्य, सावकार, उद्योजक यांच्या घरावर दरोडा पडल्याचे आणि लाखो, करोडो रुपयांचे धन, नगदी राशी किंवा मुल्यवान वस्तूची चोरी झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतशिवारात दरोडा पडला आणि त्या दरोडेखोरांनी त्याचे ‘गो’ धन
(गोवंश ) चोरुन नेले, अशी लज्जास्पद घटना नुकतीच बाखराबाद येथे घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या ‘गो’धन सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद शेतशिवारात ही घटना घडली असुन संबंधित शेतकरी आकोश रामचंद्र माळी (वय ७२ वर्षे) यांनी त्याबाबतची तक्रार उरळ पोलिस स्टेशन येथे दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांनी त्यांच्या शेतातील टिनपत्र्याच्या खोलीत त्यांचे दोन बैल, दोन गायी व एक वासरी, असे पाच जनावरे बाधली व जेवन करून ते झोपले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर बसून त्यांचे तोंड दाबले व दुसऱ्या व्यक्तीने पायावर बसून हात, पाय बांधले. त्यानंतर त्यांच्या सोबतच्या दोन व्यक्तींनी गोठ्यात बांधलेली बैलजोडी व दोन गायी, असे एकूण ८० हजार रुपयांचे गोवंश नायगावकडे पैदल चोरून नेले. त्यानंतर स्वतःची कशीबशी सुटका करून घेत गावात जाऊन स्वतःची मुले, नातेवाईक व पोलिस पाटलांना या घटनेची माहिती दिली तसेच सर्वांनी नायगाव व इतर रस्त्यांनी शोध घेतला. परंतु, चोर सापडले नाहीत. अशा क्रमाने शस्त्रांचा धाक दाखवून व हातपाय बांधून ही चोरीची
घटना घडली असून, त्याबाबत त्वरित तपास घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी तक्रार आकोश माळी यांनी उरळ पोलिस स्टेशन येथे गुरुवार दि १७ नोव्हेंबर रोजी दिली. त्यांच्या तक्रारीवरून अप.नं. २५४/२०२२ कलम ३९२ भादवी नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात शासनाने कठोर आणि स्वतंत्र कायदा करा !हिन्दु जनजागृती समितीची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव इन’मध्ये रहाणार्‍या आणि लग्नाविषयी विचारणा केल्यावर मारहाण करत तिची निघृणपणे हत्या करणारा लव्ह-जिहादी आफताब हा क्रूर, नराधम आहे. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या हत्येचा तपास करतांना हत्या करण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? आपल्या पोटच्या पोरीचे ३५ तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का ? या घटना पहाता राज्यात तत्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, तसेच या प्रकरणी लव्ह जिहादी आफताबला तत्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदू जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’च्या कु. सायली पाटील यांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि वरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने यावल येथील भुसावळ टि पॉईंट येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात कु. सायली पाटील हिने आपल्यास संत्पत भावना व्यक्त केल्यात .

एका महिला पत्रकाराला ‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’ असे वात्सल्याने बोलणार्‍या पू. भिडे गुरुजी यांना नोटीस पाठवणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांवर काही बोलतील का ? राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे भयावह प्रमाण पहाता यावर काही टिप्पणी करणार कि नाही ? असा आमचा प्रश्न आहे. बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत, असेही कु. सायली पाटील यांनी या वेळी सांगितले.
यावल तहसीलदार महेश पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी डॉक्टर अभय रावते, पत्रकार सुधाकर धनगर, पत्रकार प्राची पाठक भाजचे भूषण फेगडे, हिंदुराष्ट्र सेना अध्यक्ष पियूष भोईटे, सांगवी येथील अधिवक्ता शरद कोळी, न्हावी येथील मयूर चौधरी आणि अनेक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.

या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. तसेच यावल तालुक्यातील विविध गावातून धर्मप्रेमी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी ‘अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.

पोलिस प्रशासनाचा रेती ट्रक -ट्रॅक्टर चालक – मालक यांच्यावर बेकायदेशीर गुन्हे दाखल !

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक नुरुल हसन हे अवैध धंद्यांना बंद करण्याकरिता अतोनात प्रयत्न करत आहे. हि जनतेसाठी अभिनंदनाची बाब आहे.परंतु सर्वच कामात पोलीसांची प्रमुख भूमिका दिसून येत आहे, तालुक्यातील महसूल प्रशासनाचे काम सुद्धा पोलिस प्रशासन करीत आहे अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक- ट्रॅक्टर चालक मालक यांचेवर भादवी ३७९ अंतर्गत गुन्हा नोंदवुन नाहक त्रास देत आहे. ते नियमानुसार नाही आहे. पावसाळा संपला की सर्व सामान्य जनता आपल्या घराची कामे काढतात, यांना रेती पुरवणाऱ्यांवर पोलिस बेकायदेशीर कारवाई करत आहे ? हे काम महसूल प्रशासनाचे आहे परंतु हे सर्व अवैध रित्या पोलिस प्रशासन करीत आहेत जनतेला बांधकाम सुरू करण्यासाठी रेतीची आवश्यकता आहे त्याकरिता महसूल प्रशासनाचे रेती घाटाचे रितसर लिलाव करून रेती साठा जनतेला उपलब्ध करून देण्यात यावा तो दिला नाही, पोलीसांच्या होत असलेल्या कारवाई मुळे ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर चालक मालक यांचेवर भादवी ३७९ सारखे गुन्हे दाखल करण्यात येत आहे,अशे गुन्हे दाखल करून सर्व सामान्य मजुर यांचे घर उध्वस्त करत आहेत,या या कामामुळे मोठ्या प्रमाणात मजुर वर्गाचे घर चालत असते आणि त्यावरच स्थानिक पोलीस प्रशासन बेकायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांचे घर उध्वस्त करत आहे. पोलीसांनी कायदा, सुव्यवस्था, गुंडागर्दी यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे दारू गांजा जप्त करण्याचे सोडून हे मुरुम ,रेती मालकावर बेकायदेशीर गुन्हा दाखल करीत आहे. अनेक परिवारावर भुकमारीचे संकट निर्माण करित आहे.तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खुप नुकसान झाले आहे ते बिचारे पोटासाठी वणवण करत हाताशी येईल ते काम करुन आपल्या मुलांना दोन वेळचे जेवण देण्याची धडपड करत आहेत, रोजगार नाही, नोकरी नाही, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशा परिस्थितीत ते हमाली करून पोट भरतात आणि जर त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले तर त्यांना उपाशी मरावं लागेल तेव्हा अशा होणाऱ्या अवैध कारवाया पोलिस प्रशासनाने त्वरित थांबवावी आणि जिल्हा महसूल प्रशासनाचे व तालुका महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी आपले लक्ष देऊन महसूल विभाग नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील रेती घाटाचे कायदेशीर पद्धतीने लिलाव करून रेती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून राज्यातील खनिज संपत्ती ची अवैध चोरी होणार नाही आणि मोल ,मजुर, आणि ट्रक – ट्रॅक्टर चालक मालक यांचेवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार नाही व बेरोजगार तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य उध्वस्त करण्याचे प्रयत्न पोलिस प्रशासनाने करू नये अशी मागणी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार समीर कुणावर यांना निवेदनातून केली आहे.