Home Blog Page 244

सावंगी तलाव ते बर्डी रस्ताचे काटेरी झुडूप देत आहे आपघाताला आमंत्रण:

0

 

प्रतिनीधी-जालना- तालुक्यांतील सावंगी तलाव ते बर्डी या गावाला जाताना काटेरी झुडुपांनी विळखा घातला आहे.हा रस्ता डांबरीकरण २०१५/२०१६ मध्ये मुख्यंमंत्री ग्रामसडक योजना अंर्तगत रस्ताचे काम झाले असुन,आजपर्यत हा रस्ता साईड पंखे,खडे बुजवने, रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये दुरुस्ती करणे अशा कोणत्याच कामाला अजपर्यत मुहूर्त लागला नाही,सावंगी तलाव ते बर्डी,अंतराला,उमरी तसेच सेलु व पंचक्रोशीतील गावांत जाण्याच्या मुख्य रस्त्यावर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.तसेच येथील नागरिक जीव धोक्यात घालून व मुठीत धरून प्रवास करीत आहे.सावंगी तलाव ते बर्डी प्रवास करणे हे आपघाताला आमंत्रण देणारे असुन या रस्त्यावर अनेकदा अपघात झाला आहे.या रस्ता करणार्या ठेकेदारावर कार्यवाई करुन,लवकर रस्ता मोकळा करावा अशी मागणी सावंगी तलाव,बर्डी,अंतरवाला,उमरी येथील जनतेकडून व प्रवासी करत आहे.तसेच रसत्यावर असलेल्या काटेरी झुडुपामुळे नरहरी किंगरे यांचा अपघात झाला होता.त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले व अनेकांना डोळ्याचे आपघात झाले असुन,त्या काटेरी झुडुप संबधीतांनी तोडण्यास सांगावे व रस्ता रहदारीस मोकळा करण्याचा मुहूर्त लवकरात-लवकर काढवा.अशी मागणी येथील गावकरी करत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

मंगल कार्यालयात मुक्कामी गेल्याचे पाहून चोरट्याने लग्न घरी केली चोरी

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट दि.३० ऑक्टोबर
घर बंद करुन मुलीचे लग्न असल्याने पाहुण्यासह सर्व कुटुंबिय मंगल कार्यालयात मुक्कामी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी नगदी रक्कमे सह सोनेचांदीचे दागिने चोरी केल्याची घटना आज दि.३० रोजी उघडकिस आली.
सदर घटना स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथील रहिवासी अशोक श्रावण फूलमाळी(६२) यांचे घरी काल रात्री घडली असून चोरट्यांनी नगदी रुपये ६ हजार ७०० व सोने चांदीचे दागीन्यासह
एकूण ३१ हजार,८०० रूपयांचा माल उडविला.
मिळालेल्या माहितीनुसार श्री अशोक फूलमाळी हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत,स्थानिक वसंत लॉन येथे त्यांची मुलगी कु.प्रिया हिचे लग्न असल्याने काल दि.२९ रोजी लग्नकार्यासाठी आलेल्या पाहुण्यासह सर्व कुटुंबिय विवाहस्थळी वसंत लॉन येथे निघुन गेले,घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी रात्रीतून हाथ साफ करीत ३ ग्राम वजनाची सोन्याची पोत,चाँदीचे इतर दागिने व रोख रक्कम असा एकूण ३१ हजार,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल उडविला.
आज सकाळी कुटुंबातील सदस्य मुलगी घरी गेल्यामुळे सदर चोरीची घटना उघडकिस आली.
घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आली असून पोलिस हवालदार परमेश्वर झामरे,नापोशी आशीष गेडाम हे पुढील तपास करीत आहेत.

पोलीस अधीक्षक नुरल हसन यांना शहरात चार्ली पथक सुरू करा मागणी केली !

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 29 ऑक्टोंबर
शहरात महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा घटना वाढत आहेत शहरातील युवती मध्ये दहशतीचौ वातावरण आहे,अशा घटना लक्षात घेत समाजसेवक सनी बासनवार यांची शहरात चार्ली पथक सुरू कराण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.
शहरात टवाळखोरी च प्रमाण वाढत चाललं आहे.बसस्टाॅप,नंदोरी चौक,बिडकर कॉलेज,झांसी यांनी चौक या परीसरात जास्त या घटना घडत आहे तसचं हिंगणघाट शहरात गेल्या तीन वर्षांत अनेक प्रकरणं झाले आहे यात अंकिता जळीतकांड व अन्य प्रकरण घडले आहे, या घटनांना लक्षात घेता शहरात चार्ली पथकाची गरज आहे यावर चर्चा करण्यांत आली यावर निर्णय घेत शहरात चार्ली पथक सुरू करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सहमंत्री सनी बासनवार यांनी केली .

WARDHA/पोलीस अधीक्षक नूरुल हसन हिंगणघाट येथे भेट देताच खुले-आम दारू विक्री करणाऱ्यावर पहिली कारवाई

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट 29 ऑक्टोंबर अभिषेक मनोज जैसवाल वय 27 वर्ष रा नेहरू वार्ड ॲक्सिस बँकेसमोर राहते घरी अवैध दारू साठा, आहे दिनांक 28 ऑक्टोबर दुपारी3.30 वाजता खबरीच्या माहितीवरून माहिती मिळाली त्या आधारे आम्ही घर झडती केली असल्यास दारू साठा मिळाला यामध्ये रॉयल स्ट्रॉंग कंपनीच्या 90एम, च्या 29 निपा एकूण किंमत 4350 रु. ऑफिसर चॉइस ब्ल्यू कंपनीच्या 180 एम एल च्यानो 9 निपा किंमत 2700 रु.
मॅकडॉल कंपनीच्या 180 एम एल च्या तीन निपा किंमत 900 रुपये असा एकूण विदेशी दारूचा माल 7950 रुपयाचा माल मिळून अला, आरोपीस अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, नितीन तोडासे, अनिल केकतपुरे यांनी केली

डीपी पथकाने भूमि अभिलेख कार्यालय येथून शासकीय लॅपटॉप चोरी करणाऱ्याला केली अटक

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 29 ऑक्टोंबर
दि 19 सप्टेंबर चे दुपारी 4 ते 5 वा. दरम्याण फिर्यादी ही भुमी अभिलेख कार्यालय, हिंगणघाट येथे त्यांचे जवळील डेल कंपनीचे शासकिय लॅपटॉपवर काम करीत असता, कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे कार्यालयातून शासकिय लॅपटॉप चोरून नेल्याचे तक्रारी वरून पोस्टे ला अपराध क्र. 1002/2022 कलम 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद .
सदर गुन्हा दाखल होताच पो. स्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख पो. हवा. शेखर डोंगरे व त्यांचे पथक लॅपटॉप चोरी गेल्या पासुन पो. स्टे. हद्दीमध्ये शोध घेत असता, त्यांना दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी मुखबीर कडून मिळालेल्या माहितीवरून संशईत आरोपी नामे अशोक गोविंदराव भगत, वय 58 वर्ष, रा. विर भगतसिंग वार्ड, हिंगणघाट यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्याने सदरचा लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन एक डेल कंपनीचा लॅपटॉप कि. 45,000 रू. चा हस्तगत केला.
सदरची कामगीरी मा. श्री. नुरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.

हरवले आहेत: – १.नाव:राजेश मुरलीधर काळे .रा:नेर,तालुका जिल्हा जालना

0

येथे दहा वर्षापासून वास्तव्यास आहे.
३.वय ४० वर्ष.मुळगाव:आखणी-पाखणी,तालुका मंठ्ठा,जिल्हा जालना.
४.व्यावसाय:सलुन व्यावसायिक व एक एकर शेती आहे.
५.हवरल्याची तारीख:दिनांक १४/१०/२०२२ रोजी शुक्रवारी संध्याकाळी नऊ वाजता घरातील काळी बॅग व कपडे भरून घरातून निघून गेली आहे.
६.हरवल्याची तक्रार:दिनांक २७/१०/२०२२ रोजी गुरुवारी दुपारी दोन ते तीन दरम्यान मौजपुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
७.फिर्याद देणाऱ्या व्यक्तीचे नाव: गौरव राजेश काळे
८.रंग:गोरा
९.उंची: ६ ते ६.५०.
१०.शरीर वर्णन:सडपातळ.
११.कुटुंबात:एक मुलगा,एक मुलगी,पत्नी,आई-वडील असा परिवार आहे.

कुणालाही सापडल्यास किंवा दिसल्यास पुढील नंबर वर संपर्क करावे.संपर्क क्रमांक:९८३४१३३३४८.८९७५१५४७३८.

पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न व विविध विषयांवर चर्चा

0

 

(तुकाराम राठोड)

प्रतिनिधी:(जालना)जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.श्री.अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना स्वीकारून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल,अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री सावे यांनी दिली.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार,यात काही शंका नाही.तसेच याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे,माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे,माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर,खासदार बंडू जाधव,आ.नारायण कुचे,आ.कैलास गोरंट्याल,आ.संतोष दानवे,जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोरपणा तहसील कार्यालयात शेतकऱ्याचे निवेदन

0

 

कोरपना – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्या प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई मिळणे बाबत आमदार सुभाष धोटे व उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांना शेतकऱ्या तर्फे निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी व पुरामुळे पैनगंगा वर्धा नदी तीरावरील भोयगाव ,भारोसा , एकोडी , पिपरी, अंतरगाव , कोडशी, इरई, परसोडा ,पारडी, जेवरा, रायपुर, मेहंदी, भोईगुडा, तुळशी आदी गावात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील बऱ्याच गावात तीन ते चारदा पिके खरवडून वाहून गेली. या अनुषंगाने शासनातर्फे १३ हजार ६०० रुपये ची मदत तीन हेक्टर पर्यंत जाहिर करण्यात आले. मात्र कोरपना तालुक्यात प्रत्यक्षात थातुर मातूर सर्व्हे करून अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे पुनच सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देते वेळी विजयराव बावणे
सुरेश मालेकर, किसन डोंगे, राजू ठाकरे, अविनाश लांजेकर, राजेंद्र पाचभाई, रमेश बोंडे, दिनकर टाले, घनश्याम काळे, बंडू गेडाम आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सुर्या मराठी न्यूज साठि मनोज गोरे कोरपणा-चंद्रपूर

गुन्हे प्रगटीकरण पथकाकाने लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 27 ऑक्टोबर
फिर्यादी जख्मी नामे प्रज्वल विठठलराव वरभे वय 20 वर्शे रा. सातेफळ त. हिंगणघाट जि. वर्धा हे दि. 27 ऑक्टोंबर रात्री 9 वाजता दरम्यान आपले मोबाईल दुकानातील काम संपवुन त्याची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 ने एकटे सातेफळ गावाकडे परत जात असता रात्री 9.15 ते 9.30 वाजता दरम्यान सातेफळ रोडवरील घोडे यांचे शेताजवळील विहीरीजवळ तिन अनोळखी ईसमांनी गाडीला आडवे होवुन गाडी थांबवीली नंतर फिर्यादी यास गाडीवरून हात धरून खाली पाडले. फिर्यादी यास लाथाबुक्क्याने मारहाण करून धारदार शस्त्राने शरीरावर ठिकठिकाणी वार करून जख्मी केले नंतर जख्मी फिर्यादी याचा रेडमी कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणी पॅंटचे खिष्यातील 1000/- रूपये जबरीने काढुन फिर्यादी जख्मी याची पांढऱ्या रंगाची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 असा एकुण जुमला किंमत 46,000/- रू चा माल जबरीने चोरून घेवुन गेले. जख्मी/ फिर्यादी यांचे मृत्युपुर्व बयाणावरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप. क्रमांक 1099/2022 कलम 394, 397, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात अन्वेषण अधिकारी श्री. सोमनाथ टापरे पोलीस उप निरीक्षक आणी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांनी व त्यांचे पथकाने कसोशीने आणि शीताफीने प्रयत्न करून आरोपी नामे 1) भोजराज तुकारामजी जंगले वय 37 वर्ष, रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट 2) आकाश उल्हास उईके वय 29 वर्ष, रा. सेलु मुरपाड आणी 3) निखीलअशोक भोकरे वय 18 वर्षे रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट यांना निष्पन्न करून ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातुन गुन्हयात जबरीने नेलेली पांढऱ्या रंगाची एक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच. 32/ए.ए./0940 किंमत 25,000/- रूपये, आरोपीतांचे दोन मोबाईल किंमत 20,000/- रूपये असा एकुण 45,000/- रू चा माल जप्त केला. पुढील तपास श्री. सोमनाथ टापरे, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यषवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. के.एम. पुंडकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार सोमनाथ टापरे पोलीस उप निरीक्षक यांचे सह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रषांत वाटखेडेे, आषिश गेडाम, उमेष बेले, संग्राम मुंडे आणी सायबर सेल चे अनुप कावळे यांनी केली.

सिंदखेडराजा राष्ट्रवादी कॉग्रेस ला दिवाळीत फटाके,राजेंद्र अंभोरे सह कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश

0

 

प्रतिनिधी:(मुंबई) सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा धक्का बसला आहे.तबल 30 वर्षा सोबत एकनिष्ठ राहिलेले राजेंद्र अंभोरे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,खासदार प्रतापराव जाधव,माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिंदे गटांमध्ये प्रवेश केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक जी बोरकर,शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख आतिश भाऊ तायडे,सिंदखेडराजा शिवसेना शहर प्रमुख तथा नगरपरिषद सभापती बालाजी मेहत्रे,प्रदीप मेहत्रे,संतोष बर्डे हे प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस ला हा दुसरा धक्का आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप मेहत्रे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे नामदार अतुलजी सावे,आमदार संजय भाऊ कुटे,विनोद भाऊ वाघ,विष्णू भाऊ मेहेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.