Home Blog Page 243

येत्या दोन दिवसात भारत जोडो यात्रा संतनगरी शेगाव मध्ये दाखल होणार

0

 

इस्माइल शेगाव प्रतिनिधि

नफरत छोडो भारत जोडो या संकल्पनेने खा. राहुल गांधी भारत जोडो पदयात्रा संपूर्ण भारतामध्ये करत असून कर्नाटक येथून पदयात्रेचा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील जील्हातून लवकरच बुलढाणा जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे ७ नोव्हेंबर 2022 रोजी त्यांची पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड येथून देगलूर या ठिकाणीं दाखल झाली. लवकरच पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे त्यात विशेष म्हणजे संत नगरी शेगाव येथे 18 नोव्हेंबर रोजी पदयात्रा दाखल होणार असून,मोठ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तसेच लाखोच्या संख्येने मोब जमेल याच कल्पनेने शेगाव मध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने समितीच्या आयोजन केल्या जात आहे.संत नगरी राहुल गांधीं यांच्या पोस्टरने गजबजली आहे राहुल गांधी राज्यात 14 दिवस असून मोठे पदाधिकारी तसेच विविध ठिकाणी पदयात्रेचे दरम्यान लोकांची संवाद साधतील येथे 18 11 2022 ते 20 11 2022 जिल्ह्यात होणाऱ्या राहुल गांधी लोकसभा सदस्य यांनी भारत जोडो पदयात्रेचे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जलम जळगाव जामोद येथील येथून मध्य प्रदेश राज्यांमध्ये प्रवेश करणार आहे सदर पदयात्राही शेगाव जलब माटरगाव वडशिंगी जळगाव जामोद निमखेडी भिंगारा तूनखुटी या गावातून मुख्य मार्गाने जाणार असून सदर पदयात्रा पाहण्याकरिता सोबत चालण्याकरिता हजारो नागरिक येण्याची शक्यता असल्याने सदर मार्गावर वाहतूक सुरू असल्यास पदयात्रेस अडचण निर्माण होऊन एखादा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर मार्गावरील वाहतूक दिनांक 18 11 2022 दिनांक 20 11 2022 नमूद केल्याप्रमाणे पर्यायी मार्गाने वळवणे गरजेचे असल्याबाबत कळविल्या जात आहे दंड अधिकारी बुलढाणा मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहे

प्रचलित मार्ग 18.11.2022
शेगाव ते अकोला

पर्यायी मार्ग – शेगाव ते खामगाव ते बाळापूर ते अकोला या मार्गे किंवा शेगाव निंबा फाटा ते उरळ गायगाव मार्गे अकोला

२) प्रचलित मार्ग – शेगाव ते बाळापूर

पर्यायी मार्ग – शेगाव ते खामगाव ते बाळापूर

३) दिनांक 19 11 2022 प्रचलित मार्ग- शेगाव ते जलंब जाणे येण्याकरिता

पर्यायी मार्ग- शेगाव खामगाव मार्गे जलम शेगाव कालखेड फाटा येउलखेड मच्छिंद्र खेड मार्गे माटरगाव जलम

शेगाव ते खामगाव लांजुळ खोलखेड माटरगाव भास्तन ते जलम भास्तन सगोडा मनसगाव शेगाव जलम

४) प्रचलित मार्ग दिनांक 20 11 2022 भेंडवळ ते जळगाव जामोद जामोद

पर्यायी मार्ग- भेंडवड ते पातूर्डा जळगाव जामोद जळगाव जामोद नांदुरा जलम

वडशिंगी मराखेड चांगेफळ ते मराखेड संग्रामपूर कडून जळगाव जामोद चांगेफळ मार्गे भेंडवळ

अशा स्वरूपाची जिल्ह्यातील पदयात्रा संपन्न होणार असल्याचे दिसत आहे.

विरावली गावात मोठ्या प्रमाणात विविध समस्या . उपाययोजना करावी म्हणून यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य ॲड देवकांत पाटील यांनी दिले निवेदन.

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

विरावली गावात मोठ्या प्रमाणात समस्यांनी थैमान घातले असून वेळो – वेळी मासिक मीटिंगमध्ये तोंडी- लेखी सूचना देऊनही सरपंच ,सचिव याकडे दुर्लक्ष करत असून वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहेत गटारांची अवस्था अत्यंत खराब- दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे विरावली गावातील मेन रस्त्याचा गटारीवरील धापा पाच ते सहा महिन्यापासून तुटलेला असून वाहने जे – जा करतांना अपघात झाल्यास शारीरिक – आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे , शिवाय रस्त्याने चालताना त्या गटारीच्या धाप्यावरून लहान मुल म्हातारे माणसे यांचे पाय गटारीच्या अस्वच्छ, दुर्गंधी , पाण्याने खराब होत आहे. वाहने त्या (ध्याप्यावर ) गटारीमध्ये आपटली जातात त्या वाहन खराब होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंड खराब अवस्थेत असून त्याच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्याची दुरुस्ती करून तेथे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे , त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोग निधीतून खालचे गाव फ्लेवर ब्लॉक बसवणे त्याचप्रमाणे गावात जाणारा मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड होऊन जाते लहान मूल म्हातारी माणसे यांना पायी चालणे शक्य होत नाही वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागते यापूर्वीही ग्रामपंचायतला सरपंच सचिव यांना निवेदन दिले आहे तरी या मुख्य रस्त्यावर कॉंक्रिटीकरण प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक मुतारी ची मागणी मासिक मीटिंगमध्ये अनेक वेळा केली गेली त्या कडेही दुर्लक्ष होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील शेजारी असणाऱ्या नाल्यात सांडपाणी साचले जात असून त्यातून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी त्या सांड पाण्याचे सुनियोजन करून नाल्याचे खोलीकरण करणे गाळ काढणे आवश्यक आहे अशा अनेक महत्त्वाच्या या मागण्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा विरावली गावातील नागरिक व आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तरी आपण आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन वरील सर्व मागण्या मान्य कराल ही अपेक्षा व मागणी यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य ॲड देवकांत बाजीराव पाटील यांनी सरपंच सचिव ग्रामपंचायत विरावली यांच्याकडे केली आहे .

सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था संदर्भात,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी केली पाहणी:

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत आहे.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात वारंवार निर्माण झाली आहे.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सोशल मीडिया,प्रिंट मीडिया तसेच युट्युब चायनल च्या माध्यमातून अनेक जणांनी या रस्त्या संदर्भात शासन- प्रशासनावर आरोप- प्रत्यारोप केले आणी पहावयास मिळाले.तसेच सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड-मानेगाव-रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्त रस्ते की रस्त्यात खड्डे अशी स्थिती निर्माण झाली आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा देखील मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवासांना व खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात प्रवाशी भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा नाहक भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना विलंब लागत असल्यामुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार म्हणावे लागतील.या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल दुरुस्ती व डाग-डुगी करावी व नवीन व सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे.अशी मागणी मानेगाव व मौजपुरी सर्कल तसेच जालना तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल.तसेच
या रस्त्यासाठी दिनांक ०७/११/२०२२ रोजी सोमवारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देण्यात आले होते.पण काही प्रमाणात प्रशासनाला जाग आली व अधिक प्रमाणात जाग करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी दिनांक १६/११/२०२२ रोजी जिल्हाधिरी कार्यालय जालना येथे सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपोषणाला उपस्थित राहावे असे आवाहन रस्ता संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे.

आदिवासी तांड्यावर रिपाई ने केला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अनोखा बालदिन साजरा…

0

 

जळगाव जामोद येथील वाडी खुर्द येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनाचे औचित्य साधून रिपाईच्या वतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या परंतु सद्यस्थितीत शिक्षण प्रवाह उच्चणाऱ्या पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी नाविन्यपुर्ण उपक्रम वाडी खुर्द येथील पारधी तांड्या वरील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य ज्ञानवर्धक साहित्य यासह गुलाब पुष्प व खाऊचे वितरण करून या पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी पारधी तांड्यावरील शिक्षणापासून वंचित असणारे विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना रिपाई चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांच्यासह भास्कर भटकर अजब आगरकर अरुण शिरसाठ सतीश तायडे यांच्यासह पारधी तांड्यावरील विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. ०८ मधील ४०० लाभार्थ्यांचे ‘धन्यवाद, मोदीजी !’ शुभेच्छा पत्र

0

 

सोलापूर प्रतिनीधी : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताचे लोककल्याणकारी निर्णय घेऊन, विविध योजना आणून कार्यान्वित केल्याअसून. सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी जनआधार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अष्टोप्रहर मेहनत घेत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थांकडून झालेल्या एक हजार लाभार्थ्यांतील सर्व योजना मिळुन 400 लाभार्थ्यांनकडुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कृतार्थ भावनेने आभार व्यक्त करण्यासाठी आभारपत्रं पाठवून देणार असल्याचे आनंद गोसकी यांच्याकडुन सांगण्यात आले.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंर्गत सामान्य घटकातील रुग्णाला शासनाने निश्चित केलेल्या काही खासगी रूग्णालयात ५ लाख खर्चापर्यंतचे मोफत उपचार होतात. या योजनेसाठी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आणि भाजपचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी शिबीराच्या माध्यमातून एक हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड बनवून दिले.

पी. एम. स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाले, भाजीवाले, चहा कॅन्टीन अशा छोट्या-छोट्या व्यवसायांना चालना मिळावी, या उद्देशाने पी.एम. स्वनिधी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिका युसीडी विभागामार्फत अनेकांना सीएसी सेंटरच्या माध्यमातून जनआधार फाऊंडेशनने अर्ज भरून देऊन, १४० लाभार्थ्यांना, १० हजार रूपयांचं मिळवून दिले. दुसऱ्या टप्यात पी.एम. स्वनिधीच्या माध्यमातून २० हजार रूपयांचे कर्ज मिळवून दिले. कोरोनाच्या काळात कोव्हिड लसीकरण शिबीर राबवुन दिलेल्या नागरीकांकडुनही मोदीजींचे आभार व्यक्त केले.

‘चुल मुक्त भारत’ या अभियानांतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून २९० गॅस कनेक्शन, गॅस, शेगडी, रेग्युलेटर, लाईटरचे सेट लाभार्थांना देण्यात आले, या सर्व लाभार्थांक देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जूना प्रभाग क्र. ०८ नविन प्रभाग क्र १५ व जनआधार फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक्ष घरोघरी जाऊन प्रभागातील नागरीक कुठल्या योजनेचा लाभ याची विचारणा करून केंद्रसरकार च्या योजनेचा लाभ गेतलेल्या अशा सर्व लाभार्थ्यांकडून, ‘धन्यवाद मोदीजी ! शुभेच्छा पत्र लिहून घेऊन भाजप शहर कार्यालयात शहराध्यक्ष विक्रम देशमुख शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख , प्रशांत फत्तेपुरकर आणि ‘धन्यवाद, मोदीजी’ उपक्रमाचे संयोजक दत्ता पाटील सर दत्ता बडगु यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘धन्यवाद, मोदीजी’ लाभार्थ्यांकडुन भरून घेतलेले पोष्ट कार्ड सोलापूर भाजपा शहर कार्यालयातुन प्रदेश कार्यालयात पाठणार आल्याची माहिती भाजपा कार्यकर्ते धन्यवाद मोदीजी या अभियानाचे सहसंयोजक आनंद मधुकर गोसकी यांनी दिली.

रानमांजरच्या पिल्लाला समजले बिबट्याची पिल्ले

0

 

@ बटवाडी शिवारात पसरले होते भीतीचे वातावरण

बाळापुर तालुक्यातील बटवाडी शेतशिवारात एका शेतकऱ्याना दोन पिल्ले दिसली ती पिल्ले बिबट्यांची समजुन लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी पिल्ला सोबत बिबट व मादी पण असेल म्हणून तो रस्स्त्याच बंद केला होता. या बाबत त्वरीत गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले यावेळी वनविभागाचे अधिकारी आर एफ ओ राजसिंह ओवे यांनी वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक संघपाल तायडे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, यशपाल इंगोले, अक्षय पांढरे व मोहोड या रेस्कू टिमला घटनास्थळी पाठविले असता बाळ काळणे यांनी सदर पिल्ले हातात घेऊन शाहनिशा केली असता ती पिल्ले रानमांजराची निघाली ती अंत्यंत छोटी व चांगल्या अवस्थेतअसल्याने तिथेच सोडणे योग्य असल्याने सदर पिल्लांना शेतातच सोडण्यात आले यावेळी वन विभागाच्या चमुने उपस्थित गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले व त्यांच्या मधली भीती दूर केली या प्रसंगी ज्ञानेश्वर आखरे, दत्ता आखरे, जगन्नाथ आखरे, अंकुष मते, अरविंद कोकाटे,आदी गावकरी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

सुर्या न्यूज तालुका प्रतिनिधी संतोष काळे बाळापूर अकोला
_________________________________

विरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के वाय सी योजना.

0

 

(तुकाराम राठोड)

जालना-सिईओ मॅडम यांनी विरेगाव ग्रामपंचायतला भेट दिली आणि आविष्यमान कार्ड विषयी माहिती घेऊन चर्चा केली. आणि येत्या आठ दिवसांत सर्व डाटा झिरो झाला पाहिजे असे आदेश दिले आणि लगेच हि दखल आमचे ग्रामपंचायत आपरेटर विषाल मोठे यांनी घेतली आणि त्यांनी सहकार्यांना सोबत घेऊन डोर टू डोर आविश्यमान कार्ड योजनेंतर्गत जनतेला जनजागृती करून थेट योजनेंतर्गत माहिती दिली आणि त्यांच्या घरी जाऊन थेट आँनलाईन प्रोसेस सर्व लाभार्थी यांच्या घरीच करून अशक्य काम क्षणात शक्य करून दाखवले. विषाल मोठे याचं कौतुकास्पद कामगिरी ग्रामपंचायत कधीही विसरणार नाही असे सरपंच अमोलभैय्या जाधव हे म्हणले. त्यांना सहकार्य म्हणून आशा शेविका अगंनवाडी शेविका महिला बचतगटांच्या प्रमुख महिला तसेच आमच्या ग्रामपंचायत सचिव शारदा साबळे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी ही वेळोवेळी लक्षवेधी सूचना करत सहकार्य केले आहे अश्या सर्व पदाधिकारी यांचे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी आभार मानले आणि भविष्यात जनहितासाठी नेहमीच आपण सोबत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी काम करूयात- सरपंच अमोलभैय्या जाधव.

यावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात गुन्हा दाखल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल चोपडा राज्य मार्गावरील रस्त्यावर वाहनचालकाचा वाहना वरून ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात एका मृत्यु झाला असुन , पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक ९नॉव्हेबरच्या रात्री ९ वाजता यावल चोपडा मार्गा वरील केसरबाग हॉटेल जवळ ट्रक वाहन चालक राजु गोविंदसिंग ( गब्बर भाई ) राहणार इधलपुर तालुका मणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची १० चाकी मालट्रक वाहन क्रमांक आरजे ११जीए ७३८०हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोबाईल बोलत भारद्याव वेगाने वाहन चालवित असतांना , चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने मालट्रक मधुन निघुन उडी मारीत असतांना रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या एका झाडावर मालट्रक आदळुन झालेल्या भिषण अपघातात स्वत गंभीर जख्मी होवुन मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत ठरला आहे . याबाबत महावीर कन्हैलाल राजपुत वय २८वर्ष राहणार ईधलपुर तालुका माणिया जिल्हा धौलपुर ( राजस्थान ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वाहनचालक राजु गोविंदसिंग यांच्या विरूद्ध भादवी कलम३o४ ( अ ) २८९ , ३३७, ३३८ कलमासह मोटर वाहन कायदा नियम १८४ ( सी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या अपघाताचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

ठाकरे गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्या जामीनवर सुटका झाल्याचा आनंद शिवसेनेकांनी फटाकेच्या आतिषबाजीत जल्लोषात केला आनंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शिवसेनाच्या वतीने शिवसेने(ठाकरे गट )ची मुलुक मैदान तौफ प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने त्यांची ईडीने भाजप सरकारच्या ईशारावर केलेली अटक ही न्यायलयाने बेकायद्याशीर दाखवुन त्यांचा जामीन मंजुर करून घेतल्याचा आनंद जल्लोष शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी , तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे व शहरप्रमुख जगदीश कवडीवाले माजी नगराध्यक्ष दिपक बेहडे यांच्या नेतृत्वाखाली यावल चोपडा मार्गावरील भुसावळ टी पॉईटवर शिवसेनिकांच्या वतीने भाजपा सरकारच्या विरूध्द घोषणा देत फटाकेच्या आतिषबाजीच्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला यावेळी तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शरद कोळी ,शहर उपप्रमुख संतोष धोबी , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , पप्पु जोशी , संतोष वाघ , आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, योगेश चौधरी , अजहर खाटिक , शकील पटेल यांच्यासह मोठया संख्येत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पंचायत समितीतील प्रभारी राजमुळे तालुक्याचा विकास खुंटला— शेखर पाटील

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

येथील पंचायत समिती मध्ये गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या प्रभारी राज मुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समिती मधील विविध विभागाच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्या असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी गट नेते शेखर पाटील यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

येथील पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून गटविकास अधिकारी हे प्रभारी राहीले असल्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच अधिकाऱ्यांकडे हा प्रभार राहिला पंचायत समितीच्या विविध विभागाच्या १५ तक्रारी पंचायत समितीच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये केल्या मात्र संबंधित विभागाकडून त्याचे अद्यापही निराकरण होत नसल्याचा आरोप शेखर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे पंचायत समिती मधील ग्रामविकास विभाग ,बांधकाम विभाग, कृषी विभाग , यासह महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या सुमारे १५ तक्रारी मासीक बैठकीत करण्यात आल्या होत्या ह्या तक्रारी मासिक बैठकीतही पटलावर ठेवण्यात आल्या होत्या मात्र वेळोवेळी तत्कालीन प्रभारी अधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी केली. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी सतस बदलत राहिल्याने तसेच विविध विभागात असलेल्या प्रभारी राज मुळे त्या तक्रारी तशाच प्रलंबित राहिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले . वरिष्ठांकडेही तक्रारी सादर करून तक्रारींचे निराकरण झाले नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या कोणत्याही विभागात अधिकारी/ कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याची तक्रारही त्यांनी करत यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप केला आहे.

तक्रारी प्रलंबित नाही

याबाबत गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले गेल्या दोन महिन्यापूर्वी शेखर पाटील यांनी एक तक्रार केली होती त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत माझ्याकडे दोन महिन्यापूर्वीच पदभार आला असून मागील काळातील त्यांचे तक्रारी संदर्भात माझ्याशी बोलणे झाले नाही. तरीही त्यांच्या प्रलंबित तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल.