Home Blog Page 242

भारत जोडो यात्रा शेगावात दाखल सभेच्या आधीच ,अनेक संभ्रम आणि यात्रा जोडो की तोडो असा लोकांना प्रश्न बघुया सत्यता ,

0

 

विठ्ठल अवताडे प्रतिनिधि

आज शेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप होणार आहे , या निमित्ताने गेल्या २१ दिवसापासून सगळे नेते शेगाव शहरात तळ ठोकून दिसलेत ,भव्य दिव्य स्वरूपात सभा आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी शेगाव शहरता होईल याची दाट शक्यता होती , तश्याताच दोन दिवस आधी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माहविकास आघाडीच्या नेत्यांनी या सभेचे निमंत्रण दिल्यामुळे सभेला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब येणार अशी चर्चा झाली आणि काही प्रसारमाध्यमांच्या बातम्या ही दिसल्या , तर बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशानाचा ताफा इतका होता की छावणीचे स्वरूप झाले होते , शहरातील वाहतूक ही दुपारी १२ नंतर बंद करण्यात आली आणि शहराच्या चारही बाजूंनी पार्किंग वेवस्था करण्यात आली , सकाळी जवळ येथे खा, राहुल गांधी यांचे आगमन झाले परंतु महविकसं आघाडीचे इतर मोठे नेते वृतलीहे पर्यंत पोहचले नाहीत तर सभेची वेळ तीन वाजता होती त्यामुळे महाविकसं आघाडीचे मोठे नेते येतीलच की नाही ? हा संभ्रम लोकांमध्ये दिसतो शिवाय गर्दी प्रचंड प्रमाणात दिसत असली तर संख्या बळ रेकॉर्ड ब्रेक असेल का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कडून काळे झेंडे दाखवण्याचे आणि राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावरील टिके साठी माफी मागावी अशी मागणी असताना काही प्रमाणात सभेसाठी आलेल्या लोकांना मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे तर गैर सोय होत असल्याचे समजते आहे त्यामुळे ही सभा आता नक्की इतिहासिक ठरते का हे बघण्या सारखे आहे , लवकरच पुढील उपडेत आम्ही सूर्या मराठी न्यूज कडून प्रसारित करू

नागपूर नर्सिंग ला ऍडमिशन करून देण्याच्या नावावर दोघांनी केली फसवणूक

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 17 नोव्हेंबर
दि. 14 ऑक्टोंबर ला आकांशा सुभाष गायकवाड हिंगणघाट पोलीस स्टेशन तिच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल कलम 420,34 अंतर्गत गुन्हा दाखल .
आरोपी मोना गावंडे रा. प्रज्ञा नगर हिंगणघाट व शुभम दुबे रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट यांच्याशी माझी मैत्रीण प्रणिता काटकर रा. आर्दश नगर हिंगणघाट हिचे मार्फत बी.ए.सी. नर्सिग ला अँडमिशन करणे साठी ओळख झाली. प्रणिता काटकर हिने सुध्दा मोना गावंडे व शुभम दुबे यांच्याशी बी. ए. सी. नर्सिंगला अँडमिशन करणे साठी पैशाचा व्यवहार केलेला आहे. डिसेंबर महिण्या मध्ये मोना गावंडे व शुभम दुबे है दोघेही माझे घरी आले व तीने मेडीकल कॉलेज नागपुर येथे बी.ए.सी नर्सिंग प्रथम वर्गाला ऍडमिशन करणे कामी 1,10,000/- रु डोनेशन म्हणुन व 15000/- रुपये कॉलेज ची वार्षीक फी मागितली तेव्हा मी एवढे पैसे भरणे शक्य नाही, असे म्हटले तेव्हा त्यांनी आताचे 20,000/- रु. द्या म्हटले व मुळ लिव्हींग 12 वी व 10 वी वर्गाची मुळ मार्कलिस्ट व बोर्डसर्टीफिकेट, मुळ कास्ट सर्टीफिकेट, मुळ डोमेशिअल सर्टीफिकेट, असे मागितले तेव्हा मी त्यांना मी कॉलेज ला येवुन कागदपत्रे व पैसे देतो, असे म्हटले तेव्हा त्यांनी मला तु जर कॉलेज ला आली तर तुला जास्त डोनेशन सांगतील. त्यामुळे तु आमच्या कडे पैसे व डाक्युमेंट्स दे. आम्ही तुझी अँडमिशन करुन देवू, असे म्हटल्याने मी त्यांना माझे मुळ कागदपत्रे दिले व माझ्या वडीलानी त्या दोघानाही 20,000/- रु. रोख रक्कम दिली. त्यानंतर दि. 31 मार्च 2022 ला मी, मोना गांवडे हिला फोन करुन अँडमिशन बाबत विचारले असता तिने सांगितले की, तुझी अँडमिशन कल्याण इंन्स्टिट्यूट, राजुरा जिल्हा, चंद्रपुर येथे होते. त्यासाठी तु 35000/- रु दे व ओरिजनल कॉस्ट व्हलीडीटी दे असे म्हटले. तेव्हा मी तीला घरी विचारुन सांगते असे म्हटले. त्यानंतर दिनांक 4 एप्रिल 2022 ला मोना गावंडे हिने मला तिचा फोन पे क्रमांक 7798714027 असा सांगुन त्यावर 35000/- रु पाठवायला सांगितले. तेव्हा तीने मला दिलेल्या फोन पे क्रमांकावर 25000/- रु पाठविले. त्यानंतर तीने मला सांगितेले की, तुझी अँडमिशन कल्याण इंन्स्टिट्यूट, राजुरा जि. चंद्रपुर येथे झालेली आहे, असे सांगितले, तेव्हा मी तिला मला नागपुर मध्ये अँडमिशन करायची आहे मला राजुरा मध्ये अँडमिशन नाही पाहीजे. मला माझे कागदपत्र व पैसे परत कर, असे म्हटले असता तीने मला कल्याण इन्स्टिट्यूट, राजुरा जि. चंद्रपुर येथे तुझे कागदपत्र आहे. तेथुन तु घेवुन जा व तुला दोन ते तीन दिवसा मध्ये पैसे परत करतो. अस म्हटले परंतु तीने आज पर्यंत मला माझे पैसे परत केले नाही, मी नागपुर येथे अंजनी रोड नागपुर येथे लोकेश सर यांनी माझे सर्व मुळ कगदपत्र आणुन दिले. माझी मैत्रीण प्रणिता काटकर रा. आर्दश नगर हिंगणघाट हिने सुध्दा मोना गावंडे व शुभम दिवे यांना दोघानाही बी.ए.सी. नर्सीगला अँडमिशन करणेसाठी 1, 10,000/- रु दिले होते. प्रणिता हिची कल्याण इंन्स्टिट्यूट राजुरा जि. चंद्रपुर येथे अँडमिशन झाली असुन प्रणिता हिने राजुरा येथून अँडमिशन कॅन्सल केली परंतु मोना गावडे व शुभम दुबे यांनी प्रणिताला अद्यापावेतो तिच्या कडुन घेतलेले पैसे परत केले नाही. व पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. मौना गावंडे व शुभम दुबे यांनी बी.ए.सी नर्सिंग मध्ये अँडमिशन करुन देतो असे म्हणुन माझ्या कडून 45000/- रु व माझी मैत्रीण नामै प्रणिता काटकर हिच्या कडुन 1,10,000/- रु घेवुन नागपुर येथे अँडमिशन न करता माझी फसवणुक केली आरोपी विरोधात आज दि.17 नोव्हेंबरला अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुक्ला करीत आहे

मारूळ ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या भुमिगत गटारींचे काम निकृष्ठ प्रतिचे कामाची चौकश करावी

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायत kअंतर्गत बांधण्यात आलेल्या भुमिगत गटारीचे बांधकाम हे संबधीत ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले असुन या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे लिखित निवेदन रिपाई (आठवले गट )च्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे . या संदर्भात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना दिलेल्या निवेदनात राजु रमजान तडवी यांनी म्हटले आहे की , मारूळ तालुका यावल येथील ग्रामपंचायती अंतर्गत गावात भुमिगत गटारींचे काम हे शासनाने ठरवुन दिलेल्या अंदाजपत्राकानुसार करण्यात आलेले नसुन ठेकेदाराच्या माध्यमातुन गावातील जुन्याच गटारींवर नवे बांधकाम दाखवण्यात येणार असल्याचे गोंधळ सद्या सुरु आहे . यामुळे ज्या उद्देशाने शासनाच्या लाखो खर्चाच्या निधीतुन मारूळ बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर भुमिगत गटारींचे काम होणे अपेक्षीत होते मात्र तसे होतांना दिसत नाही . तरी या सर्व निकृष्ठ व बोगस गटारींच्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात येवुन संबधीत ठेकदाराकडुन योग्य प्रकारे व गुणवत्तापुर्ण करून घ्यावे तसेच संबधीत ठेकेदार जो पर्यंत शासकीय अंदाज पत्राकानुसार भुमिगत गटारींचे काम करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये , पंचायत समितीच्या वारिष्ठांकडुन जर या कामांची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या माध्यमातुन यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी यांनी निवेदन स्विकारले

अवैद्यरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक..

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट दि.१७ नोव्हेबर
शहरामध्ये पेट्रोलींग करीत असता बस स्थानक शेजारील शिवमंदीराचे परिसरात २ इसम अवैध गांजाविक्री करीत असतांना आढळले.
हिंगणघाट पोलिसांचे डीबी पथकाने त्यांना दि.१५ रोजी असता अटक केली असता त्यांचेकडून १०५ ग्राम वजनाचा सुमारे ११०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
सदर आरोपींची सागर उर्फ स्वागत दुर्गाप्रसाद यादव(२१)रा. रामनगर वार्ड व हिमांशु रमेशराव सोनकुसरे(२१) रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट अशी ओळख आहे.
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळ एका प्लास्टीक पन्नीमध्ये १०५ ग्रॅम वजनाचा गांजा एकुण किमंत १००० रू. चा माल मिळाला. उपरोक्त प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अप. क्र. ११९३/२०२२ कलम ८, २०(ब) २९ एन.डी.पी.एस. अन्वये आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनात सपोनि. प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.

धारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी पंचायत समिती कार्यालय मधे रक्तदान शिबिर कार्यक्रम मधे मध्यप्रदेशातील बुराहनपुर येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ब्लड कलेक्शन वैन घेऊन या रक्तदान शिबिर मधे आपल्या सहकारी डाक्टर सोबत आले तसेच धारणी ऐथील उपजिल्हा व तालुक्यातील रुग्णालय अंतर्गत जेवढे रूग्ण बुराहनपुर जिल्हा रुग्णालयात उपचार करीता जातात त्यांना दवाखान्यातील रेफर सिट वर ब्लड सुविधा व ऊपचर केला जातो आज धारणी पंचायत समिती कार्यालय अंतर्गत शिक्षक तसेच ग्राम सचिव, पंचायत समिती अधीकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिर मधे ब्लड डोनेट केले यावेळी उपस्थित पंचायत समिती चे गटविकास अधिकारी महेश पाटील,मय्युर दलाल, सचिन राठोड वैद्यकीय अधिकारी, डॉ तिलोत्तमा वानखडे तालुका आरोग्य अधिकारी ,सौ कविता पवार विस्तार अधिकारी आरोग्य, तसेच बुराहनपुर डॉक्टर नसिम, डॉक्टर कमलेश सालवे, सुभाष चव्हाण, फारुख खान,स्वप्नील ढगे, लक्ष तीवारी व, अतुल जाधव यांनी ब्लड शिबिर मधे मोलाचे परीश्रम व योगदान दिले दुपारी चार वाजेपर्यंत 150 कर्मचारी नी ब्लड डोनेट केले व ब्लड डोनेट करणार्या कर्मचारी ची सारखीच गर्दी दीवसभर होती

धारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली चे कामे निक्रुष्ठ

0

 

संदीप राऊत धारणी

धारणी शहर मध्ये सध्या आवश्यकता असलेले रोड सोडुन भलत्याच ठीकानी ठेकेदारांच्या मर्जी ने कामे शुरु आहे मात्र या कामावर नगर पंचायत कार्यालय चा ऐकही अभीयंता हजर नसुन ठेकेदार आपल्या मर्जीने कामे करत आहे परीनामी तीनच महीन्यात रोड नाली चे हाल समोर दीसत आहे प्रभाग क्रमांक पाच मधे जिव घेना खड्डा पडला आहे, तसेच पोष्ट आॅफीस रोड वर सहा महीन्यापासुन रोड चे हालच हाल झाले आहे व रोड वर सांड पाणी वाहत आहे पेव्हीगं ब्लॉक रोड वरून फुटुन पडले आहे मात्र नगर पंचायत अधिकारी आॅल ईज वेल,असल्याचा देखावा करत आहे धारणीत शुरु असलेल्या बोगस विकास कामावर ठेकेदार ने काम केल्यानंतर अभियंता ची हाजेरी लागते वास्तविक पाहता संपूर्ण कामे शाखा अभियंता च्या देखरेखीखाली झाली तरच धारणीचा रोड व नाली बांधकाम व्यवस्थीत रीत्या होऊ शकते असे सुज्ञ नागरिकांन कडुन बोलले जात आहे

दत्तापूर धांदरवाडी येथील आत्माराम राठोड यांचा रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू:

0

 

(तुकाराम राठोड)

प्रतिनिधी:(सिंदखेडराजा)तालुक्यातील दत्तापूर (धांदरवाडी) येथील रहिवासी आत्माराम राठोड वय ४५ वर्ष यांचा आज सकाळी ट्रक व मोटरसायकल दुर्घटने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.ही घटना माळसावरगाव घाटात घडली आहे.बेधुंद ट्रक चालकांने मोटरसायकला उडवल्याने आत्माराम राठोड यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.आत्माराम राठोड हे दुचाकीवरून माळसावरगाव घाटातून प्रवास करीत होते.एक्सीडेंट एवढा भीषण होता की,आत्माराम राठोड यांच्या गाडीला जोरात धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले आहे.ही घटना अतिशय दुर्देवी व मन हेलावून टाकणारी आहे.या घटनेमुळे(दत्तापूर)धांदरवाडी या गावावर व तांड्यावर शोक-कळा पसरली आहे.आत्माराम राठोड यांच्या पश्चात-पत्नी,आई-वडील, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.या घटनेमुळे राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर राठोड परिवाराला या दुखातुन सावरण्याची सद्बुद्धी देवो.हि नम्र विनंती.”ओम- शांती- ओम”, “भावपूर्ण श्रद्धांजली”.

कुरूळ येथे जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे दैवत,प्रेरणास्थान, जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती परधान समाज कुरूड च्या वतीने मोठ्या उत्साहात,आनंदात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात नाचत-गाजत रॅली काढण्यात आली.जनजागृती मोहीम राबवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.मिरवनुकीत परधान समाजातील सर्व पुरुष महिला,युवक-युवती व गावातील इतर नागरिक, तसेच बाहेर गावातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.
दरम्यान डॉ किरसान,महेंद्र ब्राम्हणवाडे,राजेश ठाकुर, सरपंच विनोद मडावी, मुख्याध्यापक बंडू सेडमेक,गट साधन केंद्र चामोर्शीचे विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,देवळीचे डॉ मेश्राम,पोलिस पाटील यामिना भोयर,महेश परचाके,पांडुरंग तलांडे,सुरेश मरसकोल्हे,मोरेश्वर गेडाम,राजेंद्र गेडाम,सुभाष मडावी,कालिदास मडावी, प्रमोद परचाके,छगन टेकाम,रामदास सडमाके,महेश मडावी व सर्व विर बिरसा मुंडा आदिवासी परधान समाज संघटना कुरूड आणि गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ मेश्राम, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते व मुख्याध्यापक बंडु सेडमाके यांचे उपस्थित बहुसंख्य नागरीकांसाठी मार्गदर्शन लाभले.

हेडलाईन- ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एम आय एम) मार्फत शेगाव तहसीलदारांना निवेदन

0

 

शेगाव प्रतिनिधि इस्माइल

महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाला मदत करण्यासाठी व समाजाच्या बेरोजगार तरुणांना शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुलांना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. परंतु या मंडळामार्फत फक्त शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात आहे.
शैक्षणिक कर्ज योजने सोबतच बेरोजगार तरुणांना मंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज प्रकरण मंजूर करून, त्यांना कर्ज वाटप करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाने मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्वातंत्रपणे उघडण्यात यावे. व कर्ज मंजूर प्रकरण हे मुंबई ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयातून करण्यात यावे. वरील मागण्या तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय व संबंधित मंत्री यांनी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चासत्र बोलावून तत्काळ मार्गी लावावा अन्यथा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ऑल इंडिया मजलीस फतेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. पुढील सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा इशारा देखील देण्यात आला. आपल्या सहिणीशी निवेदन देताना (एम.आय.एम) चे शहर अध्यक्ष शेख मुख्तार हाजी शेख बुढाण, शेख जहीर शेख जमीर, शेख इरफान शेख इकबाल ,शेख सावीर शेख सत्तार, शेख मोईन शेख मुनाफ,अजगर बेग अख्तर बेग,शेख निस्मिल्लाह शेख इस्माईल,मोहम्मद जावेद मोहम्मद इकबाल इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

भारत जोडो महाराष्ट्राच्या शेवटच्या सभेला सोनिया गांधी , शरदचंद्र पवार , उद्धव ठाकरे एकाच मंचावरून सांगता करतील ?

0

 

स्थानिक भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात असताना शेवटची सभा दिनांक १८-११-२०२२ रोजी शेगाव येथे संपन्न होणार आहे ,या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून शेगाव शहरात लगबग सुरू झाली असताना काँग्रेस पक्षाचे सर्वच बडे नेते शेगाव मध्ये येत जात असल्याचे दिसत होते तर या निमित्ताने संपूर्ण शेगाव शहर काँग्रेस मय झाल्याचे दिसत असताना आज सकाळ पासून या सभेला काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी राष्ट्रवादी चे शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हजेरी लावतील तर अशी चर्चा सुरू आहे ,तर या संदर्भात असे की महाविकास आघाडी स्थापन होऊन तीन वर्ष झाले आहेत आणि अश्यातान महविकस आघाडीची एकजूट दाखवून विरोधना एकप्रकारे शक्तिप्रदर्शन दाखवण्या साठी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना या सभेचे आमंत्रण दिल्या मुळे या सभेमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तीन ही मोठे नेते एकत्र येऊ शकतात यात शंका नाही ,सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार यांची उपस्थिती राहील असे समजते तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यात जाहीर सभा असल्या मुळे या विषयी स्पश्ट मत सांगता येणार नाही ,अवघ्या तीन दिवसावर सभा असताना आता मोठ्या नेत्यांची उपस्थितीच्या चर्चेने तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण दिसत आहे हे मात्र नक्की